मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाइक्स घेताना - भाग ४

टवाळ कार्टा · · तंत्रजगत
बाईक्स घेताना - भाग १ बाइक्स घेताना - भाग २ बाइक्स घेताना - भाग ३ ...तर आता विभागवार लोकप्रिय ठरलेल्या बाइक्सचे पर्याय बघू...मी फक्त नवीन किंवा खप जास्त असणारे पर्यायच निवडले आहेत...त्याशिवायसुध्धा प्रत्येक विभागात अजून कमी प्रसिध्द पर्याय आहेत १३५ cc "ना घर की ना घाट की" segment १३५ cc च्या बाईक्स का बनवतात हे अजूनही मला समजलेले नै... बाईकची पॉवर जवळजवळ १५० cc इतकीच (किंचित कमी...कधीकधी किंचित जास्त) मायलेज जवळजवळ १५० cc इतकेच किंवा किंचित जास्त दिसणे १५० cc समोर काही खास नाही (याला एक अपवाद आहे) किंमत जवळजवळ १५० cc इतकीच किंवा किंचित कमी तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च जवळपास १५० cc इतकाच अतिरिक्त वैशिष्ट्ये...(additional features) - कैच नैत (याला एक अपवाद आहे) पण असे असतानाही जर बाईक बनवणार्या कंपन्या १३५ cc च्या बाईक बनवत असतील तर नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी कारण असेलच...असो मलातरी हे सगळे मुद्दे बघता १२५ cc पेक्षा जास्त इंजिन कपॅसीटीची बाईक घेताना १५० cc ऐवजी १३५ cc ची बाईक का घ्यावी याचे उत्तर कधीच नै मिळाले...कोणी सांगेल का इथेतरी? अगदी काही वर्षांपर्यंत या segment मध्यॆ एकापेक्षा जास्त पर्याय होते...जसे Bajaj Pulser 135- LS pulser-135-ls Bajaj Discover DTSi 135 discover-135 Hero Honda Achiever achiever पण बहुतेक सगळ्या कंपन्याना कमी होणारी विक्री जाणवली असावी कारण भारतातले बाईक मार्केट आता प्रगल्भ होत आहे (फक्त चोखंदळ निवडीबाबत...सुरक्षित चालवण्या बाबत आनंदच आहे सगळीकडे) त्यामुळे आता या segment मध्ये फक्त एकाच बाईक उपलब्ध आहे http://bikeadvice.in/125cc-motorcycle-segment-india-shrinking/ या बातमी नुसार हेच १२५ cc बद्दल सुध्धा सुरु झाले आहे
Bajaj Pulser 135- LS बजाजने पल्सार आणल्यापासून त्यात वेळोवेळी बरेच बदल करत होती...पण टेक्नोलॉजीकल मोठ्ठा बदल याच बाईक पासून केला... Biggest USP - world's first bike with 4 valve DTSi engine भारतात अजूनही 4 valve इंजिन असणार्या बाईक्स फक्त बजाजच बनवते...बहुतेक फक्त बजाजकडेच पेटंट असावे (याबाबत मलातरी नक्की माहिती नाही) 4 valve इंजिनाचे फायदे इंधन ज्वलनातून जास्तीत जास्त उर्जा मिळवता येते इंजिनाची कार्यक्षमता वाढते आणि मायलेज सुध्धा कमी cc च्या इंजिनामधून जास्त पॉवर मिळवता येते (अधिक माहितीसाठी कॉलिंग चिमणराव) टेक्नोलॉजी मधल्या बदलाबरोबरच पल्सरची नट-क्रॅकर* :D इमेज बदलणेसुध्धा याच बाईकपासून सुरु झाले बजाजच्या ट्रिपल स्पार्क प्लगवाल्या इंजिनांचे माहित नाही पण त्या आधीच्या बजाजच्या सगळ्या इंजिनांमध्ये या बाईकचे इंजिन सगळ्यात बेस्ट आहे १३५ cc मधून १३.५ PS पॉवार मिळते जी काही १५० cc बाईकच्या पॉवरपेक्षा जास्त आहे (होंडा युनिकॉर्न, यामाहा SZ, बजाज Discover १५० DTSi, ई.) speed आणि acceleration च्या बाबतीत सुध्धा वर लिहिलेल्या बाईक्सपेक्षा उजवी आहे आणि मायलेजसुध्धा ६० kmpl च्या आसपास मिळते इंजिन ३० kmph इतक्या कमी स्पीडलासुध्धा ५ व्या गिअरमध्ये knocking करत नाही लुक्सच्या बाबतीत बघावे तर काही first in class features आहेत...जसे clip-on handlebars split seats DC circuit 5 step adjustable rear Nitrox shock absorber ज्यांची उंची कमी आहे अथवा ज्यांना १५० cc च्या बाईक्स वजनदार वाटतात आणि पिकपसुध्धा हवाय, थोडे बरे मायलेज पण हवे पण १२५ cc किंवा त्यापेक्षा कमी cc च्या बाईक्स वरणभात टाईप वाटतात अश्या सर्व बाईकप्रेमींसाठी ही बाईक "आखुडशींगी बहुगुणी लाथा न मारणार्या दुभत्या गायीसारखी सर्वगुणसंपन्न" आहे...हि "विद्या बालन" *ज्यांनी पल्सरचे सगळ्यात पहिले मॉडेल चालवले आहे त्यांना व्यवस्थित कळले असेल मला काय म्हणायचे आहे ;) Disclaimer - या लेखातली सर्व मते माझी खाजगी मते आहेत

वाचने 43065 वाचनखूण प्रतिक्रिया 125

In reply to by पॉइंट ब्लँक

झकासराव Mon, 04/27/2015 - 14:57
पल्सर १५० सीसी वाली ७५ हजारच्या आसपास असेल (पुण्यात) पण त्या तुलनेत सीबीआर पाहुन अवाक झालोय. सव्वा लाखाच्या पुढेच असेल ती.

In reply to by झकासराव

टवाळ कार्टा Mon, 04/27/2015 - 15:05
कोणत्या जमान्यातल्या किंमती सांगताय :) पुण्यात माहित नै पण मुंबईमध्ये Pulser 150cc आरामात ८० हजाराच्या वर असेल...शीबीआर १५० ची घेताय का २५० ची घेताय त्यानुसार सव्वा लाख (चायला पुजेच्या दक्षिणेचा आकडा वाटतोय) ते एक लाख नव्वद हजाराच्या आसपास आहे

In reply to by टवाळ कार्टा

झकासराव Mon, 04/27/2015 - 15:11
पुण्यात ७८ हजार आहे लेटेस्ट किमत. मी घेतली तेव्हा ७५ होती. सीबीआर एक शोरुम गुगलुन पाहिली. म्हणुन मोघम सव्वा लाखाच्या पुढे लिहिल. :)

In reply to by पैसा

प्रचेतस Mon, 04/27/2015 - 15:39
पोराला मोटारसायकल पालकांनी घेऊन देऊ नये असे माझे व्यक्तीगत मत. त्याची त्याने स्वकमाईवर घ्यावी. अशाने बाईकची काळजी असल्याने ती काळजीपूर्वक चालवली जाते व देखभालसुद्धा व्यवस्थित घेतली जाते असा माझा स्वानुभव.

In reply to by प्रचेतस

पैसा Mon, 04/27/2015 - 15:48
मी स्वतःची सायकल सुद्धा स्कॉलरशिपचे पैसे जमवून घेतली होती. पण मुलाचं कॉलेज ४ किमि लांब आहे. त्यांच्या खास बसमधे गर्दी खूप असतेच पण ती बस जर एका मिनिटासाठी चुकली तर पुढची बस अर्ध्या तासाने असते, मग लेक्चर चुकतं. घरी येताना तोच प्रॉब्लेम. त्यामुळे हातात वाहन असलेले बरे. इथे गोव्यात चढ उतार खूप असल्यामुळे सायकली कोणी वापरत नाहीत.

In reply to by टवाळ कार्टा

पैसा Mon, 04/27/2015 - 16:24
घरापासून कॉलेजपर्यंत संपूर्ण चढ आहे. फार्मागुडी हिलस्टेशनला कॉलेज, आणि आणि आम्ही राहतो फोंड्यात. कोंकणीत फोंड म्हणजे खड्डा! एवढा चढ काढून गेल्यावर लेक्चर कुठलं! शिवाय रस्त्यात एवढ्या गाड्या असतात की कुठेही चालत लवकर पोचायला होईल. म्हणजे त्या ४ किमि चढ चढेपर्यंत १०० वेळा थांबावं लागेल.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा Mon, 04/27/2015 - 16:40
घरापासून कॉलेजपर्यंत संपूर्ण चढ आहे. फार्मागुडी हिलस्टेशनला कॉलेज, आणि आणि आम्ही राहतो फोंड्यात. कोंकणीत फोंड म्हणजे खड्डा! एवढा चढ काढून गेल्यावर लेक्चर कुठलं!
१७+ हजाराची सायकल असेल तर चढाचे काय वाटत नै...
शिवाय रस्त्यात एवढ्या गाड्या असतात की कुठेही चालत लवकर पोचायला होईल. म्हणजे त्या ४ किमि चढ चढेपर्यंत १०० वेळा थांबावं लागेल.
असे असेल तर पोरगं बाईक घेउनसुध्धा १०० वेळा थांबणारच की...वर पेट्रोल जळणार ते वेगळेच...असो जर पटत असेल तर सेकंडहँड बाईक द्या घेउन...फक्त बाईक घाटावरून घ्या...गोव्यात खार्या वार्यामुळे बाईकची वाट लागते

In reply to by पैसा

टवाळ कार्टा Tue, 04/28/2015 - 11:46
मी स्वतःची सायकल सुद्धा स्कॉलरशिपचे पैसे जमवून घेतली होती.
एक फटू द्या पाठवून...त्यावेळी फ्लेक्ष ची फ्याशन नसेल...पण आता आहे... खालच्या सारखा एखादा बनवैचा का? ;) flex

In reply to by पैसा

टवाळ कार्टा Tue, 04/28/2015 - 12:24
इतका विचार करायला लागलात तर कश्या तुम्ही फेमश होणार...फ्लेक्ष लाग्ला तर गेलाबाजार ग्राम्पंच्यायतीत तिकिट तरी मिळेल ;)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा Tue, 04/28/2015 - 12:54
तिथे जायला गेंड्याची कातडी लागते असे ऐकून आहे (जी तुम्च्याकडे नै असे कानावर आलेले आहे)...मी तुम्हाला भेटलेलो नाहीये पण तिथपर्यंत पोचलात तर वळख ठिवा :)

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा Mon, 04/27/2015 - 16:04
पोराला मोटारसायकल पालकांनी घेऊन देऊ नये असे माझे व्यक्तीगत मत. त्याची त्याने स्वकमाईवर घ्यावी. अशाने बाईकची काळजी असल्याने ती काळजीपूर्वक चालवली जाते व देखभालसुद्धा व्यवस्थित घेतली जाते असा माझा स्वानुभव.
अग्दी अग्दी...कॉलेजला जायला म्हणून बाईक दिलीत तर ती जास्त इथे तिथे फिरण्यातच जाते...द्यायचीच असेल तर अगदी साधी आणि सेकंडहँड घेउन द्यावी...पोरगं जर सुट्टीत स्वकमाई करत असेल तर मात्र पोराने कमावलेल्या किमतीच्या २०-३० पट किंमत असलेली बाईक घेउन द्यायला हर्कत नै कारण पैसे कमवायला घरचे कसे कष्ट करतात हे समजलेले असते ...परंतू घरात १ बाईक असावीच असे माझे मत आहे...अडीअडचणीला बाईकसारखे दुसरे साधन नाही धावाधाव करायला

In reply to by प्रचेतस

सुबोध खरे Wed, 04/29/2015 - 12:06
पोराने स्वकमाईने बाईक घ्यावी हे ठीक आहे परंतु तो कमवायला लागेपर्यंत आयुष्यातील काही( चार ते पाच) सोनेरी वर्षे गेलेली असतात ती मात्र कधीच परत येत नाहीत. त्या काळात जर तुमच्या मुलाला पैश्याची किंमत समजावून देऊन बाईक दिलीत तर पुढे आयुष्यात काही राहून गेले असे वाटणार नाही.मुलाला जबाबदारीची जाणीव द्या. म्हणजे बापाची वस्तू स्वतःची म्हणून वापरायला शिकतील. मला वयाच्या १९ व्या वर्षी लहान का होईना बाईक मिळाली होती.७५,००० किमी व्यवस्थित चालवून शेवटी विकली. त्याचे अनुभव आजही अंगावर रोमांच आणतात. उदा पर्वती टेकडीवर मागच्या बाजूने बाईक चढविली होती. किंवा मुंबई ते मुरुड आणि परत एका दिवसात. प्रत्येक सुटीत मी बाईक पुण्याहून मुंबईला घेऊन जात असे. माझे एक म्हणणे आहे पैसा आयुष्यात केंव्हाना केंव्हा तरी प्रत्येकाला मिळतोच. गेलेला वेळ मात्र कधीच परत येत नाही. आयुष्य हे आनंद लुटण्यासाठी आहे. नाहीतर पैसा मिळवून कुणाच्या मढ्यावर घालायचा आहे? आजही मुलाला मी माझी होंडा युनिकोर्न देऊ केलेली आहे अट इतकीच-- परवाना( लायसन्स) मिळव आणि बाईक घेऊन जा आणि हेल्मेट शिवाय बाईक वर दिसलास तर बाईक परत घेतली जाईल. मुलगा सिव्हिल इंजिनियरिंग ला आहे (२ सेमिस्टर) केंव्हा तरी इंजिनियर होईलच आणि कमवायला लागेलच. फारतर एखादे वर्ष उशिरा.

In reply to by काळा पहाड

टवाळ कार्टा Tue, 04/28/2015 - 11:35
सुझूकी १५० आर किंवा होंडा युनिकॉर्नच बरी.
अजून पण बरेच पर्याय आहेत....येइलच पुढच्याच्या पुढच्या भागात :)

गणेशा Mon, 04/27/2015 - 16:23
चांगली माहिती ... पुढील भागात अपाची असेलच . वाचायला आवडेल, मागील भाग बहुतेक बघितलेनाहित वाचतो लवकरच...

In reply to by गणेशा

टवाळ कार्टा Mon, 04/27/2015 - 16:36
पुढील भागात अपाची असेलच . वाचायला आवडेल,
नै...ती पुढच्याच्या पुढच्या भागात आहे...पुढचा भाग अनाहिता स्पेश्शल अस्णारै :)
मागील भाग बहुतेक बघितलेनाहित वाचतो लवकरच...
यावरून एका मिपाआयडीची आठवण झाली ;) एक खौचट्ट शंका - तुम्ही लेख सुध्धा कोणी लिहिला आहे ते बघून मगच वाच्ता कै? :)

In reply to by टवाळ कार्टा

काळा पहाड Mon, 04/27/2015 - 16:46
नै...ती पुढच्याच्या पुढच्या भागात आहे...पुढचा भाग अनाहिता स्पेश्शल अस्णारै :)
म्हंजे कंच्या बाय्की? अनाहिता बाय्की वापरत नै कै.

अजया Mon, 04/27/2015 - 17:00
येता जाता अनाहिता काढल्याशिवाय काहीही लिहिता येऊ नये इतका अनाहितामय झाला आहेस वाटतं टकाबाळा! लेखमालिका छान आहे ही तुझी.माझा मुलगा अगदी विंट्रॆस्ट घेऊन वाचतोय आणि मला रस्त्यात या बायका दिसल्या की ज्ञानात प्रॅक्टिकल भर घालतो! रच्याकने-रविवारी पहाटे आमच्या रस्त्यावरुन (जुना हायवे) भारी भारी बाईक्स आणि बायकर्स जातात!!माझ्या लेकाला त्या डुकाटी वगैरे बायकांची स्वप्नं पडतात बहुतेक!!

In reply to by अजया

टवाळ कार्टा Mon, 04/27/2015 - 17:15
येता जाता अनाहिता काढल्याशिवाय काहीही लिहिता येऊ नये इतका अनाहितामय झाला आहेस वाटतं टकाबाळा!
अनाहिता के बगैर मिपा पे लिख्खा नही जाता*
लेखमालिका छान आहे ही तुझी.माझा मुलगा अगदी विंट्रॆस्ट घेऊन वाचतोय
अर्रे व्वा...संपादक + अनाहितेकडून कौतिक...ठ्यांकू :)
आणि मला रस्त्यात या बायका दिसल्या की ज्ञानात प्रॅक्टिकल भर घालतो!
बायका नक्का हो म्हणू...पहिल्याच भागात कोणीतरी बायका असे लिहिल्याबद्दल टोचलेले बाकी ज्ञान वाढले असेल तर पुढचा अनाहिता स्पेश्शल भाग नक्की वाचा :)
रच्याकने-रविवारी पहाटे आमच्या रस्त्यावरुन (जुना हायवे) भारी भारी बाईक्स आणि बायकर्स जातात!!
पुण्यात की ठाण्यात की मुंबईत?
माझ्या लेकाला त्या डुकाटी वगैरे बायकांची स्वप्नं पडतात बहुतेक!!
या बायकांची स्वप्ने पडत असतील तर ठिकै...या बैका तुम्च्या डोक्यावर नै बस्णार ;) *सुझानचा माजी नव्रा टू ऐश्वर्याचा आजी नव्रा व्हाईल कॉईन देतानाचा सीन ईन धूम-२

In reply to by टवाळ कार्टा

त्यांना मुलाला ड्युकाटी घेउन द्यायला लागली तर त्या तुला त्याचं ड्युकाटी खाली घालणार एवढं खर्ं ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा Wed, 04/29/2015 - 11:43
कै सांग्ता येत नै...आज्काल धमक्यांच्या खरडी / व्यनी यायला लाग्लेत झेड का काय्ते अस्ते तस्ली शिकूरीटी मिपावर मिळ्ते कै?

In reply to by कपिलमुनी

टवाळ कार्टा Mon, 04/27/2015 - 19:19
सध्ध्या वापरतो आहे Avenger 220 DTSi विकायची आहे...घेणार का...बाकी Avenger बद्दल लिहिनच...तितका धीर धरवत नसेल तर इथेच विचार काय ते...वरची प्रश्नपत्रिका बघ पैसा तैंना दिलेली :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा Tue, 04/28/2015 - 11:35
सांगतो रे रात्री. जर्रा कामात आहे. काम करता करता इथे टवाळक्या चाल्ल्यात. ते झालं की हे संपादित करतो.
कै सांग्तो?