विडंबन काव्यमाला-भाग-१ ''मी माझा''(मग तू कुणाचा?)
थोडी प्रस्तावना-''मी माझा'' हा चंद्रशेखर गोखले यांचा चारोळी काव्य संग्रह,अंदाजे१२ वर्षांपुर्वी आला होता.तो त्यावेळी जसा आला तसाच भरपूर गाजला देखिल होता...''त्या काळी''त्याची पारायंणं करण्यात आंम्ही अग्रेसर होतो.म्हणजे एके काळी मी त्यांचा fan होतो,त्यानंतर पुला खालुन बरच पाणी वाहुन गेल्यानंतर त्याचा पंखा झाला.तोपर्यंत चंगुचे २/३पुढील भागही प्रसारित झालेले होते.पण नंतर त्यात चव राहिली नाही म्हणुन म्हणा,किंवा त्याचा कंटाळा आला म्हणुन असेल...पण ते वाचण्या अईवजी त्याचं विडंबनच सुचू लागलं.तीच विडंबनं आता मुळ कवितांसह इथे भागशः प्रसारित करत आहे. (आधी मुळकाव्य व नंतर विडंबन असा क्रम मुद्दामच सोय म्हणुन ठेवला आहे.)
१)नेहमीच डोक्यानं विचार करु नये....................नेहमीच बेसनाचा विचार करु नये
कधी भावनांनाही वाव द्यावा...........................बटाट्यांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना..................................भुकेलेल्या पोटांना
स्वप्नांचा गाव द्यावा.....................................'चांगला' वडापाव द्यावा
२)खराट्यानं झाडतात ते.................................. तांब्यानी टाकतात ते
प्राजक्ताचा सडा..............................................जिलबीचा वेढा
आणि मी हळहळलो,तर म्हणतात.....................आणी मी कळवळलो तर
हा खरा वेडा.............................................मला देतात पेढा
३)सगळं तुला देऊन पुन्हा..................................तुझ्यात कळशी ओतुनही
माझी ओंजळ भरलेली....................................माझी कळशी भरलेली
पाहिलं तर तू तुझी ओंजळ..............................पाहिलं तर,तू तुझी कळशी
माझ्या ओंजळीत धरलेली............................. माझ्या कळशीवर धरलेली
४)झाडावरुन प्राजक्त ओघळतो...................... चौरंगावरुन नारळ पडतो
त्याचा आवाज होत नाही...........................धप्प-कन आवाज होतो--नाही???
याचा अर्थ असा नाही.................................याचा अर्थ असा नाही
की त्याला इजा होत नाही..........................की पुजेत मजा येत नाही
५)मिठी या शब्दात.....................................मिठि नावाच्या नाटकात
केवढी मिठास आहे..................................केवढी मिठ्ठी - आस आहे
नुसता उच्चारला तरी..............................हस्तस्पर्श ही प्राथमिकता
क्रुतीचा भास आहे....................................तर''चुंबन''फुकट पास आहे
पराग दिवेकर
:-)
एक सपक विडंबन
सपक तर सपक
=))
अप्रतिम ... पुढील भागाच्या
मी माझा... तर...
https://www.scribd.com/doc
चान्गलंय !!!
हाहाहा !! बुव्वेश .... भन्नाट
मजा आली, तसे मला विडंबन
वा.....!!!!
(No subject)
च्यायला. जिलबी अन भांडे यांचा
चं.गो. आवडत नाहीत
पण विडंबनं झकास !
सॉल्लीड
अर्रे हे आज वाच्ले...
चंगो मी काॅलेजमध्ये असल्यापासून
..तुझ्यात कळशी ओतुनही
खरं आहे.
फार छुपा अर्थ दडलेला है त्यात
मग
+११
इथे नको...तिकडे या...तिकडे
इथं नको तिथं जाऊ
उच्च दर्जाची विडंबने.
धनु राशीला साडेसाती आहे काय?
धन्या माहीत आहे, धनू कोण ?
मिठीबाई नावाच्या कॉलेजात