Skip to main content

सपान

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 26/12/2014 02:56 या दिवशी प्रकाशित केले.
साळंला सुट्टी पडली की दादा येतो. न्हायतर तो तिकडं शेरात पोरांच्या संगट -हातोय. आई, अण्णा, आज्जी त्याच्याच मागं असत्येत. लाड करायला. दादाची माज्यावर लई माया. माजं तो आईकणार म्हन्जे धापैकी धा. आज्जी म्हन्ली, "उठा आन्जाक्का”. "दादा कुठंय?” म्या इचारलं. “अण्णा गेलेत त्याला आणायला,” आज्जीबाई म्हन्ली. "कायबी बोलू नग. राती दादाच्याच कुशीत झोपली व्हती,” म्या बोल्ली. "दादा, दादू, दाद्या...” म्या बोलावलं. यीना तो. आई आली. “रडू नकोस. दादा येतोय संध्याकाळी.” "काल आला की” म्या पुन्ना बोल्ले. “स्वप्न पडलं तुला दादा आल्याचं. खोटं असतं ते”, आई म्हन्ली. खोटं? मंग हेच सपान. हेला कसं घालवायचं असतंय? पुन्यांदा उलिसं झोपून? * शतशब्दकथा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10577
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

आन्जीच्या मानानं आई खूपच शहरी वळणाचं बोलतेय. तेवढं एक वगळता बाकी कथा मस्त.

मस्त :)

In reply to by अजया

पण ह्या स्वरूपात नको... ह्या स्वरूपातली आंजी आता दिवसभर अस्वस्थ करणार.

In reply to by मुक्त विहारि

मुवि, या कथेमुळे तुम्हाला काही दुखरे क्षण आठवताहेत - त्याबद्दल मला माफ करा. पण ही कथा फक्त ''स्वप्न'' याबद्दल आहे; enjoy :-)

In reply to by आतिवास

तेच त्या कथेचे यश आहे... "जीवन फार क्षणभंगूर आहे." आहे तो क्षण आनंदाने जगा. उद्याचा काय भरवसा? कदाचित ह्या आंजूचे भावाचे पटत नसेल.तो मोठा असल्याने ह्या आंजूचे ऐकत पण नसेल.त्यामुळे तिला त्याचा राग पण येत असेल. आणि तो गेल्या नंतर मात्र तिला भावाची कमतरता जाणवते. एक उत्तम भावस्पर्शी चित्र उभे राहिले. फार उत्तम लिहीले आहे. मोजक्याच शब्दांत पण फार परीणामकारक... मला कथा अतिशय आवडली. माफी नका मागू.... उलट मीच धन्यवाद देतो.... "जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना."

मस्त!

आन्जी म्हंजे निरागसता, धा पैकी धा..

खोटं? मंग हेच सपान. हेला कसं घालवायचं असतंय? पुन्यांदा उलिसं झोपून? किती निरागस आणि साधा उपाय. अशीच रहा आन्जे.

आन्जीप्रेमींमध्ये आता मी पण...

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

In reply to by मदनबाण

+++१११ हेला कसं घालवायचं असतंय? पुन्यांदा उलिसं झोपून? >>> .... _/\_

डोळ्यावर पांघरूण ओढलं की भीती वाटणार्‍या सावल्या दिसेनाशा होतात तसंच हे!