✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मंत्रयोग - जपयोग

अ
अनिल तापकीर यांनी
गुरुवार, 07/17/2014 - 16:32  ·  लेख
लेख
मंत्रयोग - जपयोग शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात. जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय. २- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो. ३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही. ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता. आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो. जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
70530 वाचन

💬 प्रतिसाद (434)

प्रतिक्रिया

द्विजांनी वेदोक्त मंत्र

बॅटमॅन
Tue, 07/22/2014 - 13:02 नवीन
द्विजांनी वेदोक्त मंत्र म्हणले अन इतरांनी पुराणोक्त म्हणले तर त्यात काही उच्च नीच नाही ... आमच्या साठी वेद आणि पुराण दोन्हीही श्रेश्ठच आहेत !
सर्वांनीच वेदोक्त मंत्र म्हटले तरी त्यात धर्महानी काहीच नाही.
( हे वैयक्तिक मत आहे, तुमच्यालेखी फाट्यावर मारणारे श्रेष्ठ आणि नियम पाळणारे कनिष्ठ असे असु शकेल , त्याला कोणाचीच हरकत नाही , हिंदु धर्मात वाट्टेल ते स्वातंत्र्य आहे ज्याला जे हवे त्याने ते मत बनवावे )
वैयक्तिक मत कसेही असूदे. पण 'माझ्यालेखी फाट्यावर मारणारे श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ' हा हेत्वारोप चुकीचा आहे हे सांगणे अवश्यमेव आहे. माझ्यालेखी दोन्ही लोक सारखेच आहेत. रँकिंग ठरेल ते खर्‍या मनोभावावर. तस्मात वाट्टेल ते स्वातंत्र्य इ.इ. कंडिसेन्शन इथे नको. बाकी चर्चा करूच.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

प्र.गो.-हे वाचा आणि थोडा

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/22/2014 - 15:59 नवीन
प्र.गो.-हे वाचा आणि थोडा विचार करा. प्र.गो. आपणे जे म्हणतायत,ते येणे प्रमाणे- जर वेदोक्त शिकायचे असेल,तर मुंजिचा संस्कार करुन शिकावे..आणि ते ज्यांना(द्विजांना) धर्मानी अधिकार दिला आहे त्यांनीच. बाकिच्यांना पुराणोक्ताचा अधिकार आहे.आणि या दोन्हीत श्रेष्ठ/कनिष्ठ असे काहिही नाही. तेंव्हा कमी-जास्त पणाचा आरोप करु नका. प्र.गो:- हे सगळं तुंम्ही तुमच्या सद्बुद्धीचा कौल लाऊन म्हणताय.(जे शास्त्राला अजिब्बात मान्य नाही.)प्रत्यक्ष वैदिक(ज्याला सामान्यतः हिंदू संबोधतात.)त्या परंपरेत आणि ती परंपरा चालविणार्‍या आमच्या वैदिक आचार्यांमधे वेद मंत्रांची किंमत आणि स्थान हे पुराणोक्ताच्या वरचं आहे. पुराणोक्त कर्म(कांड) करणे..हे दुय्य्यम आणि हलक्या स्वरुपाचं मानलेलं..आचरलेलं आहे. म्हणजे वेदोक्त श्रीखंडासारखं,तर पुराणोक्त मंजे निव्वळ दही साखर...! दोन्हीतले घटक/कृती तीच पण घटीत आणि दर्जा वेगळा! मंत्रातला अर्थ/आशय तोच पण मान आणि दर्जा वेगळा..असा हा मामला आहे. मला या गोष्टी कळल्यावर मी आमच्यातल्या अनेकांना हा प्रश्न विचारला,पण उत्तरं देताना कोणिही पोथीप्रामाण्या बाहेर गेले नाहीत.(एका अर्थी स्वतःच्या अंगावर येणार,ते पोथीच्या अंगावर ढकललं..इतकच) आता यातही काहि आचार्य/प्रवचनकार/पुरोहित हे वेदमंत्र ऐकण्याचा अधिकार सर्वांना आहे.(शिकण्याचा नव्हे!) अशी भुमिका (अर्थातच शास्त्रा धार-काढून) घेत असतातच.यातल्या काहिंना असं प्रामाणिकपणे वाटत असतं,की आपण म्हणतो तेच शास्त्रातलं मत बरोब्बर..बाकिची लफंगेगिरी/अप्रामाणिकता.उरलेल्यांना ही उघड विषमता आहे हे कळत असतं,पण लोकांनी ऐकावं म्हणून आणि त्यांनाही परंपरेत राहुन हे साध्य करायचं असल्यानी ते शास्त्राधार घेतात. ..असो! माझ्या सारख्यांना सावरकरांची वेदामृत सर्वांना पाजा ही माणुसकीपूर्ण भुमिका पटते...त्यामुळे मी ज्याला वेदमंत्र शिकण्याची पात्रता आहे त्या (हिंदुसमाजातल्या) प्रत्येक स्त्री/पुरुषाला..पौरोहित्य किंवा व्यक्तिगत उपासनेसाठी वेद शिकवले पाहिजेत. या मताचा आहे. आता तुमचा रहाता राहिला मुद्दा विधिनिषेध पाळण्याचा... तर तुंम्हाला हे नम्रपणे सांगतो की धर्मशास्त्रातले विधिनिषेध हे ऐहिक दृष्ट्या निरर्थक आहेत. निर्रर्थक म्हणजे - तुलनाच न करता येण्याच्या स्वरुपाचे. वेदाध्ययना साठी मुंजीचा संस्कार हा विधि करावा लागतो.. हा विधी न करता वेद शिकणे हा निषेध. आता हे निर्रर्थक कसं होतं ते पहा... मुंजीचा संस्कार हा वेदाध्ययनाच्या दालनात शिरायचा गेटपास आहे. पण आपल्या धर्मपरंपरेत हा पास लायकीवर नाही,तर जातिवर मिळतो..ही पहिली विषमता. (आपल्याला CAR शिकायची असेल,तर ज्याला येते त्याला शिकायचा गेटपास म्हणजे लर्निंग लायसनची मुंज करवून मिळते आणि त्यात उत्तीर्ण झाल्यास परमनंट लायसन मिळतं..आणि स्वतःची गाडी चालवायचं उपासना स्वातंत्र्य मिळतं..किंवा चालक या पदावर पौरोहित्याची संधी मिळते....म्हणजे जात पाहिली जात नाही..सरळ लायकता पाहिली जाते.. ही ऐहिक समता[आपल्याच लोकसमुहाकरीता] धर्मात का नाही? याचा विचार करा.) ही विषमता आजही जिवंत आहे. वेदपाठशाळांमधे स्त्रीया वा ब्राम्हणेतरांना प्रवेश नाही.याबद्दल तुंम्हाला काय वाटतं? आता थोडा ग्रंथाधारः- मनु:स्मृती - अध्याय- २ :- श्लोक ३१ ते ४९ हा भाग मुद्दाम वाचा हा खास उपनयनाचे द्विंजांसाठी/त्रैवर्णिकांसाठीचे नियम सांगतो.. हे ही जाती आधारीत आहेत.अध्ययनाकरिता ब्राम्हणापासून पुढे प्रत्येक वर्णाची मुंज ही ४ वर्षांची गॅप ठेऊन सांगणे. कमरे भेवतीच्या मेखला वेगवेगळ्या धाग्यांच्या सांगणे,धरणाचे दंड वेगवेगळ्या वृक्षांचे आणि उंचीचे सांगणे... असा या आमच्या वैदिककॉलेज मधे,,विद्यार्थीसमुहात पाहाता क्षणीच ओळखायला सोप्पा जावा ,असा जन्माधारीत विषमतेचा कडेकोट बंदोबस्त,मनुस्मृतीनी सांगितलेला आहे..विधीनिषेधाच्या नावाखाली हा पाळण्या योग्य मानायचा का? आपल्याला काय वाटतं? शिवाय शूद्रा*ला मुंज करून शिकायला परवानगीच नाही..हे का बरं? पाण्यात उडी मारायला संधीच द्यायची नाही,आणि तू पोहोण्यायोग्य नाहीस असा आधिच निर्वाळा द्यायचा..हे कशाचं लक्षण मानायचं? शिवाय दुसर्‍या धर्मांमधेही असच आहे..ते बघा..!--- असा सल्ला मधुन मधुन तुंम्ही देता. तर तुंम्हाला ते ही समर्थनीय वाटतं काय? आणि मी किंवा माझ्यासारख्या कुणी ही विषमता माझ्याधर्मापुरती दुर/हद्दपार करायची,आणि धर्मात समता आणायची म्हटली तर त्यात काहि चूक आहे...असं तुम्हाला दुसर्‍या धर्मांचा दाखला देऊन सांगावसं का वाटतं? त्यांचं घर राहू दे ना घाणेरडं आपण आपलं स्वच्छ करू..काय हरकत आहे? असं का वाटत नाही? :) *@द्विज/त्रैवर्णिक इत्यादी कलीयुगात नाहीत. कलियुगात दोनच वर्ण अस्तित्वात आहेत. ब्राम्हण व *इतर(शूद्र) हे धर्मशास्त्र्यांचं मत आहे. आणि त्यावरूनच शाहू/वेदोक्त प्रकरण झालं होतं. मग तुंम्ही वादापुरतं सुद्धा द्विज म्हणजे त्रैवर्णिकांच्या कथित अधिकाराचं बाहुलं नाचविण्यात काय अर्थ उरतो??? याचाही विचार करा. ==================== प्र.गो:--- मी वर मांडलेले विचार..मुद्दे हे तुंम्हाला हरवण्यासाठी नाहीत. हे जाता जाता नमूद करु इच्छितो.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सोनारानेच कान टोचले हे लै

बॅटमॅन
Tue, 07/22/2014 - 16:04 नवीन
सोनारानेच कान टोचले हे लै झ्याक झालं आत्मूस. प्रतिसाद फार तिरके होताहेत, तस्मात हा प्रतिसात पुन्हा एकदा पेष्टवतो खाली.
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

पुढील चर्चा भेटी अंती

प्रसाद गोडबोले
Tue, 07/22/2014 - 16:06 नवीन
आय थिंक आय कॅन स्टिल डिफेन्ड माय पॉईट ! असो . पुढील चर्चा भेटी अंती :)
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सोनार

llपुण्याचे पेशवेll
Tue, 07/22/2014 - 18:49 नवीन
सोनार म्हणायला हा सोनार, सोनार नाही असे माझे स्पष्ट मत आहे. इत्यलम्.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तुमच्या सण्णकन थोबाडण्याच्या

नानासाहेब नेफळे
Mon, 07/21/2014 - 20:19 नवीन
तुमच्या सण्णकन थोबाडण्याच्या कृतीला त्याने 'जळी स्थळी काष्ठी पाषाणी' देवच आहे या तत्वाने पुन्हा लाथेने प्रत्युत्तर दिले असते तर आपण काय करणार होतात? विषयवासनेचा स्पर्श होऊ नये यासाठी समर्थ शिधाही पाण्यात धुवायचे व बेचव करुन खायचे, त्याच समर्थगडावर सत्तेसाठी भांडाभांड करणारे दोन रामदासी गट आहेत हे ही निदर्शनास आणुन देतो.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

या तत्वाने पुन्हा लाथेने

प्रसाद गोडबोले
Mon, 07/21/2014 - 20:27 नवीन
या तत्वाने पुन्हा लाथेने प्रत्युत्तर दिले असते तर आपण काय करणार होतात?
नाठाळाचे माथी काठी हाणु ! ह्या हिशेबाने काठी हाणणार होतो ... *biggrin* ते निदर्शनास आणुन देण्याचे गरज नाही हो त्या दोन्ही गटातील वाद निवळलाय (मला परसनली तर दोन्ही गटातील माणसे ओळखतात... दोघांशी चर्चा होत असते माझी त्यामुळे हे १००% खात्रीने सांगु शकतोय मी )... दोन काय ११०० गट स्थापन करण्याचा आमचा मानस आहे !!
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

