आत्महत्या नव्हे, शेतकर्यांचा शासकीय खून!
जेवढे झुलायचे फ़ास लाऊन
तेवढे झुलत बसा
खायचे तितके जहर तुम्ही
खुशाल खात बसा
दहा-पाच करा किंवा शेकड्यांनी करा
हजारोंनी करा किंवा लाखोंनी करा
आम्ही सारे ढिम्म, आम्हाला काय त्याचे?
शेतामध्ये मरा नाहीतर घरामध्ये मरा
शिक्षित, सुजाण, वकील, डॉक्टर
नेता, तज्ज्ञ, सेवक, मास्तर
यांना तरीही ज्या देशामध्ये
निवांत झोप लागू शकते!
शासन-प्रशासन, पुजार्यांना
रंभा-परीचे स्वप्न पडू शकते!!
त्या देशाच्या पोशिंद्यांनो
एवढे तरी ध्यानी घ्या की;
हे फ़क्त इंडियातच घडू शकते!!!
संवेदनाशीलता मेली काय?
बिनपाण्याने हजामत
राजा! ही तुझी बदमाषी आहे
आत्महत्या नव्हे, शासकीय खून!
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------
यंदाचा दुष्काळ "न भूतो न भविष्यति" असाच म्हणावा लागेल. विदर्भात तर आतापासून चटके बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसापासून वृत्तपत्र उघडलं की, शेतकरी आत्महत्त्येच्या संदर्भातील निदान एकतरी बातमी दिसलीच समजायची. आता असा एकही दिवस जात नाही की, शेतकरी आत्महत्त्येची बातमी कानावर येऊन आदळत नाही. मात्र तरीही कोणत्याच पातळीवर काहीही हालचाल होताना दिसत नाही. "रोजचे मढे त्याला कोण रडे" अशी एक म्हण आहे. भारतीय मानसिकता अधोरेखित करण्यासाठी ही एकच म्हण पुरेशी ठरावी.
जेवढे झुलायचे फ़ास लाऊन
तेवढे झुलत बसा
खायचे तितके जहर तुम्ही
खुशाल खात बसा
दहा-पाच करा किंवा शेकड्यांनी करा
हजारोंनी करा किंवा लाखोंनी करा
आम्ही सारे ढिम्म, आम्हाला काय त्याचे?
शेतामध्ये मरा नाहीतर घरामध्ये मरा
शिक्षित, सुजाण, वकील, डॉक्टर
नेता, तज्ज्ञ, सेवक, मास्तर
यांना तरीही ज्या देशामध्ये
निवांत झोप लागू शकते!
शासन-प्रशासन, पुजार्यांना
रंभा-परीचे स्वप्न पडू शकते!!
त्या देशाच्या पोशिंद्यांनो
एवढे तरी ध्यानी घ्या की;
हे फ़क्त इंडियातच घडू शकते!!!
संवेदनाशीलता मेली काय?
माणूस संवेदनाक्षम वगैरे खरंच असतो काय, याबद्दल मला फार पूर्वीपासून संशय होता; पण तो केवळ संशय होता. आता मात्र माझ्या मनातला कालचा संशय हळूहळू दृढतेत बदलायला लागला आहे. आता मनुष्याच्या संवेदनक्षमतेविषयी मी एवढेच म्हणू शकतो की माणसाच्या संवेदनशीलते मागे त्याचा निहित स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले असतात. स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसेल तर सभोवताली कितीही लाजिरवाण्या, क्रूर अथवा अमानुष घटना घडल्या तरीही मनुष्यप्राणी कळवळत नाही, हळहळत नाही आणि काळजाचे पाणी होण्याइतपत द्रवतही नाही. तो निगरगट्ट, ढिम्मच्या ढिम्म आणि निर्विकारच असतो.
आतापर्यंत लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या झाल्यातरी मख्ख असणारा समाज दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून झाल्याबरोबर रस्त्यावर उतरतो, मेणबत्त्या पाजळतो, सर्वत्र हाहाकार माजेल इतपत निदर्शने करतो, प्रसारमाध्यमातही रात्रंदिवस एवढ्याच एका मुद्द्याभवती रेंगाळत बसण्याची जणूकाही चढाओढ लागते; तेव्हा त्यामागे सुजाण आणि सुशिक्षित समाजाची संवेदनाशीलता नसते. असते ती केवळ त्यांच्या मनात निर्माण झालेली भिती. जी घटना आज त्या मुली संदर्भात घडली तीच घटना आपल्याही मुलीवर ओढवू शकते, या भितीपोटी उडालेला थरकाप!
शेतकरी आत्महत्यांशी सुजाण आणि सुशिक्षित समाजाचे दूरान्वयानेही स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसतात. आज आत्महत्या करण्याची वेळ त्या शेतकर्यावर आली, उद्या माझ्यावरही येऊ शकते, अशी भिती उत्पन्न व्हायचेही कारण नसते. त्यामुळे शेतकरी कितीही आत्महत्या करोत, सहा लाख शेतकरी आत्महत्या करोत की साठ लाख शेतकरी आत्महत्या करोत; हळहळण्याचे कारणच संपुष्टात आलेले असते.
हुश्श! एका मुलीच्या हत्त्येवर आकाश-पाताळ एक करणारा सुजाण आणि सुशिक्षित समाज शेतकरी आत्महत्यांवर गप्प का बसतो? हा प्रश्न अनेक दिवसांपासून मनात दबा धरून बसला होता. आता मात्र हळूहळू उत्तरावरील धुकं हटायला लागलं आहे. समाजाची संवेदनाशीलता मेली काय? असा प्रश्न उपस्थित करण्याचे औचित्य दिसतच नाही कारण सामूहिक समाजमन संवेदनक्षम असते, हेच मुळात थोतांड आहे, अशी खात्री व्हायला लागली आहे.
बिनपाण्याने हजामत
या विषयावर उहापोह करण्याचे कारण असे की, मला समोर भयाण वास्तव दिसत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीय कमी दाबाचा पट्टा निर्माण व्हायला लागला की जशी पाऊस पडण्याची शक्यता बळावत जाते तद्वतच शेतकरी आत्महत्यांमध्ये प्रचंड वाढ होऊ शकेल अशी अनुकूल स्थिती शेतकर्यांच्या अवतीभवती निर्माण व्हायला लागली आहे. वेळीच शासकीय स्तरावर वेगवान हालचाली होऊन युद्धस्तरावर उपाययोजना झाली नाही तर येणारे सहा-सात महिने अत्यंत वाईट बातम्या घेऊन येतील, हे अगदी सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट दिसायला लागले आहे.
यंदा विदर्भात नापिकीने कहर केला आहे. कापसाचे एकरी उत्पादन गत दोन वर्षाच्या तुलनेने फक्त ३०-३५ टक्केच होईल, असा अंदाज आहे. सोयाबीनची स्थिती तर सर्वाधिक खराब आहे. जिथे एकरी ९-१० क्विंटल सोयाबीन व्हावे तिथे १ ते २ क्विंटल होत आहे. अनेक शेतात तर एकरी १ क्विंटलापेक्षा कमी उत्पादन होण्याची शक्यता असल्याने व सोयाबीन कापणीसाठी लागणारा खर्चसुद्धा भरून निघण्याची शक्यता नसल्याने शेतकर्यांनी उभ्या पिकातच नांगरट सुरू केली आहे किंवा गुरे चरायला सोडली आहेत. यात जिरायती आणि बागायती असासुद्धा भेदाभेद करायला कारण नाही आहे, कारण एकाची पाणी लावून तर दुसर्याची बिनपाण्याने हजामत होत आहे. एकीकडे उत्पादनात आलेली प्रचंड घट आणि दुसरीकडे शेतमालाचे पडलेले बाजारभाव अशा दुहेरी जात्यात शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे.
राजा! ही तुझी बदमाषी आहे
विदर्भातलाच शेतकरी जास्त प्रमाणात आत्महत्या का करतो, या प्रश्नाचे उत्तरही कठीण नाही. कापसाच्या एकाधिकार खरेदीचा कायदा महाराष्ट्र सरकारने १९७१ साली मंजूर केला. पण महाराष्ट्र शासनाच्या कापूस एकाधिकार योजनेअंतर्गत 'भारतीय कापूस महामंडळा' च्या धर्तीवर बाजारभावाप्रमाणे किंवा बाजारभावापेक्षा जास्त चढ्या दराने कापूस खरेदीचे धोरण राबविण्यात आले नाही. तुरळक अपवाद वगळले तर अन्य प्रांतातील शेतकर्यांना खुल्या बाजारपेठेत जेवढे भाव कापसाला मिळालेत त्यापेक्षा कायमच कमी भाव एकाधिकाराच्या नावाखाली महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या पदरात टाकले गेले. अन्य प्रांतात चांगले भाव असूनही त्याचा फायदा राज्यातील शेतकर्यांना घेता आला नाही कारण प्रांतबंदी लादून अन्य राज्यामध्ये कापूस विक्रीस नेण्यास राज्यातील कापूस उत्पादकांना कायदेशीर मज्जाव करण्यात आला आणि "आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना" अशी गत खुद्द शासनानेच राज्यातील कापूस उत्पादकांची करून टाकली. कापूस एकाधिकाराच्या गोंडस नावाखाली कापूस उत्पादकांचे जवळजवळ ३०-३५ वर्षे "कायदेशीर शोषण" झाल्याने राज्यातला कापूस उत्पादक आर्थिक स्थितीने एवढा नेस्तनाबूत झाला की त्याला पुन्हा डोके वर काढताच आले नाही.
मध्यंतरी खुल्या अर्थव्यवस्थेच्या प्रारंभालाच चांगली संधी आली होती. कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू शकेल एवढी तेजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आली होती. तेव्हा शासनाने फक्त गप्प बसण्याची गरज होती. मामला व्यापारी आणि शेतकरी यांच्यामधला होता. सरकारवर आर्थिक भारही पडणार नव्हता. याउलट कापसाच्या निर्यातीतून परकीय चलनाची गंगाजळी शासकीय तिजोरीत येऊन साठणार होती पण; कापसाला प्रति क्विंटल ९०००/- भाव मिळू देईल तर ते ’मायबाप’ सरकार कसलं? कापूस गिरणी मालकांच्या दबावाखाली येऊन सरकारने तातडीने सूत्रे हालवली. कापसावर निर्यातबंदी लादली आणि देशांतर्गत बाजारपेठेत प्रति क्विंटल ९०००/- सहज मिळू शकणारे भाव प्रति क्विंटल ५०००/- पेक्षाही कमी आले.
जेव्हा चांगलं पिकलं व बाजारभावही चांगले मिळून कापूस उत्पादकांची आर्थिकबाजू सावरायची शक्यता निर्माण झाली तेव्हा शेतकर्यांची लूट करायला कोणी व्यापारी आला नाही, दलाल आला नाही, चोर आला नाही किंवा दरोडेखोरसुद्धा आला नाही. कापूस उत्पादकांना सरकारने लुटलं, राजरोजसपणे लुटलं, कायदेशीरपणे लुटलं. कापूस उत्पादकांच्या अधोगतीला शासनाची बदमाषीच कारणीभूत आहे.
आत्महत्या नव्हे, शासकीय खून!
ज्या वर्षी शेतीत उत्पादन कमी येते आणि शेतमालाचे भावही पडतात, त्या-त्या वर्षी शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत जातो. शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची पाळी येते ती त्याने आळशीपणा दाखवला म्हणून नव्हे, त्याने कर्तव्यात कसूर केला होता म्हणून नव्हे, त्याच्या व्यसनाधीनतेमुळे तर नव्हेच नव्हे! शेतमालाचे भाव ठरविण्याचे, त्यावर निर्बंध लादण्याचे, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण ठरविण्याचे सर्वाधिकार शासनाकडेच असल्याने शेतीक्षेत्रातील सर्व बर्याबाईट परिणामांसाठी व प्रगती-अधोगतीसाठी थेट सरकारच जबाबदार ठरते. शासनाच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणांमुळे आज शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या ह्या आत्महत्या नसून ह्या आत्महत्यांना "शेतकर्यांचा शासकीय खून" असेच संबोधावे लागेल.
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------
वाचने
85891
प्रतिक्रिया
246
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेच्चा,
इंडस्ट्रीज
In reply to अरेच्चा, by जयंत कुलकर्णी
अण्णासाहेब शिंदे नावाचे एक
इतर उत्पन्न वाढले तरच शेतकर्
In reply to अण्णासाहेब शिंदे नावाचे एक by जयंत कुलकर्णी
इतर उत्पन्न वाढले तरच शेतकर्यांचे प्रश्न सुटू शकतील असे त्यांचे म्हणणे होते.+१००० अण्णासाहेब शिंदे यांच्याबद्दल अगोदर माहिती नव्हती. पण ते केवळ शेतीतज्ञच नव्हे तर पूर्ण अर्थतज्ञ होते असेच म्हणावे लागेल. सर्वसाधारण जनतेची आर्थिक ताकद वाढवणार्या उद्योगधंद्याना मदत केल्यावरच शेतमालाची (किंबहुना सर्वच आवश्यक उत्पन्नांची) सबसिडीमुक्त किंमत देऊन जनता तो माल खरेदी करू शकेल. म्हणजेच पर्यायाने शेतकर्यालाही योग्य आर्थिक उत्पन्न मिळेल. सर्वसाधारणपणे सबसिडी ही केवळ तात्कालीक सेतूयोजना (ब्रिजिंग सोल्युशन) म्हणून वापरली जाते... तिला कायमस्वरुपी योजना बनवण्याने शेतकर्याला (किंवा इतर कोणत्याही उत्पादकाला) सतत परावलंबी ठेवण्यापलिकडे काहीच साधले जाणार नाही हे शेतकरी (आणि इतर सर्व उत्पादक) समजतील तोच सुदिन.+१
In reply to इतर उत्पन्न वाढले तरच शेतकर् by डॉ सुहास म्हात्रे
उदाहरण
In reply to अण्णासाहेब शिंदे नावाचे एक by जयंत कुलकर्णी
बरोबर आहे. मी अलिकडील
In reply to उदाहरण by कपिलमुनी
कोणी जिरायती, बागायती आणि
भूगोलच नक्की पण यत्ता सहावी,
In reply to कोणी जिरायती, बागायती आणि by सतिश गावडे
धन्यवाद.
In reply to भूगोलच नक्की पण यत्ता सहावी, by प्यारे१
श्री. मुटे यांची उत्तरे
+१
In reply to श्री. मुटे यांची उत्तरे by जयंत कुलकर्णी
अनर्थक चर्चा गुर्हाळ...
In reply to श्री. मुटे यांची उत्तरे by जयंत कुलकर्णी
गंगाधर मुटे साहेब संघटने काम
सहमत
देशोन्नती-२०/११/१४
हे येथे दाखवायचे प्रयोजन कळले
In reply to देशोन्नती-२०/११/१४ by गंगाधर मुटे
हे पेपरातून बातम्या वगैरे
In reply to देशोन्नती-२०/११/१४ by गंगाधर मुटे
ते उपक्रम वैगेर चालवत आसतील
In reply to हे पेपरातून बातम्या वगैरे by सतिश गावडे
लेख आणि प्रतिसाद
+१
In reply to लेख आणि प्रतिसाद by विटेकर
गावगाडा
In reply to लेख आणि प्रतिसाद by विटेकर
+११११
In reply to लेख आणि प्रतिसाद by विटेकर
+१००
In reply to लेख आणि प्रतिसाद by विटेकर
उत्तम प्रतिसाद. मिपा वरच्या
In reply to लेख आणि प्रतिसाद by विटेकर
+संतुलीत आणी थेट समयोचीत प्रतिसाद.
In reply to उत्तम प्रतिसाद. मिपा वरच्या by प्रसाद१९७१
- किती शेतकरी मंडळांनी/जिल्हा मित्र मंडळानी (खान्देश मित्रमंडळ्/मराठवाडा मित्रमंडळ ई.)समस्या निवाराणासाठी जनजागृती केली आहे उदा.व्यसनमुक्ती,आत्महत्येपासून पराव्रुत करणे त्याकरता समुपदेशन्,कर्ज काढून लग्न सोहळा करून नका असे मार्गदर्शक उदाहरण ठेवून जास्तीत जास्त शेतकर्यांचा सहभाग वाढवणे
जर शहरात स्थाईक झालेल्या शेतकरी-पुत्र्/बाधवांची अनास्था आणि स्वतः शेतकर्यांची मूळ समस्येकडे डोळेझाक असेल तर शहरातील पांढरपेशांवर विनाकारण चिखलफेक करण्याचा कुणालाही अधिकार नाही. याकरता एकच उदाहरण देतो: गावाकडून पडेल ते काम करायला आलेल्या अकुशल कामगारांच्या बायका वेळ प्रसंगी धुणी-भांड्याची कामे करून संसाराला हातभार लावतात्.माझ्या परिचयातील कुटुंबप्रमुखाची नोकरी कंपनी बंद झाल्याने, केवळ पत्नीच्या कामाने पुढची नोकरी लागेपर्यंत गुजराण केली.तात्पर्य मूळ उत्पन्न स्तोत्र तोकडे/अपूरे असेल तर पर्यायी मार्ग शोधावेच लागतात. आजोबांची जमीन कुळकायद्यात गेलेला आणि वाडा जाळला गेलेला (गांधी हत्येनंतर) आपल्याच गावाला परका झालेला पांढरपेशा नाद खुळासहमत.
In reply to +संतुलीत आणी थेट समयोचीत प्रतिसाद. by नाखु
//पण शेतकर्यांच्या
शेती आणि शेतकरी
>>तस्मात, बेंबट्या, स्वतःच्या
In reply to शेती आणि शेतकरी by आदिजोशी
आक्षेप
तो वास बर्याच दिवसांपासून
In reply to आक्षेप by विटेकर
अंडर सेम जिओ-पोलिटिकल
नक्कीच असेल
In reply to अंडर सेम जिओ-पोलिटिकल by vikramaditya
ज्ञान आणि तंत्रज्ञान एकुण
In reply to अंडर सेम जिओ-पोलिटिकल by vikramaditya
>>>> तोटा आहे म्हणून शेती
In reply to ज्ञान आणि तंत्रज्ञान एकुण by माहितगार
शेतकरी आणि शेतकर्यांचे नेते
ज्या गावात एखादा शेतकरी
In reply to शेतकरी आणि शेतकर्यांचे नेते by आदिजोशी
लेख वाचला. चिडचिड पाह्यली.
महाराष्ट्रातील पुढार्यांचा
एक वेगळा मुद्दा...
काही स्त्री-शेतकर्यांनीही
In reply to एक वेगळा मुद्दा... by अर्धवटराव
ह्यावरही विचार/चर्चा व्हावी....
पाणी
In reply to ह्यावरही विचार/चर्चा व्हावी.... by प्रभाकर पेठकर
सहमत.
In reply to पाणी by कपिलमुनी
श्री पेठकर, उलट चढ्या दराने
In reply to सहमत. by प्रभाकर पेठकर
अमेरिकेत घराघरांतून
In reply to श्री पेठकर, उलट चढ्या दराने by जयंत कुलकर्णी
जर्मनीत हे नक्की होतं,
In reply to अमेरिकेत घराघरांतून by प्रदीप
मुटेजी तुम्ही शेतकर्याचा
+१
In reply to मुटेजी तुम्ही शेतकर्याचा by प्रसाद गोडबोले
या वर समस्त मिपाकरांचे काय म्हणणे आहे?
>>इथे ढिगभर धागे निघाले असते
In reply to या वर समस्त मिपाकरांचे काय म्हणणे आहे? by दिवाकर देशमुख
अगदी अगदी. पण मिपावर बीजेपी
In reply to >>इथे ढिगभर धागे निघाले असते by सूड
+१
In reply to अगदी अगदी. पण मिपावर बीजेपी by बॅटमॅन
+२
In reply to +१ by नाखु
सुडबुद्धीच आहे तुमची
In reply to >>इथे ढिगभर धागे निघाले असते by सूड
>>सुडबुद्धीच आहे तुमची
In reply to सुडबुद्धीच आहे तुमची by दिवाकर देशमुख
काँग्रेस असो किंवा मोदी किंवा
वा वा
@दिवाकर - सर्व चर्चा मोदी आणि
In reply to वा वा by दिवाकर देशमुख
कारण
In reply to @दिवाकर - सर्व चर्चा मोदी आणि by प्रसाद१९७१
मी फक्त अश्या लोकांचा बुरखा
In reply to कारण by प्रदीप
आणि व्हाईसे व्हर्सा, हो की
In reply to मी फक्त अश्या लोकांचा बुरखा by दिवाकर देशमुख
ओके गंमु!!
In reply to मी फक्त अश्या लोकांचा बुरखा by दिवाकर देशमुख
गंमु- नक्की का?
In reply to ओके गंमु!! by सूड
द्रौपदीला वाचावायला जसे
In reply to गंमु- नक्की का? by बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी.
In reply to द्रौपदीला वाचावायला जसे by सूड
बॅटमॅन
In reply to हा हा हा, अगदी अगदी. by बॅटमॅन
शेवटी डुआयडीच आयडीच्या मदतीला
In reply to गंमु- नक्की का? by बॅटमॅन
माझी डुआयडीच नाही
In reply to शेवटी डुआयडीच आयडीच्या मदतीला by सूड