Skip to main content

दिवाळीचा बाण...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 25/10/2011 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
आगं मैना गं मैना गं,जरा चष्मा तुझा मला दे ना, माझा बाटलीतं बानच जाइ ना...!॥धृ॥ दमुन थकुन टाइट मी झालो, फटाकडी उडवाया गच्चीवर आलो, पन अंधारात नेमच लागं ना...! बानाची काटकी हाय लय म्होटी, त्येच्या मापानं बाटली छोटी, आन्‌ हातानं अंदाजचं यै ना...! डोळ्यावर झापड वयानं आली, हात नाय जात अता बाटलीच्या खाली, अता तुच मला आधार दे ना...! ये ना मैना माजी साथं कराया, बानाची वात जरा नीट खुडाया, तुज्या नजरंचा ख्येळच है ना...? नंतर माजा बानं जोरातं उडल, पिरतीच्या गगनाला खोलवर भिडल, ह्यो हातगुन तुजाचं हाय ना...! होउं दे झोकात दिवाळी आपली, माजं ह्ये कडबोळं तुजी ती चकली, ह्यो लग्नाचा फराळंचं है ना...!
काव्यरस

वाचने 15750
प्रतिक्रिया 60

प्रतिक्रिया

_/\__/\__/\_ भटजीबुवा. एक नंबर. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. असेच बाण उडवून फराळ करत रहा.

शेवट मस्त!! होउं दे झोकात दिवाळी आपली, माजं ह्ये कडबोळं तुजी ती चकली, ह्यो लग्नाचा फराळंचं है ना...!

दिवाळीचा बाण हा खास गणपतीच्या वेळेसच बाहेर काढत आहे. या अमोघ अस्त्राकडे मिपाकरांचे आजवर अक्षम्य दुर्लक्ष झालेय.... ही अनास्था चोलबे ना!!!!

In reply to by बॅटमॅन

=)) =)) =)) अगदी अगदी. इतकी प्रत्ययकारी कविता आजवर इतकी दुर्लक्षित कशी राहिली होती कुणास ठाऊक.

In reply to by प्रचेतस

नैतर काय. एकेक कडवे प्रत्ययकारी आहे. शब्दयोजना विलोभनीय, निरागस आणि अल्पाक्षररमणीय आहे. उदा.
बानाची काटकी हाय लय म्होटी, त्येच्या मापानं बाटली छोटी, आन्‌ हातानं अंदाजचं यै ना...!
जीवनातील अनिश्चिततेचा, मिसफिटपणाचा असा 'फॉक्कन' प्रत्यय क्वचितच अजून कुठे आला असेल.

In reply to by बॅटमॅन

अयायायायायायाया बॅट्या कुठे सापडलं रे खोकं? माळ्यावर टाकून दिले होते की काय? असला जबरा दारुगोळा बुवांनी लपवून ठेवला होता की काय? बुवा तुमच्या फायरवर्क्स ला सोलापूरच्या आतिषबाजी स्पर्धेत सहभागी व्हायची इनंती करीत आहोत. पहिले बक्षीस तुमचेच. :)

In reply to by अभ्या..

बॅट्या कुठे सापडलं रे खोकं? माळ्यावर टाकून दिले होते की काय?
इतिहाससंशोधनाचा असाही फायदा होतो कधीकधी ;) बाकी बुवांच्या फायरवर्क्स बद्दल आम्ही पामरे काय बोलावे. असला झबरदस्त दारुगोळा अजून नाय कुठं गावायचा.

मठ्ठा अन् तुमची ही जीलबी एक णंबर कॉंबिणेशण हाये बरं का .... बॅटा वल्ल्या आपलं अगोबा आणा ओ एक बाण बुवाला देउ आपण जीलबीचं वाण :))

In reply to by लीलाधर

बॅटा वल्ल्या आपलं अगोबा आणा ओ एक बाण बुवाला देउ आपण जीलबीचं वाण Lol>>> :D बघ... परत "शी" केलीस! =))

दादा कोंडके यांचा सततच्या सिल्वर ज्युबिली चा विक्रम मोडणारी कविता. ह ह पु वा ... पुरती वात लागली ! पेताड कवीचा बाण भरकटला पण बुवाचा बराबर बसला ! वाट नाही बुवा, वात लागली !!!!!!

बुवा , तो कवि दमून टाईट झालाय का ? सॉरी ! तेला पेताड बोल्लो !

In reply to by चौकटराजा

@तो कवि दमून टाईट झालाय का?>>>प्रथम "तो कवि" ना...ह्ही! "कवितेतला माणूस"..असे म्हणा! :p दमल्या'नी टाइट होत नाय का??? आपला हणुभव काय? :p

कारण प्रतिक्रीया कुठेही दिसत नाहीत...................... का तुम्हाला दिसत नाहीत? तुमचाही गणेशा झाला की काय ? गणेशाला फोटो दिसत नाहीत आणि तुम्हाला प्रतिक्रीया :))

In reply to by फुलपात्र

हा प्रति साद कुणाला उद्देशून ? नक्की कुठे "द्यायचा" होता? http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-007.gif सांगाल काय? http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-004.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

फुलपात्र... तुमचा प्रतिसाद बहुतेक इथे- http://misalpav.com/comment/508580#comment-508580 - वांग्याच्या धाग्यावर पडायचा होता, पण एकावेळी दोन भाज्या करण्याच्या नादात,चुकून त्या पातेल्या(वर)चा "डाव" हिकडे पडलेला दिसतोय! =)) http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-tv-008.gif

त्रिवार दंडवत

अंधारात बाण बाटलीत घालून उडवताना होणारी 'दमछाक' , ताक घुसळताना होणारी भांड्याची आन दांड्याची 'ओढताण' यांचे उत्स्फूर्त चित्रण आपल्या आशयघन कवितेद्वारे करणारे सामाजिक कवी 'ब्वासायेब घुसळे' यांचे पुनः अभिनंदन !

In reply to by मालोजीराव

@यांचे पुनः अभिनंदन ! >>> विशेष काव्य रसास्स्वादक विषयो'त्प्रीय,मालो जी राव... =)) यांचे पुनः अभिनंदनाबद्दल... आमच्याकडूनंही पुनःपुन्हा हबिनंदण! :p

अत्युच्च. काय ती, काय ती अलौकिक प्रतिभा.... आहाहा! 'प्रेमाचा बाण' कुणाच्या तरी वर्मी लागून बुवांची 'दिवाळी' लवकरात लवकर साजरी व्हावी ही गणराजाचरणी प्रार्थना!

अगागागा !! दादा कोण्ड्केंना तुम्हीच गाणी लीहुन द्यायचात काहो ? दादा आज असते तर लाखभर तरी दीलेच असते या गाण्याचे !! ह. घ्या.

In reply to by खटपट्या

@दादा आज असते तर लाखभर तरी दीलेच असते या गाण्याचे !! >>> दादांनी दिले .. असं म्हणले असते ,तरी पोचले असते! :-D

In reply to by प्रचेतस

+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ ("आत्म"प्रतिभेने विस्मयचकित) बट्टमण्ण.

मस्त

.

In reply to by प्रचेतस

आणि कधीही एक्सपायरी डेट नसलेला दारुगोळा आहे. वल्लीं चे आभार. आत्मुदा लिखित साहित्य आस्वादक अखिल पिंपरी-चिंचवड गावठाण महासंघाचा सक्रिय सभासद नाखु वाचकांची पत्रेवाला

शिरसाष्टांग दंडवत बुवा. एवढ्या पूर्वी उडवलेला सूचक शृंगारिक मदनबाण आज नजरेच्या टप्प्यात आला.