Skip to main content

खाद्यभ्रमंती - पुणे

लेखक नांदेडीअन यांनी गुरुवार, 22/01/2015 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
खाण्या-पिण्यासाठीच्या पुण्यातल्या चांगल्या जागांचा एक नवीन डेटाबेस तयार करायचा का ? बादशाही, श्रेयस, पीके, गुडलक, वैशाली या हॉटेल्सची महती एव्हाना पुण्याच्या बाहेरसुद्धा पोहोचली असेल. थोडा वेळ काढून काही नवीन हॉटेल्सची नावं सांगा, जेणेकरून माझ्यासारख्या खादाडांना खाद्यभ्रमंती करता येईल. चला, सुरूवात मीच करतो. - चांदणी चौक (बावधन) जवळचे ’टेस्टी टंग्स’ चाटसाठी चांगले आहे.

- औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.

- कर्वे नगरच्या स्पेन्सर चौकात महिन्याभरापूर्वी ’ममता डायनिंग हॉल’ सुरू झाला आहे. कमी पैशात फार चांगली थाळी मिळते इथे.

- कर्वेनगरलाच आंबेडकर चौकाजवळ ’कॅफे स्क्वेअर’ नावाचे एक छोटेसे चायनिज हॉटेल आहे. इथले चायनिज पदार्थ इतरत्र मिळतात तसेच आहेत, पण इथली शेजवान चटनी मला खूप आवडते.

- विमान नगरच्या दत्त मंदिर चौकाजवळ ’लझीझ’ नावाचे एक हैद्राबादी हॉटेल आहे. इथली चिकन बिर्याणी पुण्यातल्या सर्वोत्तम चिकन बिर्याणींपैकी एक आहे. ’कुबानी का मिठा’ ही स्वीट डिशसुद्धा मस्तच !


वाचने 124836
प्रतिक्रिया 251

प्रतिक्रिया

१. तुम्ही सांगितलेल्या टेस्टी टंग्स मध्ये डॉलर जिलबी आणि मालपुआ अप्रतिम मिळतो. गुलाबजामही अतिशय सुंदर २. आपटे रोडवरच्या शाहजी पराठा हाउस मध्ये पराठे अप्रतिम मिळतात. थोडे महाग आहेत. पण वर्थ व्हिजिट. साधा अँबियन्स चालणार असेल तर त्यांची मूळ शाखा लक्ष्मी रोडवर आहे. तिथे किंमती कमी आहेत. इथला चुर चुर नान, अमृतसरी नान आणि बनारसी आलू पराठा केवळ अप्रतिम. दाल लसूनी पराठीही उत्तम. लस्सी देखील सुंदर. ३. कोथरुडला (पौड रोड) स्ट्यु आर्ट हे अतिशय अप्रतिम छोटेसे हॉटेल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्यु अतिशय दर्जेदार मिळतात. हंगेरियन गुलाश खास प्रसिद्ध. ४. कोल्हापुरचे राजमंदिर आइसक्रीम आता पुण्यात सुरु झाले आहे. कोथरुड डीपी रोड (म्हातोबा मंदिरापासुन गणंजय सोसायटीवर जाणारा रस्ता) वर आहे. येथील रेड पेरु आइसक्रीम केवळ अप्रतिम. बाकीचीही आइसक्रीम बरी आहेत. पायना स्ट्रॉबेरी हा एक वेगळा फ्लेवरही मिळतो इथे. ५. ढोले पाटील रोडवर द्रविडा'स बिस्ट्रो नव्याने सुरु झाले आहे. सिटी पॉइंट मध्ये. उत्कृष्ट दाक्षिणात्य पदार्थ मिळतात. इथली थाळी देखील सुंदर. ६. रोल्स मॅनियाच्या शाखा ठिकठिकाणी आहेत. त्यांचे सगळेच रोल्स सुंदर आहेत. ७. औंधला स्किप्स नावाचा कॅफे आहे. येथील ब्रेकफास्ट आणि सँडविचेस अतिशय सुंदर. ८. कोथरुडला करिष्माच्या येथील खाऊ गल्लीत सिन सिटी नावाची बेकरी आहे. येथील सर्वच केक्स सुंदर. खास करुन इटालियन कसाटा, हनी अल्मंड तर लय भारी. ९. कोथरुडला कोकण एक्स्प्रेसच्या गल्लीत मस्ती मिसळ आणि पौड फाट्यावर किमायाच्या पुढच्या (कोथरुड कडुन नळ स्टॉप कडे जाताना) गल्लीतली कोल्हापुरी मिसळ निरातिशय सुंदर. १०. बावधनला त्रिकाया नावाचे हॉटेल आहे. अँबियन्स दर्जेदार. जेवण आवडेलच असे नाही. पण येथील लेमन कॉरियंडर सुप अतिशयच दर्जेदार. ११. ठिकठिकाणी डेयरी डॉन आइसक्रीम आहे. यांच्या कडे डेयरी डॉन स्पेशल आणी अमेरिकन नट सुंदर मिळते. १२. भांडारकर रोडवर एक फ्रेंच बेकरी आहे. नाव नीट्से आठवत नाही (ले प्स्लेजर की कायसे नाव आहे). येथील मेकरुन आणि चीझकेक खुप सुंदर. १३. भाउ पाटील चौकात दिल्ली चाट दरबार सुरु झाले आहे. अस्सल दिल्ली साएड चाट आणि छोले भटुरे मिळतात (इथे काळे छोले असतात आणि ते काळा मसाला वापरतात. त्यामुळे सर्वांनाच आवडेल असे नाही) बाकी नंतर सांगेन

In reply to by मृत्युन्जय

अजुन ३: १४. मॉडेल कॉलनीत ऑरियँटल वोक आहे. इथले बर्मीज खाउ सी जरुर ट्राय करावे. १५. मॉडेल कॉलनीतच हॉल्ली क्रेप्स आहे. इथले क्रेप्स सुंदर. अर्थात क्रेप्स हा प्रकार सगळ्यांना आव्डेल असे नाही. आपल्याला डोसे ठराविक प्राकारातच खायला आवडतात. क्रेप्स म्हणजे अगदी डोसे नसले तरीही हा प्रकार याच कारणाने अनेकांना आवडत नाही. १६. करिष्मा लेनमध्ये आणि शबरी, एफ सी रोडच्या बाहेर पुर्वी स्पाइस आइस्क्रीम मिळायचे. आताचे माहित नाही. काही फ्लेवर्स खुपच सुंदर होते. मिळत असेल अजुनही तर नक्की ट्राय करा.

In reply to by मृत्युन्जय

अजुन १: १७. जे जे गार्डनचा वडापाव पुण्यात प्रसिद्ध आहेच. त्यांची एक शाखा आता नळ स्टॉप वर समुद्रच्या लायनीत, कॉटनकिंगच्या बाजुला सुरु झाली आहे. वडापाव अप्रतिम

In reply to by नांदेडीअन

गार्डन वडापाव खायचा असेल तर कॅम्पात जा, न पेक्षा कोथरुड महेश विद्यालयजवळचा कोथरुड वडापाव ट्राय करा.

In reply to by मृत्युन्जय

आपटे रोडवरच्या शाहजी पराठा हाउस मध्ये पराठे अप्रतिम मिळतात. थोडे महाग आहेत. पण वर्थ व्हिजिट. साधा अँबियन्स चालणार असेल तर त्यांची मूळ शाखा लक्ष्मी रोडवर आहे. तिथे किंमती कमी आहेत. इथला चुर चुर नान, अमृतसरी नान आणि बनारसी आलू पराठा केवळ अप्रतिम. दाल लसूनी पराठीही उत्तम. लस्सी देखील सुंदर.
असहमत.. बरे आहेत पराठे पण अप्रतिम किंवा उल्लेखनीय नाहीत. जाडेभरडे वाटले. चुरचुर नान बरे, पण मेथी पराठा म्हणजे खुसखुशीत मेथी तोंडात येणारा ठेपला नसून अगदीच पालेभाजीची हिरवी प्युरी माफक प्रमाणात कणकेत एकजीव मिसळून नुसता हिरवा रंग आणलेली जाडी चपाती वाटली. आलू, गोबी पराठ्याचेही तसेच. तव्यावरचा पातळसर अन खुसखुशीत पराठा जास्त छान लागतो. यांचे तसे नव्हते. अर्थात पसंद अपनी अपनी हे शेवटी आहेच.

In reply to by गवि

शाहजीज चे पराठे पातळ नाहित हे नक्कीच. किंबहुना त्याच कारणासाठी मला ते जास्त आवडले. स्टफिंग सढळ हस्स्ते वापरले जाते. मेथी पराठी बद्दल माझा पास. सगळ्या प्रकारच्या पराठ्यांमध्ये हा स्गळ्यात जास्त नावडता, कधीच खात नाही (अपवाद घरी करुन ताटात कंपल्सरी वाढलाच जातो तेव्हाचा). पुर्वी मी चैतन्यच्या पाराठ्यांचा चाहता होतो. पण त्यांची क्वालिटी पारच ढासळली आहे. तरीही बरे असतात तसे.

In reply to by मृत्युन्जय

बेष्ट धागा...
१२. भांडारकर रोडवर एक फ्रेंच बेकरी आहे. नाव नीट्से आठवत नाही (ले प्स्लेजर की कायसे नाव आहे). येथील मेकरुन आणि चीझकेक खुप सुंदर.
होय, ला प्लेझीर नावाचं हाटील. छोटसं आहे. पण मस्तं (आणि महाग). सँडिविचं खाल्ली होती दोन. लय भारी.

In reply to by अनुप ढेरे

ला प्लेझीर, हे एका आपल्यासारख्या मध्यमवर्गीय मराठी माणसाचे फ्रेंच हॉटेल आहे. सिद्धार्थ महाडिक - राष्ट्रीय बॅडमिंटनपटू आणि नंतर मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी शेवटी सिडनी मधून बेकरीचे शिक्षण ! या भांडवलावर याने भांडारकर रस्त्यावर फ्रेंच बेकरी टाकली आणि यशस्वी करून दाखवली. खूप प्रयोग करत राहणे हा या बेकरी चा आत्मा ...त्यामुळे खाणे थोडे महाग असले तरी समाधान देऊन जाते.

In reply to by मृत्युन्जय

द्रविडा'ज बिस्त्रो हे ईअरमार्कवल्या गेले आहे. नक्की जाऊन पाहीन. बहुत धन्यवाद. लझीझदेखील लवकरच ट्राय औट करण्यात येईल.

In reply to by बॅटमॅन

द्रविडाज बिस्ट्रो इयरमार्कवले आहेस म्हणुन थोडेफार सांगतो: १. हे जरी दाक्षिणात्य हॉटेल असले तरी ते ऑर्गॅनिक फूडसाठी जास्त प्रसिद्ध आहे. २. मला त्यांची कंसेप्ट आवडली. मस्त टोपलीत वगैरे खाद्यपदार्थ आणुन ठेवतात. ३. स्टाफ हा नौकरवर्ग न वाटता सगळे मालक आहेत असे वाटते. अ‍ॅटिट्युडमुळे नाही तर सर्व्ह करण्याच्या त्यांच्या मनापासूनच्या इच्छेमुळे. सर्व्हिस प्रॉम्प्ट नाही म्हणता येणार पण आतिथ्यशील वाटते. माझा घसा खराब आहे म्हटल्यावर त्याने कुठल्यासे हर्ब्स मिसळुन फिकट गुलाबी रंगाचे पाणी गरम करुन आणुन दिले (गुड फॉर सोर थ्रोट यु नो. आवर शेफ सजेस्टेड दिस फॉर यु). (हे फुकट होते हे जास्त महत्वाचे. फुकट ते असेही पौष्टिक) ४. चव थोडी सपक आहे. मी रस्सम नाही चाखु शकलो. पण बाकी पद्दार्थ थोडे माइल्ड क्याटेगरीतले होते. ५. ते जवळजवळ प्रत्येक गोष्ट कस्टमाइझ करुन देतात. सॅलेड, इडली, डोसा, उत्तपा, पराठा सगळे कस्टमाइझ करुन देतात. ६. बर्‍याच गोप्ष्टी ते पॉर्शन बेसिस वर देतात. पॉर्शन म्हणजे मध्यम (छोटी ते मध्यम या मधली खरे म्हणले) आकाराची वाटी. हाफ बिर्याणी म्हणजे एक मिडीयम बाउल वगैरे. पॉर्शन बेसिस वर अस्ल्ल्याने क्वांटिटी गंडते. आपण समजा फ्राइड पनीर सागितले की तो पनीरचे ३ आयताकृती तुकडे आणुन ठेवतो. चव चांगली होती आणि पोर्शन कमी होते तशी किंमत पण कमी होती. पण आपला क्वांटिटीचा अंदाज त्यामुळे चुकु शकतो. ७. या पॉर्शन आणि कस्टमाइझच्या भानगडीत ते बराच घोळ घालतात. उदा. एखादे स्पेशल चाय हॉटेल असेल तर ते असा गोंधळ घालतील: १. ब्लॅक टी की रेग्युलर २. रेग्युलर असेल तर मसाला की बिन मसाला. ३. साखरेचा की बिनसाखरेचा ४. ब्लॅक हवा असेल तर लेमन की दार्जीलिंग की अर्ल ग्रे की जस्मिन की आसाम की अजुन काही ५. ब्लॅक विथ शुगर की विदाउट शुगर ६. रेग्युलर डिप की लाँग डिप ७. दूध हवे असेल तर डेयरी व्हाइटनर की साधे दूध ८. साधे दूध हवे असेल तर गाईचे की म्हशीचे की शेळीचे. ९. म्हशीचे हवे असेल तर चितळे की गोकुळ की वारणा की कात्रज १०. गाईचे हवे असेल तर काठेवाडी की जर्सी. शेवटी तुम्ही वैतागता. पण मला हा असा चॉइसचा खेळ आवडला. मला इथली बिर्याणी आणि फ्राइड पनीर मनापासून आव्डले. किंमत रास्त होतीणिसर्व्हिस तत्पर नसली तरीही आगत्यशीर होती. रचना आणि प्रेझेंटेशन आवडले. फूड बाबत म्हणाल तर दक्षिणायन याहुन १०० पट जास्त उत्तम पदार्थ द्यायचे.

In reply to by मृत्युन्जय

मुद्दाम कालच जाऊन आलो. रस्सम- ऑस्सम. थोऽडे अजून टँगी चालले असते. पण कपात घेऊन चहासारखे पिताना जाम मज्या आली. सांबार- अजून बरेच मसालेदार पायजे होते. सपक वाटले. मालकाला सांगितल्यावर तो म्हणाला की भातासोबत वेगळे अन इडलीसोबत वेगळे सांबार देतो. इडली घेतल्यामुळे सपक सांबार नशिबी आले. चटण्या- लाल टोम्याटो चटणी ओक्के ओक्के. नारळ चटणी छान होती. आप्पम व व्हेज स्ट्यू- गंडलेला प्रकार होता. आप्पमच्या कडा छान जाळीदार होत्या पण सेंटरला ओलाकच्च लागत होता. व्हेज स्ट्यूदेखील जरा गंडलेला होता. याच्या तुलनेत सौथ इंडीजमधला व्हेज स्ट्यू म्हणजे वर्ल्ड अपार्ट. बट देन किंमतीतही फरक आहेत. उत्ताप्पा- नथिंग टू ग्रेट. ताक- अप्रतिम. असे ताक लै कमी ठिकाणी प्यालोय. बहुधा हलकी फोडणी टाकत असावेत असे वाटले. जे काय असेल ते असो, पण जे कै पेय समोर आले ते अप्रतिम होते. आणि दक्षिणायनच्या आठवणीने खरेच हळवा झालो. काय क्वालिटी होती च्यायला. ते बंद व्हायला कारणीभूत असलेल्यांना माझा तळतळाट लागणार आहे.

In reply to by बॅटमॅन

आणि दक्षिणायनच्या आठवणीने खरेच हळवा झालो. काय क्वालिटी होती च्यायला. ते बंद व्हायला कारणीभूत असलेल्यांना माझा तळतळाट लागणार आहे. खरं आहे रे. ती क्वालिटी इतर कुठेच नाही. साउथ इंडिज मध्ये पण नाही.

In reply to by मृत्युन्जय

अगदी अगदी. साऊथ इंडीजमधला तो कै करी स्ट्यू फक्त ट्रेडमार्क आहे. तो आणि आप्पम हे पदार्थ तिथे जगात भारी. बाकी काही लय खास नाही. दक्षिणायनमध्ये जी क्वालिटी होती त्याच्यापेक्षा भारी क्वालिटी सौथमध्येही दिसली नाही. सौथमध्ये त्याच्या तोडीचे होते आजवर पाहिले ते सर्व. दक्षिणायन बंद झाल्यापासून हॉटेलोहॉटेली भटकतो आहे पण अत्रुप्त आत्म्यासारखी स्थिती झालीये. आमचे वैकुंठ काही सापडायला तयार नाही.

In reply to by बॅटमॅन

आणि दक्षिणायनच्या आठवणीने खरेच हळवा झालो. काय क्वालिटी होती च्यायला. ते बंद व्हायला कारणीभूत असलेल्यांना माझा तळतळाट लागणार आहे. आम्हालाच तळतळाट लागणार रे तुझे ;) बाकी ते दक्षिणायन लै बकवास होतं. अशी माजुरडी हाटेलं बंदच व्हायला हवीत. पैशे ढिगाने घ्यायचे पण क़्वांटीटी अगदीच कमी, बरे निदान क्वालिटी तरी हवी ना तर तीही नाही. सालं त्या दिवशी दक्षिणायन मधून अर्धपोटी बाहेर पडून नंतर मग संगली स्पेशल भेळपुरी आणि मराठवाडा पेश्शल लोणी धपाटे खावे लागले. किमान ७ ते ८ मिपाकर साक्षी आहेत ह्या गोष्टीला. पण ह्या बाट्याला दक्षिणायनचं लैच कौतुक :-/

In reply to by प्रचेतस

बाकी काहीही बोल पण क्वालिटीबद्दल बोलायचं काम नाय सांगून ठिवतो हां. अर्धपोटी बाहेर पडला ते क्वांटिटीमुळे, क्वालिटीमुळे नव्हे. श्या घालायच्या तर नेमक्या आणि योग्य मुद्यावर घातल्या पायजेत. ;)

In reply to by प्रचेतस

शेवटी आवडनिवड ही सब्जेक्टिव्ह असते म्हणा. पण दक्षिणायन रसम विरुद्ध सौथिंडीज रसम दक्षिणायन मुळगापुडी इडली विरुद्ध सौथिंडीज मुळगापुडी इडली आणि एकूणच दक्षिणायन डोसा विरुद्ध सौथिंडीज डोसा अशा स्नॅक बेस्ड तुलनेत दक्षिणायन कोसो आगे आहे. तेच आप्पम इ. मध्ये सौथिंडीज पुढे आहे. शिवाय दक्षिणायनमधले टोम्याटो राईस, पुळिओगरे, बिशिबेळेभात, हे सौथिंडीजमध्ये मिळतही नाहीत तिथल्या लंचमध्ये. सांबाराबाबतीत दोन्ही मोर ऑर लेस सेम. सेम अबौट चटण्या. इडली, डोसा, उत्तप्पा, भात, रसम या पाच प्रकारांत दक्षिणायन उजवे तर आप्पम, स्ट्यू, इ. मध्ये सौथिंडीज उजवे. सबब, तुलनाच करायची झाली तर क्वालिटीच्या बाबतीत दक्षिणायनचा नाद नाही. असो, अजून हळवे नको व्हायला.

In reply to by बॅटमॅन

हाहाहा. बाकी दक्षिणी पदार्थांबद्दलच बोलायचं तर हैद्राबादेतील चटणीज चा नादच खुळा. इतकं भारी जगात कुठंच नै.

In reply to by बॅटमॅन

चटणीज ला नाही गेलास अजुन? अर्रे केवळ त्यासाठी हैद्राबाद ची एक ट्रिप मार. चार चटण्या + मुळगापुडी + सांबार. सगळे अनलिमिटेड. दैवी चव. घासाघासात निव्वळ ...... हैद्राबादेत जाउन एकवेळ बिर्याणी नाही खाल्ली किंवा कराचीची बिस्कीटे नाही चाखली किंवा मोती नाही घेतले तरी चालतील पण चटणीज इज अ मस्ट.

In reply to by मृत्युन्जय

चटनीज हाटेलाच्या आठवणी लै जुन्या आहेत. उ. गृहाचे बांधकाम चालू असल्यापासून बघितले आहे. मग त्यांचे उद्घाटन झाले. कोणताही पदार्थ सुरेखच असतो असा अनुभव आला होता. चिरंजीवी दोसा की अशाच नावाचा कोणतातरी एक पदार्थ माझा आवडता. चटनीजमध्ये न जाऊन १० वर्षे तरी झाली असतील, किंवा जास्तच!

In reply to by प्रचेतस

चेन्नैच मुरुगन देखील खासच. चटणीज एवढेच मल तेही आवडते. दाक्षिणायन मला त्याच लीगमधले वाटायचे. सांबर, रस्सम आणि चटणीज बद्दल बोलायचे झाल्यास. अर्थात चटणीज आणी मुरुगन दक्षिणायन पेक्षा खासच आहेत हे मान्यच करावे लागेल. निव्वळ सुख आहे ते. आणी हो. दक्षिणायन बद्दल काय पण बोलायचे नाय

In reply to by मृत्युन्जय

:) चेंनैच्या मुरुगनबाबत बरंच ऐकलेले आहे. कधी योग आला तिकडे जायचा तर अवश्य जाऊच. बाकी चटनीज म्हणजे निव्वळ अप्रतिम रे. अगदी घासाघासात सुख. इकडे औंधला बनाना लिफ नावाची सौथींडीयन आंध्रा स्टाईल मेस आहे. अप्रतिम रस्सम, सांभार आणि केळफ़ुलाची भाजी मिळणारी. कुणी गेलंय का तिथे? एक मित्र प्रचंड तारीफ़ करत होता.

In reply to by प्रचेतस

बनाना लीफ बंद झाले बहुधा. एकदा गेलो होतो मी शटर डाउन बघुन परत आलो. बादवे "इकडे औंधला" या शब्दांचा अर्थ काय? तु औंधात कुठे असतोस की काय कामाला?

In reply to by मृत्युन्जय

अरे ते दुपारीच चालू असते फ़क्त. मी हिंजवडीला आहे रे. पण बनाना लिफ ला गेलो नाही कधी. बाकी नावावर जाऊ नकोस. नाव जरी लै भारी वाटत असलं तरी ती आंध्रा स्टाइल लहानशी मेस आहे.

In reply to by प्रचेतस

बनाना लीफला जाउन आलो. माझे मतः १. इडली / मेदु वडा उपलब्ध नव्हता कारण तो फक्त दुपारी १२ पर्यंतच असतो. नंतर बॅटर तितकेसे चांगले उरत नाही असे हॉटेल चे मत होते. २. डोसा उत्तम होता. पण फक्त त्यासाठी मी फार मोठा प्रवास करणार नाही. बर्‍याच ठिकाणी चांगले डोसे मिळतात. ३. चटण्या (लाल आणी पांढरी) चांगल्या होत्या. पण परत तेच, केवळ चटण्यांसाठी फार पाय तुडवत जाण्यासारखे काही नाही. ४. रस्सम ठीकठाक होता. दक्षिणायन मध्ये यापएक्षा १०० पट चांगला रस्सम मिळायचा. थोडी टँगी थोडी तिखट अशी जी चव हवी ती दोन्ही थोडी कमी होती. ५. सांबार चांगला होता. पण मला स्वतःला शिवसागर चा सांबार अधिक आवडतो (दक्षिणायन तर प्रश्नच नाही). सांबर मध्ये सुद्धा तो टँगी पंच मिसिंग होता (योग्य मराठी शब्द कोणीतरी सुचवा रे). ६. फिल्टर काप्पी अप्रतिम होती. केवळ याच साठी लांबवर प्रवास करायला लागला तरी हरकत नसावी. ७. मी इडली / वडा खाउ न शकल्याने त्याबद्दल फारशी प्रतिक्रिया देउ शकत नाही. \ ८. स्वच्छतेला १० /१० ९. किंमतीत १० पैकी ९ मी परत जाइन का? नक्की जाइन की. माझ्या हापिसापासुन २ मिनिटाच्या अंतरावर आहे. तत्पर सर्विस आहे, अतिशय रास्त दरात उत्तम पदार्थ मिळतात, वेगळे बरेच पदार्थ जे इतर दाक्षिणात्या हाटेलात मिळत नाहित ते इथे चाखता येतील. चवीच्या बाबतीत जरी मला इतरही बरीच चांगली उपहारगृहे माहिती असतील तरी बनाना लीफ बाबत तक्रार करायला फार जागा नाही, चव चांगलीच आहे (याहुन चांगली इतर ठिकाणी असते ही गोष्ट वेगळी. थोडक्यात म्हणजे कंप्लिट व्हॅल्यु फॉर मनी आहे. माझे हापिस इथुन उठुन कोथरुडात गेले तर मात्र मुद्दाम वाट वाकडी करुन जाइन की नाही हे सांगता येत नाही.

In reply to by मृत्युन्जय

बनाना लीफ विश्रांतवाडी मध्ये आहे. औंधवाल्यांचीच ब्रांच आहे की कुणाची ते माहित नै पण.

@ मृत्युन्जय जी खूप खूप धन्यवाद. यातल्या २-३ ठिकाणीच गेलोय. एक-एक ट्राय करतो आता. :)

एक विनंती लोकांनी जेथे काही खाल्ले असेल तेथिल वर्णन फोटोसकट टाकावे. अन्यथा असे मुंबईतील ७५ ठिकाणांचे शाकाहारी पदार्थांचे वर्णन माझ्या कडे व्हाट्स अप्प वर पण आहे मग त्याला मजा येत नाही. नुसतेच मधुबालाबद्दल वर्णन करायचे आणि फोटो टाकायचे नाही यात मजा नाही यासारखे.मग लोकांनी आपल्या कल्पनांचे मनोरे रचा.

In reply to by सुबोध खरे

बरोबर आहे. नुसतीच लिस्ट देउन मजा येत नाही. पण ही (मी दिलेली) वॉट्सअ‍ॅपची लिस्ट नाही हो. मी सगळीकडे जाउन आलेलो आहे. अन्न पुढ्यात आल्यावर ते फोटो काढण्याइतके पेशन्स नसतात माझ्याकडे. पुढच्या वेळेस पासुन ट्राय करेन खरे. :)

आशा डायनिंग हॉल्,सुवर्णरेखा डायनिंगहॉल खूप जुने ,बहुदा आपटेरोड वरचे.कोथरूड वाढले व पुण्यात खाण्याची मजा गेली असे ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुवर्णरेखा डायनिंग हॉल ला लोक का गर्दी करतात ठाऊक नाही. दैनंदिनी खानावळ म्हणून जात असाल तर चांगलं आहे पण हॉटेल म्हणून जात असाल तर फार काही ग्रेट नाही. महाविद्यालयीन जीवनात माझी हीच खानावळ होती त्यामुळे रोजरोज तिथे खाल्ल्याने मला विशेष वाटत नसावं पण ऐरवी जायलाही तिथे का जावं असा प्रश्न पडतो. आपल्या घरी जे जेवण असतं तेच तिथं मिळतं साध्या भाज्या, चटण्या, कोशिंबीरी (श्रेयस किंवा दुर्वांकूर सारखं लग्नबाज जेवणही नसतं). पोऴ्या म्हणजे तर, झटकून घ्याव्या लागतात एवढं पीठ असतं त्यावर, अगदी रखरखीत कोरड्या. गरम खाल्ल्या तर ठीक नाहीतर थोडा जोर देऊन तोडून खायच्या. पण तिथला गरम-गरम भात-आमटी, केवळ अहाहाहा :) महाराष्ट्रीय थाळीच्या बाबतीत आत्तापर्यंत श्रेयस आवडलं (दुर्वांकूर मात्र आजीबात आवडत नाही, त्यांचा दहीवडा आणि बटाटेवडा अपवाद).

In reply to by उदय के'सागर

सुवर्णरेखा बद्दल सहमत एखाद दिवस तेथेले जेवण बरे वाटते. मात्र सुवर्णरेखा (प्रभात रोडवर) स्वच्छतेचा अभाव आढळला. चमचे वाट्या नीट धुतलेल्या नसतात

In reply to by विजुभाऊ

सुवर्णेरेखा ही खानावळच आहे. बरी खानावळ इतकेच. हॉटेलची अपेक्षा घेउन तिकडे जाउच नये. मला व्यक्तिशः अजिबातच आवडत नाही. त्यापेक्षा आशा कितीतरी चांगले.

In reply to by असंका

प्रभात रोडवरच आहे. प्रभात पोलिस चौकीवरुन डेक्कन कडे येताना चौक पार केल्यावर २-३ बिल्डींग सोडुन उजव्या हाताला सापडेल. पैसे वाया आहेत. एक पोटभरु खाणावळ यापेक्षा जास्त काही नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

असे ह्यांचे मत.
ह्यांचे म्हणजे कोणाकोणाचे?

In reply to by सूड

आदरार्थी "एकवचन" असावे. तुम्हाला अपेक्षीत "बहुवचन" नसावे !! खरे खोटे नानां ची माई (माईंचे नाना) जाणे. ग्रेट्थिंकर्नी यावर प्रकाश टाकावा.

माझ्याकडे बर्‍याच फोटो आहेत, पण त्या जागा बहुतांशी लोकांना माहित आहेत. नवीन माहिती मिळावी या उद्देशानेच खूप पॉप्युलर असणार्‍या जागांबद्दल लिहिले नाही.

bounty sizzlers कल्याणीनगर, पुणे. अप्रतिम शाकाहारी आणि मांसाहारी सिझलर्स मिळतात. सोबतीला चालत असेल तर थंडगार बिअर. कसे जावे: पुणे नगर रस्त्यावर रामवाडी जकात नाक्यच्या चौकातुन उजवीकडे वळावे. बिशप स्कुलची इमारत गेली की पुढच्या बाजुला उजव्या हाताला छोट्याशा रस्त्यावर वळालात की लगेच दिसेल. पोलीस ग्राउंड नंतर लगेच दिसणारे फर्र्ग्युसन रस्त्यावरील याना सिझलर्स देखिल चांगले आहे असे ऐकले आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

याना सिडलर्स चा चिझ गार्लीक ब्रेड जरुर जरुर ट्राय करावा, अतिउत्तम. बाकी बांउटी सिझलर्स बद्दल सहमत. अगदी आँथेटीक सिझलर्स खायचे असतील तर बाँटी इज अ बेस्ट प्लेस.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

बाऊंटी बद्दल आमच्या घरातल्या सिझलरप्रेमी मंडळींचे मत काही चांगले नाही. पुण्यात "ऑथेंटिक सिझलर्स" काही दशकांपासून फक्त कँपातील वेस्ट एंड थिएटर जवळच्या "द प्लेस" (The Place - Touche The Sizzler) मध्ये मिळतात. कल्याणीनगरमधल्या मारीप्लेक्स मॉल्मध्ये एक सिझलर जॉईंट आहे (नाव विसरलो)... चव चांगली असली तरी ते ऑथेंटिक म्हणता येणार नाही. सॉसेस भारतीय जिभेला आवडतील अशी तिखट आहेत... माझ्या मते जरा जास्तच. पण आमच्या काही नातेवाईकांना ती फार आवडली !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"द प्लेस" (The Place - Touche The Sizzler) मध्ये मिळतात.
ये ब्बात एक्काकाका - हेच लिहायला आलो होतो. भरपूर भूक ठेवून जाणे - द प्लेसचे सिझलर्स बरेच मोठे असतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कल्याणीनगरमधल्या मारीप्लेक्स मॉल्मध्ये एक सिझलर जॉईंट आहे "याना" सिझलर्स... चांगले आहेत इथले सिझलर्स.. एफ.सी रोडवर पण एक शाखा आहे.

अप्रतिम . विमान नगर मधे nyati मिलेनियम मधे एक रोल चे दा दुकान आहे. छान चव आहे.relax पावभाजी सहकार नगर

माझ्या माहितीतील काही ठिकाणं : १. बाणेर भागातल्या हॉटेल्स बद्दल फार माहिती नसल्यास, तिथे 'वे डाऊन साऊथ' नावाचं फाईन-डाईन रेस्टॉरंट आहे. असंख्य प्रकारचे डोसे/उत्तपे. खूप छान चव, मात्र फार महाग. २. बाणेर-पाषाण रस्त्यावर सॅफरन नावाचे रेस्टॉरंट आहे, सी-फूड उत्तम. ३. एम.जी. रोडवरील 'मार्झो-ओ-रीन' मधे चवदार सँडवीच मिळतात. आणि होममेड टाईप पिझ्झाज्/बर्गर ही मस्त असतात.

In reply to by उदय के'सागर

३. एम.जी. रोडवरील 'मार्झो-ओ-रीन' मधे चवदार सँडवीच मिळतात. आणि होममेड टाईप पिझ्झाज्/बर्गर ही मस्त असतात. हे पुणे खाद्यसंस्कृतीतील एक अग्रगण्य प्राचीन पण अजूनही टिकून असलेले ठिकाण आहे !

पुण्यात शिकत असताना (१९९६-९८) च्या सुमारास डेक्कनवरच्या जनसेवा मध्ये बरेचदा गेलोय. मस्त होतं. बाकी एम.जी. रोडवरच्या मार्झोरिनचे चिकन सँडविच आणि शेक्स लाजवाब! दोराबजीची बिर्याणीही सुपर्ब!

छान धागा आहे. साधारणतः चांगला अँबीयन्स हायर-मीडल बगेट रेंज १२ -१४ जणांना डिनरपार्टीसाठी रेस्टॉरण्ट्सची माहिती हवी आहे. प्रिफरेबली गार्डन रेस्टॉरण्ट. (मुख्य म्हणजे आसनव्यवस्था कंजस्टेड (अगदी पाठीला पाठ टेकुन) नसावी.)

In reply to by माहितगार

साधारण कुठल्या भागात करायची आहे पार्टी? शाकाहारी की मिश्राहारी, कॉकटेल्स हवेत की नकोत?

औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.
आवो...डिटेलमदी पत्ता द्या..! आजच जाऊण खान्याची परचंड मंजी परचंड विच्छा व्हायलिया!

In reply to by अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआअ http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif घावलं...घावलं! झुम्याटूवर घावलं, http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif पावलं पावलं,..आमाला विनटरन्येट पावलं! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif

पटवर्धन बागेजवळचा खिडकी वडा प्रसिदध आहे .