जेवणाची चव
लहानपणी आईसोबत बाजारात जायला मला कधीच आवडले नाही पण ती आवर्जून मला घेऊन जायची. रविवार आणि गुरुवार असे दोनच दिवस बाजार भरायचा. पण या दोन तीन दिवसाचा बाजार खरेदी करतानाही आईला तास का लागायचा मला त्यावेळी कधीच समजले नाही. ती आधी सगळीकडील भाजी पहात, भाव विचारीत पूर्ण शेवटपर्यंत जायची आणि परत येताना खरेदी चालू करायची. अगदी चार दोन रुपयांसाठी पण मोलभाव करायची. ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची. फळेच काय पण अगदी बटाटे आणि टोमाटोसुद्धा स्वतः एकेक निवडून घ्यायची. आणि वरती त्या भाजी किंवा फळविक्याला "अहो मावशी अहो मामा" म्हणत वर एक्स्ट्रा भाजी किंवा फळ घ्यायची. मला हे सारे त्यावेळी कसेतरीच वाटायचे.
काल येताना अशीच एक थोडीशी वेगळ्या रूपातील आई मला पाहायला भेटली. आई म्हणतोय कारण एक चिमुरडी तिच्या आजूबाजूला फिरत होती. घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपात ती एका भैय्याच्या हातगाड्यावरून भाजी खरेदी करत होती. एका हाताने मोबाईल कानाशी धरून बोलणे चालू होते आणि ड्रेसला शोभेल अशा नेलपोलीश लावलेल्या, मोठे नख असलेल्या तर्जनीने, भाजीकडे न पहाताच आणि बहुधा चुकून भाजीला स्पर्श झाला तर शॉक बसेल कि काय अशा समजाने अर्ध्या फुटाचे अंतर ठेऊन ती भैय्याला म्हणत होती "आधा किलो टमाटर, आधा किलो कांदा, पाव किलो मटार ,एक गोभी …. और पाच कि मिरची देना"
बस संपला बाजार.. हल्ली रासायनिक खतांमुळे भाजीचा कस तर उतरलाच आहे पण जेवणाची चव हि का उतरली आहे याचे उत्तर मिळाले


वर्गीकरण
प्रतिक्रिया
असेच वाटले होते पण खात्री
>>आमचेकडे नवनवीन कोकणी अपशब्द
साहेब,
तुम्ही कोणाला प्राधान्य द्याल
कहर करताय राव तुम्ही.
राव मै क्या बोल रहा हू तुम
मेरे को भी नै समझरा.
(No subject)
पैसा ताई च्या मतांशी सहमत.
तो भैया हो.
भैया लोकांशी हिंदीतून
भैया लोकांशी हिंदीतून बोलण्याची लाचारी मराठी लोकांशिवाय दुसर्या कोणाची?हे सौ टका पटले ! :) ;)णाही. भैय्या दिसला की माझी
भैय्या हिंदीत बोलला तर एक वेळ
यांचे
त्यांना हिंदीत बोलु द्यायचं.
>>त्यांना हिंदीत बोलु द्यायचं
तिनं मराठी शिकणं यात वाईट
या प्रसंगाचे साक्षीदार होतो
१००% सहमत!
धागा १००+ गाठणार तर....
आमच्याकडे आई कध्धीच भाजी
बापही तसलेच.. हे नवीन पिढीचे
बर्रोब्बर बोल्लात गवि. हे बाप
विजुभाऊ, मुळात पाश्चात्य
हे कोक, पेप्सी, जंकफूड,
रामरक्षा म्हणणं/पाठ करणं हे
रामरक्षा म्हणणं/पाठ करणं हे
आमच्या संस्कृतच्या मास्तरीण
हाहाहा...
पण बायकांनादेखील हँडसम, पाच
नवरेही करतात.
मेजॉरिटी
सहमत.
याच विचाराला धरून मालिकेत
मालिकेचा हिरवीणी प्रमाणेच
मला काहीच आठवत नाही हो ……
+१ प्रतिसाद आवडला.
> निर्णयस्वातंत्र्य मर्यादित
मलाही नाही कळले हे
http://www.misalpav.com/node
:-)
स्वत:साठी घालतात हो.. तुमाला
लक्ष वेधून घेण्यासाठी
अनेक उत्तरे खरी आहेत.
हा हा हा हा हा हा
+१ प्रतिसाद आवडला.
सहमत!
आजकाल प्रत्येकाला कमावती
आजकाल प्रत्येकाला कमावती सेक्सी बायको हवी असते.यात वाईट काहीच नाही. फक्त आपण पण तितकेच योग्य असायला / व्हायला हवे हे ही तितकेच खरे आहे :)अहो मग तुम्हीच जात जा ना
शीतावरुन भाताची परिक्षा