✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

१५ फेब्रुवारी, मिपा संमेलन...कशेळी, कर्जत

म
मुक्त विहारि यांनी
गुरुवार, 01/01/2015 - 13:34  ·  लेख
लेख
मिपाकरांनो, प्रथमतः नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आधीचा धागा (http://www.misalpav.com/node/29818) ठरल्यापरमाणे मिपा संमेलन कशेळी, कर्जत जवळ होणार आहे. पुण्याहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.इस्पिक एक्का आणि वल्ली, ह्यांच्या संपर्क साधावा. मुंबईहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.कंजूस, श्री. नूलकर किंवा अजया ज्यांच्याशी संपर्क साधावा. ह्या संमेलनाचे एक खास वैशिष्ट म्हणजे, श्री. नुलकर आपल्याला "ओरीगामी"ची ओळख आणि काही प्रात्यक्षिके पण दाखवणार आहेत. मी आणि आम्ही काही मिपाकर १४ता. रात्री पासूनच संमेलनाच्या ठिकाणी असूच. नविन वर्षाच्या सुट्ट्या हातात असल्याने आणि बरेच दिवस म्हणजे तब्बल ४५ दिवस आधीच कल्पना दिल्याने, आरक्षण आणि प्लॅनिंग करायला जड जायला नको. आता माझा ह्या धाग्याशी संबंध संपला. तरीपण काही मदत लागली तर अवश्य कळवा. अरे हां..महत्वाची गोष्ट...... प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे. ठिकाण :वनविहार , ही एक फलोद्यान सहकारी(बागाईत शेतीचे प्लॉट) संस्था आहे. त्यात राहणे, जेवण इत्यादिची व्यवस्था एका प्लॉटमध्ये आहे. श्री शिवाजी ते करतात. काय आहे: लेणी(विहार), नदी, वन, मागे भिमाशंकर डोंगर, जवळ कोथळीगड (पेठचा किल्ला). प्रवेश फी :नाही. जेवण :नाश्ता, चहा, जेवण (वेज नॉनवेज). पार्किँग :भरपूर. राहणे :तीन खोल्या ४०० ते६००रु. संपर्क 9226093034 शिवाजी 0214683313 जावे कसे :नेरळ स्टे -१२किमी कशेळे जाणाऱ्या ६सिटर शेअररिक्षाने -कशेळे-१५रु+१२किमी जामरुघ जाणाऱ्या रिक्षाने १५रु -वनविहार. पुण्याच्या मिपाकरांना १२ ते ४ इतका कट्ट्यावर वेळ मिळेल. पुण्याकडून :सकाळची सह्याद्री थेट नेरळलाही थांबते. १०.००वाजता तिथून रिक्षा करून जागेवर ११.३०होतील. परत जाण्यासाठी कर्जतहून ६.००प्रगति/ डेक्कन क्वीन मिळेल. मुंबईकडून :नेरळसाठी खूप लोकल ट्रेनस आहेत. कोणीही अगोदर जाऊन खात्री करू शकता. राजमाचीवरून कोंडाणेला उतरल्यावरचे श्री अनिल/वसंत गोगटे यांचे वनविहार वेगळे आहे. तिथे आता त्यांनी एक अंबेजोगाईचे देउळ बांधले आहे. कर्जत-कशेळे-मरबाड या रस्त्याला नेरळ -कशेळे -जामरुघ रस्ता क्रॉस जातो. कशेळेहूनच आणखी एक रस्ता खांडस (भिमाशंकरसाठी)जातो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
30080 वाचन

💬 प्रतिसाद (205)

प्रतिक्रिया

मी मुंबईहून नक्कीच येईन.

पिंगू
गुरुवार, 01/01/2015 - 14:11 नवीन
मी मुंबईहून नक्कीच येईन. तसेही कशेळीला जायचे होतेच. कट्ट्याच्या निमित्ताने ते ही होईलच.
  • Log in or register to post comments

नेरळ

इरसाल
Fri, 01/16/2015 - 11:04 नवीन
नेरळ स्टँडावरुन हव्या तितक्या विक्रम रिक्षाची व्यवस्था करुन देवु शकतो. फक्त वेळ, इप्सित स्थळाचा पत्ता नी नग किती ते कळवा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

१४ ला रात्रिच येण्याचा इचार

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/01/2015 - 14:12 नवीन
१४ ला रात्रिच येण्याचा इचार हाय! .. फुडिल चर्चा रात्रि'वाल्यांशी ( ;) ) मेसेजात करनेत यील!
  • Log in or register to post comments

मी आहे रात्रकट्ट्याला

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/01/2015 - 14:43 नवीन
मी आहे रात्रकट्ट्याला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ज्याना या कट्टयाला यायचंय

अजया
गुरुवार, 01/01/2015 - 14:27 नवीन
ज्याना या कट्टयाला यायचंय त्यांनी कृपया इथे नावे द्यावी.त्याप्रमाणे बुकिंग करायचे आहे.अादल्या दिवशी रात्री येणार असल्यास तसेही लिहावे. इथे येणार्या मिपाकरांच्या नावाची यादी update करत राहु.
  • Log in or register to post comments

कशेळे वनविहार कट्ट्याला

कंजूस
Fri, 01/16/2015 - 19:30 नवीन
कशेळे वनविहार कट्ट्याला रस्त्याने येण्यासाठी मार्ग १)मुंबईकडून दादर.. चेंबूर.. वाशी ..सीबिडी ..पनवेल.. पळस्पे ..{खोपोली रस्त्याने}.. अंबानी हॉस्पिटल .. कर्जतफाट्याला डावीकडे वळणे पुढे  प्रमाणे २)पुण्याकडून पुणे ..लोणावळा ..घाट उतरणे ..आडोशी बोगद्यानंतर एक्सप्रेसवे सोडून डावीकडचा खोपोली रस्ता घेणे.. खाली खालापूर नाका ..{पनवेल रस्त्याने} ..कर्जतफाट्याला उजवीकडे वळणे ..पुढे  प्रमाणे  कर्जत रोडने ..एन डी स्ट्युडिओ ..कर्जत रेल्वे ओवरब्रिजने पलिकडे ..आमराई नाका ..डावीकडे नदीपूल ओलांडून.. परत डावीकडे.. {कशेळे- कडाव- मुरबाड रोडने}.. कडाव गणपतिचे गाव.. कशेळे ..उजवीकडे {जामरुघ रस्त्याने} ..कोटिंबे अनिरुद्धबापूंचा मठ आंबिवली ..{डावीकडचा टेंभरे फाटा सोडून पुढे सरळ पाचशे मिटर्सवर}@वनविहार. ३) कल्याण डोंबिवलीकडून {शिळफाटा रस्त्याने} काटई नाक्याअगोदर डावीकडे ..{पाईपलाईन रोडने} अंबरनाथ एमआइडिसी ..बदलापूर ..{बदलापूर नेरळ रस्त्याने} नेरळ ..फाटक रे क्रॉसिँग करून ..{कशेळे रस्त्याने} कशेळे ..{जामरुघ रस्त्याने} आंबिवली ..@वनविहार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

४)अलिबाग/पेणकडून

कंजूस
Fri, 01/16/2015 - 20:31 नवीन
४)अलिबाग/पेणकडून पेण-पनवेल रस्त्याने ..खारपाडा.. खाडी ओलांडल्यावर.. जिते.. आपटेफाट्याला उजवीकडे वळा.. आपटा ,आपटा रे॰ स्टे॰.. रसायनी रे॰ स्टे॰.. उजवीकडे वळून.. मोहापाडा ..दांडफाटा ..{पनवेल-खोपोली रस्त्याने उजवीकडे खोपोलीच्या दिशेने पुढे} कर्जतफाटा.. कर्जत रोडने ..एन डी स्ट्युडिओ ..कर्जत रेल्वे ओवरब्रिजने पलिकडे ..आमराई नाका ..डावीकडे नदीपूल ओलांडून.. परत डावीकडे.. {कशेळे- कडाव- मुरबाड रोडने}.. कडाव गणपतिचे गाव.. कशेळे ..उजवीकडे {जामरुघ रस्त्याने} ..कोटिंबे अनिरुद्धबापूंचा मठ आंबिवली ..{डावीकडचा टेंभरे फाटा सोडून पुढे सरळ पाचशे मिटर्सवर}@वनविहार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

ऐला कशेळे इकडं आहे होय! या

आदूबाळ
Fri, 01/16/2015 - 20:56 नवीन
ऐला कशेळे इकडं आहे होय! या कडावच्या पलिकडे असलेलं वैजनाथ हे माझ्या आजोळचं मूळ गाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

काही स्पष्टीकरण हवेय ! मुवि !

चौकटराजा
गुरुवार, 01/01/2015 - 14:32 नवीन
मुवि साहेब, १) कशेळी ते तीर्थक्षेत्र आहे का ? २) काही जणच आदल्या रात्रीच कशासाठी ?सग्ळे मिपाकर का नकोत ? ३)आपपला खर्च हा बेसिस आदल्या रात्रीच्या " खर्चा" साठी आहे की दिवसा उजेडीच्या कट्ट्याचा ? आपले अविस्तर पत्र यावे . थोनलहा. आपला डोंबोली चा जावई.
  • Log in or register to post comments

सविस्तर पत्र कशाला? हेच जाहीर आमंत्रण आहे...

मुक्त विहारि
गुरुवार, 01/01/2015 - 15:07 नवीन
१) कशेळी ते तीर्थक्षेत्र आहे का ? १४ला रात्री पक्षी-तीर्थ २) काही जणच आदल्या रात्रीच कशासाठी ?सग्ळे मिपाकर का नकोत ? काही जणांना पक्षी-तीर्थ नको असते. ३)आपपला खर्च हा बेसिस आदल्या रात्रीच्या " खर्चा" साठी आहे की दिवसा उजेडीच्या कट्ट्याचा ? दोन्ही कट्ट्यांसाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मी येणार

मनिमौ
गुरुवार, 01/01/2015 - 14:37 नवीन
माझी मुलगी पण आहे बरोबर. वय 2.5 चालेल का?.मी सकाळीच येईन.
  • Log in or register to post comments

हो,चालेल की.

अजया
गुरुवार, 01/01/2015 - 15:03 नवीन
हो,चालेल की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिमौ

..आमचे नाव नोंदवा १४ रात्रीपासुन...!!!

विनोद१८
गुरुवार, 01/01/2015 - 14:38 नवीन
जर काही बदल झालाच तर तसे आगाउ कळविण्यात येइल.
  • Log in or register to post comments

बुकींग किती दिवस आधी करावे लागणार आहे.

रुस्तम
गुरुवार, 01/01/2015 - 14:51 नवीन
बुकींग किती दिवस आधी करावे लागणार आहे.
  • Log in or register to post comments

आत्ताच शिवाजी यांच्याशी बोलणे

अजया
गुरुवार, 01/01/2015 - 15:10 नवीन
आत्ताच शिवाजी यांच्याशी बोलणे झाले. पंधरा जानेवारीपर्यंत बुकिंग करावे लागेल.
  • Log in or register to post comments

१५ च्या कट्ट्याला नक्की येणार

बहारिन् चा खलिफा
गुरुवार, 01/01/2015 - 15:12 नवीन
१५ च्या कट्ट्याला नक्की येणार!
  • Log in or register to post comments

मी सकाळी येईन

पैसा
गुरुवार, 01/01/2015 - 17:09 नवीन
तिकीट काढू ना?
  • Log in or register to post comments

होय...

मुक्त विहारि
गुरुवार, 01/01/2015 - 17:25 नवीन
तुम्ही पुणे मार्गे येणार की मुंबई मार्गे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी पण येईन.

त्रिवेणी
गुरुवार, 01/01/2015 - 18:03 नवीन
मी पण येईन.
  • Log in or register to post comments

१४ ला रात्रिच येण्याचा इचार

समिर२०
Fri, 01/02/2015 - 03:01 नवीन
१४ ला रात्रिच येण्याचा इचार हाय! ..
  • Log in or register to post comments

स्वागत...

मुक्त विहारि
Fri, 01/02/2015 - 08:27 नवीन
नक्की या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समिर२०

जबरा कट्टा होणार असे दीसतेय !

खटपट्या
Fri, 01/02/2015 - 03:39 नवीन
जबरा कट्टा होणार असे दीसतेय !! शुभेच्छा ..
  • Log in or register to post comments

कट्ट्यास शुभेच्छा. सुट्टी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 01/02/2015 - 08:45 नवीन
कट्ट्यास शुभेच्छा. सुट्टी मिळेल की नाही हे आत्तचं सांगु शकत नाही. पण १४ पासुन यायची मात्र इच्छा आहे...
  • Log in or register to post comments

PUNE SAT)

कंजूस
Fri, 01/02/2015 - 08:58 नवीन
PUNE SAT) पुण्याकडून शनिवारी येणाऱ्यांनी १)शक्यतो दुपारी पावणे बाराच्या पुणे-भुसावळ एक्सप्रेसने दोन वाजता कर्जतला उतरा (पुणे-कर्जत रेजर्वेशन काढा.)[या गाडीचे पुणे -कल्याण रेज तिकिट कर्जतला उतरून पुढे नेरळला जाण्यास व्हैलिड नाही.]अनरिजर्वड पुणे -नेरळ काढले तर रेजच्या डब्यात १५ रुभरून कर्जत करून घ्यायचे . २)लोकलचे नेरळ तिकिट काढून सिएसटी लोकलने नेरळला उतरा. पलिकडच्या प्लैटफॉर्मवर पुलावरून जा. पुढच्या बाजूस बाहेर पडा. 3)साडेतीनच्या डेक्कन एकसप्रेस ने येऊ नका फारच अंधार होईल आणि कर्जत हून६.२०च्या सिएसटी गाडीस फारच गर्दी असते. PUNE SUNDAY १)सकाळी ७.००ची सह्याद्री इक्सप्रेसचे (11024) पुणे/शिवाजीनगर/पिंपरी ते नेरळ थेट स्लीपरचे रेझ मिळेल आणि १०.००वाजता नेरळलाच उतराल २)कट्टयाहून तीनला निघाल्यावर नेरळ स्टे ला ५.००ची कर्जत गाडी मिळून ६.0८ची कर्जतला प्रगति इक्स (12125)मिळेल
  • Log in or register to post comments

MUMBAI /THANE/KALYAN)मुंबई

कंजूस
Fri, 01/02/2015 - 09:00 नवीन
MUMBAI /THANE/KALYAN)मुंबई ठाणे कल्याणकडून येणारे: १)कर्जत/खोपोली लोकलने नेरळ स्टे ला उतरा. २)त्याच प्लैटफॉर्मच्या मागच्या बाजूस (कल्याण एंड)बाहेर पडा पाच मिनीटात बस/रिक्षा अड्डा येईल. ३)कशेळे कडे जाणाऱ्या ६सिटर शेअर रिक्षाने कशेळे जा. ४)इथून जामरूघ कडे जाणाऱ्या रिक्षाने वनविहार सांगा. वनविहारची कमान/ प्रवेशद्वारापाशीच रिक्षा थांबवेल. ५)उजवीकडचे कोपऱ्यात पहिलेच घर आहे.
  • Log in or register to post comments

आई गं !

इरसाल
Fri, 01/02/2015 - 10:39 नवीन
कशेळेपासुन ४ किमी वर सुगवे येथे( इथुन भिमाशंकर जायला फाटा फुटतो ...खांडस फाटा) इ. ६ वी ते ११ वी शिकताना रहात होतो आणी कशेळे येथे माझे हाय्स्कुलचे शिक्षण झालेय. (कोणाला मोहाची घ्यायची आहे का ?) मय ये कट्टा भौत मिस क्रुंगा. (इथे रडणारा बाहुला इमॅजिन कर्नेका !)
  • Log in or register to post comments

(कोणाला मोहाची घ्यायची आहे का ?)

मुक्त विहारि
Fri, 01/02/2015 - 10:50 नवीन
एकदा चाखून बघायची इच्छा आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

मी २ थेंब घेईन

टवाळ कार्टा
Fri, 01/02/2015 - 12:16 नवीन
मी २ थेंब घेईन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मोह वाईट..

गवि
Fri, 01/02/2015 - 12:25 नवीन
मोह वाईट..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मोह वाईट..

मुक्त विहारि
Fri, 01/02/2015 - 13:30 नवीन
पण मोहाची दारू हा अपवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

म्हण्जे ...

चौकटराजा
Sat, 01/03/2015 - 07:32 नवीन
"मोहा" आपल्या हाताने पाजली असेल तर ...... काय ? तर ती वाईट नाही......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मि पन ..... २ थेम्ब ....

पा पा
Fri, 01/02/2015 - 12:28 नवीन
घस्यात ओतनार ....
  • Log in or register to post comments

पन नागपूर ला...

पा पा
Fri, 01/02/2015 - 12:29 नवीन
पन नागपूर ला...
  • Log in or register to post comments

अगोदर जाऊन आलेले दोघे तिघे

कंजूस
Fri, 01/02/2015 - 12:45 नवीन
अगोदर जाऊन आलेले दोघे तिघे एकेका मुबई/पुण्याच्या गटाला नेरळ स्टेशनहून नेतील आणि फोनाफोनी होणार नाही. पंचवीस तीसजण येणार असतील तर कमीतकमी गोंधळ व्हावा अशासाठी सांगतो आहे.आणखी कोण वालंटिअर आहेत ते कळवा. जे पुणेकर रविवारी सकाळी साडेदहाला नेरळला येतील त्यांना मी घेऊन येतो.
  • Log in or register to post comments

जर आधी नीट ठरत असेल की किमान

गवि
Fri, 01/02/2015 - 12:55 नवीन
जर आधी नीट ठरत असेल की किमान आठदहा जण नक्की येणार असं तर खरोखर मुंबई/ ठाणे इथून एक अन पुणे इथून एक अश्या रिटर्न बोलीवर सुमो / इनोव्हा बुक कराव्यात. थेट सुटसुटीत अन सोयीस्कर जाणे येणे. एकत्र असणे. शेअरिंग केल्यावर खर्च नक्की परवडेल आणि आपापले वेगवेगळे जाणे, तिथे शेअर रिक्षा शोधणे, रेल्वे बदलणे, ठराविक रिझर्वेशनवर अवलंबणे, तीन टप्पी प्रवास , लोकलांशी घासाघीस आणि अनिश्चितता हे सर्व टळेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

+ १

मुक्त विहारि
Fri, 01/02/2015 - 13:29 नवीन
सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+१

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 01/04/2015 - 16:01 नवीन
हे नक्कीच खूप सोईस्कर होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अशीच अरेंजमेंट ..

चौकटराजा
Mon, 01/12/2015 - 18:29 नवीन
शेअरिंग केल्यावर खर्च नक्की परवडेल आणि आपापले वेगवेगळे जाणे, तिथे शेअर रिक्षा शोधणे, रेल्वे बदलणे, ठराविक रिझर्वेशनवर अवलंबणे, तीन टप्पी प्रवास , लोकलांशी घासाघीस आणि अनिश्चितता हे सर्व टळेल अशीच अरेंजमेट पुणेकरानी /चिंचवडकरानी ही करावी. पुणेकर मिपावाल्या कडे तिघा चौघांकडे चारचाकी असणारच. सगा, सावंत काका ई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

काका,

अभ्या..
गुरुवार, 01/15/2015 - 20:12 नवीन
काका, त्येंच्यात आमची बी सोय लावा. टपावर बसून येताव, सवय हाय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

त्यापेक्षा ..

चौकटराजा
Fri, 01/16/2015 - 05:04 नवीन
त्यापेक्षा माझ्याकडे जालिम उपाय आहे. तू १० तारखेलाच माझ्याकडे चिंचवडला ये . आपण तहान लाडू भूक लाडू घेउन मजल दरमजल करीत कशेळीकडे कूच करू. वाटेत अनेक " सातवहन कालिन" धर्मशाळा आहेत. वल्लीने त्या आधीच दाखवून ठेवल्या आहेत. गुप्तकालीन पाणपोयाही आहेत. मला गाताही येते. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे इश्वर, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा गरीबो़ंकी सुनो ई ई . बाकी दोघानाही चित्रकला बर्‍यापैकी येते. गरज पडली तर रंगीत खडू कोळसा ई ने मारुति , साईबाबा ई चित्रे रस्त्यावर काढू. मस्त " कल्पक" सफर होईल. तू जमले तर जानेवलो जरा मुडके देखो मुझे किंवा जिंदगीकी ना टूटे लडी ही गाणी पाठ करून ठेव. म्हणजे मला मधून मधून रिलिफ मिळेल. हा का ना का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

_/\_

अजया
Fri, 01/16/2015 - 10:37 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

तुमचा मार्ग आणि वेळा कळवा.

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/16/2015 - 12:26 नवीन
तुमचा मार्ग आणि वेळा कळवा. फोटो काढायला कोणीतरी लागेलच... मी येतो. मिपाकट्ट्याला जाण्याच्या एका नव्या प्रयोगाचा साक्षीदार होण्याचा मोह आवरत नाहीय +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

एक्का साहेब फक्त फोटो नको या

खटपट्या
Fri, 01/16/2015 - 12:29 नवीन
एक्का साहेब फक्त फोटो नको या प्रसंगाचे व्हीडीओ शूटीग करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हरकत नाय !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/16/2015 - 12:30 नवीन
हरकत नाय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

MSG (मेसेंजर ऑफ गॉड) पेक्षा

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 01/16/2015 - 12:35 नवीन
MSG (मेसेंजर ऑफ गॉड) पेक्षा जास्त खळबळजनक पिच्चर बनण्याची ताक्द आहे या कथाबिजात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

बास्स बास्स्स.

अभ्या..
Fri, 01/16/2015 - 13:05 नवीन
चौराकाका, कट्टा आपल्याला स्पॉन्सर करायचा नाहीय्य्ये. ज्याचा त्यानी खर्च करणारेत.. उगी जास्त उत्पन्नाचे मार्ग सुचवू नका. मिपाकर स्वतःचे मनोरंजन करुन घ्यायला कुणालाही घोड्यावर चढवतील त्याचा नेम नै. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मिपाकर स्वतःचे मनोरंजन करुन

टवाळ कार्टा
Fri, 01/16/2015 - 14:15 नवीन
मिपाकर स्वतःचे मनोरंजन करुन घ्यायला कुणालाही घोड्यावर चढवतील त्याचा नेम नै. Smile
आण्भव कै? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ट्क्या तू इचारतोस आण्भव काय??

अभ्या..
Mon, 01/19/2015 - 16:55 नवीन
ट्क्या तू इचारतोस आण्भव काय????? =)) =)) =)) लका उतर आधी अनाहिताद्वेष्ट्या घोड्यावरुन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अर्रे...मला त्या घोड्यावर (का

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 17:05 नवीन
अर्रे...मला त्या घोड्यावर (का हत्तिणीवर?) जबरदस्तीने "बशीवलेय" :( मी १ शांतताप्रिय मिपाकर आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मी १ शांतताप्रिय मिपाकर आहे

अभ्या..
Mon, 01/19/2015 - 17:07 नवीन
मी १ शांतताप्रिय मिपाकर आहे
म्हणूनच... =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा