"नाही यार नाही. हा नाही. अरे तो ठीक आहे पंतप्रधान म्हणून. महाराष्ट्रात हा नाही पाहिजे. अरे तो मराठी माणसाचा, आपला, असा पक्ष नाहीये मित्रा.... तो महाराष्ट्रात मराठी माणसाला पोरकं करेल, अरे मारून टाकेल तो आपल्या अस्मितेला...." अगदी कळकळीने काल रस्त्यावर एक माणूस दुस-या माणसाला सांगत होता.
या सगळ्या विचारांत काहीसं तथ्य असलं जरी, तरी बरचसं नाही आहे. मुंबईतला एक मुख्य पक्ष हा पहिल्यापासून मराठी माणसाचा पक्ष राहिलेला आहे. मराठी माणसाला मुंबईत कधीच पोरकं केलं गेलं असतं. पण त्याला बळ दिलं, त्याचा दरारा प्रस्थापित केला तो या पक्षाने. दंगलींच्या वेळी मराठी माणसाला मुंबईत आधार होता तो याच पक्षाचा. या आणि अशा अनेक गोष्टी अगदी ख-या आणि महत्वाच्या आहेत. पण मला त्या माणसाच्या बोलण्यातला एकच मुद्दा खटकला. अस्मितेचा.
मराठी अस्मिता ! मराठी अस्मिता !.... कधी बंगळुरू मधे कन्नडी अस्मिता ! असं कुणी बोंब मारताना ऐकलंय का? मी तरी नाही. चेन्नईत मल्ल्याली अस्मितेच्या नावाने कुणी ओरडत नाही की बंगाल मधे बंगाली अस्मितेच्या नावाने नाही. पण ही अस्मिता त्यांच्या रोजच्या, सततच्या वागण्यातून दिसते. बंगळुरू मधे रिक्षावाले ठासून नो इंग्लिश नो हिंदी म्हणतात. ओनली कन्नडा. मग तिथे रहायला गेलेली मराठी मंडळी घरी आल्यावर मी थोडं थोडं कन्नड शिकलोय म्हणतात, त्यांना घरचेही अरे वा ! मस्त म्हणून शाबासकी देतात. इथे अस्मिता कुणाची श्रेष्ठ ठरली?
लोकल ट्रेन मधे आपण प्रवास करतो. अगदी सहजपणे आपण हिंदीत संवाद साधत असतो. उदा. 'भाईसाब जरा बाजू होना', 'कौनसा स्टेशन गया?', 'आपको कहां उतरना है?'. किंवा अगदीच फस्ट क्लास किंवा एसी बस मधे असू किंवा जरा टापटीप माणूस/बाई दिसली की आपण थेट इंग्रजी सुरू करतो. उदा. 'एक्स्क्यूज मी, डज धिस बस गो टू चेंबूर'. का? आपल्याला कुणी प्रतिबंध करत नाही 'नो हिंदी नो इंग्लिश' म्हणायला. शिरजोर पणे 'हिंदी मे बोल यार' म्हणणारी अमराठी मंडळी अनेकांनी कार्यालयात बघितली असतील कदाचित. त्यांच्यासमोर आपली अस्मिता मूग गिळून का बसते?
इंग्रजी शाळांवरचं प्रेम, इंग्रजी सण, आपले मराठी सणही साजरे करायच्या इंग्रजी पद्धती, या आणि अशा बाबतीत 'आपलीच' मराठी अस्मिता दाखवण्यात आपल्याला वाटणारा कमीपणा किंवा कालबाह्यतेची भावना अशा अनेक गोष्टींद्वारे आपण आपली ही अस्मिता मारतच असतो की. 'जीते जी' म्हणतात तसं.
हे असं असताना निवडणुका आल्या की कुण्या पक्षाची आणि लगोलग आपलीही अस्मिता मात्र जागी होते. मग आपल्याला पुळका येतो; भाषेचा, आणि ती भाषा, तिचा अभिमान बाळगणा-या अशा पक्षांचा. आता वास्तविक हा असा प्रकार कालबाह्य झाला आहे. पक्षांसाठी भाषिक मुद्द्यावर निवडणुका लढवणं योग्य राहिलेलं नाही आणि लोकांनी कुण्या राजकीय पक्षावर 'आपल्या' भाषेची अस्मिता जपण्याकरिता अवलंबून रहाणं योग्य राहिलेलं नाही. पुढे गेलंय सगळं आता. दोन दशकांपूर्वी जेंव्हा एका पक्षाने मराठी माणसाचं सबलीकरण केलं, तेंव्हा त्यासाठी तो काळ योग्य होता. पण आता जेंव्हा इतर पक्ष विकासाची कास धरत आहेत, ती लोकांच्या बुद्धीला पटत आहे, तेंव्हाही हे योग्य ठरेल ही शक्यता कमीच.
मराठी भाषा, तिची अस्मिता जपायला हवी, तर ती प्रत्येकाने कृतीतून, वागण्यातून जपायला हवी. जिथे तिथे मराठीचा पुरस्कार व्हायला हवा. छोट्या छोट्या गोष्टीतून मराठीचा, मराठी असल्याचा अभिमान दिसायला हवा. बंगळुरूच्या रिक्षावाल्यापासून ते जरीकाठी लुंगी घालून फिरणा-या भारताच्या माजी अर्थमंत्र्यांच्या वागण्यातून दिसतो तसा. एक पक्ष येईल, मराठी अस्मिता जपेल असं म्हणणं म्हणजे कुणीतरी येईल, वाढून देईल म्हणण्यासारखं आहे. आपण आपल्या बाजूने अस्मिता वा-यावर सोडायची, आणि एखादा राजकीय पक्ष ती जपेल म्हणत त्याला मत द्यायचं म्हणजे खुळेपणा आहे. क्रांतिवीर चित्रपटातला 'आज मै तुम्हे बचाऊंगा, कल कौन आयेगा?' वाला संवाद इथे आठवतो. सुजाणांनी त्यातून बोध घ्यावा.
एक मराठी म्हणून प्रत्येक माणसाला अभिमान जरी असला, तरी तोच राजकारणाच्या अग्रस्थानी ठेवण्यावर संबंधित पक्षांनी, मतदारांनी विचार करायला हवा. कारण याच्यामुळेच कदाचित आपण जे खरोखर गरजेचे मुद्दे आहेत, जो आपल्या हक्काचा विकास आहे, त्याच्यापासून दूर राहिले असू. तेंव्हा आज खरं तर विकासासारख्या महत्वाच्या मुद्द्याला प्राधान्य दिलं पाहिजे. लढाई विकासाची असली पाहिजे. मराठी आहेच; आणि राहील. आजच्या काळात गरज मराठीच्या तलवारीला धार लावण्याची नसून विकासाच्या तलवारीला मराठीची मूठ बसविण्याची आहे. आणि त्या मुठीला इथल्या मराठी माणसांची एकत्रित ताकद मिळाली पाहिजे. मग अटकेपार झेंडे रोवण्यापासून मराठीला मराठी माणसाला कुणीही अडवू शकणार नाही. एकत्रित ताकद मिळाली नाही तर मात्र भविष्यात अल्पसंख्यांकतेची ढाल करायची वेळ आपल्यावर येईल हे नक्की.
- अपूर्व ओक
वाचने
35070
प्रतिक्रिया
132
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>> अरे रे ! अतिशय बायस्ड ,
In reply to हल्ली आयआयएम मध्ये नेमक काय by सुहास..
जशी शिवसेना एकटी निवडणुक
In reply to >>> अरे रे ! अतिशय बायस्ड , by श्रीगुरुजी
या परिच्छेदातून प्रस्तुत
In reply to खो खो खो by क्लिंटन
जरूर
In reply to या परिच्छेदातून प्रस्तुत by विजुभाऊ
+१
In reply to उदा: उद्या समजा मराठीवर अशी by प्रसाद१९७१
अगदी हेच लिहिणार होतो.
In reply to +१ by आजानुकर्ण
तसा तुम्ही जिल्बी टाकुनपण
In reply to उदा: उद्या समजा मराठीवर अशी by प्रसाद१९७१
नाही दिसले हे पदार्थ, तर काय
In reply to उदा: उद्या समजा मराठीवर अशी by प्रसाद१९७१
आयला वीजूभाऊ - तुम्ही तर महान
In reply to नाही दिसले हे पदार्थ, तर काय by विजुभाऊ
अवांतर-
In reply to ज्या भाषा नष्ट झाल्या त्या by विजुभाऊ
"म्हाद्या " ही भरपूर कांदा
In reply to अवांतर- by यसवायजी
रेसीपी टाका हो.
In reply to "म्हाद्या " ही भरपूर कांदा by विजुभाऊ
अनिल अवचट यांचं ' छंदांविषयी
In reply to अवांतर- by यसवायजी
जरा इच्चार करीसन फेका दादा.
In reply to ज्या भाषा नष्ट झाल्या त्या by विजुभाऊ
हे आणखी एक. तिथलंच.
In reply to जरा इच्चार करीसन फेका दादा. by आनंदी गोपाळ
हा हा हा, अगदी अगदी
In reply to हे आणखी एक. तिथलंच. by आनंदी गोपाळ
भाषेची निर्मिती का झाली ?
मला वाटले होते की माझ्या
In reply to भाषेची निर्मिती का झाली ? by पिंपातला उंदीर
अरेरे.... तसं सुचवायचं होतंत
In reply to मला वाटले होते की माझ्या by प्रसाद१९७१
मराठी अस्मिता हे एक भोंगळ
मराठीचे हिंदीचं आक्रमण होतंय
In reply to मराठी अस्मिता हे एक भोंगळ by विजुभाऊ
हिंदी पखवाडा
In reply to मराठी अस्मिता हे एक भोंगळ by विजुभाऊ
अस्मितावाद्यांनी जरा हा लेख वाचावा!
वाचला. उत्तम आहे.
In reply to अस्मितावाद्यांनी जरा हा लेख वाचावा! by बोका-ए-आझम
धागा अस्मितेचा पुरस्कार करतोय
In reply to वाचला. उत्तम आहे. by वेल्लाभट
यातून आणि इतर मुद्द्यांतून जे म्हणायचंय ते कळलं नसेल तर....
In reply to धागा अस्मितेचा पुरस्कार करतोय by बोका-ए-आझम
अस्मितावाद्यांनी जरा हा लेख वाचावा!
मराठी
अगदी बरोबर.
In reply to मराठी by माईसाहेब कुरसूंदीकर
चेन्नैतील मल्याळी अस्मिता ही
काही चुकले की कांय
In reply to चेन्नैतील मल्याळी अस्मिता ही by असंका
तामिळ समजा हो
In reply to चेन्नैतील मल्याळी अस्मिता ही by असंका
अच्छा अच्छा!! समजलो. म्हणलं
In reply to तामिळ समजा हो by वेल्लाभट
याला..
In reply to तामिळ समजा हो by वेल्लाभट
अस्मिता
In reply to चेन्नैतील मल्याळी अस्मिता ही by असंका
लोल !
In reply to अस्मिता by सुनील
अहो
In reply to अस्मिता by सुनील
जल्ला, शेवटी सगले मद्रासीच...
In reply to चेन्नैतील मल्याळी अस्मिता ही by असंका
कंचा पक्ष ह्यो?
हा हा हा
In reply to कंचा पक्ष ह्यो? by आजानुकर्ण
अस्मिता
ही अस्मिता मराठी, तामीळ की
In reply to अस्मिता by कपिलमुनी
कि फर्क पैंदा
In reply to ही अस्मिता मराठी, तामीळ की by शिद
हो ते पण आहेच म्हणा.
In reply to कि फर्क पैंदा by टवाळ कार्टा
थोडक्यात काय तर
In reply to हो ते पण आहेच म्हणा. by शिद
मराठी
In reply to ही अस्मिता मराठी, तामीळ की by शिद
हिला मी आवडीने पाहतो.
In reply to अस्मिता by कपिलमुनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Global consumer confidence improves, India most bullish - Nielsenहि आमची अस्मिता ,हिच्यावर
In reply to अस्मिता by कपिलमुनी
भाषा एका नदी सारखी असते,
महाराष्ट्रात जर अमराठी
In reply to भाषा एका नदी सारखी असते, by विवेकपटाईत
+२... मराठी खाऊ-भाउ पेक्षा
In reply to महाराष्ट्रात जर अमराठी by शिद
आम्हाला तर इंग्लंड मधला
In reply to भाषा एका नदी सारखी असते, by विवेकपटाईत
भारताचा पहिला पंतप्रधान
In reply to आम्हाला तर इंग्लंड मधला by प्रसाद१९७१
इंग्लंड मधे शिकलेला आणी
In reply to भारताचा पहिला पंतप्रधान by बोका-ए-आझम
मराठी माणूस हा नेहमीच
सगळ्यात कालाचा महिमा मोठा..
नुस्तेच कोब्रा-देब्रा कशाला
फरक नक्कीच पडतो आहे.....
In reply to नुस्तेच कोब्रा-देब्रा कशाला by विजुभाऊ
काडी टाकण्यासाठी धन्यवाद. आता
In reply to नुस्तेच कोब्रा-देब्रा कशाला by विजुभाऊ
.
.
मराठी ही फक्त मुंबईतच बोलली जाते का ?