Skip to main content

मिपा हे नविन सदस्याकरीता अडचणीचे तर ठरत नाहीये ना??

लेखक Sanjay Kokare यांनी शुक्रवार, 16/01/2015 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
कालच मी मिपा चा सदस्य झालो. सदस्य झाल्या नंतर मी माझे लेख, कविता वैगेरे मिपा फळावर टाकल्या. मला वाटल येथील सर्वच जण अभ्यासु असतील व त्यांच्या कडुन मला चांगले मार्गदशन लाभेल. व मला माझ्या द्न्यानात अजुन भर टाकता येईल . म्हणुन मला माहीती नसलेल्या विषयावर माहीती मिळवण्यासाठी मी एक चर्चेसाठी एक विषय ही टाकला. मला त्या विषयाबद्दल मला जास्त माहीती नसल्यामुळे ती पोस्ट मी अत्यंत लहान टाकली होती. त्यामुळे संपादकानी ती पोस्ट अत्यंत लहान असल्याचे कारण सांगुन ती डिलीट केली.. मग मी नविन असल्यामुळे पोस्टींग करताना चुकुन स्पेच देण्याचे विसरलो व ती वर्हाडी भाषेतील कवीतेला विदर्भ वेगळा देउनच द्यावा या भाषेत प्रतिक्रिया देण्यात आल्या. मराठी माणसाबाबत टाकलेल्या लेखावर पण मराठी माणसाबाबत मराठी माणसालाच काही घेणे देणे आहे की नाही अश्या प्रकारचे प्रश्न निर्मान होणार्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या.. माझा लेखाखाली माझ नाव मी नित्य नियमाप्रमाने टाकले जेणेकरुन वाचणार्याला मला त्या लेखाबाबत संपर्क साधता यावा. परंतु याबाबत ही अनेक प्रश्न उठवले गेले.. परंतु हे सर्व होउनही मिपावर सर्व अत्यंत मदत करणारे लोक आहेत अस मला जाणवल.... काही चुकल्यास क्षमस्व

वाचने 30911
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

In reply to by सस्नेह

ह्या प्रतिसादाचा पण अभ्यास करा. आपल्याच धाग्याची जाहिरात कशी करावी :D रच्याकने http://www.misalpav.com/node/२६५१७ मस्त आहे हे नोंदवू इच्छितो :)

आपल्याकडे रस्त्यात लक्ष देत नसतील तर आपण उगाचच घसरून पडायचं. तिकडे परदेशात फेसबुकवर लाईक मिळाले नाहीत की काही मुलींना फारच डिप्रेशन येतं आणि त्याच्यासाठी स्पेशालिस्ट ,साइकॉलजिस्टची ट्रीटमेंटही घ्यावी लागते. तुमच्या बाबतीत मिपाने झिडकारले असा काही न्यूनगंड येणार नाही याची खात्री आहे. हा 'जालीय आभास आहे'(श्रेय कल्पना एक मिपाकर )आता हे श्रेय कोणाला आहे ते मिपावरचे सर्व लेख अभ्यासून शोधा. हे शोधताना तुमच्या अंगावर साळिंदरचे काटे उगवतील आणि तुम्ही पक्के मिपाकर व्हाल.

संजयराव , मिपा एक होस्टेल आहे. सुरवातीला त्रास होतो पण फर्स्ट इयर नंतर जसे होस्टेल आवडू लागते तसेच मिपाचे होते. माझे अनुभव सांगतो - १.मिपावर भविष्य , जातीव्यवस्था , हिंदुत्व , देव , भूत , नाडी , गांधी , सावरकर , आंबेडकर , ब्रिगेड यावर भरपूर लेखन , चर्चा , टिंगल झाली आहे. ह्या विषयावर लिहिणे सुरवातीला टाळणे योग्य. २.लिहिताना किमान शुद्धलेखन अपेक्षित असते. त्याकडे लक्ष ध्यावे. ३. मार्मिक ,खवचट , तिखट प्रतिक्रिया देण्यास मात्र घाबरू नका. लेखकाला नाही तर वाचकांना नेहमीच अश्या प्रतिक्रिया नेहमी आवडतात. ४. मिपाचे काही परवलीचे शब्द आहेत , ते समजून घ्या . ५. थोड्याच दिवसात आपला कंपू तयार करा आणि पहा काय मजा येते येथे ! नाराज होवू नका म्हणजेच "निगरगट्ट"" व्हा !

In reply to by तर्री

५. थोड्याच दिवसात आपला कंपू तयार करा आणि पहा काय मजा येते येथे !
मलाही येथे खुप खुप मजा करायची आहे. आपला कंपू कसा तयार करायचा हे कृपया सांगाल का?

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा सर, मी हे गांभिर्याने विचारत आहे. कृपया मला मार्गदर्शन करा.

In reply to by श्रीगुरुजी

अहो गुरुजी असं हिट वगैरेला काही अर्थ अस्तो का? मिपावर ज्या विषयावर प्रत्येकाकडे काहीतरी बोलण्यासारखं निघतं त्या विषयावरचे धागे अशा प्रतिसादांनी भरून जातात. नाहीतर बोका भाऊंचे धागे फ्लॉप झाले असा अर्थ निघायचा...

मिपावर लिहित राहा. नाऊमेद करणा-या प्रतिसादांना घाबरु नका. मिपावर तुम्ही चांगलं लिहाल असं वाटतं. एकदा मिपाची प्रवृत्ती समजली की मग तुम्ही नक्की रमाल. आपले दोन्ही तिन्ही धागे वाचले छान लिहिता. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by यसवायजी

प्रत्यक्षात "र" सायलेंट आहे !! कॉलींग बॅट्या फॉर फर्दर डिट्टेल्स !!!!

हजर सदस्यांत आत्ता जेपी दिसत नसल्याने - पदार्पणातच पण्णास झाल्याबद्दल संजयभौंचा सत्कार एक स्पेअर कीबोर्ड देऊन करण्यात येत आहे.

In reply to by आदूबाळ

नीट ब्रोबर टाईप करणारा कीबोर्ड द्या. नायतर उगाच स्पेलिंग मिष्टीका व्हाय्च्या :) ;)

मला तर मराठी पण धड लिहिता येत नाही, चक्क हिंदी शब्द वापरतो, तरी ही मिपावकर सहन करतात. लोकांच्या आवडी निवडीची पर्वा न करता लिहित रहा.

In reply to by विवेकपटाईत

काका तुम्हाला हिंदी लिहिता येते म्हणजे मराठीही लिहिता येतच असणार. लिपी एकच आहे हो. देवनागरी.

अभिनंदन संजय साहेब. तुमचा धागा पदार्पणातच सेंच्युरी मारणार.

In reply to by धर्मराजमुटके

अभिनंदन संजय साहेब.
काय पण योगायोग पहा. ते ही अभ्यासपुर्ण लिहायचे. हे ही अभ्यास पुर्ण लिहितात. ड्वाले पाणावले.

In reply to by सस्नेह

गेले? कधी? आयेंगे मेरे संजय संजय आयेंगे. संजय ह्या नावाचाच हा महिमा आहे का? ते सामना मधे पण एक संजय असेच काही काही अभ्यासपूर्ण लिहीतात रोज. प्रत्येक वाक्यात सरासरी ३ विशेषणे वापरलीच पाहिजेत असा काहीसा नियम आहे म्हणे.

मिपावर येताना, नांवच एकदम 'कडक' घ्यायचं. आन, पायाने जमीन उकरतच यायचं. लोकांना तुमचा दबदबा वाटला पाहिजे. शिवाय महत्वाचं म्हणजे लेखन हे एकतर 'उच्च' नाहीतर 'हुच्चं' असलं पाहिजे. वर सांगितल्याप्रमाणे, दोन मुलांत योग्य अंतरही ठेवावे. लिहित रहा.

In reply to by तिमा

ठ्ठो =)) दोन मुलांत आणि दोन अवतारांतही योग्य अंतर ठेवावे, तसेच वर्तनही अंमळ वेगळे असावे. नायतर लग्गेच अवतारामागचा देव ओळखल्या जातो. मग तो थिंकर कितीही ग्रेट असो नायतर कसाही नेफळट असो नायतर कुणी माईसाहेब असो.

In reply to by बॅटमॅन

णाणा व मै मीच असे सर्व म्हणत होते. पण ते खोटे आहे.

हा शांतेचं कार्ट चालू आहे मधला संवाद तुमच्यासाठी, श्यामः तुम्ही मला एक वचन द्या. मिस माया साने: कसलं वचन? श्यामः घाबरू नका मला मदत करायचं. मिस माया साने: हा, ते दिलं. श्यामः आता तुम्ही या घरात राहणार कि नाही, मग तुम्हाला तुमचे नाव बदलावं लागेल. मिस माया साने: काय हो, तुम्ही सगळेजण ईथे नाव बदलून राहता? श्यामः नाही, आम्ही सगळे एकमेकांना नावं ठेउन राहतो. :D

तुम्हाला अजून आजची कविता, राजकारण सदरात लेख, झालच तर जनातल मनातल मधे काहितरी अस ब्रच काहि ल्हायचय. प्रतिक्रियाकदडे कुठे लक्ष देतात? चक्की चालु ठेवा.

In reply to by भाकरी

चक्की चालु ठेवा.
म्हणजे मग आतल्या आत पीठ* पडेल. *lol* *जरी बसलो दाबून नीट, आतल्या आत पडतंय पीठ

In reply to by सतिश गावडे

तांबीय सांप्रदायिक काव्यही लिहुन बघू शकता आपण.त्यासाठी मार्गदर्शनही इथेच मिळेल.मठाधिपतींशी ओळख काढल्यास त्यांचे शिष्य म्हणून इतर भक्तगण प्रतिसादाच्या प्रसादाने प्रसन्न करतील तुम्हाला.जय तांबे बाबा =))

तुमची कविता खुप आवडली...असंच लिहीत राहा..आणि काही मिपाकर जर तुमची चेष्टा करत असतील तर जास्त विचार नका करु..तसे सगळे मिपाकर मनाने एकदम चांगले आहेत..मदतीसाठी याच मिपाकरांचे हात लगेच पुढे सरसावतात..या सर्वांची मला सगळ्यात जास्त मदत झालीये..

अभ्यासपूर्ण लिहिलं की इतरांना काही शंका, झब्बू, दंगा करायला राहतच नै ना. यापुढं अभ्यासनपूर्ण लिहित चला म्हणजे तुंबळ हाणामारी होईल प्रतिसादांची.

In reply to by हाडक्या

त्यांच्या इतर अभ्यास पुर्ण लेखांवर चर्चा करायची सोडून तुम्हाला त्यांनी कळवळ्याने लिहिलेल्या धाग्याची सेंचुरी करायची पडली आहे. असंवेदनशील कुठचे.

In reply to by सतिश गावडे

*lol* तुम्ही त्यांना पदार्पणातच "सखू"ची ओळख (आणि आमाला आठवण ;)ओळख करून दिलीत, तेव्हा कुठे गेली होती तुमची संवेदनशीलता.. ?

In reply to by हाडक्या

यसवायजीने सखुची आठवण करुन दिली त्यामुळे मन संक्लीद्य झाले. तसे काव्य मी त्याआधी प्रसवले नव्हते, आणि त्यानंतरही नाही...

In reply to by बॅटमॅन

याला आक्षेप. आनंद मरते नही वैसे "सखू" विस्मरते नही !!! बाबू माताय.

१००

तुम्हाला आवडतं म्हणून लिहिता की लोकांनी तुमचे कौतुक करावे म्हणून ? तुम्हाला जो विषय आवडतो त्या विषयावर तुम्ही जर लिहिलं, मनापासून लिहिलं तर लोकांना आवडेलंच की .. - शेखर काळे

माईसाहेब मोड ऑनः अरे संजया, लगेच इतका निराश होऊ नकोस रे बाळा. इथले काही सदस्य ना खूप खोडकर आहेत बाई आणि नवीन माणसाची ते खूप टर उडवतात. पण हे म्हणतात की जीवनात थोडी तरी थट्टामस्करी पाहिजेच नाही तर जीवन अगदीच एकसुरी व कंटाळवाणं होईल. माईसाहेब मोड ऑफः

In reply to by टवाळ कार्टा

ये टका .. नीट वाच की .. हे पण आलेत हं. गुर्जींची आणि नानांची गहिरी दोस्ती होती(आहे) म्हणे. गुर्जी माईंना वैनी म्हणित जा हो.. *lol*

In reply to by हाडक्या

गुर्जी माईंना वैनी म्हणित जा हो..
एव्हढा जिव्हाळा नवमिपाकरांबद्दल दाखवलात तर त्यांच्यावर असे धागे काढायची वेळ येणार नाही.

In reply to by सतिश गावडे

सगा उर्फ धनाजीराव, आमी सोता नव-मिपाकर (आणि नव-कवी, नव-विडंबक इ.इ.) आहोत हो. त्यामुळे एक नवमिपाकर दुसर्‍या नवमिपाकराशी बंधुभावाच्या जिव्हाळ्याने जोडला गेलेला आहे ( जाऊ देत, ते तुमच्यासारख्या कंपुबाजास नाही कळावयाचे.. ;) ) . गुर्जी आणि नानांचा स्नेह आम्हास नेहमीच लोभवत आला आहे, त्यात काय एवढे.. :)

श्री.संजयजी कोकरे साहेब, प्रथमतः तुमचे अभिनंदन,ज्याप्रकारे तुम्ही हा लेख लिहुन एका अन्यायाला वाचा फोडली आहे त्यास तोड नाही. ज्या प्रमाणे महाभारातील संजय युद्धभुमीचे वर्णन करायचा, ज्या प्रमाणे सामना चे संजय विरोधकावर तुटुन पडतात, ज्या प्रमाणे आमचे हेवनवासी गुर्रदेव लोकांना भ्रमातुन बाहेर काढायचे, त्याच प्रमाणे तुम्ही नवीन मिपाकरांवर होणर्‍या अन्यायावर लेख लिहीला आहे. आज आल्यावर प्रथम तुमचे सर्व लेख वाचले.सर्व लेखांबद्दल ईथेच टोपी काढुन सलाम. असेच लेख लिहीत रहा.आमची संघटना तुमच्या पाठीशी आहे.गरज भासल्यास यावर एक आंदोलन हि करु, तसाही पयल्या आंदोलनाला बराच काळ लोटला आहे.सध्या कार्यकर्त व्यस्त आहेत वेळ मिळाला की आंदोलनाची दिशा ठरवु. लेखापेक्षा प्रतिसाद मोठा होऊ नये या साठी थांबतो. जाता जाता- हाफ शेंच्युरी निमीत्त श्री आदुबाळ यांनी तुमचा सत्कार केला आहे.त्या बद्दल त्यांचे आभार आणी आता शेंचुरी निमीत्त तुमचा आणी श्री.आदुदादु यांचा सत्कार (काय द्यावे बर!!) करण्यात येत आहे. . . कळावे आपला नम्र. जेपी, गाव- लातुर तालुका- महाराष्ट्र जिल्हा- भारत जय हिंद ,जय मिपा.

In reply to by जेपी

+१ बरं झालं तुम्ही आवाज उठवलात संजयजी! आमच्यात तुमच्या इतकी हिंमत नव्हती मिपावर नवे आलो तेव्हा! आता मात्र तुम्ही पिच्छाच पुरवा या अच्रत मिपाकरांचा., खोड मोडा मेल्यांची!

In reply to by आनन्दिता

खोड मोडा मेल्यांची! हे वाचून हसल्या गेले आहे. संजयजींनी आभार मानलेत त्यावर आणखी हसू आले. तुमची चेष्टा करण्याचा हेतू निदान माझा तरी नाही. जेपी, शेंचुरीबद्दल उसाची मोळी दिली तरी चालेलसे दिसते.