✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ६

च
चतुरंग यांनी
Sat, 11/15/2014 - 18:38  ·  लेख
लेख
आज यायला उशीर झालाय. डाव सुरु होऊन जवळपास तास झालाय. कालचा डाव बरोबरीत गेला. आज मॅग्नुस निकराचा प्रयत्न करतोच आहे. डाव सिसिलिअन ने सुरु झाला.

Book traversal links for आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ६

  • ‹ आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ५
  • Up
  • आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ७ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
6714 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

च्यायला, मलाही उशीर झाला डाव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/15/2014 - 19:00 नवीन
च्यायला, मलाही उशीर झाला डाव बघायला वजीरावजीरी झाली वाटतं. म्हणजे डाव बरोबरीकडे जाणार आता ? अरे कुठे गेली मंडळी ? कुछ तो बोलो :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

काल

सुजित पवार
Sat, 11/15/2014 - 19:05 नवीन
काल आनन्दचा हत्ति नि उन्ट मग्नुस च्या हत्तिच्या समोर होते. आज तिच उन्टाचि जागा घोड्याने घेतलि आहे... आज पन ड्राव करनार का हे?
  • Log in or register to post comments

माझं ढोबळ मत म्याच ड्रॉच करणार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/15/2014 - 19:11 नवीन
सेम सेम पोझीशन आहे असं वाटतं. कालच्या सामन्यात आनंद मानसिकदृष्ट्या कार्लसनपेक्षा वरचढ असूनही बरोबरीसाठीच आनंदने जास्त प्रयत्न केले. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित पवार

मॅग्नुसचा डाव चांगला वाटतोय

चतुरंग
Sat, 11/15/2014 - 19:10 नवीन
परंतु त्याला असलेले अ‍ॅडवांटेज पूर्ण गुणात बदलणे अवघड आहे.
  • Log in or register to post comments

पटावरचा जास्ती जागेचा ताबा आणि दोन्ही रंगाचे उंट

चतुरंग
Sat, 11/15/2014 - 19:15 नवीन
शिवाय पुढे आलेले हत्ती ही मॅग्नुसची बलस्थाने आहेत. तर वजिराच्या बाजूचे दुहेरी प्यादे हे कमकुवत आहे. मॅग्नुसने राजाच्या बाजूला हत्ती आणि उंटाने रेटायला सुरुवात केली की आनंद वजिराच्या बाजूला प्यादी सरकवून मॅग्नुसला कोंडीत पकडणार.
  • Log in or register to post comments

आनंदचा सगळ्यात मोठा प्रश्न

चतुरंग
Sat, 11/15/2014 - 19:20 नवीन
मॅग्नुसच्या कणाकणाने होणार्‍या प्रगतीला खीळ कशी घालायची हा आहे. त्याची सगळी मोहोरी अशा जागांवर आहेत की त्याने हालचाल केली की तो झुग्झ्वांग मधे जाणार.
  • Log in or register to post comments

झुग्झ्वांग ??

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 11/15/2014 - 19:46 नवीन
झुग्झ्वांग ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मॅग्नुसचा प्लॅन

चतुरंग
Sat, 11/15/2014 - 19:24 नवीन
राजाच्या बाजूला हत्तींची मारामारी करुन उंट पुढे रेटायचे आणि आनंदची एच ६ आणि जी ७ वरची दुबळी प्यादी मटकावून स्वतःची एफ आणि जी प्यादी रेटणे.
  • Log in or register to post comments

आनंदला आता फक्त

चतुरंग
Sat, 11/15/2014 - 19:27 नवीन
मॅग्नुस काय करतोय त्याप्रमाणे जात राहणे असेच शक्य आहे. प्रत्येक ठिकाणी बचाव शोधून काढणे कठिण आहे. कारण मॅग्नुसच्या थ्रेट्स थेट नाहीयेत अतिशय सटल म्हणतात तशा आहेत. त्यामुळे होते काय की कोणत्याही क्षणी तो रोख बदलून वेगळाच प्लॅन बनवू शकतो.
  • Log in or register to post comments

डी स्तंभ

चतुरंग
Sat, 11/15/2014 - 19:32 नवीन
आणि जी ६ वरचा घोडा अशी दोन मर्मस्थाने आहेत. आनंद डी स्तंभात हत्ती आणून तिथून डि ३ असा घुसू शकतो. मॅग्नुसला ते थोपवणे भाग आहे. त्यामुळे त्याने सी२ मधे उंट आणला. आता आनंद हत्ती परत जी ८ मधे नेणार..
  • Log in or register to post comments

मॅग्नुस व आनन्द

सुजित पवार
Sat, 11/15/2014 - 19:33 नवीन
आज दोगेहि ड्रा साठि खेलत आहेत कि काय असे वाटत आहे...
  • Log in or register to post comments

नाही

चतुरंग
Sat, 11/15/2014 - 19:37 नवीन
मॅग्नुस जिंकण्यासाठीच खेळतोय. त्याला अ‍ॅडवांटेज सुद्धा आहे. अणि त्याला आजचा आणि उद्याचा डाव आघाडी मिळवण्याची उत्तम संधी आहे असे असताना तो सहजासहजी बरोबरीत जाणार नाहीच! आनंदला आज जास्तितजास्त बरोबरी मिळू शकेल..जिंकायची शक्यता नाहीच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित पवार

आनंदने त्याचे

चतुरंग
Sat, 11/15/2014 - 19:41 नवीन
ए प्यादे ढकलत ३ र्‍या घरापर्यंत आणले आहे. प्लॅन समजत नाहीये. त्याला ए पट्टीतून काही फार करता येईल असे दिसत नाहीये. राजाच्या बाजूने मॅग्नुसने प्यादी ढकलायला सुरुवात केली आहे. आनंदची घुसमट करायला बघणार तो.
  • Log in or register to post comments

आनंदकडे वेळ कमी आहे का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/15/2014 - 19:42 नवीन
आणि त्यामुळे तो काही चूक करेल ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हीच शंका आहे!

आतिवास
Sat, 11/15/2014 - 19:45 नवीन
हीच शंका आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वेळ

सुजित पवार
Sat, 11/15/2014 - 19:49 नवीन
आनन्दचा वेळ खुप कमि राहिला आहे अता त्याला मारामारि करावि लागेल ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

कॉमेंटरी रुममधे

चतुरंग
Sat, 11/15/2014 - 20:11 नवीन
स्विडलर आणि क्रामनिक आलेत. चँपिअनशिपच्या स्पर्धेतले दोन खेळाडू, त्यातला एक माजी जगज्जेता, समालोचनासाठी येणे हे या स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करते! :) क्रामनिकच्या एक्सपर्ट कॉमेंट्स ऐकण्यासारख्या आहेत. त्याच्यामते विशीने चांगला खेळ केला तर त्याला वजिराच्या बाजूला चांगला प्रतिहल्ला निर्माण करता येण्यासारखे आहे..
  • Log in or register to post comments

वजिर

सुजित पवार
Sat, 11/15/2014 - 20:17 नवीन
आधिच गेलेत ना दोघान्चे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

पण त्याची बाजू आहे कि पटावर

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 11/15/2014 - 20:35 नवीन
पण त्याची बाजू आहे कि पटावर ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित पवार

कार्लसन दोन पॉन्स प्लस आहे, आणि

संजय क्षीरसागर
Sat, 11/15/2014 - 20:34 नवीन
आनंदचं एच प्यादं जाण्याच्या मार्गावर आहे. जर कार्लसन, प्याद्याचा वजीर करण्याची थ्रेट घडवू शकला तर जिंकेल.
  • Log in or register to post comments

च्यायला... हरला

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 11/15/2014 - 20:44 नवीन
च्यायला... हरला :-(
  • Log in or register to post comments

जिंकला कार्लसन

संजय क्षीरसागर
Sat, 11/15/2014 - 20:45 नवीन
आता आनंदला ७ वा गेम जिंकावाच लागणार, नाही तर अवघड आहे. आनंदच्या शेवटच्या तीन मूवज (मला तरी) अनाकलनीय होत्या.
  • Log in or register to post comments

३७ व्या मूव नंतरची ही कमेंट वाचनीय आहे

संजय क्षीरसागर
Sat, 11/15/2014 - 20:48 नवीन
Anand has realised that trapping the bishop is not possible, so the position is objectively lost, and it is too late to do something...
  • Log in or register to post comments

सत्तविसाव्या खेळीला

चतुरंग
Sat, 11/15/2014 - 21:09 नवीन
घोड्याने ई५ वरचे प्यादे मारुन आनंदला जोरदार प्रतिहल्ल्याची संधी होती.ती त्याने गमावली तिथेच डाव गेल्यासारखा होता. ती संधी त्याने घेतली असती तर मात्र हत्तींची मारामारी वेळेवर होऊन धोकादायल ई प्यादे पटावरुन गेले असते आणि डाव बरोबरीत नक्कीच सोडवता आला असता. असो. आता पुढल्या डावात सोमवारी आनंदला जिंकण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे कारण तोही डाव जर मॅग्नुसने जिंकला तर स्पर्धा गमावल्यासारखीच आहे. स्पर्धेच्या या पातळीत अशा संधी गमावणे परवडणारे नाही! आनंद मानसशास्त्रीय दृष्ट्या मॅग्नुस एवढा कणखर राहिलेला नाही हे सत्य मान्य करुन अनुभव आणि डायनामिक खेळ, टॅक्टिकल पोझीशन्स याच्या जोरावरच त्याला वाट काढायला लागणार आहे. आजच्यासारखी पोझीशन मॅग्नुसला देणे म्हणजे सिंहाच्या गुहेत स्वत:हून जाऊन बसण्यासारखे आहे!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा