✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खाद्यभ्रमंती - पुणे

न
नांदेडीअन यांनी
गुरुवार, 01/22/2015 - 11:16  ·  लेख
लेख
खाण्या-पिण्यासाठीच्या पुण्यातल्या चांगल्या जागांचा एक नवीन डेटाबेस तयार करायचा का ? बादशाही, श्रेयस, पीके, गुडलक, वैशाली या हॉटेल्सची महती एव्हाना पुण्याच्या बाहेरसुद्धा पोहोचली असेल. थोडा वेळ काढून काही नवीन हॉटेल्सची नावं सांगा, जेणेकरून माझ्यासारख्या खादाडांना खाद्यभ्रमंती करता येईल. चला, सुरूवात मीच करतो. - चांदणी चौक (बावधन) जवळचे ’टेस्टी टंग्स’ चाटसाठी चांगले आहे.

- औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.

- कर्वे नगरच्या स्पेन्सर चौकात महिन्याभरापूर्वी ’ममता डायनिंग हॉल’ सुरू झाला आहे. कमी पैशात फार चांगली थाळी मिळते इथे.

- कर्वेनगरलाच आंबेडकर चौकाजवळ ’कॅफे स्क्वेअर’ नावाचे एक छोटेसे चायनिज हॉटेल आहे. इथले चायनिज पदार्थ इतरत्र मिळतात तसेच आहेत, पण इथली शेजवान चटनी मला खूप आवडते.

- विमान नगरच्या दत्त मंदिर चौकाजवळ ’लझीझ’ नावाचे एक हैद्राबादी हॉटेल आहे. इथली चिकन बिर्याणी पुण्यातल्या सर्वोत्तम चिकन बिर्याणींपैकी एक आहे. ’कुबानी का मिठा’ ही स्वीट डिशसुद्धा मस्तच !

वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
124207 वाचन

💬 प्रतिसाद (251)

प्रतिक्रिया

असे ह्यांचे मत.

सूड
गुरुवार, 01/22/2015 - 14:56 नवीन
असे ह्यांचे मत.
ह्यांचे म्हणजे कोणाकोणाचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

ते

नाखु
Fri, 01/23/2015 - 10:33 नवीन
आदरार्थी "एकवचन" असावे. तुम्हाला अपेक्षीत "बहुवचन" नसावे !! खरे खोटे नानां ची माई (माईंचे नाना) जाणे. ग्रेट्थिंकर्नी यावर प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

माझ्याकडे बर्‍याच फोटो आहेत,

नांदेडीअन
गुरुवार, 01/22/2015 - 13:17 नवीन
माझ्याकडे बर्‍याच फोटो आहेत, पण त्या जागा बहुतांशी लोकांना माहित आहेत. नवीन माहिती मिळावी या उद्देशानेच खूप पॉप्युलर असणार्‍या जागांबद्दल लिहिले नाही.
  • Log in or register to post comments

bounty sizzlers कल्याणीनगर,

सौंदाळा
गुरुवार, 01/22/2015 - 13:49 नवीन
bounty sizzlers कल्याणीनगर, पुणे. अप्रतिम शाकाहारी आणि मांसाहारी सिझलर्स मिळतात. सोबतीला चालत असेल तर थंडगार बिअर. कसे जावे: पुणे नगर रस्त्यावर रामवाडी जकात नाक्यच्या चौकातुन उजवीकडे वळावे. बिशप स्कुलची इमारत गेली की पुढच्या बाजुला उजव्या हाताला छोट्याशा रस्त्यावर वळालात की लगेच दिसेल. पोलीस ग्राउंड नंतर लगेच दिसणारे फर्र्ग्युसन रस्त्यावरील याना सिझलर्स देखिल चांगले आहे असे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments

याना सिडलर्स चा चिझ गार्लीक

उदय के'सागर
गुरुवार, 01/22/2015 - 14:18 नवीन
याना सिडलर्स चा चिझ गार्लीक ब्रेड जरुर जरुर ट्राय करावा, अतिउत्तम. बाकी बांउटी सिझलर्स बद्दल सहमत. अगदी आँथेटीक सिझलर्स खायचे असतील तर बाँटी इज अ बेस्ट प्लेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

bounty sizzlers

कपिलमुनी
गुरुवार, 01/22/2015 - 14:39 नवीन
+११११ अप्रतिम चवीचे सिझलर्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

बाऊंटी बद्दल आमच्या घरातल्या

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/23/2015 - 18:00 नवीन
बाऊंटी बद्दल आमच्या घरातल्या सिझलरप्रेमी मंडळींचे मत काही चांगले नाही. पुण्यात "ऑथेंटिक सिझलर्स" काही दशकांपासून फक्त कँपातील वेस्ट एंड थिएटर जवळच्या "द प्लेस" (The Place - Touche The Sizzler) मध्ये मिळतात. कल्याणीनगरमधल्या मारीप्लेक्स मॉल्मध्ये एक सिझलर जॉईंट आहे (नाव विसरलो)... चव चांगली असली तरी ते ऑथेंटिक म्हणता येणार नाही. सॉसेस भारतीय जिभेला आवडतील अशी तिखट आहेत... माझ्या मते जरा जास्तच. पण आमच्या काही नातेवाईकांना ती फार आवडली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

योको सिझलर्स?

अनुप ढेरे
Fri, 01/23/2015 - 18:34 नवीन
योको सिझलर्स?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

"द प्लेस" (The Place - Touche

आदूबाळ
Fri, 01/23/2015 - 23:15 नवीन
"द प्लेस" (The Place - Touche The Sizzler) मध्ये मिळतात.
ये ब्बात एक्काकाका - हेच लिहायला आलो होतो. भरपूर भूक ठेवून जाणे - द प्लेसचे सिझलर्स बरेच मोठे असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

कल्याणीनगरमधल्या मारीप्लेक्स

पिलीयन रायडर
Sat, 01/31/2015 - 23:46 नवीन
कल्याणीनगरमधल्या मारीप्लेक्स मॉल्मध्ये एक सिझलर जॉईंट आहे "याना" सिझलर्स... चांगले आहेत इथले सिझलर्स.. एफ.सी रोडवर पण एक शाखा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

याना

मनिमौ
गुरुवार, 01/22/2015 - 14:08 नवीन
अप्रतिम . विमान नगर मधे nyati मिलेनियम मधे एक रोल चे दा दुकान आहे. छान चव आहे.relax पावभाजी सहकार नगर
  • Log in or register to post comments

माझ्या माहितीतील काही ठिकाणं

उदय के'सागर
गुरुवार, 01/22/2015 - 14:26 नवीन
माझ्या माहितीतील काही ठिकाणं : १. बाणेर भागातल्या हॉटेल्स बद्दल फार माहिती नसल्यास, तिथे 'वे डाऊन साऊथ' नावाचं फाईन-डाईन रेस्टॉरंट आहे. असंख्य प्रकारचे डोसे/उत्तपे. खूप छान चव, मात्र फार महाग. २. बाणेर-पाषाण रस्त्यावर सॅफरन नावाचे रेस्टॉरंट आहे, सी-फूड उत्तम. ३. एम.जी. रोडवरील 'मार्झो-ओ-रीन' मधे चवदार सँडवीच मिळतात. आणि होममेड टाईप पिझ्झाज्/बर्गर ही मस्त असतात.
  • Log in or register to post comments

३. एम.जी. रोडवरील 'मार्झो-ओ

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/23/2015 - 18:04 नवीन
३. एम.जी. रोडवरील 'मार्झो-ओ-रीन' मधे चवदार सँडवीच मिळतात. आणि होममेड टाईप पिझ्झाज्/बर्गर ही मस्त असतात. हे पुणे खाद्यसंस्कृतीतील एक अग्रगण्य प्राचीन पण अजूनही टिकून असलेले ठिकाण आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय के'सागर

पुण्यात शिकत असताना (१९९६-९८)

बोका-ए-आझम
गुरुवार, 01/22/2015 - 15:00 नवीन
पुण्यात शिकत असताना (१९९६-९८) च्या सुमारास डेक्कनवरच्या जनसेवा मध्ये बरेचदा गेलोय. मस्त होतं. बाकी एम.जी. रोडवरच्या मार्झोरिनचे चिकन सँडविच आणि शेक्स लाजवाब! दोराबजीची बिर्याणीही सुपर्ब!
  • Log in or register to post comments

छान धागा आहे. साधारणतः चांगला

माहितगार
गुरुवार, 01/22/2015 - 15:17 नवीन
छान धागा आहे. साधारणतः चांगला अँबीयन्स हायर-मीडल बगेट रेंज १२ -१४ जणांना डिनरपार्टीसाठी रेस्टॉरण्ट्सची माहिती हवी आहे. प्रिफरेबली गार्डन रेस्टॉरण्ट. (मुख्य म्हणजे आसनव्यवस्था कंजस्टेड (अगदी पाठीला पाठ टेकुन) नसावी.)
  • Log in or register to post comments

साधारण कुठल्या भागात करायची

मृत्युन्जय
गुरुवार, 01/22/2015 - 16:13 नवीन
साधारण कुठल्या भागात करायची आहे पार्टी? शाकाहारी की मिश्राहारी, कॉकटेल्स हवेत की नकोत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/22/2015 - 15:28 नवीन
औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.
आवो...डिटेलमदी पत्ता द्या..! आजच जाऊण खान्याची परचंड मंजी परचंड विच्छा व्हायलिया!
  • Log in or register to post comments

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/22/2015 - 16:05 नवीन
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआअ Image removed. घावलं...घावलं! झुम्याटूवर घावलं, Image removed. पावलं पावलं,..आमाला विनटरन्येट पावलं! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

खिडकी वडा

सिरुसेरि
गुरुवार, 01/22/2015 - 15:44 नवीन
पटवर्धन बागेजवळचा खिडकी वडा प्रसिदध आहे .
  • Log in or register to post comments

पण पुण्याचीच का?

दिपक.कुवेत
गुरुवार, 01/22/2015 - 17:29 नवीन
चला पळा आता.....
  • Log in or register to post comments

पळतो कशाला?

पैसा
गुरुवार, 01/22/2015 - 19:22 नवीन
भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! लढ बाप्पू! अवांतरः धागा आणि फोटो खासच आहेत! मृत्युंजय ची पुण्याबद्दलची माहिती बघून अवाक्!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

मृत्युंजय ची पुण्याबद्दलची माहिती बघून अवाक्!

मुक्त विहारि
Fri, 01/23/2015 - 01:42 नवीन
+१११११११११११११११११११११११११११११११ सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

Ajun yeudya list. Mhanje ek

अभिजीत अवलिया
Fri, 01/23/2015 - 10:01 नवीन
Ajun yeudya list. Mhanje ek ek karun sarv thikani jaata yeil. (Plz kunitari saang na ithe Marathi madhe kase type karayche)
  • Log in or register to post comments

http://www.misalpav.com/node

मोहनराव
Fri, 01/23/2015 - 17:32 नवीन
http://www.misalpav.com/node/1312
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

निदान सहीला तरी जागलं पाहिजे

५० फक्त
Fri, 01/23/2015 - 22:44 नवीन
निदान सहीला तरी जागलं पाहिजे .... १ कोथरूड बसस्टँड जवळाचं एशियन मेलॅज अतिशय चांगलं हॉटेल आहे, वातावरण, चव, सर्विस एकदम मस्त. इथं व्हेज प्लॅटर + हॉट सिझलर ब्राउनी एकदम सही प्रकार आहे. २. गणेश पेठ गुरुद्वारासमोरचं उत्तम, नावाप्रमाणेच उत्तम आहे. बुंदीचे लाडु आणि गरमगरम गुलाबजामुन अगदी एक नंबर तसंच खास पंजाबी डोडा नावाची मिठाई इथं मिळते, ते सुद्धा एक नंबर. (मिठाईचं दुकान आहे) ३. द्रविड बरिस्ता ढोले पाटील रोड - टाळणेबल आहे - सर्विस फारच अपरिपक्व आहे, तुम्ही काय ऑर्डर दिलि आहे हे सुद्धा लक्षात ठेवत नाहीत, तुम्हालाच येउन विचारतात काय ऑर्डर होती ते. ४. विश्रांतवाडीच्या एमेसीबी ऑफिससमोर दिल्ली चाट पराठा हाउस आहे, अगदी स्वस्त आणि मस्त पराठे आणि समोसे. ५. कर्वेनगरच्या काकडे सिटि शॉपिंग सेंटर मधल्या फुलांच्या / पुजा सामानाच्या दुकानाच्या समोर एक पाणिपुरीवाल्या काकु असतात, जबरदस्त पाणिपुरी असते त्यांच्याकडे. ६. पुणे स्टेशन समोरच्या शिवकैलास मधली कुल्फी+बासुंदी हा एक जीवघेणा प्रकार आहे, कॅम्पातल्या द प्लेस मध्ये सिझलर खाउन चालत चालत इथं यायचं अन एक कुल्फि +बासुंदी खायची लई भारी. ७. मंडई गणपती जिथं वर्षभर असतो तिथं समोरचे सातपुते बासुंदीवाले, कोंळ्शाच्या शेगडीवर केलेली गरम बासुंदी, फक्त इथं आधी ऑर्डर द्यावी लागते आणि आपला डबा घेउन जावा लागतो, पण चव एकदम जबराट, फक्त दुध आणि साखरेची बासुंदी, एक नंबर प्रकार आहे हा. ८. गणेशखिंड एमेसेबी ऑफिस जवळची बंगाली हॉटेलं कुठं गेली कुणाला माहित आहे का ते सांगा, अगदी उत्तम बंगाली जेवण अतिशय स्वस्तात मिळायचं तिथं. ९. रास्ता पेठ एमेसेबी ऑफिसचं कँटिन हा एक स्वस्त आणि पोटभर खाण्याचा चांगला पर्याय आहे, १५/- मध्ये अंडा करी बाहेर कुठंही मिळत नसेल बहुधा. असो, अजुन सांगेनच, आणि हो या सर्व ठिकाणी एकापेक्षा जास्त वेळा जाउन अनुभव घेउन हे लिहिलेलं आहे.
  • Log in or register to post comments

तो बटाटेवडा कुठला होता हो?

यसवायजी
Sun, 01/25/2015 - 12:09 नवीन
तो बटाटेवडा कुठला होता हो? पत्ता परत एकदा सांगा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

नवी पेठ विठ्ठल मंदिर

५० फक्त
Sun, 01/25/2015 - 19:25 नवीन
अरे होत तो एक राहिलाच, दुर्वांकुरच्या समोरचा बोळ, म्हणजे दुर्वाकुरच्या दारात अलका कडं तोंड करुन उभं राहिलं की डाव्या हाताचा बोळ, त्याच बोळात नवी पेठ विठ्ठल मंदिर आहे पुढं गेल्यावर. अजुन एक, गांधी लॉन्स च्या लायनीत म्हणजे कोथरुड आय्सिआय्सिआय्च्या समोर एक काळुबाई गार्डन वडापाव नावाचं दुकान आहे, अगदी खास मराठी वडे असतात त्याच्याकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

@त्याच बोळात नवी पेठ विठ्ठल

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/28/2015 - 07:32 नवीन
@त्याच बोळात नवी पेठ विठ्ठल मंदिर आहे पुढं गेल्यावर. >>> अहो पचास...तो आमच्या नवि पेठेतला आण्णा'चा वडापाव! लै मंजी लै जबराट चव. शाळेत असताना, तो ७५पैशाचा १ वडापाव मंजी फायश्टार हाटीलातल्या पार्टीसारका वाटायचा. एकावेळी ६/७ तरी सहज खायचो तेंव्हा.. पण फुडं अण्णा गेला..आता म्हणे त्येचा कोनतरी रिलेटीव्ह चालिवतो ति गाडी..चव अजुनंही बर्‍यापैकि तीच आहे.. कदाचित दिवंगत अण्णाचा फोटू दिसतो गाडीवर लावलेला,म्हणून वाटत असेल..पण बरं आहे अजून. आणि त्याची एक्झॅट खूण मंजी नवी पेठ विठ्ठल मंदिरा अलिकडं,जनता दूधगृह(थोटे यांचे. ;) ) समोर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

+१

विंजिनेर
Wed, 01/28/2015 - 12:28 नवीन
काय तो वडापाव. वा वा.. जुन्या आठवणी जागवल्या राव! आम्ही पण शाळेतून येताना खायचो.. पुढे, काही वर्षांनी, जगातील पर्फेक्ट वडापावाचा शोध लागला - जुन्या बेडेकर मिसळ/साठे गादी कारखान्यासमोरच्या वडाखाली, नारायणपेठेत तो वडापाव मिळतो. अजूनही,फक्त संध्याकाळी ३तास असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

जुन्या बेडेकर मिसळ

मृत्युन्जय
Wed, 01/28/2015 - 13:25 नवीन
जुन्या बेडेकर मिसळ म्हणजे नक्की कुठे? एकदा खाइन म्हणतो. सध्या तरी मी गार्डन आणि शिवदीपच्या प्रेमात आहे. गोखले (अण्णा) आणि भोला देखील सुंदरच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

@म्हणजे नक्की कुठे? एकदा खाइन

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/28/2015 - 19:39 नवीन
@म्हणजे नक्की कुठे? एकदा खाइन म्हणतो.>>> +++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

बासुंदीची ठिकाणं बद्दल आभारी.

कंजूस
Sat, 01/24/2015 - 04:32 नवीन
बासुंदीची ठिकाणं बद्दल आभारी. 'सिरवि'ची खाल्ली आहे फक्त एक विचारायचे आहे ."दुध आणि साखरेची बासुंदी" म्हणजे काय? बासुंदीत साखर घालावी लागते?
  • Log in or register to post comments

क्या बात है, पुणे तिथे काय

अमोल केळकर
Sat, 01/24/2015 - 10:41 नवीन
क्या बात है, पुणे तिथे काय उणे ? धन्यवाद अमोल केळकर
  • Log in or register to post comments

कुमार परिसर कोथरूड मधील

Maharani
Sat, 01/24/2015 - 14:45 नवीन
कुमार परिसर कोथरूड मधील मेट्रोमिक्स छोटेसे आहे पण काही पदार्थ मस्त असतात...त्यांचे रोस्टेड कॉर्न अँड गार्लिक सूप,चॉको मिंट मुस मस्ट ट्राय औंध नागरस रोड ला पवार मावशींची हातगाड़ी आहे...त्यांचा वडापाव खुप मस्त असतो...पण फ़क्त सकाळी ... सहकार नगर - रिलॅक्स पावभाजी..अप्रतिम... शिवाजी पुतल्याजवक कोथरूड ला खत्री आइसक्रीम ....त्यांचे गुलकंद तसेच उन्हाळ्यात मैंगो आइसक्रीम मस्ट ट्राय.. कोथरूड यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ डीपी रोड ला बधाई स्वीट्स मधली पानीपुरी अप्रतिम.... अजूनही बरेच आहेत..आठवेल तसे लिहीन..
  • Log in or register to post comments

कोथरूड यशवंतराव चव्हाण

नांदेडीअन
गुरुवार, 03/12/2015 - 22:25 नवीन
कोथरूड यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ डीपी रोड ला बधाई स्वीट्स मधली पानीपुरी अप्रतिम....
तुम्ही नाट्यगृहाजवळ म्हणालात म्हणून मी १५-२० मिनिटे नाट्यगृहाजवळच शोधत होतो. शेवटी थकून एका ऑटोवाल्याला विचारले तेव्हा नेमका पत्ता कळाला. बरोबर १ किलोमिटर पुढे आहे नाट्यगृहाच्या. असो, पाणीपुरी मस्तच आहे ! वारंवार जाणे होईल आता इथे. धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Maharani

अहो नाट्यगृह ही ठळक खुण झाली.

Maharani
Tue, 03/17/2015 - 18:22 नवीन
अहो नाट्यगृह ही ठळक खुण झाली..DP रोड लिहिले आहे ना.. पण पाणी पूरी आवडली ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन

पूर्णानगर, चिंचवड

विनटूविन
Sat, 01/24/2015 - 16:34 नवीन
पापाजीज: अगदी साधे पण चवीचे जेवण, तंदूर स्पेशालिस्ट, मकईकी रोटी, सरसोदा साग भन्नाट होते. लसूनी टिक्का पण मस्त होता.
  • Log in or register to post comments

पापाजीज:

मुक्त विहारि
Sun, 01/25/2015 - 06:02 नवीन
म्हणजे नक्की कुठे? कात्रज की हडपसर की लोणावळा की शिरुर? आजकाल पुण्याची व्याप्ती फार वाढत असल्याने, पुढे मागे शिरूर पण पुण्यात सामील व्हायची शक्यता नाकारता येत नाही. पुण्या बाबतीत फार अनभिज्ञ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनटूविन

म्हणजे नक्की कुठे?

विलासराव
Sun, 01/25/2015 - 14:00 नवीन
म्हणजे नक्की कुठे? पूर्णानगर, चिंचवड. लिहीलय त्यांनी मुवी. कात्रज की हडपसर की लोणावळा की शिरुर? आजकाल पुण्याची व्याप्ती फार वाढत असल्याने, पुढे मागे शिरूर पण पुण्यात सामील व्हायची शक्यता नाकारता येत नाही. मुवींना पार्टी असं झालं तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

papaji @ Chinchwad

गुळाचा गणपती
Sun, 01/25/2015 - 11:35 नवीन
https://www.zomato.com/pune/papajees-chinchwad
  • Log in or register to post comments

शाहजि पराथा लक्ष्मि रोड्वर कुथे?

palambar
Sun, 01/25/2015 - 23:26 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

शाहजि पराथा

अभिदेश
Mon, 01/26/2015 - 00:31 नवीन
।हे सोन्या मारुति चौका जवळ आहे.
  • Log in or register to post comments

आवडीचा विषय आणि मस्त मस्त

स्रुजा
Wed, 01/28/2015 - 03:23 नवीन
आवडीचा विषय आणि मस्त मस्त प्रतिसद. खास करून मृत्युंजय आणि ५० फक्त यांना मनापासून दाद ! थोडा माझा खारीचा वाटा : १. श्रीजी ची कुल्फी आणि पान मसाला आईस क्रीम उत्तम २. अप अन अबुव्ह फारसं खास राहिलेलं नाही आता पण बाहेरचा पान वाला झकास पान बनवून देतो . मला अनुभव मिठा मसाला पानाचा फक्त . ३. शीतल मध्ये कर्वे पुतळ्याजवळ छान साउथ इंडिअन आणि फार च छान पाव भाजी मिळते . बाहेरचा पान वाला पण मस्त पान बनव्तो. ४. तुळशीबागेत अगत्य (अगत्य च न? , हो बहुदा ) आहे आत , तिथे पाव भाजी अप्रतिम . तुळशी बागेत जाऊन पाव भाजी न खाता येणे हा दखल पा त्र गुन्हा आहे . ५. एशिअन मिलांज चे चायनिस आणि स्टार्टर्स मस्त . ६. इ स्क्वेअर च्या वर एक ऑल स्टर फ्राय आहे , तिथले वोक अप्रतिम आणि बाकीचं जेवण ही अगदी लक्षात राहण्याजोगं . किंमत पण लक्षात राहते पण ठीक आहे फार महाग नाहीये . आतला अम्बियांस तर फार च सुन्दर. दुपारच्या वेळी एखादे वेळेस गेलं की आतल्या झुळझुळीत वातावरणात सगळा शीण जातो पळून . ७. तिथेच नॉट जस्ट जाझ बाय द बे आहे. तिथला लंच बुफ्फे अत्यंत आवडता प्रकार. संध्याकाळी गेलात तर मस्त लाइव मुझिक चालू असतं , आवडत्या माणसाबरोबर संध्याकाळ अगदी मनासारखी जाते . ८. म्यारीऑट चा स्पैस किचन चा बुफ़ॆ पण सगळी हौस भागवतो . आता काही तरी १००० रुपये आहे म्हणे पण पैसा वसूल . ९. शिवसागर औंध मधलं आणि जंगली महाराज रोड वरचं : नाचोज , पाव भाजी (जगातली सगळी कडची पाव भाजी खावून यायचं स्वप्न होतं एके काळी माझं, असो … ) आणि एस पी डी पी म्हणजे फ़ुल्ल ऑन . १०. कोपा कबाना मध्ये जे काही २-३ वेळा खाल्लं , सगळं भावलं . हे वाकड च्या जवळ आहे . ११. पोलका डॉट्स औंध आणि नगर रोड दोन्ही कडे थाई फूड मस्त म्हणजे अगदी मस्त च . बाकी पण चांगलं मिळत असेल पण आम्ही थाई ला इतके चटावलो होतो की दुसरं काही मागवयाचोच नाही. १२. त्रीकायाची आठवण कुणी तरी काढलीच आहे तर वेज लोकांसाठी त्यांचा जस्मिन राइस आणि ग्रीन थाई करी एकदा तरी खाच . १३. गुड लक ला विसरून कसं चालेल ? त्यांचा बन मस्का , स्क्र्याम्बल्ड एग आणि चिकन बद्दल मी पामराने काय बोलावं ? १४. थोडं डेक्कन चौकातून पुढे जाऊन एफ सी रोड वर चैतन्याचा पराठा पण छान मिळतो . कॉलेज मध्ये परवडणाऱ्या आणि आवडणाऱ्या दोन्ही यादींमध्ये फार थोडी ठिकाणं होती , चैतन्य पहिल्या नंबर वर विराजमान होतं बराच वेळ . १५. कोरेगाव पार्कात प्रेम'स मध्ये छान अड्डा नाही तर डेट दोन्ही साठी मस्त जागा , त्यांचं जेवण पण छान , खूप खाल्लंय इथलं पण , सगळं आवडलेलं आहे . १६. काटा किर्र ची मिसळ किती हि मोठी रांग असली तरी एखाद्या खावीच , मग आयुष्य बदलून जातं . १७ . पुरेपूर कोल्हापूर : नावात च सगळं महात्म्य आलं . मात्र कोल्हापुरी सोडून फार काही भानगडीत पडू नका . मिसळ आणि अस्सल कोल्हापुरी मात्र बोटे अक्षरशः तोंडात घालायला लावणारी चव . एरंडवण्यात सगळं जेवण मिळतं आणि कर्वे नगर मध्ये फक्त मिसळ (की उलटं ??) असं आहे मात्र . १८. राम कृष्ण क्याम्प मधलं थाळी साठी प्रसिद्ध आहे , आणि ते प्रसिद्धी ला जागतं . १९.एफ सी च्या वाडेश्वर ची मोहीम हाती घ्यावी आणि नियमित पणे हजेरी लावून सगळे पदार्थ निदान एकदा खाल्ल्याचं पुण्य पदरात पाडून घ्यावं . २०. कल्याणी नगर, बालगंधर्व च्या समोर दोन्ही ठिकाणी राजधानी आहे . इथे जाऊन किंवा पार्सल पण थाळी मस्त मिळते . एका कुठल्या तरी छोट्या समारंभाला जेंव्हा केटरर इतक्या कमी (२०) लोकांसाठी तयार होईना तेंव्हा इथून आम्ही मिनी थाळी आणली होती आणि बेत मस्त झाला होता. २१. एफ सी वर च हॉर्न ओके प्लीज मध्ये एक रस्टिक फील आहे , जेवण पण छान २२. एरंड वण्यात च अभिषेक आहे शुद्ध शाकाहारी , इथे पण डोळे झाकून मेनू वर बोट ठेवावं आणि तृप्त व्हावं . २३. वाह मराठी मगर पट्ट्याचं पण छान आहे म्हणे , आम्ही गेलो नाही पण आई बाबांनी पसंती कळवली आहे . २४. मेनल्यांड चायना मध्ये पैसे आणि वेळ खर्च करायची तयारी ठेवून जावं पण एक सुंदर अनुभव गाठीशी राहणार याची खात्री . २५. शबरी (तुकाराम की ज्ञानेश्वर ? पादुका चौकात ) ची मराठी थाळी पण मस्त . २६. म्हात्रे पुलाजवळ निसर्ग चं सी फूड आणि सोलकढी एक नंबर . २७. नगर रोड जवळ कल्याणी वेज आहे , तिथलं पंजाबी आणि सौथ इंडिअन दोन्ही छान . २८ . कोथरूड लाच हल्ली क्रस्टीज सुरु झालाय साधारण वर्ष दीड वर्षापूर्वी , तिथे पण व्हरायटी मेनू आहे , चवीत फेरबदल म्हणून खास आवडला . २९ . लक्ष्मी रोड जवळ चं भागात ताराचंद जिता जागता चमत्कार आहे , तो याची देही एकदा अनुभवावाच . ३०. कोंढवा भागात देव अंकल'स किचन आहे , देव अंकल गेले दीड एक वर्षांपूर्वी पण त्यांचं आतिथ्य आणि त्याहून लाजवाब जेवण यांची चव अजून रेंगाळते आहे . ते गेले असले तरी एकदा जाउन याच . ३१. बाणेर चं भैरवी आणि शाकाहारी ग्रीन पार्क पण इकडच्या पब्लिक साठी सही ठिकाणं . बास करते आता तुम्हाला वाटेल मी घरी कधी जेवलेच नाही . वि. सू . : हे सगळे अनुभव साधारण १ -२ वर्षापूर्वीचे आहेत पण अनेक वेळा जाऊन चवीत कधी बदल झाला नाही अशीच ठिकाणं सुचवली आहेत . कुणी गेलं तर निराशा व्हायची शक्यता कमी आहे . एखाद दुसरं ठिकाण वरच्या यादीत आलं असेल तर माझा अति उत्साह समजून सांभाळून घ्या . सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना च जवळपास ही ठिकाणं माहिती असतील , मी या निमित्ताने एकदा फिरून आले ,आणि हो धागा एकत्र यादी करायची म्हणून काढलाय अशी माझी समजूत असल्याने थोडी फार माहिती असलेली ठिकाणं पण टाकलेच .
  • Log in or register to post comments

बाबौ! यातलं एकही ठिकाण यावेळी

रेवती
Wed, 01/28/2015 - 04:38 नवीन
बाबौ! यातलं एकही ठिकाण यावेळी ट्रायता आलं नाही. फारसं कुठं खाऊच शकले नाही. तुझी यादी मात्र चांगली आहे. हा धागा वाखू म्हणून साठवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

बास करते आता तुम्हाला वाटेल

असंका
गुरुवार, 01/29/2015 - 15:52 नवीन
बास करते आता तुम्हाला वाटेल मी घरी कधी जेवलेच नाही .
बरोबर!! अगदी वाटायलाच लागलं होतं, फक्त शब्द सापडत नव्ह्ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

कॉलेज आणि नोकरी चा काळ धरून

स्रुजा
Fri, 01/30/2015 - 00:42 नवीन
*biggrin* :-D :D +D =D :biggrin: कॉलेज आणि नोकरी चा काळ धरून केली आहे हो एवढी खादाडी. रेवाक्का , नक्की जा आणि कर च ट्राय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

शीतल : फार च छान पाव भाजी

मृत्युन्जय
गुरुवार, 01/29/2015 - 16:07 नवीन
शीतल : फार च छान पाव भाजी मिळते तिथे तुम्ही शेवटची पाव भाजी खाउन बराच काळ लोटला असावा. माझा असा समज होता की दाल फ्राय आणि पाव भाजी जगातला कुठलाही आचारी चुकवु शकत नाही. शीतलने माझा तो भ्रम मागच्याच आठवड्यात मोडला. अन्नाला नावे ठेववत नाही पण इतकी भिकार पावभाजी मी जन्मात खाल्ली नव्हती. पानात घेतलेली संपवली इतकेच. रंग, वास, चव या सगळ्याच गोष्टींचा अभाव होता. पुढच्यावेळेसपासुन मी एकवेळ झाडावरचा पाला ओरबाडुन पावा बरोबर खाइन पण शीतलची पावभाजी खाणार नाही. शीतलची इडली मात्र सुंदर असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

अरे अरे ! एक ठिकाण हुकलं

स्रुजा
Fri, 01/30/2015 - 00:45 नवीन
अरे अरे ! एक ठिकाण हुकलं म्हणायचं पाभा साठी. माझी शेवटची शीतल वारी २-२.५ वर्षांपूर्वी झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तेरी राजपूत डीअरी

अर्धवटराव
Wed, 01/28/2015 - 04:32 नवीन
नॉर्थ मेन रोड कोरेगावपार्क. आता आहे का माहित नाहि, पण तिथले पराठे आणि समोसे लाजवाब.
  • Log in or register to post comments

खेड शिवापूर पुण्याच्या कक्षेत

गवि
Wed, 01/28/2015 - 13:50 नवीन
खेड शिवापूर पुण्याच्या कक्षेत येईल का? तिथे हजारो हॉटेल्स आहेत आणि सगळीच "गावरान","चुलीवरची","साजुक तुपातले मटणवाली","मटक्यात शिजवलेल्या स्वैपाकाची" वगैरे. चाळीसपन्नासवेळा तिथून जातानापैकी पंधरावीसवेळा वेगवेगळी हाटेले ट्राय केली अन वनपत्रेपासून सर्वांकडे चवीबाबत निराशा झाली. नुकतंच एक जगदंबा म्हणून हाटेल मात्र झ्याक लागलं. हे "जगन्नाथ भेळ"च्या शेजारी, मागच्या बाजूला आहे. मटणरस्सा झणझणीत अन तृप्त करणारा. सोबत ज्वारी अन बाजरीची चक्क घरच्यासारखी खुसखुशीत भाकरी विथ तूपवाटी, खर्डा, सुके मटण आणि शेवटी इंद्रायणी भात म्हणजे याच भागात उगवणार्‍या तांदळाचा काहीसा चिकट अन मऊ भात.. हा तर अफलातूनच.. शिवाय इथलं पिठलं म्हणजे स्वर्गीयच.. एकदम रेकमेंडेड ठिकाण.. एरवी गावरान घरगुती वगैरे असे काही असले की ते माझ्या स्पेशल आवडीच्या लिस्टवर नसते.. कधीकधी इतका वीट येतो पाट्या बघून की मला कोणीतरी "शहररान, बाजारु, हॉटेलगुती" जेवण द्याल का ? असे विचारावेसे वाटते. पण या हॉटेलने सुखद अनुभव दिला.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा