Skip to main content

१५ फेब्रुवारी, मिपा संमेलन...कशेळी, कर्जत

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 01/01/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो, प्रथमतः नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आधीचा धागा (http://www.misalpav.com/node/29818) ठरल्यापरमाणे मिपा संमेलन कशेळी, कर्जत जवळ होणार आहे. पुण्याहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.इस्पिक एक्का आणि वल्ली, ह्यांच्या संपर्क साधावा. मुंबईहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.कंजूस, श्री. नूलकर किंवा अजया ज्यांच्याशी संपर्क साधावा. ह्या संमेलनाचे एक खास वैशिष्ट म्हणजे, श्री. नुलकर आपल्याला "ओरीगामी"ची ओळख आणि काही प्रात्यक्षिके पण दाखवणार आहेत. मी आणि आम्ही काही मिपाकर १४ता. रात्री पासूनच संमेलनाच्या ठिकाणी असूच. नविन वर्षाच्या सुट्ट्या हातात असल्याने आणि बरेच दिवस म्हणजे तब्बल ४५ दिवस आधीच कल्पना दिल्याने, आरक्षण आणि प्लॅनिंग करायला जड जायला नको. आता माझा ह्या धाग्याशी संबंध संपला. तरीपण काही मदत लागली तर अवश्य कळवा. अरे हां..महत्वाची गोष्ट...... प्रत्येकाने आपापला खर्च करायचा आहे. ठिकाण :वनविहार , ही एक फलोद्यान सहकारी(बागाईत शेतीचे प्लॉट) संस्था आहे. त्यात राहणे, जेवण इत्यादिची व्यवस्था एका प्लॉटमध्ये आहे. श्री शिवाजी ते करतात. काय आहे: लेणी(विहार), नदी, वन, मागे भिमाशंकर डोंगर, जवळ कोथळीगड (पेठचा किल्ला). प्रवेश फी :नाही. जेवण :नाश्ता, चहा, जेवण (वेज नॉनवेज). पार्किँग :भरपूर. राहणे :तीन खोल्या ४०० ते६००रु. संपर्क 9226093034 शिवाजी 0214683313 जावे कसे :नेरळ स्टे -१२किमी कशेळे जाणाऱ्या ६सिटर शेअररिक्षाने -कशेळे-१५रु+१२किमी जामरुघ जाणाऱ्या रिक्षाने १५रु -वनविहार. पुण्याच्या मिपाकरांना १२ ते ४ इतका कट्ट्यावर वेळ मिळेल. पुण्याकडून :सकाळची सह्याद्री थेट नेरळलाही थांबते. १०.००वाजता तिथून रिक्षा करून जागेवर ११.३०होतील. परत जाण्यासाठी कर्जतहून ६.००प्रगति/ डेक्कन क्वीन मिळेल. मुंबईकडून :नेरळसाठी खूप लोकल ट्रेनस आहेत. कोणीही अगोदर जाऊन खात्री करू शकता. राजमाचीवरून कोंडाणेला उतरल्यावरचे श्री अनिल/वसंत गोगटे यांचे वनविहार वेगळे आहे. तिथे आता त्यांनी एक अंबेजोगाईचे देउळ बांधले आहे. कर्जत-कशेळे-मरबाड या रस्त्याला नेरळ -कशेळे -जामरुघ रस्ता क्रॉस जातो. कशेळेहूनच आणखी एक रस्ता खांडस (भिमाशंकरसाठी)जातो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 30138
प्रतिक्रिया 205

प्रतिक्रिया

रविवारी सकाळी शक्यतो बाईक ने येण्याचा विचार आहे, जर बरेच जन असतील आणि ते ट्रेन ने जाणार असतील सकाळी तर त्यांच्याबरोबर पण येईन. आमचे परम मित्र .. अआ आणि वल्लीशेट आदल्यादिवशी जात असल्याने आम्ही एकटे पडलो आहे.. कोण आहे काय सकाळच्याला जाणारे. हर्षद दिसत नाही रे आजकाल येथे

अात्तापर्यंत आलेली नावे मुवि सहकुटुंब विनोद १८सहकुटुंब भाते समिर२० डाॅ खरे सहकुटुंब मापं कंजूस नुलकर कुटुंब वल्ली सगा बुवा गणेशा अभ्या दोघे बोका ए आझम बाहरीनचा खलिफा अन्या दातार कॅप्टन जॅक स्पॅरो उर्फ वर लिहिलेले नाव! चौरा काका विजूभाऊ सुहास झेले टका पिंगु इस्पिकचा एक्का द रामदास काका स्वच्छंदी मनोज पैसा ताई अजया इनिगोय मनिमौ सुचेता

In reply to by टवाळ कार्टा

५ ओप्शन्स आहेत. १. पक्षी-तीर्थ वाले, २. पक्षी वाले ३. तीर्थ वाले. ४. फक्त शाकाहारी. ५. शनिवार असल्याने उपास करणारे. थोडक्यात सगळ्यांचे स्वागत आहे.

In reply to by अजया

पुण्याहून म्हण्जे त्यात सोलापूरकर( हे येणारेत ), इचलकरंजीकर ( हे आले तर) व पुण्याचे असे सगळे धरावे. तसेच कल्याण बाजूने येणारे त्यात कांदिवली , डोबूली सगळे. त्यातून दोन्ही गटातील रात्रीचे शिलेदार वजा करून यादी प्रसिद्ध करावी.म्हणजे ई ए नी म्हटल्या प्रमाणे १६ सीटर अशी काही गाडी पुण्याहूने आमच्या चिंचवड मार्गे १५/२ ला सकाळी आणता आली तर बरे ! रेलेवे पेक्षा खचे वाढेल पण पुढचा मेगा कट्टा २०१६ त असे मुविकडून अ‍ॅफेडेव्हिट घेउ !

कट्ट्याला येणार नक्की. पण कसं यायचं ते ठरत नाहीये. आदल्या रात्री यायचं तर दुकान बंद करायला उशीर झाला तर काय? आणि सकाळी यायचं तर उठायला उशीर झाला तर? रेल्वेनी, मोटार सायकलने कि कारने ते समजत नाहीये फार दिवस विचार करून डोक्याचा भुगा झाला. . रेल्वे ने हात हलवत येता येईल. पण नेरळ पासून कशेळी पर्यंत आणि परत लळत लोंबत यायला लागेल मोटार सायकलने बेस्ट आहे पण बायको कटकट करेल आणि क्यामेरा गळ्यात पडतो कार- चालवायचा कंटाळा येतो कोणता पर्याय सर्वात चांगला आहे तेच कळत नाही

In reply to by सुबोध खरे

तुमच्या सोईच्या दिवशी व वेळेला तेथे येणारा दुसरा चारचाकीवाला गाठा ! हाकानाका !! (इ-कॅब हा जरा खार्चिक पर्यायही आहे. ;) :) ) : इ ए फुक्टेअड्वायजर

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आठ-दहा जण जमले तर बराच आरामदायक आणि फारसा खार्चिक नसलेला खाजगी गाडीचा पर्यायही शक्य आहे.

ह्या कट्ट्याला विशेषतः मूवी ह्यांच्या भेटी न घेता येण्यामुळे प्रचंड मिस करणार आहे. इनोवो सारखी गाडी बुक करून एकत्र हसत खेळत गंमत जमंत करत जाण्याचा पर्याय खूप आवडला. कट्याचे लाइव अपडेट सचित्र देत राहणे

In reply to by टवाळ कार्टा

आणि मोबाइलवर लाइव्ह मॅच बघता येते. हिंदूस्थान जिंकला तर आनंदी आनंद आणि हरला तरी मिपाकर नक्कीच जिंकणार.

In reply to by मुक्त विहारि

मोबाइलवर लाइव्ह मॅच बघता येते.
पण नेटवर्क जाऊ शकतं, लोडशेडिंग होऊ शकतं, ३ग ऐवजी फक्त २ग च मिळू शकतं....काऽऽहीऽऽही होऊ शकतं!! वेंजॉय लोक्स !! *mosking*

मी येतोय. पण आदल्या दिवशी येणं शक्य नाही. सो १५ ला येईन. (अनिरुद्ध दातार) णोटीसः अनिरुद्ध (अन्या) दातार (मुळं गावः कोल्हापुर सद्ध्या मुक्काम निगडी प्राधिकरण) आणि मी अनिरुद्ध (अंड्या) दातार (निगडी प्राधिकरण बाय बर्थ) ह्या वेगवेगळ्या व्यक्ती असुन एकमेकांना भेटलेलो आहोत. त्याला माझा किंवा मला त्याचा डु-आयडी समजल्यास मि.पा. कलम ४२० अन्वये मिसळपाव पार्टी वसुल केली जाईल तसेचं खिसा रिकामा होईपर्यंत कोल्ड कॉफी प्यायली जैल. तस्मात दोन वेगवेगळ्या व्यक्ती मोजल्या जाव्यात ही णम्र विणंती. =)) आपलाच विणम्र (अनिरुद्ध (अंड्या) दातार)

In reply to by टवाळ कार्टा

मी एकालाच भेटलो असल्याने मला साक्षीसाठी कॉफीपानास हजर राहण्याचा ह्क्क (माझा कायदा कलम ९अ पोट्कलम ६ब सुधारीत दि ११.१.२०१५) आपोआप प्राप्त झाला आहे हे सविनय नमूद करतो. कॉफीचा साक्षीदार मु.पो.चिंचवड. तळटीपःचिंचवड संपादकांशी आम्ची जान्-पैचान आहे याची नोंद घ्यावी.

In reply to by नाखु

तो मी नव्हेचं!! पिं.चिं. च्या संपादकांची आणि आमची अजुन थेट ओळख नाही...फक्त लिखाण-वाचनातुन ओळख आहे. तस्मात कॉफीपानास त्यांनाही आमंत्रण द्यावे लागेल असं उपकलम ९अ पोटकलम खादाडी-पिदाडी विभाग ८च आहे. =)) (लखोबा लोखंडेचा आणि प्रभाकर पणशीकरांचा पंखा) अनिरुद्ध दातार, प्राधिकरण.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वर अजयातैंनी दिलेली लिस्ट वाचून तिथेच उपप्रतिसाद द्यायचे डोक्यात आले होते. पण इथे अंड्या दाताराने खुलासा (तोही दंविसं कलमासह) वाचून त्यास कचकून अनुमोदन देत आहे. टीप - वरील खुलाश्यावर शंका घेतल्यास वेगळी पार्टी वसूलण्यात येईल याची संबंधितांनी दखल घ्यावी ;)

In reply to by अन्या दातार

मी हल्लीच गोंधळले तुमच्या दोघांत. फोनवर बोलताना कोल्लापूरकर अन्या का 'कप्तान चिमणराव' हे पटकन समजलं नाही! मग चिंचवडकर संपादकाकडून खात्री करून घेतली. मात्र तेव्हा 'चिमणराव' पण निगडीकर हे माहीत नव्हतं. नाहीतर अजून कन्फूजन!!

ठाण्यातून / ठाण्याजवळून येणार्यांनी मला व्यनी करावा (सोबत स्वताचे वाहन असल्यास तेसुध्धा सांगा) जमले तर सगळे एकत्र जाउ

इतके प्रतिसाद! इतके मिपाकर या मिपा संमेलनाला येणार आहेत? चक्क स्पेशल "26" ... (घारापुरी कट्टा!) पेक्षा जास्त! लई भारी! कोण त्या कुठल्यातरी चेंडुफळी खेळाचा ऊल्लेख करतो आहे? (कृ.ह.घ्या.) तो चेंडुफळीचा खेळ आपल्याला तुनळी वर नंतर केव्हाही आणि कितीही वेळा बघता येईल ना! साक्षात कट्टा नियोजन अधिकारी आपल्याबरोबर असल्यावर आपण सगळे जण त्यापेक्षा नक्कीच जास्त मज्जा करू. कट्टा वृत्तांत, मिपाकरांचे (आणि खादाडीचे सुध्दा!) फोटो टाकुन कट्टयाला न आलेल्या / न येऊ शकलेल्या समस्त मिपाकरांना इनो घ्यायला लाऊ.

१००

कशेळे वनविहार कट्ट्याला रस्त्याने येण्यासाठी मार्ग १)मुंबईकडून दादर.. चेंबूर.. वाशी ..सीबिडी ..पनवेल.. पळस्पे ..{खोपोली रस्त्याने}.. अंबानी हॉस्पिटल .. कर्जतफाट्याला डावीकडे वळणे पुढे  प्रमाणे २)पुण्याकडून पुणे ..लोणावळा ..घाट उतरणे ..आडोशी बोगद्यानंतर एक्सप्रेसवे सोडून डावीकडचा खोपोली रस्ता घेणे.. खाली खालापूर नाका ..{पनवेल रस्त्याने} ..कर्जतफाट्याला उजवीकडे वळणे ..पुढे  प्रमाणे  कर्जत रोडने ..एन डी स्ट्युडिओ ..कर्जत रेल्वे ओवरब्रिजने पलिकडे ..आमराई नाका ..डावीकडे नदीपूल ओलांडून.. परत डावीकडे.. {कशेळे- कडाव- मुरबाड रोडने}.. कडाव गणपतिचे गाव.. कशेळे ..उजवीकडे {जामरुघ रस्त्याने} ..कोटिंबे अनिरुद्धबापूंचा मठ आंबिवली ..{डावीकडचा टेंभरे फाटा सोडून पुढे सरळ पाचशे मिटर्सवर}@वनविहार. ३) कल्याण डोंबिवलीकडून {शिळफाटा रस्त्याने} काटई नाक्याअगोदर डावीकडे ..{पाईपलाईन रोडने} अंबरनाथ एमआइडिसी ..बदलापूर ..{बदलापूर नेरळ रस्त्याने} नेरळ ..फाटक रे क्रॉसिँग करून ..{कशेळे रस्त्याने} कशेळे ..{जामरुघ रस्त्याने} आंबिवली ..@वनविहार.

In reply to by कंजूस

४)अलिबाग/पेणकडून पेण-पनवेल रस्त्याने ..खारपाडा.. खाडी ओलांडल्यावर.. जिते.. आपटेफाट्याला उजवीकडे वळा.. आपटा ,आपटा रे॰ स्टे॰.. रसायनी रे॰ स्टे॰.. उजवीकडे वळून.. मोहापाडा ..दांडफाटा ..{पनवेल-खोपोली रस्त्याने उजवीकडे खोपोलीच्या दिशेने पुढे} कर्जतफाटा.. कर्जत रोडने ..एन डी स्ट्युडिओ ..कर्जत रेल्वे ओवरब्रिजने पलिकडे ..आमराई नाका ..डावीकडे नदीपूल ओलांडून.. परत डावीकडे.. {कशेळे- कडाव- मुरबाड रोडने}.. कडाव गणपतिचे गाव.. कशेळे ..उजवीकडे {जामरुघ रस्त्याने} ..कोटिंबे अनिरुद्धबापूंचा मठ आंबिवली ..{डावीकडचा टेंभरे फाटा सोडून पुढे सरळ पाचशे मिटर्सवर}@वनविहार.

In reply to by कंजूस

. वरील चित्रात जिथे पिवळ्या रंगातील मार्ग ( डाव्या बाजूस) चालू होतो ते कशेळे गाव आहे. त्या गावात आणखी गौलवाडी कडून येणारा फिकट पिवळा मार्ग हा करजत-कशेळे व्हाया काडाव असा आहे. आता ठळक पिवळा मार्ग म्हणजे कशेळे- आंबिवली केव्ह असा १० किमी चा मार्ग व्हाया कोथिबे खणंद पिगळस असा आहे. हे वनविहार म्हणजे आंबिवली केव्ह हे ठिकाण आहे का ? असे असेल तर जीपीएस लावणे फार आवश्यक असणार आहे.

१५ तारखेला सकाळी सहकुटुंब कट्ट्याला येत आहे. स्वतः मोटार चालवत नेणार असशील तरच येईन असे सौ ने सांगितल्याने नाईलाज आहे. किती जण सहकुटुंब येत आहेत?

१५ ला येण्याचा प्रयत्न करतो. आदल्या दिवशी घरात समारंभ असल्याने दुसर्‍या दिवसाची खात्री नाही. आलो तर गाडीने येईन आणि कांदीवली - ठाणे अशा मार्गाने येईन.

वनविहारचे तारीख बुकिंग नक्की केले आहे.१४-१५ फेब्रुवारीसाठी.साधारण पन्नास माणसांची रहायची सोय होऊ शकते असे तिथल्या मॅनेजरने सांगीतले आहे.

१४ तारखेला भावाच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस आहे आणि १६ तारखेला मुलाचा १८ वा वाढदिवस आहे त्यामुळे १४ ला रात्री जमणार नाही. १५ ला सकाळी नक्की.

शेवटी तेच्च झाले. आमचा १३ ते २१चा परदेशी पलायनाचा प्लान झाल्याने हाही महाकट्टा हुकणार च्यामारी.. (दुःखी)SYG

In reply to by यसवायजी

परदेशी पलायनाचा प्लान झाल्याने हाही महाकट्टा हुकणार च्यामारी..(दुःखी)SYG
अरे दु:खी काय होतांयस? हा हुकला तर आणखी एक होईल कट्टा, परदेशी जावयाची संधी मिळणें महत्त्वाचें !! काय समजलांस?

येण्याची इच्छा बळावली आहे (रविवारी शिफ्ट लागली नाही ऑफीस मधे म्हणजे कट्टा पावला)...एवढे मीपकार येताहेत बघून. १५ तारखेला आल्यास किती खर्च होईल एका व्यक्तीचा ह्याचा अंदाज मिळाला तर बरे होईल. मी आलोच तर बहुतेक बाईकने प्रवास करायचा विचार आहे डोंबिवलीमधून.

In reply to by सूड

इंग्लीशाने कामाला दांडी मारली की ती झाली, "फ्रेंच लीव्ह" आणि तेच फ्रेंचाने केले तर ती झाली, "इंग्लिश लीव्ह" ! :)

In reply to by सूड

ते असं की घरातूनच एस्सेमेस करायचा आज तापानं फणफणलोय / डिसेंट्री लागलीय / चुलतआजोबा वारले / बायको पडलीय हात मोडलाय किंवा यापेक्षा अॅडव्हान्सड कुणाला माहिती असेल ते कारण *biggrin*

In reply to by सस्नेह

डिसेंट्री लागलीय हाच पर्याय सर्वोत्तम। दुसऱ्या दिवशी शिंकून/खोकून/कन्हू न दाखवावे लागत नाही। :D

In reply to by सस्नेह

कट्टाप्रवर्तक आणि कशेळी कर्जत परिसराचे माहितगार यांना उद्देशून प्रश्नः लेणी, गुंफा, कोरीवकाम, सातवाहन, गुप्त, पांडवकालीन दगडाचं काही आहे का त्या कट्ट्याच्या परिसरात. असेल तर इथे वर्णन करा. बघा..वल्लीचा इन्कार इकरारमधे बदलेल क्षणात. ;)

In reply to by गवि

आहे आहे. आंबिवली जवळच वनविहार म्हणुन बौद्धकालीन विहार आणी लेण्या आहेत. परत पेठचा किल्ला आहे तो वेगळाच. अति उत्साही मंडळी नंतर मांगी-तुंगीच्या भेटीलाही जावुन येवु शकतात. गवि इतके पुरेल का ?