Skip to main content

बाइक्स घेताना - भाग ४

लेखक टवाळ कार्टा यांनी सोमवार, 27/04/2015 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
बाईक्स घेताना - भाग १ बाइक्स घेताना - भाग २ बाइक्स घेताना - भाग ३ ...तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू...मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत...त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत १३५ cc "ना घर की ना घाट की" segment १३५ cc च्या बाईक्स का बनवतात हे अजूनही मला समजलेले नै... बाईकची पॉवर जवळजवळ १५० cc इतकीच (किंचित कमी...कधीकधी किंचित जास्त) मायलेज जवळजवळ १५० cc इतकेच किंवा किंचित जास्त दिसणे १५० cc समोर काही खास नाही (याला एक अपवाद आहे) किंमत जवळजवळ १५० cc इतकीच किंवा किंचित कमी तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च जवळपास १५० cc इतकाच अतिरिक्त वैशिष्ट्ये...(additional features) - कैच नैत (याला एक अपवाद आहे) पण असे असतानाही जर बाईक बनवणार्या कंपन्या १३५ cc च्या बाईक बनवत असतील तर नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी कारण असेलच...असो मलातरी हे सगळे मुद्दे बघता १२५ cc पेक्षा जास्त इंजिन कपॅसीटीची बाईक घेताना १५० cc ऐवजी १३५ cc ची बाईक का घ्यावी याचे उत्तर कधीच नै मिळाले...कोणी सांगेल का इथेतरी? अगदी काही वर्षांपर्यंत या segment मध्यॆ एकापेक्षा जास्त पर्याय होते...जसे Bajaj Pulser 135- LS pulser-135-ls Bajaj Discover DTSi 135 discover-135 Hero Honda Achiever achiever पण बहुतेक सगळ्या कंपन्याना कमी होणारी विक्री जाणवली असावी कारण भारतातले बाईक मार्केट आता प्रगल्भ होत आहे (फक्त चोखंदळ निवडीबाबत...सुरक्षित चालवण्या बाबत आनंदच आहे सगळीकडे) त्यामुळे आता या segment मध्ये फक्त एकाच बाईक उपलब्ध आहे http://bikeadvice.in/125cc-motorcycle-segment-india-shrinking/ या बातमी नुसार हेच १२५ cc बद्दल सुध्धा सुरु झाले आहे
Bajaj Pulser 135- LS बजाजने पल्सार आणल्यापासून त्यात वेळोवेळी बरेच बदल करत होती...पण टेक्नोलॉजीकल मोठ्ठा बदल याच बाईक पासून केला... Biggest USP - world's first bike with 4 valve DTSi engine भारतात अजूनही 4 valve इंजिन असणार्या बाईक्स फक्त बजाजच बनवते...बहुतेक फक्त बजाजकडेच पेटंट असावे (याबाबत मलातरी नक्की माहिती नाही) 4 valve इंजिनाचे फायदे इंधन ज्वलनातून जास्तीत जास्त उर्जा मिळवता येते इंजिनाची कार्यक्षमता वाढते आणि मायलेज सुध्धा कमी cc च्या इंजिनामधून जास्त पॉवर मिळवता येते (अधिक माहितीसाठी कॉलिंग चिमणराव) टेक्नोलॉजी मधल्या बदलाबरोबरच पल्सरची नट-क्रॅकर* :D इमेज बदलणेसुध्धा याच बाईकपासून सुरु झाले बजाजच्या ट्रिपल स्पार्क प्लगवाल्या इंजिनांचे माहित नाही पण त्या आधीच्या बजाजच्या सगळ्या इंजिनांमध्ये या बाईकचे इंजिन सगळ्यात बेस्ट आहे १३५ cc मधून १३.५ PS पॉवार मिळते जी काही १५० cc बाईकच्या पॉवरपेक्षा जास्त आहे (होंडा युनिकॉर्न, यामाहा SZ, बजाज Discover १५० DTSi, ई.) speed आणि acceleration च्या बाबतीत सुध्धा वर लिहिलेल्या बाईक्सपेक्षा उजवी आहे आणि मायलेजसुध्धा ६० kmpl च्या आसपास मिळते इंजिन ३० kmph इतक्या कमी स्पीडलासुध्धा ५ व्या गिअरमध्ये knocking करत नाही लुक्सच्या बाबतीत बघावे तर काही first in class features आहेत...जसे clip-on handlebars split seats DC circuit 5 step adjustable rear Nitrox shock absorber ज्यांची उंची कमी आहे अथवा ज्यांना १५० cc च्या बाईक्स वजनदार वाटतात आणि पिकपसुध्धा हवाय, थोडे बरे मायलेज पण हवे पण १२५ cc किंवा त्यापेक्षा कमी cc च्या बाईक्स वरणभात टाईप वाटतात अश्या सर्व बाईकप्रेमींसाठी ही बाईक "आखुडशींगी बहुगुणी लाथा न मारणार्या दुभत्या गायीसारखी सर्वगुणसंपन्न" आहे...हि "विद्या बालन" *ज्यांनी पल्सरचे सगळ्यात पहिले मॉडेल चालवले आहे त्यांना व्यवस्थित कळले असेल मला काय म्हणायचे आहे ;) Disclaimer - या लेखातली सर्व मते माझी खाजगी मते आहेत

वाचने 43136
प्रतिक्रिया 125

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

तिथे जायला गेंड्याची कातडी लागते असे ऐकून आहे (जी तुम्च्याकडे नै असे कानावर आलेले आहे)...मी तुम्हाला भेटलेलो नाहीये पण तिथपर्यंत पोचलात तर वळख ठिवा :)

In reply to by पैसा

गेंड्याच्या कातडीचे ज्याक्येट बनवून घेऊ की...हा.का.ना.का. ;) http://www.rhinoleather.com.au/mens-leather-jackets/ ह्ये बगा शांपल :)

In reply to by प्रचेतस

पोराला मोटारसायकल पालकांनी घेऊन देऊ नये असे माझे व्यक्तीगत मत. त्याची त्याने स्वकमाईवर घ्यावी. अशाने बाईकची काळजी असल्याने ती काळजीपूर्वक चालवली जाते व देखभालसुद्धा व्यवस्थित घेतली जाते असा माझा स्वानुभव.
अग्दी अग्दी...कॉलेजला जायला म्हणून बाईक दिलीत तर ती जास्त इथे तिथे फिरण्यातच जाते...द्यायचीच असेल तर अगदी साधी आणि सेकंडहँड घेउन द्यावी...पोरगं जर सुट्टीत स्वकमाई करत असेल तर मात्र पोराने कमावलेल्या किमतीच्या २०-३० पट किंमत असलेली बाईक घेउन द्यायला हर्कत नै कारण पैसे कमवायला घरचे कसे कष्ट करतात हे समजलेले असते ...परंतू घरात १ बाईक असावीच असे माझे मत आहे...अडीअडचणीला बाईकसारखे दुसरे साधन नाही धावाधाव करायला

In reply to by प्रचेतस

पोराने स्वकमाईने बाईक घ्यावी हे ठीक आहे परंतु तो कमवायला लागेपर्यंत आयुष्यातील काही( चार ते पाच) सोनेरी वर्षे गेलेली असतात ती मात्र कधीच परत येत नाहीत. त्या काळात जर तुमच्या मुलाला पैश्याची किंमत समजावून देऊन बाईक दिलीत तर पुढे आयुष्यात काही राहून गेले असे वाटणार नाही.मुलाला जबाबदारीची जाणीव द्या. म्हणजे बापाची वस्तू स्वतःची म्हणून वापरायला शिकतील. मला वयाच्या १९ व्या वर्षी लहान का होईना बाईक मिळाली होती.७५,००० किमी व्यवस्थित चालवून शेवटी विकली. त्याचे अनुभव आजही अंगावर रोमांच आणतात. उदा पर्वती टेकडीवर मागच्या बाजूने बाईक चढविली होती. किंवा मुंबई ते मुरुड आणि परत एका दिवसात. प्रत्येक सुटीत मी बाईक पुण्याहून मुंबईला घेऊन जात असे. माझे एक म्हणणे आहे पैसा आयुष्यात केंव्हाना केंव्हा तरी प्रत्येकाला मिळतोच. गेलेला वेळ मात्र कधीच परत येत नाही. आयुष्य हे आनंद लुटण्यासाठी आहे. नाहीतर पैसा मिळवून कुणाच्या मढ्यावर घालायचा आहे? आजही मुलाला मी माझी होंडा युनिकोर्न देऊ केलेली आहे अट इतकीच-- परवाना( लायसन्स) मिळव आणि बाईक घेऊन जा आणि हेल्मेट शिवाय बाईक वर दिसलास तर बाईक परत घेतली जाईल. मुलगा सिव्हिल इंजिनियरिंग ला आहे (२ सेमिस्टर) केंव्हा तरी इंजिनियर होईलच आणि कमवायला लागेलच. फारतर एखादे वर्ष उशिरा.

In reply to by सुबोध खरे

हे पटले...त्या सोनेरी वर्षांत बाईक नसेल तर बर्याच आनंदाना मुकतो :(

In reply to by काळा पहाड

सुझूकी १५० आर किंवा होंडा युनिकॉर्नच बरी.
अजून पण बरेच पर्याय आहेत....येइलच पुढच्याच्या पुढच्या भागात :)

In reply to by टवाळ कार्टा

याडव्हर्टाईज कर्तूस वाट्टं पुढच्या भागांची?

चांगली माहिती ... पुढील भागात अपाची असेलच . वाचायला आवडेल, मागील भाग बहुतेक बघितलेनाहित वाचतो लवकरच...

In reply to by गणेशा

पुढील भागात अपाची असेलच . वाचायला आवडेल,
नै...ती पुढच्याच्या पुढच्या भागात आहे...पुढचा भाग अनाहिता स्पेश्शल अस्णारै :)
मागील भाग बहुतेक बघितलेनाहित वाचतो लवकरच...
यावरून एका मिपाआयडीची आठवण झाली ;) एक खौचट्ट शंका - तुम्ही लेख सुध्धा कोणी लिहिला आहे ते बघून मगच वाच्ता कै? :)

In reply to by टवाळ कार्टा

नै...ती पुढच्याच्या पुढच्या भागात आहे...पुढचा भाग अनाहिता स्पेश्शल अस्णारै :)
म्हंजे कंच्या बाय्की? अनाहिता बाय्की वापरत नै कै.

In reply to by काळा पहाड

म्हंजे कंच्या बाय्की? अनाहिता बाय्की वापरत नै कै.
म्हणजे बाय्की बाय्का :)

In reply to by टवाळ कार्टा

बाय्का बाय्की नस्तात. इस्कूटर बाय्की अस्तात. बाय्की बाय्का कुठ्ल्या ब्रं?

येता जाता अनाहिता काढल्याशिवाय काहीही लिहिता येऊ नये इतका अनाहितामय झाला आहेस वाटतं टकाबाळा! लेखमालिका छान आहे ही तुझी.माझा मुलगा अगदी विंट्रॆस्ट घेऊन वाचतोय आणि मला रस्त्यात या बायका दिसल्या की ज्ञानात प्रॅक्टिकल भर घालतो! रच्याकने-रविवारी पहाटे आमच्या रस्त्यावरुन (जुना हायवे) भारी भारी बाईक्स आणि बायकर्स जातात!!माझ्या लेकाला त्या डुकाटी वगैरे बायकांची स्वप्नं पडतात बहुतेक!!

In reply to by अजया

येता जाता अनाहिता काढल्याशिवाय काहीही लिहिता येऊ नये इतका अनाहितामय झाला आहेस वाटतं टकाबाळा!
अनाहिता के बगैर मिपा पे लिख्खा नही जाता*
लेखमालिका छान आहे ही तुझी.माझा मुलगा अगदी विंट्रॆस्ट घेऊन वाचतोय
अर्रे व्वा...संपादक + अनाहितेकडून कौतिक...ठ्यांकू :)
आणि मला रस्त्यात या बायका दिसल्या की ज्ञानात प्रॅक्टिकल भर घालतो!
बायका नक्का हो म्हणू...पहिल्याच भागात कोणीतरी बायका असे लिहिल्याबद्दल टोचलेले बाकी ज्ञान वाढले असेल तर पुढचा अनाहिता स्पेश्शल भाग नक्की वाचा :)
रच्याकने-रविवारी पहाटे आमच्या रस्त्यावरुन (जुना हायवे) भारी भारी बाईक्स आणि बायकर्स जातात!!
पुण्यात की ठाण्यात की मुंबईत?
माझ्या लेकाला त्या डुकाटी वगैरे बायकांची स्वप्नं पडतात बहुतेक!!
या बायकांची स्वप्ने पडत असतील तर ठिकै...या बैका तुम्च्या डोक्यावर नै बस्णार ;) *सुझानचा माजी नव्रा टू ऐश्वर्याचा आजी नव्रा व्हाईल कॉईन देतानाचा सीन ईन धूम-२

In reply to by टवाळ कार्टा

त्यांना मुलाला ड्युकाटी घेउन द्यायला लागली तर त्या तुला त्याचं ड्युकाटी खाली घालणार एवढं खर्ं ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कै सांग्ता येत नै...आज्काल धमक्यांच्या खरडी / व्यनी यायला लाग्लेत झेड का काय्ते अस्ते तस्ली शिकूरीटी मिपावर मिळ्ते कै?

In reply to by कपिलमुनी

सध्ध्या वापरतो आहे Avenger 220 DTSi विकायची आहे...घेणार का...बाकी Avenger बद्दल लिहिनच...तितका धीर धरवत नसेल तर इथेच विचार काय ते...वरची प्रश्नपत्रिका बघ पैसा तैंना दिलेली :)

In reply to by टवाळ कार्टा

लै खिक्क..खिक्क ..करायला आजकाल..सांगिन नाव दंतोप्टक अनाहिताला..मग बसशील बोबंलत... ऑं...खिक्क

सांगतो रे रात्री. जर्रा कामात आहे. काम करता करता इथे टवाळक्या चाल्ल्यात. ते झालं की हे संपादित करतो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सांगतो रे रात्री. जर्रा कामात आहे. काम करता करता इथे टवाळक्या चाल्ल्यात. ते झालं की हे संपादित करतो.
कै सांग्तो?

In reply to by टवाळ कार्टा

नाय बुलेट नाय आत्ताच स्टेप बाय स्टेप जायच.आदी avenger नंतर पुढे..

In reply to by सामान्यनागरिक

बाईक फक्त बुलेटच ! बाकी सगळी खेळणी हो ! पण तूमचं चालु द्या ........
बुलेटसाठी एक सेप्रेट धागाच काढायचा आहे...बाकी बाईक्स एक तरफ और बुलेट एक तरफ असे बुलेटवाले(च फक्त) बोलतात...पण माझ्यामते बुलेटची बाकीच्या बाईक्स बरोबर तुलना करणे हे सफरचंद आणि संत्र्याच्या तुलनेसारखे आहे बाकी मागे कोणीतरी लिहिल्याप्रमाणे माज असल्याशिवाय बुलेट देत नाहीत म्हणे ;) (हे ह.घे.)

In reply to by दिपक.कुवेत

आता काहि लिहायचचं म्हणून्...छान आहे धागा (न वाचता)....
कुठे फेडाल ही पापं :)

मी २००७ पासून बजाज डिस्कवर १३५ सीसी चालवत आहे. आतापर्यंत जवळजवळ सव्वा लाख किमी चे रनिंग झाले आहे. मला बजाज अ‍ॅव्हेंजरचे बर्‍याच दिवसापासून कुतूहूल आहे. तिचा मायलेज कमी आहे हे अगोदरच माहित आहे पण एकूण सुरक्षितता, चालवण्यातील आराम याबाबतीतले अनुभव हवे आहेत. शक्यतो कोणी ही गाडी वापरत असेल तर आवर्जून लिहा. वापर : सिटीमधे रोजचे रनिंग : ७० ते ७५ किमी. (कमीतकमी १५-२० दिवस) मुंबई पुणे दौरा : महिन्यातून दोन वेळेस. एकूण वापर अंदाजे ७००-८०० किमी.

In reply to by धर्मराजमुटके

मी २००७ पासून बजाज डिस्कवर १३५ सीसी चालवत आहे. आतापर्यंत जवळजवळ सव्वा लाख किमी चे रनिंग झाले आहे. मला बजाज अ‍ॅव्हेंजरचे बर्‍याच दिवसापासून कुतूहूल आहे. तिचा मायलेज कमी आहे हे अगोदरच माहित आहे पण एकूण सुरक्षितता, चालवण्यातील आराम याबाबतीतले अनुभव हवे आहेत. शक्यतो कोणी ही गाडी वापरत असेल तर आवर्जून लिहा. वापर : सिटीमधे रोजचे रनिंग : ७० ते ७५ किमी. (कमीतकमी १५-२० दिवस) मुंबई पुणे दौरा : महिन्यातून दोन वेळेस. एकूण वापर अंदाजे ७००-८०० किमी.
परवडत असेल तर कार घ्या किंवा (वजन) झेपत असेल तर बुलेट :) मी आत्ता Avenger 220 DTSi वापरतोय...रोज ५० कि.मी. अ‍ॅवेंजर मस्त बाईक आहे...जर तुमचा चालवायचा रोजचा रस्ता पक्का डांबरी/काँक्रिटचा, खड्डे विरहीत, मध्ये मध्ये उंचवटे नसलेला असेल तर...एकदम आरामखुर्चीमध्ये बसून बाईक चालवल्याचा फील आहे...मला ४० kmpl चे मायलेज मिळते :) पण जर रस्ता वर लिहिल्याप्रमाणे नसेल तर विचारसुध्धा करू नका, कारणे ground clearance फार कमी आहे...बाईक खालून घासली जाऊ शकते पाय पुढे सोडून बसायला लागते त्यामुळे खाचखळग्यांतून जाताना पाठीच्या मणक्याला खूप जास्त हादरे बसतात कारण हादरे बसल्यावर पायाच्या मदतीने हादर्यांचा परिणाम कमी नाही करता येत डिस्क ब्रेक वापरायचा अनुभव नसेल तर आधी हळू हळू ब्रेक लावायची प्रॅक्टिस करा...अ‍ॅवेंजर बाकी बाईकपेक्षा लवकर स्किड होते (लांबलचक असल्याने) पण कमी स्पीडला (३५ kmph पेक्षा कमी) स्किड झाली तर बाईक दोन्ही पायांच्या मधून घसरून निघून जाईल व तुम्ही मात्र जागच्या जागी २ पायांवर उभे असाल :)

In reply to by टवाळ कार्टा

सविस्तर प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद ! कार घेणे हा विचार आहेच पण मुंबईच्या ट्राफीकमधे कारवाले देखील वैतागतात. कधी कधी तर चक्क असुयेने बाईकवाल्यांकडे बघतात. रोजच्या प्रवासासाठी बाईकशिवाय पर्याय नाही. कमी वेळात इच्छीत स्थळी पोहोचता येते. शिवाय पार्कींगचा प्रश्न इतका बिकट झालाय की कधी कधी बाईकसाठी पार्की़ग शोधताना देखील नाकी नऊ येतात.

In reply to by धर्मराजमुटके

मुंबईत असाल तर अ‍ॅव्हेंजर चालून जाईल

नविन बाईक घ्यायची होती म्हणुन बाजरात तुलनात्मक अंदाज घेतला व होंडा युनिकॉर्न (१५० सीसी) घ्यायचे नक्की केले. युनिकॉर्न-१५० सीसीचे उत्पादन बंद करण्यात आले असुन नविन स्टाईल्ड युनिकॉर्न-१६० सीसीचे बुकींग चालु आहे, युनिकॉर्न-१६० ची डिलीव्हरी मिळायला दोन अडीच महिने लागतील असे शोरूम मध्ये सांगितले. ३१-मार्च-२०१५ किंमती वाढणार असल्याने व बाईकची निकड असल्याने व स्टाईलच्या तुलनेत होंडा ट्रिगर सरस वाटल्याने मग तीच घेतली. होंडा ट्रिगर स्टॅन्डर्ड: १५० सीसी । १४.० बीएचपी । फ्रंट डिस्क ब्रेक । ऑन-रोड प्राईस रु. ८०, ५०० My_CB_Trigger याच श्रेणीतल्या इतर काही बाईक्सच्या ऑन-रोड किंमती पुढील प्रमाणे होत्या (३१-मार्च-२०१५ पुर्वी) : १) सुझुकी गिक्सार: १५५ सीसी । १४.८ बीएचपी । फ्रंट डिस्क ब्रेक । रु. ८५,५०० २) यामाहा एफझी, सिंगल कलर : १५५ सीसी । १४.० बीएचपी । फ्रंट डिस्क ब्रेक । रु. ९०,००० ३) यामाहा एफझी, डुअल कलर : १५५ सीसी । १४.८ बीएचपी । फ्रंट डिस्क ब्रेक । रु. ९२,००० ४) होंडा ट्रिगर डिलक्स: १५० सीसी । १४.० बीएचपी । फ्रंट+रियर डिस्क ब्रेक । रु. ८४,००० ५) होंडा ट्रिगर सीबीएस: १५० सीसी । १४.० बीएचपी । फ्रंट+रियर डिस्क ब्रेक वुईथ सीबीएस । रु. ९१,००० ६) होंडा युनिकॉर्न, स्टॅन्डर्ड : १६० सीसी । १४.५ बीएचपी । फ्रंट डिस्क ब्रेक । रु. ८४,००० ७) होंडा युनिकॉर्न, सीबीएस: १६० सीसी । १४.५ बीएचपी । फ्रंट+रियर डिस्क ब्रेक वुईथ सीबीएस । रु. ९०,०००

In reply to by चौथा कोनाडा

हिचे आणी युनीकॉर्नचे ईंजीन सारखेच आहे...फक्त डिझाईन मला यामाहा एफझी वरून "inspired" वाटते ;)

In reply to by टवाळ कार्टा

हो, अगदी, अगदी ! डिझाईन मला यामाहा एफझी वरून "inspired" आहे समजतेच, पण इंधन टाकीचे वशिंड (बम्प) जरासा माईल्ड केलाय. आफ्टर ऑल दिज आर जेन्ट्लमन्स बाईक्स ! :-) अति-स्टायलिंग ज्याना आवडत नाही, त्यांना पसंत पडण्या सारखी आहे.

In reply to by बिहाग

जर्रा आळसावलेलो आहे सध्ध्या...कट्ट्यांचा सिझन सुरु आहे ना :) मिपाकर वाट बघत आहेत हे पाहून छान वाटले...आजच टंकायला सुरु करतो पण २०० cc च्या आधी २ भाग आहेत भौतेक :)