✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दिवाळीचा बाण...

अ — अत्रुप्त आत्मा, Tue, 10/25/2011 - 19:41
आगं मैना गं मैना गं,जरा चष्मा तुझा मला दे ना, माझा बाटलीतं बानच जाइ ना...!॥धृ॥ दमुन थकुन टाइट मी झालो, फटाकडी उडवाया गच्चीवर आलो, पन अंधारात नेमच लागं ना...! बानाची काटकी हाय लय म्होटी, त्येच्या मापानं बाटली छोटी, आन्‌ हातानं अंदाजचं यै ना...! डोळ्यावर झापड वयानं आली, हात नाय जात अता बाटलीच्या खाली, अता तुच मला आधार दे ना...! ये ना मैना माजी साथं कराया, बानाची वात जरा नीट खुडाया, तुज्या नजरंचा ख्येळच है ना...? नंतर माजा बानं जोरातं उडल, पिरतीच्या गगनाला खोलवर भिडल, ह्यो हातगुन तुजाचं हाय ना...! होउं दे झोकात दिवाळी आपली, माजं ह्ये कडबोळं तुजी ती चकली, ह्यो लग्नाचा फराळंचं है ना...!

प्रतिक्रिया द्या
15646 वाचन

💬 प्रतिसाद (60)

लै भारी.

प्रचेतस
Tue, 10/25/2011 - 22:14 नवीन
_/\__/\__/\_ भटजीबुवा. एक नंबर. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. असेच बाण उडवून फराळ करत रहा.
  • Log in or register to post comments

डोळ्यावर झापड वयानं आली, हात

प्रकाश१११
Wed, 10/26/2011 - 09:22 नवीन
डोळ्यावर झापड वयानं आली, हात नाय जात अता बाटलीच्या खाली, अता तुच मला आधार दे ना...! छान लिहिलीस .मस्त ..!!
  • Log in or register to post comments

वल्ली आणी प्रकाशराव दोघांसही

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/27/2011 - 00:03 नवीन
वल्ली आणी प्रकाशराव दोघांसही धन्यवाद... :-)
  • Log in or register to post comments

खुपच छान अप्रतीम........

लीलाधर
गुरुवार, 10/27/2011 - 10:58 नवीन
रामबाण दीवाळीचा बाण लागलाय............... एकदम झकास..............
  • Log in or register to post comments

लई भारी!!

मोहनराव
गुरुवार, 10/27/2011 - 13:54 नवीन
शेवट मस्त!! होउं दे झोकात दिवाळी आपली, माजं ह्ये कडबोळं तुजी ती चकली, ह्यो लग्नाचा फराळंचं है ना...!
  • Log in or register to post comments

दिवाळीचा बाण हा आज्ञेवरून

बॅटमॅन
Sun, 09/08/2013 - 13:32 नवीन
दिवाळीचा बाण हा खास गणपतीच्या वेळेसच बाहेर काढत आहे. या अमोघ अस्त्राकडे मिपाकरांचे आजवर अक्षम्य दुर्लक्ष झालेय.... ही अनास्था चोलबे ना!!!!
  • Log in or register to post comments

=))

प्रचेतस
Sun, 09/08/2013 - 13:36 नवीन
=)) =)) =)) अगदी अगदी. इतकी प्रत्ययकारी कविता आजवर इतकी दुर्लक्षित कशी राहिली होती कुणास ठाऊक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नैतर काय. एकेक कडवे

बॅटमॅन
Sun, 09/08/2013 - 13:46 नवीन
नैतर काय. एकेक कडवे प्रत्ययकारी आहे. शब्दयोजना विलोभनीय, निरागस आणि अल्पाक्षररमणीय आहे. उदा.
बानाची काटकी हाय लय म्होटी, त्येच्या मापानं बाटली छोटी, आन्‌ हातानं अंदाजचं यै ना...!
जीवनातील अनिश्चिततेचा, मिसफिटपणाचा असा 'फॉक्कन' प्रत्यय क्वचितच अजून कुठे आला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अयायायायायायाया

अभ्या..
Sun, 09/08/2013 - 21:47 नवीन
अयायायायायायाया बॅट्या कुठे सापडलं रे खोकं? माळ्यावर टाकून दिले होते की काय? असला जबरा दारुगोळा बुवांनी लपवून ठेवला होता की काय? बुवा तुमच्या फायरवर्क्स ला सोलापूरच्या आतिषबाजी स्पर्धेत सहभागी व्हायची इनंती करीत आहोत. पहिले बक्षीस तुमचेच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बॅट्या कुठे सापडलं रे खोकं?

बॅटमॅन
Mon, 09/09/2013 - 00:18 नवीन
बॅट्या कुठे सापडलं रे खोकं? माळ्यावर टाकून दिले होते की काय?
इतिहाससंशोधनाचा असाही फायदा होतो कधीकधी ;) बाकी बुवांच्या फायरवर्क्स बद्दल आम्ही पामरे काय बोलावे. असला झबरदस्त दारुगोळा अजून नाय कुठं गावायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

झकास हो गुर्जी. दिवाळीचे वेध

पाषाणभेद
Sun, 09/08/2013 - 13:42 नवीन
झकास हो गुर्जी. दिवाळीचे वेध फार लवकर लागले.
  • Log in or register to post comments

बुवा वा वा वा माझा तो

लीलाधर
Sun, 09/08/2013 - 14:38 नवीन
मठ्ठा अन् तुमची ही जीलबी एक णंबर कॉंबिणेशण हाये बरं का .... बॅटा वल्ल्या आपलं अगोबा आणा ओ एक बाण बुवाला देउ आपण जीलबीचं वाण :))
  • Log in or register to post comments

बॅटा वल्ल्या आपलं अगोबा आणा ओ

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/08/2013 - 16:29 नवीन
बॅटा वल्ल्या आपलं अगोबा आणा ओ एक बाण बुवाला देउ आपण जीलबीचं वाण Lol>>> :D बघ... परत "शी" केलीस! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

=))

किसन शिंदे
Mon, 09/09/2013 - 00:53 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बाण

उद्दाम
Sun, 09/08/2013 - 14:51 नवीन
बाण
  • Log in or register to post comments

बुवांची कविता म्हणजे सिल्व्हर ज्युबिली

चौकटराजा
Sun, 09/08/2013 - 17:33 नवीन
दादा कोंडके यांचा सततच्या सिल्वर ज्युबिली चा विक्रम मोडणारी कविता. ह ह पु वा ... पुरती वात लागली ! पेताड कवीचा बाण भरकटला पण बुवाचा बराबर बसला ! वाट नाही बुवा, वात लागली !!!!!!
  • Log in or register to post comments

आरं आरं ..

चौकटराजा
Sun, 09/08/2013 - 17:35 नवीन
बुवा , तो कवि दमून टाईट झालाय का ? सॉरी ! तेला पेताड बोल्लो !
  • Log in or register to post comments

@तो कवि दमून टाईट झालाय का?>>

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/08/2013 - 17:54 नवीन
@तो कवि दमून टाईट झालाय का?>>>प्रथम "तो कवि" ना...ह्ही! "कवितेतला माणूस"..असे म्हणा! :p दमल्या'नी टाइट होत नाय का??? आपला हणुभव काय? :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

याचा अर्थ वाचनमात्र असता,,,असा होतो..

फुलपात्र
Sun, 09/08/2013 - 19:57 नवीन
कारण प्रतिक्रीया कुठेही दिसत नाहीत...................... का तुम्हाला दिसत नाहीत? तुमचाही गणेशा झाला की काय ? गणेशाला फोटो दिसत नाहीत आणि तुम्हाला प्रतिक्रीया :))
  • Log in or register to post comments

हा प्रति साद कुणाला उद्देशून

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/08/2013 - 21:41 नवीन
हा प्रति साद कुणाला उद्देशून ? नक्की कुठे "द्यायचा" होता? Image removed. सांगाल काय? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलपात्र

फुलपात्र... तुमचा प्रतिसाद

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/08/2013 - 21:54 नवीन
फुलपात्र... तुमचा प्रतिसाद बहुतेक इथे- http://misalpav.com/comment/508580#comment-508580 - वांग्याच्या धाग्यावर पडायचा होता, पण एकावेळी दोन भाज्या करण्याच्या नादात,चुकून त्या पातेल्या(वर)चा "डाव" हिकडे पडलेला दिसतोय! =)) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

असूदे हो बुवा.. "भांडे" बदलले

मोदक
Sun, 09/08/2013 - 23:15 नवीन
असूदे हो बुवा.. "भांडे" बदलले. इतकेच! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मोदू...मोदू... तुला मारिन

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/08/2013 - 23:43 नवीन
मोदू...मोदू... तुला मारिन अंडी बुदू बुदू!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

=)) =))

बॅटमॅन
Mon, 09/09/2013 - 00:17 नवीन
=)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

दंडवत

मुक्त विहारि
Tue, 09/10/2013 - 16:06 नवीन
त्रिवार दंडवत
  • Log in or register to post comments

अंधारात बाण बाटलीत घालून

मालोजीराव
Wed, 09/11/2013 - 11:55 नवीन
अंधारात बाण बाटलीत घालून उडवताना होणारी 'दमछाक' , ताक घुसळताना होणारी भांड्याची आन दांड्याची 'ओढताण' यांचे उत्स्फूर्त चित्रण आपल्या आशयघन कवितेद्वारे करणारे सामाजिक कवी 'ब्वासायेब घुसळे' यांचे पुनः अभिनंदन !
  • Log in or register to post comments

@यांचे पुनः अभिनंदन ! >>>

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/11/2013 - 13:04 नवीन
@यांचे पुनः अभिनंदन ! >>> विशेष काव्य रसास्स्वादक विषयो'त्प्रीय,मालो जी राव... =)) यांचे पुनः अभिनंदनाबद्दल... आमच्याकडूनंही पुनःपुन्हा हबिनंदण! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

अत्युच्च.

प्यारे१
गुरुवार, 09/12/2013 - 00:16 नवीन
अत्युच्च. काय ती, काय ती अलौकिक प्रतिभा.... आहाहा! 'प्रेमाचा बाण' कुणाच्या तरी वर्मी लागून बुवांची 'दिवाळी' लवकरात लवकर साजरी व्हावी ही गणराजाचरणी प्रार्थना!
  • Log in or register to post comments

दिवाळीच्या निमित्ताने

प्रचेतस
Fri, 10/24/2014 - 08:07 नवीन
दिवाळीच्या निमित्ताने आत्मूगुर्जींचा हा दिवाळीचा बाण आठवला.
  • Log in or register to post comments

आंssssssss!!!!

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/24/2014 - 09:21 नवीन
=)) आंssssssss!!!! =)) दू दू हत्ती!!! :-D :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हे तर धनाजीराव नामक वाकडे

सूड
Fri, 10/24/2014 - 10:38 नवीन
हे तर धनाजीराव नामक वाकडे कवीच्या सखू या कवितेहूनही वरताण काव्य आहे. ;)
  • Log in or register to post comments

आपल्याला हे कळलं,यातच सारं

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/25/2014 - 07:33 नवीन
आपल्याला हे कळलं,यातच सारं(काही) आलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आनंद शिंदे झक मारतंय की वो ह्यापुढं...

माम्लेदारचा पन्खा
Sat, 10/25/2014 - 08:38 नवीन
बुवा....शीडी काडा तुमी येखांदी.....आमी ऐकू ती.... पन ह्या कुठ्ल्या झाडानं धरलं वो तुमास्नी?
  • Log in or register to post comments

अगागागा !!

खटपट्या
Sat, 10/25/2014 - 10:01 नवीन
अगागागा !! दादा कोण्ड्केंना तुम्हीच गाणी लीहुन द्यायचात काहो ? दादा आज असते तर लाखभर तरी दीलेच असते या गाण्याचे !! ह. घ्या.
  • Log in or register to post comments

@दादा आज असते तर लाखभर तरी

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/25/2014 - 10:38 नवीन
@दादा आज असते तर लाखभर तरी दीलेच असते या गाण्याचे !! >>> दादांनी दिले .. असं म्हणले असते ,तरी पोचले असते! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

सुचतात तरी कशी हो अशी काव्य

प्रचेतस
Sat, 10/25/2014 - 10:59 नवीन
सुचतात तरी कशी हो अशी काव्य तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

+१

सूड
Sun, 10/26/2014 - 20:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Sun, 10/26/2014 - 21:59 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+११११११११११११११११११११११११११११

बॅटमॅन
Mon, 10/27/2014 - 16:24 नवीन
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ ("आत्म"प्रतिभेने विस्मयचकित) बट्टमण्ण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

काय काव्य आहे.

जेपी
Sat, 10/25/2014 - 10:08 नवीन
काय काव्य आहे. काढल तेवढे अर्थ निघतील. *wink*
  • Log in or register to post comments

आहा... काय ते काव्य. अफाट!!!

सतिश गावडे
Sat, 10/25/2014 - 10:26 नवीन
आहा... काय ते काव्य. अफाट!!! रसग्रहणाची सुपारी द्यायची का?
  • Log in or register to post comments

दिवाळी आली की बुवाचा हा बाण

प्रचेतस
Tue, 11/10/2015 - 18:07 नवीन
दिवाळी आली की बुवाचा हा बाण अठवतोच.
  • Log in or register to post comments

हे काव्य वर आणण्यासाठी

सतिश गावडे
Tue, 11/10/2015 - 18:11 नवीन
हे काव्य वर आणण्यासाठी धन्यवाद. पुनर्प्रत्ययाचा आनंद का काय म्हणतात तो झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अत्रुप्त कोंडके =))

स्वामी संकेतानंद
Tue, 11/10/2015 - 18:32 नवीन
अत्रुप्त कोंडके =))
  • Log in or register to post comments

@अत्रुप्त कोंडके>>> दुत्त

अत्रुप्त आत्मा
Tue, 11/10/2015 - 19:40 नवीन
@अत्रुप्त कोंडके>>> Image removed. दुत्त दुत्त स्वामिज्जि!!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद

अत्युच्च काव्याचे पुनरेकवार

सूड
Tue, 11/10/2015 - 18:49 नवीन
अत्युच्च काव्याचे पुनरेकवार रसग्रहण!
  • Log in or register to post comments

वा बुवा..!!!! =))

मोदक
Tue, 11/10/2015 - 18:54 नवीन
वा बुवा..!!!! =))
  • Log in or register to post comments

बाब्बौ....गुर्जींनी काय अफाट

टवाळ कार्टा
Tue, 11/10/2015 - 20:02 नवीन
बाब्बौ....गुर्जींनी काय अफाट काव्ये रचली आहेत....वेदिओ बन्वा अता यावर ;)
  • Log in or register to post comments

वेदिओ बन्वा

सतिश गावडे
Tue, 11/10/2015 - 20:06 नवीन
वेदिओ बन्वा
हे चुकून "वेदिवर चढवा" असे वाचले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मग कै कुठचे बाण कुठे उडतील कै

टवाळ कार्टा
Tue, 11/10/2015 - 20:15 नवीन
मग कै कुठचे बाण कुठे उडतील कै पत्ताच नै
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा