Skip to main content

मंत्रयोग - जपयोग

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 17/07/2014 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
मंत्रयोग - जपयोग शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात. जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय. २- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो. ३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही. ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता. आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो. जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 71092
प्रतिक्रिया 434

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद गोडबोले

अवश्य. पण याचा बादरायण संबंध सिलेक्टिव्ह रीडिंगशी लावण्यात काही हशील नाही, कारण दोहोंत क्वालिटेटिव्ह फरक आहे. इथे फक्त निरुपद्रवी उपासना आहे, तर तिकडे जाणूनबुजून केलेला विपर्यास आणि अंततोगत्वा चिखलफेक आहे.

In reply to by बॅटमॅन

निरुपद्रवी कशी ? धर्माचे नियम न पाळता केली उपासना(जे की बर्‍याच वेळा ढोंग / दांभिकता असते) ही धर्माचे नियम पाळुन उपासना करणार्‍यांसाठी उपद्रवच असतो !

In reply to by प्रसाद गोडबोले

चार ओळीचा मंत्र म्हटल्याने नक्की कुणाला आणि कसला उपद्रव होतो ते मला अजूनही कळालेलं नाही. पण अशा वांझोट्या चर्चांत अडकून पडलेल्या समाजावर मूठभर अल्पसंख्य परकीयांनी कसं काय राज्य केलं असेल ते उमगलं. एकीकडे असली एक्स्क्लूझिव्हिटी दाखवायची आणि दुसरीकडं अन्य धर्मीयांच्या धर्मप्रसाराला लोक बळी पडतात म्हणून ओरडायचं! स्वतःच दारे बंद करून घेतली तर लोक घरात येत नैत म्हणून ओरडण्यापैकी प्रकार आहे हा. याला काहीच अर्थ नाही.

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला काय वाटतं .... इतर धर्मात असे विधीनिषेध डू & डोन्ट्स नसतात ? की जे असतात ते फाट्यावर मारायचे स्वातंत्य्र असते ? की जे लोक असे फाट्यावर मारतात त्यांना खुप मोठ्ठा आदर मिळतो ?

In reply to by प्रसाद गोडबोले

या असल्या बिनबुडाच्या विधीनिषेधांमुळेच सर्व धर्म गुंडाळून ठेवायची गरज आहे.. त्यापेक्षा तुम्ही आपले धर्म म्हणजे धारण करणे किंवा एक जीवनपद्धती या सेफ व्याख्येवर या मग काय कोणालाच प्रॉब्लेम नसतो !! कारण तुमचे हे असले विधीनिषेध म्हणजे हिंदु धर्म नव्हेच असे सांगणारे अनेक हिंदु धर्माभिमानी भेटतील.. :-)

In reply to by प्रसाद गोडबोले

इतर धर्मांत काहीही का असेना, एंड रिझल्ट हाच आहे की आपल्याच लोकांना स्वीकारायला हिंदू म्हणवणारे कुचकुचतात. त्यामुळे असल्या प्रथा तरी बिनकामाच्या आहेत. अवघा हिंदू एक इ.इ. बाता मारणार्‍यांना जर साधा एक मंत्र इतरांनी म्हटल्यामुळे त्रास होत असेल तर घंट्याचं एकीकरण होणारे. आणि बाकी धर्मांत काय होतं याची फिकीर मी का करावी हा एक वाईड बॉल सोडून देत आहे. चालुद्या.

In reply to by बॅटमॅन

एंड रिझल्ट हाच आहे की आपल्याच लोकांना स्वीकारायला हिंदू म्हणवणारे कुचकुचतात.
>>> मुळीच नाही ... आधी म्हणल्याप्रमाणे पुराणोक्त मंत्र आहेतच की !
त्यामुळे असल्या प्रथा तरी बिनकामाच्या आहेत. अवघा हिंदू एक इ.इ. बाता मारणार्‍यांना जर साधा एक मंत्र इतरांनी म्हटल्यामुळे त्रास होत असेल तर घंट्याचं एकीकरण होणारे.
मंत्र म्हणल्याने कोणाला त्रास कशाला होतोय ? मी वरच म्हणले आहे की हिंदु धर्म फ्री आहे ...ज्याला जे हवे त्याने ते करावे ... कोणी अडवणारे नाहीये ... मी मुद्दा इतकाच मांडतोय की जे विधीनिषेध पाळुन हे सर्व करतात त्यांच्या साठी हा भोंदुपणा आहे बस्स इतकेच !!
आणि बाकी धर्मांत काय होतं याची फिकीर मी का करावी
>>> कारण तुम्हीच तर म्हणालात ना की असल्या विधीनिषेधांमुळे धर्मांतर होतात .... मी इतकच दाखवुन देतोय की असले विधीनिषेध सर्वच धर्मात असतात !

