✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

इंग्रजी शब्दांचा मराठीत होणारा चुकीचा वापर

म
मराठी कथालेखक यांनी
Fri, 07/25/2014 - 16:48  ·  लेख
लेख
मराठीत (वा हिंदीत) बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर होणे नित्याचेच आहे. पण त्यातही चुकीच्या शब्दांचा वापर पाहिला की हसावे की रडावे ते कळत नाही. आणि हा वापर इतका भक्तिभावे होतो की वाटावे हे जणू मराठीच शब्द आहेत. काही उदाहरणे देत आहे. १) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्‍याची 'कीव' कराविशी वाटते. २) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट' ३) Bicycle करिता 'सायकल' ४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी. ५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !! ६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं. ७) Cinema/Movie साठी 'पिक्चर' तुम्हाला अजून असे कोणते शब्द आठवतात ? शब्दांचा हा चुकीचा वापर टाळावा निदान कमी व्हावा म्हणून काय करता येईल ?तुम्ही काही करता का ? तुम्ही निदान पुढच्या पिढीला अशा चुकीच्या वापरापासून परावृत्त करता का ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
96477 वाचन

💬 प्रतिसाद (271)

प्रतिक्रिया

गोरा साहेब..

स्वाती दिनेश
Mon, 07/28/2014 - 18:04 नवीन
पारींचं पॅरिस करतो, फिरेन्झचं फ्लॉरेन्स करतो, रोमाचं रोम करतो, म्युनशनंचं म्युनिक नाहीतर म्युनिच करतो, क्योल्नचं कलोन करतो.. यादी न संपणारी आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

रम्य चर्चा

स्पा
Fri, 07/25/2014 - 21:59 नवीन
रम्य चर्चा
  • Log in or register to post comments

१०१ !!!

कवितानागेश
Fri, 07/25/2014 - 22:31 नवीन
रम्य ही स्वर्गाहूनि चर्चा........ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आम्ही करतोच चिरफाड... काय म्हणणं आहे?

मयुरा गुप्ते
Fri, 07/25/2014 - 22:30 नवीन
आम्ही कि नाही इथे 'वालमार्टात' जाउन मग मुलांनी खुपच दंगा केला की 'पार्कात' जातो. आणि की नाही आम्ही तो 'मल्टी बिलियन'डॉलर्स खर्चुन केलेला 'अवतार'च बघितला. तर लेकीने मला थोडं सुधारवायचा प्रयत्न केला..'अवतार' नाही काय्...'अ‍ॅवटार'..मग बाकी आम्ही माय मराठीतच कान उघडणी केली...गधडे, तुझ्या अ‍ॅवटार वाल्यांच्या नानाची टांग्.शाळेमध्ये अधुन मधुन 'पजामा डे' असतो, तेव्हा आपला रात्री झोपयचा पायजमा (हा नक्कि मुळ मराठी शब्द नाहीये, जाणकार माहिती देतीलच) घालुन पाठवतो. बाकी प्रतिक्रिया नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण. -मयुरा.
  • Log in or register to post comments

अवतार' नाही काय्...'अ‍ॅवटार'.

बॅटमॅन
Sat, 07/26/2014 - 00:11 नवीन
अवतार' नाही काय्...'अ‍ॅवटार'..मग बाकी आम्ही माय मराठीतच कान उघडणी केली...गधडे, तुझ्या अ‍ॅवटार वाल्यांच्या नानाची टांग्.
हाण तेजायला...जबरीच ओ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरा गुप्ते

पायजमा (हा नक्कि मुळ मराठी शब्द नाहीये, जाणकार माहिती देतीलच)

केदार-मिसळपाव
Mon, 07/28/2014 - 18:28 नवीन
हा पोषाख बायजाबा नावाच्या स्त्री ने शिवला होता. तो ईंग्रजांना आवडला नी त्यांनी त्याचे पायजामा केले. हा.का.ना.का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरा गुप्ते

>> त्याला हास्पिटलात न्हेलंत.

धन्या
Fri, 07/25/2014 - 22:59 नवीन
>> त्याला हास्पिटलात न्हेलंत. >> तिजी कालच डिलेव्री झाली. >> आला म्हॉटा झ्याटमीन शिकवायला. >> शील्याब टाकून घ्या. >> काल रात्री लाईट गेली व्हती. >> बलप लय डीम झालाय, बदलून टाका. नायतं टुबंच लावा ना. >> ए पॉरा, त्या जांग्यावर प्यांड घाल. तसाच फिरु नुको. >> मना बुलू रंगाचा शरट हावा. >> मना फुल्प्यांड पायजे. मी हाप्प्यांड नाय घालनार जा. >> ये पॉरा, ज्याम धर नाय तं कुटरवरना पडशील. >> ट्याक्टर घ्यातलाय आज दोन तासांना. नांगार काय परवाडताय. >> ती चक्की विलेक्टीक वर चालते. क्रमशः ;)
  • Log in or register to post comments

आला म्हॉटा झ्याटमीन शिकवायला

शिद
Mon, 07/28/2014 - 17:57 नवीन
आला म्हॉटा झ्याटमीन शिकवायला
आमच्या गावाकडच्या भाषेत अतिशहाण्या माणसाला थोड्याफार अश्याच शब्दांत सुनवतात - ह्यो आयलो मोठो झाटलीमन...गप बह.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

झ्याटमीन

वामन देशमुख
Mon, 07/28/2014 - 23:06 नवीन
आला म्हॉटा झ्याटमीन शिकवायला.आला हे मला खरंच कळलं नाही. इस्कटून सांगाव वो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तेन्ला जंटल्मेंटल म्हनायचंय !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/28/2014 - 23:34 नवीन
तेन्ला जंटल्मेंटल म्हनायचंय ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

झ्याटमीन म्हनल्याव तुमच्या

हाडक्या
Wed, 07/30/2014 - 20:09 नवीन
झ्याटमीन म्हनल्याव तुमच्या मनात काय आलंय ते आमी वळकून हावो.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

व्हरांडा हा शब्द मराठी कि

खटपट्या
Fri, 07/25/2014 - 23:11 नवीन
व्हरांडा हा शब्द मराठी कि इंग्रजी ? बाकी लक्ष्मी वरून लैक्मे झालेलं ऐकलं कुठंतरी मदर फादर सुद्धा मातृ पितृ वरून घेतलंय हे खरं का ? आम्ही पण क्रमश:
  • Log in or register to post comments

तंटा नाय तर घंटा नाय ..

तुमचा अभिषेक
Sat, 07/26/2014 - 01:29 नवीन
मुंबईत लाखाला पेटी बोलतात आणि कोटीला खोका शंभरच्या नोटेला कान बोलतात आणि पाचशेच्या नोटेला बापू.. डान्सबार या ईंग्रजी शब्दाला काय म्हणे तर छमछम .. खंबा कशाला बोलतात हे जाणकारांना सांगायला नकोच, आणि अश्यांना मग चपटी कशाला म्हणतात ते ही माहीत असेल.. सुपारी, कबूतर, घोडा, घंटा ... वाट लावली या अंडरवर्ल्डने मराठी आणि ईंग्लिश दोन्ही भाषांची :(
  • Log in or register to post comments

एकदा आमचे इकोनोमिक्स चे

सरनौबत
Mon, 07/28/2014 - 19:01 नवीन
एकदा आमचे इकोनोमिक्स चे मास्तर (मातृभाषा - अर्थातच हिंदी) म्हणाले मराठी फारच गमतीदार आहे. काहीही बोलतात. " आनंद मेला … पाहायला चला." मी आणि मित्र मागच्या बाकावरून उभे राहिलो आणि म्हणालो …" गुर्जी !!!! ते मेला नाही …मेळा आहे…म्हणून दाखवा जरा आम्हाला जरा ' ळ ' !!!" जीभ वळत नाही म्हणून मराठी गमतीदार काय ? त्यानंतर नेहमीच आमच्यावर खार खाउन असायचे. लोकमान्य टिळकांचे नावच बदलून टाकणारे हे लोक ( सर्व हिंदी लोक "तिलक" असे म्हणतात हे आपल्याला ठाऊक आहेच पण आपण नाही ). यांना काय कपाळ मराठी कळणार.
  • Log in or register to post comments

सर्व हिंदी लोक "तिलक" असे

सरनौबत
Mon, 07/28/2014 - 19:04 नवीन
सर्व हिंदी लोक "तिलक" असे म्हणतात हे आपल्याला ठाऊक आहेच पण आपण काही नाही बोलत.....असे म्ह्णायचे होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरनौबत

उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/29/2014 - 00:05 नवीन
उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे मुळाक्षर नाही... मराठीने ते दाक्षिणात्य (द्रविड) भाषांतून उचलले आहे... "ळ" संस्कृतमध्येही नाही ! यावरून, बाला (बाळा), काला (काळा), गोला (गोळा) असे बोलणार्‍या गावाकडच्या माणसाची कोणी चेष्टा करू लागला तर आम्ही त्याला 'ळ' ऐवजी 'ल' च्या वापरामुळे खेडवळ बोलिभाषा "तुपातल्या मराठीपेक्षा" संस्कृतच्या जास्त जवळ आहे, असा युक्तीवाद करून गारद करत असू ते आठवले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरनौबत

मंत्रपुष्पांजलीत आहे

सुनील
Tue, 07/29/2014 - 07:07 नवीन
"ळ" संस्कृतमध्येही नाही !
आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति आणखी काही उदाहरणे असू शकतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य

बॅटमॅन
Tue, 07/29/2014 - 12:56 नवीन
ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् | होतारं रत्नधातमम् || -ऋग्वेद, मंडल पहिले, सूक्त पहिले, त्यातली पहिलीच ऋचा. बाकी हे ळ वैदिक संस्कृतमध्ये होते. पाणिनीय संस्कृतमधून गायब झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

ही ही ही... आमचा संस्कृतचा

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/29/2014 - 13:25 नवीन
ही ही ही... आमचा संस्कृतचा इतका गाढा अभ्यास नाही (अभ्यास नाही असे म्हटले तरी चालेल... अकरावी नंतर संस्कृतचा सहवास संपला :) ). पण आमचा तो युक्तीवाद ऐकून स्वतःला संस्कृतचे पंडित समजणारे गार पडत असत हे मात्र खरे. (उगा शेखी मिरवणार्‍यांना गारद करण्यात मजा वाटणारा) ईए
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

युक्तिवाद बाकी आहे मस्तच :)

बॅटमॅन
Tue, 07/29/2014 - 13:26 नवीन
युक्तिवाद बाकी आहे मस्तच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

-ऋग्वेद, मंडल पहिले, सूक्त

हाडक्या
Wed, 07/30/2014 - 20:14 नवीन
-ऋग्वेद, मंडल पहिले, सूक्त पहिले, त्यातली पहिलीच ऋचा.
बाकी तुमची ही लगोलग संदर्भसहित उदाहरणे, श्लोक, ऋचा इत्यादि देण्याची पद्धत पाहून आम्ही लई जळतो बॅटमॅनराव.. (हो हो जळतो.!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

"ळ" संस्कृतमध्येही नाही !

पिशी अबोली
Tue, 07/29/2014 - 22:00 नवीन
"ळ" संस्कृतमध्येही नाही !
वेदांमधील 'ळ' चे मूळ हा दीड शतक चाललेला वाद आहे. अजून संपला नाही आणि कधी संपणंही कठीण दिसतंय... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

ळ नाही पण ट आहे ना ? मग टिलक

सरनौबत
Wed, 07/30/2014 - 17:09 नवीन
ळ नाही पण ट आहे ना ? मग टिलक का नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/29/2014 - 00:05 नवीन
उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे मुळाक्षर नाही... मराठीने ते दाक्षिणात्य (द्रविड) भाषांतून उचलले आहे... "ळ" संस्कृतमध्येही नाही ! यावरून, बाला (बाळा), काला (काळा), गोला (गोळा) असे बोलणार्‍या गावाकडच्या माणसाची कोणी चेष्टा करू लागला तर आम्ही त्याला 'ळ' ऐवजी 'ल' च्या वापरामुळे खेडवळ बोलिभाषा "तुपातल्या मराठीपेक्षा" संस्कृतच्या जास्त जवळ आहे, असा युक्तीवाद करून गारद करत असू ते आठवले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरनौबत

माझा एक मित्र बनियनला 'बनेन'

यसवायजी
Tue, 07/29/2014 - 00:40 नवीन
माझा एक मित्र बनियनला 'बनेन' आणी अंडरवेअरला 'अंडरवेल' म्हणायचा. :D आम्ही 'ईश्टील' किंवा 'प्याश्टीक'च्या पेल्याला 'गिलास' म्हणतो. सायकलला शायकल आणी क्रोसीनला क्रोशीन म्हणतो. टाईल्सला ष्टाईलच्या फरश्या म्हणतो. काम्पुटर, किरकेट, ष्टंपा, बॅटा, बेल्सा, यष्टी, लज्गरी बस, वगैरे शब्द मराठीच आहेत.
  • Log in or register to post comments

बनियानला अंतर्बंडी आणि

मराठे
Tue, 07/29/2014 - 01:22 नवीन
बनियानला अंतर्बंडी आणि अंडरवेअरला अंतर्चड्डी असे दोन समर्पक शब्द आहेत! वापरा आणि खात्री करा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

काय ते??

यसवायजी
Tue, 07/29/2014 - 01:31 नवीन
वापरा आणि खात्री करा काय वापरा म्हणताय? वापरतोच की. खात्री कसली करायची त्यात? :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

ती तुमची "अंदरकी बात"

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/29/2014 - 12:35 नवीन
ती तुमची "अंदरकी बात" असल्याने त्यांना माहित नसणे स्वाभाविक आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

@अंतर्बंडी आणि अंडरवेअरला

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/30/2014 - 00:10 नवीन
@अंतर्बंडी आणि अंडरवेअरला अंतर्चड्डी >>> Image removed. अहो.. सरळ अंतर्वस्त्र म्हणा ना राव! काय ते भयंकर शब्दां-तरण! या वरून मि.पा.वर (आंम्ही-आणलेल्या.. Image removed. ) एका शब्दभुभू'ची आठवण झाली.ते महाराज असल्या संस्कृतचं तूप सोडलेल्या मराठी शब्दांना - काढण्यात माहिर आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

फक्त दुधापासून बनवलेला चहा

नाव आडनाव
Tue, 07/29/2014 - 19:40 नवीन
फक्त दुधापासून बनवलेला चहा म्हणजे "पिव्वर" चहा, म्हणजे इंग्रजीतला "प्युअर" चहा :) पारनेर आणि नगरला हा शब्द बर्यापैकी वापरात आहे. माहित नाही बाकीच्या लोकांनी आइकलाय कि नाही.
  • Log in or register to post comments

मिरजेतही हा शब्द ऐकला आहे.

बॅटमॅन
Wed, 07/30/2014 - 13:55 नवीन
मिरजेतही हा शब्द ऐकला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

पिव्वर म्हैस...

धमाल मुलगा
Wed, 07/30/2014 - 21:56 नवीन
"आमच्या येथे पिव्वर म्हैशीचे दूध मि़ळेल"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

.

vrushali n
Wed, 07/30/2014 - 09:26 नवीन
बरेचदा पेशंट लोक खुप ब्लडींग (blooding) होत आहे,असे म्हणतात ,त्याची आठवण झाली
  • Log in or register to post comments

काहि लोक बनियनला "गंजीफ्रॉक"

युगन्धरा@मिसलपाव
Wed, 07/30/2014 - 14:34 नवीन
काहि लोक बनियनला "गंजीफ्रॉक" म्हणतात.....
  • Log in or register to post comments

आमच्या कामवाल्या बाई कपडे

रेवती
Fri, 08/01/2014 - 18:36 नवीन
आमच्या कामवाल्या बाई कपडे धुताना आईला "बै, सगळ्यांच्या बनेलांना नीळ घालयची का?" असे विचारीत. त्या बनियनला बनेल म्हणत. आम्ही मुले त्या तसे म्हणायची वाट बघत असू, नंतर घोड्यासारखे खिंकाळून हसत असू. आता यात हसण्यासारखे काय? अशा चेहर्‍याने त्या आमच्याकडे बघत असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युगन्धरा@मिसलपाव

कदाचित त्या बाई हुशार

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/02/2014 - 12:03 नवीन
कदाचित त्या बाई हुशार असाव्यात आणि त्यांना त्या वाक्याआडून "सगळ्या बनेल पोरांच्या कपड्यांना नीळ घालायची का?" असे म्हणायचे असेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

होय, नक्कीच!

रेवती
Sat, 08/02/2014 - 22:54 नवीन
होय, नक्कीच! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

बनियन वा गंजीफ्रॉक

हुप्प्या
Wed, 07/30/2014 - 22:23 नवीन
दोन्ही शब्द हे अमेरिकेत पूर्णपणे अगम्य आहेत. हे कुठून आले ते कुणी जाणकारच सांगू शकतील. पण ह्यातला कुठलातरी एक शब्द जास्त उच्चभ्रू इंग्रजी आहे असे मला वाटत नाही.
  • Log in or register to post comments

विकी- Banyan

यसवायजी
Wed, 07/30/2014 - 22:30 नवीन
विकी- Banyan Banyan is also commonly used in present day Indian English and other countries in the Indian Subcontinent to mean "vest" ("undershirt" in American English).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

(शब्दकोशात एंट्री

माहितगार
गुरुवार, 07/31/2014 - 14:24 नवीन
(शब्दकोशात एंट्री करण्याच्यादृष्टीने) एखादा (नवा अथवा इतरभाषी) शब्द भाषेने स्विकारला आहे हे केव्हा समजावे ?
  • Log in or register to post comments

जेव्हा तो

केदार-मिसळपाव
गुरुवार, 07/31/2014 - 15:11 नवीन
एखाद्या सार्वजनीक पत्रकात अथवा किमान तिन चार वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमात वापरला जातो. उदा. गेलाबाजार हा शब्द मि गावात ऐकलाय तसेच मराठी वृत्तपत्रात तसेच अंतरजालावरही बघितलाय. माझ्यामते हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

बरचसं पटतय.

माहितगार
गुरुवार, 07/31/2014 - 21:14 नवीन
बरचसं पटतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

एक महत्वाचा शब्द राहिलाच.

मराठी कथालेखक
गुरुवार, 07/31/2014 - 15:39 नवीन
"नापास" ...हा शब्द ऐकला /वाचला (अगदी वृत्तपत्रातही वापरला जातो) की माझं टाळकं फिरतं ..
  • Log in or register to post comments

सहनशक्तीच्या परीक्षेत नापास

बॅटमॅन
गुरुवार, 07/31/2014 - 15:58 नवीन
सहनशक्तीच्या परीक्षेत नापास झाला म्हणायचे की तुम्ही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

आणि वृत्तपत्रे अनुत्तीर्ण

मराठी कथालेखक
गुरुवार, 07/31/2014 - 16:00 नवीन
आणि वृत्तपत्रे अनुत्तीर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नापास हा शब्द जबर्‍या आहे.

बॅटमॅन
गुरुवार, 07/31/2014 - 16:05 नवीन
नापास हा शब्द जबर्‍या आहे. जसे पोष्टपोन वरून भारतीयांनी प्रीपोन हा नवा शब्द काढला तसाच पास वरून नापास काढला. लय आवडतो मला. अनुत्तीर्ण इ.इ. पाहिले की जीर्ण ठिगळांची आठवण येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

+११११

मैत्र
Fri, 08/01/2014 - 12:21 नवीन
मी अनेक वेळा लोकांना दुरुस्ती सांगत असतो की prepone असा शब्द नाहीये. reschedule earlier म्हणा. ८०% वेळा लोक आपल्यालाच हसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हे पहा..

हाडक्या
Fri, 08/01/2014 - 16:28 नवीन
हे पहा.. http://www.oxforddictionaries.com/definition/english/prepone जरी उगम भारतीय इंग्लिश मधून असला तरी आता प्रमाणित इंग्लिश भाषेने हा शब्द स्वीकारला आहे, तेव्हा लोकांना दुरुस्ती सांगणे थांबवलेत तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

असच updation ह देखिल शब्द

बाळ सप्रे
Fri, 08/01/2014 - 16:43 नवीन
असच updation ह देखिल शब्द स्वीकारावा. अजुन स्वीकारला नाहिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

असे कितीतरी शब्द आहेत

हुप्प्या
Fri, 08/01/2014 - 10:16 नवीन
बेलाशक हा शब्द बघा. बे हा फारसी उपसर्ग विना ह्या अर्थी वापरला जातो. उदा. बेइज्जत, बेमुर्वत, बेईमान वगैरे. पण ला हा अरबी उपसर्ग त्याच अर्थाचा आहे. उदा. लावारिस. आता हे दोन उपसर्ग शक ह्या शब्दाला लावून एक धेडगुजरी शब्द बनवला आहे. तीच गोष्ट बेमालूमची. बे हा फारसी. मालूम हा अरबी इल्म वरून आलेला शब्द. तोही धेडगुजरीच. ताकदवान ह्यात ताकद हा बहुधा फारसी. पण वान हा धनवान, शक्तीवान अशापैकी संस्कृतजन्य. नापास शब्द खुपण्याचे कारण काय? पास हा शब्द इंग्रजी आहे आणि तो सोवळा असावा अशी तीव्र इच्छा की अजून काही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा