मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा हे नविन सदस्याकरीता अडचणीचे तर ठरत नाहीये ना??

Sanjay Kokare · · काथ्याकूट
कालच मी मिपा चा सदस्य झालो. सदस्य झाल्या नंतर मी माझे लेख, कविता वैगेरे मिपा फळावर टाकल्या. मला वाटल येथील सर्वच जण अभ्यासु असतील व त्यांच्या कडुन मला चांगले मार्गदशन लाभेल. व मला माझ्या द्न्यानात अजुन भर टाकता येईल . म्हणुन मला माहीती नसलेल्या विषयावर माहीती मिळवण्यासाठी मी एक चर्चेसाठी एक विषय ही टाकला. मला त्या विषयाबद्दल मला जास्त माहीती नसल्यामुळे ती पोस्ट मी अत्यंत लहान टाकली होती. त्यामुळे संपादकानी ती पोस्ट अत्यंत लहान असल्याचे कारण सांगुन ती डिलीट केली.. मग मी नविन असल्यामुळे पोस्टींग करताना चुकुन स्पेच देण्याचे विसरलो व ती वर्हाडी भाषेतील कवीतेला विदर्भ वेगळा देउनच द्यावा या भाषेत प्रतिक्रिया देण्यात आल्या. मराठी माणसाबाबत टाकलेल्या लेखावर पण मराठी माणसाबाबत मराठी माणसालाच काही घेणे देणे आहे की नाही अश्या प्रकारचे प्रश्न निर्मान होणार्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या.. माझा लेखाखाली माझ नाव मी नित्य नियमाप्रमाने टाकले जेणेकरुन वाचणार्याला मला त्या लेखाबाबत संपर्क साधता यावा. परंतु याबाबत ही अनेक प्रश्न उठवले गेले.. परंतु हे सर्व होउनही मिपावर सर्व अत्यंत मदत करणारे लोक आहेत अस मला जाणवल.... काही चुकल्यास क्षमस्व

वाचने 30853 वाचनखूण प्रतिक्रिया 160

In reply to by जेपी

नाखु Tue, 01/20/2015 - 10:15
हाये. मागच्या वेळेला काही लोकांना पॅकेजम्धून फकस्त रिकाम्या काडेपेट्या आणि मेणबत्तीच्या फकस्त वाती मिळाल्या, शिवाय पेप्रात फोटु न्हायी. त्यामुळ्म इथंच जाहीर पणे मागणी मान्य करावी अशी पुन्हा एकदा विनंती.

In reply to by पैसा

मेणबत्ती काडेपेटीबरोबर जर का मफलर आणि मै हु कंपुबाज वाल्या टोप्या दिल्यात तर योग्य कमिशण देण्यात येईल!!! =))

विटेकर Tue, 01/20/2015 - 09:59
का रे त्या गरीब कोकराच्या मागे लागलाय ? की " संजय " नांव दिसले की तुमचे कि बोर्ड पेटून उठतात ? आणि ते " हेवन-वासी " झालेले नाहीत, ते "वन-वासी" झाले आहेत सं मं च्या कृपेने ! संजय मरते नही ( आनंद मरते नही च्या चालीवर वाचावे ) परत येतील ना तेव्हा बघून घेतील तुमच्याकडे ! संजय परतला की आम्ही सत्कार करणार आहोत शन्वारवाड्यावर ! तुम्हां सगळ्यांच्या अडेलतट्टूपणामुळे संम चा बुद्धीभेद झाला आणि बंदीचे पातक त्याम्च्या हातून घडले. मुळा- मुठेच्या स्नानानंतर संमं चे शुद्धीकरन देखील होईल त्यादिवशी. बारामतीकरांचे तस्लं पाणी वाहून गेल्यावर नदिला जेव्हा नवे जल येईल तेव्हाच हा जण्गी कार्यक्रम गेह्ण्यात येईल, अवास्तव काल्जी नको !) संजया , येशील कव परतुनी ?