✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मृत्युषडाष्टक

न
नितीनचंद्र यांनी
गुरुवार, 02/19/2015 - 23:29  ·  लेख
लेख
आजच एक जोडी माझ्याकडे सल्ल्यासाठी आली होती. मुलाचे जन्मनक्षत्र आर्द्रा म्हणजे मिथुन रास तर मुलीचे जन्मनक्षत्र जेष्ठा म्हणजे वृश्चिक रास. या दोन्ही राशी एकमेकांपासुन सहाव्या आठव्या येतात म्हणजे षडाष्टक योगात गुणमेलनाचे गुण एकदम कमी होऊन कोणी ज्योतिषी लग्न करा असा सल्ला द्यायला धजावत नाही. यातुन मृत्यु हा शब्दामुळे दोघेही भांबावलेले / धास्तावलेले होते. दोघेही वडीलधार्‍या व्यक्तीच्या सोबत न येता फक्त दोघेच आले होते त्यामुळे हा मामला प्रेमाचा आहे हे समजावयला वेळ लागला नाही. अधीक चौकशीत ते एकमेकांचे ( विवाहाला अडथळा नसलेले नातेवाईक म्हणजे मुलाच्या मामाची मुलगी ) आहे हे समजले. दोघे एकमेकांना लहान पणा पासुन चांगले एकमेकांच्या स्वभावाचा परिचय असलेले आणि एकमेकांवर अत्यंतीक प्रेम असलेले दिसत होते. गावाकडे गुणमेलनाच्या सॉफ्टवेअरमधे लग्न जुळत नाही हा शिक्का लागलेला कागद घेऊन आले होते. दाते पंचांगात याला पर्याय म्हणजे दोघांच्या नवांश कुंडल्या मांडुन नवांशस्वामी एकमेकांचे मित्र असल्यास षडाष्टक योग असुनही विवाह वर्ज नाही हा सल्ला तर दिलाच त्या शिवाय मुलीला जेष्ठा नक्षत्र शांती करावयाचा सल्ला दिला जी झालेली नव्हती. जेष्ठा नक्षत्र हे जेष्ठता मिळवण्यासाठी आतुर नक्षत्र समजले जाते. त्यांना डावललेले चालत नाही. प्रत्येक गोष्टीत पतीने पत्नीचा सल्ला घेणे आणि आपली बाजु समजाऊन सांगुन जर दुमत असेल तर एकमत बनवणे ही शहाण्या जोडप्याने वागायची रितही समजाऊन सांगीतली. लग्न हे समजुतदारपणाने निभावले जाते हेही सांगायला मी विसरलो नाही. मंगळ आणि बुध हे एकमेकाचे शत्रु असल्याने एकमेकांचे पटत नाही हे शास्त्र झाल. व्यवहारात अनेक वेळा अश्या राशीच्या लोकांना नोकरी/व्यवसायात एकमेकांना पटवावे लागते. बुध हा शब्द्प्रभु असल्यामुळे त्याला फार भावनेच्या आहारी न जाता असे पटवणे सोपे जाते. मिसळपाववर षडाष्टक योगाची चर्चा झाली आहे आणि स्वभाव न पटल्यास एकत्र रहाणे म्हणजे मृत्युसम या अर्थाने याला मृत्युषडाष्टक म्हणणे योग्य ठरेल हे विधान मलातरी पटले आहे. दोघांनी एकमेकांना पसंत केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे एकमेकांशी संघर्ष कधी झालेच नाहीत आणि होणारही नाहीत इतक्या खात्रीने ते विवाह करत असतील तर उगाच भिती दाखवुन तो विवाह टाळण्यास सांगण्याचा सल्ला देण्यात काही हशील नव्हता. शिवाय एकमेकांशी विवाह न करता ते किती सुखी होतील असा प्रश्न विचारल्यावर अजिबात नाही असे उत्तर दोघेही देत होते. असे असताना आणि त्यांची वये पाहुन हे फक्त आकर्षण नाही हे स्पष्ट समजत होते. आर्थीक सुसंपन्नता तर आहेच. अस असताना या दोन आत्म्यांना माझ्या अंतरात्म्याला न पटलेला सल्ला देणे म्हणजे काहीतरी पाप करणे वाटत होते. यातला अजुन एक भाग म्हणजे दोघांची एकनाड आहे. परंतु दोघांचे पंचमेश दोषमुक्त आहेत. पंचम स्थान आणि गुरु देखील सुस्थीतीत आहेत. याशिवाय आज सायन्स इतके पुढे गेले आहे त्यामुळे दोष असलाच तर किमान एक संतती होणे सायन्स च्या सहायाने अशक्य नाही. शभंभवतु हा आशिर्वाद मी दिलाच आहे. मिसळपावकरांना माझे म्हणणे पटेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
49531 वाचन

💬 प्रतिसाद (110)

प्रतिक्रिया

लेख उत्तम

कपिलमुनी
गुरुवार, 02/19/2015 - 23:37 नवीन
बर्‍याच दिवसांनी फलज्योतिषावर लेख आला. ( पुन्हा जुनाच धुरळा न उडवता मिपाकर सुज्ञपणा दाखवतीलच)
  • Log in or register to post comments

टेक्नीकल (असल्याच तर) गोष्टी कळल्या नाहि.

अर्धवटराव
गुरुवार, 02/19/2015 - 23:47 नवीन
पण लग्न करण्याची इच्छा असणार्‍या एका जोडप्याला तुम्ही कुंडली मेचींगच्या जंजाळातुन सोडवलं इतकं समजलं. बरं आहे.
  • Log in or register to post comments

चला, बरं झालं!

पिवळा डांबिस
Fri, 02/20/2015 - 01:50 नवीन
चला, बरं झालं! पण आता आम्हां मिपाकरांना रडवायला त्या जोडप्याला अपत्यप्रातीत अडचण वगैरे काही दाखवू नका हां! अहो जोडप्याची कुचंबणा दाखवून, मिपाकरांना रडवून, प्रतिसाद मिळवायचे म्हणजे पाऽऽप हो!!!
  • Log in or register to post comments

(No subject)

आदूबाळ
Fri, 02/20/2015 - 02:12 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

त्या सुक्या मासळी चा धागा

आनन्दिता
Fri, 02/20/2015 - 06:01 नवीन
=)) त्या सुक्या मासळी चा धागा आल्यापासुन डांबिस काका फुल्ल फॉर्मात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

(No subject)

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/20/2015 - 07:53 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

कुंडली बदला की हो.

यसवायजी
Fri, 02/20/2015 - 09:20 नवीन
कुंडली बदला की हो. अहो, जन्मवेळ आणि स्थळ आता कसे बदलणार? मग भडजी बदला की हो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अगदी अगदी.

बॅटमॅन
Mon, 02/23/2015 - 18:06 नवीन
अगदी अगदी. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

रावसाहेबं =))

बॅटमॅन
Mon, 02/23/2015 - 18:06 नवीन
रावसाहेबं =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

१)ज्योतिषात जर त्यांच्याच

कंजूस
Fri, 02/20/2015 - 07:05 नवीन
१)ज्योतिषात जर त्यांच्याच शास्त्राप्रमाणे जातकाच्या कुंडलीतील ग्रहमानाप्रमाणेच गोष्टी घडणार आहेत तर गुणमेलन पत्रिका जुळवणे हा खटाटोप ज्योतिषांनी करू नये असं माझं मत आहे. २)मुलाची मिथुन चंद्ररास सांगते की निर्णय घेण्यास असमर्थ असणे, प्रत्येक गोष्टीचा कीस काढणे, ठामपणा नसतो. ३)प्रेमविवाह करणाऱ्यांना सरळ सांगा ज्योतिष पाहात नाही. ४)योग हे जोडयोग असतात. मुलास वाहनयोग असल्यास बापाकडे पैसा असतोच. मुलास अल्पमृत्यु आणि आइवडिलांस पुत्रशोक योग असतोच. ५)मुलीस वैधव्य असेल तर नवऱ्यास अल्पमृत्युयोग असणाराच असतो. हे तुम्हाला कळले तरी ते तुम्ही तोंडावर सांगू शकत नाही. सांगण्यास टाळाटाळ केली तर आणखी शंका येते. थोडक्यात लग्न जुळवाजुळवीच्या भानगडीत {ज्योतिषी लोकांनी तरी}अजिबात पडू नये.
  • Log in or register to post comments

लग्न जुळवाजुळवीच्या भानगडीत {ज्योतिषी लोकांनी तरी}अजिबात पडू नये

मुक्त विहारि
Fri, 02/20/2015 - 07:36 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

क्रमांक ४चा मुद्दा आवडला

आयुर्हित
Fri, 02/20/2015 - 10:53 नवीन
वाह व्वा कंजूसजी, (फक्त)क्रमांक ४चा मुद्दा आवडला व पटला देखील. क्रमांक १,२,3,५ वर नितीनचंद्रजी काय म्हणतात बघू या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

लग्न जुळवायच्या फंदात ज्योतिषान्रे पडु नये

hitesh
Fri, 02/20/2015 - 11:12 नवीन
मग ज्योतिष ज्ञानाचा उपयोग काय ? उलट असे प्रकार व्यवस्थीत डोक्युमेंट केले तर ज्योतिष हे शास्त्र आहे हे सिद्ध व्यायला मदत होइल ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

व्यायला मदत?

पिवळा डांबिस
Fri, 02/20/2015 - 23:26 नवीन
....तर ज्योतिष हे शास्त्र आहे हे सिद्ध व्यायला मदत होइल ना ?
व्यायला मदत करायला हरकत नाही हो, पण दर वेळेस भरंवशीच्या म्हशीला टोणगाच होतोय, त्याचं काय? :) (तुमचा टायपो आहे हे लक्षात आलं होतं, पण प्रसंगानुरूप म्हण वापरायचा मोह आवरला नाही. ह. घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

नका आवरू मोह. दोष तुमचा नाही

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/20/2015 - 23:36 नवीन
नका आवरू मोह. दोष तुमचा नाही, तो त्या आयडीचा गुण असावा +D (हघ्याहेवेसांन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

क्रमांक १,२,3,५ वर नितीनचंद्रजी काय म्हणतात बघू या!

नितीनचंद्र
Fri, 02/20/2015 - 12:18 नवीन
१)ज्योतिषात जर त्यांच्याच शास्त्राप्रमाणे जातकाच्या कुंडलीतील ग्रहमानाप्रमाणेच गोष्टी घडणार आहेत तर गुणमेलन पत्रिका जुळवणे हा खटाटोप ज्योतिषांनी करू नये असं माझं मत आहे. उत्तर : आपल्याला पुण्याहुन दिल्लीला जायचे आहे तर सोयीची गाडी शोधाल की चेन्नईला जाऊन तिकडुन दिल्लीला जाल ? वैवाहीक जीवन काही लोकांना सुखावह नसते. अश्यावेळी त्यातल्या त्यात सुखावह व्यक्तीशी विवाह करणे आपल्या हातात असते. २)मुलाची मिथुन चंद्ररास सांगते की निर्णय घेण्यास असमर्थ असणे, प्रत्येक गोष्टीचा कीस काढणे, ठामपणा नसतो. उत्तर : म्हणुन तर जोडी माझ्याकडे आली होती. मी नुसते ज्योतीष पहात नाही तर समापुदेशन पण करतो. ३)प्रेमविवाह करणाऱ्यांना सरळ सांगा ज्योतिष पाहात नाही. उत्तर : हे आपण का ठरवावे ? ते विवाह करणारच आहेत. यावर उपाय काय आणि किती रिस्क आहे याची असेसमेंट त्यांना हवी होती. ४)योग हे जोडयोग असतात. मुलास वाहनयोग असल्यास बापाकडे पैसा असतोच. मुलास अल्पमृत्यु आणि आइवडिलांस पुत्रशोक योग असतोच. उत्तर : वहानयोग ड्रायव्हरला पण असतो. फरक इतकाच की त्याला वहानाचे सुख नसते. मुलास अपमृत्यु ( अल्पमृत्यु नसतो ) याचा वरील लेखाशी काय संबंध ? लग्नामुळे मृत्यु असा योग मुळी नसतो. मी दोघांच्या पत्रीका आयुष्यमान पहाण्याकरता सुध्दा तपासल्या. दोघांना दिर्घायुष्य आहे. हीच भिती घालवणे महत्वाचे. ५)मुलीस वैधव्य असेल तर नवऱ्यास अल्पमृत्युयोग असणाराच असतो. हे तुम्हाला कळले तरी ते तुम्ही तोंडावर सांगू शकत नाही. सांगण्यास टाळाटाळ केली तर आणखी शंका येते. उत्तर : असले कोणतेही योग दोघांच्या पत्रीकेत नव्हते. लेखन विस्ताराच्या भयाने हे लिहणे टाळले इतकेच. थोडक्यात लग्न जुळवाजुळवीच्या भानगडीत {ज्योतिषी लोकांनी तरी}अजिबात पडू नये. याचे उत्तर वेगळे लिहले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

मृत्युषडाष्टक

नितीनचंद्र
Fri, 02/20/2015 - 11:49 नवीन
थोडक्यात लग्न जुळवाजुळवीच्या भानगडीत {ज्योतिषी लोकांनी तरी}अजिबात पडू नये. आपण मला सल्ला देण्याच्या आधी विषय समजाऊन घेतला असता तर बरे झाले असते. माझे वधु-वर सुचक मंडळ नाही. लोक दुकान मांडुन खरा सल्ला भिती/आत्मविश्वास अभावा पोटी देत नाहीत. लग्न झाल्यामुळे मृत्यु असा कर्मविपाक माझ्या पहाण्यात नाही. त्या जोडीला हीच भिती होती. मी माझी कामे माझ्या विवेकानुसार करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

>>योग हे जोडयोग असतात. मुलास

सूड
Fri, 02/20/2015 - 14:14 नवीन
>>योग हे जोडयोग असतात. मुलास वाहनयोग असल्यास बापाकडे पैसा असतोच. मुलास अल्पमृत्यु आणि आइवडिलांस पुत्रशोक योग असतोच. ५)मुलीस वैधव्य असेल तर नवऱ्यास अल्पमृत्युयोग असणाराच असतो. हे तुम्हाला कळले तरी ते तुम्ही तोंडावर सांगू शकत नाही
ह्यासाठी तुम्हाला एक मँगो केशर मस्तानी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

हे भविष्यकथन नव्हे तर

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/20/2015 - 19:47 नवीन
हे भविष्यकथन नव्हे तर व्यावहारीक लॉजिक आहे... पण त्यामध्ये एक खडा आहे, तो हा... मुलास वाहनयोग असल्यास बापाकडे पैसा असतोच. हे असेच असेलच असे नाही. कारण... अ) "मुलगा लहानपणापासून गाडीतून फिरणार" असा असल्यास ती गाडी वडिलांचीच असेल असे कशावरून... आईने अथवा एकत्र कुटूंबातील इतर कोणी (आजोबा, काका, इ) घेतलेली असू शकेल. आ) मुलगा मोठा झाल्यावर स्वतःची गाडी घेऊ शकेल... सद्या कित्त्येक तरुणांकडे विशीच्या दशकात स्वतःची (हप्त्याने घेतलेली का होईना) पण गाडी आहेच ना ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

१००% सहमत आहे

आयुर्हित
Fri, 02/20/2015 - 21:39 नवीन
असेही बऱ्याच बाबतीत असू शकते/ आहेच! १००% सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

चांगलं काम केलंत

पैसा
Fri, 02/20/2015 - 11:03 नवीन
बाकी गोष्टींबद्दल आपला पास. पण एकूण परिस्थिती पाहून अतिशय योग्यप्रकारे वागलात!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नितीनचंद्र
Fri, 02/20/2015 - 11:51 नवीन
चला, मी योग्य सल्ला दिल्याचे तुम्हालातरी पटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

प्रसंग छान वर्णिला आहे.

गवि
Fri, 02/20/2015 - 12:22 नवीन
प्रसंग छान वर्णिला आहे. लिखाणाची हातोटी आवडली. मुळात इतका समंजसपणा असताना हे नक्षत्रांचे आणि ग्रहांचे आणि त्यांना शांत वगैरे करण्याचे हातचे हवेतच कशाला? ज्योतिषाधारे कोणतेही निर्णय घेणे हा मूळ भागच अशासाठी चुकीचा वाटतो की उदा. या लग्नाबाबत हे जोडपे तुमच्याकडे आले म्हणून ठीक. या नक्षत्ररचना अन योग त्यांच्या मार्गात धोंड बनून राहिले नाहीत. पण ज्योतिषावर विश्वास ठेवून निर्णय घ्यायचे ही पद्धत रुजलेलीच राहिली असेल तर अशी जोडपी इतर ज्योतिष्यांकडेही जातील आणि जातच असणार. त्यांना असा समजूतदार ज्योतिषी मिळेलच असं नाही. म्हणून या एकूण पद्धतीविषयीच पुनर्विचार करायला हवा.
  • Log in or register to post comments

+१

गिरकी
Fri, 02/20/2015 - 12:27 नवीन
+१ आणि जरी ज्योतिषाने कितीही वाईट सांगितले तरी लग्न करण्याचा विचार पक्का असेल तर उगीच ज्योतिषाकडे जाऊन असेसमेंट किंवा रिस्कच प्रमाण कशाला शोधत बसायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

प्रसंग छान वर्णिला आहे. लिखाणाची हातोटी आवडली

नितीनचंद्र
Fri, 02/20/2015 - 12:29 नवीन
नक्षत्र शांतीने अनेक अडचणी दुर होतात. घरच्यांचा थोडासा विरोध आहे ज्याला त्यांना पटेल असा उपायही आवश्यक आहे. नक्षत्रशांती आणि अडचणी दुर होणे हे पटायला अवघड आहे. अनुभव मला आहे. अनुभुती जातकांनी घ्यावी. एकूण पद्धतीविषयीच पुनर्विचार करायला हवा. +१११११
  • Log in or register to post comments

तुमचा सल्ला ठिक आहे,

ब़जरबट्टू
Fri, 02/20/2015 - 14:02 नवीन
परंतू तो जर तुम्ही विरुध्द जरी दिला असता, तरी हे जोडपे जोपर्यन्त त्यांच्या सोयीनुसार सांगणारा ज्योतीषी भेटत नाही तोपर्यन्त भटकले असते... मुळात बेस्ट ज्योतिषी कोण असतो ? जो माझ्या बद्दल ग्रेट बोलतो... :) दुसरे काही नसते हो ऐकायचे....
  • Log in or register to post comments

वेगळाच अँगल.. लैच भारी...!!

गवि
Fri, 02/20/2015 - 14:17 नवीन
वेगळाच अँगल.. लैच भारी...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

जोतिष्याच्या नादी लागलेल्या

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/20/2015 - 23:42 नवीन
जोतिष्याच्या नादी लागलेल्या बर्‍याच जणांचे असेच वागणे असते. मनासारखे भविष्य सांगणारा मिळेपर्यंत शोधत राहतात आणि एखाद्याने सागितलेले भविष्य एकदा खरे ठरले की नंतर कितीही वेळा त्याची भाकीते खोटी ठरली तरी त्याला सोडणे जमत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

रा़जयोग म्हणजे नक़्की काय ??

बाहुली
Fri, 02/20/2015 - 14:44 नवीन
माणुस राजा होतो ??
  • Log in or register to post comments

माणुस राजा होतो ?? हो

सूड
Fri, 02/20/2015 - 14:54 नवीन
माणुस राजा होतो ??
हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाहुली

सहमत.

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 02/20/2015 - 19:54 नवीन
सहमत. मी तरी इतर कोणत्याही प्राण्याला राज्याभिषेक झालेला पाहिले/ऐकले/वाचले नाही ! +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

हो प्रत्येक..

नाखु
Mon, 02/23/2015 - 09:42 नवीन
माणूस (बाप्या) राजा होतोच. सकाळची सुरवातच मुळी राज्या उठ तुला शाळेला जायचयनां पासून होऊन "गाढवा/गधड्या" पर्यंत थांबते तस्मात राजा होणे अटळ आहे. प्रेमी युगुलांचे "राजा-राणी" वेगळे प्रकरण आहे स्वानुभवी-जाणकार अनुभव दाखले देतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

रेफ्रन्स साठी आदी जोशींचे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 02/23/2015 - 11:29 नवीन
रेफ्रन्स साठी आदी जोशींचे ब्लॉग्स वाचावेत असं सुचवतं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

ड्राइवर ला वाहनयोग आहे असे

कंजूस
Fri, 02/20/2015 - 14:54 नवीन
ड्राइवर ला वाहनयोग आहे असे म्हणत नाहीत मागच्या सीटवर बसणाऱ्याला तो योग असतो. प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याने ज्योतिषाचा सल्ला मागायला जाणे हा शुद्ध दांभिकपणा आहे. प्रेम केलं आणि विवाहही केला {दुसऱ्याशी}असा प्रकार झाला. नितिनचंद्र तुमची मतं ही नितिनचंद्र यांची न धरता ज्योतिष विषयाची सांगितलेली मतं असं धरतो आहोत. आता एक उदाहरण टी एन शेशन यांचे घ्या(त्यांच्याच पुस्तकातून)त्यांना स्थळं सांगून आली की त्यांचेच ज्योतिषी वडील प्रत्येक कुंडली नाकारायचे. असं का विचारल्यावर वडील म्हणाले तुलाच संततियोग नाहीये त्यामुळे संततियोग नसलेली मुलगी पाहतो आहे. आता हाच योग वरील लग्न करू इच्छिणाऱ्या मुलाच्या कुंडलीत असता तर तुम्ही तोंडावर सांगू शकला असता का ? ज्योतिष, मंत्रतंत्र आणि जादू या तीन{वाईट} विद्या कधितरी त्यांनाच गोत्यात आणतात.वाईट योगावर घरातच कोणी जन्मला असेल की ज्योतिष खोटं ठरू दे अशी तो सतत प्रार्थना करतो.ज्योतिष कळणे ही फार क्लेशदायक गोष्ट ठरते.
  • Log in or register to post comments

ज्योतिष, मंत्रतंत्र आणि जादू या तीन{वाईट} विद्या कधितरी त्यांनाच

नितीनचंद्र
Fri, 02/20/2015 - 15:19 नवीन
वाईट योगावर घरातच कोणी जन्मला असेल की ज्योतिष खोटं ठरू दे अशी तो सतत प्रार्थना करतो.ज्योतिष कळणे ही फार क्लेशदायक गोष्ट ठरते. सुदैवाने मला असा अनुभव नाही. किमान माझी धारणा " जे बदलता येणार नाही ते स्विकारण्याची आहे". आपण कर्माचा सिध्दांत हे हरीभाई ठक्कर यांचे पुस्तक वाचले नसेल तर वाचावे. प्रारब्ध जे पक्व आहे सोडुन प्रयत्नपुर्वक बरेच काही बदलता येते यावर माझा विश्वास आहे. अर्थात सामान्य अपेक्षा गृहीत धरुन हे वाक्य लिहले आहे. माझ्या पहाण्यात असे अनेक जातक आहेत ज्यांच्या पत्रीकेत संतती योग कठीण असताना " नवसाने " त्यांना किमान एक कन्या वा पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. आजकाल सायन्स इतके पुढे गेले आहे कि संतती योग कठीण म्हणजे पैसे खर्च करणे असे झाले आहे. पुर्वीही अनेक उपायाने संतती प्राप्त करण्याचे मार्ग सांगीतले जायचे. अस असताना इतके खात्रीपुर्वक वागणारे श्री शेषन यांचे वडील एक अजब व्यक्तीमत्व मानायला हवे.
  • Log in or register to post comments

आजकाल सायन्स इतके पुढे गेले

हाडक्या
Fri, 02/20/2015 - 23:04 नवीन
आजकाल सायन्स इतके पुढे गेले आहे कि संतती योग कठीण म्हणजे पैसे खर्च करणे असे झाले आहे.
ह्म्म्म ... काहीही बोलण्यापासून स्वतःला रोखतो आहे, धाग्याचे वधु-वर करण्याची अजिबात इच्छा नाही म्हणून. ;) तेव्हढे "सायन्स" पुढे गेलेय तर "विज्ञाना"लापण थोडे आणा पुढे आणि वापरा जरा. आणि हो, "कि" हा हिंदीत आहे, मराठीत अजूनतरी "की"च आहे. असो, मातृभाषा-दिनाच्या आगाऊ शुभेच्छा.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीनचंद्र

नक्षत्रशांती

सिरुसेरि
Fri, 02/20/2015 - 23:51 नवीन
म्हैशीस चालते का हो तुमचे ज्योतिषशास्त्र ? शांत केलीन म्हणजे झाले .
  • Log in or register to post comments

ख्याक्क!

अत्रुप्त आत्मा
Sat, 02/21/2015 - 00:24 नवीन
ख्याक्क! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

ख्याक्क!

अत्रुप्त आत्मा
Sat, 02/21/2015 - 00:27 नवीन
ख्याक्क! :-D @म्हैशीस चालते का हो तुमचे ज्योतिषशास्त्र ? …>>> अंहों कां नै चांलणांर? माणसांस चांलतें,तर म्हैशिनी कांय घोंडं मारलंनीत??? ;-) पथ्य पांळलनीत म्हणजें झांलं! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

ज्योतिषशास्त्राची पथ्य फार

आनन्दिता
Sat, 02/21/2015 - 00:42 नवीन
ज्योतिषशास्त्राची पथ्य फार कडक हां !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

पुढे चालू

पिवळा डांबिस
Sat, 02/21/2015 - 03:32 नवीन
ज्योतिषशास्त्राची पथ्य फार कडक हां !!
"सायन्सचं आणि तुमचं एव्हढं का हो वाकडं?" "सायन्समध्ये लॉजिक नांवाचं विष असतं!" "छे! लॉजिक तत्वज्ञानात असतं. सायन्समध्ये 'इंपरिकल एव्हिडन्स' की कायतरी असतं!" "वाटेल ते बोलू नका! इंपरिकल एव्हिडन्स? इंपरिकल एव्हिडन्स म्हणजे ज्योतिषशास्त्राची शवपेटिका!!!!" बोलणारे गृहस्थ पिडांकाका असावेत... नायतर इथे मिपावर इतक्या ठणकावून बोलणार कोण? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

ज्योतिषशास्त्राच्या धाग्यात

आनन्दिता
Sat, 02/21/2015 - 04:48 नवीन
ज्योतिषशास्त्राच्या धाग्यात सायन्स, तत्वज्ञान, इंपिरिकल एव्हीडन्स सारखे शब्द ऐकुन काही अनुभवी मिपाकरांनी टपावरुन आपले बिस्तरे खाली उतरवले. आता १०० प्रतिसादांची निश्चिंती झाली आत्मुदादा !!! शंभर??? अरे खुळां काय तुं हाडक्यां ... मागे मुविंनी "अपेक्षांची" मेख मारलीन, तर मिपाकरांनी हजाराचा धुरळा उडवलानीत. इथं तर अखंड कुंडलीये, त्या अपेक्षाना हजार तर, कुंड्लीतल्या प्रत्येक घरास किती???? घाल बोटें मोज !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

धन्य गं तुझि दुत्त दुत्त आ.

अत्रुप्त आत्मा
Sat, 02/21/2015 - 11:21 नवीन
धन्य गं तुझि दुत्त दुत्त आ..नन्दीता! =)) आणि पिंडा काका की ( ही :-D ) जय हो! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

सुभानल्ला

अत्रन्गि पाउस
Sat, 02/21/2015 - 13:42 नवीन
क्या बात है !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

@ कुंड्लीतल्या प्रत्येक घरास

अत्रुप्त आत्मा
Sat, 02/21/2015 - 16:12 नवीन
@ कुंड्लीतल्या प्रत्येक घरास किती???? घाल बोटें मोज !! >>> खुळा की काय तू? आडवा हो काश्मिर होइस्तर! " धाग्यावर प्रतिसाद उलगडीत मुवि नानांनी आपलं मत मांडलं. इकडे धागा रणरणायला लागला होता. मंडळी आग ओकणार्‍या प्रतिसादांचा आश्रय शोधित होती. अत्यंत ओळखिचा धागा-अत्यंत ओळखिचेच प्रतिसाद. मग ''एकमेका सहाय्य करु",म्हणून कोणी डु आय डींच्या शोधार्थ निघाले. फेक अकाऊंट - अदली बदली व्हायला लागली. संपादकांच्या गाड्याबिड्या डु आय डीं ना पकडायला सुटल्या. तेव्हढ्यात एकानी अवांतर करायला सुरवात केली. ================ भ्रमशः =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

@ कुंड्लीतल्या प्रत्येक घरास

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 02/21/2015 - 16:51 नवीन
@ कुंड्लीतल्या प्रत्येक घरास किती???? घाल बोटें मोज !! >>> खुळा की काय तू? आडवा हो काश्मिर होइस्तर! " धाग्यावर प्रतिसाद उलगडीत मुवि नानांनी आपलं मत मांडलं. इकडे धागा रणरणायला लागला होता. मंडळी आग ओकणार्‍या प्रतिसादांचा आश्रय शोधित होती. अत्यंत ओळखिचा धागा-अत्यंत ओळखिचेच प्रतिसाद. मग ''एकमेका सहाय्य करु",म्हणून कोणी डु आय डींच्या शोधार्थ निघाले. फेक अकाऊंट - अदली बदली व्हायला लागली. संपादकांच्या गाड्याबिड्या डु आय डीं ना पकडायला सुटल्या. तेव्हढ्यात एकानी अवांतर करायला सुरवात केली. ================ भ्रमशः Lol
=)) एकमेका सहाय्य करु....कैच्या कै ओ...कंपु अस्तित्वात नै मिपावर =))...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कंपू...ते काय अस्ते

टवाळ कार्टा
Sat, 02/21/2015 - 22:57 नवीन
कंपू...ते काय अस्ते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

काही आयडीया नाही रे.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 02/21/2015 - 23:52 नवीन
काही आयडीया नाही रे. मार्गदर्शक आहेत का कोणी कंपुबाजीवर भाष्य करणारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

भ्रमशः>>>>ये रहा येक अत्रुप्त

बॅटमॅन
Mon, 02/23/2015 - 18:08 नवीन
भ्रमशः>>>>ये रहा येक अत्रुप्त सिक्सर! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

खी खी खी

बॅटमॅन
Mon, 02/23/2015 - 18:08 नवीन
खी खी खी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा