✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पहिला दक्षिण कॅलिफोर्निया मिसळपाव कट्टा - ८ नोव्हेंबर २००८

न
नंदन यांनी
Tue, 11/11/2008 - 18:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15603 वाचन

💬 प्रतिसाद (48)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Tue, 11/11/2008 - 19:14 नवीन

नंदन अभिनंदन

नंदन अभिनंदन !! वृत्तांत मस्त !! मोठ्या माणसांचे दर्शन झाले :) भरुन पावलो !!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 11/11/2008 - 19:15 नवीन

पिडाकाका

पिडाकाका कोणत्या मराठी नटासारखे दिसतात बॉ ?? :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ट
टारझन Tue, 11/11/2008 - 19:22 नवीन

अगं बाई अरेच्चा मधला

पिडाकाका कोणत्या मराठी नटासारखे दिसतात बॉ ?? अगं बाई अरेच्चा मधला संजय नार्वेकरला स्कुटरवर लिफ्ट देणारा तर नाही ना महाराजा ? बाकी जेवणाचं टेबल पाहून अंमळ अंमळ लाळ गळाली हो ... लै लै लै ... घाटावरचा भट प्रत्येक फोटूत येगळा दिसतो ... पिडा काकांना साष्टांग णमस्कार्स - पिवळा खविस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ग
गणा मास्तर Tue, 11/11/2008 - 20:21 नवीन

आयला

आयला डिट्टो विनय येडेकर - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
आ
आनंदयात्री Tue, 11/11/2008 - 20:25 नवीन

नायरे

नायरे .. विनय येडेकर नाय .. तो कायतारीच आहे. पिडा म्हणजे अट्टल राजकारणी किंवा साखर कारखान्याचे चेअरमन वाटतात. अनंत जोग पण म्हणता येणार नाही .. डोळे घारे नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणा मास्तर
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 11/11/2008 - 20:25 नवीन

डेव्हिड धवन???

डेव्हिड धवन??? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Tue, 11/11/2008 - 20:27 नवीन

हा हा

=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
क
कपिल काळे Tue, 11/11/2008 - 19:24 नवीन

तोडलत

मित्रांनो, तोडलत!! http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 11/11/2008 - 19:31 नवीन

वाचुन आनंद झाला ....

पिडाकाकांनी स्वतः पुढाकार घेऊन भरवलेला कट्टा अपेक्षेप्रमाणे व नंदनच्या भाषेत मोठ्ठ्या थाटामाटाने पार पडल्याचे पाहुन आनंद झाला. एकंदरीत कट्टा व वॄत्तांत झक्कास !!!
तसे व्यवहाराकरता किंवा आपले काम साधण्यासाठी अनौपचारिक बोलून मग मुद्द्यावर येणारे अनेक लोक असतात. पण कट्ट्यावर बसून मित्रांशी मारलेल्या निर्हेतुक गप्पांसारखे, किंवा घरी जेवणं आटोपल्यावर एकत्र बसून मारलेल्या शिळोप्याच्या गप्पांसारखे दुसरे सुख नाही. फोनवरच्या संभाषणाला, किंवा चॅटिंगलाही त्याची सर नाही. या गजालींना, कट्ट्यावरच्या गप्पांना विषयाचे बंधन नसतेच.
++++१, सहमत आहे ... एकदम सौ टके की बात की है नंदनभाय ... असो. आम्हाला आनंद झाला सर्व वाचुन ... कट्टाधिपती आणि हिज रॉयल नॉटीनेस श्री. डांबिसकाका यांचे हाबिणंदण !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 11/11/2008 - 19:31 नवीन

मस्त

मस्त लिहिला आहेस वृत्तांत नंदन :) तुला आणि इतर सगळ्या मिपाकरांना भेटून छान वाटले. पिडांकाकाऽ ऽ ऽ _/\_
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 11/11/2008 - 19:38 नवीन

मस्त

जॉर्जच्या प्रिय विद्यार्थ्याचे, खानदोस्ताचे अर्थात हिज रॉयल नॉटीनेस भारदस्त दर्शन !! पिडाकाकुंनी केलेला जंगी बेत क्या कहने!!
  • Log in or register to post comments
श
शिंगाड्या Tue, 11/11/2008 - 19:49 नवीन

मस्त यजमान

पिडा काका काकुंनी अगदी मनापासुन केलेला पाहुणचार! मस्त वाटला..
  • Log in or register to post comments
श
शिंगाड्या Tue, 11/11/2008 - 19:49 नवीन

मस्त यजमान

पिडा काका काकुंनी अगदी मनापासुन केलेला पाहुणचार! मस्त वाटला..
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 11/11/2008 - 19:51 नवीन

वा! वा!

वा! वा! तमाम जालावरच्या नावांना लाभलेल्या चेहर्‍यांच्या दर्शनाने आनंद झाला :) वृत्तांत तर लै भारी!... वृतांत देण्याची इष्टाईल आवडली :)
बाकी जेवणाचं टेबल पाहून अंमळ अंमळ लाळ गळाली हो
टारोबाशी सहमत.. फक्त "अंमळ" हा शब्द "जरा जास्तच" असा वाचावा. पिडाकाकुंचा बेत मस्तच होता :) पिडाकाकांच्या एकूण व्यवस्थेबद्दल अभिनंदन :) - ऋषिकेश
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 11/11/2008 - 20:06 नवीन

कट्टा मस्त झालेला दिसत आहे.

कट्टा वृत्तां त आणि फोटो मस्तच. आमचा कट्ट्याचा वृत्त्तांत ही येईल आज असे वाटते. :)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 11/11/2008 - 20:16 नवीन

हाय !

हपिसात फ्लिकर दिसत नाही त्यामुळे चित्राना दाद यथावकाश देऊच. पण नुसती वर्णने ऐकून खलास झालो आहे. मी तर तिकडे येलोनॉटी म्याकेन्रो आणि नंदनबियाँ बोर्गची फैनल पहायला यायला हवे होते ! आणि हो , भटांना असेतसे सोडलेत हे काही ठीक नाही झाले. हे म्हणजे जास्वंदाबाई जैसिंगपूरकरीण होती न् बैठकीची लावणी झाली नाहीसे झाले की. बाकी मेन्युचे फोटु पहायचेत ; पण जी वर्णने ऐकली त्यावरून .........पिडाकाकींना शिसानविवि , लाख दुवा , मिलियन कॉम्प्लिमेंट्स. आणि येलोनॉटीबद्दल काय बोलणार ? मालवणी अघळपघळपणा असणारा पण शिष्टपणा नसणारा , "मध्यरात्री नभघुमटाखाली " दिलखुलास गजाली करणारा, आख्खा बार ओपन करणारा , दिलखुलास गप्पा मारणारा डांबिसखान ! भाग्यश्री , भट , नंद्या , लेको गेल्या जन्मी पुण्ये तरी काय काय केली आहेत ?? ;-) बाय द वे, साक्षात येलोनॉटी यांची बोलती बंद करणारे त्यांचे चिरंजीव नव्हते काय ? ;-)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 11/11/2008 - 20:24 नवीन

आहाहा...

काय ते फोटू... अंमळ वगैरे काही नाही, चांगली बादलीभर लाळ गळली, तिच्यायला. मस्त धमाल केली आहे. सर्व फेमस मिपाकर 'दिसती कसे आननी' ही उत्कंठा होतीच. दिसले सगळे. मिसळीच्या फोटोतल्या मिरच्या भारीच दिसताहेत. मस्त.... आणि हिज रॉयल नॉटीनेस पण दणदणीत, वर परत हातात अमृतकुंभ!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Tue, 11/11/2008 - 20:48 नवीन

चीअर्स!

आम्हालाही मैफिलीत सामील झाल्यासारखे वाटले. छायाचित्रे, वर्णन आणि पिडांकाकूंची तयारी सारेच अगदी झोकात!! - एकलव्य
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 11/11/2008 - 20:53 नवीन

वा वा वा!!!

तुमचा कट्टा भारीच झालेला दिसतोय. पिडाकाकूंच्या पाककौशल्याबद्दल बोलायलाच नको.:) आमचाही कट्टा झाला त्याच दिवशी. कसा झाला ते प्राजु लिहितीये. तीला प्रश्न पडला असेल की मुलांच्या दंग्याचं आणि पसार्‍याचं वर्णन कसं टाळावं.;) आमचे चिरंजीव आघाडीवर होते हे सांगायला नकोच (कोण म्हणतं यशराज खूप दंगा करतो?) पिडाकाकांचा फोन आल्यावर मी त्यांच्याशी बोलले पण त्यांनी ओळखले नाही हो मला. ( मला फोनवर रंगाशेट म्हणाले तेच राहून राहून आठवतयं.).:( रेवती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 11/11/2008 - 21:02 नवीन

मस्तच.

कट्ट्याच्या मेनूचे फोटो मस्तच. पिडा काकूना खास निरोप असा कि, खास तुमच्या हातचं बटर चिकन खाण्यासाठी मी तिकडे नक्की येईन. एक घोळ झाला.. नेहमीप्रमाणेच, पिडा काकांबद्दल मी जसा विचार करत होते.. त्यापेक्षा ते जरा 'भारी" निघाले. मला वाटलं होतं.."बारिक शरिरयष्टी, नाकावर सोनेरी चष्मा आणि डोक्याची अर्धी चांदी झालेली" असे असतील काका. बट काका, यू आर टू यंग!!!!!!!!!! :) पण तरीही माझे काकाच तुम्ही.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 11/11/2008 - 21:34 नवीन

अगदी सेम!!

अगदी सेम!! :) काकांना काका कसं म्हणावं असा प्रश्न पडला.. सगळी चुक तुझी आहे असंही काकांनी आम्हाला सांगितलं.. :) कट्टा सह्ह्हीच झाला.. खाणं-पिणं,गप्पा गॉसिपिंग ;) ... फुल्ल टू धमाल! नंदन मस्त लिहीला वृत्तांत..! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
र
रामदास Tue, 11/11/2008 - 21:05 नवीन

पि.डा. साहेब,

अस्सा गुलाबी रंग चेहेर्‍यावर .(फक्त स्कॉच आणि स्कॉचच) कट्टेकरांचं अभिनंदन.
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 11/11/2008 - 21:12 नवीन

हलकट कुठले!

जळवा जळवा लेको. नरकात जाल सगळे! (नाडी परीक्षक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 11/13/2008 - 13:42 नवीन

असेच

असेच म्हणतो... मी प्राजुताईंचे कट्टावर्णन आधी वाचले.. त्यातच अर्धा खल्लास झालेलो... अन् इथे संपूर्ण!! अर्थात् आपण शाकाहारी.. अन् हार्डड्रिंक्सही घेत नाही... पण तरिही जळजळ होतेच की राव :( सगळे दोस्त एकत्र भेटणे हेच कारण पुरेसे आहे त्यासाठी!! स्वगतः पुण्यात मिपा कट्टा व्हायलाच हवा आता. :W मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/11/2008 - 21:23 नवीन

व्वा

हाबिणंदण !!! हाबिणंदण !!! हाबिणंदण !!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/11/2008 - 22:20 नवीन

क्या बात है !!!

नंदन साहेब, कट्टा वृत्तांत झकास..पिडासाहेब, घाटावरचे भट, नंदन, निनाद भाग्यश्री आपल्या सर्वांच्या दर्शनाने आम्हालाही आनंद झाला :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 11/13/2008 - 08:56 नवीन

+१

असेच म्हणते! छानच वृत्तांत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ल
लिखाळ Tue, 11/11/2008 - 22:24 नवीन

अरे वा !

अरे वा ! थाटात आणि पोटभर कट्टा झालेला दिसतोय :) सर्वांना भेटून आणि वृत्तांत वाचून मजा आली. असेच सर्वत्र कट्टे होवोत ! :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 11/11/2008 - 23:15 नवीन

माताय! जबराटच की कट्टा!

पहिल्याच चित्रात काकांची डांबीस छबी हातात रीगलचा अख्खा खंबा धरुन बघताच भरुन पावलो! (आणि अंमळ चक्रावलोसुद्धा कारण माझ्या डोक्यातल्या चित्राशी काकांचं हे रुप अंमळ विसंगतच आहे. ) पिडाकाकूंच्या पाककौशल्याबद्दल काय बोलावे? जेवणाच्या मेजावरची एवढी रेलचेल बघून खात्रीच पटली की त्यांचे घर हे सुगरणीचे घरटे आहे (मुख्य फरक एवढाच असावा की इथे सुगरण 'ती' आहे एरवी 'तो' सुगरण असतो!!;)) घाटावरचे भट, नंदन, श्री व सौ. भाग्यश्री ह्यांना सदेह बघून धन्य झालो! (काकू आणि ज्यु.डांबीस ह्यांच्या छबी न दिल्याने पिडाकाकांचा निषेध!) नंदन वृत्तांत छानच झालाय रे! :) (खुद के साथ बातां : रंगा, पिडाकाकांकडे 'बघता' तुझे फोटो साईडने काढायला काहीच हरकत नसावी! B) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 11/11/2008 - 23:27 नवीन

आगायायायाया

रंगा, पिडाकाकांकडे 'बघता' तुझे फोटो साईडने काढायला काहीच हरकत नसावी! =)) =)) =)) णाकात पुलावाचा भात गेला न भो .. केवढा ठसका प्लस हसण्याचा लोंढा आला ... आडवा फोटू काढू शकणार्‍यांचा एक क्लब स्थापन व्हावा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
संजय अभ्यंकर गुरुवार, 11/13/2008 - 22:03 नवीन

मेजावरची एवढी रेलचेल बघून खात्रीच पटली की त्यांचे घर हे सुगरणी..

सहमत! पिडां साहेबांच्या प्रकृतीवरून खात्री पटते! चिअर्स! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विसोबा खेचर Wed, 11/12/2008 - 00:08 नवीन

क्या बात

क्या बात है, क्या बात है..! सुंदर, सुरेख वृत्तांत आणि फोटू..! पिडां तर लैच स्मार्ट दिसतो आहे.. बाय द वे, माझ्या चरणी वाहिलेली शिवास रिगल पावली बर्र का मला! :) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले गुरुवार, 11/13/2008 - 10:01 नवीन

क्यालीफोर्निया कट्टा

आवशिक खाउ वरान, फ्टकीची मासली खय दिसाक नाय ती जेवनात....! कसलेरे माल्वणी तुम्ही... अरे सगुती तरी बनवायचीत....? बाकी मस्त हां .. एकदम इंटरनाशनल.......!!!!!!!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी गुरुवार, 11/13/2008 - 10:31 नवीन

मस्त!

पिडाकाकूंच्या पाककौशल्याबद्दल काय बोलावे? जेवणाच्या मेजावरची एवढी रेलचेल बघून खात्रीच पटली की त्यांचे घर हे सुगरणीचे घरटे आहे
+१ मस्त!
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष गुरुवार, 11/13/2008 - 11:08 नवीन

असेच म्हणतो...

सर्व फेमस मिपाकर 'दिसती कसे आननी' ही उत्कंठा होतीच लैच भारी झालेला दिसतोय बॉ...:)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 11/13/2008 - 13:20 नवीन

मस्त..

नंदन,वृतांत लय भारी ,कट्टाही जोरदार झालेला दिसतोय.. मजा आली वाचून.. एका दिवशी दोन दोन कट्टे!! स्वाती
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 11/13/2008 - 18:42 नवीन

मस्त

मस्त वृत्तांत नंदनराव (हो, आम्हाला आज वाचायला मिळाला. धन्य तो मिपाचा सेवाप्रदाता). ह्या कट्ट्याच्या आठवणी मनात बरेच दिवस रेंगाळत राहातील.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 11/13/2008 - 19:46 नवीन

पिडा

पिडा काकांनी जबरा पोझ दिली आहे!!! या वृतांता बद्दल नंदन भाऊ आपले आभार !!! :) मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 11/14/2008 - 00:58 नवीन

अत्यंत आभार!

सर्वप्रथम या कट्ट्याला आलेल्या नंदन, मयंक, भाग्यश्री आणि निनाद यांचे मनापासून आभार!! वेळात वेळ काढून कट्ट्याचा वृत्तांत लिहिल्याबद्दल नंदनचे विशेष आभार मानायचे होते, पण तो असा औपचारिकपणा दाखवल्याबद्दल माझ्या कानाखाली आवाज काढेल म्हणून ते करत नाही.... काल प्रतिसाद देण्यासाठी मिपावर येण्याचा (निष्फळ) प्रयत्न केला. साईट ओपनच होईना!! मनात दोन शंका..... १. पाठवलेली बाटली त्या तात्याने ताबडतोबच उघडलेली दिसतेय!! आणि त्या नादात मग सर्व्हरची ऐशी की तैशी केलेली दिसतेय!! २. आपल्या मिपावरच्या काही संगणक अतिविशारदांनी आमचं खातं ब्लॉक केलं की काय? ("कट्टे भरवताय काय साल्यो, बघतोच तुम्हाला!!!") दिवस अतिभयाण गेला. अहो उपक्रम आणि नमोगत व्यवस्थित उघडतायत आणि मिपा मात्र उघडत नाही असं दिसलं की काय काय शंका मनात येतात!!! जगबुडीच की हो ती!! मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ते काही खोटं नाही..... आज आता मिपा उघडलं (अर्थातच ऑफिसातून!!) तेंव्हा कुठे जिवाला बरं वाटलं..... तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून बरं वाटलं..... मिसळीच्या फोटोतल्या मिरच्या भारीच दिसताहेत. मस्त.... बिपिनराव, त्यांना हालापिन्यो (उच्चारी आलापिन्यो) मिरच्या म्हणतात. बिया काढून खाल्या तर एकदम नरम, पण जर चुकुन बी चावली गेलीच तर एकदम आगजाळ!!! मालवणी अघळपघळपणा असणारा पण शिष्टपणा नसणारा , "मध्यरात्री नभघुमटाखाली " दिलखुलास गजाली करणारा, आख्खा बार ओपन करणारा , दिलखुलास गप्पा मारणारा डांबिसखान ! बस्स मुक्तसुनीतराव, भरून पावलो!!! आपल्याला उभ्या आयुष्यात इतका चांगला काँप्लीमेंट कुणी दिला नव्हता!! मिपाकरांनो, आजपासून मुसुराव आमचे जानी दोस्त!! कुणी त्यांच्या खोड्या काढाल तर त्यांच्या विद्वत्ताप्रचुर (मुलुख मैदान) आणि आमच्या शिवराळ (लांडा कसाब) अशा दोन तोफांना तोंड द्यावं लागेल!!!:) बाय द वे, साक्षात येलोनॉटी यांची बोलती बंद करणारे त्यांचे चिरंजीव नव्हते काय ? होते, पण नंदनने त्यांना त्यांच्या आवडीचा फुटबॉल भेट दिल्यामुळे ते आमच्यात दंगा करत नव्हते.... नेहमीप्रमाणेच, पिडा काकांबद्दल मी जसा विचार करत होते.. त्यापेक्षा ते जरा 'भारी" निघाले. मला वाटलं होतं.."बारिक शरिरयष्टी, नाकावर सोनेरी चष्मा आणि डोक्याची अर्धी चांदी झालेली" असे असतील काका. बरं झालं!!! प्राजु, तुला सांगितलं कोणी होतं असल्या येडचाप कल्पना करायला?:) बट काका, यू आर टू यंग!!!!!!!!!! पण तरीही माझे काकाच तुम्ही... होग्गं माझी शाणी शोनी पुतणी ती!!! (इथे एक करकच्चून शाब्दिक गालगुच्चा!!) तुझा मी काकाच बरं!!! पिडाकाकांचा फोन आल्यावर मी त्यांच्याशी बोलले पण त्यांनी ओळखले नाही हो मला. ( मला फोनवर रंगाशेट म्हणाले तेच राहून राहून आठवतयं.). अहो तसं नाही रेवतीताई, मला रंगाने मेसेजमध्ये फक्त फोन नंबर ठेवला, मला वाटलं की तो त्याचा सेल नंबर असेल. फोन रिटर्न केला तर तो तुम्ही उचललात!! आता मला तुमचं आणि या रंग्याचं गोड गुपित काय म्हायती? त्यामुळे थोडासा गोंधळ झाला इतकंच!! तुम्हाला मी रंगा कसं बरं समजीन? (खुद के साथ बातां: त्याचे वेगळे स्वतंत्र उधळलेले गुण रोज दिसतायतच की!!!):) अस्सा गुलाबी रंग चेहेर्‍यावर .(फक्त स्कॉच आणि स्कॉचच) रामदासजी, मात्र तो रंग स्कॉच पिण्यापूर्वीचा आहे हो!! फोटोत बघा, अहो बाटली उघडायची आहे अजून!! ओन्ली शिवास!! (अवांतरः स्कॉच घेतल्यावर पिवळा डांबिस "तांबडा" होतो!!) पिडा म्हणजे अट्टल राजकारणी किंवा साखर कारखान्याचे चेअरमन वाटतात. अनंत जोग पण म्हणता येणार नाही .. डोळे घारे नाहीत. नाय रे बाबा, आमी कसले राजकारणी!! आणि डोळे खरंच घारे नाहीत, हिरवे आहेत... बाय द वे, माझ्या चरणी वाहिलेली शिवास रिगल पावली बर्र का मला! चला तात्या, ते बरं झालं!! मला वाटलं की कस्टम्सवाले उडवतात की काय मधल्यामधे!!! आवशिक खाउ वरान, फ्टकीची मासली खय दिसाक नाय ती जेवनात....! कसलेरे माल्वणी तुम्ही... अरे सगुती तरी बनवायचीत....? अरे तसां नाय, पण मासळी आणल्यावर तेची तिर्फळां घालून लालभडक आमटी करांक नको? आणि मग आमटी तिखट, मिसळ तिखट मगे ह्या पोरांका हगरड लागली नस्ती काय? आणि पुना मासळीबरोबर सोलाची कढी करूचीच लागतां. मग तो बेत श्रीखंडपुरीबरोबर बरो दिसणां नाय.... हो मालवणी कट्टो नाय होतो, मिपाचो कट्टो होतो.... अर्थात् आपण शाकाहारी.. अन् हार्डड्रिंक्सही घेत नाही... जेवणाचा ८०% मेन्यू शाकाहारी होता हां!!!! आणि आणलेली सॉफ्ट ड्रींक्स् कमी पडतील की काय म्हणून काकूने भाग्यश्रीसाठी मुद्दाम पीच ची नॉन अल्कोहोलिक स्पार्कलिंग वाईनही आणली होती. तेंव्हा आमच्या पुढल्या कट्ट्याला निशं:कपणे या, आपली सर्व व्यवस्था करू!!! पिडाकाकांकडे 'बघता' तुझे फोटो साईडने काढायला काहीच हरकत नसावी! हे बघ रंगा, जगणार्‍याने जगत जावे, लोकं फोटो कुठुन काढणार त्याची चिंता करण्यात वेळ घालवू नये!! आपण आपल्या आयुष्यात (आणि संसारात!) जर संतुष्ट असू तर बाकीचे लोक काय म्हणतात याला काय किंमत आहे?:) महात्मा गांधी चिंता करत होते का की कुठल्या ऍन्गलने फोटो काढल्यावर त्यांच्या बरगड्या कमीतकमी दिसतील? त्याचाच व्यत्यास करायचा!!!!:) असो. सर्व मंडळींचे पुन्हा मनःपूर्वक आभार! असाच लोभ ठेवा!! आपला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 11/14/2008 - 09:48 नवीन

अहो उपक्रम

अहो उपक्रम आणि नमोगत व्यवस्थित उघडतायत आणि मिपा मात्र उघडत नाही असं दिसलं की काय काय शंका मनात येतात!!! जगबुडीच की हो ती!! मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात ते काही खोटं नाही..... हा हा हा! खरं आहे रे डांबिसा.. साले हे मनोगती तसेही तांत्रिकदृष्ट्या पुढारलेले आहेत. ते जेव्हा काहितरी तांत्रिक क्लुप्त्या वापरून मिपा साफ बंद पाडतील तेव्हाच सुखाने श्वास घेतील! :) आपला, (डोईजड!) तात्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/14/2008 - 15:15 नवीन

ह्याची

ह्याची काळजी नको तात्या ! निलकांत आहे... व निलकांतचे मित्रमंडळ देखील आहे समाचार घेण्यासाठी ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
भ
भाग्यश्री Fri, 11/14/2008 - 14:15 नवीन

हो, त्या

हो, त्या पीच फ्लेवर्ड वाईनबद्द्ल सांगायचंच राहीलं!! अप्रतिम होती! स्कॉचही असावी... निनाद भलताच खुष झाला कट्ट्याला येऊन.. त्या अर्थी स्कॉच मस्तच असेल.. :) कारण जेवण अप्रतिम होतंच ! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
र
रेवती Fri, 11/14/2008 - 20:46 नवीन

पण तू

कोणते पदार्थ शिकलीस काकूंकडून ते सांग ना. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
भ
भाग्यश्री Fri, 11/14/2008 - 22:46 नवीन

शिकतीय

शिकतीय कसली! आधी गप्पा, आणि नंतर जेवण इतका मस्त प्लॅन असताना तिथून उठून काही शिकून घेणं वगैरे अवघड होतं.. :) आता मात्र काकूंचं शिष्यत्व पत्करायला हवं ! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
अ
अघळ पघळ Sat, 11/15/2008 - 07:56 नवीन

अय्या

अय्या भाग्यश्री, मला किनई वाईन फक्त ग्रेप्सचीच बनवतात असं वाटायचं. ही पिचची वाईन देखिल ट्राय केली पाहिजे हा आता ;) ह घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
अ
अघळ पघळ Sat, 11/15/2008 - 07:54 नवीन

डांबीसाचा

डांबीसाचा फोटू बघून 'अब्दुल खान' हे व्यक्तिचित्र काल्पनीक नसुन खरे आहे ह्याची आता खात्री पटली..पण मग तो सुलेश कोण हो डांबीस काका?;)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 11/15/2008 - 10:22 नवीन

अर्थात!!!

त्यातले अब्दुलखान आणि सुलेश हे दोघेही काल्पनिक आहेत......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अघळ पघळ
प
पिवळा डांबिस Sat, 11/15/2008 - 10:20 नवीन

प्रकाटाआ

अभिप्राय दोन वेळा प्रकाशित झालाय!!१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अघळ पघळ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा