✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

जेवणाची चव

क
कहर यांनी
Wed, 09/17/2014 - 09:04  ·  लेख
लेख
लहानपणी आईसोबत बाजारात जायला मला कधीच आवडले नाही पण ती आवर्जून मला घेऊन जायची. रविवार आणि गुरुवार असे दोनच दिवस बाजार भरायचा. पण या दोन तीन दिवसाचा बाजार खरेदी करतानाही आईला तास का लागायचा मला त्यावेळी कधीच समजले नाही. ती आधी सगळीकडील भाजी पहात, भाव विचारीत पूर्ण शेवटपर्यंत जायची आणि परत येताना खरेदी चालू करायची. अगदी चार दोन रुपयांसाठी पण मोलभाव करायची. ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची. फळेच काय पण अगदी बटाटे आणि टोमाटोसुद्धा स्वतः एकेक निवडून घ्यायची. आणि वरती त्या भाजी किंवा फळविक्याला "अहो मावशी अहो मामा" म्हणत वर एक्स्ट्रा भाजी किंवा फळ घ्यायची. मला हे सारे त्यावेळी कसेतरीच वाटायचे. काल येताना अशीच एक थोडीशी वेगळ्या रूपातील आई मला पाहायला भेटली. आई म्हणतोय कारण एक चिमुरडी तिच्या आजूबाजूला फिरत होती. घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपात ती एका भैय्याच्या हातगाड्यावरून भाजी खरेदी करत होती. एका हाताने मोबाईल कानाशी धरून बोलणे चालू होते आणि ड्रेसला शोभेल अशा नेलपोलीश लावलेल्या, मोठे नख असलेल्या तर्जनीने, भाजीकडे न पहाताच आणि बहुधा चुकून भाजीला स्पर्श झाला तर शॉक बसेल कि काय अशा समजाने अर्ध्या फुटाचे अंतर ठेऊन ती भैय्याला म्हणत होती "आधा किलो टमाटर, आधा किलो कांदा, पाव किलो मटार ,एक गोभी …. और पाच कि मिरची देना" बस संपला बाजार.. हल्ली रासायनिक खतांमुळे भाजीचा कस तर उतरलाच आहे पण जेवणाची चव हि का उतरली आहे याचे उत्तर मिळाले bazar
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53778 वाचन

💬 प्रतिसाद (172)

प्रतिक्रिया

ट्रेलर पाहून सिनामाची

कहर
Wed, 09/17/2014 - 11:56 नवीन
ट्रेलर पाहून सिनामाची गुणवत्ता ठरवणाऱ्या नवीन पिढीसाठी अज्जिबात नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

.

पोटे
Wed, 09/17/2014 - 12:09 नवीन
मॉलमध्ये असे वागतात का ?
  • Log in or register to post comments

च्यायला,

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 09/17/2014 - 12:10 नवीन
च्यायला, सगळे वर्णन वाचल्यावर मोठ्या उत्सुकतेने फोटु पाहिला. पण त्यात घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपातली ती ललना कुठेच न दिसल्या मुळे प्रचंड निराश झालो. तिचा फोटु असायला पाहिजे होता म्हणजे मग लेखकाचे ऑब्जेक्षन नक्की कशाला आहे ते समजले असते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

(No subject)

सस्नेह
Wed, 09/17/2014 - 12:26 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

(No subject)

टवाळ कार्टा
Wed, 09/17/2014 - 12:33 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अगदी अगदी

सुहास झेले
Sun, 09/21/2014 - 02:32 नवीन
अगदी अगदी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

या धाग्याच्या लेखक आणि

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/17/2014 - 12:53 नवीन
या धाग्याच्या लेखक आणि प्रतिसादकांना प्रेम्ळ सूच्ना: हा धागा (प्रतिसादांसकट) पी दिपीकाला पाठवला आहे. आता तुम्चं तुमीच सांभाळा ! ;) :)
  • Log in or register to post comments

हो सांभाळतो.

प्रभाकर पेठकर
Wed, 09/17/2014 - 13:11 नवीन
>>>>आता तुम्चं तुमीच सांभाळा ! आमचं आम्ही नेहमीच सांभाळतो, बरं! काळजी नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

कहर झाला आता .

मनीषा
Wed, 09/17/2014 - 12:56 नवीन
*sad* :-( :( +( =( :-(( :(( +(( =(( :sad: कहर झाला आता . त्या मॉ डर्न ललनेला कुणीतरी चंगलं वळण लावायला पाहिजे .
  • Log in or register to post comments

माँडंर्न म्हणायचय का तुम्हाला

अनुप ढेरे
Wed, 09/17/2014 - 13:19 नवीन
माँडंर्न म्हणायचय का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

नाही नाही. माँर्डंन.

बॅटमॅन
Wed, 09/17/2014 - 13:19 नवीन
नाही नाही. माँर्डंन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

. माँर्डंन हा हा तेच ते

मनीषा
Wed, 09/17/2014 - 13:58 नवीन
. माँर्डंन हा हा तेच ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

माँडंर्न हे कसं म्हणायचं?

मनीषा
Wed, 09/17/2014 - 13:55 नवीन
माँडंर्न हे कसं म्हणायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

म्हणायचं नाही, फक्त अनुभवायचं

बॅटमॅन
Wed, 09/17/2014 - 14:13 नवीन
म्हणायचं नाही, फक्त अनुभवायचं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

ते ट्रेड सिक्रेट हाय. त्या

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/17/2014 - 14:15 नवीन
ते ट्रेड सिक्रेट हाय. त्या समजण्यासाठी 'मोजी'भौंची शिकवणी लावायला लागते ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

नक्की ऑब्जेक्शन कशाला आहे? मी

कवितानागेश
Wed, 09/17/2014 - 13:06 नवीन
नक्की ऑब्जेक्शन कशाला आहे? मी आजपर्यंत कुणालाही सैल जीन्स घातलेलं पाहिलं नाहीये. जीन्स घट्टच असायला हवी. भाजी नीट बघून निवडून घ्यावी हे मात्र खरंय. :)
  • Log in or register to post comments

बस्स …. फक्त तुम्हालाच समजले

कहर
Wed, 09/17/2014 - 13:55 नवीन
बस्स …. फक्त तुम्हालाच समजले । :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

खरच गं...जरा सैल जीन्स घातली

स्वप्नांची राणी
Wed, 09/17/2014 - 17:48 नवीन
खरच गं...जरा सैल जीन्स घातली आणि ति घसरली की मागूनही ऑब्जेक्शनच ऑब्जेक्शन असेल....जगु द्या जरा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

आवरा!!

सूड
Wed, 09/17/2014 - 18:03 नवीन
आवरा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

मागूनही ऑब्जेक्शनच ऑब्जेक्शन

कानडाऊ योगेशु
Sat, 09/20/2014 - 09:56 नवीन
मागूनही ऑब्जेक्शनच ऑब्जेक्शन असेल
असे झाले तर मग मागे वळुन म्हणायचे "आता माझी सटकली" हा.का.ना.का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

इतके नियम धडाधड मोडणार्‍या

बॅटमॅन
Wed, 09/17/2014 - 13:14 नवीन
इतके नियम धडाधड मोडणार्‍या त्या अहंकारी, दुष्ट वैट्ट इ.इ. ललनेचा फोटो न टाकल्यामुळे या धाग्याचा अन धागाकर्त्याचाही निषेध म्हणून काहीतरी करावे म्हणतो. काय सुचवता लोक्स?
  • Log in or register to post comments

(No subject)

काळा पहाड
Wed, 09/17/2014 - 13:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हे चित्र बघून काही रोचक

बॅटमॅन
Wed, 09/17/2014 - 14:13 नवीन
हे चित्र बघून काही रोचक टिप्पण्या कराव्याशा वाटताहेत, पण संमं पंख लावणार त्या प्रतिसादाला म्हणून थांबतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

व्यनी करावा ही विणंती विशेष

टवाळ कार्टा
Wed, 09/17/2014 - 14:22 नवीन
व्यनी करावा ही विणंती विशेष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वाघुळाशास्त्री असे निराश होउ नका हा घ्या फोटु

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 09/17/2014 - 14:13 नवीन
Image removed. भाजीचा ललनेचा आणि खट्याळा छकुल्याचा जीन्स चा आणि सैलसर टीशर्टचा पैजारबुवा (फोटु अंजा वरुन साभार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ही नक्की ललना आहे का????

बॅटमॅन
Wed, 09/17/2014 - 14:19 नवीन
ही नक्की ललना आहे का???? =)) अंमळ कन्फ्यूजनच होतंय खरं. पण तरी धन्यवाद पैजारबुवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मेल्या बॅट्या

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 09/17/2014 - 14:30 नवीन
आता तु मेला बेट्या Image removed. पैजारबुवा (परत एकदा फोटु अंजा वरुन साभार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आयो...मेलो मेलो मेलो...हे

बॅटमॅन
Wed, 09/17/2014 - 14:37 नवीन
आयो...मेलो मेलो मेलो...हे बॅटमोबिल, मुझे पळा ले रे बाबा पळा ले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

ओ

इरसाल
Wed, 09/17/2014 - 17:02 नवीन
ती ललना नाही तो लल्लन असावा. (चुभु देघे. ज्यायला ते माकड की माकडीन हे किलेर झाले तर हा तोडगा काढता यावा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हायला!! आत्ता नीट वाचलं. तिनी

कवितानागेश
Wed, 09/17/2014 - 13:16 नवीन
हायला!! आत्ता नीट वाचलं. तिनी पाच किलो मिरची घेतली??? :P ............... लोणचं घालेल की धुरी देइल? एक्स्पर्ट्स कोमेन्ट्स प्लीज.
  • Log in or register to post comments

लोणचं घालेल की धुरी देइल?

बॅटमॅन
Wed, 09/17/2014 - 13:18 नवीन
लोणचं घालेल की धुरी देइल?
यांपैकी काहीच नाही. ओएलेक्स किंवा ईबेवर विकून टाकेल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

पाचकिलो मिरची घेतली या

विजुभाऊ
Wed, 09/17/2014 - 13:34 नवीन
पाचकिलो मिरची घेतली या आब्जेक्षनेबल काय आहे? तिला बहुतेक मिरचीचे वाळवण करायचे असेल किंवा हिरवी मिरची वाळ्वून त्याचे पांढरे तिखट करायचे असेल रच्याकाने : पांढरे तिखट वापरले की चटणीला तो तपकिरी रंग येत नै म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

पांढरं तिखट पुण्यात कुठे

सूड
Wed, 09/17/2014 - 15:30 नवीन
पांढरं तिखट पुण्यात कुठे मिळतं म्हणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

पांढरं तिखट पुण्यात कुठे

विजुभाऊ
Wed, 09/17/2014 - 18:15 नवीन
पांढरं तिखट पुण्यात कुठे मिळतं म्हणे?
स पेठेत. ज्ञानप्रबोधिनी जवळ विचारा. नक्की मिळेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अपुरी माहिती..

गवि
Wed, 09/17/2014 - 18:21 नवीन
किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत आणि कोणकोणत्या वारी? ..ते विसरलात सांगायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

आणि नेमक्या कुठल्या शब्दांत?

बॅटमॅन
Wed, 09/17/2014 - 18:31 नवीन
आणि नेमक्या कुठल्या शब्दांत? झालंच तर प्रत्येक प्रश्नाला अलौड असलेला कमाल वेळ किती? तेही राहिलंच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

स पेठेत. . ते "जिवाला खा

विजुभाऊ
Fri, 09/19/2014 - 10:58 नवीन
स पेठेत. . ते "जिवाला खा जिवाला खा.अनरसे सामोसेवाले "त्यांच्या समोर. ज्ञानप्रबोधिनीच्या लायनीत हत्तीगणपतीच्या जवळपास. इतका पत्ता बास झाला का? आणखी एक तुम्ही दुकाना कडे तोंड केले तर डावा कान उत्तर आनि उजवा कान दक्षीण दिशेत राहील अशा अवस्थेतच पांढरे तिखट उपलब्ध होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हत्ती गणपतीजवळ होकायंत्र कुठे

काळा पहाड
Fri, 09/19/2014 - 11:15 नवीन
हत्ती गणपतीजवळ होकायंत्र कुठे मिळते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

५ किलो नाही ५ कि मिरची म्हणजे

सुहास पाटील
Wed, 09/17/2014 - 15:13 नवीन
५ किलो नाही ५ कि मिरची म्हणजे ५ रुपयाची मिरची . कधी बाजारात जाता कि नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

>>५ किलो नाही ५ कि मिरची

सूड
Wed, 09/17/2014 - 15:31 नवीन
>>५ किलो नाही ५ कि मिरची म्हणजे ५ रुपयाची मिरची काय सांगता?? तुम्ही सांगितलंत म्हणून हो, नाहीतर आम्हाला शिंचं कुठलं कळायला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास पाटील

अग, माऊ ताई, पाच किलो मिरची

भावना कल्लोळ
Wed, 09/17/2014 - 15:27 नवीन
अग, माऊ ताई, पाच किलो मिरची नाही ग, पाच कि मिर्ची म्हणजे पाच रुपयाची मिरची … म्हींदी आहे ते … विशेष कोर्स करावे लागतात त्यासाठी ..... :P आणि पाच किलो मिरची घेतली तर खर्डाच करावा लागेल तिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ह्म्म्म

इरसाल
Wed, 09/17/2014 - 16:21 नवीन
पाच किलो मिरची घेतली तर खर्डाच करावा लागेल तिला. तिला काय तिचाच खर्डा होणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भावना कल्लोळ

पाच किलोचा खर्डा????????????

भिंगरी
Wed, 09/17/2014 - 16:31 नवीन
बाबौव ........... किती धावाधाव होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भावना कल्लोळ

पाच किलो मिर्ची सामुदायीक

विजुभाऊ
Wed, 09/17/2014 - 18:22 नवीन
पाच किलो मिर्ची सामुदायीक धुरी देण्यासाठी उपयोगी पडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भावना कल्लोळ

काय खंग्री धागा आणी चर्चा

जेपी
Wed, 09/17/2014 - 13:18 नवीन
काय खंग्री धागा आणी चर्चा चालु आहे. धाग्यावर येत राहिन. =))
  • Log in or register to post comments

घाला हो कुणीतरी एक फर्मास

सस्नेह
Wed, 09/17/2014 - 14:23 नवीन
घाला हो कुणीतरी एक फर्मास विडंबन ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

आलि लहर केला कहर

पिंपातला उंदीर
Wed, 09/17/2014 - 15:20 नवीन
आलि लहर केला कहर
  • Log in or register to post comments

आयडी बाकी नावाला जागला हो!!

सूड
Wed, 09/17/2014 - 15:31 नवीन
आयडी बाकी नावाला जागला हो!! ;)
  • Log in or register to post comments

क ह र आहे एकं-दरीत!

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/17/2014 - 15:43 नवीन
क ह र आहे एकं-दरीत! =))
  • Log in or register to post comments

अगदी अस्संच मॅनीक्युअर केलेलं

अजया
Wed, 09/17/2014 - 16:12 नवीन
अगदी अस्संच मॅनीक्युअर केलेलं नख भैयाला दाखवुन दाखवुन भाजी घेतली,लांबुनच दाखवुन पण पोराने एकदम चवीने खाल्ली हो!!काय हा कहर?!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा