✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र.१ मानवनिर्मित स्थापत्य - निकाल

स
संपादक मंडळ यांनी
गुरुवार, 09/04/2014 - 14:07  ·  लेख
लेख
छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र. १ मानवनिर्मित स्थापत्य ********************** नमस्कार मंडळी! छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्र.१ मानवनिर्मित स्थापत्य - निकाल जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या स्पर्धेला उदंड प्रतिसद देऊन यशस्वी करण्यात तुमचा सर्वांचा हातभार लागला आहे. आलेली सर्वच छायाचित्रे अतिशय सुरेख होती आणि डावे-उजवे करणे फारच कठीण. म्हणूनच सर्व सदस्यांना चित्रे निवडायची विनंती केली होती. एकूण २८ स्पर्धकांची ७९ छायाचित्रे आली. निकाल लावताना ४० सदस्यांनी आपल्या पसंतीची चित्रे निवडली. ३३ जणांनी धाग्यावर तर ७ जणांनी व्यनिद्वारे मत दिले. एकूण ४४ छायाचित्रांना लोकांच्या पसंतीचे गुण मिळाले. तर ९ छायाचित्रांना १० पेक्षा जास्त गुण मिळाले. या सर्वांनाच अगदी थोड्या थोड्या फरकाने क्रमांक दिले गेले आहेत. सदस्यांनी दिलेल्या क्रमांकानुसार चित्रांना पहिल्या क्रमांकाला ३ दुसर्‍या क्रमांकाला २ तर तिसर्‍या क्रमांकाला १ असे गुण देऊन सगळ्यांची बेरीज केली. त्याप्रमाणे १) Kohalea चित्र क्र. २४ a २) समर्पक चित्र क्र. ४९ a ३) वल्ली चित्र क्र. ६ a यांची छायाचित्रे सर्वाधिक पसंतीची ठरली. यानंतर ४) समर्पक चित्र क्र. ४८ ५) बोका चित्र क्र. ३१ ६) इस्पीकचा एक्का चित्र क्र. ३६ यांचे क्रमांक आहेत. स्पर्धेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे लगेच पुढची स्पर्धा जाहीर करत आहोत, यावेळी काही बदल करण्यात येत आहेत. प्रत्येक स्पर्धकाला फक्त एक छायाचित्र सादर करता येईल. गुण देण्याची पद्धत पहिल्या स्पर्धेप्रमाणेच राहील. स्पर्धेचा विषय "आनंद" हा राहील. आणि यातील विजेती चित्रे मिपा दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात येतील. त्याशिवाय पहिल्या ३ स्पर्धकांना प्रशस्तीपत्रके देण्यात येतील. स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका स्पर्धेसाठीच्या खास धाग्यात अपलोड कराव्यात ही विनंती. तिथे अन्य प्रतिक्रिया पोस्ट करू नयेत. त्या चित्रांबद्दल चर्चा, मते यासाठी दुसरा स्वतंत्र धागा काढण्यात येईल. पहिल्या स्पर्धेत ज्यांची चित्रे विजेती ठरली नाहीत त्यांनी निराश न होता या स्पर्धेत पुन्हा चांगली छ्याचित्रे सादर करावीत ही विनंती. प्रत्येकाचा आवडता विषय वेगवेगळा असतोच! पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धोरण
मांडणी
वावर
जीवनमान
तंत्र
मौजमजा
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
प्रतिसाद
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
आस्वाद
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
12028 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

'विजेत्यांचे अभिनंदन आणि

सौंदाळा
गुरुवार, 09/04/2014 - 14:13 नवीन
'विजेत्यांचे अभिनंदन आणि परिक्षकांचे आभार' म्हणुन मी माझे २ शब्द संपवतो. विजेते फोटो याच भागात परत असते तर मजा आली असती असे वाटते. किंवा आधीच्या धाग्याची लिंक तरी ईकडे असु देत म्हणजे भविष्यात खोद्काम करायला बरे पडेल :)
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे बहुत अभिनंदन!!

किसन शिंदे
गुरुवार, 09/04/2014 - 14:14 नवीन
विजेत्यांचे बहुत अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

मधुरा देशपांडे
गुरुवार, 09/04/2014 - 14:16 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व स्पर्धक आणि आयोजकांचे आभार.
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे कचकून

स्पा
गुरुवार, 09/04/2014 - 14:18 नवीन
सर्व विजेत्यांचे कचकून अभिनंदन __/\__
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन !

मदनबाण
गुरुवार, 09/04/2014 - 14:21 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way {We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.com
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन आणि

सूड
गुरुवार, 09/04/2014 - 14:26 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार !! :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/04/2014 - 14:33 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. प्रत्येक विजेत्याच्या नांवा पुढे त्याचे विजयी छायाचित्र टाकले असते तर ते नक्कीच उचीत ठरले असते. पुढील स्पर्धेच्या स्पर्धकांच्या प्रवेशिका मतदात्यांना नांवाशिवाय दिसण्याची कांही व्यवस्था केल्यास बरे होईल. प्रत्येक छायाचित्रा सोबत फक्त क्रमांक असावा आणि मतदात्यांनी त्या त्या क्रमांकांना मतदान करावं. असे केल्याने मतदात्यांच्या मनावर स्पर्धकांच्या नांवाचा भला-बुरा प्रभाव असणार नाही आणि मतदान 'छायाचित्रालाच' होईल.
  • Log in or register to post comments

+१... विजेती चित्रे इथे

पिलीयन रायडर
गुरुवार, 09/04/2014 - 14:38 नवीन
+१... विजेती चित्रे इथे टाकावीत,... आणि पुढची स्पर्धा अ‍ॅनोनिमस असावी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अभिनंदन!

नंदन
गुरुवार, 09/04/2014 - 14:48 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
पुढील स्पर्धेच्या स्पर्धकांच्या प्रवेशिका मतदात्यांना नांवाशिवाय दिसण्याची कांही व्यवस्था केल्यास बरे होईल. प्रत्येक छायाचित्रा सोबत फक्त क्रमांक असावा आणि मतदात्यांनी त्या त्या क्रमांकांना मतदान करावं.
सहमत आहे. कौलाच्या व्यवस्थेप्रमाणे मतदान घेता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

+३

शिद
गुरुवार, 09/04/2014 - 14:59 नवीन
असेच म्हणतो. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+ ४

आतिवास
गुरुवार, 09/04/2014 - 15:19 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. या निमित्ताने अप्रतिम फोटो पाहायला मिळाले आणि बरंच शिकता आलं याबद्दल 'मिपा' आणि सहभागी 'मिपाकरांचे' आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

विजेती छायाचित्रे

शिद
गुरुवार, 09/04/2014 - 16:01 नवीन
विजेती छायाचित्रे डकवल्याबद्दल संमंचे धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/04/2014 - 15:08 नवीन
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
  • Log in or register to post comments

३ पैक्की २ क्रमांक माझ्या

मृत्युन्जय
गुरुवार, 09/04/2014 - 15:20 नवीन
३ पैक्की २ क्रमांक माझ्या क्रमांकाशी अगदी जुळले :). अगदी त्याच नंबरात. वेल्लाभट यांच्या छायाचित्राला पारितोषिक न मिळाल्याचे बघुन थोडे आश्चर्य वाटले. पण अर्थात समर्पक यांचेही छायाचित्र उत्तमच होते. सर्व विजेत्यांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दिक

Mrunalini
गुरुवार, 09/04/2014 - 15:23 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!! :)
  • Log in or register to post comments

हाबिनंदन..

चिगो
गुरुवार, 09/04/2014 - 15:33 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन..
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 09/04/2014 - 15:56 नवीन
आणि सर्व स्पर्धकांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!

पैसा
गुरुवार, 09/04/2014 - 16:03 नवीन
सर्वच विजेते आणि स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन! ही चित्रे आता पाहताना एक गोष्ट सहजच लक्षात आली की तिन्ही चित्रांत अंतराची कल्पना काही प्रमाणात येत आहे. इथे काहीजणांनी छायाचित्रकारांची नावे दिसू नयेत अशी सूचना केली आहे. आदर्श परिस्थितीत ते तसे करता येईल. मात्र सध्या इतका वेळ देणे कोणाच संपादकाला वैयक्तिक रीत्या शक्य नाही. दिवाळी अंकाचेही काम आहे. पहिल्या धाग्यात सगळी छायाचित्रे पुन्हा कॉपी पेस्ट करून धागा तयार करावा लागला होता. ते वाचवण्यासाठी आता फक्त चित्रांचा एक आणि प्रतिक्रियांचा एक असे २ धागे करूया अशी कल्पना अंमलात आणली आहे. माझे वैयक्तिक मत विचाराल तर छायाचित्रे चित्रकाराच्या नावाने देण्यात फार काही बिघडते असे नव्हे. आताही मत देणार्‍यांवर ओळखीचा काही परिणाम झाला आहे असे वाटत नाही. त्यामुळे Kohalea आणि समर्पक या रोज रोज न दिसणार्‍या/नवीन आयडींची चित्रे एक व दोन क्रमांकावर आली आहेत. (समर्पकची सुरेख लेखमालिका चालू आहे हे मी विसरलेले नाहीये! :D) त्यातूनही इतरांना आपले मत कळू नये असे वाटल्यास सदस्य व्यनि करू शकताच. म्हणजे छायाचित्रे निनावी देण्यापेक्षा मते निनावी राहतील. फारसा फरक पडत नाही. यावेळीही ७ जणांनी आपापली मते व्यनि ने दिली आहेत. मिपा सदस्य नि:पक्षपातीपणे मते देतात यावर माझा विश्वास आहे, आणि तो बहुतांशी सार्थ ठरला आहे. मात्र संपादक मंडळात या सूचनेवर पुढच्या स्पर्धेपर्यंत अवश्य विचार होईल. आणि शक्य असेल, बहुमताचा निर्णय असेल तर नियम बदलले जातीलच! तोपर्यंत पुढच्या स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दिक

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 09/04/2014 - 16:04 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमुळे अनेक अप्रतिम चित्रे बघायला मिळाली... त्यासाठी आयोजकांना धन्यवाद !
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे आणी मिपाचेही

जेपी
गुरुवार, 09/04/2014 - 16:24 नवीन
सर्व विजेत्यांचे आणी मिपाचेही अभिनंदन.
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!

अजया
गुरुवार, 09/04/2014 - 16:25 नवीन
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

नि३सोलपुरकर
गुरुवार, 09/04/2014 - 16:29 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा! आयोजकांचे आभार.
  • Log in or register to post comments

उत्तमोत्तम छायाचित्र बघण्याची

वेल्लाभट
गुरुवार, 09/04/2014 - 16:30 नवीन
उत्तमोत्तम छायाचित्र बघण्याची, त्यातून शिकण्याची संधी मिपाने उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल मिपा संपादकांना सलाम. जी जबर छायाचित्र इथे विजयी ठरली आहेत त्यांच्यासाठी टाळ्या! आणि पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा ! जय कॅमेरा ! जय क्लिक !
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि

सुहास झेले
गुरुवार, 09/04/2014 - 16:46 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 09/04/2014 - 17:09 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. या उपक्रमासाठी संपादक मंडळाचे मनःपूर्वक आभार.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सर्वसाक्षी
गुरुवार, 09/04/2014 - 17:33 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि सर्व स्पर्धकांचेही अभिनंदन. अनेक सुरेख चित्रे पाहायला मिळाली. नव्या स्पर्धेचा विषय फारच कल्पक आहे.
  • Log in or register to post comments

अरे वा! अभिनंदन!

रेवती
गुरुवार, 09/04/2014 - 17:37 नवीन
अरे वा! अभिनंदन!
  • Log in or register to post comments

सर्वांचे अभिनंदन आणि

अनिता ठाकूर
गुरुवार, 09/04/2014 - 18:08 नवीन
सर्वांचे अभिनंदन आणि आयोजकांना धन्यवाद! घरबसल्या उत्तम फोटो पहायला मिळाले. पुढेहि असेच घडो! *clapping*
  • Log in or register to post comments

सर्व

सानिकास्वप्निल
गुरुवार, 09/04/2014 - 18:44 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/04/2014 - 19:29 नवीन
सर्वच छायाचित्रे अप्रतिम होती. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

जुइ
गुरुवार, 09/04/2014 - 20:04 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दि़क अभिनंदन!! संपादक मंडळ आणि मिपाचे स्पर्धा आयोजित केल्याबद्द्ल आभार! सर्व सहभागी स्पर्धाकांचे ही आभार खुप छान फोटो टाकल्याबद्दल.
  • Log in or register to post comments

+१

एस
गुरुवार, 09/04/2014 - 20:18 नवीन
अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त यशस्वी ठरलेली स्पर्धा! संपादकांनी घेतलेल्या कष्टांबद्दल खास आभार. सर्व छायाचित्रकारांचे आणि प्रतिसादकांचेही आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ

+२ ऐसेच बोलताय.

प्यारे१
गुरुवार, 09/04/2014 - 21:03 नवीन
+२ ऐसेच बोलताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मी ही तेच म्हाणतो वेळात वेळ

प्रमोद देर्देकर
Fri, 09/05/2014 - 09:20 नवीन
मी ही तेच म्हाणतो वेळात वेळ काढुन हि स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार. विजेत्यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

सर्व विजेत्यांचे अभिनंदन

कवितानागेश
गुरुवार, 09/04/2014 - 21:05 नवीन
पहिल्या क्रमाम्काचं चित्र खरोखरच फार सुंदर आहे. मी ते पहिल्यांदा पाहिल्यापासून चोरलंय आणि डेस्कटॉपवर लावलंय. :) त्यातले आकाश, पाणी, डोन्गरकडा आणि पूल हे सर्व एक्मेकांत अगदी सहज मिसळून गेलंय.
  • Log in or register to post comments

पण मुलांनो एक लक्षात आलं का?

प्यारे१
गुरुवार, 09/04/2014 - 21:05 नवीन
पण मुलांनो ;) एक लक्षात आलं का? तिन्ही पारितोषिक प्राप्त छायाचित्रांमध्ये कुठून तरी कुठं तरी जाण्याचा मार्ग आहे, गतिमानता आहे, थंडपणा नाही. कदाचित मिपाचं उत्साहाचं गतिशील हॅपनिंग प्रतिबिंबच दिसतंय म्हणा ना! - प्यारेण दवणे
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे अभिनंदन (मी

प्रचेतस
गुरुवार, 09/04/2014 - 21:09 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन (मी सोडून).
  • Log in or register to post comments

टाळ्या..टाळ्या..टाळ्या..आणि टाळ्या..

किल्लेदार
गुरुवार, 09/04/2014 - 23:11 नवीन
टाळ्या..टाळ्या..टाळ्या..आणि टाळ्या..
  • Log in or register to post comments

मिपाकरांना मनापासून धन्यवाद

अनुप कोहळे
Fri, 09/05/2014 - 09:09 नवीन
उसगावातुन मायदेशी परतण्याचा घाई गडबडीत ईथे येवुन निकाल बघायला उशीर झाला. सर्व मिपाकरांना माझा मनःपुर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

जागतिक छायाचित्रण दिवस

श्रीरंग_जोशी
Sat, 08/19/2017 - 21:14 नवीन
सर्व मिपाकरांना जागतिक छायाचित्रण दिवसाच्या शुभेच्छा!! आजपासून तीन वर्षांपूर्वी मिपावर छायाचित्रणकला स्पर्धा हा उपक्रम सुरु झाला होता. आजही 'छायाचित्रणकला स्पर्धा' या दोन शब्दांनी इमेज सर्च केल्यास केवळ मिपावरच्या धाग्यांमधले फोटो दिसतात :-) . सोळा महिन्यांपूर्वी मिपावरची सतरावी छायाचित्रणकला स्पर्धा पार पडली. या लोकप्रिय उपक्रमाचे पुनुरुज्जीवन करावे ही विनंती मी साहित्य संपादकांना करतो. या दिवसानिमित्त छायाचित्रणाशी संबंधीत मी काढलेला एक फोटो Image removed. तसेच आजचा बिंगच्या होमपेजवरचा फोटो Image removed. हे स्थळ आहे St. Andrews Bay, South Georgia (अर्जेंटिना व अंटार्क्टिकादरम्यानचे एक बेट).
  • Log in or register to post comments

+१

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/19/2017 - 23:38 नवीन
+१ गेल्या स्पर्धांच्या त्सुनामीनंतर (हघ्याहेवेसांन) खूप वेळ केवळ ओहोटी आहे. एक मस्तं स्पर्धा आयोजित करून मिपाकरांमध्ये चैतन्य जागवायची वेळ झाली आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

घेऊयात

एस
Sun, 08/20/2017 - 04:18 नवीन
श्रीगणेश लेखमाला झाली की एक स्पर्धा घेऊयात दिवाळी अंकाआधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Sun, 08/20/2017 - 05:43 नवीन
तत्त्वतः मान्यतेची अपेक्षा असताना काळवेळेसकट योजना जाहीर झाल्याने आनंद वाटत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा