✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तू ये...

स — सतिश गावडे, Sun, 04/26/2015 - 10:07
तुझ्यासाठी कोसळतं आभाळ कवेत घेईन तू ये, तुला फुकट देईन... वादळांची अता तमा न मजला, न प्रलयाची मज भीती तोडून दिले सारे पाश अता मी, मज ना कुणाची क्षीती तुझ्यासाठी रणरणत्या उन्हात भैरवी गाईन तू ये, तुला फुकट देईन... अर्थ नसे कसलाच कशाला, फेकली फुकाची ओझी परी अंतरी हळवा कोपरा, अता घेतसे परिक्षा माझी तुझ्यासाठी दगडाला जास्वंदीची फुले वाहीन तू ये, तुला फुकट देईन... अर्थस्य पुरुषः दासः म्हणूनी उद्घोष तो करी मी नसे तयात माझा आत्मा, उगा ओंजळ भरी मी तुझ्यासाठी अमावस्येच्या रातीलाही चांदणे देईन तू ये, तुला फुकट देईन...

प्रतिक्रिया द्या
10558 वाचन

💬 प्रतिसाद (42)

विलक्षण प्रत्ययकारी कविता.

प्रचेतस
Sun, 04/26/2015 - 10:16 नवीन
विलक्षण प्रत्ययकारी कविता. कवीने व्यथा आणि कथा (किंवा व्यथेची कथा किंवा कथेची व्यथा) ह्या दोहोंचा संगम अतिशय सुरेखरीत्या येथे दर्शवला आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!

सतिश गावडे
Sun, 04/26/2015 - 10:17 नवीन
अता कुणी "कथा कुणाची, व्यथा कुणाला" असं म्हटलं नाही म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सहमत!

पॉइंट ब्लँक
Sun, 04/26/2015 - 16:40 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हात मेल्या!

पैसा
Sun, 04/26/2015 - 10:28 नवीन
कसं व्हायचं तुझं! णो फ्रीबीज!!
  • Log in or register to post comments

तीच्या पर्यंत साद पोचली का ;)

टवाळ कार्टा
Sun, 04/26/2015 - 10:32 नवीन
तीच्या पर्यंत साद पोचली का ;)
  • Log in or register to post comments

तसलं कै नै हो...

सतिश गावडे
Sun, 04/26/2015 - 10:36 नवीन
तसलं कै नै हो... एखादी हटके ओळ आणि यमके यांच्या जोडीने कविता विशेषतः आर्त कविता कशी पाडता सॉरी प्रसवता येते याचं प्रात्यक्षिक करुन बघत होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

एक सुचवते

पैसा
Sun, 04/26/2015 - 10:42 नवीन
'तुला चांदणे देईन' असा बदल कर. मग किती रोम्यांटिक वाटेल बघ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

पैसा तै जोरात आहेत आज :)

टवाळ कार्टा
Sun, 04/26/2015 - 10:43 नवीन
पैसा तै जोरात आहेत आज :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अजुन एक

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 04/26/2015 - 11:44 नवीन
ऐ तू ये, असा बदल जास्त रोम्यॅंटीक वाटेल असे नम्रपणे सुचवू इच्छितो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आपल्या सुचनेची विनम्रपणे पोच

सतिश गावडे
Sun, 04/26/2015 - 11:57 नवीन
आपल्या सुचनेची विनम्रपणे पोच देऊन असे सांगू इच्छितो की कवितेचा डोलाराच मुळी "तू ये, तुला फुकट देईन..." या ओळीवर उभा आहे. आणि ही ओळ जिथून उचलली आहे तिथे "तू ये, तुला फुकट देईन..." अशीच असल्यामुळे त्यात बदल करणे ही कवितेच्या प्रेरणेशी प्रतारणा होईल. तस्मात, क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

"कविता - एक पाडणे" या

सतिश गावडे
Sun, 04/26/2015 - 11:06 नवीन
"कविता - एक पाडणे" या परिसंवादातील आपल्या सहभागासाठी तसेच मौलिक मार्गदर्शनासाठी धन्यवाद. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

धन्यवादासाठी धन्यवाद!

पैसा
Sun, 04/26/2015 - 11:53 नवीन
कवीच्या बाजूने: हॅ हॅ हॅ कस्चं कस्चं! वाचकांच्या बाजूने: अजून पाडलीय कुठे? जरा उभी रहू दे. मग पाडू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

पैसा ताई सुचवलेले मस्त आहे,

गणेशा
Tue, 04/28/2015 - 18:43 नवीन
पैसा ताई सुचवलेले मस्त आहे, परंतु तू ये, तुला फुकट देईन.. या ओळी या कवितेच्या जान आहेत असे वाटते आहे. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चांगलय

जेपी
Sun, 04/26/2015 - 11:08 नवीन
50 अपेक्षीत
  • Log in or register to post comments

या कवितेतले दोन गुप्त संदेश :

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 04/26/2015 - 11:40 नवीन
या कवितेतले दोन गुप्त संदेश : १. तू ये, तुला फुकट देईन... हे सारखं सारखं लिहून कवी "निवडणूका जवळ आल्या आहेत आणि मी उभा राहणार आहे" असा छुपा संकेत देत आहे. २. "मठधिपतींच्या कवीशिष्यांत अता अजून एक अ‍ॅडीशन झाली आहे" असा महत्वाचा गुप्त संदेशही कवीने मोठ्या खुबीने कवितेत पेरला आहे. ;) :)
  • Log in or register to post comments

ते अधीपासुनच मानाचे शिष्य

टवाळ कार्टा
Sun, 04/26/2015 - 11:50 नवीन
ते अधीपासुनच मानाचे शिष्य आहेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

तुझ्यासाठी परातभर जिलब्या मी

प्रचेतस
Sun, 04/26/2015 - 12:22 नवीन
तुझ्यासाठी परातभर जिलब्या मी तळीन तू ये, तुला फुकट देईन.
  • Log in or register to post comments

अतिशय प्रत्ययकारी कविता. अजून

किसन शिंदे
Sun, 04/26/2015 - 14:07 नवीन
अतिशय प्रत्ययकारी कविता. अजून कडवी जोडायला हवीत खरं तर
  • Log in or register to post comments

हे "तू" कोण आहे ?

द-बाहुबली
Sun, 04/26/2015 - 14:09 नवीन
हे "तू" कोण आहे ?
  • Log in or register to post comments

तुमच्य सरखाच एक अवतार =))

टवाळ कार्टा
Sun, 04/26/2015 - 14:12 नवीन
तुमच्य सरखाच एक अवतार =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

यांचे मिपावरील अवतार मोजले तर

सतिश गावडे
Tue, 04/28/2015 - 23:35 नवीन
यांचे मिपावरील अवतार मोजले तर पुराणातील एखादया देवतेच्या अवतारांच्या संख्येपेक्षा जास्त भरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

I take it as a compliment...

द-बाहुबली
Tue, 04/28/2015 - 23:47 नवीन
I take it as a compliment... after all its the only thing you are very capable of giving me. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

:)

सतिश गावडे
Tue, 04/28/2015 - 23:50 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

बॉमकेस बॅक्षी - Tue, 28/04

टवाळ कार्टा
Wed, 04/29/2015 - 12:13 नवीन
बॉमकेस बॅक्षी - Tue, 28/04/2015 - 23:47 I take it as a compliment... after all its the only thing you are very capable of giving me. :)
तुम्ही कोणाचेही कितवेही अवतार असा...हे वाक्य जाम आवडले आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

नक्की कोण का येत नाहीये? वटी

अजया
Sun, 04/26/2015 - 15:58 नवीन
नक्की कोण का येत नाहीये? वटी घ्या.
  • Log in or register to post comments

तस्ला प्रॉब्लेम नै ओ त्याला :

टवाळ कार्टा
Sun, 04/26/2015 - 16:09 नवीन
तस्ला प्रॉब्लेम नै ओ त्याला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

कुठे गेले ते थोर थोर

कवितानागेश
Sun, 04/26/2015 - 17:17 नवीन
कुठे गेले ते थोर थोर विडंबनकार?
  • Log in or register to post comments

फुकट देण्यावरुन आठवलं, तुझं

सूड
Mon, 04/27/2015 - 21:15 नवीन
फुकट देण्यावरुन आठवलं, तुझं पुस्तक द्यायचं राह्यलंय!! ;) बाकी पुण्यात राहून फुकटच्या वार्ता म्हणजे अतीच!! ;)
  • Log in or register to post comments

>> फुकट देण्यावरुन आठवलं,

सतिश गावडे
Mon, 04/27/2015 - 22:50 नवीन
>> फुकट देण्यावरुन आठवलं, तुझं पुस्तक द्यायचं राह्यलंय!! ;) धन्यवाद, मी तुम्हाला माझा पत्ता व्यनि करतो. कुरियरने पाठवून दया. >> बाकी पुण्यात राहून फुकटच्या वार्ता म्हणजे अतीच!! ;) वार्ताच त्या. तुम्हाला काय वाटलं, खरंच फुकट देईल का कवी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कविता आवडली नाही !

प्रसाद गोडबोले
Mon, 04/27/2015 - 22:35 नवीन
कविता आवडली नाही ! आपण आम्हाला ऐकवलेली कविता बरीच हलक्या नोट वर होती .... इथे अर्थस्य पुरुषः दासः वगैरे घातल्याने चाल लावता येत नाहीये ... असं कसं चालायचं ... श्यॅ .... कविता आवडली नाही
  • Log in or register to post comments

बाप्रे!!

यशोधरा
Tue, 04/28/2015 - 08:25 नवीन
भलतेच उदाराचे कर्ण आहेत कवीश्वर! हे फुकट, ते फुकट! मज्जाय ब्वॉ!
  • Log in or register to post comments

फुकट

नाखु
Tue, 04/28/2015 - 11:46 नवीन
ते पौष्टीक या न्यायाने कवीतेचा अर्थ सकस आहे पण "अता" या शब्दाचे विशेषाधिकार राखीव आणि "रेखीव" असल्याने ही कवीता ती प्रतीभेची उंची गाठत नाही आणि भावार्थात खोलीही नाही.
"आधी वस्तरा मग निस्तरा" या झी(ट) टिव्हीच्या कवीता समीक्षण कार्यक्रमातून साभार. मूळ अवांतर : यमकांचा गूढअभ्यास वाढवावा, आणखी दर्जेदार खमके यमके कवी होण्याची लक्षणे आहेत तुमच्यात हा वाचकांचा प्रेमळ सल्ला !!
  • Log in or register to post comments

अर्थ नसे कसलाच कशाला, फेकली

स्पंदना
Tue, 04/28/2015 - 12:46 नवीन
अर्थ नसे कसलाच कशाला, फेकली फुकाची ओझी परी अंतरी हळवा कोपरा, अता घेतसे परिक्षा माझी
हे अंतिम सत्य!! चेष्टा करतानाही मुळच्या स्वभावाने कविता छानच झाली आहे.
  • Log in or register to post comments

सहज आपल्या आवडत्या काव्य

गणेशा
Tue, 04/28/2015 - 18:41 नवीन
सहज आपल्या आवडत्या काव्य विभागात आज डोकवावे म्हंटले आणि ही कविता वाचुन छान वाटले.. सर्वात आवडले म्हणजे "तू ये, तुला फुकट देईन..." कवीतेतील नायक ज्या पद्धतीने हे बोलतो आहे ते एकदम आवडले.. जाता जाता : तु हसत दूर जा या कवितेची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

गणेशा, जाताना कवी काहीच फुकट

यशोधरा
Tue, 04/28/2015 - 18:51 नवीन
गणेशा, जाताना कवी काहीच फुकट देणार नाहीये, हे लक्षात असूदेत मात्र! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

हा हा हा.

गणेशा
Wed, 04/29/2015 - 09:00 नवीन
हा हा हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

फार सुंदर, अर्थपूर्ण कविता

मांत्रिक
Fri, 09/11/2015 - 20:41 नवीन
फार सुंदर, अर्थपूर्ण कविता सगाजी!!! अतिशय आवडली!!! खूप खूप आवडली!!!
  • Log in or register to post comments

तुझ्यासाठी कोसळतं आभाळ कवेत

मांत्रिक
Fri, 09/11/2015 - 20:46 नवीन
तुझ्यासाठी कोसळतं आभाळ कवेत घेईन तू ये, तुला फुकट देईन...तुझ्यासाठी अमावस्येच्या रातीलाही चांदणे देईन तू ये, तुला फुकट देईन... या ओळी अगदी अगदी आवडल्या. सुंदर!!! सुंदर!!!
  • Log in or register to post comments

आवडली

ज्योति अळवणी
Sat, 09/12/2015 - 10:23 नवीन
कविता छान आहे. कल्पना आवडली
  • Log in or register to post comments

सगाबोवा...

विजय पुरोहित
गुरुवार, 02/25/2016 - 21:21 नवीन
सगाबोवा... पुन्हा येऊ देत हो असं काहीतरी हृदयाच्या कोन्यातून वरवर तरंगत येणारं... भर उकाड्याच्या दिवसातही वादळवारा वीजकहारा अनुभव देणारं...
  • Log in or register to post comments

सगाबोवा...

विजय पुरोहित
गुरुवार, 02/25/2016 - 21:21 नवीन
सगाबोवा... पुन्हा येऊ देत हो असं काहीतरी हृदयाच्या कोन्यातून वरवर तरंगत येणारं... भर उकाड्याच्या दिवसातही वादळवारा वीजकहारा अनुभव देणारं...
  • Log in or register to post comments

मस्तच

स्पा
Mon, 02/29/2016 - 13:25 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा