रविंद्र पाटील : नाव ओळखीचं वाटतंय ???
रविंद्र पाटील या नावाला स्वतंत्र ओळख नाही पण 'सलमान खान' हा संदर्भ दिला की त्यांची ओळख पटू शकेल.
रविंद्र पाटील हे सलमानचा अंगरक्षक म्हणून नेमलेले पोलिस काँस्टेबल होते, होते म्हटले कारण आता ते या जगात नाहीत. पैसा आणि अधिकार या दोहोंच्या ताकदीने मिळून एका निष्पाप प्रामाणिक माणसाचा कसा बळी घेतला त्याचीच ही कहाणी.
गेले काही दिवस लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेल्या चि.कु.सलमान खान खटल्याबाबत माहिती करून घेतांना काही धागे मिळाले. या संदर्भातील काही लेख आंतरजाल तसेच व्हॉटसएप इ.वर उपलब्ध आहेत त्यातील हा एक त्यात असलेल्या तपशीलवार माहितीमुळे इथे देत आहे.
*** बहुचर्चित अशा सलमान खानच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा आज निकाल लागलाय. सलमान या प्रकरणात दोषी आढळलाय... त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय तसंच २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आलाय. पण, ही शिक्षा रविंद्र पाटीलच्या उद्ध्वस्त आयुष्यासमोर काहीच नाही... रविंद्र पाटीलचा एकच गुन्हा होता आणि तो म्हणजे, या अपघाताच्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल असलेला २४ वर्षांचा रविंद्र सलमानच्या सोबतच त्याचा बॉडीगार्ड म्हणून उपस्थित होता... आता तो या जगात नाही... ३ ऑक्टोबर २००७ रोजी रविंद्रचा डिप्रेशननं आणि क्षयरोगानं बळी घेतला.
➡रविंद्रनं दाखल केली होती एफआयआर...
याच रविंद्र पाटीलनंच सलमानच्या गाडीच्या अपघातानंतर पहिल्यांदा एफआयआर दाखल केली होती. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार दिली होती. मूळचा धुळ्याचा असलेला रवींद्र पाटील १९९८ बॅचचा पोलीस कॉन्स्टेबल.... मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत होता. रवींद्रचे दोन्ही मोठे भाऊसुध्दा पोलीस दलातच कार्यरत होते.
➡रविंद्रनं कोर्टात दिली होती खरी साक्ष...
रविंद्र हा या प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार होता... रविंद्रनं वांद्रे कोर्टात, सलमाननं जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलहून घरी जाण्यासाठी गाडी काढली आणि वेगाने वांद्रेच्या दिशेने निघाला... यावेळी तो मद्य प्यायलेला होता... आपण त्याला याबद्दल जाणीव करून दिली होती, अशी साक्षही दिली होती.
➡रविंद्रवरचा दबाव वाढला...
यानंतर, 'हिट अॅन्ड रन' प्रकरणामुळे रविंद्रवरचा दबाव वाढला होता. तो कोर्टात वकिलांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायलाही घाबरत होता. त्यामुळेच तो डिप्रेशनमध्ये गेला...
➡पोलिसांचीच रविंद्रला वाटत होती भीती...
सीनिअर पोलीस अधिकाऱ्यांनी नोकरीवर अनुपस्थित राहिल्याचा आरोप लावून रविंद्रला नोकरीवरून काढलं होतं. त्यानंतरही पोलिसांनी त्याचा पिच्छा पुरवला... त्यामुळे रविंद्रच्या डिप्रेशनमध्ये अजूनच वाढ झाली. त्यानं मुंबई सोडली आणि दुसरीकडे निघून गेला.
➡कुटुंबीयांपासूनही दूर झाला रविंद्र...
मुंबई सोडल्यानंतर रविंद्र अनेकदा चोरून लपून आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक-दोन दिवसांसाठी मुंबईला येत होता. कुटुंबीयांनीही त्याला या प्रकरणातून काढता हात घेण्याचा सल्ला दिला होता पण रविंद्रनं त्यांचं ऐकलं नाही...
➡साक्ष बदलण्यासाठी दबाव...
रविंद्रसोबत जे काही मोजके लोक होते त्यांच्या म्हणण्यानुसार सलमान खान प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी रविंद्रवर खूप जास्त दबाव होता. परंतु, रविंद्रनं शेवटच्या श्वासापर्यंत आपली साक्ष बदलली नाही. कुठलीही लाच त्यानं स्वीकारली नाही. धमक्यांना भीक घातली नाही.
➡कोर्टात अनुपस्थित राहण्यासाठी तुरुंगवास...
सलमान खान प्रकरणात कोर्टात अनुपस्थित राहण्याच्या आरोपाखाली रवींद्रला जेलमध्ये धाडण्यात आलं. आपल्याला तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचं सांगत रविंद्रनं आपल्याला तुरुंगात सीरियल किलर्सपासून दूर ठेवण्याची विनंती कोर्टात केली होती. पण, त्याची ही मागणी फेटाळण्यात आली.
➡भीक मागण्याची वेळ...
कुटुंबापासून वेगळा झाल्यानंतर रविंद्र बेपत्ता झाला होता... त्याचा ठावठिकाणा कुणालाही माहीत नव्हता. या काळात त्याला रस्त्यावर भीक मागताना अनेकांनी पाहिल्याचं सांगितलं जातं.
➡रविंद्रचे अखेरचे काही क्षण...
दारूचं व्यसन... आणि क्षयरोग
२०००७ मध्ये तो सेवरी म्युनिसिपल हॉस्पीटलमध्ये सापडला. खूप दारू प्यायल्याचा परिणाम म्हणून रविंद्रला क्षयरोग (टीबी) झाला होता. त्यामुळे, त्याच्यावर औषधांचा कोणताही परिणाम झाला नाही... आणि खंगून खंगून रविंद्रनं याच हॉस्पीटलमध्ये ३ ऑक्टोबर २००७ रोजी अखेरचा श्वास घेतला. यावेळी, त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांपैकीही कुणी उपस्थित नव्हतं.
➡न्यायालयानं रविंद्रची साक्ष ग्राह्य धरली...
रविंद्रच्या मृत्यूनंतर २०१४ साली जेव्हा सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला पुन्हा सुरू झाला तेव्हा रविंद्रनं वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात दिलेली साक्ष ग्राह्य धरण्याची सरकारी वकिलांची मागणी मान्य करण्यात आली...
सलमान खान ला पाच वर्षाची सजा झाली. सेशन कोर्ट जवळ बरेच सेलिब्रिटी सपोर्ट करीता आले होते. ब-याच जणांनी टीव्ही चॅनेल समोर चमकून घेतले. काहींनी अकलेचे तारे तोडले.
या सर्व केसचा उत्कृष्ट तपास करणा-या पोलीसांसाठी एकाही व्यक्तीने किंवा मिडीयाने प्रशंसा उद्गार काढलेले दिसले नाही.
सिनेस्टार ला शिक्षा झाली म्हणून सगळे चवीने चर्चा करतात. मिडीया टी.आर.पी. वाढवत बसली. हिरोला आणखी सूपरस्टार बनवतील.
जर हि शिक्षा झाली नसती तर पोलीसांचे वाभाडे मिडीयाने काढले असते आणि पोलीस तेव्हा बदनामीच्या किताबातील हीरो झाले असते. ***
सौजन्य: zeenews.india.com
या बाबतची आणखी माहिती खालील दुव्यांवर मिळू शकेल.
१. http://m.indiatimes.com/news/india/even-death-didnt-shake-his-convictionwe-remember-ravindra-patil-the-prime-witness-in-salman-hitandrun-case-232455.html
२. https://patil.wordpress.com/2013/07/08/ravindra-patil-salman-khan-hit-run-case-the-wretched-witness/
३. http://lighthouseinsights.in/blogger-soumyadipta-banerjee-deletes-his-posts-on-actor-salman-khans-2002-hit-and-run-case-issues-a-public-apology-to-salman-too.html/
दि. ०७/०५/२०१५ च्या मटा मध्येही याबद्दल बातमी आली आहे.
या शिवाय अजूनही बरेच दुवे गुगल वर 'रवींद्र पाटील' या नावाने शोध घेतल्यास मिळू शकतात.
या खटल्यामुळे त्यांची माहिती थोडीफार वर येत आहे नाहीतर ज्या एका माणसाच्या साक्षीमुळे मुख्यत्वे सलमानवर खटला दाखल झाला आणि तो दोषी ठरून शिक्षा ही झाली, त्याचं जगणं आणि मरण दोन्ही अंधारातच राहिलं असतं.
एका धडधाकट देखण्या तरुणाचे केवळ पाच वर्षांच्या कालावधीत झालेले विदारक परिवर्तन मनाला चटका लावून जाते. त्यांची शोकांतिका वाचून कोणाही संवेदनशील माणसाचे मन हेलावून जाईल. सगळ्यात वाईट गोष्ट ही की एका होतकरू तरूणाच्या आयुष्याची परवड होत असतांना कोणीच त्याची मदत केली नाही, स्वत: त्याचं कुटुंब, त्यातही २ भाऊ पोलीस दलातच असतांनाही असं बेवारस मरण एखाद्याला यावं याहून दुर्दैव ते काय?
पोलिस खातं आपल्या रक्षणासाठी आहे असा आपला समज आहे पण हे पोलिसच जेव्हा काही पैशांसाठी विकले जातात आणि अधिकारांचा गैरवापर करून आपल्याच एका सहकाऱ्याच्या जिवावर उठतात तेव्हा कायदा आणि न्यायाची अपेक्षा आपण कोणाकडून करायची ?
'बीइंग ह्यूमन' ही संस्था काढणाऱ्या चि.कु.सलमानच्या माणूसकी बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे.
स्वत: गुन्हा करूनही तो कबूल न करता सुटकेसाठी कोणत्याही थराला जाऊन, गुन्हा आपल्या ड्रायव्हरवर ढकलू पाहणारा आणि कोर्टात शपथ घेऊन निर्लज्जपणे खोटं बोलणारा हा माणूस ढोंगीपणाचा कळस आहे.
त्याची बाजू घेणारे फिल्म इंडस्ट्रीतील लोक आणि बथ्थड बिनडोक चाहते त्याला डोक्यावर घेऊन नाचताएत, त्याच्या नावावर अजूनही बरेच गुन्हे जमा आहेत हेही ते सोयिस्कर रित्या विसरतायत. चित्रपटात अन्यायाविरुध्द पेटून उठणारा, वाईट प्रवृत्तिंचा विनाश करणारा हा 'हिरो' प्रत्यक्ष आयुष्यात किती खलप्रवृत्तिचा निघाला हे कळूनही लोक त्याला सपोर्ट करणे सोडत नाहीत !!
अपघातानंतर सलमानने स्वत:हून जखमींची मदत करायला हवी होती, पोलिसांना कळवायला हवे होते, पण त्याने तिथून पळ काढण्यात धन्यता मानली, तेव्हा त्याची ह्यूमैनिटी कुठे गेली होती ?
नंतरही झालेली चूक सुधारण्याचा त्याने प्रयत्न केला नाही, उलट हे प्रकरण कुठल्याही प्रकारे दडपण्याचाच त्याचा आणि संबंधितांचा प्रयत्न होता. त्याने सरळ मार्गाने गुन्हा कबूल केला असता तर केव्हाच कायद्यानुसार मिळालेली शिक्षा भोगून आज एक प्रामाणिक नागरिक म्हणून तो उजळ माथ्याने फिरू शकला असता, पण एवढा उदात्त विचार त्याने केला असता तर काय होते..
या खटल्यातील अजुन एक दुर्लक्षलेली व्यक्ति म्हणजे कमाल खान, सलमानचा गायक मित्र/चुलत भाऊ, अपघाताचा दुसरा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार !! त्याला ह्या पूर्ण खटल्यातून पध्दतशीरपणे वगळण्यात आलं, तो कधीच समोर आला नाही जेव्हा खरंतर पहिली साक्ष त्याची असायला हवी होती.
१ साक्षीदार ज्याला साक्षीला कधी बोलावलेच गेले नाही
२ रा साक्षीदार ज्याला साक्षीदार संरक्षण (witness protection) मिळायला हवे होते ते दिले नाही, तो देशोधडीला लागून हाल हाल होऊन गेला तरी कोणाला काही पत्ता नाही.
हे सर्व आपल्या देशात, आपल्या कायद्या अंतर्गतच होऊ शकते, कोणी कसा विश्वास ठेवायचा अशा कायदा आणि न्यायव्यवस्थेवर !!
सलमानला शिक्षा झाली नाही झाली तरी त्याच्यामुळे हकनाक गेलेले दोन जीव परत येणार आहेत थोडीच, फक्त त्यांना न्याय मिळाला तरी ठीकच म्हणायचं.
यातील दुवे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून लोकांनी सलमानचा मुखवट्या आडचा चेहरा ओळखून त्याचा उदो उदो करणं बंद करावं यासाठी हा एक छोटासा प्रयत्न..
हा धागा रवींद्र पाटील यांना एक श्रध्दांजली म्हणून ...
त्यांच्या आत्म्याला शांति लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करण्याशिवाय अजून आपण काय करू शकतो ?
वाचने
59177
वाचनखूण
प्रतिक्रिया
145
संताप आणि तिरस्कार
In reply to संताप आणि तिरस्कार by पैसा
हे
+११११११
संपूर्ण सहमत.
त्यांची छायाचित्रे ही उपलब्ध
In reply to त्यांची छायाचित्रे ही उपलब्ध by नीलमोहर
+११११११११११११११११११११११११११११
++++१
In reply to ++++१ by जिन्क्स
हो नक्कीच,
ओह .. हे मला माहीत नव्हते..
संपुर्ण सहमत
सगळे त्रासदायक आणि संतापजनक
लेख वाचल्यावर, अस्वस्थपणा व संताप, दोन्ही एकाचवेळी जाणवले
या एकंदर विषयावर प्रतिक्रिया या लिंकवर
एका कर्तव्यदक्ष कर्मचार्याची
अरेरे
हाय कोर्टानी निर्णय रद्द केला
विदारक
In reply to विदारक by अभिरुप
प्रतिक्रिये साठी धन्यवाद,
..........
..........
काय सिद्ध झालं शेवटी?
In reply to काय सिद्ध झालं शेवटी? by स्पंदना
आणि असं असूनही या देशातली
In reply to आणि असं असूनही या देशातली by सूड
नुसती न्याय व्यवस्थाच नव्हे
+१
★★★★★
In reply to ★★★★★ by लालगरूड
बघवत नाही.
In reply to बघवत नाही. by चुकलामाकला
खरच बघवत नाहि.
In reply to ★★★★★ by लालगरूड
अरेरे
In reply to अरेरे by रवीराज
+१
नक्षलवाद यातूनच जन्म घेतो.
फार वाईट झालं. ही रामकहाणी
हे एवढं असूनही सलमानला जामीन
रवींद्र पाटील यांना
मुर्ख बिनडोक लोकांचा देश आहे
In reply to मुर्ख बिनडोक लोकांचा देश आहे by पिलीयन रायडर
सलमानच्या झोपेचं काय घेऊन
In reply to सलमानच्या झोपेचं काय घेऊन by बॅटमॅन
सलमानला जे जे लोक सपोर्ट करत
In reply to सलमानच्या झोपेचं काय घेऊन by बॅटमॅन
+१
नीलमोहर,राविन्द्राची कथा आणि
In reply to नीलमोहर,राविन्द्राची कथा आणि by नूतन सावंत
नाही हो,
In reply to नाही हो, by नीलमोहर
एड्स आणि टीबी
In reply to एड्स आणि टीबी by अगम्य
तरीही रक्त तपासणीमधे HIV
In reply to तरीही रक्त तपासणीमधे HIV by द-बाहुबली
बरोबर
आणि हे म्हणे " बइंग ह्युमन" !
रवींद्र पाटील याचा मृत्य नाही
वाईट झाले पाटील बाबतीत..
अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आहे
Salman Hit & Run Case: Will
पैसा आणि प्रसिद्धी असली तर
सत्यपथावर चालणे सौपे नसते,
लेख दुसरीकडे (whatsapp) वर
In reply to लेख दुसरीकडे (whatsapp) वर by उगा काहितरीच
हो नक्कीच,
In reply to हो नक्कीच, by नीलमोहर
धन्यवाद ! तुमची परवानगी
In reply to धन्यवाद ! तुमची परवानगी by उगा काहितरीच
हो हे मात्र बरोबर आहे,
हा लेख वाचला आणि काल न्यूजवर
:(
व्हत्सप्प
आणि...
In reply to आणि... by अर्धवटराव
त्यांना फक्त मतदानावेळी मराठी
आमच्या एक काकु.. ज्या जनरली
In reply to आमच्या एक काकु.. ज्या जनरली by पिलीयन रायडर
काकू आमचा सलमान म्हणजे सलमान
In reply to काकू आमचा सलमान म्हणजे सलमान by सूड
काकू वागतातही तश्याच!!
In reply to काकू वागतातही तश्याच!! by पिलीयन रायडर
माईसाहेबांची आठवण झाली उगीच.
In reply to आमच्या एक काकु.. ज्या जनरली by पिलीयन रायडर
हे शिकले सवरले लोक असं बोलतील
In reply to आमच्या एक काकु.. ज्या जनरली by पिलीयन रायडर
अवघड आहे !!!
सुशिक्षित सुजाण नागरिकांनी
In reply to सुशिक्षित सुजाण नागरिकांनी by नीलमोहर
ह्याना पण अशिक्षित अडाणीच
In reply to ह्याना पण अशिक्षित अडाणीच by मराठी_माणूस
धन्य !
माफ करा रविंद्र पाटील,
In reply to माफ करा रविंद्र पाटील, by नीलमोहर
सलमान ईथुन सुटलाय पण देवापुढे
In reply to सलमान ईथुन सुटलाय पण देवापुढे by कविता१९७८
लो बा गं टि यांची आठवण आली.
In reply to सलमान ईथुन सुटलाय पण देवापुढे by कविता१९७८
देवापुढे काय,
In reply to देवापुढे काय, by सूड
ते एक वाक्य आहे बघ, बर्याच
In reply to देवापुढे काय, by सूड
+१
In reply to +१ by नीलमोहर
हो मला नियति आणि कर्माबद्दलच
In reply to माफ करा रविंद्र पाटील, by नीलमोहर
People get VERDICT in Courts
परवा एका काळवीटाचा आत्मा
In reply to परवा एका काळवीटाचा आत्मा by सुबोध खरे
@ डॉक
In reply to परवा एका काळवीटाचा आत्मा by सुबोध खरे
(No subject)
In reply to परवा एका काळवीटाचा आत्मा by सुबोध खरे
डॉक्टर तुम्ही सुद्धा?
रविंद्र पाटील
नीलमोहर
In reply to नीलमोहर by शान्तिप्रिय
रविन्र्द पाटलाचे कळल्यापासुनच
In reply to नीलमोहर by शान्तिप्रिय
झालं ते सगळं संशयास्पद आहेच.
In reply to झालं ते सगळं संशयास्पद आहेच. by गवि
मुद्दा बरोबर आहे,
In reply to झालं ते सगळं संशयास्पद आहेच. by गवि
गवि साहेब
त्याच्या चित्र॑पटावर बहीष्कार
धिक्कार असो याला डोक्यावर
In reply to धिक्कार असो याला डोक्यावर by सतिश पाटील
सलमान ती आर पी आहे
जे काही झालं त्यातून एक समाज
In reply to जे काही झालं त्यातून एक समाज by नगरीनिरंजन
एकाने चूक केली म्हून सगळे दोषी