आज सकाळी साळा.
कालच्याला अब्यास न्हौता, लई खेळ्ळो.
तीन पायाच्या शरयतीत नुस्ती पडापड.
तोंडात चम्चा अन चम्च्यात लिंबू ठिवून पळायचीबी येक शरयत.
सोपी नसतीय.
पन माजा पैला नंबर आला.
आज साळंत झेंडा उबारला. समदी झ्याक ‘जनगणमन’ बोल्ली.
कोणकी आजीबाई आलत्या, तेंनी कायबाय सांगितलं.
समजलं नाय काय मला, तरीबी म्या टाळया वाजिवल्या.
मंग बक्शीसं दिली. अंक्याला लब्बर, भान्याला पटटी.
गुर्जीन्नी मला बोलिवलं. म्या आज्जीबाईच्या जवळ ग्येली.
त्या म्हन्ल्या, “बाळ, तुला मोठेपणी काय व्हायचं आहे?”
“शरयतवाली” म्या बोल्ली.
त्या हसल्या.
म्हन्ल्या, “आमचीही शर्यतच चालू आहे कधीपासून. सगळया मुलामुलींना शिकता यावं ही शर्यत.”
म्हन्जे समदे नाय शिकले, तर आज्जीबाई शरयत हरणार?
औघड हाये.
* शतशब्दकथा
वाचने
15269
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली !!
मस्त कथा
ये ब्बात. नेहमीप्रमाणेच.
आवडली.
आंजी आवडलीच.
एकदम झकास.
+++१११
In reply to एकदम झकास. by सौन्दर्य
शरयत-शरियत!
+१ मीही क्षणभर "शरियत" असं
In reply to शरयत-शरियत! by एस
+२
In reply to +१ मीही क्षणभर "शरियत" असं by आदूबाळ
ंमी पण..
In reply to +२ by बॅटमॅन
.
(No subject)
आवडल..
कडक
आवडली कथा.
आवडली
आवडलं.
आवडली
कथा आवडली
आंजी रॉक्स
मस्तच!
आवडलं
आवडली कथा.
एकच म्हणेन "हार्ड हीटिंग"
आहा!
आंजी आणि आज्जी दोन्हीही खासच.
+१
एक सूचना
मस्त
शरयत वाचून कंन्फ्युज झालो,
कथा आवडली, रच्याकने बर्याच
वॉव..
लई ब्येस !
सर्वांचे आभार.