Skip to main content

कोकणी भुते

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 06/05/2015 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणी माणसांच्या मनातील भूते. भूते ही दोन प्रकाराची असतात.१ ञास देणारी २ञास न देणारी.ही भूते जंगले ,स्मशान,रानमाळ, भरड अशा ठीकाणी वातव्य करतात. आज कोकणी मनातील भूते व त्यांचे प्रकार जाणून घेऊ. कोकणात १७ प्रकाराची भूते पहावयास मिळतात. १वेताळ २ब्रम्हग्रह ३ समंध ४देवचार ५ मुंजा ६ खवीस ७ गि-हा ८ चेटकीन ९ झोटिंग १० वीर ११ वायंग्या १२ म्हसोबा १३ जखिन १४ लावसट १५ हडळ १६ भानामति १७ चकवा. १ वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर ञास दायक भूतांना पाळवून लावतो. २ ब्रम्हग्रह / ब्रह्मराक्षस : हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते.जो वेदात निपून आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला. ३ समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो. हे भूत प्रमुख्यने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंव्हा तीठा अशा ठिकाणी पकडते.हे एक संतान नसलेला (र्निवंशी ) ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवथ्यानाच्या आड मार्गे केला तर देवथ्यान देखिल पुढे येत नाही. ४ देवचार : हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो.ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात.कोकणात ह्यांना डावे अंग म्हटले जाते.कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो. ह्याची सहान भूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर,कोंबडा द्यावा लागतो. ५ मुंजा: हे ब्राह्मणां पैकी भूत असते.जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.ह्याचे मुख्य थ्यान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते. ६ खविस: हा प्रकार मुस्लिमांन मध्ये मोडतो.हे फार ञास दायक भूत असते.ज्याला अतिषय क्रुर रीत्या मारले जाते.तो मेल्यानंतर खविस होतो असा समज आहे. ७ गिर्या / गिर्हा - जो माणूस बूडून मेला किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे.हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फार ञास दायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले ,मुळे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव आला असेल. कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो.त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या मानसावर सर्व त-हेची संकटे आणून सोडतो. ८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते. ९ झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांन मध्ये गणले जाते. १० विर : हे भूत क्षत्रीय समाजा च्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो.याला निमा असेही म्हटले जाते. 11: लावसट - ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्यूनंतर लावसट मध्ये होते . 12: खुन्या - हे अतिशय क्रूर भूत असून हरिजन समाजातील असते 13: बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किम्वा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते 14 : चकवा - हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकविते . सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही .... संग्राहित / संपादित *

वाचने 76598
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

13: बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किम्वा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते
फक्त १०००० हजारात?...होलसेल मध्ये आर्डर देउया का मिपाकरांसाठी ;) बाकी एक अतृप्त आत्मा इथेच आहे ;)

तुमचा भुतांचा अभ्यास भारी आहे ! :) भुतांतही इतके वर्गीकरण आणि जातपात असेल असे वाटले नव्हते ;)

In reply to by सूड

बा द वे, चेटकीणीला डाव म्हणतात म्हणजे दिसायला बरी असते का? का हो? रातच्याला वाड्यावर बोलावून डाव टाकायचा विचार हाय काय? (पत्त्याचा डाव हो..)

In reply to by टवाळ कार्टा

हो!! येतोस का तू पण? पाच-तीन-दोन खेळू या. आणखी कोणी आलं तर मेंढीकोट, चाराहून जास्ती असल्यास रम्मी खेळूया.

In reply to by सूड

मी येतो ... पण जेवायचे पण बघ हा.. नाहीतर डावा मध्ये उगा जेवन विसरायला नको..

भुतांचा आभ्यास चांगलाय ह्या सगळ्या भुतांमध्ये एक महत्त्वाचे भुत राहिलं संशयाच भुत = हे फार लबाड भुत असते. ज्याच्या मानगुटीवर बसते त्याचे होत्याचे नव्हते करून टाकते. आणि सगळ करून सवरुन पछडलेल्याला देशोधडीला लावल्या शिवाय त्याला सोडत नाही

मुस्लीमांत असलेला "जिन" हा प्रकार नक्की काय आहे? भूताचाच प्रकार असतो का हा? त्याच्याशी समांतर असा हिंदुधर्मीयातला प्रकार कोणता? म्हणजे हिंदू लोकांना "जिन" लागु शकतो का? लागलाच तर त्यानंतरचे जे खटाटोप करायचे ते मुसलमानी असतील का हिंदु? (घाबरट)योगेशु.

In reply to by कानडाऊ योगेशु

आपल्याकडं भूत म्हणजे टिपिकली मनुष्ययोनीतल्याच जीवाचे मरणोत्तर रूप. जिन म्हणजे अगोदरपासूनच अमानवी असलेले दुसरे जीव. यांना आपल्या भुतांप्रमाणेच सुपर पॉवर्स असतात.

In reply to by कानडाऊ योगेशु

मुस्लीमांत असलेला "जिन" हा प्रकार नक्की काय आहे? भूताचाच प्रकार असतो का हा? त्याच्याशी समांतर असा हिंदुधर्मीयातला प्रकार कोणता? म्हणजे हिंदू लोकांना "जिन" लागु शकतो का? लागलाच तर त्यानंतरचे जे खटाटोप करायचे ते मुसलमानी असतील का हिंदु? (घाबरट)योगेशु.
बलबन का मकबरा वाचा ;)

१) भुतांच्या प्रतीप्रमाणे वर्गवारी करायची झाली तर ते काम कोण करू शकेल ? २) ही सगळी माहिती कोणी संकलित केली असेल ? ३) बायांग्या ह्या भुताचे दुकान नक्की कुठे आहे? त्याचे पैसे कुणाला द्यायचे? ते परत करायचे म्हणजे काय करायचे? त्याला साखळी घालून देतात का? ४) भूतयोनीतसुद्धा जाती असतील तर त्यांच्यात आणि आपल्यात वेगळेपणा काय आहे? तिथेही कुठली संस्था आहे का? ५) कोकणात भूतांना "टाईमपास" काय असतो? (टाईमपास २ नव्हे !!) ६) आशा राहिलेला माणूस भूत होतो तर मग भारतात 'आशाळभूतपणे' सगळीकडे पाहणाऱ्यांना काय म्हणावे? बाकी चालू द्या…. !!!!

In reply to by माम्लेदारचा पन्खा

जबरी प्रश्न...!! तर मग भारतात 'आशाळभूतपणे' सगळीकडे पाहणाऱ्यांना काय म्हणावे? ह्या प्रश्नातच उत्तर आहे. त्यांना आशाळभूत असे म्हणतात.

एकवेळ कोकणी भुतं परवडली, पण गोव्याची भुतं खूपच डेन्जरस असतात. सारखीसारखी चहा मागतात. (सर्व भुताखेतांनी क्रुपया ह. घे.) :-D

In reply to by एस

चहा मागतात ती रत्नांग्री-तळकोकणातली, हिते वर रायगडात आलात की दुदु दुदु मागणारी भुतं असतात. ;)

इतक्यात चेपु वर किंवा आणखी कुठेतरी वाचलय. शिर्षक बहुधा कोकणातील भुते कि काहिस होत. तिथे भुताचा पहिलाच प्रकार mention केला आहे तो cheda आहे. ति लिंक शोधायाला आताच आमच्या जिनि ला पाठवलेय :)

१३वाले भूत किती जणांना पायजे ते पैसाताईला सांगा.तिच्या घराजवळ विकत मिळतंय बहुतेक.ती पयसे गोळा करायला जाणार आहे.घेऊन टाकेल सगळ्यांसाठी=))

In reply to by अजया

मला पाहिजेत चार. फायदा झाला तर पैसाताईंना पैसे देउ.

८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.
डाव. ह्म्म!!!

ते फिल्ममधे हिरो हिरोईन रोमांस करत असतात किंवा हिरोईन आंघोळ करताना मधेच येते त्या भूताला काय म्हणतात ? मेलं नीट एखादा चांगला सीन पुरे करु देईल तर शप्पथ.

In reply to by होबासराव

मोदिंनी सांगीतलेला 'मेक इन इंडिया' हा मंत्र अंमलात आणणारे ते एक आद्य उद्योजक होते.

In reply to by जेपी

मस्त आठवणींना उजळणी दिलीत. मी शाळेत होतो तेव्हा. साला त्यातला "दस्तक" चा एपिसोड सॉल्लिडच होता. जाम फ़ाफ़ललेली.

In reply to by पगला गजोधर

बरोबर बोललात नंतर कॉमेडी शो झाला तो पण सुरुवातीचे काही एपिसोड चांगले दाखवलेले.

अर्रे! हा नुसता भूतजातीवाचक सर्व्हे हाय काय! मला वाटलं मस्तपैकी कोकणातल्या श्टोरी असतील भुतांच्या! मज्जा येते ऐकायला. सांगा कोणाला माहिती असतील तर.

८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.
पुण्यात डाव हा शब्द चुकीच्या अर्थाने वापरतात मग!! ;)

In reply to by आदूबाळ

त्याच खाण-पिणं वेगळच असतं..... हे १०,००० त्या बायंगी च्या मूळ मालकाला दिले जातात. एक ठराविक कालावधि झाला की बायंगी मूळ मालकाकडे परत....

तुम्ही वर्णिलेली भुते त्रास देणारी का न देणारी ? त्रास देणारी कोणती आणि न देणारी कोणती हे कसे ओळखायचे ? बाटलीतून (मुख्यत्वे समुद्रकिनारी बुच लावलेल्या बाटलीतून) निघते ते भूत कोणते ? परदेशी असावे बहुतेक. स्त्री भूतांची माहिती कुठे सापडेल ? जनावरांची भुते असतात का ?

In reply to by उगा काहितरीच

अंदाज चुकला की तुमचा गुरुजी ! काहीच तर राडा झाला नाही की.

In reply to by उगा काहितरीच

तो मी प्रतिसादातून आधीच काढुन नै का घेतला? ;) अच्च काय ते? :D

ऐला.. लै भारी.. घाऊक मध्ये भुतं विकत घेतली तर डिस्काऊंट मिळेल काय? थोडी तिकडे सीरीयात सोडीन म्हणतो. एक णाडी केंद्रात पण सोडायचंय. थांबा, आता लिष्टच करायला घेतो. ते डिस्काऊंटचं तेवढं बघा हां.. अंमळ जास्तच भूतं लागतील.

विं दा करंदिकरांची, किर्र रात्री,सुन्न रानी ..... अशी भुतांवरची सुंदर कविता आहे, वर्षा भावे यांची चपखल चाल आहे, जरूर ऐका.

भुतांविषयी इतकी वैविध्यपूर्ण माहिती प्रथमच वाचण्यास मिळाली :-) .

लहानपणी वारंवार कानावर पडणार्‍या "गिर्याला गवसला" या शब्दप्रयोगाचा नेमका अर्थ आता कळला.
संग्राहित / संपादित *
हे लेख प्रकाशित करण्यासाठी योग्य जागा मला माहिती आहे. ;)

खूप छान माहिती... भूतयोनीत सुद्धा मंडल आयोग लागू असावा असे उगाच वाटले. एका जातीच्या भूताने दुसर्‍या जातीच्या माणसाला त्रास दिला तर त्यांच्यात सुद्धा आपापसात जुंपत असावी. बाकी माझ्या जाती/धर्माची भूते माझे रक्षण करत असतील का हो? बादवे झोटींग, आग्यावेताळ हे काय असते? मा.बो. वर अमानवीय असा धागा आहे. त्यात बर्‍याच जणांच्या खर्‍याखुर्‍या अनुभवावर चर्चा आहे. त्यात बायंगीवर सुद्धा एक चर्चा आहे. या भुताला म्हणे कायम काही नेवेद्द्य द्यावा लागतो. आणि जर तुमच्या कडून आगळीक झाली तर तर हे भूत त्याने तुम्हाला जे दिले त्याच्या दसपट वसूल करून अक्षरशः तुम्हाला रस्तावर आणतो...असे लिहीले आहे.

ज्या ने धागा टाकला तो मंका बहुतेक उरलेल्या तीन १५) हडळ १६ भानामति १७ चकवा यांच्या तावडीत सापडला असावा. कारण धागा टाकुन तो गायबलाय.1 आणि उका लेडिज भुत वेगळं कशाला पाहिजे ते पुण्याला असं रुमाल बांधुन 1 आजुबाजुला वावरत असतातच की तुम्ही सावध असा फक्त.

In reply to by प्रमोद देर्देकर

पुण्यातील लेडीज भूतांचा तुमचा सखोल अभ्यास दिसतो.

In reply to by सतिश गावडे

कस चं कस चं आम्ही आलो होतो तेव्हा काही मांत्रिक आमच्या अवतीभवती होते. त्यामुळे ती भुते आमच्या पासुन १० हात दुर वावरत होती. 1

मंदार काञे, तुम्हाला तुमचा आयडी नीट लिहिता येतोय, म्हणजे हे ढकलपत्रातून आलेले समजून याच्यावर भानामती करू काय? म्हसोबा, हडळ आणि भानामती यांच्याबद्दल दुसर्‍या मेसेजमधे आले होते का? तो मेसेज पण पेस्ट करायचा त्रास घ्या जरा!

In reply to by सतिश गावडे

मिपावरच्या भुतांसाठी लै जालीम भानामती माहिती आहे. आणि भुताटकी उतरवणारा मांत्रिक पण!

In reply to by पैसा

म्हणजे मिपावरची उपद्रवी भूते जेव्हा गायब होतात तेव्हा त्यांना मांत्रिकाकरवी बाटलीत भरले जाते तर.

In reply to by यशोधरा

उत्तर तुम्ही स्वतःला पुणेकर समजता की कोकणी यावर अवलंबून आहे.

In reply to by यशोधरा

अरे वा. छान. आता मिपाकर या नात्याने तुम्हीच चहा पाजा.

In reply to by प्रचेतस

माझ्या नावाने एक पुस्तक काढून ठेवा, नायतर तुमची सगळी पुस्तके लोक उधारीवर घेऊन जातील असा शाप देईन.

In reply to by पैसा

नायतर तुमची सगळी पुस्तके लोक उधारीवर घेऊन जातील असा शाप देईन.
"आणि परत करणार नाहीत" हा महत्वाचा क्लॉज राहिला की शापामध्ये. लोकांनी पुस्तके परत केली तर काय उपयोग त्या शापाचा?

In reply to by सतिश गावडे

"आणि परत करणार नाहीत" हा महत्वाचा क्लॉज राहिला की शापामध्ये. लोकांनी पुस्तके परत केली तर काय उपयोग त्या शापाचा?
आपली पुस्तके पुण्यातलेच लोक नेण्याची शक्यता जास्त असल्या कारणाने ते परत करणार नाहीतच हे गृहीत धरलं असावं त्यांनी!! आणि मेलेल्याला आणखी का मारा म्हणून क्लॉज मुद्दाम वगळला असेल.

In reply to by पैसा

कोण घेऊन जाईल? सरळ देत नाही जा असं सांगू की आम्ही. पुणेरी स्पष्टवक्तेपणा कधी कामी यायचा? =))

In reply to by यशोधरा

ओ तै, सकाळी तुम्ही पुणेकर की कोकणी असे विचारल्यावर "आम्ही मिपाकर" असे सांगितलेत. आणि पुणेरी स्पष्टवक्तेपणा वापरण्याच्या गोष्टी करुन तुम्ही पुणेकर असल्याचे सिद्ध करताय. हे चिटिंग आहे.

In reply to by प्रचेतस

तिथे तुम्हाला कट मिळतो अशी अफवा उठवावी म्हणतो ;)

In reply to by टवाळ कार्टा

हाहा. पुस्तकांची दुकाने आमची अवडती ठिकाणे. अत्रे सभागृह पण लिस्टात अ‍ॅड कर.

In reply to by गणेशा

चहाला येणार असशील तर हरकत नाही. जेवायला येतो म्हटलं असतंस तर विचार करावा लागला असता.

In reply to by सोत्रि

जी जात नाही ती जात. माणसं मेल्यानंतरही आपापल्या कम्युनिटीच्या भूतवर्गास जॉईन करत असावीत.

कोकणात स्त्रीभूतांपेक्षा पुरुषभूते जास्त आहेत तर! स्त्रीभूतात आसरा आणि सटवाई हे प्रकार नाहीत का?

In reply to by विशाखा पाटील

म्हणजे कोकणातल्या स्त्रीयांच्या अपेक्षा मेल्यावर पण संपत नैत कै? =))

In reply to by विशाखा पाटील

सटवाईला सुईणींची देवी मानतात ना?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नोप. सटवाई पाचवी पुजतो त्यादिवशी बाळाचं नशीब लिहून जाते म्हणतात.

भयानक जंगल, ओसाड पडलेल्या वाड्या, निर्मनुष्य रस्ते,आणि एकाकी सडे त्यामुळे कोकणात भूतांचा जन्म झाला नसेल तर नवलच माझ्या वडलांनी सांगितलेला एक किस्सा आठवला आमच्या गावाहून साधारण ७, ८ किलोमीटर वर बाबांची शाळा होती,सड्यावरून एक पाउल वाट जायची. एकदा शाळेत कुठलेसे नाटक लागलेले होते,म्हणून सर्व मित्र मंडळी रात्री उशिरा पर्यंत थांबली. येताना साधारण मध्यरात्र उलटून गेलेली होती.श्रावणातली रात्र होते, हलक्या सरींचा खेळ सुरु होता, या सर्वांकडे खोळी होत्या, सड्यावर आल्यावर अचानक वारा पडला, वातावरण गरम व्हायला लागले.समोर लांब घरंगळत गेलेला रस्ता अस्पष्ट व्हायला लागला. आणि अचानक बैलांच्या गळ्यातील घुंगरांचे, माळांचे , चाकांचे आवाज यायला लागले. मागे पुढे कोणीही नव्हत. मशालींच्या धुराचा कळपट वास यायला लागला,खाण्याच्या पदार्थांचा घमघमाट सुटला, अस्पष्ट कुजबुज, खसखस ऐकायला यायला लागली हे सर्व प्रकार बघून सर्वांचीच तंतरली, आधी लांबवरून येणारे आवाज जवळ जवळ यायला लागले. त्यातला एक जरा अनुभवी मुलगा होता, त्याने सर्वांना बाजूला माळरानात उड्या मारायला सांगितल्या, सगळे डोक्यावरून खोळी घेऊन निपचित पडून राहिले, बराच वेळ तो आवाज, ते वास येतच होते. हळू हळू वातावरण पूर्ववत झाले तरी कोणाचीच उठायची इच्छा नव्हती, सगळ्यांनी रामरक्षा म्हणत अजून दोन तास तिकडेच काढले आणि साधारण तीन च्या दरम्यान उठून चालते झाले . :)

In reply to by स्पा

वेताळाची पालखी!! हे नुसत वर्णनच नाही तर त्या वेळी एकच जागी गच्च झालेली बैलगाडी आणि त्या सगळ्यात मला एकट्याला ते दिसत होतं अस सांगणारे आत्याचे मिस्टर सहा वर्षापूर्वी वारले. मुंबईत सरकारी सर्विसमध्ये होते. कधी कोणत्या गोश्टीत फार गुंतलले पाहिले नाहीत. ना ही देवधर्म ना कोणता कुळाचार, पूजा अर्चा, ना ही नैवेद्य!! अश्या माणसाच्या तोंडुन ऐकलेले हे वर्णन आश्चर्यचकित करुन गेलं होतं.

In reply to by स्पंदना

कोल्हापूर कट्ट्याला पण एक वेताळ येणार आहे म्हणे, आतापासनंच भ्या वाटतंय. ;)

जल्ल सगळी भुताटकी..साला हाफ्शेंच्युरी झाली कोण सत्कार केला नाय ..कस होणार..ह्याच. (पिंपळावरचा मुंजा) जेपी

In reply to by जेपी

दोनचार कवट्या ,साताआठ हाडे आणि स्मशानातील राख उधळून सत्कार करनेत येत आहे! भुतेच्छुक :- अतृप्त आत्मेश्वर, आणि भूत ग्यांग, जुन्या स्मशाना जवळ , पिंपळ नं 10... ! :P

In reply to by अत्रुप्त आत्मा

पण अता आत्मा गायब होऊन नुसताच अत्रुप्त उरलाय ना?

In reply to by प्रचेतस

पण अजूनही कधी कधी तो आत्मा अत्रुप्तांच्यात प्रवेश करतो. म्हणतात ना, जित्याची खोड मेल्यावरसुद्धा जात नाही...! ;)

In reply to by प्रचेतस

@पण अता आत्मा गायब होऊन नुसताच अत्रुप्त उरलाय ना?>>> :-/ आत्मा गायब झालाय्,संपलेला नाही!!! असाहि तो संपत नसतोच्च! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif दू...दू... स्नेहातै! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd.png

संकल्पनाकोश - लेखक - सुरेश वाघे .. खंड २ - मानवी शरीर व जीवनावस्था हा माझ्या वडिलांचा ५ खंडी ग्रंथ आहे. त्यात पान 6 - 75 पासून ६-७ पाने भुते tyanche वर्गीकारौ / प्रकार यावर आहेत. तसेच भाग १.५१ - ते भाग १.५४ मध्ये ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य , क्षुद्र यांच्या भूतांचे उल्लेख आहेत ;)

यातलं "बायंगी" आमच्या गावात विकत आणलं होतं एका घराने. अर्थात अस म्हंटल जात होतं. ते घरच असल्या प्रकारांच असल्याने काहीही करु शकत होते. जाताना घरातला कणन कण खरवडुन नेते आणि घरातली मुलगी घेउन जाते अस काहीस ऐकल होतं. अन निदान मुलगी गेलेली तरी माहित आहे.

In reply to by स्पंदना

हे इंटरेस्टिंग प्रकरण आहे. बायंगी. अजून माहिती असल्यास सांगावी. या क्रेडिट कार्डावर मिळतात काय?

In reply to by वेल्लाभट

काय माहित नाही हो. ती भरा भरा आलेली भरभराट पण पाह्यली, ती लिव्हर सिरॉसीस ने वारलेली मुलगीही पाह्यली त्या दरम्यान आणि मग सगळ उजाड झालेलंही पाह्यलं. आता अजून उजाडच आहे. कशाला विषाची परिक्षा घ्यावी? आणि कुणी? जसा देवा, बाबाजी वर दुरुन नमस्कार तसाच या सगळ्यालाही जरा लांबुनच पहावं. फार खोलात शिरु नये या मताची आहे मी.

In reply to by स्पंदना

हो हो; मी आपलं गमतीने म्हणतोय. मला काही स्वारस्य नाही. :) कशाला हवंय असलं काही, चायला.

In reply to by वेल्लाभट

मला माहितीये. रत्नांग्रीस आमची आत्या होती कैक वर्षे तेव्हा तिथे राहिलेलो आहे. साळवी स्टॉप येथे त्यांचे घर होते, थिबा राजाच्या थडग्यापासून जवळच एकदम. तेव्हा मानकाप्याची ष्टुरी ऐकलेली आहे. अवांतरः रत्नागिरी लक्षात रहायची काही कारणे: १. मिरजेसनं रत्नागिरीला अंबा घाटमार्गे जावं लागतं, तेव्हा कायम फुशारक्या मारूनसुद्धा हमखास दरवेळेस घाटात ओकायचो म्हणजे ओकायचोच. २. एकदा आईबाबांसोबत रत्नागिरीस आलो असताना पावस, गणपतीपुळे, डेरवण, इ.इ. ठिकाणे बघायला म्हणून समस्त नातेवाईक एका सुमोत कोंबून फिरत होतो. तिथे कुंबळे नामक एका गावानजीक काय चकवा लागला काय माहिती, सुमो त्याच त्या पट्ट्यात तासभर तरी फिरत होती. फलकही नव्हते, काय कळतच नव्हतं काय झालं ते. प्री-मोबाईल जमाना तो, सगळ्यांचीच फाटलेली, संध्याकाळचे ६-७ तरी वाजले असतील. शेवटी कसा कोण जाणे पण मार्ग मिळाला आणि आम्ही मार्गस्थ झालो. ३. आमच्या आतेभावाशी कायम मारामारी करायचो. दोन वर्षे सीनियर असल्याने बिचार्‍याला लय मारलेला आहे तेव्हा. :( सर्व भावंडांत सर्वांत सालस तोच अन त्याच्याच नशिबी आमच्यासारखे लोक यावेत? अर्थात आम्हांलाही इतर भाऊ पिडत तेव्हा तसा राग निघायचा. =)) ४. तासन्तास ब्रिक गेम खेळत असू. ५.हापूस आंबा. ६.प्रथमावताराचे प्रथम भक्षण. वॉज़ नॉट अ‍ॅट ऑल इम्प्रेस्ड.

In reply to by सतिश गावडे

नीट आठवत नाय, पण ते एक भूत रातच्याला लोकांना ठार मारत सुटतं. त्याला स्वतःला डोकं नसतं, समथिंग लाईक प्रभुदेवा इन दॅट मुक्काला मुक्काबला साँग. बाकी एलेमेंट्स वेल्लाभट साहेब सांगतील.

In reply to by बॅटमॅन

नाउ दॅट यु हॅव कॉल्ड मी, मला माहित असलेली श्टोरी अशी.... हे मानकाप्या भूत जयस्तंभाजवळ असतं. तिथून रात्री कुणी एकटं जात असलं की हे आपले दोनही हात खांद्याच्या रेशेत जमिनीला समांतर फिरवत येतं आणि त्याची मान कापतं. डोकं धडापासून वेगळं करतं. म्हणून मानकाप्या.

In reply to by वेल्लाभट

म्हंजे लहानपणी हेलीकॉप्टर हेलीकॉप्टर खेळतात तस्सं! :D

In reply to by यशोधरा

नेमक्या याच शब्दात आतेभावाने ष्टुरी सांगितलेली आठवली.

आम्हाला रहायला जागा आहे हे नशीब! की त्यांच्यापैकीच माहित नसलेला प्रकार आहे कोण जाणे! या जयस्तंभावरच्या भुताबद्दल मागे एकदा इथेच वाचले होते, पण अजून दिसले नाही कधी.

असतील शिते तर जमतील भुते ही म्हण कोकणातल्या भातखाऊ भुतांवरूनच आली असावी काय? देशावरची असती तर असता ज्वारी, भुते खूप सारी अशी काहीशी म्हण आली असती. किंवा असता नाचणी, येती भुते साजणी, वगैरे.

In reply to by टवाळ कार्टा

एकदाच झपाटलं, दगडावर आपाटलं. प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणूनच वडावरचा मुंजा शांत आहे एकच वादा, झपाटलेला ओढा

मला एक भाबडी शंका आहे : त्या भुत प्रेतांना अंधश्रद्धा मानणार्‍या काकांचे भुत ब्रह्मपिशाच्च झाले असेल कि समंध हो ? ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमच्या बेसिकमध्ये लोचा आहे. "अंधश्रद्धा" म्हणून काही नसते. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात "अंध" आणि "डोळस" श्रद्धा असे काही नाही. कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला कोणत्याही गोष्टीच्या अस्तित्वाविषयी किंवा सत्यतेविषयी असणारा ठाम विश्वास म्हणजे श्रद्धा. अंधश्रद्धा हा शब्दच मुळात चुकीचा आहे. ज्याने कुणी हा शब्द पहिल्यांदा वापरला असेल त्याला "अंधश्रद्धा" या शब्दामध्ये व्यक्तीस किंवा समाजास घातक अशा श्रद्धा अपेक्षित असणार. उदा. नरबळी दिल्याने धनप्राप्ती किंवा पुत्रप्राप्ती होते ही झाली अंधश्रद्धा. याउलट निरुपद्रवी श्रद्धांसाठी "श्रद्धा" हा शब्द सरसकट वापरला जातो. उदा. अमुक एका ठिकाणचा तमुक देव नवसाला पावतो ही झाली "श्रद्धा".

In reply to by प्यारे१

हे म्हणजे हॅरी पॉटर मधल्या विकृत अश्व सारखे वाटले =))

In reply to by सतिश गावडे

आपणास मुद्दा कळलेला नाही >>> हा तुमचा समज आहे . चालु दे तुमचे निरर्थक अत्मरंजन !

In reply to by सतिश गावडे

किती तो स्वमतांध दांभिकपणा. >>>>> तुम्ही हिंदुन मधील औरंग्या सॉरी सॉरी अफजल खान सॉर्री सॉरी शाहिस्ते खान आहात :-\