Skip to main content

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)

लेखक संपादक मंडळ यांनी बुधवार, 24/09/2014 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 --------------------------- छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या २ स्पर्धांनंतर तिसरी स्पर्धा जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons) स्पर्धेचे नियम दुसर्‍या स्पर्धेप्रमाणेच राहतील. म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून ७ दिवस. इतर सर्व नियम सुद्धा दुसर्‍या स्पर्धेप्रमाणेच! सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!

वाचने 82942
प्रतिक्रिया 132

प्रतिक्रिया

monsoon

In reply to by चौकटराजा

देवताओंके चहीते फोटोजमेंसे हमारा सबसे पसंदीदा फोटो. (वाक्याव्हेर: हिंदी ट्रॉय).

कुल्लू मनाली रस्ता …. डिसेंबर महिना. वेळ साधारण संध्याकाळचे ४. ही कदाचित पॉपलर नावाची झाडे आहेत. (या भागात बरीच पॉप्युलर आहेत. :) ) Yellos_edited

Fall 2013 Vermont गेल्या वर्षी व्हर्मॉन्टला काढला आहे. वरील फोटो दिसत नसल्यास येथे जाऊन बघावे https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk पूर्ण अल्बम बघायची इच्छा असल्यास येथे बघता येईल https://app.box.com/s/z2mby00x8rxzp2t47lxo https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk

आमची पण एक एंट्री... शिकागोतल्या एका बर्फाळ दिवसानंतरची गंभीर आणि किंचित उदास करडी छ्टा असलेली संध्याकाळ. सगळीकडे निष्पर्ण झाडांचे खराटे आणि दिसेल तेथपर्यंत साचलेले हिम. 0 दुर्दैवाने एक्झिफ डाटा उपलब्ध नाहीये. :(

सर्व छायाचित्रे सुरेख आहेत ok

गुलमर्ग येथे जवळपास ९००० फुट उंचीवर असलेल्या बर्फाच्या पठारावर असताना अचानक तापमानात झालेला बदल आणि अनुभवलेली बर्फवृष्टी . 1

rutu चैतन्य महाप्रभु दीक्षितांचे शब्द उसने घेऊन - त्या थेंबांशी हितगुज व्हावे छान टपोरे अन सृजनाचे मुक्त फुलावे मनी फुलोरे

ही स्पर्धा, स्पर्धा म्हणून रद्द करावी अशी नम्र विनंती करण्यात येत आहे. आमच्या दृष्टीनं सगळेच विजेते आहेत. अत्यंत सुंदर छायाचित्रांना उजवं डावं करुन कुणाचाही हिरमोड करण्याची इच्छा नाही किंबहुना तसं करताच येणार नाही.


In reply to by सुखी

मस्त फोटो!! आता पुणेरी कमेंटः येवढं पाणी शिंपडताय, आलं का गुलाब शुद्धीवर??

~ हिवाळा ~ माणसाच्या इच्छाशक्तीची, चिकाटीची, चिवटपणाची, संयमाची कसोटी पाहणारा ऋतू. रोजच्या जगण्यावर अनेक मर्यादा आणणारा पण बरेच काही शिकवून जाणारा ऋतू. पांढऱ्या रंगातही असलेल्या छटांची जाणिव करून देणारा ऋतू. हिवाळ्यातील एक निवांत सकाळी काढलेले हे छायाचित्र हिवाळ्यास समर्पित. हिवाळा EXIF: Canon PowerShot SX30 IS; F stop: f/5.8; Exposure: 1/640; Focal length: 150 mm चित्रावर क्लिक केल्यास नव्या टॅबमध्ये मोठ्या क्षेत्रफळात बघता येईल.

माझी प्रवेशिका: ऋतु: पावसाळा फोटो ठाणे येथील येऊर च्या जंगलात घेतलेला आहे. तशी कधीही फोटोग्राफीसाठी ही सुंदर जागा आहे पण पावसाळ्यात तर येऊरला बहार येते. aa अ‍ॅपर्चर एफ ४ शटरस्पीड १/१०० आयएसओ ६४० फोकल लेन्ग्थ १० एम एम एक्स्पोजर -०.३ स्टेप

एकाहून एक अप्रतिम फोटो आहेत.उन्हाळा,पावसाळा,हिवाळा असे विभाग नाहि का करता येणार?मत देण फार अवघड काम आहे.

प्यारे ला अनुमोदन. निवड करणं खरचं अवघड काम आहे. आता मी हि थोडा हातभार लावावा असं वाटु लागलय.

मनमाड जवळ असलेल्या अंकाई किल्ल्यावरून टिपलेले दृश्य. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या या ठिकाणी पावसाळ्यात दिसणारा सुंदर परिसर. Camera: Canon 550D Ankai

In reply to by मी एक ट्रेकर

आई ग्ग! किती सुरेख फोटो आहे. अंगावर काटा आला अगदी! मी वर्षानुवर्षे भारतात न जाऊन भयंकर काहीतरी मिस करतीये असे वाटतय. फोटू अतोनात मस्त आहे.

छायाचित्रण क्षेत्रात एक मूलभूत विधान वाचलेलं आहे. 'निसर्ग कधी फसवत नाही.' (Nature never deceives) म्हणजेच, निसर्ग जसा 'दिसतो' तस्साच छायाचित्रात बंदिस्त होतो. (छायाचित्रणाचा प्राथमिक अनुभव गृहीत धरला आहे.) सुंदर, विलोभनीय निसर्गाचे जे अनंत तुकडे जगभर विखुरलेले आहेत ते नजरेस पडताच रसिकाच्या तोंडून उत्स्फुर्त दाद जाते...व्व्वा! निसर्गाचे रुपडे छायाचित्रात बंदिस्त करताना त्या दृष्याचे वैशिष्ट्य अधोरेखित करणे जसे, सूर्यास्ताचा लालीमा, सुर्योद्याचा अंधाराचा घेतला जाणारा वेध, पावसाचा धुवाँधार स्वभाव, निसर्गाचं यःकश्चित मनुष्यप्राण्यावर आक्रमण करणारं रौद्र रुप वगैरे वगैरे महत्त्वाचे आणि कौशल्याचे असते. विविध स्पीड (फिल्मचा, कॅमेराचा), संवेदनक्षमता (ISO), लेन्सचा वापर, डेफ्थ ऑफ फिल्डचावापर, छायाप्रकाशचा खेळ अशा असंख्य बाबीतून छायाचित्रकाराचे कौशल्य दिसून येते. मतदान करताना वर वर्णिलेल्या कौशल्याला जास्त मार्क द्यावेत. निसर्ग दृष्य चांगले आहे म्हणून छायाचित्र चांगले दिसते आहे की छायाचित्रकाराचे कांही विशिष्ट कौशल्य/कल्पकता त्यामागे आहे ह्याचा विचार करावा आणि क्रमांक द्यावेत. म्हणजे, सुंदर निसर्गाची 'फ्रेम' निवडण्यात छायाचित्रकाराचे कांहीच कौशल्य नसते असे मी म्हणत नाहीये. तेही महत्त्वाचे आहे. पण नुसतीच 'फ्रेम' सुंदर आहे की छायाचित्रकाराचे कसब पणास लागले आहे ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत हे मतदान करताना ध्यानात ठेवावे. श्री. स्वॅप्स ह्यावर जास्त चांगले मार्गदर्शन करू शकतील, त्यांनी ते तसे करावे अशी विनंती मी करेन.

In reply to by प्रभाकर पेठकर

या विषयावर मी मतदान संपल्यावर लिहिणे जास्त उचित ठरेल असे पूर्वानुभवावरून वाटतेय. :-) आपण मांडलेला दृष्टिकोन योग्यच आहे. यातले छायाचित्रकाराच्या कौशल्याला जास्त दाद दिली गेली पाहिजे या मुद्द्याबाबत अगदी सहमत. जास्त काही लिहीत नाही.

पानगळ

In reply to by टपरी

सदर फोटो पब्लिकली शेअर केला आहे का? याबद्दल खात्री करण्यासाठी तुमचे स्वतःचे गूगल लॉगिन नसताना फोटोची लिंक ब्राउझरमधून ओपन करा. फोटो दिसत असेल तर इथेही दिसू शकेल. नसल्यास प्रथम पब्लिकली शेअर करण्याची प्रक्रिया पार पाडावी. फोटोची लिंक स्लाइड शो सुरू असताना राइट क्लिक करून 'Copy Image URL' ने मिळवली आहे असे गृहित धरले आहे.


असेच काही फोटो बर्फाच्या season मध्ये विमानातून घेतलेला बॉस्टन विमानतळा जवळील फोटो Snow बर्फाळा Snow उन्हाळ्याच्या शेवटाला चालू झालेला सफरचंदांचा हंगाम Apples Green Apples आणि हा: हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट.... Khandala