✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मृत्युषडाष्टक

न
नितीनचंद्र यांनी
गुरुवार, 02/19/2015 - 23:29  ·  लेख
लेख
आजच एक जोडी माझ्याकडे सल्ल्यासाठी आली होती. मुलाचे जन्मनक्षत्र आर्द्रा म्हणजे मिथुन रास तर मुलीचे जन्मनक्षत्र जेष्ठा म्हणजे वृश्चिक रास. या दोन्ही राशी एकमेकांपासुन सहाव्या आठव्या येतात म्हणजे षडाष्टक योगात गुणमेलनाचे गुण एकदम कमी होऊन कोणी ज्योतिषी लग्न करा असा सल्ला द्यायला धजावत नाही. यातुन मृत्यु हा शब्दामुळे दोघेही भांबावलेले / धास्तावलेले होते. दोघेही वडीलधार्‍या व्यक्तीच्या सोबत न येता फक्त दोघेच आले होते त्यामुळे हा मामला प्रेमाचा आहे हे समजावयला वेळ लागला नाही. अधीक चौकशीत ते एकमेकांचे ( विवाहाला अडथळा नसलेले नातेवाईक म्हणजे मुलाच्या मामाची मुलगी ) आहे हे समजले. दोघे एकमेकांना लहान पणा पासुन चांगले एकमेकांच्या स्वभावाचा परिचय असलेले आणि एकमेकांवर अत्यंतीक प्रेम असलेले दिसत होते. गावाकडे गुणमेलनाच्या सॉफ्टवेअरमधे लग्न जुळत नाही हा शिक्का लागलेला कागद घेऊन आले होते. दाते पंचांगात याला पर्याय म्हणजे दोघांच्या नवांश कुंडल्या मांडुन नवांशस्वामी एकमेकांचे मित्र असल्यास षडाष्टक योग असुनही विवाह वर्ज नाही हा सल्ला तर दिलाच त्या शिवाय मुलीला जेष्ठा नक्षत्र शांती करावयाचा सल्ला दिला जी झालेली नव्हती. जेष्ठा नक्षत्र हे जेष्ठता मिळवण्यासाठी आतुर नक्षत्र समजले जाते. त्यांना डावललेले चालत नाही. प्रत्येक गोष्टीत पतीने पत्नीचा सल्ला घेणे आणि आपली बाजु समजाऊन सांगुन जर दुमत असेल तर एकमत बनवणे ही शहाण्या जोडप्याने वागायची रितही समजाऊन सांगीतली. लग्न हे समजुतदारपणाने निभावले जाते हेही सांगायला मी विसरलो नाही. मंगळ आणि बुध हे एकमेकाचे शत्रु असल्याने एकमेकांचे पटत नाही हे शास्त्र झाल. व्यवहारात अनेक वेळा अश्या राशीच्या लोकांना नोकरी/व्यवसायात एकमेकांना पटवावे लागते. बुध हा शब्द्प्रभु असल्यामुळे त्याला फार भावनेच्या आहारी न जाता असे पटवणे सोपे जाते. मिसळपाववर षडाष्टक योगाची चर्चा झाली आहे आणि स्वभाव न पटल्यास एकत्र रहाणे म्हणजे मृत्युसम या अर्थाने याला मृत्युषडाष्टक म्हणणे योग्य ठरेल हे विधान मलातरी पटले आहे. दोघांनी एकमेकांना पसंत केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे एकमेकांशी संघर्ष कधी झालेच नाहीत आणि होणारही नाहीत इतक्या खात्रीने ते विवाह करत असतील तर उगाच भिती दाखवुन तो विवाह टाळण्यास सांगण्याचा सल्ला देण्यात काही हशील नव्हता. शिवाय एकमेकांशी विवाह न करता ते किती सुखी होतील असा प्रश्न विचारल्यावर अजिबात नाही असे उत्तर दोघेही देत होते. असे असताना आणि त्यांची वये पाहुन हे फक्त आकर्षण नाही हे स्पष्ट समजत होते. आर्थीक सुसंपन्नता तर आहेच. अस असताना या दोन आत्म्यांना माझ्या अंतरात्म्याला न पटलेला सल्ला देणे म्हणजे काहीतरी पाप करणे वाटत होते. यातला अजुन एक भाग म्हणजे दोघांची एकनाड आहे. परंतु दोघांचे पंचमेश दोषमुक्त आहेत. पंचम स्थान आणि गुरु देखील सुस्थीतीत आहेत. याशिवाय आज सायन्स इतके पुढे गेले आहे त्यामुळे दोष असलाच तर किमान एक संतती होणे सायन्स च्या सहायाने अशक्य नाही. शभंभवतु हा आशिर्वाद मी दिलाच आहे. मिसळपावकरांना माझे म्हणणे पटेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
49531 वाचन

💬 प्रतिसाद (110)

प्रतिक्रिया

मी नितिनचंद्र यांच्या मताशि सहमत आहे.

यमगर्निकर
Tue, 02/24/2015 - 13:16 नवीन
ज्योतिष हे एक शास्त्र आहे, ज्या लोकांना हे पटत नसेल त्यांनि ह्या भानगडित पडु नये, ज्योतिष शास्त्र हे खुप चांगले शास्त्र आहे, पण ते बघनारा त्यातिल तज्ञ माणुस असला पाहिजे तरच त्याच्या सहायाने आपण भविष्याचा वेध घेउ शकतो आणि बर्यापैकि प्रोबलेम कमी करु शकतो, पण दुर्दैवने ह्या ज्ञानातिल तज्ञ माणसे खुपच कमी आहेत आणि अर्धवट ज्ञानवर ज्या लोकांनि दुकाने टाकलि आहेत त्यांच्यामुळेच ज्योतिषशास्त्र बदनाम झाले आहे, पण नितिनचंद्रनि त्यांच्या ज्योतिषशास्त्रातिल अभ्यासावरुन त्या जोडप्याला योग्य तोच सल्ला दिला आता तो मानने किंवा न मानने हे त्या जोडप्याच्या हातात आहे त्यासाठि नितिनचंद्र यांनि त्या जोडप्यावर कोणतिहि जबर्दस्ति केलि नाहि आहे ते त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेत.
  • Log in or register to post comments

कोणत्याही एका तज्ञाचे नाव

टवाळ कार्टा
Tue, 02/24/2015 - 13:36 नवीन
कोणत्याही एका तज्ञाचे नाव सांगाल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर

हॅ हॅ हॅ. शास्त्राची व्याख्या

बॅटमॅन
Tue, 02/24/2015 - 14:08 नवीन
हॅ हॅ हॅ. शास्त्राची व्याख्या काय हो तुमची यमगर्निकर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर

सहमत

नया है वह
Tue, 02/24/2015 - 19:59 नवीन
ज्योतिष हे एक शास्त्र आहे अगदी बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर

लिव्ह इन पण एक शास्त्र म्हणे.

हाडक्या
Tue, 02/24/2015 - 22:00 नवीन
लिव्ह इन पण एक शास्त्र म्हणे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर

या प्रतिसादाबद्दल

यसवायजी
Sat, 02/28/2015 - 15:51 नवीन
या प्रतिसादाबद्दल यमगर्णीकरांना "वल्डफेमस निपाणीकर" मण्डळाकडून, कळशीभरुन वेदगंगेचे पाणी देण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यमगर्निकर

असा असा कुयोग होता. बरं झालं

कंजूस
Tue, 02/24/2015 - 17:09 नवीन
असा असा कुयोग होता. बरं झालं अमक्याला विचारायला गेला आणि वाचला. शुन्यालाच बर्फ झालं. तमक्याकडे गेला असता तर दहा डिग्रीलाच बर्फ झालं असतं. याला म्हणतात शास्त्र. जाताजाता- होमियो सेपिअन=अखील मानव जात . होमिओहित =मानव जातीचं हित पाहणारा {व्यनितून}भलं करणारा .व्यापक ज्ञान मिळवण्याकरता गंडा बांधून घ्यावा लागतो .
  • Log in or register to post comments

कंजूस साहेब

सुबोध खरे
Tue, 02/24/2015 - 19:32 नवीन
कंजूस साहेब होमो सेपियन्स आहे होमियो नव्हे होमियो चा अर्थ तत्सम (SIMILAR) आहे होमोचे बरेच अर्थ आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

(No subject)

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 02/24/2015 - 19:34 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

होय, होमो च पाहिजे.

कंजूस
Tue, 02/24/2015 - 20:41 नवीन
होय, होमो च पाहिजे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा