Skip to main content

खाऊगल्ली भाग २

लेखक रेवती यांनी गुरुवार, 30/04/2015 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== खाऊगल्ली : भाग १ ================================================================== बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा. तर चला एकमेका सहाय्य करू------- वरील मजकूर त्रिवेणीच्या पहिल्या धाग्यातून ढापला आहे याची नोंद घ्यावी. नंतर तक्रार चालणार नाही. पहिल्या धाग्यावर आलेले नवे प्रतिसाद कळत नाहीत ही श्रीश्री पप्पू अदूबाळ यांची रिक्वेष्ट मान्य करून हा धाग्या त्यांच्या चरणी अर्पण करीत आहोत. चार ओळींच्यापुढे लेखन (ढापलेले का असेना) गेल्याने संमं मजवर क्रिपा करून हा धागा टिकू देतील अशा आशा! आज अपर्णाने सांगितलेल्या पाकृनुसार डाळ कांदा नावाची रेशिपी करून बघतिये. मला हरभरे, जे सुकवल्यावर तपकिरी दिसतात, जे भिजवल्यावर हळदीकुंकवाला ओटी भरण्यासाठी वापरतात त्याच्या उसळीची पाकृ हवी आहे. त्यात फोडणी करताना ओवा घालतात ती! सांगण्याची कृपा करावी. सवडीने पाकृ आली तरी चालेल, लगेच हरभरे आणलेले नाहीत पण आणणार आहे. धन्यवाद.

वाचने 28515
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

In reply to by श्रीरंग_जोशी

पॉईंट नोटेड, श्रीरंग :-) दुव्यांबद्दल दुवा! (बाकी अशा उपयुक्त दुव्यांच्या प्रतिसादांसाठी वाचनखूण कशी साठवायची?)

In reply to by बहुगुणी

थर्ड पार्टी सर्च इंजिन मिपाला जोडून कस्टमाइझ्ड सर्च सुविधा मिपावर देता येईल कदाचित. मी या क्षेत्रात काम करत नसल्याने त्याची केवळ संकल्पना मांडू शकतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

मिसळपाव सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:tpmbqavfq… कस्टम कोड पण आहे जो साइट वर टाकला तर एक सर्च बॉक्स तयार होईल पण इकडे टाकता येत नाहीये

In reply to by टीपीके

या दुव्यावरा मास्तुरे या शब्दाने शोध घेतला तसेच गुगलवर मास्तुरे site:misalpav.com असा शोध घेतला तर सारखे रिझल्ट मिळाले. मिपा स्पेसिफिक सर्च याद्वारे होत आहे पण लेखनप्रकार, उपप्रकार, प्रतिक्रिया असे अतिरिक्त घटक त्या शोधयंत्राला जोडता आल्यास कस्टमाइझ्ड सर्च टूल असे काही म्हणता येईल.

In reply to by श्रीरंग_जोशी

हो, सध्या तरी तसेच आहे. तुम्ही म्हणता तशी सोय करता येईल का माहित नाही (म्हणजे करता येईल पण युझर इंटरफेस गन्डेल) प्रत्येक प्रकारासाठी वेगळे सर्च इंजिन होईल बहुतेक. तुमच्या डोक्यात कसा इंटरफेस आहे?

In reply to by टीपीके

मराठी सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_f… सध्या ह्या साईट वर हे सर्च इंजिन काम करते मिसळपाव मनोगत मायबोली उपक्रम ऐसी अक्षरे

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

हे आवडतं का बघा. यात आता tabs टाकले आहेत https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_f… यात आता अनेक वर्तमान पत्रे पण टाकली आहेत. अजून काही सूचना असतील तर नक्की सांगा मराठी शोध या नावाने एक सोपी युआरल तयार करायचा पण प्रयत्न करतो आहे, hopefullly should work marathishodh.tk

In reply to by बहुगुणी

दुव्यांबद्दल दुवा!>> +१ !! श्रीरंग, दुव्यांबद्दल धन्यवाद! तुम्हाला अशा सगळ्या दुव्यांसाठी दुवा मिळाल्या तर कधी दवाची गरज पडणार नाही! बहुतेक बटाटा-मटार टिक्की करुन पाहीन. पोळी/ ब्रेड बरोबर खाल्ला तर फार बटाटा संपणार नाही ना :) जाता जाता, बटाटा हाईट्स ही पाकृ नाहिये, कथा आहे :)

In reply to by रुपी

एकच काम यांत्रिकपणे केले की अशी हाईट होते ;-) . यापुढे दुवे देण्यापूर्वी बघत जाईन की मजकूर काय आहे... दह्यातलि बटाटा रस्सा भाजि - सहा वर्षांपासून शून्य प्रतिसाद असलेल्या या धाग्यावर कुणी त्याची पाकृ लिहिल्यास उत्तमच.

In reply to by श्रीरंग_जोशी

तो धागा चुकीच्या विभागात टाकलाय ना.. काथ्याकूट मध्ये असता तर खूप पाकृ आल्या असत्या असं त्यांच्या बाकी धाग्यांवरुन वाटतं.:) पळते आता, नाहीतर हा धागा खाऊगलीतून भलतीकडेच जायचा..

In reply to by श्रीरंग_जोशी

बटाटयाच भुजण या नावाचा एक प्रकार, विशेषत: सारस्वत मंडळींकडे, केला जातो असे ऐकले आहे. त्या संबधी माहिती कोणी देऊ शकेल का ?

In reply to by पैसा

या माहिती साठी पैसाताई यांना धन्यवाद .

In reply to by रुपी

एवढ्या पाकृ मिळाल्याच तर निदान सुरुवात करावी म्हणून वरणभाताच्याच बरोबर बटाटे उकडून घेतले. न सोललेले बटाटे पाहून नवर्‍याने ऑफिसमध्ये कुणाच्या डब्यात खाल्ली तशी पाकृ करुन का म्हणून विचारले आणि मीही अगदी आनंदाने हो म्हटले! जेवताना तोंडी लावायला/ साईड-डिश म्हणून खायला घेतलं. जे काही होतं ते खूपच चवदार आणि झटपट होणारं, शिवाय माझ्या लेकानेही स्वतः घेउन आवडीने खाल्लं. तर ही त्याची पाकृ. उकडलेल्या बटाट्याची सालं न काढता भाजीसाठी करतो तसेच तुकडे करुन घ्या. अगदी जेवायला बसण्याआधी तूप-जीरे-हिंगाची फोडणी करुन त्यात ते तुकडे, गरम मसाला आणि मीठ घाला. मोठीच आच ठेवून २ मिनिटे हलवत राहा आणि लगेच वाढा.

In reply to by रुपी

ही पाककृती अमेरिकन ब्रेकफास्ट पोटॅटोजसारखी वाटत आहे. गरम मसाल्यामुळे भारतीयीकरण झाले आहे :-) . झटपट पाकृ म्हणून उपयुक्त आहे.

हि एक मस्त रेसिपी आणि मुलांच्या आवडीची , शिवाय हरभरे ऐवजी कोणतेही कडधान्य किंवा मिक्स करून इतर कडधान्य वापरू शकता. हरभरे रात्री भिजवा . दुसर्या दिवशी कुकर ला वाफवून घ्या , खूप जास्त पण नको गाळ होईल इतके आणि कच्चे पण नको अशा बेताने शिट्ट्या घ्या. आता कांदा , टोमाटो , कोथिंबीर , पुदिना , कैरी मस्त पैकी बारीक बारीक कापून घ्या. असेल तर पालक आणि काकडी सुद्धा कापून घ्या. आवडत असल्यास चिंचेचा कोळ करून घ्या. एका बाउल मध्ये वाफवलेले हरभरे , वरील चिरलेले साहित्य ,मीठ , चिंचेचा कोळ मिक्स कर. वरून चाट मसाला , असल्यास जिरे आणि धने पूड भुरभुरा आणि वरून बारीक शेव घालून दया. चिंचेचा कोळ नसेल किवा आवडत नसेल तर लिंबू पिळून घ्या.

हो हो या रेसिपी चे नाव खुळा च आहे. सलाड मध्ये मोड्णारी साहित्य . मेथी निवडलेली . काकडी लिंबू कोथिंबीर मुळा मुळ्याची हिरवीगार पाने मिरची चवीनुसार मीठ चवीनुसार कृती: मेथी ची पाने , मुळ्याची पाने , कोथिंबीर धुवून निथळायला ठेवा. तोपर्यंत मुळा , काकडी बारीक चिरून घ्या. आता मेथी ची आणि मुळ्याची पाने , कोथिंबीर बारीक चिरून घ्या. सर्व साहित्य मिक्स करा . मिरची बारीक कापून टाका , मीठ चवीनुसार टाका आणि वरून लिंबू पिळून घ्या. टीप: आमच्याकडे उडीद पापड भाजून त्याच्या चुरा (एकदम बारीक नाही ह ) करतात आणि त्यामध्ये शेंगदाणा चटणी (जळगाव स्पेशल ) टाकून तेल टाकून खातात त्यालाही खुळाच म्हणतात आणि रसाबरोबर (आमरस ) तोंडी लावायला हाच खुळा असतो इतर कोणत्या सुक्या भाजी पेक्षा ..

In reply to by स्वीत स्वाति

पौष्टिक वाटत आहे ही पाकृ. आमच्याकडे जो मेथीचा घोळाणा करतात त्याच्याशी बरेच साधर्म्य आहे. घोळाणा म्हणजे प्रामुख्याने मेथी (पालेभाजी) व टोमॅटो - कांदा यांचे सॅलड. चवीपुरते मीठ व तिखट घालायचे व लिंबू पिळायचे.

दोन तीन थेंब माझेही. उथळ पॅनमधे बटर फिरवुन सालासहित किसलेला बटाटाव्यवस्थित अंथरुन घ्यायचा मग मंद आचेवर त्याला ठेवुन झाकण ठेवुन शिजवुन घ्यावा, शिजत आला की वरुन थोडे बटर सोडावे, खालच्या बाजुने कुरकुरीत-सोनेरी झाला की पलटुन घेवुन त्यावर ऑरेगेनो भुरभुरावे + मीठ, आवडत असल्यास एक अंडे फोडुन टाकावे. अंडे ज्यापद्धतीने शिजलेले आवडेल तसे शिजले की खावे. लहान मुलांना हा प्रकार खास आवडतो. बटाटे शिजवुन सालं काढुन त्याच्या इंचाच्या फोडी कराव्यात, परत पॅन मधे बटर किंवा तेल टाकुन त्या फोडी त्यात परतत असताना त्यात मीठ, ऑरेगॅनो, चीझ स्लाइस टाकुन मंदपणे ढवळावे आणी गरमागरम......हादडावे. किंवा बटाट्याची भाजी करुन, बटाटवडे किंवा त्या भाजीत उकडलेले चणे मिक्स करुन पाणीपुरी साठी वापरावे.किंवा तिच भाजी शिळ्या पोळीला थोडे तव्यावर तापवुन किंचीतसे मीठ टाकुन त्यात रोल करुन पुन्हा तव्यावर शेकुन खावी. भेंडी! हाय काय त्यात. बटाटा अपुन को बहुत प्रिये हय. अवर मंगताय तो दोन्तीन आय्ड्या फेकके मारेंगा.

मिसळपावर मिसळपावच्या पाकॄ कोणी कोणी दिल्या आहेत का ? मागच्या आठवड्यात शोधत होतो... शेवटी चकली ताय ची पाकॄ त्यांच्या सायटीवर वाचली.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूक