लहानपणी आईसोबत बाजारात जायला मला कधीच आवडले नाही पण ती आवर्जून मला घेऊन जायची. रविवार आणि गुरुवार असे दोनच दिवस बाजार भरायचा. पण या दोन तीन दिवसाचा बाजार खरेदी करतानाही आईला तास का लागायचा मला त्यावेळी कधीच समजले नाही. ती आधी सगळीकडील भाजी पहात, भाव विचारीत पूर्ण शेवटपर्यंत जायची आणि परत येताना खरेदी चालू करायची. अगदी चार दोन रुपयांसाठी पण मोलभाव करायची. ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची. फळेच काय पण अगदी बटाटे आणि टोमाटोसुद्धा स्वतः एकेक निवडून घ्यायची. आणि वरती त्या भाजी किंवा फळविक्याला "अहो मावशी अहो मामा" म्हणत वर एक्स्ट्रा भाजी किंवा फळ घ्यायची. मला हे सारे त्यावेळी कसेतरीच वाटायचे.
काल येताना अशीच एक थोडीशी वेगळ्या रूपातील आई मला पाहायला भेटली. आई म्हणतोय कारण एक चिमुरडी तिच्या आजूबाजूला फिरत होती. घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपात ती एका भैय्याच्या हातगाड्यावरून भाजी खरेदी करत होती. एका हाताने मोबाईल कानाशी धरून बोलणे चालू होते आणि ड्रेसला शोभेल अशा नेलपोलीश लावलेल्या, मोठे नख असलेल्या तर्जनीने, भाजीकडे न पहाताच आणि बहुधा चुकून भाजीला स्पर्श झाला तर शॉक बसेल कि काय अशा समजाने अर्ध्या फुटाचे अंतर ठेऊन ती भैय्याला म्हणत होती "आधा किलो टमाटर, आधा किलो कांदा, पाव किलो मटार ,एक गोभी …. और पाच कि मिरची देना"
बस संपला बाजार.. हल्ली रासायनिक खतांमुळे भाजीचा कस तर उतरलाच आहे पण जेवणाची चव हि का उतरली आहे याचे उत्तर मिळाले


वाचने
53848
प्रतिक्रिया
172
मिसळपाव
प्रतिक्रिया
अग, माऊ ताई, पाच किलो मिरची
In reply to हायला!! आत्ता नीट वाचलं. तिनी by कवितानागेश
ह्म्म्म
In reply to अग, माऊ ताई, पाच किलो मिरची by भावना कल्लोळ
पाच किलोचा खर्डा????????????
In reply to अग, माऊ ताई, पाच किलो मिरची by भावना कल्लोळ
पाच किलो मिर्ची सामुदायीक
In reply to अग, माऊ ताई, पाच किलो मिरची by भावना कल्लोळ
काय खंग्री धागा आणी चर्चा
घाला हो कुणीतरी एक फर्मास
In reply to काय खंग्री धागा आणी चर्चा by जेपी
आलि लहर केला कहर
आयडी बाकी नावाला जागला हो!!
क ह र आहे एकं-दरीत!
अगदी अस्संच मॅनीक्युअर केलेलं
जीन्स घातली होती का? नायतर
In reply to अगदी अस्संच मॅनीक्युअर केलेलं by अजया
१००!
ही बघा भाजी आनाला चाल्ली
(No subject)
In reply to ही बघा भाजी आनाला चाल्ली by इरसाल
सैल टीशर्ट अशा रूपात ती एका
बाय्कान्नी डोक्टर कड़े असे कपड़े घालून जायचे नाही
हैला! आजकाल टैट कपडे, क्लिवेज
हैला! आजकाल टैट कपडे, क्लिवेज
In reply to हैला! आजकाल टैट कपडे, क्लिवेज by रेवती
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हिंदी-चिनी.. नेमके काय?हम्म...आजकाल तू लैच फेमस हून
In reply to हैला! आजकाल टैट कपडे, क्लिवेज by मदनबाण
शॅरोन स्टोनचा
In reply to हैला! आजकाल टैट कपडे, क्लिवेज by मदनबाण
वा: दिवस सार्थकी लागला.
एक आईवरील कविता आवश्य एकदा
भाजी शिळी झाली वादावादीमध्ये.
भेंडी शुद्धीवर येण्याचा जोक
In reply to भाजी शिळी झाली वादावादीमध्ये. by प्यारे१
सांगा की.
In reply to भेंडी शुद्धीवर येण्याचा जोक by गवि
बाकी तो फोटो आटपाडी
वा मस्त...
नौवारी घालुन केलेलं आणि
अय्या आनन्दिता होत काग अस
हो ..
In reply to अय्या आनन्दिता होत काग अस by इशा१२३
घालुन कि नेसुन
तीन वर्षांपूर्वी