Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 01/01/2015 - 13:34
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
मिपाकरांनो, प्रथमतः नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आधीचा धागा (http://www.misalpav.com/node/29818) ठरल्यापरमाणे मिपा संमेलन कशेळी, कर्जत जवळ होणार आहे. पुण्याहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.इस्पिक एक्का आणि वल्ली, ह्यांच्या संपर्क साधावा. मुंबईहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.कंजूस, श्री. नूलकर किंवा अजया ज्यांच्याशी संपर्क साधावा. ह्या संमेलनाचे एक खास वैशिष्ट म्हणजे, श्री. नुलकर आपल्याला "ओरीगामी"ची ओळख आणि काही प्रात्यक्षिके पण दाखवणार आहेत. मी आणि आम्ही काही मिपाकर १४ता. रात्री पासूनच संमेलनाच्या ठिकाणी असूच. नविन वर्षाच्या सुट्ट्या हातात असल्याने आणि बरेच दिवस म्हणजे तब्बल ४५ दिवस आधीच कल्पना दिल्याने, आरक्षण आणि प्लॅनिंग करायला जड जायला नको. आता माझा ह्या धाग्याशी संबंध संपला. तरीपण काही मदत लागली तर अवश्य कळवा. अरे हां..महत्वाची गोष्ट...... प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे. ठिकाण :वनविहार , ही एक फलोद्यान सहकारी(बागाईत शेतीचे प्लॉट) संस्था आहे. त्यात राहणे, जेवण इत्यादिची व्यवस्था एका प्लॉटमध्ये आहे. श्री शिवाजी ते करतात. काय आहे: लेणी(विहार), नदी, वन, मागे भिमाशंकर डोंगर, जवळ कोथळीगड (पेठचा किल्ला). प्रवेश फी :नाही. जेवण :नाश्ता, चहा, जेवण (वेज नॉनवेज). पार्किँग :भरपूर. राहणे :तीन खोल्या ४०० ते६००रु. संपर्क 9226093034 शिवाजी 0214683313 जावे कसे :नेरळ स्टे -१२किमी कशेळे जाणाऱ्या ६सिटर शेअररिक्षाने -कशेळे-१५रु+१२किमी जामरुघ जाणाऱ्या रिक्षाने १५रु -वनविहार. पुण्याच्या मिपाकरांना १२ ते ४ इतका कट्ट्यावर वेळ मिळेल. पुण्याकडून :सकाळची सह्याद्री थेट नेरळलाही थांबते. १०.००वाजता तिथून रिक्षा करून जागेवर ११.३०होतील. परत जाण्यासाठी कर्जतहून ६.००प्रगति/ डेक्कन क्वीन मिळेल. मुंबईकडून :नेरळसाठी खूप लोकल ट्रेनस आहेत. कोणीही अगोदर जाऊन खात्री करू शकता. राजमाचीवरून कोंडाणेला उतरल्यावरचे श्री अनिल/वसंत गोगटे यांचे वनविहार वेगळे आहे. तिथे आता त्यांनी एक अंबेजोगाईचे देउळ बांधले आहे. कर्जत-कशेळे-मरबाड या रस्त्याला नेरळ -कशेळे -जामरुघ रस्ता क्रॉस जातो. कशेळेहूनच आणखी एक रस्ता खांडस (भिमाशंकरसाठी)जातो.
  • Log in or register to post comments
  • 30080 views

प्रतिक्रिया

Submitted by पिंगू on गुरुवार, 01/01/2015 - 14:11

Permalink

मी मुंबईहून नक्कीच येईन.

मी मुंबईहून नक्कीच येईन. तसेही कशेळीला जायचे होतेच. कट्ट्याच्या निमित्ताने ते ही होईलच.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Fri, 01/16/2015 - 11:04

In reply to मी मुंबईहून नक्कीच येईन. by पिंगू

Permalink

नेरळ

नेरळ स्टँडावरुन हव्या तितक्या विक्रम रिक्षाची व्यवस्था करुन देवु शकतो. फक्त वेळ, इप्सित स्थळाचा पत्ता नी नग किती ते कळवा .
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 01/01/2015 - 14:12

Permalink

१४ ला रात्रिच येण्याचा इचार

१४ ला रात्रिच येण्याचा इचार हाय! .. फुडिल चर्चा रात्रि'वाल्यांशी ( ;) ) मेसेजात करनेत यील!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 01/01/2015 - 14:43

In reply to १४ ला रात्रिच येण्याचा इचार by अत्रुप्त आत्मा

Permalink

मी आहे रात्रकट्ट्याला

मी आहे रात्रकट्ट्याला ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on गुरुवार, 01/01/2015 - 14:27

Permalink

ज्याना या कट्टयाला यायचंय

ज्याना या कट्टयाला यायचंय त्यांनी कृपया इथे नावे द्यावी.त्याप्रमाणे बुकिंग करायचे आहे.अादल्या दिवशी रात्री येणार असल्यास तसेही लिहावे. इथे येणार्या मिपाकरांच्या नावाची यादी update करत राहु.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 01/16/2015 - 19:30

In reply to ज्याना या कट्टयाला यायचंय by अजया

Permalink

कशेळे वनविहार कट्ट्याला

कशेळे वनविहार कट्ट्याला रस्त्याने येण्यासाठी मार्ग १)मुंबईकडून दादर.. चेंबूर.. वाशी ..सीबिडी ..पनवेल.. पळस्पे ..{खोपोली रस्त्याने}.. अंबानी हॉस्पिटल .. कर्जतफाट्याला डावीकडे वळणे पुढे  प्रमाणे २)पुण्याकडून पुणे ..लोणावळा ..घाट उतरणे ..आडोशी बोगद्यानंतर एक्सप्रेसवे सोडून डावीकडचा खोपोली रस्ता घेणे.. खाली खालापूर नाका ..{पनवेल रस्त्याने} ..कर्जतफाट्याला उजवीकडे वळणे ..पुढे  प्रमाणे  कर्जत रोडने ..एन डी स्ट्युडिओ ..कर्जत रेल्वे ओवरब्रिजने पलिकडे ..आमराई नाका ..डावीकडे नदीपूल ओलांडून.. परत डावीकडे.. {कशेळे- कडाव- मुरबाड रोडने}.. कडाव गणपतिचे गाव.. कशेळे ..उजवीकडे {जामरुघ रस्त्याने} ..कोटिंबे अनिरुद्धबापूंचा मठ आंबिवली ..{डावीकडचा टेंभरे फाटा सोडून पुढे सरळ पाचशे मिटर्सवर}@वनविहार. ३) कल्याण डोंबिवलीकडून {शिळफाटा रस्त्याने} काटई नाक्याअगोदर डावीकडे ..{पाईपलाईन रोडने} अंबरनाथ एमआइडिसी ..बदलापूर ..{बदलापूर नेरळ रस्त्याने} नेरळ ..फाटक रे क्रॉसिँग करून ..{कशेळे रस्त्याने} कशेळे ..{जामरुघ रस्त्याने} आंबिवली ..@वनविहार.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 01/16/2015 - 20:31

In reply to कशेळे वनविहार कट्ट्याला by कंजूस

Permalink

४)अलिबाग/पेणकडून

४)अलिबाग/पेणकडून पेण-पनवेल रस्त्याने ..खारपाडा.. खाडी ओलांडल्यावर.. जिते.. आपटेफाट्याला उजवीकडे वळा.. आपटा ,आपटा रे॰ स्टे॰.. रसायनी रे॰ स्टे॰.. उजवीकडे वळून.. मोहापाडा ..दांडफाटा ..{पनवेल-खोपोली रस्त्याने उजवीकडे खोपोलीच्या दिशेने पुढे} कर्जतफाटा.. कर्जत रोडने ..एन डी स्ट्युडिओ ..कर्जत रेल्वे ओवरब्रिजने पलिकडे ..आमराई नाका ..डावीकडे नदीपूल ओलांडून.. परत डावीकडे.. {कशेळे- कडाव- मुरबाड रोडने}.. कडाव गणपतिचे गाव.. कशेळे ..उजवीकडे {जामरुघ रस्त्याने} ..कोटिंबे अनिरुद्धबापूंचा मठ आंबिवली ..{डावीकडचा टेंभरे फाटा सोडून पुढे सरळ पाचशे मिटर्सवर}@वनविहार.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Fri, 01/16/2015 - 20:56

In reply to ४)अलिबाग/पेणकडून by कंजूस

Permalink

ऐला कशेळे इकडं आहे होय! या

ऐला कशेळे इकडं आहे होय! या कडावच्या पलिकडे असलेलं वैजनाथ हे माझ्या आजोळचं मूळ गाव.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 01/01/2015 - 14:32

Permalink

काही स्पष्टीकरण हवेय ! मुवि !

मुवि साहेब, १) कशेळी ते तीर्थक्षेत्र आहे का ? २) काही जणच आदल्या रात्रीच कशासाठी ?सग्ळे मिपाकर का नकोत ? ३)आपपला खर्च हा बेसिस आदल्या रात्रीच्या " खर्चा" साठी आहे की दिवसा उजेडीच्या कट्ट्याचा ? आपले अविस्तर पत्र यावे . थोनलहा. आपला डोंबोली चा जावई.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 01/01/2015 - 15:07

In reply to काही स्पष्टीकरण हवेय ! मुवि ! by चौकटराजा

Permalink

सविस्तर पत्र कशाला? हेच जाहीर आमंत्रण आहे...

१) कशेळी ते तीर्थक्षेत्र आहे का ? १४ला रात्री पक्षी-तीर्थ २) काही जणच आदल्या रात्रीच कशासाठी ?सग्ळे मिपाकर का नकोत ? काही जणांना पक्षी-तीर्थ नको असते. ३)आपपला खर्च हा बेसिस आदल्या रात्रीच्या " खर्चा" साठी आहे की दिवसा उजेडीच्या कट्ट्याचा ? दोन्ही कट्ट्यांसाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by मनिमौ on गुरुवार, 01/01/2015 - 14:37

Permalink

मी येणार

माझी मुलगी पण आहे बरोबर. वय 2.5 चालेल का?.मी सकाळीच येईन.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on गुरुवार, 01/01/2015 - 15:03

In reply to मी येणार by मनिमौ

Permalink

हो,चालेल की.

हो,चालेल की.
  • Log in or register to post comments

Submitted by विनोद१८ on गुरुवार, 01/01/2015 - 14:38

Permalink

..आमचे नाव नोंदवा १४ रात्रीपासुन...!!!

जर काही बदल झालाच तर तसे आगाउ कळविण्यात येइल.
  • Log in or register to post comments

Submitted by रुस्तम on गुरुवार, 01/01/2015 - 14:51

Permalink

बुकींग किती दिवस आधी करावे लागणार आहे.

बुकींग किती दिवस आधी करावे लागणार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on गुरुवार, 01/01/2015 - 15:10

Permalink

आत्ताच शिवाजी यांच्याशी बोलणे

आत्ताच शिवाजी यांच्याशी बोलणे झाले. पंधरा जानेवारीपर्यंत बुकिंग करावे लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by बहारिन् चा खलिफा on गुरुवार, 01/01/2015 - 15:12

Permalink

१५ च्या कट्ट्याला नक्की येणार

१५ च्या कट्ट्याला नक्की येणार!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 01/01/2015 - 17:09

Permalink

मी सकाळी येईन

तिकीट काढू ना?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 01/01/2015 - 17:25

In reply to मी सकाळी येईन by पैसा

Permalink

होय...

तुम्ही पुणे मार्गे येणार की मुंबई मार्गे?
  • Log in or register to post comments

Submitted by त्रिवेणी on गुरुवार, 01/01/2015 - 18:03

Permalink

मी पण येईन.

मी पण येईन.
  • Log in or register to post comments

Submitted by समिर२० on Fri, 01/02/2015 - 03:01

Permalink

१४ ला रात्रिच येण्याचा इचार

१४ ला रात्रिच येण्याचा इचार हाय! ..
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 01/02/2015 - 08:27

In reply to १४ ला रात्रिच येण्याचा इचार by समिर२०

Permalink

स्वागत...

नक्की या...
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 01/02/2015 - 03:39

Permalink

जबरा कट्टा होणार असे दीसतेय !

जबरा कट्टा होणार असे दीसतेय !! शुभेच्छा ..
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 01/02/2015 - 08:45

Permalink

कट्ट्यास शुभेच्छा. सुट्टी

कट्ट्यास शुभेच्छा. सुट्टी मिळेल की नाही हे आत्तचं सांगु शकत नाही. पण १४ पासुन यायची मात्र इच्छा आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 01/02/2015 - 08:58

Permalink

PUNE SAT)

PUNE SAT) पुण्याकडून शनिवारी येणाऱ्यांनी १)शक्यतो दुपारी पावणे बाराच्या पुणे-भुसावळ एक्सप्रेसने दोन वाजता कर्जतला उतरा (पुणे-कर्जत रेजर्वेशन काढा.)[या गाडीचे पुणे -कल्याण रेज तिकिट कर्जतला उतरून पुढे नेरळला जाण्यास व्हैलिड नाही.]अनरिजर्वड पुणे -नेरळ काढले तर रेजच्या डब्यात १५ रुभरून कर्जत करून घ्यायचे . २)लोकलचे नेरळ तिकिट काढून सिएसटी लोकलने नेरळला उतरा. पलिकडच्या प्लैटफॉर्मवर पुलावरून जा. पुढच्या बाजूस बाहेर पडा. 3)साडेतीनच्या डेक्कन एकसप्रेस ने येऊ नका फारच अंधार होईल आणि कर्जत हून६.२०च्या सिएसटी गाडीस फारच गर्दी असते. PUNE SUNDAY १)सकाळी ७.००ची सह्याद्री इक्सप्रेसचे (11024) पुणे/शिवाजीनगर/पिंपरी ते नेरळ थेट स्लीपरचे रेझ मिळेल आणि १०.००वाजता नेरळलाच उतराल २)कट्टयाहून तीनला निघाल्यावर नेरळ स्टे ला ५.००ची कर्जत गाडी मिळून ६.0८ची कर्जतला प्रगति इक्स (12125)मिळेल
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 01/02/2015 - 09:00

Permalink

MUMBAI /THANE/KALYAN)मुंबई

MUMBAI /THANE/KALYAN)मुंबई ठाणे कल्याणकडून येणारे: १)कर्जत/खोपोली लोकलने नेरळ स्टे ला उतरा. २)त्याच प्लैटफॉर्मच्या मागच्या बाजूस (कल्याण एंड)बाहेर पडा पाच मिनीटात बस/रिक्षा अड्डा येईल. ३)कशेळे कडे जाणाऱ्या ६सिटर शेअर रिक्षाने कशेळे जा. ४)इथून जामरूघ कडे जाणाऱ्या रिक्षाने वनविहार सांगा. वनविहारची कमान/ प्रवेशद्वारापाशीच रिक्षा थांबवेल. ५)उजवीकडचे कोपऱ्यात पहिलेच घर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Fri, 01/02/2015 - 10:39

Permalink

आई गं !

कशेळेपासुन ४ किमी वर सुगवे येथे( इथुन भिमाशंकर जायला फाटा फुटतो ...खांडस फाटा) इ. ६ वी ते ११ वी शिकताना रहात होतो आणी कशेळे येथे माझे हाय्स्कुलचे शिक्षण झालेय. (कोणाला मोहाची घ्यायची आहे का ?) मय ये कट्टा भौत मिस क्रुंगा. (इथे रडणारा बाहुला इमॅजिन कर्नेका !)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 01/02/2015 - 10:50

In reply to आई गं ! by इरसाल

Permalink

(कोणाला मोहाची घ्यायची आहे का ?)

एकदा चाखून बघायची इच्छा आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 01/02/2015 - 12:16

In reply to (कोणाला मोहाची घ्यायची आहे का ?) by मुक्त विहारि

Permalink

मी २ थेंब घेईन

मी २ थेंब घेईन
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 01/02/2015 - 12:25

In reply to मी २ थेंब घेईन by टवाळ कार्टा

Permalink

मोह वाईट..

मोह वाईट..
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 01/02/2015 - 13:30

In reply to मोह वाईट.. by गवि

Permalink

मोह वाईट..

पण मोहाची दारू हा अपवाद..
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Sat, 01/03/2015 - 07:32

In reply to मोह वाईट.. by मुक्त विहारि

Permalink

म्हण्जे ...

"मोहा" आपल्या हाताने पाजली असेल तर ...... काय ? तर ती वाईट नाही......
  • Log in or register to post comments

Submitted by पा पा on Fri, 01/02/2015 - 12:28

Permalink

मि पन ..... २ थेम्ब ....

घस्यात ओतनार ....
  • Log in or register to post comments

Submitted by पा पा on Fri, 01/02/2015 - 12:29

Permalink

पन नागपूर ला...

पन नागपूर ला...
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 01/02/2015 - 12:45

Permalink

अगोदर जाऊन आलेले दोघे तिघे

अगोदर जाऊन आलेले दोघे तिघे एकेका मुबई/पुण्याच्या गटाला नेरळ स्टेशनहून नेतील आणि फोनाफोनी होणार नाही. पंचवीस तीसजण येणार असतील तर कमीतकमी गोंधळ व्हावा अशासाठी सांगतो आहे.आणखी कोण वालंटिअर आहेत ते कळवा. जे पुणेकर रविवारी सकाळी साडेदहाला नेरळला येतील त्यांना मी घेऊन येतो.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 01/02/2015 - 12:55

In reply to अगोदर जाऊन आलेले दोघे तिघे by कंजूस

Permalink

जर आधी नीट ठरत असेल की किमान

जर आधी नीट ठरत असेल की किमान आठदहा जण नक्की येणार असं तर खरोखर मुंबई/ ठाणे इथून एक अन पुणे इथून एक अश्या रिटर्न बोलीवर सुमो / इनोव्हा बुक कराव्यात. थेट सुटसुटीत अन सोयीस्कर जाणे येणे. एकत्र असणे. शेअरिंग केल्यावर खर्च नक्की परवडेल आणि आपापले वेगवेगळे जाणे, तिथे शेअर रिक्षा शोधणे, रेल्वे बदलणे, ठराविक रिझर्वेशनवर अवलंबणे, तीन टप्पी प्रवास , लोकलांशी घासाघीस आणि अनिश्चितता हे सर्व टळेल
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 01/02/2015 - 13:29

In reply to जर आधी नीट ठरत असेल की किमान by गवि

Permalink

+ १

सहमत...
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 01/04/2015 - 16:01

In reply to जर आधी नीट ठरत असेल की किमान by गवि

Permalink

+१

हे नक्कीच खूप सोईस्कर होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Mon, 01/12/2015 - 18:29

In reply to जर आधी नीट ठरत असेल की किमान by गवि

Permalink

अशीच अरेंजमेंट ..

शेअरिंग केल्यावर खर्च नक्की परवडेल आणि आपापले वेगवेगळे जाणे, तिथे शेअर रिक्षा शोधणे, रेल्वे बदलणे, ठराविक रिझर्वेशनवर अवलंबणे, तीन टप्पी प्रवास , लोकलांशी घासाघीस आणि अनिश्चितता हे सर्व टळेल अशीच अरेंजमेट पुणेकरानी /चिंचवडकरानी ही करावी. पुणेकर मिपावाल्या कडे तिघा चौघांकडे चारचाकी असणारच. सगा, सावंत काका ई.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 01/15/2015 - 20:12

In reply to अशीच अरेंजमेंट .. by चौकटराजा

Permalink

काका,

काका, त्येंच्यात आमची बी सोय लावा. टपावर बसून येताव, सवय हाय. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Fri, 01/16/2015 - 05:04

In reply to काका, by अभ्या..

Permalink

त्यापेक्षा ..

त्यापेक्षा माझ्याकडे जालिम उपाय आहे. तू १० तारखेलाच माझ्याकडे चिंचवडला ये . आपण तहान लाडू भूक लाडू घेउन मजल दरमजल करीत कशेळीकडे कूच करू. वाटेत अनेक " सातवहन कालिन" धर्मशाळा आहेत. वल्लीने त्या आधीच दाखवून ठेवल्या आहेत. गुप्तकालीन पाणपोयाही आहेत. मला गाताही येते. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे इश्वर, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा गरीबो़ंकी सुनो ई ई . बाकी दोघानाही चित्रकला बर्‍यापैकी येते. गरज पडली तर रंगीत खडू कोळसा ई ने मारुति , साईबाबा ई चित्रे रस्त्यावर काढू. मस्त " कल्पक" सफर होईल. तू जमले तर जानेवलो जरा मुडके देखो मुझे किंवा जिंदगीकी ना टूटे लडी ही गाणी पाठ करून ठेव. म्हणजे मला मधून मधून रिलिफ मिळेल. हा का ना का.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Fri, 01/16/2015 - 10:37

In reply to त्यापेक्षा .. by चौकटराजा

Permalink

_/\_

_/\_
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 01/16/2015 - 12:26

In reply to त्यापेक्षा .. by चौकटराजा

Permalink

तुमचा मार्ग आणि वेळा कळवा.

तुमचा मार्ग आणि वेळा कळवा. फोटो काढायला कोणीतरी लागेलच... मी येतो. मिपाकट्ट्याला जाण्याच्या एका नव्या प्रयोगाचा साक्षीदार होण्याचा मोह आवरत नाहीय +D
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 01/16/2015 - 12:29

In reply to तुमचा मार्ग आणि वेळा कळवा. by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

एक्का साहेब फक्त फोटो नको या

एक्का साहेब फक्त फोटो नको या प्रसंगाचे व्हीडीओ शूटीग करा
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 01/16/2015 - 12:30

In reply to एक्का साहेब फक्त फोटो नको या by खटपट्या

Permalink

हरकत नाय !

हरकत नाय !
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 01/16/2015 - 12:35

In reply to हरकत नाय ! by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

MSG (मेसेंजर ऑफ गॉड) पेक्षा

MSG (मेसेंजर ऑफ गॉड) पेक्षा जास्त खळबळजनक पिच्चर बनण्याची ताक्द आहे या कथाबिजात ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 01/16/2015 - 13:05

In reply to MSG (मेसेंजर ऑफ गॉड) पेक्षा by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

बास्स बास्स्स.

चौराकाका, कट्टा आपल्याला स्पॉन्सर करायचा नाहीय्य्ये. ज्याचा त्यानी खर्च करणारेत.. उगी जास्त उत्पन्नाचे मार्ग सुचवू नका. मिपाकर स्वतःचे मनोरंजन करुन घ्यायला कुणालाही घोड्यावर चढवतील त्याचा नेम नै. :)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 01/16/2015 - 14:15

In reply to बास्स बास्स्स. by अभ्या..

Permalink

मिपाकर स्वतःचे मनोरंजन करुन

मिपाकर स्वतःचे मनोरंजन करुन घ्यायला कुणालाही घोड्यावर चढवतील त्याचा नेम नै. Smile
आण्भव कै? ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 01/19/2015 - 16:55

In reply to मिपाकर स्वतःचे मनोरंजन करुन by टवाळ कार्टा

Permalink

ट्क्या तू इचारतोस आण्भव काय??

ट्क्या तू इचारतोस आण्भव काय????? =)) =)) =)) लका उतर आधी अनाहिताद्वेष्ट्या घोड्यावरुन. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 01/19/2015 - 17:05

In reply to ट्क्या तू इचारतोस आण्भव काय?? by अभ्या..

Permalink

अर्रे...मला त्या घोड्यावर (का

अर्रे...मला त्या घोड्यावर (का हत्तिणीवर?) जबरदस्तीने "बशीवलेय" :( मी १ शांतताप्रिय मिपाकर आहे ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 01/19/2015 - 17:07

In reply to अर्रे...मला त्या घोड्यावर (का by टवाळ कार्टा

Permalink

मी १ शांतताप्रिय मिपाकर आहे

मी १ शांतताप्रिय मिपाकर आहे
म्हणूनच... =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com