✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान

श
शशिकांत ओक यांनी
Mon, 09/22/2014 - 17:52  ·  लेख
लेख

जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान

पचा पच थुंकणे व तसेच येता जाता कशा न कशा कारणांनी शिव्या देणे हा आपला राष्ट्रीय टाईम पास आहे. माता व बहिणींवर अशा मेहरबानीयां फार होतात. `च्या यला` हे पालुपद जास्त अन् ग्राम्य शिवी कमी अशी आजची अवस्था आहे. बामणांच्या चिकन मटन खाण्यामुळे मागणी वाढून भाव चढले असे चेष्टेने म्हणतात. खरे खोटे माहिती नाही. पण शिव्यांच्या मक्तेदारीत गैरब्राह्मण समाजाच्या मुक्त संचारात ब्राह्मणी जिव्हा तितक्याच जिव्हाळ्याने चालताना ऐकून, 'लगे रहो' असा पवित्र संदेश द्यावासा वाटतो...! भाषा शुद्धीच्या चर्चा कानावर येतात. पण शिव्यांना 'चले जाव' करायला आपली जीभ का कचरावी? यावरून आठवले पूर्वी हवाईदलातील कार्यकाळात माझ्या मुखी ब्लडी,बार्टर्ड, ईडीयट,उल्लू के पठ्ठे आदी हीन अभिरुचीचे शब्द न कळत वास करून होते. मुले झाल्यावर त्यांचा अभ्यास घ्यायला सुरुवात अशा शब्दांनी नको असे पत्नीने साध्या शब्दात सुचवून जागे केले व वेळीच मी सावध झालो. असो... संस्कारक्षम बालवयातील मुलांसमोर वरिष्ठांनी मुखरस थुंकण्याच्या सवय़ीला व आपल्या ग्राम्य भाषा वैभवाला कटाक्षाने अव्हेरले तर ते योग्य ठरणार नाही काय? असे एक राष्ट्रीय अभियान सुरू करायला नमोंनी १५ ऑगस्ट च्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावरील आपल्या दणकेबाज शैलीत उद्घोषणा करायला हवी काय? ते मिपाकरांनी आपल्या पासून सुरुवात केली तर नाही का चालणार?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
संस्कृती
भाषा
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
37669 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय

बालगंधर्व
Mon, 09/29/2014 - 15:20 नवीन
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय

बालगंधर्व
Mon, 09/29/2014 - 15:20 नवीन
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय

बालगंधर्व
Mon, 09/29/2014 - 15:21 नवीन
शश्प हे शब्दाचा अर्थ नककि कय असतो हे कुनि मला सनगेल का? म्हनजे तो चन्गला श्बद आहे का एक शिवि अहे?अनि तो अपन कुनासन्गे वपरु शत्को?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

शष्पचा अर्थ काही असला तरी

बॅटमॅन
Mon, 09/29/2014 - 15:30 नवीन
शष्पचा अर्थ काही असला तरी तुमची जिज्ञासा शष्प वाट पाहू शकत णाही हे बाकी शिद्द झाले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

४-४ वेळा विचारून देखील

शिद
Mon, 09/29/2014 - 15:32 नवीन
४-४ वेळा विचारून देखील त्यांना ह्यातील शष्प काही कळणार नाही असं वाटतं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदी अगदी

बॅटमॅन
Mon, 09/29/2014 - 15:38 नवीन
अगदी अगदी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

शष्प म्हणजे वाळलेल्या गवताची

मृत्युन्जय
Mon, 09/29/2014 - 16:12 नवीन
शष्प म्हणजे वाळलेल्या गवताची काडी :). लोकांनी उगा बदनाम केलाय हा शब्द ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

अगदी

सूड
Mon, 09/29/2014 - 16:44 नवीन
हो हो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

माझया गावाला पूरवी एक मदरसा

बालगंधर्व
Tue, 09/30/2014 - 10:07 नवीन
माझया गावाला पूरवी एक मदरसा अले होति. तिच नाव शुबहनगी होता. गवातले सगले पोर तिचयावर मरयचि. मि पन मरयचो. मि तिच मोबयल नमबर मिलविला. तिला मेसेज केला. तिचा कदे मझे पेरेम बोलओलो. पन तिने मला शश्प रिसपोनस दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

"मदरसा" आली होते ?

खटपट्या
Tue, 09/30/2014 - 10:39 नवीन
"मदरसा" आली होते ? म्हणजे नक्की कोण आली होती तिचे नाव शुभहनगि म्हणजे शुभांगी होते का ? पेरेम, रीसपोनस…. जावूदे…. काय ते सपष्ट लिवा वो ? मराटी मदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

फुलं काई जालं नाई ना? तुमी

प्यारे१
Tue, 09/30/2014 - 12:33 नवीन
फुलं काई जालं नाई ना? तुमी आजून पन ल्हानच वात्ता. असू द्या असू द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

बा द वे, बालगंधर्व, सतिश,

प्यारे१
Tue, 09/30/2014 - 12:34 नवीन
बा द वे, बालगंधर्व, सतिश, चुचु, जेनि... ह्यांची बाशासुद्दी जास्त म्हत्वाची हाये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बॉर्र म्रुगनैनी.

बॅटमॅन
Tue, 09/30/2014 - 12:33 नवीन
बॉर्र म्रुगनैनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

काय म्हणता बॅटमॅन? आज अचानक

मृगनयनी
Tue, 09/30/2014 - 12:46 नवीन
काय म्हणता बॅटमॅन? आज अचानक माझी आठवण कशी काय आली? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तुमची आठवण कुणाला नाय येणार ओ

बॅटमॅन
Tue, 09/30/2014 - 16:39 नवीन
तुमची आठवण कुणाला नाय येणार ओ. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

हई कओनतई भआशा??

सूड
Tue, 09/30/2014 - 15:16 नवीन
हई कओनतई भआशा??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बालगंधर्व

काका

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 09/23/2014 - 15:25 नवीन
गणिकामध्यस्थ हे लै म्हणजे लैच आवडले आहे हे नम्रपणे नमुद करुन अशा संस्कृतोद्भव श्या देण्या मुळे त्या श्यांमधला जोर निघुन जातो (शिवी देताना आणि घेताना अर्थ कोणी लक्षात घेतो का? उदा. टिनपाट, सरमाळ्या ) . शिवी कोणती आहे या पेक्षा ती कोणी व कशी उच्चारली या वरुन तीच्या परीणामाची तिव्रता ठरते. कल्पना करा आत्मुगुरुजी त्यांच्या देणेकर्‍याला म्हणत आहेत "अरे गणिकामध्यस्था माझे ॠण कधी चुकते करणार आहेस?" तो कधीच पैसे द्यायचा नाही. त्या ऐवजी "भा* दे ना पैसे" कसे वजनदार वाटते म्हणणार्‍याला पण आणि ऐकणार्‍याला पण. शिवी देताना गुर्मी दिसलीच पाहिजे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

@त्या ऐवजी "भा* दे ना पैसे">>

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/23/2014 - 15:41 नवीन
@त्या ऐवजी "भा* दे ना पैसे">>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अहो त्या संस्कृतवाल्या श्या

बॅटमॅन
Tue, 09/23/2014 - 17:58 नवीन
अहो त्या संस्कृतवाल्या श्या फक्त ग्रंथनिविष्ट करायला म्हणून. खर्‍या हातघाईच्या प्रसंगी प्राकृतच लागते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

रागाचा निचरा करण्यासाठी 'भ'

शिद
Tue, 09/23/2014 - 01:55 नवीन
रागाचा निचरा करण्यासाठी 'भ' ची बाराखाडी म्हणणे आवश्यक आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. ;)
  • Log in or register to post comments

नुस्ता भ नाही...सगळे "ग म भ न

टवाळ कार्टा
Tue, 09/23/2014 - 08:47 नवीन
नुस्ता भ नाही...सगळे "ग म भ न" आले पाहिजे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

६-१२

पिवळा डांबिस
Tue, 09/23/2014 - 09:34 नवीन
प्रतिसादांचे अवलोकन केले असता (प्रस्तुत धागाकर्त्याचे, फॉर रीझन ऑफ बायस, आणि उपप्रतिसादांचे गणन न करता) हा प्रस्ताव ६-१२ प्रतिसादांनी हरला आहे!!!! मिपाचे मूळ स्थान, त्याची प्रतिष्ठानापासूनची भूमिका, धागाकर्त्यांच्या लक्षात न आल्याबद्दल त्यांचे सांत्वन! आणि, मिपासंस्थापक तात्या अभ्यंकरांच्या शाब्दिक पुण्याईचा विजय असो!!!!! :)
  • Log in or register to post comments

आता स्कोअर अपडेट करायचा का?

प्यारे१
Tue, 09/30/2014 - 16:01 नवीन
आता स्कोअर अपडेट करायचा का? डावानं पराभव झाला असणार. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अमान्य!

सर्वसाक्षी
Tue, 09/23/2014 - 10:30 नवीन
ओकसाहेब जिवश्च कंठश्च मित्र कोण? माझी व्याख्या सोपी आहे. "ज्याचे सहर्ष स्वागत आपण चार शिव्या घालुन करतो तो!" ज्यांना शिव्या दिलेल्या आवडत नाहीत किंवा ज्यांना उघड शिव्या देणे परवडणारे नसते त्यांना कुणी शिव्या देत नाही. आजुबाजुला अपरिचीत स्त्रिया असतील शिवी देणे टाळले जाते. रस्त्यावरील भांडणे, हमरीतुमरीचा भाग वगळता शिव्या या आपुलकीनेच दिल्या जातात. शिव्या नसल्या तर मित्रांचे संभाषण कसे होईल? मुळात बहुत्वेकरुन शिव्या या उद्गारवाचक चिन्हांऐवजी वापरल्या जातात, त्या कुणाला उद्देशून वगैरे नसतात. शिव्या देणे बंद वगैरे करणे अमान्य. अर्थात आजुबाजुला कोण आहे आणि आपण कुठे आहोत याचे थोडे तारतम्य अवश्य बाळगावे.
  • Log in or register to post comments

१०० % राईट्ट

नि३सोलपुरकर
Wed, 09/24/2014 - 10:25 नवीन
जिवश्च कंठश्च मित्र कोण? माझी व्याख्या सोपी आहे. "ज्याचे सहर्ष स्वागत आपण चार शिव्या घालुन करतो तो!"--१०० % राईट्ट , सर्वसाक्षी साहेबांशी सहमत ,आताच बोर्डावर आलेला पटाईत साहेबांचा लेख ही हेच मत व्यक्त करतोय असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

शिव्यांशिवाय कम्युनिकेशन, आय

मदनबाण
Tue, 09/23/2014 - 11:19 नवीन
शिव्यांशिवाय कम्युनिकेशन, आय जस्ट कान्ट इमॅजिन यू नो ! ;) मी शक्यतो शिव्या देत नाही, दिल्याच तर त्या मनातल्या मनात देण्यावर जास्त भर असतो. ट्रॅफिक जाम मुळे आणि अतरंगी वाहन चालकांमुळे मात्र हल्ली टाळक सटकुन २-४ सॉफ्टकोअर शिव्या हासडतो... परवाच हायवेवर मधेच बाईक वळवु का नओ वळवु का नको अशा विचार मग्न असलेल्या पोराने माझी दुचाकी जवळ येताच मधेच बाईक वळवली ! मी ओरडले ! अरे छगन च्यायला डोक घरी ठेवुन आलास काय ? भाउला राग आला ! पुढे जाउन त्याने बाईक थांबवली आणि वाद घालायला सुरुवात केली,मी म्हंटल काय प्रॉब्लेम झाला, तर तो बोलाला की चूक झाली म्हणुन काय झालं छगन कशाला म्हणालास ? तो आग्री बाला आहे हे त्याच्या बोलण्यावरुन कळले, मी त्याला विचारले की छगन म्हणु नको तर काय म्हणु ? कन्फुज झाला आणि कीक मारुन मुकाट निघुन गेला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!
  • Log in or register to post comments

मी त्याला विचारले की छगन

पिवळा डांबिस
Tue, 09/23/2014 - 11:23 नवीन
मी त्याला विचारले की छगन म्हणु नको तर काय म्हणु ?
"मिथुन' म्हण!!!! जल्लां सगलां काय नांवानच हाय!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

छगन म्हणु नको तर काय म्हणु

काळा पहाड
Tue, 09/30/2014 - 11:17 नवीन
छगन म्हणु नको तर काय म्हणु
आम्ही रुत्विक, चिन्मय, बाबूराव इ. नावं वापरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

छगन ही शिवी आहे का ?

विटेकर
Tue, 09/23/2014 - 11:35 नवीन
"छगन" ही शिवी आहे का ? शिव्यांचा काही भौगोलिक मापदंड ( जी आय) असतो का? नाशिक परिसरात " छगन" ही शिवा नसावी ( असे वाटते )
  • Log in or register to post comments

अहो विटुकाका... ती शिवी नाही,

मदनबाण
Tue, 09/23/2014 - 11:47 नवीन
अहो विटुकाका... ती शिवी नाही, पण ते सुद्धा लोकांना सहन होत नाही ! शिव्यांचा काहीही मापदंड नसतो ! देणारा सुद्धा गमतीने देउ शकतो आणि घेणारा सुद्धा गमतीने घेउ शकतो ! अर्थात पुरुष मित्रपरिवारात हे सहज होत्,स्त्रीयांचे काय माहित नाही... बहुधा परवा पमाकडे {प्रमिला}मंगळागौर झाली, काय सुरेख कार्यक्रम झाला होता ! पण आंबेडाळ काय नीट जमली नव्हती ! या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} ;) बाकी प्रकाकांनी दिलेला कोणत्या तरी स्त्रीचा *** पिळीन असा संवाद आठवतोय ! बहुधा त्यांनीच अशाच विषयावर धागा काढला होता का ? ते नीट आढवत नाही आता ! प्रकाका यावर अधिक प्रकाश टाकु शकतात याची बेशर्त गॅरेंटी देतो. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} Wink

विटेकर
Tue, 09/23/2014 - 11:55 नवीन
या पलिकडे कदाचीत त्यांचा संवाद जात नसावा ! { आपला अंदाज हो} Wink अगदी अगदी ! फार तरं " पण तू काहीही म्हण , पमाचा नवरा अगदीच हेंदरट आहे " ही परमावधी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अवांतर

जेम्स बॉन्ड ००७
Tue, 09/23/2014 - 11:56 नवीन
हेंदरट म्ह्ण्जे नक्की काय वो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

हेंदरट म्ह्ण्जे नक्की काय वो?

विटेकर
Tue, 09/23/2014 - 11:58 नवीन
पमीच्या नवर्‍यालाच विचारायला पाहिजेल. पण आशी पमा कोण हे मदनबाण यांना विचारायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७

त्याचा अर्थ आहे वेंधळा. हा

बॅटमॅन
Tue, 09/23/2014 - 12:59 नवीन
त्याचा अर्थ आहे वेंधळा. हा शब्द कोल्लापूर साईडला जास्त फेमस आहे. हेंदरट, हेंदर्‍या, इ.इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स बॉन्ड ००७

असं आहे होय? बदलापुरात एका

खटपट्या
Tue, 09/23/2014 - 22:07 नवीन
असं आहे होय? बदलापुरात एका जागेचे नाव हेन्द्रपाडा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

चौकातली पाटी पाह्यलीत का त्या

सूड
Tue, 09/23/2014 - 22:29 नवीन
चौकातली पाटी पाह्यलीत का त्या? ती पाह्यलीत की कळेल त्याला हेंद्रेपाडा का म्हणतात ते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

नाही पाहीली ब्वॉ !!

खटपट्या
गुरुवार, 09/25/2014 - 10:50 नवीन
नाही पाहीली ब्वॉ !! सान्गातरी, मी काही बदलापूरचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

>>मी काही बदलापूरचा नाही.

सूड
गुरुवार, 09/25/2014 - 15:45 नवीन
>>मी काही बदलापूरचा नाही. बरं, मग एकदा या आणि बघा. धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

"छगन" ही शिवी आहे का ?

शिद
Tue, 09/23/2014 - 14:17 नवीन
"छगन" ही शिवी आहे का ?
छगन = बिचवाला...'आत्ता गं बाया' टाईप (आम्हा मित्रांच्या शिव्या-शब्दकोषाप्रमाणे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

छगन शबदाचा अर्थ ?

विटेकर
Tue, 09/23/2014 - 14:29 नवीन
अरे बाप रे ! ( की अग बाई गं !) म्हणावे ? की दोन्ही लागू की दोन्ही गैरलागू? . . . पण तुम्ही नाशिक परिसरातील नाही , बरोब्बर ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

पण तुम्ही नाशिक परिसरातील

शिद
Tue, 09/23/2014 - 14:39 नवीन
पण तुम्ही नाशिक परिसरातील नाही , बरोब्बर ना ?
हा हा हा. नाही, काळजी नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

>>'आत्ता गं बाया' टाईप +१

सूड
Tue, 09/23/2014 - 16:32 नवीन
>>'आत्ता गं बाया' टाईप +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

छगन = बिचवाला...'आत्ता गं

प्रमोद देर्देकर
Wed, 09/24/2014 - 13:50 नवीन
छगन = बिचवाला...'आत्ता गं बाया' टाईप (आम्हा मित्रांच्या शिव्या-शब्दकोषाप्रमाणे) आम्ही तर शाळेत "मोहन" असा पण शब्दप्रयोग कारायचो. ज्याला बोलायचो तो बहुदा श्रीकृष्णाचं एक नावाने मला हाक मारत आहेत असा समज करुन घ्यायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

गोंधळ करु नका हो..

जेम्स बॉन्ड ००७
Tue, 09/23/2014 - 11:49 नवीन
शिव्या ही माणसाची सहज प्रव्रुत्ती आहे. पुलं नी वस्त्रहरण नाटकाच्या १७५ व्या प्रयोगाच्या निमित्ताने केलेलं अध्यक्षिय भाषण मिळाल तर बघा..
  • Log in or register to post comments

"इचिभन" म्हणजे नक्की काय?

श्रीगुरुजी
Tue, 09/23/2014 - 13:04 नवीन
"इचिभन" म्हणजे नक्की काय? "शाळा" या चित्रपटात बर्‍याच वेळा सुर्‍या च्या तोंडात हा शब्द आलेला आहे.
  • Log in or register to post comments

'तेच्यायला' >> 'हेच्यायला' >>

बॅटमॅन
Tue, 09/23/2014 - 14:45 नवीन
'तेच्यायला' >> 'हेच्यायला' >> इसकी मां का... तसेच इचिभन>> इसकी (हेची-हिची: बोलीभाषेतील रूप) बहन का... असे असावे असा अंदाज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सांगली-मिरजेकडे

चित्रगुप्त
Wed, 09/24/2014 - 20:21 नवीन
सांगली-मिरजेकडे "लई चॅप्टर बोड्याचा" आणि " बारा बोड्याचा" अनेकदा ऐकले आहे. याचा काय अर्थ म्हणायचा? संस्कृत शब्द कोणते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ते संस्कृतच काय पण सुसंस्कृत

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 09/26/2014 - 00:11 नवीन
ते संस्कृतच काय पण सुसंस्कृत शब्दही नाहीत ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अहो, वेदात नाही असे जगात काही

चित्रगुप्त
Fri, 09/26/2014 - 20:21 नवीन
अहो, वेदात नाही असे जगात काही नाही, आणि संस्कृतमधे ज्याला प्रतिशब्द नाही, असा कोणताही शब्द नाही असे म्हणतात ना? की असे सांगणारेच चॅ. बो. म्हणायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

काय आठवण करून दिलीत

बॅटमॅन
Mon, 09/29/2014 - 15:05 नवीन
काय आठवण करून दिलीत चित्रगुप्तजी....फीलिंग लैच नॉस्टॅल्जिक. 'बाराबोड्याचा' मागे काहीतरी व्युत्पत्ती आहे असे वाचल्याचे स्मरते. नक्की काय ते तूर्त माहिती नाही, पाहून सांगतो. इन जण्रल, -बोड्याचा हा प्रत्यय म्ह. त्या अगोदरचा गुणधर्म अधोरेखित करण्यासाठी असतो. उदा. तो लै हरामखोर**ड्याचा आहे. इथे -**ड्याचा हा प्रत्यय, हरामखोरपणा हा गुणधर्म त्या व्यक्तीत आहे हे सूचित करण्यासाठी वापरला जातो. एखादा गुणधर्म माणसात आहे याचा अर्थ त्या विशिष्ट अवयवातही आहे अशी काहीशी ती धारणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा