Skip to main content

मृत्युषडाष्टक

लेखक नितीनचंद्र यांनी गुरुवार, 19/02/2015 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
आजच एक जोडी माझ्याकडे सल्ल्यासाठी आली होती. मुलाचे जन्मनक्षत्र आर्द्रा म्हणजे मिथुन रास तर मुलीचे जन्मनक्षत्र जेष्ठा म्हणजे वृश्चिक रास. या दोन्ही राशी एकमेकांपासुन सहाव्या आठव्या येतात म्हणजे षडाष्टक योगात गुणमेलनाचे गुण एकदम कमी होऊन कोणी ज्योतिषी लग्न करा असा सल्ला द्यायला धजावत नाही. यातुन मृत्यु हा शब्दामुळे दोघेही भांबावलेले / धास्तावलेले होते. दोघेही वडीलधार्‍या व्यक्तीच्या सोबत न येता फक्त दोघेच आले होते त्यामुळे हा मामला प्रेमाचा आहे हे समजावयला वेळ लागला नाही. अधीक चौकशीत ते एकमेकांचे ( विवाहाला अडथळा नसलेले नातेवाईक म्हणजे मुलाच्या मामाची मुलगी ) आहे हे समजले. दोघे एकमेकांना लहान पणा पासुन चांगले एकमेकांच्या स्वभावाचा परिचय असलेले आणि एकमेकांवर अत्यंतीक प्रेम असलेले दिसत होते. गावाकडे गुणमेलनाच्या सॉफ्टवेअरमधे लग्न जुळत नाही हा शिक्का लागलेला कागद घेऊन आले होते. दाते पंचांगात याला पर्याय म्हणजे दोघांच्या नवांश कुंडल्या मांडुन नवांशस्वामी एकमेकांचे मित्र असल्यास षडाष्टक योग असुनही विवाह वर्ज नाही हा सल्ला तर दिलाच त्या शिवाय मुलीला जेष्ठा नक्षत्र शांती करावयाचा सल्ला दिला जी झालेली नव्हती. जेष्ठा नक्षत्र हे जेष्ठता मिळवण्यासाठी आतुर नक्षत्र समजले जाते. त्यांना डावललेले चालत नाही. प्रत्येक गोष्टीत पतीने पत्नीचा सल्ला घेणे आणि आपली बाजु समजाऊन सांगुन जर दुमत असेल तर एकमत बनवणे ही शहाण्या जोडप्याने वागायची रितही समजाऊन सांगीतली. लग्न हे समजुतदारपणाने निभावले जाते हेही सांगायला मी विसरलो नाही. मंगळ आणि बुध हे एकमेकाचे शत्रु असल्याने एकमेकांचे पटत नाही हे शास्त्र झाल. व्यवहारात अनेक वेळा अश्या राशीच्या लोकांना नोकरी/व्यवसायात एकमेकांना पटवावे लागते. बुध हा शब्द्प्रभु असल्यामुळे त्याला फार भावनेच्या आहारी न जाता असे पटवणे सोपे जाते. मिसळपाववर षडाष्टक योगाची चर्चा झाली आहे आणि स्वभाव न पटल्यास एकत्र रहाणे म्हणजे मृत्युसम या अर्थाने याला मृत्युषडाष्टक म्हणणे योग्य ठरेल हे विधान मलातरी पटले आहे. दोघांनी एकमेकांना पसंत केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे एकमेकांशी संघर्ष कधी झालेच नाहीत आणि होणारही नाहीत इतक्या खात्रीने ते विवाह करत असतील तर उगाच भिती दाखवुन तो विवाह टाळण्यास सांगण्याचा सल्ला देण्यात काही हशील नव्हता. शिवाय एकमेकांशी विवाह न करता ते किती सुखी होतील असा प्रश्न विचारल्यावर अजिबात नाही असे उत्तर दोघेही देत होते. असे असताना आणि त्यांची वये पाहुन हे फक्त आकर्षण नाही हे स्पष्ट समजत होते. आर्थीक सुसंपन्नता तर आहेच. अस असताना या दोन आत्म्यांना माझ्या अंतरात्म्याला न पटलेला सल्ला देणे म्हणजे काहीतरी पाप करणे वाटत होते. यातला अजुन एक भाग म्हणजे दोघांची एकनाड आहे. परंतु दोघांचे पंचमेश दोषमुक्त आहेत. पंचम स्थान आणि गुरु देखील सुस्थीतीत आहेत. याशिवाय आज सायन्स इतके पुढे गेले आहे त्यामुळे दोष असलाच तर किमान एक संतती होणे सायन्स च्या सहायाने अशक्य नाही. शभंभवतु हा आशिर्वाद मी दिलाच आहे. मिसळपावकरांना माझे म्हणणे पटेल.

वाचने 49820
प्रतिक्रिया 110

प्रतिक्रिया

In reply to by प्रकाश घाटपांडे

ज्योतिष, कुंडली, ग्रहयोग वगैरे वगैरे बाजूला ठेवून पाहिलंत तर समुपदेशनाच्या दृष्टीने आपण योग्य तेच केलंत याबद्दल मात्र आपलं कौतुकच आहे.

In reply to by एस

अगदी अगदी....योग्य सल्ला. तरीही पत्रिकेचे एक स्थान असते, विशेषतः लग्नबाजारात. एखादे स्थळ आवडले नसल्यास नाही म्हणून सांगायला पत्रिकेचा चांगला उपयोग होतो.

ज्योतिष्य हा विश्वासाचा भाग आहे. प्रेम केल तर ज्योतिष्य बघू नये. जर आपला जोड़ीदार आपण निवडला आहे तर मग कोणत्याही परिस्थितीत एकत्र रहाणे महत्वाचे

मला स्वतः गाडी (दुचाकी, चारचाकी) चालवायला बिलकुल आवडत नाही. स्वतः गाडी चालवायची वेळ शक्यतोवर येऊ न देण्याचा प्रयत्न करतो. प्रवासाची मात्र आवड आणि हौस आहे. बोटीपासून लाल डब्ब्यापर्यंत कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा त्रास होत नाही. मग मला वाहनसुखाचा योग आहे की नाही? कंडीशनल योग असतात का? खराखुरा प्रश्न आहे, खवचटपणा नाही.

In reply to by आदूबाळ

आपणांस बहुदा सार्वजनिक वाहनसुखाचा योग आहे! आम्हाला हा योग अर्धवट मिळालेला आहे. या योगाची लक्षणे म्हणजे मुख्यत: सीट बेल्ट लावणे आवडत नाही. हेल्मेट घालणे आवडत नाही. हेल्मेट घेतांना चष्मा न घालून गेल्याने नंतर चष्मा-हेल्मेट एकत्र घालता येत नाही हे नंतर लक्षात येते आणि अजून एखादे हेल्मेट आणावे लागते. पीएमटीच्या बस स्टॉपवर कंटाळून तुम्ही रिक्षात बसला रे बसला की लगेच पाहीजे ती बस येते. जर कर्म धर्म संयोगाने हवी असलेली बस मिळाल्यास हव्या त्या चेहर्‍याशेजारी बसण्यासाठी तुम्ही पोहोचेपर्यंत ती सीट कोणी तरी हडपतो किंवा तो चेहरा बसमधून उतरतो. एखाद्या वेळेस नशीबाच्या जोरावर आपण तिथे पोहोचलो, आसनस्थ झालो की दुसर्‍या क्षणाला भोXXXXXXX!!, भेटत नाय बे इथेच असून... असं कोकलणारा दोस्त त्याच ठिकाणी बसमध्ये चढतो. आपल्याला विशिष्ट प्रकारचा असा एक स्पेशल वास्तू योग असतो. यात घर फार उत्तम मिळते पण तिकडे जाणारा रस्ता फार खराब मिळतो. गावची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कितीही उत्तम असली तरी हवे तिथे जाण्यासाठी बस आपल्या ठिकाणाहून किमान दोनदा बदलावी लागते. या वास्तू योगात "जमत नाय, तिकडून रिटन भेटत नाय सायेsssब" म्हणणारे रिक्षावाले खच्चून सापडतात.

In reply to by आयुर्हित

काहो होमियोहित साहेब, प्रत्येक वेळी ते 'व्यनि करा' चे शेपूट लावल्याशिवाय चैन नाय का हो पडत तुम्हांला?

In reply to by आदूबाळ

मोडावरून एका अज्ञात मोरोपंतकालीन कवीची ही धमाल आर्या आठवली. यतिनें न वागवावा चित्तांत अल्पहि मोड कामाचा | सुरतीं घातक जैसा युवदांपत्यासि मोडका माचा || ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

का हो? मोड टोर्टुगाच्या बंदरात खारवून वाळवून दूरदेशी विकणार आहात की काय =)) (मोड आलेला मोड) =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आमच्या गौतमहळ्ळीत लोकांच्या एकेक अत्रंगी सवयी आहेत. वेन टावरातून किती लोकांवर लक्ष ठेवणार म्हणा. तरी टोर्टुगातून येणार्‍या मालाकडे आमचे खास लक्ष असते. कृष्णमौक्तिकनौकेकडे तर अजूनच विशेष ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

विश्वास ठेवू नका ब्रुस्वेनभौ, हे बेणं या बोटावरची त्या बोटावर करण्यात लै तरबेज है.. पायरेट जमात है शेवटी. ;)

In reply to by हाडक्या

ओ कैच्या कै कवटीला येईल ते बोलु नका...ह्या बोटीवरची त्या बोटीवर म्हणा....हम बेईमानी का धंदा भी बडे इमान से करते है.. =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हम बेईमानी का धंदा भी बडे इमान से करते है..
ए धंदा तुम बोट से करते है की बडे इमान से वो पयले बतावो बाबा. नै तो बोट की वाट बघेगा आन तुम इमान पाठवेगा, ऐसा नही चलेंगा रे. ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मोड हवेत ना. हा घ्या माईसाहेब मोड. माईसाहेब मोड ऑन - ज्योतिष, पत्रिका वगैरे सगळं खूळ आहे असे हे म्हणतात. आमच्या लग्नाच्या वेळी आमच्या दोघांच्या पत्रिकेत काळसर्पयोग होता म्हणे. मग तो टाळण्यासाठी नाशकात गोदातीरी जाऊन नागबळी का कसलं तरी होमहवन केलं होतं आणि मगच लग्न लावलं. तेव्हा भटजींनी खूपच दक्षिणा उकळली होती. त्या विधीची तर मला बाई भीतिच वाटली. जिवंत नागाचा बळी देतात की काय आणि तो सुद्धा आपल्यासमोर या कल्पनेनीच मी घाबरले होते. आता हे मला चेष्टेने म्हणतात की नागबळीवर पैसे घालवण्याऐवजी तू दुसर्‍याच वराशी लग्न केलं असतंस तर तू सुखी झाली असतीस आणि मी पण सुखी झालो असतो. मी बरी ऐकून घेईन? मी लगेच ह्यांना टोला हाणला की तुमचं नशीब बलवत्तर म्हणून देवाने तुमची माझ्याशी गाठ बांधली, पण माझं मेलीचं नशीबच खोटं. परवाच ह्यांनी मला संध्यानंदमधला नागबळीवरचा एक लेख वाचून दाखविला आणि सांगितलं की बघ आता हे फॅड किती वाढलंय ते. ह्यांचा आता कशाकश्शावर म्हणून विश्वास राहिलेला नाही. माईसाहेब मोड ऑफ -

ज्योतिष हे एक शास्त्र आहे, ज्या लोकांना हे पटत नसेल त्यांनि ह्या भानगडित पडु नये, ज्योतिष शास्त्र हे खुप चांगले शास्त्र आहे, पण ते बघनारा त्यातिल तज्ञ माणुस असला पाहिजे तरच त्याच्या सहायाने आपण भविष्याचा वेध घेउ शकतो आणि बर्यापैकि प्रोबलेम कमी करु शकतो, पण दुर्दैवने ह्या ज्ञानातिल तज्ञ माणसे खुपच कमी आहेत आणि अर्धवट ज्ञानवर ज्या लोकांनि दुकाने टाकलि आहेत त्यांच्यामुळेच ज्योतिषशास्त्र बदनाम झाले आहे, पण नितिनचंद्रनि त्यांच्या ज्योतिषशास्त्रातिल अभ्यासावरुन त्या जोडप्याला योग्य तोच सल्ला दिला आता तो मानने किंवा न मानने हे त्या जोडप्याच्या हातात आहे त्यासाठि नितिनचंद्र यांनि त्या जोडप्यावर कोणतिहि जबर्दस्ति केलि नाहि आहे ते त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेत.

In reply to by यमगर्निकर

या प्रतिसादाबद्दल यमगर्णीकरांना "वल्डफेमस निपाणीकर" मण्डळाकडून, कळशीभरुन वेदगंगेचे पाणी देण्यात येत आहे.

असा असा कुयोग होता. बरं झालं अमक्याला विचारायला गेला आणि वाचला. शुन्यालाच बर्फ झालं. तमक्याकडे गेला असता तर दहा डिग्रीलाच बर्फ झालं असतं. याला म्हणतात शास्त्र. जाताजाता- होमियो सेपिअन=अखील मानव जात . होमिओहित =मानव जातीचं हित पाहणारा {व्यनितून}भलं करणारा .व्यापक ज्ञान मिळवण्याकरता गंडा बांधून घ्यावा लागतो .