Skip to main content

कोकणी भुते

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 06/05/2015 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणी माणसांच्या मनातील भूते. भूते ही दोन प्रकाराची असतात.१ ञास देणारी २ञास न देणारी.ही भूते जंगले ,स्मशान,रानमाळ, भरड अशा ठीकाणी वातव्य करतात. आज कोकणी मनातील भूते व त्यांचे प्रकार जाणून घेऊ. कोकणात १७ प्रकाराची भूते पहावयास मिळतात. १वेताळ २ब्रम्हग्रह ३ समंध ४देवचार ५ मुंजा ६ खवीस ७ गि-हा ८ चेटकीन ९ झोटिंग १० वीर ११ वायंग्या १२ म्हसोबा १३ जखिन १४ लावसट १५ हडळ १६ भानामति १७ चकवा. १ वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून भूत काढणा-याच्या देहात प्रवेश करतो. व त्याच्या कडून इतर ञास दायक भूतांना पाळवून लावतो. २ ब्रम्हग्रह / ब्रह्मराक्षस : हे भूत ब्राम्हणाचे मानले जाते.जो वेदात निपून आहे.पण ज्याला त्याच्या बुध्दीचा गर्व झाला. व त्यातच त्याचा अंत झाला. ३ समंध: ज्याची इच्छा पूर्ण न होता जो मरतो तो समंध होतो. हे भूत प्रमुख्यने गावाच्या वेशीवर जूनाट झाड किंव्हा तीठा अशा ठिकाणी पकडते.हे एक संतान नसलेला (र्निवंशी ) ज्याचे कोणी काही कार्य केलेले नसते.त्यापैकी असते. कोकणात सर्वात ताकदवान भूत मानले जाते. ह्याला जर कोणी देवथ्यानाच्या आड मार्गे केला तर देवथ्यान देखिल पुढे येत नाही. ४ देवचार : हे मागास वर्गीयांचे भूत आहे. जो लग्नांनंतर थोड्याच दिवसांत मरतो.ही भूते गावाच्या चारही बाजूला असतात.कोकणात ह्यांना डावे अंग म्हटले जाते.कोकणी माणसांच्या गा-हाण्यांत यांचा प्रामुख्यने उल्लेख होतो. ह्याची सहान भूती मिळवण्यासाठी दरवर्षी याला नारळ, साखर,कोंबडा द्यावा लागतो. ५ मुंजा: हे ब्राह्मणां पैकी भूत असते.जो ब्राह्मण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो. हे त्याचे भूत असते.ह्याचे मुख्य थ्यान हे पिंपळाच्या झाडावर तसेच विहीरीवर असते. हे लोकांना छळत नाही पण घाबरवण्याचे काम करते. ६ खविस: हा प्रकार मुस्लिमांन मध्ये मोडतो.हे फार ञास दायक भूत असते.ज्याला अतिषय क्रुर रीत्या मारले जाते.तो मेल्यानंतर खविस होतो असा समज आहे. ७ गिर्या / गिर्हा - जो माणूस बूडून मेला किंव्हा ज्याचा खून झाला हे त्याचे भूत आहे.हे भूत पाण्याच्या आस-याला रहाते.हे फार ञास दायक असे भूत आहे.राञीच्या प्रहरात कोणी नदीपार खाडीपार करताना ह्याच्या तावडीत गावला तर ते त्याला खोल ठीकाणी घेऊन जाते. कोकणात राञीच्या वेळी जे कुर्ले ,मुळे पकडायला जातात त्यांना हमखास ह्या भूतांचा अनूभव आला असेल. कोकणात असे सांगीतले जाते की जो कोणी या भूताचा केस मिळवू शकला तर हा भूत त्याचा गुलाम बनतो.त्याला हवे ते आणून देतो.पण तो केस त्याला पुंन्हा मिळाला तर तो त्या मानसावर सर्व त-हेची संकटे आणून सोडतो. ८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते. ९ झोटिंग: हे भूत खारवी किंवा कोळी समाजातील भूतांन मध्ये गणले जाते. १० विर : हे भूत क्षत्रीय समाजा च्या व्यकीचे असते. जो लग्न न होता मरण पावतो.याला निमा असेही म्हटले जाते. 11: लावसट - ओली बाळंतीण मरण पावल्यास तिचे रुपांतर मृत्यूनंतर लावसट मध्ये होते . 12: खुन्या - हे अतिशय क्रूर भूत असून हरिजन समाजातील असते 13: बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किम्वा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते 14 : चकवा - हे रात्री बेरात्री जंगलात किंवा पायवाटेने जाणार्या लोकांचा रस्ता चुकविते . सकाळ झाल्याशिवाय योग्य रस्ता सापडत नाही .... संग्राहित / संपादित *

वाचने 75987
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

13: बायंगी - हे भूत विकत घेता येते. रत्नागिरी लांजा गोळवशी किम्वा मालवण चौक येथे सुमारे 10000/- रुपये खर्च केल्यास विकत मिळते .मालकाची भरभराट करुन शत्रूना त्रास देते
फक्त १०००० हजारात?...होलसेल मध्ये आर्डर देउया का मिपाकरांसाठी ;) बाकी एक अतृप्त आत्मा इथेच आहे ;)

In reply to by सूड

बा द वे, चेटकीणीला डाव म्हणतात म्हणजे दिसायला बरी असते का? का हो? रातच्याला वाड्यावर बोलावून डाव टाकायचा विचार हाय काय? (पत्त्याचा डाव हो..)

In reply to by टवाळ कार्टा

हो!! येतोस का तू पण? पाच-तीन-दोन खेळू या. आणखी कोणी आलं तर मेंढीकोट, चाराहून जास्ती असल्यास रम्मी खेळूया.

भुतांचा आभ्यास चांगलाय ह्या सगळ्या भुतांमध्ये एक महत्त्वाचे भुत राहिलं संशयाच भुत = हे फार लबाड भुत असते. ज्याच्या मानगुटीवर बसते त्याचे होत्याचे नव्हते करून टाकते. आणि सगळ करून सवरुन पछडलेल्याला देशोधडीला लावल्या शिवाय त्याला सोडत नाही

मुस्लीमांत असलेला "जिन" हा प्रकार नक्की काय आहे? भूताचाच प्रकार असतो का हा? त्याच्याशी समांतर असा हिंदुधर्मीयातला प्रकार कोणता? म्हणजे हिंदू लोकांना "जिन" लागु शकतो का? लागलाच तर त्यानंतरचे जे खटाटोप करायचे ते मुसलमानी असतील का हिंदु? (घाबरट)योगेशु.

In reply to by कानडाऊ योगेशु

आपल्याकडं भूत म्हणजे टिपिकली मनुष्ययोनीतल्याच जीवाचे मरणोत्तर रूप. जिन म्हणजे अगोदरपासूनच अमानवी असलेले दुसरे जीव. यांना आपल्या भुतांप्रमाणेच सुपर पॉवर्स असतात.

In reply to by कानडाऊ योगेशु

मुस्लीमांत असलेला "जिन" हा प्रकार नक्की काय आहे? भूताचाच प्रकार असतो का हा? त्याच्याशी समांतर असा हिंदुधर्मीयातला प्रकार कोणता? म्हणजे हिंदू लोकांना "जिन" लागु शकतो का? लागलाच तर त्यानंतरचे जे खटाटोप करायचे ते मुसलमानी असतील का हिंदु? (घाबरट)योगेशु.
बलबन का मकबरा वाचा ;)

१) भुतांच्या प्रतीप्रमाणे वर्गवारी करायची झाली तर ते काम कोण करू शकेल ? २) ही सगळी माहिती कोणी संकलित केली असेल ? ३) बायांग्या ह्या भुताचे दुकान नक्की कुठे आहे? त्याचे पैसे कुणाला द्यायचे? ते परत करायचे म्हणजे काय करायचे? त्याला साखळी घालून देतात का? ४) भूतयोनीतसुद्धा जाती असतील तर त्यांच्यात आणि आपल्यात वेगळेपणा काय आहे? तिथेही कुठली संस्था आहे का? ५) कोकणात भूतांना "टाईमपास" काय असतो? (टाईमपास २ नव्हे !!) ६) आशा राहिलेला माणूस भूत होतो तर मग भारतात 'आशाळभूतपणे' सगळीकडे पाहणाऱ्यांना काय म्हणावे? बाकी चालू द्या…. !!!!

In reply to by माम्लेदारचा पन्खा

जबरी प्रश्न...!! तर मग भारतात 'आशाळभूतपणे' सगळीकडे पाहणाऱ्यांना काय म्हणावे? ह्या प्रश्नातच उत्तर आहे. त्यांना आशाळभूत असे म्हणतात.

एकवेळ कोकणी भुतं परवडली, पण गोव्याची भुतं खूपच डेन्जरस असतात. सारखीसारखी चहा मागतात. (सर्व भुताखेतांनी क्रुपया ह. घे.) :-D

In reply to by एस

पुणेकर मांत्रिकांपुढे कोकणी भुतांनी सुद्धा हात टेकले!!

इतक्यात चेपु वर किंवा आणखी कुठेतरी वाचलय. शिर्षक बहुधा कोकणातील भुते कि काहिस होत. तिथे भुताचा पहिलाच प्रकार mention केला आहे तो cheda आहे. ति लिंक शोधायाला आताच आमच्या जिनि ला पाठवलेय :)

१३वाले भूत किती जणांना पायजे ते पैसाताईला सांगा.तिच्या घराजवळ विकत मिळतंय बहुतेक.ती पयसे गोळा करायला जाणार आहे.घेऊन टाकेल सगळ्यांसाठी=))

ते फिल्ममधे हिरो हिरोईन रोमांस करत असतात किंवा हिरोईन आंघोळ करताना मधेच येते त्या भूताला काय म्हणतात ? मेलं नीट एखादा चांगला सीन पुरे करु देईल तर शप्पथ.

रामसे ब्रदर्स च्या मुव्हीज चे फॅन दिसताय

In reply to by होबासराव

मोदिंनी सांगीतलेला 'मेक इन इंडिया' हा मंत्र अंमलात आणणारे ते एक आद्य उद्योजक होते.

In reply to by जेपी

मस्त आठवणींना उजळणी दिलीत. मी शाळेत होतो तेव्हा. साला त्यातला "दस्तक" चा एपिसोड सॉल्लिडच होता. जाम फ़ाफ़ललेली.

In reply to by पगला गजोधर

बरोबर बोललात नंतर कॉमेडी शो झाला तो पण सुरुवातीचे काही एपिसोड चांगले दाखवलेले.

अर्रे! हा नुसता भूतजातीवाचक सर्व्हे हाय काय! मला वाटलं मस्तपैकी कोकणातल्या श्टोरी असतील भुतांच्या! मज्जा येते ऐकायला. सांगा कोणाला माहिती असतील तर.

८ चेटकीन : हे मागासवर्गीयांचे भूत असते.याला कोकणात डाव असेही संबोधले जाते.
पुण्यात डाव हा शब्द चुकीच्या अर्थाने वापरतात मग!! ;)

In reply to by आदूबाळ

त्याच खाण-पिणं वेगळच असतं..... हे १०,००० त्या बायंगी च्या मूळ मालकाला दिले जातात. एक ठराविक कालावधि झाला की बायंगी मूळ मालकाकडे परत....

तुम्ही वर्णिलेली भुते त्रास देणारी का न देणारी ? त्रास देणारी कोणती आणि न देणारी कोणती हे कसे ओळखायचे ? बाटलीतून (मुख्यत्वे समुद्रकिनारी बुच लावलेल्या बाटलीतून) निघते ते भूत कोणते ? परदेशी असावे बहुतेक. स्त्री भूतांची माहिती कुठे सापडेल ? जनावरांची भुते असतात का ?

ऐला.. लै भारी.. घाऊक मध्ये भुतं विकत घेतली तर डिस्काऊंट मिळेल काय? थोडी तिकडे सीरीयात सोडीन म्हणतो. एक णाडी केंद्रात पण सोडायचंय. थांबा, आता लिष्टच करायला घेतो. ते डिस्काऊंटचं तेवढं बघा हां.. अंमळ जास्तच भूतं लागतील.

विं दा करंदिकरांची, किर्र रात्री,सुन्न रानी ..... अशी भुतांवरची सुंदर कविता आहे, वर्षा भावे यांची चपखल चाल आहे, जरूर ऐका.

भुतांविषयी इतकी वैविध्यपूर्ण माहिती प्रथमच वाचण्यास मिळाली :-) .

लहानपणी वारंवार कानावर पडणार्‍या "गिर्याला गवसला" या शब्दप्रयोगाचा नेमका अर्थ आता कळला.
संग्राहित / संपादित *
हे लेख प्रकाशित करण्यासाठी योग्य जागा मला माहिती आहे. ;)

खूप छान माहिती... भूतयोनीत सुद्धा मंडल आयोग लागू असावा असे उगाच वाटले. एका जातीच्या भूताने दुसर्‍या जातीच्या माणसाला त्रास दिला तर त्यांच्यात सुद्धा आपापसात जुंपत असावी. बाकी माझ्या जाती/धर्माची भूते माझे रक्षण करत असतील का हो? बादवे झोटींग, आग्यावेताळ हे काय असते? मा.बो. वर अमानवीय असा धागा आहे. त्यात बर्‍याच जणांच्या खर्‍याखुर्‍या अनुभवावर चर्चा आहे. त्यात बायंगीवर सुद्धा एक चर्चा आहे. या भुताला म्हणे कायम काही नेवेद्द्य द्यावा लागतो. आणि जर तुमच्या कडून आगळीक झाली तर तर हे भूत त्याने तुम्हाला जे दिले त्याच्या दसपट वसूल करून अक्षरशः तुम्हाला रस्तावर आणतो...असे लिहीले आहे.

ज्या ने धागा टाकला तो मंका बहुतेक उरलेल्या तीन १५) हडळ १६ भानामति १७ चकवा यांच्या तावडीत सापडला असावा. कारण धागा टाकुन तो गायबलाय.1 आणि उका लेडिज भुत वेगळं कशाला पाहिजे ते पुण्याला असं रुमाल बांधुन 1 आजुबाजुला वावरत असतातच की तुम्ही सावध असा फक्त.

In reply to by सतिश गावडे

कस चं कस चं आम्ही आलो होतो तेव्हा काही मांत्रिक आमच्या अवतीभवती होते. त्यामुळे ती भुते आमच्या पासुन १० हात दुर वावरत होती. 1

मंदार काञे, तुम्हाला तुमचा आयडी नीट लिहिता येतोय, म्हणजे हे ढकलपत्रातून आलेले समजून याच्यावर भानामती करू काय? म्हसोबा, हडळ आणि भानामती यांच्याबद्दल दुसर्‍या मेसेजमधे आले होते का? तो मेसेज पण पेस्ट करायचा त्रास घ्या जरा!