Skip to main content

<इंचा-इंचाने आपण बेळगाव यळ्ळुर मध्ये माघार घेत आहोत>

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 25/07/2014 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र टाईम्स मधील ही बातमी वाचून महाराष्ट्रदेशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा. मुख्य लेख वाचण्यासाठी "माऊस ची लेफ्ट क्लीक " आणि "डोळे" वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी ही डोळेच वापरावे लागतील. (आतापर्यंत ७ प्रतिसाद आले आहेत व एकही वाचण्यासारखा नाहीये .) http://maharashtratimes.indiatimes.com/nation/maharashtra-karnataka-bor… अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण बेळगाव यळ्ळुर मध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला बेळगाव यळ्ळुर वर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले मुख्यमंत्री, आपले राज्यपाल, आपले पोलिस अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर बेळगाव यळ्ळुरपासून सुरुवात होऊन इतर काही जिल्हेही एक-एक करून फुटतील व महाराष्ट्र म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली किमान दोन पक्ष अस्मिताधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. बेळगाव यळ्ळुर मध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने कन्नडिगां सारख्या देशद्रोह्यांना शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात! असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो मराठी भाषिकांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल! या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रनोबदांना बंगालीत पाठविली नाही आहेत. आपणही पाठवु नका! राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in जय हिंद! जय महाराष्ट्र ! जय पुणे ! जय हिंजवडी फेज १ ! जय आपलं क्युबिकल नंबर ! जय बेन्च ! आणि सर्वात महत्वाचे

जय मिसळपाव !!


वाचने 33738
प्रतिक्रिया 103

प्रतिक्रिया

In reply to by यसवायजी

६०-७० ला जन्मलेल्यांची निम्मी लाकडं मसणात गेली.
बापरे माझी पण निम्मी लाकडं मसणात गेली हे ऐकून उगीचच म्हातारं झाल्याचे वाटायला लागलं :(

In reply to by प्रभाकर पेठकर

अरे!!! स्वर्गातून मजा काय बघताय राव?? इकडे देव असण्या नसण्यावर इतका वाद चालू आहे.. धावतं समालोचन करा की देवभेटीच!!

In reply to by बाळ सप्रे

मी काय धावतं समालोचन-बिमालोचन वगैरे करणार? मराठीत म्हण आहे नं 'आप मेल्याशिवाय स्वर्ग (पर्यायाने देव) दिसत नाही.' मग कायssss मरा.....!

In reply to by बॅटमॅन

दक्षिणेतले लोक एरवी आपसांत किती का भांडेनात, राज्यहिताचा प्रश्न आला की केंद्रात सर्वपक्षीय दबावगट तयार करतात. महाराष्ट्रातल्या नेत्यांना ती अक्कल नाही आणि ती औकातही नाही. राडे करणे, चमत्काराने धरणे भरणे, यातच एनर्जी घालवताहेत झालं. पूर्णपणे सहमत ! महाराष्ट्राचे वाटोळे कोणी केले ? कन्नडिगांनी का ? बेळगाव आणि समस्त इतर शहरे आणि गावं जी महाराष्ट्रात येण्यास आसुसली आहेत, त्यांना महाराष्ट्रात काय मिळणार आहे ? इथे फक्त आमच्या माजलेल्या सांड नेत्यांच्या वाढदिवसांच्या फ्लेक्स शिवाय काही नाही ! बरं महाराष्ट्रातली जनता यांच्या {बेळगाव आणि समस्त इतर शहरे आणि गावं} यांच्यासाठी पेटुन उठेल का ? तर खेदाने सांगावे लागेल नाही ! अहो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पाण्यासाठी उपोषणाला बसणार्‍यांची टिंगल करतात आणि गलिच्छ भाषा वापरतात... त्या महाराष्ट्रात येउन काय मिळणार ? इथे विजही नाही ! बरं वीज नाही त्यामुळे जास्त मुल जन्माला येतात असा जगावेगळा शोध लावणारेच हेच टग्या ! इथे फक्त टगेगिरी चालते... विकास आणि सुव्यवस्थेच्या नावाने पुरती बोंब आहे. जास्त कशाला वेगळ बोलु ? माझ्या लहानपणा पासुन आणि जेव्हा पासुन पेपर वाचत आलो आहे तेव्हा पासुन पावसाळ्याच्या आधी नाले सफाई झाली नाही, नाले सफाईत भ्रष्टाचार, सगळीकडे पाणी तुंबले, मुंबइच्या लोकलवर पावसाचा परिणाम, हार्बरलाइन बंद पडली, खड्डे आणि त्याच्या बातम्या आणि फोटो... हे इतके वर्ष सातत्याने घडताना पाहत आहे,वाचत आहे. कालच लोकसत्तेचा अग्रलेख {राज्य रुतले खड्डय़ांत..!} वाचला होता... फार अस्वस्थ व्हायला होत मला... आपल्या महाराष्ट्रातले राज्यकर्त्ये नक्की काय करतात ? मुंबइच शांघ्याय झाल ? सिंगापुर झाल? कोकणाचा कॅलिफोर्रनिया झाला ? वाटोळ मात्र नक्कीच झालं ! नुसता भ्रष्टाचार...अव्याहतपणे चालणारा ! महाराष्ट्र शेतकर्‍यांच्या आत्महत्येत पहिला, विद्यार्थींच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला,पोलिसांच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला,सर्व प्रकारच्या आत्महत्येत महाराष्ट्र पहिला. काय ठेवलय या महाराष्ट्रात भ्रष्टाचारा शिवाय ? जाता जाता :--- कालच ऑफिसमधुन घरी जाताना जवळपास गुडघाभर पाण्यातुन बाइक काढुन घरी जिवंत पोहचलो ! हेच आमचे जगणे ? नाहीतर खालच्या तरुणासारखा कुठेतरी वाहुन गेलो असतो... आजची स्वाक्षरी :- 'काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं' :(

In reply to by मदनबाण

परम खेदाने मदनबाणाशी सहमत व्हावे लागत आहे. :( एकसे एक माजलेले गुंठामंत्री, किलो किलो सोने घालून फिरणारे हत्ती यांची मोकाट चराई सुरू आहे. माजुरडे नेते अन त्यांचे दीडदमडीचे चेले यांची गुंडगिरी वगळता महाराष्ट्रात काही उरलेलं नाही. सगळे साले मूर्खागमनी :(

In reply to by मदनबाण

अगदी मान्य. बेळगाव- संयुक्त महाराष्ट्र याविषयी मिपावरच २०१० मधील पंगांचा हा आणि हा प्रतिसाद आठवला. पंगांसारखे मिपाकर हल्ली इथे का येत नाहीत काय माहित?

In reply to by मदनबाण

तुलना अस्थानी आहे.. महाराष्ट्रात त्यांना केवळ कन्नड सक्ती टाळण्यासाठी यायचयं.. आणि ते नक्की साध्य होईल महाराष्ट्रात आल्यास. बाकी राहिला प्रश्न महाराष्ट्रातील राजकारण्यांचा आणि राज्यकारभाराचा.. कर्नाटकात काय एवढं रामराज्य आहे?? इथे टग्या तिथे येडंयुरप्पा.. गुंठामंत्री तिकडेही आहेतच.. खाणवाले रेड्डीबंधु वगैरे या गुंठामंत्र्यांचेही बाप निघतील.. इकडे मनसे,सेना, ब्रिगेड .. तिकडे रक्षण वेदिके, श्रीरामसेना सगळे एका माळेचे मणी..

In reply to by बॅटमॅन

नाकावर टिच्चून फलक लावण्यात प्वाइंट काय ते मला अजूनही समजत नाही
जर काही पॉइंट नाहि तर तसाच का नाही ठेऊ दिला तो फलक? कशाला उखडला? तेव्हा कैतरी पॉइंट असणारच ना तो फलक लावण्यात? :P

वर प्रशांतने म्हंटल्याप्रमाणे सेना-भाजपाची कोंडी करण्यासाठी मनसेला पुढे आणण्याचा कॉन्ग्रेसवाल्यांचा डाव दिसतोय.तिकडे कर्नाटकातही कॉन्ग्रेसचे सरकार आहे त्यामुळे नाटक जास्त वेळ चालवण्याची परवानगी कॉन्ग्रेसश्रेश्ठि देणार नाहीत्.असो. दिल्ली असो वा येळ्ळूर आपल्या मराठी पुढार्‍यांना कुठलाही मुद्दा चालतो, मराठीच्या नावाने गळा काढायला.

धाग्याच्या शीर्षकात बेळगावच्या ऐवजी बेळगावी असा बदल करावा अशी संपादकांना विनंती करीत आहे :D

In reply to by पैसा

झालं की संपलं आता ... आता कस्लं येतेय बेळगाव महाराष्ट्रात ... सोडुन द्या विषय ...

In reply to by प्रसाद गोडबोले

नायतर काय. वेगळा विदर्भ (हागणदारीमुक्त) केला नाही हेच नशीब म्हणायचे! अन नै आलं ते त्यांच्यासाठी बरंच आहे. पुन्हा नायतर दादागिरीसाठी अजूनेक फ्रंट मिळणार, दुसरे काय?

In reply to by हाडक्या

हे बघा मी टीआरपीसाठी एकही प्रतिसाद देणार नाही आधीच सांगून ठेवतोय. समजलं का??? समजलं नसलं तर पुन्हा सांगेनच असं नाही असं नाही असंही नाही.

काश्मीर की बेळगाव ? कोणता प्रश्न आधी ( अजून साधारण ५० वर्षात) सुटेल ?

In reply to by हाडक्या

नाही. ते "बेळगाव"च. सध्या तरी मी एखादा कन्नड्या माझ्या तोंडावर मला करेक्ट करायची वाट बघतोय.