साळंला सुट्टी पडली की दादा येतो.
न्हायतर तो तिकडं शेरात पोरांच्या संगट -हातोय.
आई, अण्णा, आज्जी त्याच्याच मागं असत्येत.
लाड करायला.
दादाची माज्यावर लई माया.
माजं तो आईकणार म्हन्जे धापैकी धा.
आज्जी म्हन्ली, "उठा आन्जाक्का”.
"दादा कुठंय?” म्या इचारलं.
“अण्णा गेलेत त्याला आणायला,” आज्जीबाई म्हन्ली.
"कायबी बोलू नग. राती दादाच्याच कुशीत झोपली व्हती,” म्या बोल्ली.
"दादा, दादू, दाद्या...” म्या बोलावलं. यीना तो.
आई आली. “रडू नकोस. दादा येतोय संध्याकाळी.”
"काल आला की” म्या पुन्ना बोल्ले.
“स्वप्न पडलं तुला दादा आल्याचं. खोटं असतं ते”, आई म्हन्ली.
खोटं?
मंग हेच सपान.
हेला कसं घालवायचं असतंय?
पुन्यांदा उलिसं झोपून?
* शतशब्दकथा
वाचने
10617
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
का लिहीता हो तुम्ही अशा कथा..
चालायचेच....
एक असेच, २/३ वर्षे उद्धस्थ झालेले कुटुंब आठवले.
छान.
आन्जीच्या मानानं आई खूपच शहरी वळणाचं बोलतेय. तेवढं एक वगळता बाकी कथा मस्त.
आधीच्या कथांत या संदर्भात
In reply to छान. by एस
आधीच्या कथांत या संदर्भात सूचक उल्लेख (विखुरलेले) आहेत.
मस्त
मस्त
मस्त
मस्त :)
मस्त !!
मस्त !!
स्वप्न आणि वास्तव याच्यातल्या
:)
स्वप्न आणि वास्तव याच्यातल्या सीमारेषा धूसर होण्याचा अनुभव आंजीला(ही) आला हे पाहून भारी वाटलं.
मस्त.आंजीला असं सक्काळी
मस्त.आंजीला असं सक्काळी सक्काळी भेटलं की लै ब्येस वाट्टं.
आंजीला असं सक्काळी सक्काळी भेटलं की लै ब्येस वाट्टं.
In reply to मस्त.आंजीला असं सक्काळी by अजया
पण ह्या स्वरूपात नको...
ह्या स्वरूपातली आंजी आता दिवसभर अस्वस्थ करणार.
मुवि, या कथेमुळे तुम्हाला
In reply to आंजीला असं सक्काळी सक्काळी भेटलं की लै ब्येस वाट्टं. by मुक्त विहारि
मुवि, या कथेमुळे तुम्हाला काही दुखरे क्षण आठवताहेत - त्याबद्दल मला माफ करा.
पण ही कथा फक्त ''स्वप्न'' याबद्दल आहे; enjoy :-)
असंच वाटलं होतं ...
In reply to मुवि, या कथेमुळे तुम्हाला by आतिवास
असंच वाटलं होतं ...
ही कथा पण आवडली !
या कथेमुळे तुम्हाला काही दुखरे क्षण आठवताहेत
In reply to मुवि, या कथेमुळे तुम्हाला by आतिवास
तेच त्या कथेचे यश आहे...
"जीवन फार क्षणभंगूर आहे."
आहे तो क्षण आनंदाने जगा. उद्याचा काय भरवसा?
कदाचित ह्या आंजूचे भावाचे पटत नसेल.तो मोठा असल्याने ह्या आंजूचे ऐकत पण नसेल.त्यामुळे तिला त्याचा राग पण येत असेल.
आणि तो गेल्या नंतर मात्र तिला भावाची कमतरता जाणवते.
एक उत्तम भावस्पर्शी चित्र उभे राहिले.
फार उत्तम लिहीले आहे.
मोजक्याच शब्दांत पण फार परीणामकारक...
मला कथा अतिशय आवडली.
माफी नका मागू....
उलट मीच धन्यवाद देतो....
"जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना."
मस्त!
मस्त!
सुंदर..
आन्जी म्हंजे निरागसता, धा पैकी धा..
खोटं?
खोटं?
मंग हेच सपान.
हेला कसं घालवायचं असतंय?
पुन्यांदा उलिसं झोपून?
किती निरागस आणि साधा उपाय. अशीच रहा आन्जे.
मस्त...
आन्जीप्रेमींमध्ये आता मी पण...
आन्जी नेहमीप्रमाणेच आवडली.
आन्जी नेहमीप्रमाणेच आवडली.
आन्जी येकलंबर!
आन्जी येकलंबर!
आभार
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
आन्जी जिंदाबाद !
आन्जी जिंदाबाद ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
China builds lighter tanks for Tibet border
Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF
Russia looks to boost defence ties with India
Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B
Auto bailout cost the US goverment $9.26B
Analysts foresee bad year for U.S. government bonds
Google Fiber services may launch in India soon
Telcos to make tough calls as spectrum war heats up
+++१११
In reply to आन्जी जिंदाबाद ! by मदनबाण
+++१११
हेला कसं घालवायचं असतंय?
पुन्यांदा उलिसं झोपून? >>> .... _/\_
मस्त!
डोळ्यावर पांघरूण ओढलं की भीती वाटणार्या सावल्या दिसेनाशा होतात तसंच हे!
आन्जी मस्तच..
आन्जी मस्तच..