✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ९

च
चतुरंग यांनी
गुरुवार, 11/20/2014 - 17:17  ·  लेख
लेख
आठव्या डावात आनंदने निर्णायक विजय खेचून आणणे आवश्यक असताना नीरस बरोबरी झाली. मधल्या एका विश्रांतीनंतर आज नवव्या डावात आनंद 'डू ऑर डाय' परिस्थितीत आहे. काळी अथवा पांढरी मोहोरी न बघता त्याने विजयासाठीच प्रयत्न करणे आवश्यक आहे अन्यथा सामना पुरे १२ डाव देखील होणार नाही अशी (चेन्नै साधार) भीती वाटते! :( काळ्या मोहोर्‍यांकडून खेळताना आनंदने कायम बरोबरीचे ध्येय ठेवल्यासारखे आतापर्यंतच्या डावांत वाटत आले आहे. आज आनंद पुन्हा एकदा जोमदार प्रयत्न करेल अशी आशा ठेवूयात आणि डावाकडे वळूयात. अजून १५ मिनिटे आहेत. तोवर कोणीतरी पट लावा रे!! :)

Book traversal links for आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ९

  • ‹ आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ८
  • Up
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १० ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
7276 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

पट

बहुगुणी
गुरुवार, 11/20/2014 - 17:26 नवीन
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा

चतुरंग
गुरुवार, 11/20/2014 - 17:32 नवीन
बर्लिन डिफेन्स! बर्लिनची भिंत काही हलायला तयार खेळतोय्दोघेही वेगाने खेळत आहेत दीड मिनिटात १० खेळ्या झाल्यात!
  • Log in or register to post comments

आनंदनं कॅसलींगची फॅसिलिटी गमावली!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 11/20/2014 - 17:37 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

माझ्या मते ती स्टॅन्डर्ड खेळी

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 11/20/2014 - 17:51 नवीन
माझ्या मते ती स्टॅन्डर्ड खेळी आहे बर्लिन मध्ये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ते असेल पण

संजय क्षीरसागर
गुरुवार, 11/20/2014 - 17:54 नवीन
आता हत्ती बाहेर काढणं जिकीरीचं होतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

माझ्या मते हत्ती हा एच ६ नंतर

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 11/20/2014 - 18:02 नवीन
माझ्या मते हत्ती हा एच ६ नंतर जी ६ असाच बाहेर काढायचा प्लान असतो डायरेक्ट पांढर्‍याच्या कॅसलीन वर अ‍ॅटॅक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आनंद बहुदा तेच करतोयं (एच-६ वगैरे)

संजय क्षीरसागर
गुरुवार, 11/20/2014 - 18:14 नवीन
पण या प्रकारात आपलीच प्यादी आपल्याला अडथळा होतात असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

बर्लिनमध्ये

चतुरंग
गुरुवार, 11/20/2014 - 18:13 नवीन
मोहोर्‍यांचा विकास साधणे हे मुख्य ध्येय असते कॅसलिंग करण्यात एका खेळीचा टेंपो जातो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पण राजा एक्स्पोज्ड राहातो ना?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 11/20/2014 - 18:16 नवीन
ती कायमची डोकेदुखी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मग्नुस बरोबरेसाठीच खेळतोय की

आनन्दा
गुरुवार, 11/20/2014 - 17:35 नवीन
मग्नुस बरोबरेसाठीच खेळतोय की काय?
  • Log in or register to post comments

मॅग्नसने वजीर का बळी दिला....

बहुगुणी
गुरुवार, 11/20/2014 - 17:43 नवीन
कळलं नाही!
  • Log in or register to post comments

कारण जितक्या लवकर पीसेस

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 11/20/2014 - 17:53 नवीन
कारण जितक्या लवकर पीसेस कॅन्सल होतील तितक्या लवकर डाव ड्रॉ होईल अन मग्नुस ला घरीजाऊन उद्याच्या अवघड डावाची तयारी करता येईल ... आजचा डाव ड्रॉच होणार ... उद्या आनंद काही तरी भन्नाट करेल अशी अपेक्षा आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

एन डी टी व्ही वर

बहुगुणी
गुरुवार, 11/20/2014 - 17:52 नवीन
आता तरी ही मॅच लाईव्ह दाखवताहेत
  • Log in or register to post comments

धावत जौन एनडीटीवी चे तिन चॅनल

जेपी
गुरुवार, 11/20/2014 - 18:09 नवीन
धावत जौन एनडीटीवी चे तिन चॅनल पाहिले . नाय दिसल. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

इथे बघा

चतुरंग
गुरुवार, 11/20/2014 - 18:14 नवीन
http://www.sochi2014.fide.com/ थोडे स्क्रोल करुन खाली गेलात की मध्यभागी पट दिसेल. पीटस्विडलरची कॉमेंट्री सुद्धा छान असते...
  • Log in or register to post comments

आज मॅग्नुस

चतुरंग
गुरुवार, 11/20/2014 - 18:17 नवीन
घड्यालात मागे पडलाय जवळपास २३ मिनिटांनी! आनंदने तेराव्या खेळीनंतर त्याला विचारात पाडले आहे. ओके ई६ प्यादे पुढे ढकलले मॅग्नुसने. आता ते प्यादे अडचणीचे ठरु शकते त्यामुळॅ आनंदने त्याचे मोहोरे बचावात रोखायला हवेत.
  • Log in or register to post comments

बरोब्बर!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 11/20/2014 - 18:22 नवीन
ई६ प्याद्यामुळे मोठा लफडा होणार असं दिसतंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

अरे काय धन्दे? आम्ही घरात

आनन्दा
गुरुवार, 11/20/2014 - 18:33 नवीन
अरे काय धन्दे? आम्ही घरात खेळायचो तसे खेळतायत वाटते. तीन वेळा?
  • Log in or register to post comments

डाव ड्रॉ झाला!!

चतुरंग
गुरुवार, 11/20/2014 - 18:33 नवीन
का राव? हॅ आपल्याला नाही आवडले.... :(
  • Log in or register to post comments

:-(

आतिवास
गुरुवार, 11/20/2014 - 18:34 नवीन
काही कळलं नाही आज!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

बरोबरी!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 11/20/2014 - 18:33 नवीन
.
  • Log in or register to post comments

काय कटकट आहे भेंडी. ड्रॉ?????

बॅटमॅन
गुरुवार, 11/20/2014 - 18:34 नवीन
काय कटकट आहे भेंडी. ड्रॉ??????
  • Log in or register to post comments

बहुधा त्या मूव वर सगळे

आनन्दा
गुरुवार, 11/20/2014 - 18:37 नवीन
बहुधा त्या मूव वर सगळे अवलंबून होते, मॅग्नुसला दोन घोड्यांच्या सहाय्याने आक्रमण करायचे होते, तर आनंदला राजाच्या सहाय्याने ते तिथेच थांबवायचे होते.. शेवटी ड्रॉ. नाही तुला, नाही मला घाल %^%#^#
  • Log in or register to post comments

आजचा ड्रॉ

चतुरंग
गुरुवार, 11/20/2014 - 18:50 नवीन
मॅग्नुससाठी धक्कादायक होता! त्याने तयारी केली होती त्याप्रमाणे डाव झाला नाही त्याने एफ ६ असे प्यादे पुढे टाकणे अपेक्षिले होते. त्याचे ई६ वरचे प्यादे आणि दोन घोडी याच्या जोरावर आनंदची राजाची बाजू चेपून तिथे प्याद्यांची संख्या वाढवायची आणि नंतर मोहोरी मारामारी करुन एंडगेमला घुसायचे..परंतु आनंद आणि टीमने आज वेगळाच पवित्रा घेतला. उरलेल्या ३ डावतले दोन डाव पांढर्‍याचे आहेत त्यासाठी काही खास तयारी आनंद आणि टिमने केली आहे हे नक्की! आनंद अगदी कंफर्टेबल वाटतोय प्रेस काँन्फरंसमधे...
  • Log in or register to post comments

उरलेल्या ३ डावतले दोन डाव

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 11/20/2014 - 19:27 नवीन
उरलेल्या ३ डावतले दोन डाव पांढर्‍याचे आहेत त्यासाठी काही खास तयारी आनंद आणि टिमने केली आहे हे नक्की! आनंद अगदी कंफर्टेबल वाटतोय प्रेस काँन्फरंसमधे
येस्स ... माझाही तसाच अंदाज आहे ! उद्या काहीतरी भन्नाट पहाय्ला मिळेल अशी आशा आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

एवढ्या लवकर ड्रॉ

जेपी
गुरुवार, 11/20/2014 - 18:59 नवीन
एवढ्या लवकर ड्रॉ स्कोर काय झाला.
  • Log in or register to post comments

५-४

बहुगुणी
गुरुवार, 11/20/2014 - 19:37 नवीन
कार्लसन ५- आनंद ४
  • Log in or register to post comments

(No subject)

जेपी
गुरुवार, 11/20/2014 - 20:09 नवीन
:-(
  • Log in or register to post comments

मला वाटतं कार्लसनची बाजू जास्त निर्धास्त आहे

संजय क्षीरसागर
गुरुवार, 11/20/2014 - 21:54 नवीन
आनंदला तीन पैकी २ गेम्स जिंकायलाच पाहिजेत आणि एक ड्रॉ झाला तरी हरकत नाही. त्याला आता एकही गेम हारता येणार नाही. कार्लसननं तीनही गेम ड्रॉ केले तरी त्याला काही फरक पडत नाही. तो एक गेम हारला तरी दोघं इक्व्कल होतील. आणि तीन पैकी एक जरी जिंकला तर विषयच संपला.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा