Skip to main content

इंग्रजी शब्दांचा मराठीत होणारा चुकीचा वापर

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 25/07/2014 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत (वा हिंदीत) बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर होणे नित्याचेच आहे. पण त्यातही चुकीच्या शब्दांचा वापर पाहिला की हसावे की रडावे ते कळत नाही. आणि हा वापर इतका भक्तिभावे होतो की वाटावे हे जणू मराठीच शब्द आहेत. काही उदाहरणे देत आहे. १) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्‍याची 'कीव' कराविशी वाटते. २) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट' ३) Bicycle करिता 'सायकल' ४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी. ५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !! ६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं. ७) Cinema/Movie साठी 'पिक्चर' तुम्हाला अजून असे कोणते शब्द आठवतात ? शब्दांचा हा चुकीचा वापर टाळावा निदान कमी व्हावा म्हणून काय करता येईल ?तुम्ही काही करता का ? तुम्ही निदान पुढच्या पिढीला अशा चुकीच्या वापरापासून परावृत्त करता का ?

वाचने 97588
प्रतिक्रिया 271

प्रतिक्रिया

In reply to by नानासाहेब नेफळे

हा एक नवाच पैलु आमच्या अल्पमतीला आज कळाला... आजवर सावरकर ते पु.लंचा तिरस्कार केवळ जातीमुळे करताना पुष्कळ लोकांना पाहिल्यामुळे त्याबद्दल काही विशेष वाटले नाही.. ज्ञानेश्वरपण सुटले नाहीत ह्यांच्या तडाख्यातुन... (बोलणार्‍याची लायकी सुद्धा विचारात घ्यावी लागते म्हणा..).. शिवाय शिवाजी महाराज ह्यांच्यावरही मक्तेदारी दाखवायचा सोस लोकांना सुटत नाही.. (पुन्हा एकदा.. कीव येते.. असो..) पण आता हा माज इतका वाढलाय की संस्कृतपेक्षा परकीय भाषा जवळच्या वाटु लागल्या.. नुसतं तेवढंच नाही तर स्वभाषांशी "वावडं"च होऊ लागलं..?? मोठ्या संख्येने समाज असा निर्बुद्ध विचार करु लागला तर भारतीय भाषा मृतवत होणार नाहीत तर काय? बाबासाहेबांचा दाखला देणार्‍या लोकांना बाबासाहेब काडीभर तरी कळले असतील का हा प्रश्नच आहे.. शाळेत असताना एक धडा होता.. "महापुरुषांचा पराभव".. राहुन राहुन त्या धड्याची आज फार आठवण आली.. बॅट्या आणि प्रगो.. तुमच्या सगळ्या पोस्टसाठी +१११११

In reply to by पिलीयन रायडर

"महापुरुषांचा पराभव" हे एकदम बरोबर उदाहरण दिलंय. मला पण हेच लिहायचं होतं पण शनिवारी आणि रविवारी मिसळपाव बंद होतं. मला लहान असताना हा धडा जास्त कळला नव्हता पण मोठा होताना आजू बाजूला जे काही चाल्लय ते बघून बर्याच वेळेला या धड्याची आठवण आली आणि हळूहळू कळला / अजूनही कळतोय. कुणाला सावरकरांची बदनामी करायची आहे, तर कुणाला संभाजी महाराजांची. कुणाला आंबेडकरांवर चिखल उडवयचाय तर कुणाला गांधींवर. नेत्यांच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटतील असं नाही, पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या घ्यायला काय हरकत आहे? तुम्ही आम्ही हे सगळं होत असताना तिथे नव्हतो आणि इतिहास लिहिताना बर्याचदा दोन बाजूनी वेगवेगळा लिहिला जातो. त्यातला जो चांगला आहे तेवढाच ठेवू, बाकीच्या गोष्टींची (ज्याने कुणाचीही बदनामी होत असेल) चर्चा जाहीर रित्या तरी टाळली पाहिजे.

In reply to by पिलीयन रायडर

बाबासाहेबांचा दाखला देणार्‍या लोकांना बाबासाहेब काडीभर तरी कळले असतील का हा प्रश्नच आहे..
क्या बात है, पिराताई.. १००% सहमत .. त्यातल्यात्यात आजकाल स्वतःला बाबासाहेबांचे किंवा आणखीही कुणाकुणा महापुरुषांचे समर्थक म्हणवणार्‍यांचा चेपुवर जो प्रचंड वैचारीक सावळागोंधळ आणि वायझेडपणा सुरु असतो ना, तो प्रचंड डोक्यात जातो..

In reply to by बॅटमॅन

दूकान, मैदान, ज्यादा, फत्ते (विजय), मालूम, हे शब्द अरेबिक भाषेत (मस्कतच्या) ऐकले आहेत. 'पेटी'ला संदूक म्हणतात. अरबी भाषेतही प्रदेशनिहाय बदल दिसून येतात. आपल्याकडे जसे मुंबई-पुण्याची मराठी, कोकणातील मराठी, नागपूरची मराठी वगैरे वगैरे कांही प्रमाणात वेगवेगळ्या असतात. तसेच, मस्कत, दुबई, सौदी, बाहरेन वगैरे देशांमध्ये अरेबीक थोडी थोडी बदलत जाते. तेही शब्द मुळ अरेबिक आहेत की बाहेरुन आयात केले आहेत सांगणे अभ्यासकाचेच काम असेल.

In reply to by प्यारे१

फ्रेंचमध्ये पावाला pain असा शब्द आहे, उच्चार पां किंवा पॉं, कोकणी उच्चाराशी बरंच जास्त साधर्म्य असणारा. अल्जिरीयन-फ्रेंच उच्चार मला माहित नाही. फ्रेंच, इतालियन, स्पॅनिश, पोर्तुगीज या भाषा लॅटिनोद्भव आहेत आणि बरेच शब्द सारखे आहेत. काही शब्दांची स्पेलिंग्ज कदाचित समानही असतील, पण उच्चार निरनिराळे असतात. अवांतर - नोबेलविजेता फ्रेंच कथालेखक आल्बेर कामू अल्जिरीयात जन्माला आला. --- मूळ धागालेखक - आमच्यात लोकांवर येताजाता लैन मारतात, १४ फेब्रुवारीला "लौ यू" म्हणतात. मूळ शब्द काय आहेत हे समजून त्यांचे विचित्र उच्चार, गंमतीखातर करणं निराळं असतं. आणि माहित नसताना भलते काहीतरी शब्द वापरणं निराळं. अस्मितांची गळवं टरारलेली असणं सगळ्यात जास्त विनोदी. पण तरीही जेव्हा भलते शब्द भलत्या अर्थाने बऱ्याच प्रमाणावर लोकांकडून वापरले जातात तेव्हा भाषा बदलते. वर अनुप ढेरेंनी झेरॉक्सचं उदाहरण दिलेलं आहेच. आता याच धाग्यात अशा अर्थाचा प्रतिसाद वाचला, स्लीप म्हणजे झोपणं नाही. उच्चार आणि स्पेलिंग पाहिलं तर sleep या शब्दाचा उच्चार-लेखन स्लीप आणि slip चा उच्चार-लेखन स्लिप असंच पाहिजे. pen, pane, pain या तीन इंग्लिश शब्दांचे उच्चारही निरनिराळे आहेत, पेन्, पेन आणि पेऽन. पण लक्षात कोण घेतं!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी म्हणतो नेहमी आपणच लक्ष का द्यायच? इथे आपली मराठी सांभाळायची/वाढवायची सोडुन इतर भाषांच्या शुद्धतेची काळजी आपणच का घ्यावी. त्यांनी योग चे योगा केले, आपणही योगा असेच म्हणतोय. तुम्ही त्यांना सांगा ना ते की ते योग आहे. त्यांना ही करु द्या ना चुकांची दुरुस्ती. महत्वाचा मुद्दा असा की आधी आपले घर व्यवस्थित आवुया लावुया आणि मग इतरत्र बघुया. इथे मला युरोपातले उदाहरण द्यावेसे वाटते. हे लोक स्पष्ट सांगतात की इंग्रजी परकीय भाषा आहे. ती आम्ही फक्त अत्यावश्यक वेळीच वापरु. मला त्यात काही चुकिचे वाटत नाही. बहुतेक भारतिय इंग्रजीबहुल देशात वास्तव्यास असल्याने त्यांना इतर भाषिय देशातला अनुभव नसतो. माझा अनुभव असा आहे की युरोपातले लोकही शक्यतो त्यांच्या भाषेतिल वाक्ये कामचलाउ इंग्रजीत रुपांतरित करतात आणि ती खपतातही. मी सुद्धा बरिच मराठी वाक्ये दॉईच भाषेत रुपांतरीत करतो. तुर्तास इतकेच.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आभार्स. फ्रेन्च फुटबॉल पटू झिनेदाईन झिदान जन्मानं अल्जिरियाचाच. (डूक्करमुसंडी वाला) 'पां' च आहे. 'लेऐ (lait) एत पां' :) बाकी फ्रेंच लोक्स नि फ्रेंच भाषेला टेम्पोत बसवायलाच हवंय. लिहीतात काय नि बोलतात काय. बोबडी वळते राव. आधी शिकलो असतो तर कदाचित जमलं असतं.

In reply to by प्यारे१

लिहीतात काय नि बोलतात काय. बोबडी वळते राव.
फ्रेंचचे उच्चाराचे नियम इंग्लिशपेक्षा निराळे आहेत. ते एकदा समजले की बरंच फ्रेंच सहज वाचता येतं ... अगदी अर्थ समजला नाही तरीही. (पण उच्चार समजला म्हणून फ्रेंच स्पेलिंग लिहीता येईल का हे मला माहित नाही; जे इंग्लिशबद्दल मला म्हणता येतं.) फ्रेंचमधल्या 'र'चा उच्चार किती मराठी लोकांना जमेल याबद्दल मला बरंच कुतूहल आहे. मला तरी तो जमत नाही. --- केदार-मिसळपाव -
इथे आपली मराठी सांभाळायची/वाढवायची सोडुन इतर भाषांच्या शुद्धतेची काळजी आपणच का घ्यावी. त्यांनी योग चे योगा केले, आपणही योगा असेच म्हणतोय.
माझ्या कागदोपत्री नावाची आणि टोपणनावांची उच्चार आणि लेखन दोन्हींमध्ये वाट लावणारे उच्चशिक्षित मराठी लोक मला लहानपणापासून माहित आहेत. लोकांचे उच्चार आणि शुद्धलेखन सुधारण्यात घालवण्याइतपत वेळ माझ्याकडे नाही याची जाणीव मला लहानपणापासूनच झाली. त्यामुळे परदेशी लोकांनासुद्धा मी त्यांना झेपेल तोच उच्चार सांगते. ज्यांना करायचंय त्यांनी करावं. फक्त दुसरा कोणी अमक्या पद्धतीने वागतो म्हणून मी ते करत नाही. किंवा दुसरा कोणी आवडीने मला नावडणारी गोष्ट खात असेल तर मी त्यांना अडवायलाही जात नाही. माझं मराठी (हिंदी, इंग्लिश, फ्रेंच) फार चांगलं आहे अशातला भाग नाही; निदान आहे त्यापेक्षा सुधारण्याचा प्रयत्न करते हे माझ्यापुरतं मला पुरेसं आहे.

In reply to by बॅटमॅन

'पगार' हा शब्द पोर्तुगिज आहे? माझ्या ऐकिव माहिती नुसार हा उर्दूतून आला आहे. पूर्वी श्रीमंतांच्या पदरी 'आश्रीत' असायचे त्यांना 'हातखर्चा'साठी जे पैसे दिले जायचे त्याला 'पगार' म्हणत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पगार हा शब्द पोर्तुगीज मधून आलाय असे वाचले आहे खरे.तपासून पहायला पाहिजे. बाकी उर्दू ही मिश्रभाषा आहे, ( मेनली फारसी + काही अरबी शब्द इ.इ.) + (हिंदीचे मध्ययुगीन रूप) = उर्दू. त्यामुळे एखादा शब्द उर्दूतून आला याचा अर्थ त्याचे मूळ अरबी, फारसी नैतर तुर्की असते. या तीन भाषांमध्ये चेकवले पाहिजे. अरबीचं तुम्ही जाणताच जे काय असेल ते, बाकीचं जमेल तसं पाहतो.

In reply to by बॅटमॅन

बाहेरचे शब्द उसने घ्यायचेच नाही असे अजिबातच म्हणणे नसावे कोणाचेच. पण बुद्धीमांद्यामुळे स्वभाषेत वा इतर अनेक भाषांमध्ये चपखल, समर्पक आणि सुंदर शब्द असूनही फक्त इंग्रजी/हिंदीतले घासून गुळगुळीत झालेले शब्द वापरणे हा प्रकार फार वाईट आहे. वरती विक्षिप्तबाईंनी उच्चाराप्रमाणे लिहीणे वगैरे विचार मांडले आहेत, तितकं दक्ष पाहिजे प्रत्येक बाबतीत. साला प्रगत होणे म्हणजे मेंदूचा अधिक वापर करणे, कमी नाही.

१) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्‍याची 'कीव' कराविशी वाटते. >>> make a line किंवा stand in line असते इंग्रजीमधे, त्यातूनच हा प्रकार मराठीमधे आला असावा. लायनी वगैरे अर्धवट ज्ञानातून होणारे प्रकार आहेत. आपला मुद्दा इतर लोकांच्या दृष्टीने पहा बरं, स्वच्छ भाषेच्या मागे लागलेल्या इंग्रजासमोर उभे राहून आपण कितीही छान इंग्रजी बोलायचा प्रयत्न केला तरी एका मर्यादेनंतर आपल्या इंग्रजीने त्यालाही फेफरे येईल. :) २) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट' >>> वीजप्रवाहासाठी लाईट शब्द वापरलेला मी तरी (सुदैवाने) ऐकलेला नाही. लाईट गेले म्हणतात ते दिवे गेले या अनुषंगाने असते. आणि दिवे गेले म्हणजे अर्थातच वीज गेली असेल या अर्थाने ते येत असावे. ३) Bicycle करिता 'सायकल' >>> Bicycle हा सायकलचा एक उपप्रकार आहे, शब्द मोठा होतो म्हणून तो बारीक करण्याचा प्रयत्न यापलीकडे त्यात फार चुकीचे काही नाही. मोटरसायकल म्हणता की बाईक? ४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी. >>> हा थोडं विचित्र आहे खरं. पण बहुतेक जुन्या काळात ही विशेषणे लग्न झालेल्या स्त्री पुरुषांसाठी वापरली जात. खास करुन मिसेस हे लग्न झालेल्या स्त्री साठी होते. त्यामानाने मिस्टर हे जास्त Generically वापरले जायचे. "हे माझे पती" म्हणणे केव्हाही योग्य. आजच्या काळात hubby जास्त चालते बरं का. ५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !! >>> हो ना, ब्रँडनेमचं क्रियापद कसं होईल बरं? आता मरीअम-वेबस्टर गुगल किंवा झेरॉक्स ला क्रियापद म्हणत असली म्हणून काय झालं? ६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं. >>> मागे एकदा एक वाक्य वाचलं होतं Every bun is bread but not every bread is bun. त्यातलाच प्रकार. ७) Cinema/Movie साठी 'पिक्चर' >>> Movie म्हणजे Motion Pictures. सुरुवातीला Motion pictures जास्त प्रचलित असावा ज्यामुळे त्याचे छोटे रुप पिक्चर प्रचलित झाले असावे. सध्या मूव्ही हा शब्द जास्त ऐकायला मिळतो. इतरांनी लिहील्याप्रमाणे काही प्रमाणात न्युनगंड, काही प्रमाणात साहेबाची भाषा म्हणजे भारी असल्या प्रकारामुळे गमती घडतात. पण सगळ्याच शब्दांमागे हे कारण असते असं नाही. पम्चर, शाक अपसर हे अज्ञानातून होतं (मराठी शब्द माहिती नाही आणि इंग्रजी येत नाही). तर बर्‍याच शब्दांचे अपभ्रंश झालेले असतात. हे एका दिवसात होत नाही तर शब्दाचा अपभ्रंश व्हायला, तो प्रचलित व्हायला वेळ लागतो. तोवर त्याचा वापर गमतीशीर वाटू शकतो. जसे की फारसी भाषेतून आलेले शब्द... जेव्हा ते मराठीमधे घुसले तेव्हा गमतीदारच वाटले असतील. कित्येक शब्दांचे तर अर्थसुद्धा बदललेत मराठीत. त्यामुळे मी याचा फारसा त्रास करुन घेत नाही किंवा किव वगैरे सुद्धा करत नाही. आपणही असेच नकळत कुणाला तरी पिडत असूच की... मग कशाला लय लोड घेताय, जौंद्या की. :)

In reply to by थॉर माणूस

२) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट' >>> वीजप्रवाहासाठी लाईट शब्द वापरलेला मी तरी (सुदैवाने) ऐकलेला नाही. लाईट गेले म्हणतात ते दिवे गेले या अनुषंगाने असते. आणि दिवे गेले म्हणजे अर्थातच वीज गेली असेल या अर्थाने ते येत असावे.
तसं असेल तर "लाईट गेली आहे म्हणून मिक्सर चालवू शकत नाही" अशी काही परिस्थिती तुमच्याकडे निर्माण होत नसेलच.

In reply to by मराठी कथालेखक

लाईट गेले म्हणतात ते दिवे गेले या अनुषंगाने असते. आणि दिवे गेले म्हणजे अर्थातच वीज गेली असेल या अर्थाने ते येत असावे.
:)

In reply to by थॉर माणूस

वीजप्रवाहासाठी लाईट शब्द वापरलेला मी तरी (सुदैवाने) ऐकलेला नाही. >> लाईट गेले ना, बघ पंखा फिरत नाहीये. टी. व्ही. सुरू करून बघ लाईट आलीय का ते. असे संवाद कधीच नाही ऐकले?

In reply to by सोनू

ते वीज गेली या अनुषंगाने येते सोनु... वीजप्रवाह गेला या पद्धतीने लाईट हा शब्द आलेला मी तरी पाहिलेला नाही असं म्हणायचं होतं मला, येतंय का लक्षात? घरात वीजप्रवाह गेला वगैरे म्हणता का तुम्ही लोक? वीज गेली असेच म्हणता ना? पुर्वी लोकांसाठी पंखे, टीव्ही, मिक्सर (आता ह्याला काय म्हणू? मिक्सर, ग्राईंडर, ब्लेंडर की फूड प्रोसेसर?) वगैरे चैनीच्या गोष्टी होत्या. घरात वीजेवर चालणारे उपकरण म्हणजे बल्ब आणि ट्यूबलाईट. वीज गेली हे कळण्याचा सोपा उपाय म्हणजे लाईट चालते का ते पहाणे त्यामुळे लाईट गेली अर्थात वीज गेली असे समीकरण रूढ झाले. पण एवढ्यावरून वीज गेली असे ठरवत नसत, लगेच शेजारच्यांना विचारलं जाई, "लाईट आहेत का हो तुमच्याकडे?". :) आजकाल हे कमी झालं असावं बहुतेक. अर्थात शुद्ध आणि सात्विक भाषेचा हट्टच धरायचा असेल तर आमची काही हरकत नाही, पण उगाच आपल्या लेखी अशुद्ध बोलणार्‍यांची कीव करायची गरज नाही इतकेच मला मराठी कथालेखक साहेबांना सांगायचे होते. असो, चालू द्या...

In reply to by थॉर माणूस

तुमची लाईट गेली का?असे आमच्याकडे नेहमीच विचारणा होते शेजाऱ्यांकडून. कारण कधी कधी फक्त एखाद्या घरातीलच विद्युत प्रवाह खंडित झालेला असतो. पण एका अमराठी शेजाऱ्याकडून आपका करंट है क्या? अशी विचारणा झाली आणि माझ्या मेंदूलाच करंट लागला.

Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्‍याची 'कीव' कराविशी वाटते.
हे तरी ठीक आहे हो ... आमचे एक मित्र पॅन्ट चे अनेक वचन पॅन्टी असे करायचे अन केवढा घोळ व्हायचा काय सांगु =))

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि हे घ्या पावाच्या अधिक अभ्यासा करिता http://pt.wikipedia.org/wiki/P%C3%A3o बाकी ह्या वरुन परेश रावलचा अप्रतिम डायलॉग आठवला " ये मेरे पाव है =))

बाकी, इंग्रजी शब्दांचे अपभ्रंश होतात म्हणून कातावणार्‍यांना, बहुतेक भाषांतील बहुतेक शब्द असेच तयार झालेत हे माहिती आहे काय? अगदी मराठेशाहीतही आपण इंग्रजी नावांची कसली मस्त मोडतोड केलीय याचा विदा रियासतीच्या खंड ५ मध्ये आहे. उदा. मॉस्टिन, ऑस्टिन- माष्टिन, आष्टिन. एल्फिन्स्टन- अल्पिष्टन. मॅक्फर्सन- मेघफास. सार्टोरियस- सरताऊस. रॉस लँबर्ट- रासलंपट =)) =)) =)) इंग्रजीतही असे कैक शब्द सापडतील. म्यांगो हा शब्द तेलुगु/तमिऴ मधल्या मंगई या शब्दाचा अपभ्रंश आहे, मुलिगॉटॉनी हा शब्द मिळगु तण्णीर चा अपभ्रंश आहे. माँगूज़ हा मराठीतल्या मुंगुसचा अपभ्रंश आहे. खुद्द संस्कृत शब्दांचे अपभ्रंश पाहिले तर अख्खी मराठी जवळपास त्यांनीच भरलेली आहे. मग विंग्रजीच्या तथाकथित शुद्धतेबद्दल इतके गळे का म्हणून काढायचे ते समजत नाही. ना ती कुणाची मातृभाषा, ना अजून काही. गेल्या २०० वर्षांच्या फ्याडपायी आपल्या मातृभाषेला बोल का लावायचा ते समजत नाही. असो.

अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी. >> अजून सरळसोटपणे माझा नवरा अथवा माझी बायको म्हणावं की! एवढं काये त्यात!

In reply to by केदार-मिसळपाव

व्युत्पत्तिकोशात बायको हा शब्द तुर्कीपासून आला असेल असे म्हणताना एक प्रश्नचिन्ह दिलेय बहुधा. अन सद्यकालीन तुर्की भाषेत तरी बायको या अर्थी 'बायको' शब्दासदृश शब्द दिसत नाहीये. पाहिले पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

मला एका तुर्कीश मुलीने सांगितला आहे. तिला बाबा, बायको, बाझार इत्यादि शब्दाचा अर्थ कळत होता. पण "आई" ह्या शब्दाचा उगम मला मात्र अजुनही माहित नाही.

In reply to by केदार-मिसळपाव

ह्या तुर्की शब्दाचा मुख्य अर्थ 'स्त्री' आणि संदर्भाने पत्नी असा होतो.

In reply to by नंदन

म्हणजे बायन वरुन बाई आला असेही असु शकते.

अगदीच सहमत आहे. पिक्चर असा चुकीचा शब्द कशाला वापरायचा? आम्ही पिच्चर म्हणतो. बायसिकलला आम्ही सायकल म्हणायचो पण आमची मुले बाईक म्हणातात. आम्हाला बाईक म्हंजे मोटरसायकल असे म्हाईत होते. अशे चुकीचे शब्द वाप्रूच नये असे सुचिवते.

वाघ म्हणलं तरी खातो अन वाघोबा म्हणलं तरी खातो च्या धर्तीवर नवीन म्हण आहे नवरा म्हणलं तरी घाबरतो अन मिस्टर म्हणलं तरी घाबरतो *acute*

डायवर = ड्रायव्हर किन्नर = क्लीनर मोसम = मोशन :)

In reply to by कपिलमुनी

काही विंग्रजी शब्दांना (कायमचे ;) ..) मराठी रूप दिलेला... हा आमचा- रायगड मराठी विभाग (मूळ शब्द ओळखा..पण त्यासाठी मूळ- ओळ- खा! http://www.easyfreesmileys.com/smileys/grin-0003.gif ) डी...म पडताय ना लाइट?... बल - बदला(य)ला झाला हो...त्याचा! मो..टार चालत नाय??? फेस .. उडाला असल...बग!!!! किती पेप्श्या खाशील मेल्या...सर्दी ह्वैल नाय तं काय!? शिग्रेटी कमी फुक हां... मेल्यां लगिन झाला ना इतक्यात! ===================== क्रमशः ;)

आमच्या सांगलीकडे दनलाप म्हणजे दणकट .. पूर्वी Dunlop Tyres फार चांगले चालायचे त्यामुळे हा शब्द आला .. दनलाप चप्पल हाये गडी लै दनलाप.. :)

आमच्या सांगलीकडे दनलाप म्हणजे दणकट .. पूर्वी Dunlop Tyres फार चांगले चालायचे त्यामुळे हा शब्द आला .. दनलाप चप्पल हाये गडी लै दनलाप :)

अरे, अरे, अरे... अडवा घोडं, थांबा थोडं. सद्या इंग्लिशमध्ये आहेत ते सगळे शब्द मूळचे इंग्लिशमधले आहेत हा समज फर्फार चुकीचा असू शकतो. मूळ इंग्लिशशी बर्‍यापैकी नाते सांगू शकेल अशी जगातली एकुलती एक भाषा वेल्समध्ये मृतप्राय होत असलेली एक अत्यल्पसंख्य उपभाषा आहे. चारशे वर्षांपूर्वीपर्यंत खुद्द इंग्लिश राजेरजवाडे इंग्लिश भाषा वापरणे गावंढळपणाचे लक्षण समजत असत आणि इंग्लंडचा सगळा राज्यकारभार फ्रेंचमधून चालत असे. वसाहतीच्या कालखंडात आणि नंतरही इंग्लिशने भारतिय भाषांकडून अनेक शब्द उचलले आहेत. योगा (योग नै बरं का), कर्मा (कर्म माझे !), गुरु, इ शब्द (विदेशी आणि भारतिय) गोरे इंग्लिशमध्ये कित्ती कित्ती कौतुकाने वापरतात हे काय सांगायला पाहिजे आहे काय? ;) इंग्रजांनी जगभरातून केवळ आर्थिक संपत्तीच लुटली असे नाही तर अगदी आफ्रिकन भाषांसह अनेक भाषांची शब्दसंपत्ती लुटून नेऊन इंग्लिशला शब्दसंपन्न केले आहे. येथे इंग्लिश्ने आत्मसात केलेल्या १४६ भाषांमधिल शेकडो शब्दांची अनुक्रमणिकेसह (अल्फाबेटीकल) यादी सापडेल. डिक्शनरी.कॉम प्रमाणे सद्याच्या इंग्लिशमध्ये ८०% (होय, ऐशी टक्के) शब्द उसनवार घेतलेले आहेत. शास्त्रिय परिभाषा जमेस धरली तर ते प्रमाण ९०% पर्यंत वर जाउ शकेल. यामुळे ला इंग्लिशला उसनवार भाषा (बॉरोव्ड लँग्वेज) म्हटले जाते. इंग्लिशची ही उसनवारी अजूनही सतत चालू आहे *. मात्र संवादासाठी जगात सर्वात जास्त वापरली वापरली जाणारी भाषा असल्याने हल्ली ती शब्द उसने घेण्याबरोबरच जगभरच्या भाषांना शब्द उसने देण्याचे काम प्राधान्याने करते आहे. ऑ कोणत्याही दोन भाषांमधिल देवाणघेवाणीचा आवाका आणि त्याच्या प्रवाहाची दिशा त्या भाषांमु़ळे होणार्‍या तौलनिक आर्थिक, सामाजिक व राजकिय फायद्यांवर अबलंबून असतो... त्यांत भाषाशास्त्रींच्या अथवा भाषाभिमान्यांच्या काळजीने फारसा बदल पडत नाही, असाच अनुभव आहे. तेव्हा, प्रयत्न कौतुकास्पद आहे पण, भौतीच दिलपे मत लेना भाय. ये सब पापी पेटका सवाल है ना ;) ====== * : हा छोटा दुवा मुळातूनच वाचावा. कारण, कुछ धक्के अच्छे होते है । नक्की मूळ इंग्लिश वाटणारे शब्द प्रत्यक्षात कोठून आले हे सत्य त्रिफळाचित करून जाते ('विकेट घेऊन जाते' असे म्हणण्याची इच्छा मोठ्या कष्टाने आवरली आहे हे नम्रतेने नमूद करत आहे ;) .

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मूळ भाषांतून इंग्लिश्मध्ये येताना बर्‍याच शब्दांची बर्‍यापैकी मोडतोड झालेली आहे... हेही नमूद करण्याजोगे आहे. वेंजॉय ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

खूप शब्द आहेत की इंग्रजीने घेतलेले.. मला फक्त juggernaut - जगन्नाथ (पुरीच्या रथ यात्रेवरून आलेला) शब्द माहीत होता. तो रथ ओढण्यामुळे जो प्रचंड जोर - momentum येतो त्याचा संदर्भ इंग्रजांनी घेतला होता. Guru / Pandit हे आता बर्‍यापैकी रुळले आहेत आणि बर्‍याच आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत सर्रास दिसतात. पण तरीही भाषेचे मूळ व्याकरण चांगले सांभाळले आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एखाद्या भाषेने दुसर्या भाषेतून शब्द उसने घेतले तर त्याला लुटून नेणे म्हणणे कितपत योग्य आहे? असे केल्याने मूळ भाषेतले ते शब्द नष्ट होतात का? मला नाही वाटत. इंग्रजीने मराठीतून मुंगुस नेले म्हणून मराठी माणसे तो प्राणी दिसताच डोके खाजवू लागतात का की माझ्या पणजोबांपर्यंत ह्याला काय म्हणतात ते ठाऊक होते पण शिंचे इंग्रज आल्यापासून तो शब्दच गायब झाला आहे? असो. पण इंग्रजीचे पावित्र्य जपण्याची अनाठायी उठाठेव उच्चभ्रू भारतीयांनी थोडी कमी करावी. एखाद्या सासूने सुनेकडे घराण्याचे कुळाचार जपण्याची जबाबदारी द्यावी आणि जबाबदार सुनेने ती अगदी डोळ्यात तेल घालून पार पाडावी तसे इंग्रजांनी आपल्याला इंग्रजी भाषा दिली आहे आणि ती कसोशीने जपली पाहिजे असे मानणे हे एक खूळ आहे. ते सोडावे.

In reply to by हुप्प्या

"लुटून नेणे" हा वसाहतवादाच्या संदर्भाबरोबर सहज आलेला शब्दप्रयोग होता. शिवाय सगळी चर्चा जरा उपरोध्/विनोदाच्या अंगाने चालली आहे. माझ्याही प्रतिसादात बर्‍याच स्मायल्या आहेत :) शिवाय, मी कधी म्हटले आहे की इंग्लिश्ची मोडतोड करू नये ? किंबहुना, शब्द एका भाषेतून जाताना बदलणे हे दोन भाषांतील फरकामुळे बर्‍याचदा होते. तुमच्या प्रतिसादाच्या 'एक्झॅक्ट सेम' वेळेवर दिलेला माझा हा दुसरा प्रतिसाद वाचला तर माझे मत अजून 'क्लियर' होईल ;) तेव्हा मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे, दिलपे मत लो, वेंजॉय द धागा ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

...तुमच्या प्रतिसादाच्या 'एक्झॅक्ट सेम' वेळेवर दिलेला माझा हा दुसरा प्रतिसाद वाचला तर माझे मत अजून 'क्लियर' होईल. (मिपाच्या चालू-बंद मधे वरची लिंक माझ्या प्रतिसादात मागे राहून गेली... ती येथे आहे.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शब्द लुटणे ह्याविषयीचे स्पष्टीकरण मान्य. भाषा जपण्याबद्दलचा सल्ला तुम्हाला नव्हता. लेखाच्या लेखकाला होता. अमुक एका शब्दाऐवजी तमुक शब्द वापरला तोही इंग्रजीत म्हणून त्याची कीव करण्याची भाषा लेखक करतो आहे हे जरा मनोरंजक वाटले. इंग्रजीचे जन्मस्थान असणारे इंग्लंड, तिथलेही लोक इंग्रजीच्या अधोगतीबद्दल इतके दक्ष नसतील असे काही वेळा वाटते. बाटगे जास्त कडवे असतात अशा अर्थाची एक म्हण आठवली. पण निदान आठवडाभर तरी ती तशीच्या तशी उद्धृत करणे उचित नाही. ;-).

In reply to by हुप्प्या

इंग्रजीचे जन्मस्थान असणारे इंग्लंड, तिथलेही लोक इंग्रजीच्या अधोगतीबद्दल इतके दक्ष नसतील असे काही वेळा वाटते. ते इतके दक्ष अजिबात नाहीत हे स्वानुभावावरून सांगू शकतो... काहिंचे इंग्लिश उच्चार ऐकून इंग्लंडच्या राणीला चक्कर येईल... अर्थात "क्विन्स इंग्लिश" बोलणार्‍यांचे प्रमाण मराठी माणसांत पुणेरी मराठी बोलणार्‍यांइतकेच असावे, कारण भाषा दर २० किलोमीटरवर बदलते या नियमाला इंग्लिशही अपवाद नाही.

अमेरिकेत रांग ह्या अर्थी क्यू हा शब्द सहसा वापरत नाहीत. क्यू हा शब्द त्या अर्थाने ब्रिटनमधे वापरला जातो. अर्थाने तिथे लाईन हा शब्दच वापरला जातो. कुणी वापरला तर अमेरिकन लोक गोंधळात पडतात. क्यू हा बिलियर्ड्स वा पूल खेळताना टेबलावरील चेंडूला ढकलायची काठी ह्या अर्थी जास्त प्रचलित आहे. अर्थात त्याचे स्पेलिंग वेगळे आहे पण बोलताना स्पेलिंगपेक्षा उच्चार जास्त महत्त्वाचा असतो. तस्मात, क्यू न म्हणता लाईन म्हणणार्‍यांची कीव करणार असाल तर तमाम अमेरिकन लोकांची कीव करण्याची तयारी ठेवा!

गोरा साहेब तेच करतो हो, 'मुंबई'चं 'बॉम्बे' करतो, 'खडकी'चं 'किरकी' करतो, 'कोलकाता'चं 'कॅलकत्ता' करतो, 'हरी'चं 'हॅरी' करतो, 'योग'चं 'योगा' करतो, वगैरे वगैर... आणि आम्ही कौतूक करतो *sad* मग, जरा करूद्याना आपल्या लोकांना विंग्लिश्ची तोडफोड... तेवढाच आपला रिव्हेंज ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पारींचं पॅरिस करतो, फिरेन्झचं फ्लॉरेन्स करतो, रोमाचं रोम करतो, म्युनशनंचं म्युनिक नाहीतर म्युनिच करतो, क्योल्नचं कलोन करतो.. यादी न संपणारी आहे..

आम्ही कि नाही इथे 'वालमार्टात' जाउन मग मुलांनी खुपच दंगा केला की 'पार्कात' जातो. आणि की नाही आम्ही तो 'मल्टी बिलियन'डॉलर्स खर्चुन केलेला 'अवतार'च बघितला. तर लेकीने मला थोडं सुधारवायचा प्रयत्न केला..'अवतार' नाही काय्...'अ‍ॅवटार'..मग बाकी आम्ही माय मराठीतच कान उघडणी केली...गधडे, तुझ्या अ‍ॅवटार वाल्यांच्या नानाची टांग्.शाळेमध्ये अधुन मधुन 'पजामा डे' असतो, तेव्हा आपला रात्री झोपयचा पायजमा (हा नक्कि मुळ मराठी शब्द नाहीये, जाणकार माहिती देतीलच) घालुन पाठवतो. बाकी प्रतिक्रिया नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण. -मयुरा.

In reply to by मयुरा गुप्ते

अवतार' नाही काय्...'अ‍ॅवटार'..मग बाकी आम्ही माय मराठीतच कान उघडणी केली...गधडे, तुझ्या अ‍ॅवटार वाल्यांच्या नानाची टांग्.
हाण तेजायला...जबरीच ओ =))

In reply to by मयुरा गुप्ते

हा पोषाख बायजाबा नावाच्या स्त्री ने शिवला होता. तो ईंग्रजांना आवडला नी त्यांनी त्याचे पायजामा केले. हा.का.ना.का.

>> त्याला हास्पिटलात न्हेलंत. >> तिजी कालच डिलेव्री झाली. >> आला म्हॉटा झ्याटमीन शिकवायला. >> शील्याब टाकून घ्या. >> काल रात्री लाईट गेली व्हती. >> बलप लय डीम झालाय, बदलून टाका. नायतं टुबंच लावा ना. >> ए पॉरा, त्या जांग्यावर प्यांड घाल. तसाच फिरु नुको. >> मना बुलू रंगाचा शरट हावा. >> मना फुल्प्यांड पायजे. मी हाप्प्यांड नाय घालनार जा. >> ये पॉरा, ज्याम धर नाय तं कुटरवरना पडशील. >> ट्याक्टर घ्यातलाय आज दोन तासांना. नांगार काय परवाडताय. >> ती चक्की विलेक्टीक वर चालते. क्रमशः ;)

In reply to by धन्या

आला म्हॉटा झ्याटमीन शिकवायला
आमच्या गावाकडच्या भाषेत अतिशहाण्या माणसाला थोड्याफार अश्याच शब्दांत सुनवतात - ह्यो आयलो मोठो झाटलीमन...गप बह.