✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गोंधळ

न — नाखु, Mon, 04/06/2015 - 09:38
सध्या लग्नाचा हंगाम (सीझन या अर्थाने) चालू आहे कुणाचे लग्न असा प्रश्न विचारू नये "वधू-वरांचे" असे सू(ड)चक उत्तर दिले जाईल्.अखिल महाराष्ट्रात प्रांतोप्राती ज्या चालीरीती/प्रथा आहेत त्यातील एक गोंधळ. असे म्हणतात की नवदांपत्याला पुढील जागरणात काही गोधळ होऊ नये म्हणून जागरण्-गोंधळ प्रथा चालू झाली. प्रांतोप्राती वेग्वेगळ्या लोकप्रथा असल्या तरी त्याचा गाभाहेतू एकमेकांच्या परंपरेशी नाळ जोडणारा असतो . (सदर अवतरण आम्ही श्री रा रा बॅट्ट्मण लिखीत बोलीभाषेची सालपटे आणि अर्थाची फोलपटे एक तैलबुद्धी अभ्यास या थोर्र ग्रथांतून घेतले आहे तेव्हा त्याचे खुलाष्यासाठी लेखकमजकूरांशी संपर्क करावा ही विनंती.जाहीर अवांतर आपली जबाबदारी टळली.स्वगत अवांतर :बॅट्या गिर्हाईक पाठवले आहे पुढचे तू बघ) तर तूर्तास मिपा वारंवार बद पडत आहे आणि जालीय ईडापीडानिवारणार्थ* गोंधळ घालण्याचा संकल्प सोडला (* खरडफळा उर्फ वाचकांची चावडी वरील खर्डींचा संदर्भ) ह्या गोंधळासाठी कच्चा माल हेरण्यात श्री रा रा रा रा आत्मुदा (असेल धमक तर जोड यमक ह्या स्पर्धेत गेली चार वर्षे विजेते) आणि चौकटराजा (हिरव्या देठाचे कपूरी पान या तडाखेबंद कादंबरीचे सिद्दह्स्त लेखक) यांचे अमूल्य मार्गदशन झाले आहे रूढ गोंधळात ग्रामीण स्थानीक देव्-देवतांना आवाहन केले जाते तसे या गोंधळात ही आहे. !!गोंधळ !! मिपाचा गोधळ मांडिला गोंधळाला यावे || उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे तांब्यासवे जिल्बी पाडू गोंधळाला यावे || काडीसारू फुकटतमाश्या गोंधळाला यावे ||१|| माईंआडच्या नाना तुम्ही गोंधळाला यावे || बाईंआडच्या गणा गोंधळाला यावे ||२|| आपसातल्या उरबडवे गोंधळाला यावे || साप आतल्या शोधबडवे गोंधळाला यावे ||३|| पाकघरातल्या सुगरणींनो गोंधळाला यावे || माजघरातल्या गृहीणींनो गोंधळाला यावे ||४|| कुंपणावरच्या बघ्यांनो गोंधळाला यावे || मैदानातील पळपुट्यानों गोंधळाला यावे ||५|| पलीकडच्या धोबीघाटी गोंधळाला यावे || अलिकडच्या धूळ्चाटी गोंधळाला यावे ||६|| विचारजंती लेखपाडू गोंधळाला यावे || उजेडपण्ती तेलगाळू गोंधळाला यावे ||७|| अना फेम लाडोबा गोंधळाला यावे || अना फेम दोडोबा गोंधळाला यावे ||८|| विदावाले फापटपसारे गोंधळाला यावे || क्षुधावाले वारूणीवारे गोंधळाला यावे ||९|| लेखनमात्र विचारकारी गोंधळाला यावे || अचूकमात्र पिचकारी गोंधळाला यावे ||१०|| विलंबीत सन्यासग्रस्ती गोंधळाला यावे || अचंबित अन्यायत्रस्ती गोंधळाला यावे ||११|| अदा अदा जोजवी कविवृंदा गोंधळाला यावे || बदा बदा प्रसवी बोबडकांदा गोंधळाला यावे ||१२|| स्वघोषीत होऊ कैवारी गोंधळाला यावे || अघोषीत भेटू रैवारी गोंधळाला यावे ||१३|| नसे मनाची तरी आस मानाची गोंधळाला यावे || नसे मानाची तरी आस मिपाची गोंधळाला यावे ||१४|| ====================== पुढील कवने श्री रा रा जेपीम्हाराज (सन्यास फेम) आणि श्री बॅट्टमण यांनी रचावीत अशी जाहीर विनंती)

प्रतिक्रिया द्या
22464 वाचन

💬 प्रतिसाद (54)

जबरदस्त.. =))

जेपी
Mon, 04/06/2015 - 09:44 नवीन
जबरदस्त.. =))
  • Log in or register to post comments

कं रचलच, कं रचलय

श्रीरंग_जोशी
Mon, 04/06/2015 - 09:48 नवीन
कं रचलच, कं रचलय.
  • Log in or register to post comments

बॅट्या गिर्हाईक पाठवले आहे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/06/2015 - 09:52 नवीन
बॅट्या गिर्हाईक पाठवले आहे पुढचे तू बघ
साहित्तिक कटप्रॅक्टीस =))
  • Log in or register to post comments

बाकी गोंधळ मस्तं :)

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 04/06/2015 - 09:54 नवीन
बाकी गोंधळ मस्तं :)
  • Log in or register to post comments

आईच्चा घो...असे लेख येणार

टवाळ कार्टा
Mon, 04/06/2015 - 10:54 नवीन
आईच्चा घो...असे लेख येणार असतील तर मिपा वारंवार बंद पडूदे....कस्ले लिहिले आहे.... भ...ह...न...ना...ट :)
अना फेम लाडोबा गोंधळाला यावे
हे कैच्याकै आवडल्या गेल्ये आहे ;)
  • Log in or register to post comments

तुला आवडणार..च.. *blum3*

जेपी
Tue, 04/07/2015 - 18:37 नवीन
तुला आवडणार..च.. *blum3*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्यात काय विशेष होतं रे टक्या

सूड
Tue, 04/07/2015 - 19:40 नवीन
त्यात काय विशेष होतं रे टक्या? जरा इस्काटून सांग की!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

+५५५

पाटील हो
Mon, 06/01/2015 - 09:03 नवीन
पाकघरातल्या सुगरणींनो गोंधळाला यावे
हा हा हा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ह्या गोंधळासाठी कच्चा माल

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/06/2015 - 11:03 नवीन
ह्या गोंधळासाठी कच्चा माल हेरण्यात श्री रा रा रा रा आत्मुदा (असेल धमक तर जोड यमक Image removed. ह्या स्पर्धेत गेली चार वर्षे विजेते) आणि चौकटराजा (हिरव्या देठाचे कपूरी पान Image removed. या तडाखेबंद Image removed. कादंबरीचे सिद्दह्स्त लेखक) यांचे अमूल्य मार्गदशन झाले आहे रूढ गोंधळात ग्रामीण स्थानीक देव्-देवतांना आवाहन केले जाते तसे या गोंधळात ही आहे.
Image removed. वारलो वारलो हो नाखु(न)काका! Image removed. अजुन गोंधळ पाहिलाही-नाही पूर्ण! त्याआधीच वारलो!
  • Log in or register to post comments

हा.हा.हा... :)

मदनबाण
Mon, 04/06/2015 - 11:14 नवीन
हा.हा.हा... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }
  • Log in or register to post comments

आहाहाहाहाहाहा......कं लिवलंय

बॅटमॅन
Mon, 04/06/2015 - 11:17 नवीन
आहाहाहाहाहाहा......कं लिवलंय कं लिवलंय!!!! नाखुकाकांना आजपासून मिपाशाहीर ही पदवी बहाल करण्यात येत आहे होऽऽऽ!!!!!
  • Log in or register to post comments

अगागागागागा..........

प्रचेतस
Mon, 04/06/2015 - 11:49 नवीन
अगागागागागा.......... नाखुकाका रॉक्स यमकपाडू शॉक्स.... =))
  • Log in or register to post comments

पार धुरळा उडिवलाय. मिपा दोन

पॉइंट ब्लँक
Mon, 04/06/2015 - 12:55 नवीन
पार धुरळा उडिवलाय. मिपा दोन दिवस बंद ठेवल्यावर प्रतिभेचा पूर आलाय नुसता.
  • Log in or register to post comments

अगदी असा वेगळा गोंधळ मांडायची

सूड
Mon, 04/06/2015 - 15:04 नवीन
अगदी असा वेगळा गोंधळ मांडायची गरज नव्हती. ;)
  • Log in or register to post comments

लवकर थंड पडला की गोंधळ :)

टवाळ कार्टा
गुरुवार, 04/09/2015 - 13:26 नवीन
लवकर थंड पडला की गोंधळ :) फू...फू...फू
  • Log in or register to post comments

धमाल गोंधळ =))

अजया
गुरुवार, 04/09/2015 - 13:30 नवीन
धमाल गोंधळ =))
  • Log in or register to post comments

कं लिवलंय

अविनाश पांढरकर
Tue, 04/14/2015 - 07:45 नवीन
कं लिवलंय कं लिवलंय!!!!
  • Log in or register to post comments

मिपा माईचा गोंधळ मस्तच ...

मनीषा
Tue, 04/14/2015 - 14:02 नवीन
मिपा माईचा गोंधळ मस्तच ...
  • Log in or register to post comments

टक्या

नाखु
Sat, 05/30/2015 - 09:55 नवीन
पुढचा गोंधळ तूच लिहायला घे. जेप्या सध्या खफवर "

राशींची काशी

" हे साप्ताहीक सदर चालवतोय आणि त्यातून्+सन्यासातून फुरसत नाहीय. जाता जाता जन हितार्थ. काल आकुर्डी कट्ट्याला अना फेम लाडोबा आणि अना फेम दोडोबा यांची तीव्रतेने आठवण काढली गेली याची संबधितांनी नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

खिक्क

टवाळ कार्टा
Sat, 05/30/2015 - 10:53 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

हाहाहाहा!

पैसा
Sat, 05/30/2015 - 10:12 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments

जबराट लिहिलंय. =))

सतिश गावडे
Sat, 05/30/2015 - 10:58 नवीन
जबराट लिहिलंय. =))
  • Log in or register to post comments

कोण कोण आले होते मग,कालच्या

सस्नेह
Sat, 05/30/2015 - 10:58 नवीन
कोण कोण आले होते मग,कालच्या गोंधळाला ? +)
  • Log in or register to post comments

जबरीच लिहिलंय.

नूतन सावंत
Sat, 05/30/2015 - 14:54 नवीन
जबरीच लिहिलंय.
  • Log in or register to post comments

केजरींचा झाडू..

कर्मचारी
Sat, 05/30/2015 - 15:19 नवीन
कविता हाय का केजरींचाढ झाडू.... सगळे झाडून झाडल्यात..
  • Log in or register to post comments

लै भारी !!!

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 05/30/2015 - 15:53 नवीन
लै भारी !!!
  • Log in or register to post comments

गोंधळ आवडला

प्रसाद गोडबोले
Sat, 05/30/2015 - 20:52 नवीन
गोंधळ आवडला पण गोन्धळाचा भाग होवून गेला , सध्या आम्ही पाळणा च्या प्रतिक्षेत आहोत हो :D अवांतर : गोंधळ तूर्तास बाजुला ठेवून मिपावर पाळणा लिहिण्याची स्पर्धा घेवुयात काय ;)
  • Log in or register to post comments

जुळ्यांसाठी का?

प्रचेतस
Sun, 05/31/2015 - 08:04 नवीन
जुळ्यांसाठी का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हो ना

प्रसाद गोडबोले
Sun, 05/31/2015 - 09:07 नवीन
पण जुळ्यान्ना एकाच पाळण्यात घालून झोपवतात की वेगवेगळ्या ते माहीत नाही . असो तरीही बाळा जो जो रे च्या चालीवर एक छान पाळना 'बाळा लुलु लुलू रे' असा लिहावा असे मनात आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

त्यासी

नाखु
Mon, 06/01/2015 - 08:47 नवीन
"जोड पाळणा" असे म्हणतात म्हणजे नवरंग शिनेमात जसी दोन्ही पात्रे संध्या नामक नटवीने नटीने रंगपंचमी नाचात वठवली तसे. जोडपाळणा हा शब्द इतिहास धुंडाळेशास्त्री पुरावेप्रचूर रा.रा. बॅट्ट्मण यांचे "जुळ्यांचे जोडाष्टक" या पुस्तकातील "जुळली तार" या प्रकरणातून घेतला आहे. शब्द वापरू दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. कारकून खा ल माने अभामिपामांप्कास संचालित जुळे नामकरण समिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

+१

बॅटमॅन
Mon, 06/01/2015 - 16:37 नवीन
त्या पुस्तकाची प्रेरणा एक ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहे असे सांगणारा कन्नड शिलालेख नुकताच गहाळ झाल्याचे एका मंदिरातील शिलालेखावर वल्लीने वाचले होते म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

जुळ्यांसाठी का अस्साचं प्रश्ण

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/31/2015 - 08:09 नवीन
जुळ्यांसाठी का अस्साचं प्रश्ण विचारतो आणि हिमालयामधे जायची तयारी करतो. ;) (सुन टु बी शापग्रस्त) अनिरुद्ध-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

रच्याकने...मी थोडसं वेगळं

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/31/2015 - 08:11 नवीन
रच्याकने...मी थोडसं वेगळं वाचलं आणि हसुन फुटलो. लिहिण्याच्याऐवजी पाळणा हलवायची स्पर्धा वाचलं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सुंदर !

सौन्दर्य
Sun, 05/31/2015 - 09:20 नवीन
मिपावर तसा नवीन असल्याने सगळेच संदर्भ कळले म्हणणे (अति) शहाणपणाचे ठरेल. तरी एकूण गोंधळाचा बाज आणि काव्य एकदम चपखल. अजून येऊ दे.
  • Log in or register to post comments

अर्रे! आज वाचला हा गोंधळ!

यशोधरा
Sun, 05/31/2015 - 10:07 नवीन
अर्रे! आज वाचला हा गोंधळ! जबराट!
  • Log in or register to post comments

अरे नादखुळ्या

चौकटराजा
Sun, 05/31/2015 - 10:34 नवीन
अरे नादखुळ्या ,, बराच आहेस की ! पण मी वाल्या ला विसरलास काय बालका ??? तुझी माई ....
  • Log in or register to post comments

चौराकाका आणि जेपी मिळुन

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/31/2015 - 13:32 नवीन
चौराकाका आणि जेपी मिळुन मिसळुन माई आयडी चालवत असावेत असा सौंशय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

जो जो जो ग वेल्हाळ | करि

प्रचेतस
Sun, 05/31/2015 - 10:46 नवीन
जो जो जो ग वेल्हाळ | करि निद्रा गुणी बाळा जो जो जो ग || कन्यारत्न ही जन्मली | बहु सुकृत ती चांगली | वयजू गे माऊली | शुद्धमती गायिली || जो जो जो ग || पाळणा चंदनसा कातियेला | अलवार तयार केला | कड्या घुंगुरे सजविला | गोफ चहूबाजूला || कुंच कुंचली चढवुनी | तीट अंगी लावूनी | वयजू येती ती घेवुनी| कन्याबाळाला || पाळण्याखालुनी फिरवूनी | नाव ठेविले सरस्वती | बर्फी ती वाटोनी || जो जो जो ग || जो जो जो रे वेल्हाळा | करि निद्रा गुणी बाळा जो जो जो रे || पुत्ररत्न हे जन्मले | बहु सुकृत ते चांगले | आत्माराम ते वडिली | माया केली || जो जो जो रे || झोळण्यात बाळाला टाकियेला | हळूच झोका दिल्हा | बाळ हसू लागला | आत्मा प्रसन्नला || अंगडे टोपडे घालुनी | दृष्ट ती काढूनी | आत्या घेई उचलुनी | पुत्रबाळाला || झोळण्याखालुनी फिरवूनी | नाव ठेविले गणपती | पेढे ते वाटोनी || जो जो जो रे ||
  • Log in or register to post comments

भांडण होणार निश्चित!

पैसा
Sun, 05/31/2015 - 11:12 नवीन
वल्ली पाळणा लिहिणार। अत्रुप्त तयां लोणचे मारणार। मिपाकरें काड्या टाकणार। भांडण होणार निश्चित।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बाडिस! =))

यशोधरा
Mon, 06/01/2015 - 09:11 नवीन
बाडिस! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खुप सुंदर पाळणा ! पण तरीही

प्रसाद गोडबोले
Sun, 05/31/2015 - 12:21 नवीन
खुप सुंदर पाळणा ! पण तरीही स्वतंत्र धागा काढावा ही णम्र विनंती क्रिप्या लक्षात घ्या ना गडे बाकी नाव ठेवल्या नंतर लाडिक बुक्क्या कोणाच्या पाठीत मारायच्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@ बाकी नाव ठेवल्या नंतर लाडिक

अत्रुप्त आत्मा
Sun, 05/31/2015 - 13:16 नवीन
@ बाकी नाव ठेवल्या नंतर लाडिक बुक्क्या कोणाच्या पाठीत मारायच्या ?>> ╰_╯ देख लूंगा! ╰_╯ तुझे भी देख लूंगा!!! ╰_╯
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

@आगोबा हत्ती,उर्फ़ रानडुक्कर >

अत्रुप्त आत्मा
Sun, 05/31/2015 - 13:12 नवीन
@आगोबा हत्ती,उर्फ़ रानडुक्कर >>> ╰_╯ ह्हुंsssss!!! ╰_╯ इसका बदला लिया जाएगा| ╰_╯ जरुर लिया जाएगा| ╰_╯ ह्हुंsssss!!! ╰_╯
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुम्ही चिडताय का इतके? हा

प्रचेतस
Sun, 05/31/2015 - 13:18 नवीन
तुम्ही चिडताय का इतके? हा पाळणा कथानायकाच्या जुळ्यांसाठी आहे. तुमच्या नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/31/2015 - 13:31 नवीन
तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार बोथट झालय का सद्ध्या? ;) दु दु दु दुर्ल़क्ष!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

त्याचा दुसरा भाग , दुरुन

अत्रुप्त आत्मा
Sun, 05/31/2015 - 15:45 नवीन
त्याचा दुसरा भाग , दुरुन-लक्ष्य करणे हा आहे.. आता त्येची वाट बघा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अग्गागा!! =))

यशोधरा
Mon, 06/01/2015 - 09:06 नवीन
अग्गागा!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ह्ही, ह्ही, ह्ही... ख्खी,

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/02/2015 - 01:44 नवीन
ह्ही, ह्ही, ह्ही... ख्खी, ख्खी, ख्खी... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गोंधळ परत एकदा वाचला ,

प्रसाद गोडबोले
Mon, 06/01/2015 - 12:49 नवीन
गोंधळ परत एकदा वाचला , ह्यात लिव्ह इन रिलेशनवाल्यांना गोंधळाला बोलावलेले नाही हे पाहुन मनास अत्यंत खेद जाहला ! हे काय बरोबर नाय नाखुनकाका :=\
  • Log in or register to post comments

लई भारी!

पथिक
Mon, 06/01/2015 - 13:01 नवीन
लई भारी!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा