✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भूकंपामागची कारणे

ह
हुप्प्या यांनी
Tue, 04/28/2015 - 22:29  ·  लेख
लेख
भूकंप हा कधी होईल आणि कुठे होईल ह्याचे उत्तर विज्ञानाला आजही निश्चितपणे देता येत नाही. मात्र वेळोवेळी राजकीय व धार्मिक नेते आपली पोळी भाजून घेण्याकरता भूकंपाचा वापर करत आहेत. ८० वर्षापूर्वी नेपाळ व बिहारच्या आसपास असाच मोठा भूकंप होऊन अनेक लोक मेले. २०१५ मधेही तेच झाले. १९३४ साली जेव्हा भूकंप झाला तेव्हा गांधी बाबा (मोहनदास करमचंद) म्हणून गेले की हिंदू लोक अस्पृश्यता पाळतात म्हणून देवाने त्यांना शिक्षा दिली. आता ही बातमी देवाने जातीने ह्या माणसाच्या कानात कुजबुजली का अन्य काही प्रकारे हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचवला गेला ते आजवर कळलेले नाही. ८० वर्षापूर्वी लोक तितकेसे वैज्ञानिक विचारांचे नसल्यामुळे हा ज्ञानी बाब जे काही बोलतो आहे त्याला माना डोलावण्याचे काम केले असेल. पण आजच्या घडीलाही विविध मंडळी भूकंपामागची कारणमीमांसा सांगत आहेत ते मोठे मनोरंजक आहे. कुणी बाब म्हणतात की बीफ खाल्ल्यामुळे देवाने ही शिक्षा दिली आहे. आता उरलेले जग हजारो वर्षे बीफ चापत आहे त्यांना शिक्षा का बरे नाही? कुणी म्हणते राहुलगांधी केदारनाथला गेले म्हणून देव रागावला आहे. हे काय भलतेच? देव आपल्याच अवतारावर कधी रागावतो का? असो. हिंदू वगैरे धर्म आहेतच रानटी. पण ख्रिस्ती लोकांनी नेपाळच्या भूकंपग्रस्तांना मदत म्हणून तातडीने १ लाख कागदी बांधणीतील बायबले पाठवली आहेत. बहुधा थंडीत सरपण म्हणून वापरता येतील! असो. कधीतरी विज्ञान भूकंप ओळखण्यात प्रवीण होईल अशी आशा. पण तोपर्यंत अशा लोकांच्या अकलेचे तारे ऐकून वाचून मनोरंजन करून घ्यावे. http://www.mkgandhi.org/articles/mg_causation.htm http://thenortheasttoday.com/vhp-leader-links-nepal-earthquake-to-beef-eating/ http://www.firstpost.com/politics/rahuls-impure-visit-to-kedarnath-caused-nepal-earthquake-says-sakshi-maharaj-2215456.html
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
14374 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

बाकी काही असू द्या...

पिवळा डांबिस
Tue, 04/28/2015 - 22:57 नवीन
कुणी म्हणते राहुलगांधी केदारनाथला गेले म्हणून देव रागावला आहे. हे काय भलतेच? देव आपल्याच अवतारावर कधी रागावतो का?
पण या वाक्याला दाद देतो!!! :)
  • Log in or register to post comments

+१००

मदनबाण
Wed, 04/29/2015 - 09:51 नवीन
+१०० हेच म्हणतो जी... बाकी भूकंप होण्याआधी काही दिवस माझ्या वाचनात भूकंपा विषयीच्या काही बातम्या आल्या होत्या... उदा. जपानच्या कुठल्याश्या किनार्‍यावर अनेक डॉल्फिन्स येउन पडल्या होत्या.. तिथले तज्ञांचे विचार की भूकंपामुळे मागच्या सुनामीच्या वेळी अशीच काही लक्षणे दिसली होती इं. नंतर जपानच्या भूकंपा विषयीच्या साईटवर सुद्धा नंतर एकदा जाउन आलो होतो तेव्हा ४ पेक्षा जास्तीचा जपान जवळ झाल्याचे काही तरी लिहले होते... मनात सारखे भूकंपा विषयीचे विचार येत होते, अगदी माझ्या तिर्थरुपांना देखील हे मी बोलुन दाखवले होते... आणि काही दिवसातच ही नेपाळच्या भयानक भूकंपाची घटना समजली ! टिव्ही समोर बसुन मी सारखा स्वतःलाच विचारत होतो... भूकंप भूकंप मनात का घोळत होते ? सोन्याबापूच्या धाग्यावर प्रतिसाद दिल्या नंतर त्या खाली प्रमाणाच्या बाहेर काहीच्या काही अवांतर :- मी भुकंपाची वाट पाहत आहे ! असे लिहण्याचा विचार सुद्ध्या त्या वेळी आला होता, पण तसं लिहणे मी टाळले ! असं का ? त्याचा विचार मी अजुन करतो आहे...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Nepal earthquake: humanitarian crisis engulfing 8 million people – rolling report
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

कुणी म्हणते राहुलगांधी

काळा पहाड
Tue, 04/28/2015 - 23:07 नवीन
कुणी म्हणते राहुलगांधी केदारनाथला गेले म्हणून देव रागावला आहे. हे काय भलतेच? देव आपल्याच अवतारावर कधी रागावतो का?
मुसलमान व्यक्तीनं केदारनाथ मंदिरात प्रवेश केला तर देव रागावणार नाही का?
  • Log in or register to post comments

देव "रागवेलच" हे सामान्य

टवाळ कार्टा
Wed, 04/29/2015 - 12:09 नवीन
देव "रागवेलच" हे सामान्य लोकांना कसे समजते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

हा प्रश्न सामान्य हिंदूंनाच

काळा पहाड
Wed, 04/29/2015 - 14:38 नवीन
हा प्रश्न सामान्य हिंदूंनाच का विचारला जातो? सौदी अरेबियात जाऊन सामान्य मुसलमानांना हा प्रश्न कुणी विचारेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

१००, २००, ३००, ४००, ....१०००+

टवाळ कार्टा
Wed, 04/29/2015 - 15:01 नवीन
१००, २००, ३००, ४००, ....१०००+ किती करायचेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

७८६

काळा पहाड
Wed, 04/29/2015 - 15:06 नवीन
७८६
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

शिव शिव शिव!!

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/29/2015 - 18:38 नवीन
शिव शिव शिव!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

कुणाला?

बॅटमॅन
Wed, 04/29/2015 - 19:13 नवीन
कुणाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

नशीब.. "कुणला" म्हणून

हाडक्या
Wed, 04/29/2015 - 19:54 नवीन
नशीब.. "कुणला" म्हणून विचारलंस, "काय" म्हणून विचारला असतास तर धार्मिक भावना दुखावल्या म्हून कोडतात खेचला असता तुला.. (भयंकर चिडलेली स्माईली कल्पावी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी!!!!

बॅटमॅन
गुरुवार, 04/30/2015 - 13:07 नवीन
हा हा हा, अगदी अगदी!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

ओ पहाड

खंडेराव
Wed, 04/29/2015 - 17:44 नवीन
गमतीने म्हणत असाल तर ठिक आहे. बाकी, देव माणसे हिंदु कि मुसलमान बघुन निर्णय घेतो अशी आपली समजुत असेल तर त्याचा णिशेध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

नै हो. आमचा देव तसं बघत असता

काळा पहाड
Wed, 04/29/2015 - 22:52 नवीन
नै हो. आमचा देव तसं बघत असता तर काय हवं होतं? पण आमचा देव पडला सर्वधर्मसमभाव वाला. त्यामुळं तो तसं काही करण्याची शक्यताच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव

छान...माणसात देव शोधणे याचा

टवाळ कार्टा
Wed, 04/29/2015 - 23:19 नवीन
छान...माणसात देव शोधणे याचा नवीन अर्थ समजला आज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

पापं वाढली हो!

पैसा
Tue, 04/28/2015 - 23:08 नवीन
पापं वाढली हो! फार काय, मिपावरच्या णवीण लेखकांणा तुम्ही मिपाकरांनी सतावल्यामुळे हा आकाशातल्या बापाचा कोप झाला आहे.
  • Log in or register to post comments

ज्ञानी बाब जे काही बोलतो आहे त्याला

अत्रन्गि पाउस
Wed, 04/29/2015 - 03:25 नवीन
रवींद्रनाथ टागोरांनी कडाडून विरोध केला होता असा वंगचित्रात उल्लेख आहे. ...जस्ट आठवले ..
  • Log in or register to post comments

डॉ. कल्याण गंगवाल यांनीही

एस
Wed, 04/29/2015 - 10:37 नवीन
डॉ. कल्याण गंगवाल यांनीही आइनस्टाइन चा संदर्भ देत असेच तारे तोडले आहेत.
  • Log in or register to post comments

सगळा केजरीवाल चा दोष आहे.

प्रसाद१९७१
Wed, 04/29/2015 - 12:06 नवीन
सगळा केजरीवाल चा दोष आहे. भुकंप होऊ कसा दिला त्याने?
  • Log in or register to post comments

सद्या "आप" स्वतः

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 04/29/2015 - 12:43 नवीन
सद्या "आप" स्वतः राजकीयभूकंपग्रस्त असल्याने त्या पडझडीत दुर्लक्ष झाले असेल... त्यान्ला येकडाव मापी द्या ! :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

सगळा केजरीवाल चा दोष आहे.

क्लिंटन
Wed, 04/29/2015 - 13:04 नवीन
सगळा केजरीवाल चा दोष आहे. भुकंप होऊ कसा दिला त्याने?
असं होय? मला वाटत होते की भूकंपासाठी मोदीच जबाबदार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

पूर्वी मोदींचे नाव असायचे,

प्रसाद१९७१
Wed, 04/29/2015 - 13:25 नवीन
पूर्वी मोदींचे नाव असायचे, गेल्या आठवड्यात एकाचा नौटंकी करता करता जीव गेल्या पासुन, सर्व मृत्युंची जबाबदारी केजरीवालांची आहे हे नव्यानीच कळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

नौटंकी कुणाची आणि जीव कुणाचा

रामपुरी
Wed, 04/29/2015 - 21:31 नवीन
नौटंकी कुणाची आणि जीव कुणाचा गेला. गुप्त सुत्रांकडून असंही समजतं की आण्णा हजारेंच्या उपोषणात सुद्धा अशीच नौटंकी करण्याचा बेत होता पण आण्णा हुशार निघाले. त्यांनी उपोषणच गुंडाळले आणि नौटंकीवालला त्याच्या आवडत्या विशिष्ट अवयवावर लाथ मारून हाकलून दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

खरच टि.व्हि. वर जे पाहतोय

होबासराव
Wed, 04/29/2015 - 12:27 नवीन
त्यानुसार नेपाळची परिस्थिति खुप वाईट आहे. धाग्यात गांधिंचा संदर्भ आल्याने हा धागा शतकी होणार. णेफळे आळिचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक असलेला होबासराव
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 04/29/2015 - 13:05 नवीन
वाचतेय.
८० वर्षापूर्वी लोक तितकेसे वैज्ञानिक विचारांचे नसल्यामुळे हा ज्ञानी बाब जे काही बोलतो आहे त्याला माना डोलावण्याचे काम केले असेल.
८० वर्षेच नाही तर २५ वर्षापूर्वीही '४०० वर्षे जुनी मसजीद तोडून देशाचे भले होऊ शकते' ह्यावर माना डोलावणारा सुशिक्षित मध्यमवर्ग होता की.
  • Log in or register to post comments

अरे वा!

पैसा
Wed, 04/29/2015 - 13:09 नवीन
माईसाहेब, तुम्हाला ४०० वर्षापूर्वीच्या आठवणी अजून आहेत? मस्तच हो! तेव्हाच्या मशिदी कशा बांधल्या ते पण तुम्हाला आठवत असेल नै? आमाला कै म्हैत नै. सांगा बघू पटकन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

ओ तै...म्हैत नै कै...त्या

टवाळ कार्टा
Wed, 04/29/2015 - 13:37 नवीन
ओ तै...म्हैत नै कै...त्या स्वयंभू असत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

वा

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 04/29/2015 - 14:33 नवीन
तेव्हाच्या मशिदी कशा बांधल्या ते पण तुम्हाला आठवत असेल नै
अगदी खर्रीखुर्री माहिती पाहिजे असेल तर संघाने सक्तीने रिटायर केलेल्या लालकृष्ण अडवाणींना तू विचारावेस असे सुचवते.किंवा उमा भारती,अशोक सिंघल्,मुरलीमनोहर्,वाजपेयी..अशा तज्ञांची फौज आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ते न्हवते ना तेव्हा

पैसा
Wed, 04/29/2015 - 15:41 नवीन
तुम्ही सगळं प्रतेक्ष बघितलंय म्हणून तुम्हालाच विचारलं. आठवत नसेल तर नाय म्हणा. हाकानाका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

आठवत कसं नाही? बाबराच्या पुढे

काळा पहाड
Wed, 04/29/2015 - 15:56 नवीन
आठवत कसं नाही? बाबराच्या पुढे मागे करणार्‍यात त्या पण होत्याच की! त्यानं नाही म्हटल्यावर मग "ह्यां" ना पकडलं त्यांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मायडे गं मायडे

हुप्प्या
Sun, 05/03/2015 - 10:19 नवीन
मायडे जरा वहावत गेलीस गं! म्हातारपणामुळे स्मृतीभ्रंश सुरु झाला का गं? जरा चांगल्या डॉक्टराला दाखिव. उगाच काट्याचा नायटा नको व्हायला. असो. तर शहाबानोच्या खटल्याचा निर्णय फिरवून हिंदू लोकांच्या नाराजीवर उतारा म्हणून गांधींच्या राजीवने त्या अयोध्येच्या अवशेषाजवळच्या देवळाचे कुलूप उघडून तिथे रामाची पूजा सुरू केली. म्हणजे एक आग लावून त्यावर पेट्रोल ओतून ती विझवायचा प्रयत्न बर का गं मायडे! तर ह्या प्रयत्नांना योग्य ते फळ यायचेच होते ते आले. चल आता भूकंप आणि त्याच्या कारणांकडे वळ. वाटले तर नान्यालाही बोलाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

आमाला कै म्हैत नै. सांगा बघू पटकन!

होबासराव
Wed, 04/29/2015 - 13:17 नवीन
ह्या वर आपले मौलिक मत मांडण्या करीता हीतेसभाय णाना णेफळे (पगारे) किंवा ते फिलॉसॉफर ग्रेट थुंकरकर मीपा वर 'आप'ली पायधुळ झाडतील. णेफळे आळिचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक असलेला होबासराव
  • Log in or register to post comments

कुणी म्हणते राहुलगांधी

कविता१९७८
Wed, 04/29/2015 - 14:13 नवीन
कुणी म्हणते राहुलगांधी केदारनाथला गेले म्हणून देव रागावला आहे. हे काय भलतेच? देव आपल्याच अवतारावर कधी रागावतो का?
शब्दच सुचत नाहीयेत जेव्हापासुन हे वाक्य वाचलंय.
  • Log in or register to post comments

ही घ्या कारणे

यसवायजी
Wed, 04/29/2015 - 14:48 नवीन
ही घ्या कारणे Image removed.
  • Log in or register to post comments

.

लॉर्ड फॉकलन्ड
Wed, 04/29/2015 - 15:13 नवीन
२००१ मधे भुजमध्ये भुकम्प झाल्यावर, 'गुजराती लोकांनी डांगमध्ये ख्रिश्चनांवर हल्ले केल्याने देवाने त्यांना ही शिक्षा दिली' असे कर्नाटकचा एक ख्रिश्चन मंत्री म्हणाला होता.
  • Log in or register to post comments

याची

बॅटमॅन
Wed, 04/29/2015 - 15:18 नवीन
लिंक इ. मिळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉर्ड फॉकलन्ड

ही घ्या लिंक

क्लिंटन
Wed, 04/29/2015 - 15:26 नवीन
लिंक इ. मिळेल का?
या मंत्र्याचे नाव टी.जॉन असे होते. लातूर-किल्लारीचा भूकंपही बाबरी पाडल्यामुळे झाला अशा स्वरूपाचेही ज्ञान काहींनी पाजळले होते असे वाचल्याचे आठवते. अर्थात त्यावेळी इंटरनेट नसल्यामुळे लिंक सहज देता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

धन्यवाद!

बॅटमॅन
Wed, 04/29/2015 - 15:55 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

भूकंपात

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 04/29/2015 - 17:05 नवीन
भूकंपासारख्या दुर्घटनेचेही राजकारण कसे करावे हे ह्या कमंडलू मंडळींकडून शिकावे रे बॅटमना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तुमच्या काळात पण असं

सूड
Wed, 04/29/2015 - 17:56 नवीन
तुमच्या काळात पण असं भूकंपावरुन राजकारण व्हायचं का गं माई? म्हणजे द्वापारयुग, त्रेतायुगात वैगरे? तू ब्रह्मदेवापेक्षा उलुशीक लहान म्हणून विचारलं हो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हो तर!

पैसा
Wed, 04/29/2015 - 19:51 नवीन
तेव्हा इंद्र, वरूण, वायु सगळे देव एकमेकांवर ढकलायचे बघ! मग शंकराने शाप दिला का विष्णुने वर दिला यावरून पण भांडणं व्हायची असं माई नानाला सांगताना ग्रेटथिंकरने ऐकलं असं हितेश म्हणाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कैलासावर...

स्वप्नांची राणी
गुरुवार, 04/30/2015 - 20:13 नवीन
एकदा माई आणी नाना कैलासावर बसून सारीपाट खेळत होते. तेंव्हा माईने नानांना विचारले की मी कोणत्या पुण्यानं आपणांस प्राप्त झाले..? ...असं काहीसं डोळ्यासमोर उभं राहिलं माझ्या!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

पुण्याने प्राप्त व्हायला

सूड
गुरुवार, 04/30/2015 - 20:15 नवीन
पुण्याने प्राप्त व्हायला त्यांच्या काळात पुणे अस्तित्वात तरी होतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

पुण्ण्य रे पुण्ण्य...लिही बघू

स्वप्नांची राणी
गुरुवार, 04/30/2015 - 20:18 नवीन
पुण्ण्य रे पुण्ण्य...लिही बघू १०० वेळा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ओक्के, हल्ली पुण्यातला आणि

सूड
गुरुवार, 04/30/2015 - 20:19 नवीन
ओक्के, हल्ली पुण्यातला आणि पापपुण्यातल्या पुण्यातला फरक न कळण्याइतकं पुण्याचं पाणी लागलंय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

बाकी पुणे त्रेतायूगापासून

स्वप्नांची राणी
गुरुवार, 04/30/2015 - 20:23 नवीन
बाकी पुणे त्रेतायूगापासून अस्तित्त्वात होतं...किंबहुना, त्याच्या अस्तित्त्वाबाद्दल शंका घेतल्यानेच भुकंप झाला असावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

टी जॉन आणी एम गांधी कमंडलू?

मृत्युन्जय
Wed, 04/29/2015 - 18:09 नवीन
टी जॉन आणी एम गांधी कमंडलू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

...

आशु जोग
Fri, 06/19/2015 - 00:19 नवीन
हा धागा म्हणजे आफ्टरशॉकच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

...

आशु जोग
Wed, 04/29/2015 - 22:48 नवीन
हुप्प्या बातम्या चिकटवायचे थांबवणार असे ठरले होते ना
  • Log in or register to post comments

नाही बुवा

हुप्प्या
गुरुवार, 04/30/2015 - 10:11 नवीन
असा गैरसमज का झाला आपला? जर चिकटवलेल्या बातम्या आवडत नसतील तर अशा धाग्यांना आपण चिकटू नये. अन्यत्र गमन करावे असे एक अनाहूत सल्ला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

पतंजली, संघ आणि डेरा सच्चा

विवेकपटाईत
गुरुवार, 04/30/2015 - 20:00 नवीन
पतंजली, संघ आणि डेरा सच्चा सौदाचे हजारो कार्यकर्ते निस्वार्थ भावनेने नेपाल मध्ये आज कार्य करतात आहे. एवढेच नव्हे तर उत्तर प्रदेश सरकारने ही शेकडो ट्रक गरजेच्या वस्तू पाठविल्या. तर दुसरी कडे आप आणि पप्पू कुठे आहेत. फोर्ड फाउंडेशन कडून पैसा घेणारे Ngo कुठे आहेत. पुरोगामी कुठे आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा