आजच एक जोडी माझ्याकडे सल्ल्यासाठी आली होती. मुलाचे जन्मनक्षत्र आर्द्रा म्हणजे मिथुन रास तर मुलीचे जन्मनक्षत्र जेष्ठा म्हणजे वृश्चिक रास. या दोन्ही राशी एकमेकांपासुन सहाव्या आठव्या येतात म्हणजे षडाष्टक योगात गुणमेलनाचे गुण एकदम कमी होऊन कोणी ज्योतिषी लग्न करा असा सल्ला द्यायला धजावत नाही.
यातुन मृत्यु हा शब्दामुळे दोघेही भांबावलेले / धास्तावलेले होते. दोघेही वडीलधार्या व्यक्तीच्या सोबत न येता फक्त दोघेच आले होते त्यामुळे हा मामला प्रेमाचा आहे हे समजावयला वेळ लागला नाही. अधीक चौकशीत ते एकमेकांचे ( विवाहाला अडथळा नसलेले नातेवाईक म्हणजे मुलाच्या मामाची मुलगी ) आहे हे समजले. दोघे एकमेकांना लहान पणा पासुन चांगले एकमेकांच्या स्वभावाचा परिचय असलेले आणि एकमेकांवर अत्यंतीक प्रेम असलेले दिसत होते.
गावाकडे गुणमेलनाच्या सॉफ्टवेअरमधे लग्न जुळत नाही हा शिक्का लागलेला कागद घेऊन आले होते.
दाते पंचांगात याला पर्याय म्हणजे दोघांच्या नवांश कुंडल्या मांडुन नवांशस्वामी एकमेकांचे मित्र असल्यास षडाष्टक योग असुनही विवाह वर्ज नाही हा सल्ला तर दिलाच त्या शिवाय मुलीला जेष्ठा नक्षत्र शांती करावयाचा सल्ला दिला जी झालेली नव्हती.
जेष्ठा नक्षत्र हे जेष्ठता मिळवण्यासाठी आतुर नक्षत्र समजले जाते. त्यांना डावललेले चालत नाही. प्रत्येक गोष्टीत पतीने पत्नीचा सल्ला घेणे आणि आपली बाजु समजाऊन सांगुन जर दुमत असेल तर एकमत बनवणे ही शहाण्या जोडप्याने वागायची रितही समजाऊन सांगीतली. लग्न हे समजुतदारपणाने निभावले जाते हेही सांगायला मी विसरलो नाही.
मंगळ आणि बुध हे एकमेकाचे शत्रु असल्याने एकमेकांचे पटत नाही हे शास्त्र झाल. व्यवहारात अनेक वेळा अश्या राशीच्या लोकांना नोकरी/व्यवसायात एकमेकांना पटवावे लागते. बुध हा शब्द्प्रभु असल्यामुळे त्याला फार भावनेच्या आहारी न जाता असे पटवणे सोपे जाते.
मिसळपाववर षडाष्टक योगाची चर्चा झाली आहे आणि स्वभाव न पटल्यास एकत्र रहाणे म्हणजे मृत्युसम या अर्थाने याला मृत्युषडाष्टक म्हणणे योग्य ठरेल हे विधान मलातरी पटले आहे.
दोघांनी एकमेकांना पसंत केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे एकमेकांशी संघर्ष कधी झालेच नाहीत आणि होणारही नाहीत इतक्या खात्रीने ते विवाह करत असतील तर उगाच भिती दाखवुन तो विवाह टाळण्यास सांगण्याचा सल्ला देण्यात काही हशील नव्हता. शिवाय एकमेकांशी विवाह न करता ते किती सुखी होतील असा प्रश्न विचारल्यावर अजिबात नाही असे उत्तर दोघेही देत होते. असे असताना आणि त्यांची वये पाहुन हे फक्त आकर्षण नाही हे स्पष्ट समजत होते. आर्थीक सुसंपन्नता तर आहेच. अस असताना या दोन आत्म्यांना माझ्या अंतरात्म्याला न पटलेला सल्ला देणे म्हणजे काहीतरी पाप करणे वाटत होते.
यातला अजुन एक भाग म्हणजे दोघांची एकनाड आहे. परंतु दोघांचे पंचमेश दोषमुक्त आहेत. पंचम स्थान आणि गुरु देखील सुस्थीतीत आहेत. याशिवाय आज सायन्स इतके पुढे गेले आहे त्यामुळे दोष असलाच तर किमान एक संतती होणे सायन्स च्या सहायाने अशक्य नाही.
शभंभवतु हा आशिर्वाद मी दिलाच आहे. मिसळपावकरांना माझे म्हणणे पटेल.
वाचने
49820
प्रतिक्रिया
110
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
In reply to योग्य सल्ला by प्रकाश घाटपांडे
अगदी अगदी....योग्य सल्ला.
In reply to +१ by एस
नितिनचंद्र जी योग्य सल्ला दिलात.
ज्योतिष्य हा विश्वासाचा भाग
हाच मुद्दा मी मांडलाय.
वा खुप छान
मला स्वतः गाडी (दुचाकी,
आपणांस बहुदा सार्वजनिक
In reply to मला स्वतः गाडी (दुचाकी, by आदूबाळ
इंटरेस्टिंग योग!
In reply to आपणांस बहुदा सार्वजनिक by लॉरी टांगटूंगकर
काहो होमियोहित साहेब,
In reply to इंटरेस्टिंग योग! by आयुर्हित
होमियोहित
In reply to काहो होमियोहित साहेब, by बॅटमॅन
सामासिक विग्रह म्हणायचंय का
In reply to होमियोहित by कॅप्टन जॅक स्पॅरो
नाही. व्युत्पत्तीचं बरोबर आहे
In reply to सामासिक विग्रह म्हणायचंय का by सूड
समासविग्रह केला की अर्थ वा
In reply to नाही. व्युत्पत्तीचं बरोबर आहे by कॅप्टन जॅक स्पॅरो
ते जौदे.
In reply to समासविग्रह केला की अर्थ वा by बॅटमॅन
मोड येत नाहीत का हल्ली (ऑन ऑफ
In reply to ते जौदे. by आदूबाळ
लोकांच्या मोडांच्या भारी रे
In reply to मोड येत नाहीत का हल्ली (ऑन ऑफ by कॅप्टन जॅक स्पॅरो
बघा ना. नाही त्याच्यात मोड-ता
In reply to लोकांच्या मोडांच्या भारी रे by सूड
मोडावरून एका अज्ञात
In reply to बघा ना. नाही त्याच्यात मोड-ता by आदूबाळ
(No subject)
In reply to मोडावरून एका अज्ञात by बॅटमॅन
का हो? मोड टोर्टुगाच्या
In reply to मोड येत नाहीत का हल्ली (ऑन ऑफ by कॅप्टन जॅक स्पॅरो
येस्स. गॉथम सिटीची डिमांड आहे
In reply to का हो? मोड टोर्टुगाच्या by बॅटमॅन
आमच्या गौतमहळ्ळीत लोकांच्या
In reply to येस्स. गॉथम सिटीची डिमांड आहे by कॅप्टन जॅक स्पॅरो
कृष्णमौक्तिकनौका
In reply to आमच्या गौतमहळ्ळीत लोकांच्या by बॅटमॅन
विश्वास ठेवू नका ब्रुस्वेनभौ,
In reply to कृष्णमौक्तिकनौका by कॅप्टन जॅक स्पॅरो
ओ कैच्या कै कवटीला येईल ते
In reply to विश्वास ठेवू नका ब्रुस्वेनभौ, by हाडक्या
हम बेईमानी का धंदा भी बडे
In reply to ओ कैच्या कै कवटीला येईल ते by कॅप्टन जॅक स्पॅरो
विचएव्हर रिसोर्स ब्रिंग्ज
In reply to हम बेईमानी का धंदा भी बडे by हाडक्या
मोड हवेत ना. हा घ्या माईसाहेब
In reply to मोड येत नाहीत का हल्ली (ऑन ऑफ by कॅप्टन जॅक स्पॅरो
या योगाला प्रवास धार्जिणा
मी नितिनचंद्र यांच्या मताशि सहमत आहे.
कोणत्याही एका तज्ञाचे नाव
In reply to मी नितिनचंद्र यांच्या मताशि सहमत आहे. by यमगर्निकर
हॅ हॅ हॅ. शास्त्राची व्याख्या
In reply to मी नितिनचंद्र यांच्या मताशि सहमत आहे. by यमगर्निकर
सहमत
In reply to मी नितिनचंद्र यांच्या मताशि सहमत आहे. by यमगर्निकर
लिव्ह इन पण एक शास्त्र म्हणे.
In reply to मी नितिनचंद्र यांच्या मताशि सहमत आहे. by यमगर्निकर
या प्रतिसादाबद्दल
In reply to मी नितिनचंद्र यांच्या मताशि सहमत आहे. by यमगर्निकर
असा असा कुयोग होता. बरं झालं
कंजूस साहेब
In reply to असा असा कुयोग होता. बरं झालं by कंजूस
(No subject)
In reply to कंजूस साहेब by सुबोध खरे
होय, होमो च पाहिजे.