Skip to main content

तू ये...

लेखक सतिश गावडे यांनी रविवार, 26/04/2015 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यासाठी कोसळतं आभाळ कवेत घेईन तू ये, तुला फुकट देईन... वादळांची अता तमा न मजला, न प्रलयाची मज भीती तोडून दिले सारे पाश अता मी, मज ना कुणाची क्षीती तुझ्यासाठी रणरणत्या उन्हात भैरवी गाईन तू ये, तुला फुकट देईन... अर्थ नसे कसलाच कशाला, फेकली फुकाची ओझी परी अंतरी हळवा कोपरा, अता घेतसे परिक्षा माझी तुझ्यासाठी दगडाला जास्वंदीची फुले वाहीन तू ये, तुला फुकट देईन... अर्थस्य पुरुषः दासः म्हणूनी उद्घोष तो करी मी नसे तयात माझा आत्मा, उगा ओंजळ भरी मी तुझ्यासाठी अमावस्येच्या रातीलाही चांदणे देईन तू ये, तुला फुकट देईन...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 10660
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

विलक्षण प्रत्ययकारी कविता. कवीने व्यथा आणि कथा (किंवा व्यथेची कथा किंवा कथेची व्यथा) ह्या दोहोंचा संगम अतिशय सुरेखरीत्या येथे दर्शवला आहे.

In reply to by टवाळ कार्टा

तसलं कै नै हो... एखादी हटके ओळ आणि यमके यांच्या जोडीने कविता विशेषतः आर्त कविता कशी पाडता सॉरी प्रसवता येते याचं प्रात्यक्षिक करुन बघत होतो.

In reply to by टवाळ कार्टा

तू ये, असा बदल जास्त रोम्यॅंटीक वाटेल असे नम्रपणे सुचवू इच्छितो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आपल्या सुचनेची विनम्रपणे पोच देऊन असे सांगू इच्छितो की कवितेचा डोलाराच मुळी "तू ये, तुला फुकट देईन..." या ओळीवर उभा आहे. आणि ही ओळ जिथून उचलली आहे तिथे "तू ये, तुला फुकट देईन..." अशीच असल्यामुळे त्यात बदल करणे ही कवितेच्या प्रेरणेशी प्रतारणा होईल. तस्मात, क्षमस्व.

In reply to by पैसा

"कविता - एक पाडणे" या परिसंवादातील आपल्या सहभागासाठी तसेच मौलिक मार्गदर्शनासाठी धन्यवाद. =))

In reply to by सतिश गावडे

कवीच्या बाजूने: हॅ हॅ हॅ कस्चं कस्चं! वाचकांच्या बाजूने: अजून पाडलीय कुठे? जरा उभी रहू दे. मग पाडू!

In reply to by पैसा

पैसा ताई सुचवलेले मस्त आहे, परंतु तू ये, तुला फुकट देईन.. या ओळी या कवितेच्या जान आहेत असे वाटते आहे. .

या कवितेतले दोन गुप्त संदेश : १. तू ये, तुला फुकट देईन... हे सारखं सारखं लिहून कवी "निवडणूका जवळ आल्या आहेत आणि मी उभा राहणार आहे" असा छुपा संकेत देत आहे. २. "मठधिपतींच्या कवीशिष्यांत ता अजून एक अ‍ॅडीशन झाली आहे" असा महत्वाचा गुप्त संदेशही कवीने मोठ्या खुबीने कवितेत पेरला आहे. ;) :)

In reply to by टवाळ कार्टा

यांचे मिपावरील अवतार मोजले तर पुराणातील एखादया देवतेच्या अवतारांच्या संख्येपेक्षा जास्त भरेल.

In reply to by द-बाहुबली

बॉमकेस बॅक्षी - Tue, 28/04/2015 - 23:47 I take it as a compliment... after all its the only thing you are very capable of giving me. :)
तुम्ही कोणाचेही कितवेही अवतार असा...हे वाक्य जाम आवडले आहे :)

फुकट देण्यावरुन आठवलं, तुझं पुस्तक द्यायचं राह्यलंय!! ;) बाकी पुण्यात राहून फुकटच्या वार्ता म्हणजे अतीच!! ;)

In reply to by सूड

>> फुकट देण्यावरुन आठवलं, तुझं पुस्तक द्यायचं राह्यलंय!! ;) धन्यवाद, मी तुम्हाला माझा पत्ता व्यनि करतो. कुरियरने पाठवून दया. >> बाकी पुण्यात राहून फुकटच्या वार्ता म्हणजे अतीच!! ;) वार्ताच त्या. तुम्हाला काय वाटलं, खरंच फुकट देईल का कवी?

कविता आवडली नाही ! आपण आम्हाला ऐकवलेली कविता बरीच हलक्या नोट वर होती .... इथे अर्थस्य पुरुषः दासः वगैरे घातल्याने चाल लावता येत नाहीये ... असं कसं चालायचं ... श्यॅ .... कविता आवडली नाही

ते पौष्टीक या न्यायाने कवीतेचा अर्थ सकस आहे पण "अता" या शब्दाचे विशेषाधिकार राखीव आणि "रेखीव" असल्याने ही कवीता ती प्रतीभेची उंची गाठत नाही आणि भावार्थात खोलीही नाही.
"आधी वस्तरा मग निस्तरा" या झी(ट) टिव्हीच्या कवीता समीक्षण कार्यक्रमातून साभार. मूळ अवांतर : यमकांचा गूढअभ्यास वाढवावा, आणखी दर्जेदार खमके यमके कवी होण्याची लक्षणे आहेत तुमच्यात हा वाचकांचा प्रेमळ सल्ला !!

अर्थ नसे कसलाच कशाला, फेकली फुकाची ओझी परी अंतरी हळवा कोपरा, अता घेतसे परिक्षा माझी
हे अंतिम सत्य!! चेष्टा करतानाही मुळच्या स्वभावाने कविता छानच झाली आहे.

सहज आपल्या आवडत्या काव्य विभागात आज डोकवावे म्हंटले आणि ही कविता वाचुन छान वाटले.. सर्वात आवडले म्हणजे "तू ये, तुला फुकट देईन..." कवीतेतील नायक ज्या पद्धतीने हे बोलतो आहे ते एकदम आवडले.. जाता जाता : तु हसत दूर जा या कवितेची आठवण झाली.

In reply to by गणेशा

गणेशा, जाताना कवी काहीच फुकट देणार नाहीये, हे लक्षात असूदेत मात्र! =))

तुझ्यासाठी कोसळतं आभाळ कवेत घेईन तू ये, तुला फुकट देईन...तुझ्यासाठी अमावस्येच्या रातीलाही चांदणे देईन तू ये, तुला फुकट देईन... या ओळी अगदी अगदी आवडल्या. सुंदर!!! सुंदर!!!

सगाबोवा... पुन्हा येऊ देत हो असं काहीतरी हृदयाच्या कोन्यातून वरवर तरंगत येणारं... भर उकाड्याच्या दिवसातही वादळवारा वीजकहारा अनुभव देणारं...

सगाबोवा... पुन्हा येऊ देत हो असं काहीतरी हृदयाच्या कोन्यातून वरवर तरंगत येणारं... भर उकाड्याच्या दिवसातही वादळवारा वीजकहारा अनुभव देणारं...