Skip to main content

अगदी सोपी 'फिटनेस टेस्ट'

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/04/2013 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
कुणालाही, केंव्हाही, कुठेही पटकन करता येइल, अशी ही फिटनेस टेस्ट: खाली (जमिनीवर) बूड टेकवून बसायचे, आणि कुठेही हात न टेकता, कसलाही आधार न घेता उठून सरळ उभे रहायचे. बस, एवढीच ही टेस्ट आहे. ही अगदी साधी क्रिया देखील कित्येकांना जमत नाही, असे दिसून येते. याची कारणे खालील पैकी असू शकतातः १. लठ्ठपणा, फाजील वजन. २. पाठीचा कणा आणि गुडघे कमकुवत असणे. ३. स्नायूंमधे पुरेशी शक्ती नसणे ४. उदरपटल पुरेसे कार्यक्षम नसणे (उपायः कपालभाती प्राणायाम). या सर्वांवर उपाय म्हणजे योग्य आहार आणि व्यायाम. तुम्ही स्वतः प्रचिती घ्या आणि शक्य असल्यास विविध वयोगटातल्या आणि शारीरिक ठेवणीच्या लोकांकडून ही चाचणी करवून निरिक्षणे सांगा.

वाचने 41518
प्रतिक्रिया 97

प्रतिक्रिया

धागाकर्ता पास, पण अगदी टुण्णदिशी नाही उठता येत. पण हेही जमले पाहिजेच, म्हणून रोज पहाटे ४-६ कि.मि. चालणे, प्राणायाम, धावणे, पाठीचे व्यायाम वगैरे सुरु केले आहे. परांच्या प्रश्नांच्या उत्तरादखल असे म्हणता येइल, की एकाद्या विषयात पास ३३ वा ४० टक्क्याने होता येत असले, तरी पास झाले याचा अर्थ तो विषय अगदी सांगोपांग अवगत झाला, असे नाही. त्यामुळे बसून हात न टेकता जरी उठता येत असेल, तरी त्याचा अर्थ वजन, पोट, स्नायुंची शक्ती इ.इ. अगदी यथायोग्य आहे, असा होत नाही. विडियोतील मुले जशी अगदी सहजपणे उभी रहात आहे, तसे जमले पाहिजे. ही एक सुटसुटीत, काही विशेष सामग्रीशिवाय, वा विशिष्ट ज्ञानाशिवाय, आकडेमडे, तक्ते इ. शिवाय करता येण्याजोगी चाचणी आहे. वजन, रक्तदाब, कोलेस्टरॉल, इ. साठी असलेल्या तपासण्यांचे वेगणे महत्व आहेच.

अरे वा..जमतंय की.. बाकी काही मित्र-मैत्रिणी फेल झाल्यामुळे विशेष आनंद होतो आहे. मला जमतंय म्हटल्यावर आता प्रत्येकाला करायला लावेन नक्की.. :)

वयाचे दशक, व ४० नंतर पंचक लिहिल्यास अधिक चांगली कल्पना येईल.

ही टेस्ट फारच सोपी आहे. मला धक्का बसलाय! या टेस्टप्रमाणे मी एकदम फिट आहे. मी तर लॅपटॉप हातात घेउन पण खालून उठते बसते.

In reply to by प्रभाकर पेठकर

बनियन
बनियन चा काय संबंध आहे राव =)))) तुम्ही 'दुसरी कुठली फिटनेस टेस्ट' करुन पहात होता काय पेठकर काका ;) :D

या वर्षासाठी कोणती सोप्पी टेस्ट आहे ?
ही घ्या या वर्षासाठीची टेस्टः खालील स्थितीत किमान १५ ते ३० सेकंद स्थिर रहाणे .... बघा करून आणि सांगा. . हे जमले, की मग आणखी जबरदस्त फिटनेससाठी खालील व्यायाम करा: http://youtu.be/cN0aR3m_0c0

In reply to by चित्रगुप्त

काका, अ‍ॅब्ज चा वर्कआऊट असेल त्यादिवशी ट्रेनर मिनीटभर या स्थितीत राहायला लावतो...

पाठीचा कणा आणि गुडघे कमकुवत असणे. स्नायूंमधे पुरेशी शक्ती नसणे उदर ही ठीक नाही. बहुतेक ७ प्रकारच्या गोळ्या घेतो, नाव ही लक्षात नाही राहत. सौ.ला लक्षात ठेवावे लागतात. त्याचा परिणाम उदर वर होतोच. शेवटी ४ पैकी ३ विषयांत प्राविण्य सहित नापास...

मी स्वतः यावर्षी जून महिना अखेर पर्यंत पोटाचा नगारा, जिना चढताना त्रास, 'फिटनेस टेस्ट' मधे नापास, मूळव्याधग्रस्त असा झालेलो होतो. जुलाई पासून दररोज २-३ ग्लास भाज्या आणि फळांचा ताजा रस काढून पीणे, मैदा आणि कणकेचे पदार्थ अगदी कमी खाणे, आणि थोडासा व्यायाम हे सुरू केले. ५-६ दिवसात पोटातून 'कालसर्प बाहेर निघाला, मूळव्याध वीस दिवसात पूर्ण बरी झाली. आता ऊर्जा आणी उत्साह भरपूर वाढलेला आहे, धावत जिना चढू शकतो, पोट आणि वजन बरेच कमी झाले आहे, फिटनेस टेस्ट मधे पास. याबद्दल पुणे-पाताळेश्वर कट्ट्यात माहिती सांगितली होती. त्यानंतर मिपाकर समीर यांनी सात दिवस नुसते जूस प्राशन करण्याचा प्रयोग केला. त्याबद्दल त्यांनी लिहावे, असे सुचवतो. याबद्दल कुणाला माझ्याशी बोलायचे असेल, तर व्यनी करावा.

मी जिंकलो आणि हारलो फुडं बायको येऊन हुबी ऱ्हायली आणि मुलीने फोटो काढला. काहीतरी सन्मान्यजनक आणि माण उंचावेल अशि टेस्ट हाइ का ? शाळेत असतांना पाचवी ते सातवी शाळेत कोणी पाहुणे आले की त्यांना "आमच्याकडे मुलानला योगासनेही शिकवतो" चे मी सांपल होतो मयुरासनही करत असे.

अलिकडे जरा जोशात येऊन न झेपण्याइतके धावणे, वेगात चालणे वगैरे केल्याने गुडघे/मांड्या दुखावल्या जाऊन पुन्हा या टेस्टीत नापास झालेलो आहे. आता काही दिवस आराम करून पाय वगैरे ठीक झाल्यावर पुन्हा पास होता येईल, या आशेत आहे.

खाली मांडी धालून बसता येत नाही. त्यामुळे टेस्ट मध्ये नापास. खूपच मागे पडले. कपालभाती, चालणे करुन बघू या! पास होण्याचा प्रयत्न करीन.

जमली . मी पास :-)

जमली . मी पास :-)

एक गुढगा टेकुन उठले,पण सवय केल्यावर जमेल असं वाटंतय.

२०१५ नंतर आज पुन्हा ही टेस्ट केली, आणि .... सपशेल नापास. सध्या वय ७१ आहे आणि एकंदरित तब्येत चांगली आहे. कोणतेही औषध घ्यावे लागत नाहीये. परंतु गेली काही वर्षे व्यायाम नियमित केलेला नाही. मात्र सध्या पायी चालणे किमान एक तास तरी होते. आत्ता PLANK करून बघितल्यावर ४५ सेकंद करू शकलो. आता यावर आत्मपरिक्षण आणि नेमके काय करायला हवे हे शोधून ते केले पाहिजे. वजन कमी करणे आणि पायांचे व्यायाम करून स्नायूंची शक्ती वाढवणे गरजेचे आहे असे वाटते. यावर जाणकार मिपाकर योग्य सल्ला देऊ शकतील अशी आशा आहे. प्लँकः .

वय ७१ ,वेळ ४५ सेकंद plank PLANK अवघडच आहे मला. अजूनही beginners plank च करते,साईड प्लंकच्या तर नादालाच लागत नाही.