In reply to by प्रसाद गोडबोले

आधी म्हणल्याप्रमाणे पुराणोक्त मंत्र आहेतच की !
वेदोक्त आणि पुराणोक्त मंत्र कुणाला पाहिजेत ते ते त्याप्रमाणे घेतील, तुम्ही ठरवायचं काम नाही. हा फालतूचा अहंकार बिनबुडाचा आहे, कालबाह्य आहे. हे ठरवणारे तुम्ही कोण? ग्रंथांतले सगळेच्या सगळे आहे तस्से सर्व काळी घ्यायचे हा वेडपटपणा कशासाठी? हिंदू धर्मही काय सर्वकाळ एकसारखाच होता काय?
विधीनिषेध पाळुन हे सर्व करतात त्यांच्या साठी हा भोंदुपणा आहे बस्स इतकेच !!
तथाकथित विधिनिषेध म्हणजे बर्‍याचदा निव्वळ कर्मकांड असते, बस्स इतकेच! त्याला बाकीच्यांच्या दृष्टीने काडीचेही महत्त्व नाही. नुसता दंभ असतो कैकदा..
कारण तुम्हीच तर म्हणालात ना की असल्या विधीनिषेधांमुळे धर्मांतर होतात .... मी इतकच दाखवुन देतोय की असले विधीनिषेध सर्वच धर्मात असतात !
हा हा हा. अन्य धर्मांतील विधिनिषेधाचा नकार मी कधीच केलेला नाही, फक्त विधिनिषेध हिंदू धर्माला कसे भोवले हे सांगतो आहे. अन्य धर्मांतील विधिनिषेध कसे का असेनात. आपल्याला काय भोवले हे पाहण्याची इच्छाच नसणे ही सोयीस्कर आत्मविस्मृती झाली. याचा झाला तर तोटाच होईल. बसा मग आपापल्या पोथ्यापुराणांत, जगाशी याचमुळे संपर्क तुटतो आणि परकीय येऊन राज्य करून जातात. सुदैवाने हे मत अलीकडे बहुमतात नाही त्यामुळे चालूदे.

In reply to by प्रसाद गोडबोले

कन्क्लुडींग कमेन्ट फ्रॉम माय साईड : द्विजांनी वेदोक्त मंत्र म्हणले अन इतरांनी पुराणोक्त म्हणले तर त्यात काही उच्च नीच नाही ... आमच्या साठी वेद आणि पुराण दोन्हीही श्रेश्ठच आहेत ! ज्यांना जे म्हणायचेत त्यांनी ते म्हणावेत ... पण जे विधीनिषेध पाळुन धर्माचरण करतील ते विधी निषेध न पाळता धर्माचरण करणार्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत ( हे वैयक्तिक मत आहे, तुमच्यालेखी फाट्यावर मारणारे श्रेष्ठ आणि नियम पाळणारे कनिष्ठ असे असु शकेल , त्याला कोणाचीच हरकत नाही , हिंदु धर्मात वाट्टेल ते स्वातंत्र्य आहे ज्याला जे हवे त्याने ते मत बनवावे ) ही माझी कन्क्लुडींग कमेन्ट ! तुमचा प्रतिसाद सविस्तर पणे वाचुन , कधी तरी कट्ट्याला चर्चा करु . बाकी नेफ़ळेरावांना ह्या निमित्ताने वेदातील मंत्र म्हणण्याची इच्छा झाली ह्या बद्दल आनंद व्यक्त करुन मी माझे चार शब्द संपवतो *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

द्विजांनी वेदोक्त मंत्र म्हणले अन इतरांनी पुराणोक्त म्हणले तर त्यात काही उच्च नीच नाही ... आमच्या साठी वेद आणि पुराण दोन्हीही श्रेश्ठच आहेत !
सर्वांनीच वेदोक्त मंत्र म्हटले तरी त्यात धर्महानी काहीच नाही.
( हे वैयक्तिक मत आहे, तुमच्यालेखी फाट्यावर मारणारे श्रेष्ठ आणि नियम पाळणारे कनिष्ठ असे असु शकेल , त्याला कोणाचीच हरकत नाही , हिंदु धर्मात वाट्टेल ते स्वातंत्र्य आहे ज्याला जे हवे त्याने ते मत बनवावे )
वैयक्तिक मत कसेही असूदे. पण 'माझ्यालेखी फाट्यावर मारणारे श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ' हा हेत्वारोप चुकीचा आहे हे सांगणे अवश्यमेव आहे. माझ्यालेखी दोन्ही लोक सारखेच आहेत. रँकिंग ठरेल ते खर्‍या मनोभावावर. तस्मात वाट्टेल ते स्वातंत्र्य इ.इ. कंडिसेन्शन इथे नको. बाकी चर्चा करूच.

In reply to by बॅटमॅन

प्र.गो.-हे वाचा आणि थोडा विचार करा.
प्र.गो. आपणे जे म्हणतायत,ते येणे प्रमाणे- जर वेदोक्त शिकायचे असेल,तर मुंजिचा संस्कार करुन शिकावे..आणि ते ज्यांना(द्विजांना) धर्मानी अधिकार दिला आहे त्यांनीच. बाकिच्यांना पुराणोक्ताचा अधिकार आहे.आणि या दोन्हीत श्रेष्ठ/कनिष्ठ असे काहिही नाही. तेंव्हा कमी-जास्त पणाचा आरोप करु नका. प्र.गो:- हे सगळं तुंम्ही तुमच्या सद्बुद्धीचा कौल लाऊन म्हणताय.(जे शास्त्राला अजिब्बात मान्य नाही.)प्रत्यक्ष वैदिक(ज्याला सामान्यतः हिंदू संबोधतात.)त्या परंपरेत आणि ती परंपरा चालविणार्‍या आमच्या वैदिक आचार्यांमधे वेद मंत्रांची किंमत आणि स्थान हे पुराणोक्ताच्या वरचं आहे. पुराणोक्त कर्म(कांड) करणे..हे दुय्य्यम आणि हलक्या स्वरुपाचं मानलेलं..आचरलेलं आहे. म्हणजे वेदोक्त श्रीखंडासारखं,तर पुराणोक्त मंजे निव्वळ दही साखर...! दोन्हीतले घटक/कृती तीच पण घटीत आणि दर्जा वेगळा! मंत्रातला अर्थ/आशय तोच पण मान आणि दर्जा वेगळा..असा हा मामला आहे. मला या गोष्टी कळल्यावर मी आमच्यातल्या अनेकांना हा प्रश्न विचारला,पण उत्तरं देताना कोणिही पोथीप्रामाण्या बाहेर गेले नाहीत.(एका अर्थी स्वतःच्या अंगावर येणार,ते पोथीच्या अंगावर ढकललं..इतकच) आता यातही काहि आचार्य/प्रवचनकार/पुरोहित हे वेदमंत्र ऐकण्याचा अधिकार सर्वांना आहे.(शिकण्याचा नव्हे!) अशी भुमिका (अर्थातच शास्त्रा धार-काढून) घेत असतातच.यातल्या काहिंना असं प्रामाणिकपणे वाटत असतं,की आपण म्हणतो तेच शास्त्रातलं मत बरोब्बर..बाकिची लफंगेगिरी/अप्रामाणिकता.उरलेल्यांना ही उघड विषमता आहे हे कळत असतं,पण लोकांनी ऐकावं म्हणून आणि त्यांनाही परंपरेत राहुन हे साध्य करायचं असल्यानी ते शास्त्राधार घेतात. ..असो! माझ्या सारख्यांना सावरकरांची वेदामृत सर्वांना पाजा ही माणुसकीपूर्ण भुमिका पटते...त्यामुळे मी ज्याला वेदमंत्र शिकण्याची पात्रता आहे त्या (हिंदुसमाजातल्या) प्रत्येक स्त्री/पुरुषाला..पौरोहित्य किंवा व्यक्तिगत उपासनेसाठी वेद शिकवले पाहिजेत. या मताचा आहे. आता तुमचा रहाता राहिला मुद्दा विधिनिषेध पाळण्याचा... तर तुंम्हाला हे नम्रपणे सांगतो की धर्मशास्त्रातले विधिनिषेध हे ऐहिक दृष्ट्या निरर्थक आहेत. निर्रर्थक म्हणजे - तुलनाच न करता येण्याच्या स्वरुपाचे. वेदाध्ययना साठी मुंजीचा संस्कार हा विधि करावा लागतो.. हा विधी न करता वेद शिकणे हा निषेध. आता हे निर्रर्थक कसं होतं ते पहा... मुंजीचा संस्कार हा वेदाध्ययनाच्या दालनात शिरायचा गेटपास आहे. पण आपल्या धर्मपरंपरेत हा पास लायकीवर नाही,तर जातिवर मिळतो..ही पहिली विषमता. (आपल्याला CAR शिकायची असेल,तर ज्याला येते त्याला शिकायचा गेटपास म्हणजे लर्निंग लायसनची मुंज करवून मिळते आणि त्यात उत्तीर्ण झाल्यास परमनंट लायसन मिळतं..आणि स्वतःची गाडी चालवायचं उपासना स्वातंत्र्य मिळतं..किंवा चालक या पदावर पौरोहित्याची संधी मिळते....म्हणजे जात पाहिली जात नाही..सरळ लायकता पाहिली जाते.. ही ऐहिक समता[आपल्याच लोकसमुहाकरीता] धर्मात का नाही? याचा विचार करा.) ही विषमता आजही जिवंत आहे. वेदपाठशाळांमधे स्त्रीया वा ब्राम्हणेतरांना प्रवेश नाही.याबद्दल तुंम्हाला काय वाटतं? आता थोडा ग्रंथाधारः- मनु:स्मृती - अध्याय- २ :- श्लोक ३१ ते ४९ हा भाग मुद्दाम वाचा हा खास उपनयनाचे द्विंजांसाठी/त्रैवर्णिकांसाठीचे नियम सांगतो.. हे ही जाती आधारीत आहेत.अध्ययनाकरिता ब्राम्हणापासून पुढे प्रत्येक वर्णाची मुंज ही ४ वर्षांची गॅप ठेऊन सांगणे. कमरे भेवतीच्या मेखला वेगवेगळ्या धाग्यांच्या सांगणे,धरणाचे दंड वेगवेगळ्या वृक्षांचे आणि उंचीचे सांगणे... असा या आमच्या वैदिककॉलेज मधे,,विद्यार्थीसमुहात पाहाता क्षणीच ओळखायला सोप्पा जावा ,असा जन्माधारीत विषमतेचा कडेकोट बंदोबस्त,मनुस्मृतीनी सांगितलेला आहे..विधीनिषेधाच्या नावाखाली हा पाळण्या योग्य मानायचा का? आपल्याला काय वाटतं? शिवाय शूद्रा*ला मुंज करून शिकायला परवानगीच नाही..हे का बरं? पाण्यात उडी मारायला संधीच द्यायची नाही,आणि तू पोहोण्यायोग्य नाहीस असा आधिच निर्वाळा द्यायचा..हे कशाचं लक्षण मानायचं? शिवाय दुसर्‍या धर्मांमधेही असच आहे..ते बघा..!--- असा सल्ला मधुन मधुन तुंम्ही देता. तर तुंम्हाला ते ही समर्थनीय वाटतं काय? आणि मी किंवा माझ्यासारख्या कुणी ही विषमता माझ्याधर्मापुरती दुर/हद्दपार करायची,आणि धर्मात समता आणायची म्हटली तर त्यात काहि चूक आहे...असं तुम्हाला दुसर्‍या धर्मांचा दाखला देऊन सांगावसं का वाटतं? त्यांचं घर राहू दे ना घाणेरडं आपण आपलं स्वच्छ करू..काय हरकत आहे? असं का वाटत नाही? :) *@द्विज/त्रैवर्णिक इत्यादी कलीयुगात नाहीत. कलियुगात दोनच वर्ण अस्तित्वात आहेत. ब्राम्हण व *इतर(शूद्र) हे धर्मशास्त्र्यांचं मत आहे. आणि त्यावरूनच शाहू/वेदोक्त प्रकरण झालं होतं. मग तुंम्ही वादापुरतं सुद्धा द्विज म्हणजे त्रैवर्णिकांच्या कथित अधिकाराचं बाहुलं नाचविण्यात काय अर्थ उरतो??? याचाही विचार करा. ==================== प्र.गो:--- मी वर मांडलेले विचार..मुद्दे हे तुंम्हाला हरवण्यासाठी नाहीत. हे जाता जाता नमूद करु इच्छितो.

In reply to by अत्रुप्त आत्मा

सोनारानेच कान टोचले हे लै झ्याक झालं आत्मूस. प्रतिसाद फार तिरके होताहेत, तस्मात हा प्रतिसात पुन्हा एकदा पेष्टवतो खाली.

In reply to by प्रसाद गोडबोले

सोनार म्हणायला हा सोनार, सोनार नाही असे माझे स्पष्ट मत आहे. इत्यलम्.

In reply to by प्रसाद गोडबोले

तुमच्या सण्णकन थोबाडण्याच्या कृतीला त्याने 'जळी स्थळी काष्ठी पाषाणी' देवच आहे या तत्वाने पुन्हा लाथेने प्रत्युत्तर दिले असते तर आपण काय करणार होतात? विषयवासनेचा स्पर्श होऊ नये यासाठी समर्थ शिधाही पाण्यात धुवायचे व बेचव करुन खायचे, त्याच समर्थगडावर सत्तेसाठी भांडाभांड करणारे दोन रामदासी गट आहेत हे ही निदर्शनास आणुन देतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

या तत्वाने पुन्हा लाथेने प्रत्युत्तर दिले असते तर आपण काय करणार होतात?
नाठाळाचे माथी काठी हाणु ! ह्या हिशेबाने काठी हाणणार होतो ... *biggrin* ते निदर्शनास आणुन देण्याचे गरज नाही हो त्या दोन्ही गटातील वाद निवळलाय (मला परसनली तर दोन्ही गटातील माणसे ओळखतात... दोघांशी चर्चा होत असते माझी त्यामुळे हे १००% खात्रीने सांगु शकतोय मी )... दोन काय ११०० गट स्थापन करण्याचा आमचा मानस आहे !!

In reply to by प्रसाद गोडबोले

रामदासी पंथांमधला वाद तर समर्थांच्या मृत्युनंतर लगेचच सुरु झाला होता. संभाजी राजांनी ह्या संदर्भात सज्जनगडाचा किल्लेदार जिजोजी काटकर ह्याला सक्त ताकीद दिल्याचे अस्सल पत्र उपलब्ध आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

समर्थांनी सज्जनगडावरील काही एक व्यवस्था भानजी व रामाजी गोसावी यांजकडे सुपूर्द केल्या. त्यासाठी छत्रपती शिवाजी आणि तद्नंतर संभाजीराजांनाही त्याला अनुदान चालूच ठेवले. समर्थांच्या मृत्युनंतर मात्र उद्धव गोसाव्याने द्रव्यलोभासाठी कटकटी सुरु केल्या. उद्धवास सज्जनगडाचा किल्लेदार जिजोजी काटकर हा सुद्धा सामील झाला. ह्या गोष्टी कानावर जाताच संभाजीराजांनी २/६/८२ रोजी जिजोजी काटकरास आज्ञापत्र लिहिले. त्याचा मूळ मायना पुढीलप्रमाणे. श्री स्वामी अवतार पूर्ण करण्यागोदरच आज्ञा केली होती. ऐसे असतां उधव गोसावी उगीच द्रव्यलोभास्तव भानजी व रामाजी गोसावी यांसी कटकट करितांत, तुम्ही ही उधव गोसावी यांशी द्रव्ये, पात्रें व वस्त्रे भानजी व रामाजी गोसावी यांकडून श्री स्वामींची देवविली म्हणोन कळू आले. तरी तुम्हांस ऐसे करावयाचे प्रयोजन काये व उधव गोसावी यासी कटकट गरज काये. याउपरि जे जे वस्त्राभाव व द्रव्य उधव गोसावी याचे आधीन तुम्ही करविले ते मागतें भानजी व रामाजी याचे स्वाधीन करणे. उधव गोसावी यांसी कटकट करो न देणे. श्री स्वामीची पहिलीच आज्ञा करणे...वेदमूर्ति दिवाकर गोसावी यांचे विद्यमाने आम्हास श्रुत होऊन होणे तों होईल...या उपरि ये घालमेलीत पडावया प्रयोजन नाही. श्री स्वामीच्या समुदायांसी काडीइतके अंतर पडो न देणे...या पत्राप्रमाणे राहाटी करणें.

In reply to by बॅटमॅन

त्यांच्याकडच्या प्रतीत म्हटले आहे. तुम्हाला काय घेणे देणे. ते म्हणतात ना म्हणजे मग तेच खरे. ते म्हणतात ते सगळे खरेच असते. त्यांनी विजु खोट्यांना हाक मारली तर तेही दुसर्‍या दिवसापासुन विकु खरे म्हणुन ओळखले गेले पाहिजेत. बाकी तुम्हाला अध्याय, मंडल आणि ऋचेमधला फरक तरी कळतो का? आलेत लोकांना वेदामधल्या शंका विचारायला.

In reply to by प्रसाद गोडबोले

स्त्री आणि शुद्रांना वेदोक्ताचा अधिकार नाही (त्यांच्यासाठी पुराणोक्त मंत्र आहेत) म्हणुन स्त्रीयांनी गायत्री मंत्र म्हणाणे निशिध्द आहे !
हेच तुमचेदेखील विचार आहेत का ? म्हणजे तुम्ही या विचारांशी सहमत तसेच समर्थक आहात काय ??

In reply to by बॅटमॅन

मुंज झालेली व्यक्ती हा मंत्र म्हणू शकते आणि प्राचीन काळी स्त्रियांचीही मुंज होत असे.
अनुराधा पौडवालची मुंज झालीय का?

In reply to by चित्रगुप्त

@त्यातून अहोरात्र गायत्री मंत्र गळत *mosking* असतो. >>> *ROFL* हे फॅड साधारण १५ वर्षापूर्वी सुरु झालं. मला माझ्या पेशामुळे या प्रकारची अनेक अ‍ॅप-लावत फिरणारे(विक्रेते) भेटलेले आहेत. ह्या गोष्टी साधारणपणे पेनकिलर किंवा सपोर्टीव्ह मेडिसिन सारख्या आहेत..असं भासवून त्याचं फुल्ल मार्केटींग केलं जात होतं.आता त्याच्या पुढचा टप्पा सुरु झालाय.असो!

In reply to by संजय क्षीरसागर

मी आधीच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे, जप्/नामस्मरण इ. विषयी किंचितही अनुभव नसताना त्याविषयी अत्यंत भ्रामक कल्पना तुमच्या मनात ठासून भरलेल्या आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

हवाबाणांची काय परिस्थिती झालीये पाहिली नाही का? आता तुमचं अनुभव कथन येऊ द्या. इथे बरीच गर्दी झालीये वाटत असेल तर स्वतंत्र पोस्ट टाका. बहुत मजा आएगा.

In reply to by संजय क्षीरसागर

>>> हवाबाणांची काय परिस्थिती झालीये पाहिली नाही का? निव्वळ भ्रामक कल्पनाविलासामुळे तुमची किती भ्रमिष्ट अवस्था झाली आहे ते आधी बघा. >>> आता तुमचं अनुभव कथन येऊ द्या. इथे बरीच गर्दी झालीये वाटत असेल तर स्वतंत्र पोस्ट टाका. बहुत मजा आएगा. माझे अनुभव लिहिले तरी तुम्हाला ते कळणार नाही. तुम्हाला ते समजण्याइतकी तुमची पात्रता नाही. कारण अजून तुमचं मडकं कच्चं आहे. निव्वळ कच्चं नाही तर ते गळकं आणि पालथं पण आहे. त्याऐवजी तुम्ही आपलं अरविंदाख्यान लावा किंवा काहीतरी रूणुझुणु सुरू करा. बहुत मजा आएगा.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी ,तुमचे अनुभव इतरांना न कळण्या इतपत ambiguous आहेत हे मान्य केल्या बद्दल तुमचे आभार. अरविंदाख्यानाचं संक्षि बघतिलच, वाढलेल्या पेट्रोल डीझेल आणि रेल्वेभाड्याच्या किंमतीत कसा 'राष्ट्रवाद' आहे हे सांगण्यासाठी मोदीचालिसा लिहा.कृपा करून आता विषयांतर करु नका..

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> श्रीगुरुजी ,तुमचे अनुभव इतरांना न कळण्या इतपत ambiguous आहेत हे मान्य केल्या बद्दल तुमचे आभार. अरविंदाख्यानाचं संक्षि बघतिलच, वाढलेल्या पेट्रोल डीझेल आणि रेल्वेभाड्याच्या किंमतीत कसा 'राष्ट्रवाद' आहे हे सांगण्यासाठी मोदीचालिसा लिहा.कृपा करून आता विषयांतर करु नका.. तुला कळलंच नाही रे माईसाहेब. परस्पर निष्कर्ष काढून मोकळा झालास. माझे अनुभव अजिबात ambiguous नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

मी परस्पर निष्कर्ष काढतो ,मग तुम्हि काय वैज्ञानिक पद्धती वापरुन निष्कर्ष काढता काय? निष्कर्ष काढण्यासाठी तर्क लागतो ,तुमचे तर तर्काशीस वावडे आहे ,असो.

In reply to by नानासाहेब नेफळे

तू कसला डोंबलाचा तर्क काढतोस रे माईसाहेब. पान, चुना, गायछाप. चारमिनार असली तुझी उदाहरणे. असली प्रतीके वापरून नुसत्या पिचकार्‍या टाकून घाण करत असतोस.

In reply to by चित्रगुप्त

असा प्रतिसाद दिला आहे :
वरच्या नामस्मरण/ जपाबद्दलच्या अत्यंत चुकीच्या कल्पना आहेत. असहमत आहोत. तरीही असो.
तसेच सदर सदस्याचा `आरती' याविषयावर गहन अभ्यास आहे. त्यांनी (फुकट पिंका टाकण्यापेक्षा) लाईट पाडला, तर तुम्हाला उलगडा होईल.

लेखकाने ज्या स्ठाईलने मंत्र सामर्थ्य वगैरे टाईप लेख लिहिलाय ते नक्कीच हास्यास्पद आहे . पण ह्या लेखावर हिंदुद्वेष्टे , स्वघोषित आत्मज्ञानी , प्रवचनकार , व्याख्याते , आणि मिपावरचे शतकवीर ह्यांची जी निंदात्मक विधाने येत आहेत हे पाहुन फार वाईट वाटले ... ह्या सगळ्यांना उत्तर द्यायला व्यवस्थित मंत्र सामर्थ्यावर लेख लिहावासा वाटत आहे .... पण कोणत्याही हेटरोजिनीयस ग्रुप्मधील सर्वच लोक समान अध्यात्मिक पातळी असणे असंभव असते ! कित्येकांना समजुन घेणे तर दुरच पण ऐकण्याचीही कुवत नसते म्हणुन लेख लिहायचा मोह टाळत आहे ... नामाच्या महात्म्याबाबत जिज्ञासुंनी हे अवश्य पहावे http://satsangdhara.net/shri/prastavik1.htm#

In reply to by धन्या

ह्या एका वाक्यासाठी (आणि त्याच्या पुरवणीसाठी) जोरदार टाळ्या!!! जिंकलंस भावा..जिंकलंस!

In reply to by धन्या

लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता समजतात असं एक निरीक्षण नोंदवू ईच्छितो. जसे इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेन्ट समजतात तसे.

In reply to by धन्या

अगदी अगदी! त्यामुळं आम्ही एकच टर्म इन्शुरन्स काढला आहे. (बाकी इन्व्हेस्टमेण्ट बद्दल आम्ही 'आता' बोलत नाही ;) ) बाकी न्यायाधीशांनी एकदा न्यायदान केल्यावर पुन्हा पुन्हा त्याच विषयांवर चर्चा करण्याचा कंटाळा 'तशेच' इन्टरनेट बंद पडण्याचा अतिशय मोठा हातभार ह्याठिकाणी आम्हास चर्चेपासून लांब ठेवण्यासाठी लागलेला आहे. त्या उप्पर आम्हास धन्या साहेबांनी मराठीत 'कोटेबल कोट्स' लिहायला घ्यावेत असं सुचवावंसं वाटतंय. ;)

In reply to by धन्या

लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता समजतात असं एक निरीक्षण नोंदवू ईच्छितो
ह्म्म ... पण मग आपण काय करायचं हा फार मोठ्ठा घोळ आहे ...( तुर्तास धर्माचा भाग बाजुला ठेवुया , अध्यात्माविषयी बोलु )आपण काय करायचं गायत्रीमंत्राचे ठिबकसिंचन यंत्र लावतात त्यांना आधी ठोकुन काढायचे अन मग तत्वज्ञानाधिष्ठीत अध्यात्माची कास धरायची की आधी भोळ्याभाबड्याभाविकांना (पक्षी:ठिबकसिंचनवाले) झाकुन आपलेसे करुन , दांभिकाना त्यांची जागा दाखवुन द्यायची अन मग नंतर ठिबकसिंचन दुरुस्ती करायची ? हा अगदी टिळक आगरकर वादासारखा प्रकार वाटतो मला ... आधी स्वातंत्र की आधी समाजसुधारणा च्या धर्तीवर आधी अध्यात्मिक क्लीनसिंग की आधी अध्यात्मिक प्रगती ? गीता तर म्हणते की "न बुध्दीभेदं जनयेदज्ञानाम कर्मसंगिनाम | जोषयेत सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् || " (थोडक्यात ठिबक सिंचनवाल्यांना ठिकुन काढु नका , त्यांच्या कलाकलाने घ्या ) असो . असे आम्ही किंकर्तव्य मुढ झालो आहोत , तेव्हा नुकतेच सातारहुन आणलेले गीतारहस्य वाचायला घेवुन संदर्भासहित ब्यॅटींग करायला येत आहोत *mail1* *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्यवाद. इतकी सुंदर लिंक दिल्याबद्द्ल

In reply to by स्पा

@धन्या, बॅटा, संक्षि प्रगो अका गिरिजा काकुंचा आपण प्याण झालोय >>>. *mosking* सावध रहा रे.. अत्ता पांडुब्बा फ्यान झालाय .. नंतर 'सर'. .. अशी हाक मारेल .. आणी नंतर ... *biggrin* असो!

आमच्या ओळखीच्या एक डॉ.बाईच्या घरी "हरे रामा हरे कृष्णा" असा जप करणारे मशीन सतत चालू असते. त्यांच्या घरी महिनाभर सुतारकाम चालू होते. दिवसभराचे काम संपवून ते जेवणासाठी किंवा विश्रांतीसाठी बाहेर पडत तेंव्हा त्यांच्या तोंडात सतत हरे रामा हरे कृष्णा हाच जप असे. (सांगण्यास विशेष म्हणजे सुरवातीला ते त्या जपाची टिंगल करीत असत).

In reply to by भिंगरी

माजापन आसाच ह्वयाचा आदी. हापिसला क्याबने जाताना सगळ्या येफेम च्यायनेलवर आलटून पालटून "हाम तेरे बीनं आबी रय नयी पाते" ह्ये आश्यिकी दोनमदले गाने लागायचे आनी मंग पुरा दिवस त्ये गाने माज्या तॉंडात बसायचे.

In reply to by धन्या

हेच म्हणणार होतो.. तो राम किंवा कृष्णाच्या नामाचा महिमा नाही.. कुठलेही गाणे, जाहिरात इ.चा भडिमार झाला की तोच परीणाम होतो .. न आवडणारी टुकार गाणीही तोंडात बसतात.. :-)

In reply to by बाळ सप्रे

हेच म्हणणार होतो.. तो राम किंवा कृष्णाच्या नामाचा महिमा नाही.. कुठलेही गाणे, जाहिरात इ.चा भडिमार झाला की तोच परीणाम होतो ..
निदान तो भडीमार बाहेरुन तरी होत असतो आणि कधीतरी थांबण्याची शक्यता असते. इथे तर भक्त स्वतःच भंकस करत असतो. आणि त्याला सांगितलं जातं, भावपूर्ण हो, मंत्राला हृदयस्थ कर! ( हवाबाण-बाबांनी चिटकवलेली टेप पाहा. आणि बाई रसाळपणे काय सांगतायंत ऐका). साध्या रटाळ गाण्याच्या रिपीटिशननी आपण इतके हैराण होतो तर यू कॅन इमॅजिन. आत मधे अहर्निश `हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे (रिपीट फॉर कृष्णा) चालू आहे. आणि परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलीये की आता मन जप थांबवायलाच तयार नाही! यू विल गो मॅड. साधा मोठ्या वॉल्यूममधे लागलेला रस्त्यावरचा आवाज, कामात लक्ष लागू देत नाही. इथे तर रांत्रदिवस जप चालू आहे. भक्त लाख म्हणो की त्याच्या भक्तीची ती फलश्रुती आहे पण The person has gone completely Mad! He will go into more & more illusions now. And the unfortunate part is, he is enjoying it! That completely destroys the possibility of his recovery. अर्थात, शून्य कल्पनाशक्ती आणि भोळसट भक्ती असली की साध्या गोष्टी सुद्धा समजायला किती अवघड होतात, हे वरच्या चर्चेत लक्षात आलं असेलच.

In reply to by संजय क्षीरसागर

>>> The person has gone completely Mad! He will go into more & more illusions now. And the unfortunate part is, he is enjoying it! That completely destroys the possibility of his recovery. तुमचा स्वतःचा अनुभव शून्य आहे. तुम्हाला स्वतःला अनुभव घ्यायची इच्छा नाही. ग्रंथांवर तुमचा विश्वास नाही. प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या संतांवर तुमचा विश्वास नाही. असे असताना देखील जपाने/नामस्मरणाने काय होते याविषयी तुम्ही स्वत:च्या भ्रामक कल्पनेच्या भरार्‍या मारत आहात. ही सर्व लक्षणे भ्रमिष्ट असण्याचीच आहेत. तस्मात जिलब्या पाडणे थांबवा आणि स्वतः अनुभव घेऊन बघा. थोडा प्रयत्न केलात तर तुमचा भ्रमिष्टपणा नक्कीच कमी व्हायला सुरूवात होईल.

In reply to by श्रीगुरुजी

नामजपाने जर एवढे एकाग्र होता येत असेल व स्थुल ,सुक्ष्म देहात कंपने होत असतील ,तर मग बरेच साधु बाबा महंत गोसावी हे फुकाडे गांजाडे का असतात याचा खुलासा करावा! अनेक स्वामी गांजा पिताना ,हुक्का ओढताना फोटोत दिसतात व येडे भक्त नाममहात्म्याचे गुणगाण गात बसतात.... अनेक स्वामी बाबा असे आहेत कि फक्त गावठीचाच नेवैद्य त्यांना दाखवला जातो. (स्वतः आमचे भोलेनाथ बाबा भांगप्रेमी आहेत)

In reply to by अनिल तापकीर

बारामतीच्या काकांवरही चिक्कार पुस्तके आहेत, परंतु कुठेच माणिकचंदचा उल्लेख नाही.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला स्वतःला अनुभव घ्यायची इच्छा नाही?
तुमच्यापेक्षा कैकपट अनुभव आहे! आणि म्हणून तर मी इतकं उघडपणे सांगतोयं.
ग्रंथांवर तुमचा विश्वास नाही. प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या संतांवर तुमचा विश्वास नाही.
तेच तर म्हणतोयं, ग्रंथ आणि संत बाजूला ठेवा, तुम्ही स्वतःचा अनुभव लिहा!
असे असताना देखील जपाने/नामस्मरणाने काय होते याविषयी तुम्ही स्वत:च्या भ्रामक कल्पनेच्या भरार्‍या मारत आहात.
माझे प्रतिसाद कल्पनेच्या भरार्‍या असतील तर तुम्ही स्वतःचा अनुभव लिहा आणि मग कशी मजा येते ते पाहा!
ही सर्व लक्षणे भ्रमिष्ट असण्याचीच आहेत.
तुम्ही फक्त तुमचा अनुभव सांगा (आणि खरंच हिंमत असेल तर नवा धागाच काढा). कोण भ्रमिष्ट आहे याचा निर्णय फक्त तीन किंवा चार प्रतिसादात होईल याची गॅरेंटी मी घेतो!