रामदासी पंथांमधला वाद तर

प्रचेतस
Mon, 07/21/2014 - 20:36 नवीन
रामदासी पंथांमधला वाद तर समर्थांच्या मृत्युनंतर लगेचच सुरु झाला होता. संभाजी राजांनी ह्या संदर्भात सज्जनगडाचा किल्लेदार जिजोजी काटकर ह्याला सक्त ताकीद दिल्याचे अस्सल पत्र उपलब्ध आहे.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हा तर दिव्याखाली अंधारच

धन्या
Mon, 07/21/2014 - 20:38 नवीन
हा तर दिव्याखाली अंधारच म्हणायचा.
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हे असेच असते

प्रसाद गोडबोले
Mon, 07/21/2014 - 20:54 नवीन
,पण ह्यावर सविस्तर चर्चा पुढील ट्रिप च्या वेळेस):)
↩ प्रतिसाद: धन्या

पत्र उपलब्दवणे प्लीज.

llपुण्याचे पेशवेll
Tue, 07/22/2014 - 18:50 नवीन
पत्र उपलब्दवणे प्लीज.
↩ प्रतिसाद: प्रचेतस

समर्थांनी सज्जनगडावरील काही

प्रचेतस
Wed, 07/23/2014 - 08:59 नवीन
समर्थांनी सज्जनगडावरील काही एक व्यवस्था भानजी व रामाजी गोसावी यांजकडे सुपूर्द केल्या. त्यासाठी छत्रपती शिवाजी आणि तद्नंतर संभाजीराजांनाही त्याला अनुदान चालूच ठेवले. समर्थांच्या मृत्युनंतर मात्र उद्धव गोसाव्याने द्रव्यलोभासाठी कटकटी सुरु केल्या. उद्धवास सज्जनगडाचा किल्लेदार जिजोजी काटकर हा सुद्धा सामील झाला. ह्या गोष्टी कानावर जाताच संभाजीराजांनी २/६/८२ रोजी जिजोजी काटकरास आज्ञापत्र लिहिले. त्याचा मूळ मायना पुढीलप्रमाणे. श्री स्वामी अवतार पूर्ण करण्यागोदरच आज्ञा केली होती. ऐसे असतां उधव गोसावी उगीच द्रव्यलोभास्तव भानजी व रामाजी गोसावी यांसी कटकट करितांत, तुम्ही ही उधव गोसावी यांशी द्रव्ये, पात्रें व वस्त्रे भानजी व रामाजी गोसावी यांकडून श्री स्वामींची देवविली म्हणोन कळू आले. तरी तुम्हांस ऐसे करावयाचे प्रयोजन काये व उधव गोसावी यासी कटकट गरज काये. याउपरि जे जे वस्त्राभाव व द्रव्य उधव गोसावी याचे आधीन तुम्ही करविले ते मागतें भानजी व रामाजी याचे स्वाधीन करणे. उधव गोसावी यांसी कटकट करो न देणे. श्री स्वामीची पहिलीच आज्ञा करणे...वेदमूर्ति दिवाकर गोसावी यांचे विद्यमाने आम्हास श्रुत होऊन होणे तों होईल...या उपरि ये घालमेलीत पडावया प्रयोजन नाही. श्री स्वामीच्या समुदायांसी काडीइतके अंतर पडो न देणे...या पत्राप्रमाणे राहाटी करणें.
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

वेदांनी स्त्रीला शुद्र मानले

नानासाहेब नेफळे
Mon, 07/21/2014 - 20:10 नवीन
वेदांनी स्त्रीला शुद्र मानले आहे, स्त्री ब्राह्मण असली तरी तिचे उपनयन धर्मबाह्य आहे.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नक्की कुठल्या वेदात आणि

बॅटमॅन
Mon, 07/21/2014 - 20:13 नवीन
नक्की कुठल्या वेदात आणि कुठल्या अध्यायात/मंडलात/ऋचेत इ.इ. असे सांगितले आहे?
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

त्यांच्याकडच्या प्रतीत म्हटले

मृत्युन्जय
Wed, 07/23/2014 - 11:31 नवीन
त्यांच्याकडच्या प्रतीत म्हटले आहे. तुम्हाला काय घेणे देणे. ते म्हणतात ना म्हणजे मग तेच खरे. ते म्हणतात ते सगळे खरेच असते. त्यांनी विजु खोट्यांना हाक मारली तर तेही दुसर्‍या दिवसापासुन विकु खरे म्हणुन ओळखले गेले पाहिजेत. बाकी तुम्हाला अध्याय, मंडल आणि ऋचेमधला फरक तरी कळतो का? आलेत लोकांना वेदामधल्या शंका विचारायला.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तेही बाकी खरंच म्हणा.

बॅटमॅन
Wed, 07/23/2014 - 12:57 नवीन
तेही बाकी खरंच म्हणा.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सादळलेली काडी.

यशोधरा
Mon, 07/21/2014 - 20:15 नवीन
सादळलेली काडी. :)
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

नेफळ्यांचे सगळेच सादळले आहे

प्रसाद गोडबोले
Mon, 07/21/2014 - 20:34 नवीन
नेफळ्यांचे सगळेच सादळले आहे हो =))
↩ प्रतिसाद: यशोधरा

स्त्री आणि शुद्रांना

हाडक्या
Mon, 07/21/2014 - 20:49 नवीन
स्त्री आणि शुद्रांना वेदोक्ताचा अधिकार नाही (त्यांच्यासाठी पुराणोक्त मंत्र आहेत) म्हणुन स्त्रीयांनी गायत्री मंत्र म्हणाणे निशिध्द आहे !
हेच तुमचेदेखील विचार आहेत का ? म्हणजे तुम्ही या विचारांशी सहमत तसेच समर्थक आहात काय ??
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मुंज झालेली व्यक्ती हा मंत्र

मराठे
Mon, 07/21/2014 - 20:37 नवीन
मुंज झालेली व्यक्ती हा मंत्र म्हणू शकते आणि प्राचीन काळी स्त्रियांचीही मुंज होत असे.
अनुराधा पौडवालची मुंज झालीय का?
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हां

प्रसाद गोडबोले
Mon, 07/21/2014 - 20:48 नवीन
हा भारी प्रश्न आहे =))
↩ प्रतिसाद: मराठे

+११११११११११

बॅटमॅन
Mon, 07/21/2014 - 12:57 नवीन
अगदी अगदी =)) =)) =))
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

@त्यातून अहोरात्र गायत्री

अत्रुप्त आत्मा
Sun, 07/20/2014 - 23:36 नवीन
@त्यातून अहोरात्र गायत्री मंत्र गळत *mosking* असतो. >>> *ROFL* हे फॅड साधारण १५ वर्षापूर्वी सुरु झालं. मला माझ्या पेशामुळे या प्रकारची अनेक अ‍ॅप-लावत फिरणारे(विक्रेते) भेटलेले आहेत. ह्या गोष्टी साधारणपणे पेनकिलर किंवा सपोर्टीव्ह मेडिसिन सारख्या आहेत..असं भासवून त्याचं फुल्ल मार्केटींग केलं जात होतं.आता त्याच्या पुढचा टप्पा सुरु झालाय.असो!
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

लांजा मध्ये एका हॉटेल मध्ये

खटपट्या
Mon, 07/21/2014 - 00:19 नवीन
लांजा मध्ये एका हॉटेल मध्ये "श्री स्वामी समर्थ" च मशीन २४/७ चालू असते. का ते माहित नाही.
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

संक्षि

स्पा
Mon, 07/21/2014 - 10:23 नवीन
संक्षि =))
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

संक्षि

स्पा
Mon, 07/21/2014 - 10:23 नवीन
संक्षि =))
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मी आधीच्या प्रतिसादात

श्रीगुरुजी
Mon, 07/21/2014 - 21:30 नवीन
मी आधीच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे, जप्/नामस्मरण इ. विषयी किंचितही अनुभव नसताना त्याविषयी अत्यंत भ्रामक कल्पना तुमच्या मनात ठासून भरलेल्या आहेत.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

क्या बात है, फ्री फुर्फुरुजी!

संजय क्षीरसागर
Mon, 07/21/2014 - 22:27 नवीन
हवाबाणांची काय परिस्थिती झालीये पाहिली नाही का? आता तुमचं अनुभव कथन येऊ द्या. इथे बरीच गर्दी झालीये वाटत असेल तर स्वतंत्र पोस्ट टाका. बहुत मजा आएगा.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

>>> हवाबाणांची काय परिस्थिती

श्रीगुरुजी
Tue, 07/22/2014 - 13:17 नवीन
>>> हवाबाणांची काय परिस्थिती झालीये पाहिली नाही का? निव्वळ भ्रामक कल्पनाविलासामुळे तुमची किती भ्रमिष्ट अवस्था झाली आहे ते आधी बघा. >>> आता तुमचं अनुभव कथन येऊ द्या. इथे बरीच गर्दी झालीये वाटत असेल तर स्वतंत्र पोस्ट टाका. बहुत मजा आएगा. माझे अनुभव लिहिले तरी तुम्हाला ते कळणार नाही. तुम्हाला ते समजण्याइतकी तुमची पात्रता नाही. कारण अजून तुमचं मडकं कच्चं आहे. निव्वळ कच्चं नाही तर ते गळकं आणि पालथं पण आहे. त्याऐवजी तुम्ही आपलं अरविंदाख्यान लावा किंवा काहीतरी रूणुझुणु सुरू करा. बहुत मजा आएगा.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी ,तुमचे अनुभव

नानासाहेब नेफळे
Tue, 07/22/2014 - 14:00 नवीन
श्रीगुरुजी ,तुमचे अनुभव इतरांना न कळण्या इतपत ambiguous आहेत हे मान्य केल्या बद्दल तुमचे आभार. अरविंदाख्यानाचं संक्षि बघतिलच, वाढलेल्या पेट्रोल डीझेल आणि रेल्वेभाड्याच्या किंमतीत कसा 'राष्ट्रवाद' आहे हे सांगण्यासाठी मोदीचालिसा लिहा.कृपा करून आता विषयांतर करु नका..
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

>>> श्रीगुरुजी ,तुमचे अनुभव

श्रीगुरुजी
Tue, 07/22/2014 - 22:00 नवीन
>>> श्रीगुरुजी ,तुमचे अनुभव इतरांना न कळण्या इतपत ambiguous आहेत हे मान्य केल्या बद्दल तुमचे आभार. अरविंदाख्यानाचं संक्षि बघतिलच, वाढलेल्या पेट्रोल डीझेल आणि रेल्वेभाड्याच्या किंमतीत कसा 'राष्ट्रवाद' आहे हे सांगण्यासाठी मोदीचालिसा लिहा.कृपा करून आता विषयांतर करु नका.. तुला कळलंच नाही रे माईसाहेब. परस्पर निष्कर्ष काढून मोकळा झालास. माझे अनुभव अजिबात ambiguous नाहीत.
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

मी परस्पर निष्कर्ष काढतो ,मग

नानासाहेब नेफळे
Tue, 07/22/2014 - 22:46 नवीन
मी परस्पर निष्कर्ष काढतो ,मग तुम्हि काय वैज्ञानिक पद्धती वापरुन निष्कर्ष काढता काय? निष्कर्ष काढण्यासाठी तर्क लागतो ,तुमचे तर तर्काशीस वावडे आहे ,असो.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तू कसला डोंबलाचा तर्क काढतोस

श्रीगुरुजी
Wed, 07/23/2014 - 13:17 नवीन
तू कसला डोंबलाचा तर्क काढतोस रे माईसाहेब. पान, चुना, गायछाप. चारमिनार असली तुझी उदाहरणे. असली प्रतीके वापरून नुसत्या पिचकार्‍या टाकून घाण करत असतोस.
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

मंत्र तंत्र यंत्र

चित्रगुप्त
Sun, 07/20/2014 - 22:05 नवीन
मंत्र तंत्र यंत्र या तिन्ही शब्दांची फोड आणि अर्थ काय काय आहे, हे कुणीतरी विशद करावे.
↩ प्रतिसाद: मदनबाण

माझ्या प्रतिसादावर, एका सदस्यानं

संजय क्षीरसागर
Mon, 07/21/2014 - 10:43 नवीन
असा प्रतिसाद दिला आहे :
वरच्या नामस्मरण/ जपाबद्दलच्या अत्यंत चुकीच्या कल्पना आहेत. असहमत आहोत. तरीही असो.
तसेच सदर सदस्याचा `आरती' याविषयावर गहन अभ्यास आहे. त्यांनी (फुकट पिंका टाकण्यापेक्षा) लाईट पाडला, तर तुम्हाला उलगडा होईल.
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

खरे तर

प्रसाद गोडबोले
Mon, 07/21/2014 - 12:58 नवीन
लेखकाने ज्या स्ठाईलने मंत्र सामर्थ्य वगैरे टाईप लेख लिहिलाय ते नक्कीच हास्यास्पद आहे . पण ह्या लेखावर हिंदुद्वेष्टे , स्वघोषित आत्मज्ञानी , प्रवचनकार , व्याख्याते , आणि मिपावरचे शतकवीर ह्यांची जी निंदात्मक विधाने येत आहेत हे पाहुन फार वाईट वाटले ... ह्या सगळ्यांना उत्तर द्यायला व्यवस्थित मंत्र सामर्थ्यावर लेख लिहावासा वाटत आहे .... पण कोणत्याही हेटरोजिनीयस ग्रुप्मधील सर्वच लोक समान अध्यात्मिक पातळी असणे असंभव असते ! कित्येकांना समजुन घेणे तर दुरच पण ऐकण्याचीही कुवत नसते म्हणुन लेख लिहायचा मोह टाळत आहे ... नामाच्या महात्म्याबाबत जिज्ञासुंनी हे अवश्य पहावे http://satsangdhara.net/shri/prastavik1.htm#

लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता

धन्या
Mon, 07/21/2014 - 16:06 नवीन
लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता समजतात असं एक निरीक्षण नोंदवू ईच्छितो.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

जसे इन्शुरन्सला

धन्या
Mon, 07/21/2014 - 16:07 नवीन
जसे इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेन्ट समजतात तसे. :)
↩ प्रतिसाद: धन्या

खल्लास!

धमाल मुलगा
Mon, 07/21/2014 - 16:25 नवीन
ह्या एका वाक्यासाठी (आणि त्याच्या पुरवणीसाठी) जोरदार टाळ्या!!! जिंकलंस भावा..जिंकलंस!
↩ प्रतिसाद: धन्या

+ १,००,००० उर्फ लाखाची बात !!!

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/21/2014 - 18:45 नवीन
लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता समजतात असं एक निरीक्षण नोंदवू ईच्छितो. जसे इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेन्ट समजतात तसे.
↩ प्रतिसाद: धन्या

अगदी अगदी! त्यामुळं आम्ही एकच

प्यारे१
Mon, 07/21/2014 - 23:54 नवीन
अगदी अगदी! त्यामुळं आम्ही एकच टर्म इन्शुरन्स काढला आहे. (बाकी इन्व्हेस्टमेण्ट बद्दल आम्ही 'आता' बोलत नाही ;) ) बाकी न्यायाधीशांनी एकदा न्यायदान केल्यावर पुन्हा पुन्हा त्याच विषयांवर चर्चा करण्याचा कंटाळा 'तशेच' इन्टरनेट बंद पडण्याचा अतिशय मोठा हातभार ह्याठिकाणी आम्हास चर्चेपासून लांब ठेवण्यासाठी लागलेला आहे. त्या उप्पर आम्हास धन्या साहेबांनी मराठीत 'कोटेबल कोट्स' लिहायला घ्यावेत असं सुचवावंसं वाटतंय. ;)
↩ प्रतिसाद: धन्या

ठ्ठो!!!! एकदम नेमके.

बॅटमॅन
Mon, 07/21/2014 - 16:14 नवीन
ठ्ठो!!!! एकदम नेमके.
↩ प्रतिसाद: धन्या

ह्म्म

प्रसाद गोडबोले
Mon, 07/21/2014 - 16:31 नवीन
लोक धार्मिकतेलाच अध्यात्मिकता समजतात असं एक निरीक्षण नोंदवू ईच्छितो
ह्म्म ... पण मग आपण काय करायचं हा फार मोठ्ठा घोळ आहे ...( तुर्तास धर्माचा भाग बाजुला ठेवुया , अध्यात्माविषयी बोलु )आपण काय करायचं गायत्रीमंत्राचे ठिबकसिंचन यंत्र लावतात त्यांना आधी ठोकुन काढायचे अन मग तत्वज्ञानाधिष्ठीत अध्यात्माची कास धरायची की आधी भोळ्याभाबड्याभाविकांना (पक्षी:ठिबकसिंचनवाले) झाकुन आपलेसे करुन , दांभिकाना त्यांची जागा दाखवुन द्यायची अन मग नंतर ठिबकसिंचन दुरुस्ती करायची ? हा अगदी टिळक आगरकर वादासारखा प्रकार वाटतो मला ... आधी स्वातंत्र की आधी समाजसुधारणा च्या धर्तीवर आधी अध्यात्मिक क्लीनसिंग की आधी अध्यात्मिक प्रगती ? गीता तर म्हणते की "न बुध्दीभेदं जनयेदज्ञानाम कर्मसंगिनाम | जोषयेत सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् || " (थोडक्यात ठिबक सिंचनवाल्यांना ठिकुन काढु नका , त्यांच्या कलाकलाने घ्या ) असो . असे आम्ही किंकर्तव्य मुढ झालो आहोत , तेव्हा नुकतेच सातारहुन आणलेले गीतारहस्य वाचायला घेवुन संदर्भासहित ब्यॅटींग करायला येत आहोत *mail1* *biggrin*
↩ प्रतिसाद: धन्या

सुरेख लिंक !!

सुप्रिया
Wed, 07/23/2014 - 17:40 नवीन
धन्यवाद. इतकी सुंदर लिंक दिल्याबद्द्ल
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

माझा प्रतिसाद http:/

सुप्रिया
Wed, 07/23/2014 - 17:42 नवीन
माझा प्रतिसाद http://satsangdhara.net/shri/prastavik1.htm# या लिंक बद्द्ल होता.
↩ प्रतिसाद: सुप्रिया

साला या धन्या, बॅटा, संक्षि

स्पा
Tue, 07/22/2014 - 09:32 नवीन
साला या धन्या, बॅटा, संक्षि प्रगो अका गिरिजा काकुंचा आपण प्याण झालोय :-)

मदणबाण राहीला की रे.

धन्या
Tue, 07/22/2014 - 09:52 नवीन
मदणबाण राहीला की रे. कुजकटपणाने वागताना माणसाने दुजाभाव बाळगू नये असे कुणीतरी कुठल्यातरी ग्रंथात म्हटले आहे.
↩ प्रतिसाद: स्पा

@धन्या, बॅटा, संक्षि प्रगो

अत्रुप्त आत्मा
Tue, 07/22/2014 - 09:52 नवीन
@धन्या, बॅटा, संक्षि प्रगो अका गिरिजा काकुंचा आपण प्याण झालोय >>>. *mosking* सावध रहा रे.. अत्ता पांडुब्बा फ्यान झालाय .. नंतर 'सर'. .. अशी हाक मारेल .. आणी नंतर ... *biggrin* असो!
↩ प्रतिसाद: स्पा

अत्रुप्तजी आत्माजी, वेळीच

धन्या
Tue, 07/22/2014 - 10:50 नवीन
अत्रुप्तजी आत्माजी, वेळीच सावध केल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद !!!
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

१८५

कवितानागेश
Tue, 07/22/2014 - 13:22 नवीन
मी पुन्हा एकदा स्पांडूच्या टीममध्ये. ;)
↩ प्रतिसाद: स्पा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा