Skip to main content

हेल्मेटसक्ती

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 13/11/2014 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

वाचने 137492
प्रतिक्रिया 360

प्रतिक्रिया

In reply to by मराठी_माणूस

पुन्हा पुन्हा हाच मुद्दा याच शब्दात मांडला जातोय म्हणून एक तांत्रिक मुद्दा स्पष्ट करू इच्छितो: आत्महत्या हा गुन्हा नाही. आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा आहे.

In reply to by असंका

म्हणजे मेला नाही तर पोलिसांची पायरी चढायची तयारी ठेवायची...म्हणजे प्रयत्न फसला तर कधीकधी भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थीती व्हायची...याऐवजी त्या व्यक्तीला मानसोपचार तज्ञांकडे नेउ शकत नाही का??

In reply to by प्रकाश घाटपांडे

स्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती कशाला? कारण : दूरदर्शीपणा हा सर्वसाधारण माणसाचा गुणधर्म नाही. माणूस सर्वसाधारणपणे "सारासारविवेकबुद्धी" पेक्षा जास्त "तात्कालीक सोय आणि फायदा" यांना जास्त महत्व देतो. जनतेत तात्कालीक अप्रिय होऊ शकणारे पण दीर्घकालीक फायद्याचे कायदे जाणीवपूर्वक करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ही सरकारची जबाबदारी असते (केवळ जनतेला खूष करणारे आणि / किंवा राजकारण्यांचे काम साधून घेणारे कायदे करणे नाही), हे भारतिय जनता जवळजवळ पूर्णपणे विसरली आहे असेच वारंवार दिसते. कायद्याने जनतेला सुजाण नागरीक बनवून जनतेचाच फायदा कसा होतो याचे उदाहरण म्हणून सिंगापूर आणि इतर अनेक कायद्याचे राज्य असलेल्या देशांतील यासंबंधाच्या परिस्थितीचा अभ्यास उपयोगी पडेल. आवांतर : "आमचा ९ वर्षाचा पोरगा वडापावच्या टपरीवर भांडी घासतो यात तुमच्या तिर्थरुपांचे काय जाते ?" असे विचारणार्‍यांनी बालकामगार प्रतिबंधक कायदा रद्द करावा यासाठी आंदोलन सुरू करायला हरकत नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुमचे आवांतर भलतेच आवडल्या गेले आहे असे नमूद करतो. यापरता प्रतिवाद नसावा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अहो तुम्हाला मरायचंय तर मरा ना. पण तुमच्या सारखे लोक तिकडे हॉस्पिटलं वगैरे महाग करतात त्याचं काय? शिवाय अ‍ॅक्सिडेंट झाला कि ट्रॅफिक जॅम होतो ना? मरायचंय तर तिकडे मुठेत जा, फास लावून घ्या, विष प्या. उगीच दुसर्‍याची खोटी करायची तत्वाचा प्रश्न वगैरे घेवून.

पोलिओचा डोस सर्वानी नाही घेतला तरी शंभरातल्या वीसच मुलाना पोलिओ होईल. मग पोलिओचे डोसही औस्शध कंपन्यांच्या हितासाठी सरकार देते असे ओरडुन तेही बंद करणार का ? ..... हेल्मेटमुळे प्राण नक्कीच वाचतात.. अपघातात हेड इन्जुरी ही सर्वात अधिक आढळणारी गंभीर इन्जुरी आहे.

In reply to by hitesh

हितेस भाई, हेल्मेट वापरणे चांगले आहे.आमचा नाना हेल्मेट वापरायचा नाय.गेला बिचारा.

In reply to by hitesh

मग पोलिओचे डोसही औस्शध कंपन्यांच्या हितासाठी सरकार देते असे ओरडुन तेही बंद करणार का ?
जर कोणी पोलिओ चा डोस घेतला नाही तर पोलिओ पुन्हा पसरण्याची शक्यता आहे, ज्या मुळे दुसर्‍यांना इजा होउ शकते. त्यामुळे ती सक्ती समजु शकतो पण मी हेल्मेट घातले नाही तर दुसर्‍या कोणाला काय त्रास होणार आहे.

हेल्मेट वापरण्याचे तोटे अनेक आहेत. विशेषतः मानदुखी/पाठदुखी असणार्‍यांसाठी हेल्मेट हे अत्यंत त्रासदायक आहे.
अशा लोकांनी दुचाकी तरी का चालवावी? चालत जावे वा रि़क्षा करावी असे आमचे मत.
कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत?
हात टेकले ह्या संशयित पुणेकरांपुढे.हेल्मेट सक्तीला विरोध करणार्यामागे खाजगी,महागड्या हॉस्पिटलांची लॉबी तर नाही ना?

च्यायला या पुणेकरांचा वेळ जात नाही म्हणून असल्या कुरापती काढत बसतात. फटके मारून हाकलून द्यायला पाहिजे, हेल्मेट वापरा नाहीतर दंड भरा, सोप्प आहे, उगाच काहीतरी. चांगली काहीतरी सुधारणा आणायचा प्रयत्न करतय कोणी तर कशाला काड्या घालतात हो?

हेल्मेट सक्ती योग्यच आहे. जरा विचार करून पहा. ट्रीपल सीट जाणे सुद्धा धोक्याचे आहे. त्यावेळी धोका हा स्वतः वाहन चालक आणि त्यावर स्वार असलेले लोक यांना असतो. जर ट्रिपल सीट ला बंदी हा कायदा नसता तर रोज आपल्याला बरेच जण ट्रिपल सीट वर दिसले असते. तसेच हेल्मेट सक्तीचे पण होईल. एखादी सक्ती असल्याशिवाय भारतीय माणूस सुधारत नाही

एकच प्रश्न..पुण्यात समस्त महिलावर्ग स्कूटी चालवताना डोक्यावरून स्कार्फ गुंडाळतात त्याचा सुरक्षेच्या दृष्टीने काही उपयोग आहे का? म्हणजे स्कार्फ असल्यास चालत्या स्कूटी वरुन पडूनही डोक शाबूत राहत का? :-)

In reply to by रायनची आई

म्हणजे स्कार्फ असल्यास चालत्या स्कूटी वरुन पडूनही डोक शाबूत राहत का?
हो तर! फक्त तो स्कार्फ लोखंडी किंवा मजबूत प्लास्टिकचा असला म्हणजे झालं. नायतर भारतात राहूनही सौदीराज्याचे नियम पाळण्यापलीकडे स्कार्फचा उपयोग शून्य. ;)

पुण्यात हेल्मेटसक्ती हवीच त्या शिवाय डावीकडून ओव्हर टेक करणे , वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवणे , सिग्नलवर डावीकडचा रस्ता पूर्ण ब्लॉक करणे. इत्यादी स्पेश्यल पुणेरी प्रकाराना सुद्धा चाप लावायला हवा. हेल्मेटचा एक मोठ्ठा फायदा हा आहे की हेल्मेट वापरण्याने हवेत थुंकणारांचे प्रमान आटोक्यात रहाते. पुण्यात हा दुहेरी फायदा होतो.

In reply to by विजुभाऊ

या प्रतिसादात उल्लेखलेल्या प्रत्येक गोष्टीवर कायद्याने बंदी आहेच. तिची सक्तीने फक्त अंमलबजावणी झाली पाहिजे. पण कृपया अशा बाबींना पुणेरी स्पेशलपणाचे लेबल लावण्याचा आततायीपणा करू नये असे सुचवतो. या प्रकारचा माज इतरत्रही पाहिला आहे. आणि त्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही.

In reply to by विजुभाऊ

हेल्मेट वापरण्याने हवेत थुंकणारांचे प्रमान आटोक्यात रहाते. पुण्यात हा दुहेरी फायदा होतो.
=))

हेल्मेटलाच नसुन प्रत्येक गोष्टीला असतो. कुठलाही कायदा पाळायचा तर भारतीयांच्या जीवावर येते. पण भारतात बरं का. बाहेरच्या देशात आवाज बंद... तिथे गेल्यावर शिस्तीचे वारेमाप कौतुक.

In reply to by vikramaditya

सहमत...वरील हेल्मेट सक्तीबद्दलच्या सर्वच प्रतिसादांना +१. धोके व जोखीम माहीत असूनसुद्धा हेल्मेट सक्तीला विरोध करण्यार्‍यांबद्दल नवल वाटतंय. माझे भावजी रात्रीच्या वेळी बाईक वरून येत होते. काळोखात रस्त्यावरील असलेल्या रेतीचा अंदाज आला नाही व बाईक १०-१५ फुट घसरली. शरीराची डावी बाजू पुर्ण खरचटून निघाली पण हेल्मेट असल्या कारणानं तेवढ्यावरच निभावलं. त्यामूळे जीव वाचवायचा असेल तर हेल्मेट घालणं जरुरी आहे पण लोकांना चांगलं सांगून कळत नसल्यामूळे सरकारला सक्ती करावी लागते.

दुसरीकडे ह्याच लेखावर टाकलेला प्रतिसाद इथे चिकटवतोय -- हेल्मेट चा उपयोग आहे की नाही हा खरा मुद्दा नाहीये. खरा मुद्दा हा आहे की ह्या भारत सरकारला हेल्मेट सक्ती करायचा अधिकार आहे का? त्याची कारण म्हणजे - कोणालाही दुचाकीवरुन जाताना अपघात झाला तर सरकार उपचाराची फुकट व्यवस्था करत नाही. कोणी मेले तर भरपाई देत नाही. मग सरकारला काय अधिकार आहे हेल्मेट सक्ती करायला? ज्या देशात कल्याणकारी योजना आहेत आणि वैद्यकीय उपचार सरकारची जबाबदारी आहे तिथे अशी सक्ती समजु शकतो, भारत सरकार कुठल्या अधिकारात हे सांगते आहे? - हेल्मेट न घालता एखाद्याने दुसर्‍याला इजा केली ( अपघात करुन ) तरी सरकार काही वेगळी जबाबदारी घेत नाही. - हेल्मेट न घातल्या मुळे कोणी कायमचा अपंग झाला, तर सरकार पेन्शन वगैरे देत नाही. हेल्मेट घातले असले तरी देत नाही. - हेल्मेट घातले कींवा नाही ह्याने सरकार वर कुठलाही वेगळा बोजा पडत नाही. - विमा कंपनी हेल्मेट घालत नसाल तर जास्त प्रिमियम मागू शकते, पण भारत सरकार कुठलाही नैतिक अधिकार नाही सक्ती करायचा.

In reply to by प्रसाद१९७१

साध्या जगभर समजणार्या तर्काचे तर्कट बनवून कसा प्रतिवाद करायचा हे पुणेकरांकडुन शिकावे.असो. काहीतरी फुकट मिळालेच पाहिजे हे अगदी पुणेरी धर्माला जागून हो. प्रसाद, अधिकार आहेच सरकारला असे नियम करण्याचा. अनैतिक असेल तर पुणेकरांनी कोर्टात सरकारला खेचावे असे हे म्हणतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अधिकार आहे ( माहीती नाही ), पण नैतिक अधिकार नक्की नाही. दुर्दैवाने कोर्टात लोक हेल्मेट्च्या उपयुकतेबद्दल च युक्तीवाद करतात. त्यामुळे सरकार जिंकते.

In reply to by प्रसाद१९७१

गांधींनी कायदे मोडले पण त्यासंबंद्धीच्या दंडाबद्दल कूरकूर केली नाही. गांधीजींचा दुसरा गुणही अंगी बाणवावा, मग काहीच समस्या नाही. :)

In reply to by प्रसाद१९७१

@कोणालाही दुचाकीवरुन जाताना अपघात झाला तर सरकार उपचाराची फुकट व्यवस्था करत नाही. कोणी मेले तर भरपाई देत नाही. मग सरकारला काय अधिकार आहे हेल्मेट सक्ती करायला? ज्या देशात कल्याणकारी योजना आहेत आणि वैद्यकीय उपचार सरकारची जबाबदारी आहे तिथे अशी सक्ती समजु शकतो, भारत सरकार कुठल्या अधिकारात हे सांगते आहे? - हेल्मेट न घालता एखाद्याने दुसर्‍याला इजा केली ( अपघात करुन ) तरी सरकार काही वेगळी जबाबदारी घेत नाही. - हेल्मेट न घातल्या मुळे कोणी कायमचा अपंग झाला, तर सरकार पेन्शन वगैरे देत नाही. हेल्मेट घातले असले तरी देत नाही. - हेल्मेट घातले कींवा नाही ह्याने सरकार वर कुठलाही वेगळा बोजा पडत नाही. - विमा कंपनी हेल्मेट घालत नसाल तर जास्त प्रिमियम मागू शकते, पण भारत सरकार कुठलाही नैतिक अधिकार नाही सक्ती करायचा.>>>>>>> क्या बात! *HAPPY* पुण्यात सर्वात पहिल्यांदा झालेली हेल्मेट्सक्ती अठवली..आणि नंतर यात कुणाकुणाचे हितसंबंध गुंतलेले होते..हे ही कळलं..(आणि अनेकांनी हतातला सगळा पैसा हेल्मेटात घालून..रस्त्यारस्त्यावर लावलेले हेल्मेट्चे स्टॉल्सही अठवले..आमच्या इथल्या एका रिक्षावाल्यानी रिक्षा विकून अठवडाभर त्या पैशात हा धंदा केला..आणि नंतर एकाला दोन रिक्षा घेतल्या..भजिवाले/बेकर्‍या/दुग्धालयं...इथेही तेंव्हा हेल्मेट विक्री चालायची..हे ही अठवलं...तोच चावट्पणा सध्यःकाली सुरु आहे..अर्थातच काहि दिवसात हे सर्व उजेडात येइलच. आणि अत्ता लोकांना कचकाऊन हेल्मेट खरेदी करायला लावणारे नंतर किमान २/३ वर्ष तरी त्याच्या अंमलबजावणी करण्याच्या योजना राबवतात का? हे ही पहाणं उद्बोधक ठरेल.

In reply to by अत्रुप्त आत्मा

सरकार औषधपाण्याची व्यवस्था करुन बसलेलेच असते. स्डोकं फुटलं तर दीनानाथ ला जाण्याऐवजी ससुनला जायला कुणी अडवलेलं नाही.

In reply to by hitesh

ठीक आहे, सरकार ने सांगावे की हेल्मेट घातले नसल्यामुळे डोक्याला इजा झाली तर फुकट उपचार ( ससून मधे सुद्धा ) मिळणार नाहीत. काही हरकत नाही. मी वीमा कंपनीचे उदाहरण दिलेच होते. आणी रस्त्यावर प्रत्येक दिवशी होणार्‍या शेकडो अपघातांपैकी कीती सरकारी दवाखान्यात जातात?

In reply to by प्रसाद१९७१

विमा कंपनी ही चारिटी कंपनी नाही. त्यांचे नियम वेगळे असतात. लोकांच्या चुकीने जरी अनारोग्य निर्माण झाले तरी सरकार उपचार करतेच. ते त्यांचे कर्तव्य आहे. सरकारी दवाखान्यात येऊ नका असे सरकार सांगत नाही. लोकाणॅअ‍ॅ शक्ञ असल्ञास जावे उपचार जरी खाजगी घेअतले तरी पोलिस केस , कोर्ट ही व्यवस्था सरकारीच असते.

In reply to by प्रसाद१९७१

भारी लॉजिक, हो.. ह्या हिशोबानी चोरीमारी (खाजगी मालमत्तेची), खून (वैयक्तिक वैरातून झालेला), लुबाडणूक (ज्यात सरकारला तोटा नाही) किंवा कुठलाही गुन्हा ज्यात सरकारी मालमत्ता, कर्मचारी, व्यवस्था हीला नुकसान होतं नाही, त्यात सरकारने लक्ष द्यायची गरज नाही. कारण की असल्या कुठल्याही गोष्टीत सरकार भरपाई देत नाही.. वर इए साहेबांनी बोलल्याप्रमाणे, "तत्कालीन फायदा" ह्यावरच लक्ष ठेवून माणुस वागतो, म्हणून कायद्याचा बडगा उगारावा लागतो.. iRobot चित्रपटातलं वाक्य आठवलं, " You humans are like children. You must be protected from yourselves.." बाकी चालु द्या..

       माझ्या मते हेल्मेट सक्ती हवी परंतू अश्या ठिकाणी जिथे वाहनचालक ६० पेक्षा जास्त वेगाने चालवू शकेल. पुण्यातील काही रस्त्यांवर एव्हडी गर्दी असते तिथे २०-२५ पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवताच येत नाही. उदा. सिंहगड रस्ता (सं. ७ नंतर), लक्ष्मी रस्ता (सं. ६ नंतर).        जिथे वाहनचालकाला गाडी पाय टेकवतच चालवावी लागते तिथे हेल्मेट कशाला.? ठो दे ठो करायला ?? *lol* की Kiss of Helmet करायला?? *kiss3*        हेल्मेट फक्त Highway ला ठेवा ना जिथे लोकं ६० च्या खाली येतच नाहीत. कमी रहदारीच्या रस्त्यावर हेल्मेट कशाला ?? एक गोष्ट प्रकर्शाने पहायला मिळते ती म्हणजे Scarf घातलेल्या एकाही महिलेला पोलीस आडवत नाहीत. आडवतात ते फक्त पुरुषांना. ( एखाद्या महिलेला आडवतील आणि 'समज' देऊन सुटका.) *unknw*

In reply to by हुकुमीएक्का

फक्त हायवेवरच सक्ती कशी करणार ? घारापासुन हायवेवर जायला आधी काही अंतर गल्लीबोळातुनच जाणार ना ? का घर हायवेवरच आहे ?

In reply to by hitesh

    तस नाही. मी म्हणतोय हेल्मेट 'घातलेच' पाहिजे असा नियम शहरात नको. हेल्मेट सोबत ठेवा पण Highway लाच सक्ती ठेवा. आजकल गाडीला हेल्मेट लावायची सोय पण असतेच की. माझं म्हणणे असे आहे शहरात हेल्मेट घालूनच गाडी चालवा असे नको. किंवा जिथून Highway सुरू होतो अश्या ठिकाणी हेल्मेट सक्ती करा. टोल नाक्यावर Checking करा. किती Traffic Police स्वत: हेल्मेट घालून गाडी चालवतात?? नियम सगळयांना सारखा. आणि RTO कडून अश्या प्रकारची कुठलीही बातमी अजून पेपरात आली नाहीये. मला वाटतं या वेळेस या वाहतूक पोलिसांना सरकार कडून दिवाळी बोनस मिळाला नसावा कारण आता "BJP" आहे ना. *i-m_so_happy* म्हणून नियमाच्या नावाखाली नागरिकांकडून वसूली.     रस्त्यावरून जाणार्‍या लोकांनी आधी हेल्मेट घातलं पाहिजे. आपण पेपरात वाचतोच की पादचार्‍याला पीएमटी/टँकर/कार/etc ने उडवले. त्यांना तरी भरपाई मिळते का कधी?? फक्त अज्ञात वाहनाने उडवले एव्हडेच कळते. असो एकच प्रश्न आहे. जर हेल्मेट घातलेला माणूस गाडीवरून फेकला गेला आणि त्याचे डोके शाबूत राहिले परंतू एखादे वाहन त्याच्या अंगावरून गेले आणि त्याचा मृत्यू झाला. तर त्याला सरकार कडून नुकसान भरपाई मिळेल का.?? की मग सरकार यापूढे 'चिलखत' घाला असा नवीन नियम आणणारे?? *lol*

In reply to by हुकुमीएक्का

किती Traffic Police स्वत: हेल्मेट घालून गाडी चालवतात??
याची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात. १. हेल्मेट न घालणार्‍यांचे डोके लोखंडाचे / दगडाचे असू शकते त्यामुळे त्याला मार लागू शकत नाही. २. हेल्मेट न घालणार्‍यांना डोकेच नसू शकते. ३. हेल्मेट न घालणार्‍यांना डोके असू शकते पण मेंदू दुसर्‍याच ठिकाणी असू शकतो त्यामुळे त्यांना काळजीचे कारण नसावे. ४. आपण नियम बनवले आहेत त्यामुळे आपला अपघात झाला तरी आपल्या डोक्याला इजा होणारच नाही असा ठाम आत्मविश्वास असावा. वरीलपैकी कोणते कारण पटते काय ते बघा.

In reply to by धर्मराजमुटके

मला वाटते जर Traffice Police हेल्मेट घालायला लागले तर तेही हेल्मेट विक्रेत्याकडून फुकट घेऊन घालतील. म्हणजे त्यालाही दंड की "काय रे Un-Authorized Company ची हेल्मेट विकतो?? ते पण रस्त्यावर अतिक्रमण करून?? चल केस करतो नाही तर आमच्या सर्व कर्मचार्‍यांना एक एक हेल्मेट दे तपासायला" . . . म्हणजे त्या विक्रेत्याच्या पोटावर पाय. *lol*

In reply to by हुकुमीएक्का

हेल्मेट घातल्याने डोके वाचले , तर हेल्मेटचे काम तिथे सफल झाले. अंगावरुन गाडी गेली तर बिचार्‍या हेल्मेटने / सरकारने काय करावे ? हेल्मेट सक्ती का आहे ? कारण हेल्मेट आहे किंवा नाही यावर जगणे मरणे एखाद्या केसमध्ये ठरु शकते. निर्णायक असु शाकते. पण गाडी अंगावरुन गेली तर माणुस मरणारच ! चिलखत असले तरी नसले तरी. त्यामुळे त्याचे कंपल्शन जस्टिफाय होउ शकत नाही.

म्हणे हेल्मेट घातल्याने पुणेकरांचा इगो दुखावतो

कोणी कितीही सक्ती केली, दंड केला, कायदा आणला, खोटा कळवळा आणून आमच्या सुरक्षिततेचा आव आणला तरी मी हेल्मेट वापरणार नाही हे निश्चित. एकवेळ पोलिसांना चुकविण्यासाठी गल्लीबोळातून जाऊ पण हेल्मेट सक्ती केली म्हणून मी कदापि हेल्मेट वापरणार नाही. आधी खड्डे बुजवा, रस्ते रूंद करा, वाहतूकीचे नियम पाळण्याची सक्ती करा, रस्त्यावर पुरेशी प्रकाशयोजना करा, वरखाली असलेली ड्रेनेजची झाकणे रस्त्याच्या पातळीत आणा आणि मग हेल्मेट सक्ती करा. जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही तोपर्यंत हेल्मेट परिधान करणे नाही.

In reply to by श्रीगुरुजी

समान नागरी कायद्याच्या नावाने ओरडणारे गुर्जी जे नागरी कायदे समानच आहेत ते मात्र पाळत नाहीत !

In reply to by hitesh

तुमच्या एखाद्या गड्याने म्हणु देत की "मुसलमान हेल्मेट घालणार नाहीत कारण ते इस्लामच्या विरूद्ध आहे", गुर्जी सार्‍या गावाला हेल्मेट घालून मोर्चा काढतेत की नाही बघाच... घोषणा ही तयार होईल, "इस देश में रहना होगा तो हेल्मेट पेहनके चलना होगा," =))

In reply to by श्रीगुरुजी

त्यापेक्षा आपण असं करुयात का? सगळे पुणेकर मिळून "किमान वाहतूक नियम" अशी एक यादी करूयात, आणि निदान ते तरी आम्ही पाळू शकतो हे सरकारला सिद्ध करून दाखवूयात. म्हणजे काय होईल की पुणेकरांची नियम पाळत रस्त्यांवर गाडी चालवण्याची कुवत आहे हे सिद्ध होईल, मग आपण चांगल्या रस्त्यांची मागणी अधिक जोमाने करू शकूच आणि आपोआपच आपल्या हेल्मेट सक्ती विरुद्धच्या आंदोलनाला वजन सुद्धा प्राप्त होईल नै का? अन्यथा तसेही आपल्या सोईचे नियम तेवढे लागू करण्यात आपण अनुभवी दिसताच आहात. त्यामुळे मग आहे तसेच वागत रहा, नियम असला काय नसला काय. अनेक नियम मोडतो त्यात हा अजुन एक...

In reply to by थॉर माणूस

>>> अन्यथा तसेही आपल्या सोईचे नियम तेवढे लागू करण्यात आपण अनुभवी दिसताच आहात. त्यामुळे मग आहे तसेच वागत रहा, नियम असला काय नसला काय. अनेक नियम मोडतो त्यात हा अजुन एक... सोयीच्या नियमांचा प्रश्नच नाही इथे. एखाद्या घराचे छप्पर गळत असेल तर छप्पर वॉटरप्रूफ करून गळती थांबविणे यालाच प्राधान्य असले पाहिजे. छप्परदुरुस्ती न करता घरातल्या घरात छत्री किंवा रेनकोट वापरण्याची सक्ती केली तर ते जसे हास्यास्पद होईल, तसेच अपघातांची मुख्य कारणे दूर न करता हेल्मेटसक्ती करणे हे हास्यास्पद आहे.

फाल्तू गोष्टीवर लै चर्चा झालेली दिसतीये. पुण्यात सक्ती झाल्यावरच एवढी बोंबाबोंब का? बाकिच्या शहरात तर कधीपासूनच आहे. कि सगळे हेल्मेट कारखानदार फक्त पुणेकरांच्या खिशावर डोळा ठेऊन आहेत असा पुणेकरांचा समज आहे? बाकी वाहतूक नियमांसाठी पुणेकरांच्या ..डीवर हंटरच पाहीजे यावर दुमत असण्याचे कारण नाही.

'स्वच्छ भारत'च्या धर्तीवर नरेण्द्र-देवेंद्र जोडगोळी राज्यात 'सुरक्षित महाराष्ट्र/पुणे'मोहिम राबवतील ही अपेक्षा.मग मराठी अभिनेते(भरत जाधव्,मकरंद अनास्पुरे) बाईकवर बसण्याआधी हेल्मेट घालतानाचे फोटो... मग हेल्मेटला विरोध करणारे मग नक्की हेल्मेट घालतील.

अपघात झाला तर हेल्मेट असेल किंवा नसेल तरी तुमच्या नशीबात जे होणार आहे ते होतेच. माझे दोन भाऊ मागच्या वर्षी हेल्मेट असून सुद्धा अपघातात गेले. (दोन बाईकची समोरासमोर टक्कर झाली, दोन्ही बाईकवरचे हेल्मेट घातलेले स्वार जागीच गेले. मागे बसलेले दोन्ही सुद्धा गेले..). तेव्हापासून दुचाकी चालवण्यापासून दुरच असतो. जवळच्या जवळ किंवा उपनगरात दुचाकी वापरावी व हमरस्त्यावर चारचाकी (किंवा सरकारी बस) वापरावी. (हे म्हणजे ब्रेड नाही मिळत तर केक खा असे म्हणण्यासारखे आहे पण दुचाकी चालवण्यार्‍यांच्या बेशिस्तीमुळे असे म्हणावेसे वाटते. हायवेवर मध्येच लेन तोडणे, उगाच दोन गाड्यांमधून जाणे, कट मारणे, उजव्यालेनमध्ये उगाचच गाडी हळू चालवणे या प्रकारांमुळे चारचाकीवाल्यांना फारच काळजीपुर्वक गाडी चालवावी लागते.). यामुळे हायवे/एक्स्प्रेस वे अशा रस्त्यावर दुचाकी चालवण्यास बंदी असावी असे वाटले. जास्तीत जास्त अपघात हे दुचाकीमुळेच होतात. मागेच नाशीक-मुंबई रस्त्यावर नीता होल्वोच्या मध्ये एक दुचाकी आली आणि तिला वाचवण्याच्या नादात वोल्वो दुसर्‍या लेनमध्ये घुसली आणि तिने एका इनोव्हाचा (आत बसलेल्यांसकट) चुराडा केला.

In reply to by योगी९००

(दोन बाईकची समोरासमोर टक्कर झाली, दोन्ही बाईकवरचे हेल्मेट घातलेले स्वार जागीच गेले. मागे बसलेले दोन्ही सुद्धा गेले..)
समोरासमोर टक्कर होण्याअगोदर त्यांनी एकमेकांना पाहिले नव्हते? सगळे ४ जण जाण्यासाठी बाईकचा स्पीड कमीतकमी किती हवा?
दुचाकी चालवण्यार्‍यांच्या बेशिस्तीमुळे असे म्हणावेसे वाटते. हायवेवर मध्येच लेन तोडणे, उगाच दोन गाड्यांमधून जाणे, कट मारणे, उजव्यालेनमध्ये उगाचच गाडी हळू चालवणे या प्रकारांमुळे चारचाकीवाल्यांना फारच काळजीपुर्वक गाडी चालवावी लागते.)
बेशिस्त कुणाचीही असू शकते...लेन तोडणे, कट मारणे हे प्रकार बाईकवाले"च" जास्त करतात कारण ४ चाकी पेक्षा बाईकवर असे करणे सोपे असते...पण स्वताचा मुलगा/मुलगी २चाकी कशी चालवतो याची खातरजमा करणे माझ्यामते प्रत्येक पालकाला शक्य असते...वाहतुकीचे नियम माहीत असल्याशिवाय हातात बाईक घेउन देउच नये आणि चारचाकीवाले सुध्धा समोरच्या बाईक/४चाकी पासून फक्त २ फूट अंतर ठेऊन चालवतात ते सुध्धा ५०+ च्या स्पीडला...अशांचे प्रमाणसुध्धा लक्षणियरीत्या वाढलेले आहे :(
हायवे/एक्स्प्रेस वे अशा रस्त्यावर दुचाकी चालवण्यास बंदी असावी असे वाटले.
सहमत...किंवा सेपरेट लेन असावी

In reply to by टवाळ कार्टा

समोरासमोर टक्कर होण्याअगोदर त्यांनी एकमेकांना पाहिले नव्हते? सगळे ४ जण जाण्यासाठी बाईकचा स्पीड कमीतकमी किती हवा? माझे भाऊ त्यांच्याच लेन मध्ये चालले होते. समोरून येण्यार्‍याने ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात अचानक मध्ये बाईक आणली. दोघांनाही सावरायला वेळ मिळाला नसावा. साधारण ८० चा वेग असावा. बातमी येथे वाचा.

In reply to by योगी९००

झाले ते वाईट झाले...आणि मी आणखी काही लिहित नाही...पण मनात १ प्रश्न आलाय...व्यनी करु की नको ते तुम्हीच सांगा

कायदा करण्याने काही लोक समाधान पावतात कायदा राबवण्याने काही लोक समाधान पावतात कायदा न राबवण्याने काही लोक समाधान पावतात पण राज्यकर्ते सर्वाना समाधान देऊ इच्छितात कारण ते कायद्याच्या वर आहेत

हेल्मेट घातल्या मुळे डोके वाचले पण कायमचे अपंगत्व आले (हात, पाय, कंबर मोडुन ) तर सरकार काही देणार आहे का? अश्या केसेस मधे त्या माणसाला मेलो असतो तर बरे झाले असते असे वाटेल.

In reply to by प्रसाद१९७१

मुळात आपण दुचाकी चालवत आहोत आणि आपली चुक असो वा नसो, आपल्यालाच जास्त भोगावे लागणार आहे ही जाणिव जरी आली तरी बर्‍याच प्रमाणात अपघात कमी होतील.

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद१९७१ - Fri, 14/11/2014 - 10:42 हेल्मेट घातल्या मुळे डोके वाचले पण कायमचे अपंगत्व आले (हात, पाय, कंबर मोडुन ) तर सरकार काही देणार आहे का? अश्या केसेस मधे त्या माणसाला मेलो असतो तर बरे झाले असते असे वाटेल. अरे बापरे........ एखाद्या मुद्द्याचा विरोध करण्यासाठी कायकाय तर्कटे चालवतील लोक सांगता येत नाही.

In reply to by विजुभाऊ

अरे बापरे........ एखाद्या मुद्द्याचा विरोध करण्यासाठी कायकाय तर्कटे चालवतील लोक सांगता येत नाही. कारण, मुद्दा जिंकणे महत्वाचे... खरेखोटे जाऊ दे तेल लावत *dash1*

हा धागा शंभरी मारणार याची खात्री शीर्षक बघूनच झाली होती. वेल डन लेखक व प्रतिसादक. असाच सपोर्ट देत चला. लोल

हेल्मेट न घालता अपघात झाला, आणि माणुस गेला तर विमा कंपणीने त्याचे नावाचे पैसे न देण्याचा निर्णय घ्या. आपोपा विमा कंपणीच्या नावाने कोणॅए बोलणाअर नाही, आणि हेल्मेट पण घातले जाईन. माणुस न जाता, काही हात पाय मोडला तरी मेडिक्लेम मिळणार नाही असा हि निर्णय घेण्यात यावा. म्हणजे ज्यांना हेल्मेट घालायचे नाही, त्यांनी त्या विमा कंपणीकडे जावु नये , त्यांना तशी सक्ती कोणॅए करु नये ही विनंती . बघा सगळॅ सरळ होतील

- सर्व जगात हेल्मेटची सक्ती आहे मग भारतात ती केली तर कोठे बिघडले ?. एक खासदार. आपले कायदे आपण इतर देशांकडे पाहून करायचे नसतात. ते आपल्या परिस्थीतीला साजेसे करायचे असतात. " नो मॅन्स, लॅन्ड मधे कोणत्याही वहानाचा वेग तीव्र असतो. सबब तिथे हेल्मेट सक्ती करणे एकवेळ क्रमप्राप्त आहे.महापालिका ग्रामपंचायती ई च्या हदीतील रस्ते त्यांची रुदी त्यातून अफाट वेगाने वहान चालवले जाण्याची शक्यता याचा विचार झाला पाहिजे. दुसरे असे की चालविणारा व मागे बसलेला या दोघात मागे बसणार्‍याने प्राधान्याने हेल्मेट घालणे हे सक्तीचे असले पाहिजे.कारण त्याचे स्वरूप हे थर्ड पार्टी इन्शुअरन्स सारखे आहे. हेलेमेट हा एक संरक्षक विमा आहे. तो मी एकटा असताना उतरवायचा की नाही याचे स्वातंत्र्य मला हवे. पण्॑ मागे बसलेल्याने आग्रह धरल्यास चालक म्हणून मी हेलमेट घालणे एकवेळ सक्तीचे असले तरी चालेल. पुणेकरांबाबत हा आक्षेप घेतला जातो की हे अतिशहाणे लोक आहेत. यांचाच फक्त सक्तीला विरोध का ? इंग्रजांचे अनेक देशांवर राज्य होते पण ते खटकले टि़ळकाना, बोसांना व गांधीना म्हणून त्याना आपण अतिशहाणे ठरवायचे का ? उलट अशी शक्यता आपण का गृहित धरत नाही की पुणेकरांचे आंदोलन हे इतर देशातील नागरिकाना प्रेरणा देणारे ठरून तेथील सक्ती नाहीशी होईल. दुसरे असे की मरण फक्त मेंदूला मार बसल्यानेच येते असे काही वैद्यक सांगत नाही. अपघात होताना " मेंदू कोठेय बरे त्याचा पहिला समाचार घेते असे काही नियती म्हणत नाही. मल्टीपल इन्जुरी तून शॉक हे मरणाचे एक कारण असू शकते की नाही ? दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल माझे असे निरिक्षण आहे की दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण कमी होत आहे. हे प्रमाण निव्वळ संख्येत मोजणे चूक आहे. रस्त्यावर धावणार्‍या वहानांच्या प्रमाणाचा विचार केला तर ते कमी होते आहे असेच सिद्ध होईल. दुभाजक झाल्यापासून ते कमी होताना दिसते आहे. पुणेकर नागरिक म्हणावे तितके जागरूक नाहीत. कायद्यातील या " सक्ती" ला कायमची हाकलून लावण्यासाठी त्यानी निवडणुकीपूर्वीच राजकीय पक्षांवर दबाव ठेवावयास हवा होता. निवडणुकी संपताच पद्धतशीरपणे हे अस्त्र बाहेर काढण्यात आले आहे. व जो पर्यंत आपण मोटर व्हीकल कायद्यात बदल करण्याचे यशस्वी आंदोलन करीत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. मधून मधून हे मांजर तुम्हाला आडवे जाणारच . कोणतेही कोर्ट याला स्थगिती वगैरे देण्याची शक्यता नाही कारण हा कायदा आहे वटहुकूम नव्हे.

In reply to by चौकटराजा

दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल माझे असे निरिक्षण आहे की दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण कमी होत आहे. हे प्रमाण निव्वळ संख्येत मोजणे चूक आहे. रस्त्यावर धावणार्‍या वहानांच्या प्रमाणाचा विचार केला तर ते कमी होते आहे असेच सिद्ध होईल. दुभाजक झाल्यापासून ते कमी होताना दिसते आहे. सर्वसाधारणपणे जेथे कायद्याचे राज्य आहे तेथे लोक अपघात टाळण्यासाठी जमिनीवर आखलेल्या दुभाजक रेषांनाही योग्य तो मान देतात. तर, इथे जनावरेही उड्या मारून पलिकडे जाऊ शकणार नाही असे रस्तादुभाजक लागतात (आता तसल्या दुभाजकांवरूनही उडी मारणारेही इथे सर्रास दिसतात ही गोष्ट अलाहिदा). यावरून इथे जरा जास्त कडक कायद्यांची आणि तेवढ्याच कडक अंमलबजावणीची गरज आहे असे वाटत नाही का ?