मलाही कविता सुचली
मलाही कविता सुचली ।। ध्रु. ।।
सक्काळी सक्काळी उठून
ब्रशला पेस्ट मी लावली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। १ ।।
आंघोळीसाठी दरवाज्याची
कडी मी लावली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। २ ।।
हाफिसात निघताना
बुटाची लेस मी बांधली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। ३ ।।
बायकोच्या आज्ञे वरून
रात्री भांडी मी घासली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।। ४ ।।
कवी - अथक घासकडवी
(माझा पहिलाच प्रयत्न आहे तरी गोड मानून घ्यावा ही विनंती .
तुम्हाला कधी सुचते हो कविता ? )
वाचने
7476
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
इकडे कविता सुचत नाहीत..होतात.
इकडे कविता सुचत नाहीत..होतात..
(नकवी) जेपी
कच्चा मसाला कस्ला ठासून
In reply to इकडे कविता सुचत नाहीत..होतात. by जेपी
कच्चा मसाला कस्ला ठासून भरलेला आहे ;)
परंतू आम्ही व्हीआरेस घेत्ली :)
टक्या होऊन जाऊदे...वाटलस याच
In reply to कच्चा मसाला कस्ला ठासून by टवाळ कार्टा
टक्या होऊन जाऊदे...वाटलस याच धाग्यावर टाक
ऐसा नक्को बोलू रे...मेरे हात
In reply to टक्या होऊन जाऊदे...वाटलस याच by जेपी
ऐसा नक्को बोलू रे...मेरे हात मे खुज्ली होना :)
खुज्ली होता तो खुजानेका ,काय
In reply to ऐसा नक्को बोलू रे...मेरे हात by टवाळ कार्टा
खुज्ली होता तो खुजानेका ,काय की शरम. =))
अरे होउन जाउंद्या!
In reply to खुज्ली होता तो खुजानेका ,काय by जेपी
अरे होउन जाउंद्या!
ट्क्या
In reply to अरे होउन जाउंद्या! by दमामि
गुरू आज्ञेने बांधलेला आहे.
तेव्हा त्याला भरीस घालू नका.
साक्षात्कारी वाचक
नाखु
खबर पोचली वाट्टे =))
In reply to ट्क्या by नाखु
खबर पोचली वाट्टे =))
अतिसुंदर!
अतिसुंदर!
अथकपणे अश्याच कविता करा!
मात्र ही कविता 'अभय-काव्य' प्रकारात येत नाही. त्यासाठी काही काळ अभ्यास करा.
स्वप्नातही नाही ! मात्र सर्व कविता आवडतात …
(आणि हो! तुम्ही गुर्जिंचे कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधून ठेवा . )
धन्यवाद!
In reply to अतिसुंदर! by खेडूत
धन्यवाद!
गुर्जी कोण यावर प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे.
मिपापे येकीच गुर्जी हय :)
In reply to धन्यवाद! by दमामि
मिपापे येकीच गुर्जी हय :)
कोण हो?कोण हो?कोण हो?
In reply to मिपापे येकीच गुर्जी हय :) by टवाळ कार्टा
कोण हो?कोण हो?कोण हो?
पहिल्याच दिवशी खफ-खफ आणि
In reply to कोण हो?कोण हो?कोण हो? by दमामि
पहिल्याच दिवशी खफ-खफ आणि प्रतिसाद-प्रतिसाद खेळताय आणि म्हणता गुर्जी नै माहित =))
सुचली ना ! गुड.
सुचली ना ! गुड.
ब्रश करणे आणि आंघोळ, यामधील
ब्रश करणे आणि आंघोळ, यामधील काळात वर्तमानपत्र नेल्याने कविता सुचली नाही वाटते. चला, एकदाचे सुचलेली कविता लिहूनका होईना, मोकळे होणे बरे.
वर्तमानपत्र वाचण्यासाठीच नेले
In reply to ब्रश करणे आणि आंघोळ, यामधील by चित्रगुप्त
वर्तमानपत्र वाचण्यासाठीच नेले असावे अशी आशा करतो =))
सुचली का?
बरं बरं. इथे काहीजणांना कविता होतात.
हे घासकडवी त्या घासकडवींचे
हे घासकडवी त्या घासकडवींचे कोण?
आधी गुर्जी कोण ते कळू दे , मग
आधी गुर्जी कोण ते कळू दे , मग याचे ही उत्तर देतो.
राजेश घासकडवी नामक आयडीला
In reply to आधी गुर्जी कोण ते कळू दे , मग by दमामि
राजेश घासकडवी नामक आयडीला जुने लोक गुर्जी म्हणत असत. आता सांगा आपण कोण ते/त्या!!
मी त्यांचा कुणीच नाही!
मी त्यांचा कुणीच नाही!
महितीबद्दल धन्यवाद!
बढीया!
बढीया!
बायकोच्या आज्ञे वरून
बायकोच्या आज्ञे वरून
रात्री भांडी मी घासली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली
या ओळी मात्र सत्य कथन आहे.
माझी खरकटी वेदना जाणून
In reply to बायकोच्या आज्ञे वरून by विवेकपटाईत
माझी खरकटी वेदना जाणून घेतल्याबद्दल आभार हो, पटाईत भाऊ!
कडी
आंघोळीसाठी दरवाज्याची
कडी मी लावली
आणि काय सांगू
चक्क मला कविता सुचली ।।
कडी लावली नसतीत तर इतरांना पण कविता सुचली असती.
खिक्क
In reply to कडी by तिमा
खिक्क
टक्या, नको तिथं खिक्क करयची
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
टक्या, नको तिथं खिक्क करयची भारी वैट सवय तुझी!
समजला अरसिकपणा
In reply to टक्या, नको तिथं खिक्क करयची by दमामि
समजला अरसिकपणा lllluuuullllluuuuuuu
अहो, मग कविता नाही कादंबरी
In reply to कडी by तिमा
अहो, मग कविता नाही कादंबरी सुचली असती.