Skip to main content

मंत्रयोग - जपयोग

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 17/07/2014 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
मंत्रयोग - जपयोग शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात. जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय. २- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो. ३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही. ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता. आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो. जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 71092
प्रतिक्रिया 434

प्रतिक्रिया

In reply to by प्रसाद गोडबोले

या देवि आंतर्जालेषु संस्थलरुपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

:) ===================================================== छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..ढिशक्यांव् ढिशक्यांव् ढिशक्यांव्!!!!

In reply to by टवाळ कार्टा

हे काय????
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..ढिशक्यांव् ढिशक्यांव् ढिशक्यांव् असा नामजप.

In reply to by अधिराज

संस्कृत वाणी देवे केली | मग प्राकृत काय चोरांपासुनी झाली || असा सणसणीत प्रश्न व्हिचारुन ठेवलाय नाथांनी . धन्या , थांब रे थोडा जरा दम धर तुला रेफरन्स काढुन सांगतो *biggrin* तोवर ह्या मंत्राचा जप कर
" इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात || "
*lol*

In reply to by प्रसाद गोडबोले

इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात ||
ये क्या मंत्र है, मै तो बोखला गया रे बाबा!

आपले तापकीर साहेब एवढ्या कळकळीनं 'शहाणे करुन सोडावे, सकळ जन' या रास्त हेतूनं काही माहिती देत आहेत, तरी नुस्ती टवाळी चालवलीय शिंच्यांनी. पुढे एकाद्या धूर्त अमेरिकन प्रकाशकानं "सेव्हन एन्शियंट सीक्रेट्स ऑफ मान्ट्रा-जॅपा योगा" किंवा "अमेझिंग पॉवर ऑफ मान्ट्रा-जॅपा" किंवा " हौ टु बिकम वल्ड्ज मोस्ट पॉवर्फुल पर्सनः मिरॅकल ऑफ मान्ट्रा-जॅपा योगा" असे पुस्तक "बेस्ट सेलर" म्हणून बाजारात आणले, की त्यावर उड्या घ्याल, आणि स्तुतिपर धागे काढाल. अरे काही आहे की नाही?

८०+http://www.sherv.net/cm/emo/smoke/passing-joint-smiley-emoticon.gif = ?

In reply to by अत्रुप्त आत्मा

=))

>>> ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. यालाच "अजपाजप" असेही म्हणतात.

In reply to by श्रीगुरुजी

ते प्रथम सांगा.
चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अशी देणगी मिळालेली हयात व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का?
यालाच "अजपाजप" असेही म्हणतात.
या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. तुमच्या परिचयात अशी कोणी व्यक्ती असेल तर तिला फक्त स्वानुभवाची एक पोस्ट इथे लिहायला सांगा (किंवा तिचं अनुभव कथन तुम्ही लिहा) आणि बघा काय मजा येते ती.

In reply to by संजय क्षीरसागर

>>> या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. आपल्या ओळखीत वरील वर्णनाचं कुणी आहे वाटतंय. एवढ्या ठामपणं कसं काय म्हणू शकता?

In reply to by प्यारे१

अर्थात! तुम्हाला वैयक्तिक अनुभव घ्यायचा असेल तर करा सुरु साधना आणि अजपा सुरु झाला की कळवा. तुमची मुलाखत घेऊ!

In reply to by संजय क्षीरसागर

>>> तुम्ही कोणत्या स्टेजला आहात ते प्रथम सांगा. ते तुम्हाला सांगायची गरज नाही आणि सांगून ते तुम्हाला कळणारही नाही. >>> ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अशी देणगी मिळालेली हयात व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का? तुमचा ग्रंथांवर विश्वास नाही आणि संतांवरही नाही. तुम्हाला स्वतःला शून्य अनुभव आहे आणि इतरांच्या अनुभवावर विश्वास ठेवायची तुमची तयारी नाही. तुम्ही स्वतः कधी अनुभव घ्यायचा प्रयत्न केलेला नाही. तरीदेखील अत्यंत ठामपणे तुम्ही जिलब्या पाडत आहात. बादवे, अशी देणगी मिळालेल्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत. >>> या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःच भ्रमिष्ट झालेले दिसताय (कदाचित गेले वर्षभर अखंड केलेल्या "अरविंद" जपाचा परीणाम असावा व त्यातूनच भ्रामकता आली असावी). जप/नामस्मरण यांविषयी कणभरही माहिती किंवा अनुभव नसताना तुम्ही त्याविषयी अत्यंत चुकीच्या आणि भ्रामक कल्पना मनात घट्ट धरलेल्या आहेत आणि आपल्याच भ्रामक कल्पना हेच वैश्विक सत्य आहे अशी चुकीची समजूत करून घेऊन त्या भ्रामक कल्पना ठामपणे मांडत आहात. पोहण्याचा अनुभव घेण्याकरीता किंवा पोहणे शिकण्याकरीता स्वतः पाण्यात उतरावे लागते. निव्वळ जिलब्या पाडण्याऐवजी काही दिवस स्वतः अनुभव घेऊन बघा आणि मग भाष्य करा. तुमच्या परिचयात अशी कोणी व्यक्ती असेल तर तिला फक्त स्वानुभवाची एक पोस्ट इथे लिहायला सांगा (किंवा तिचं अनुभव कथन तुम्ही लिहा) आणि बघा काय मजा येते ती.

In reply to by श्रीगुरुजी

बादवे, अशी देणगी मिळालेल्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत.
नावे मिळतील का...एकदा चरणस्पर्श करुन येइन

In reply to by टवाळ कार्टा

केवळ चरणस्पर्श केल्यानी तुम्ही पावन व्हाल ही तुमची अन्धश्रद्धा आहे कार्टासाहेब. ;) आणि खरोखरच स्पर्शानी काही होत असेल, तर तुमचा स्पर्श करुन घेउन उलट स्वतःच टवाळ होण्याचा धोका कोणता शहाणा माणूस पत्करेल? :P

In reply to by कवितानागेश

केवळ चरणस्पर्श केल्यानी तुम्ही पावन व्हाल ही तुमची अन्धश्रद्धा आहे कार्टासाहेब.
मी पावन होईन असे मी म्हणालोच नाहीये ;)
आणि खरोखरच स्पर्शानी काही होत असेल, तर तुमचा स्पर्श करुन घेउन उलट स्वतःच टवाळ होण्याचा धोका कोणता शहाणा माणूस पत्करेल?
=))

In reply to by श्रीगुरुजी

>> खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःच भ्रमिष्ट झालेले दिसताय (कदाचित गेले वर्षभर अखंड केलेल्या "अरविंद" जपाचा परीणाम असावा व त्यातूनच भ्रामकता आली असावी). जप/नामस्मरण यांविषयी कणभरही माहिती किंवा अनुभव नसताना तुम्ही त्याविषयी अत्यंत चुकीच्या आणि भ्रामक कल्पना मनात घट्ट धरलेल्या आहेत आणि आपल्याच भ्रामक कल्पना हेच वैश्विक सत्य आहे अशी चुकीची समजूत करून घेऊन त्या भ्रामक कल्पना ठामपणे मांडत आहात. पोहण्याचा अनुभव घेण्याकरीता किंवा पोहणे शिकण्याकरीता स्वतः पाण्यात उतरावे लागते. निव्वळ जिलब्या पाडण्याऐवजी काही दिवस स्वतः अनुभव घेऊन बघा आणि मग भाष्य करा. सहमत. मस्तं. हेच म्हणायला आलो होतो.

एवढ्या ठामपणं कसं काय म्हणू शकता? जिलबी बाबा गीता न वाचता त्या बद्धल बोलु शकण्याचा दावा करु शकतात, तर ते यावर सुद्धा ठामपणं सांगु शकतात ना ? ;) मननेन त्रायते इति मन्त्रः - जो मनन करने पर त्राण दे वह मन्त्र है ही व्याख्या / फोड खरी असेल तर मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं कसं होइल ? ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- En Uchimandai... :- Vettaikaran

In reply to by मदनबाण

फुल रजा घेऊन, फक्त एक दिवस, अ‍ॅटॅचड्य टॉयलेट असलेल्या, बंद खोलीत, जेवणासाठी सुद्धा बाहेर न येता, कोणत्याही एकच-एक मंत्राचं, सतत उच्चारण करुन पाहा. एका दिवसात डोकं भणभणून जाईल. (मध्यमा) दुसर्‍या टप्प्यात, तीन दिवस फुल रजा घेऊन (बंद खोलीतून अजिबात बाहेर न येता) तो प्रयोग करुन पाहा. हळूहळू इतर सर्व विचार करण्याची क्षमता संपून मेंदू बधीर होऊन जाईल. (पश्यंती) शेवटी, आठवडाभरची रजा, घेऊन त्याच बंद खोलीत, फुल्ल अनुष्ठान करा (परा!). मग अजपा सुरु होईल. मनाची सगळी प्रक्रिया तुमच्या आवाक्या बाहेर जाईल. तुम्ही कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरी जप थांबणार नाही. Now the person has gone mad. He has lost control over his thinking process. He can't focus on anything because the mind inside constantly distracts him! पब्लिक उगीच टाईमपास म्हणून वैखारी पुरतं मर्यादित आहे, त्यामुळे `जगी या खास वेड्यांचा पसारा दाटलेला' दिसत नाही इतकंच.

In reply to by संजय क्षीरसागर

अगागागागागा! कस्लं भारी! =)) वरच्या नामस्मरण/ जपाबद्दलच्या अत्यंत चुकीच्या कल्पना आहेत. असहमत आहोत. तरीही असो.

In reply to by प्यारे१

पब्लिक उगीच टाईमपास म्हणून वैखारी पुरतं मर्यादित आहे, त्यामुळे `जगी या खास वेड्यांचा पसारा दाटलेला' दिसत नाही इतकंच. हॅ.हॅ.हॅ... माझ्या पहिल्या प्रतिसादात शेवटी कबिराचा दोहा दिला आहे तो परत एकदा वाचा... त्याचा अर्थ हातात माळ ओढणे चालु आहे,तोंडाने जिभेवाटे नामस्मरण चालु आहे,पण मन मात्र चारही दिशेला भटकत आहे अशा वेळी भगवंताशी एकरुपता कशी साधता येइल ? अनेक संतांनी वैखरी हा निषिद्ध सांगितला आहे. बाकी तुम्ही फार छान कल्पक जिलबी पाडली आहे. ;) जाता जाता :- अजपा साधना मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

In reply to by मदनबाण

प्रतिसादाची घाई करण्यापूर्वी नीट वाचत चला. यापूर्वीच्या प्रतिसादात आधीच सांगितलंय :
ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अशी देणगी मिळालेली हयात व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का?
तरीही आपण दिव्यप्रभा प्रकट केली आहे :
अनेक संतांनी वैखरी हा निषिद्ध सांगितला आहे.
वैखारी निषिद्ध करुन (थोडक्यात बाह्योच्चारण हा पहिला चरण वगळून) तुम्ही काय घंटा नामस्मरण करणार? मध्यमेला जायला वैखारी अनिवार्य आहे हे कळायला नामस्मरण करण्याची सुद्धा गरज नाही. असो, तुमच्या फालतू लिंका वाचायला मला वेळ नाही. स्वतःचा अनुभव लिहा. आणि खरंच प्रचिती घ्यायची असेल तर तुमचा प्रिय मंत्र `श्रीराम जयराम जयजय राम' मी सांगितलेल्या प्रक्रियेनं (किंवा तुमच्या अक्कलहुशारीनं) अजपा करुन दाखवा. तेवढं झाल्यावर, माझा प्रतिसाद स्मरणात राहिला तर (कारण तदनंतर तुम्हाला सदासर्व काळ केवळ रामनामाचा जयघोषच ऐकू येईल आणि सगळीकडे भगवंतच दिसायला लागेल!)... इथे कळवा. तुम्ही असाल तिथे तुमच्या मुलाखतीची व्यवस्था करतो!

In reply to by संजय क्षीरसागर

वैखारी निषिद्ध करुन (थोडक्यात बाह्योच्चारण हा पहिला चरण वगळून) तुम्ही काय घंटा नामस्मरण करणार? मध्यमेला जायला वैखारी अनिवार्य आहे हे कळायला नामस्मरण करण्याची सुद्धा गरज नाही. जिलबी बाबा चला तुम्हाला इतके समजले ही देखील मोठी गोष्ट आहे ! ;) ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अरे ? तुम्ही सगळच नाकारताय ! ज्यांनी ही शिकवणी अख्या जगताला दिली ते नक्की काय आणि का सांगताय ते पहायला नको ? अर्थात तुम्ही गीता न-वाचता त्या बद्धल बोलु शकण्याचा दावा करु शकतात तेव्हा प्रतिसाद सुद्धा नीट वाचत नसणार याची खात्री आहेच. ;) तुमच्या फालतू लिंका वाचायला मला वेळ नाही. स्वतःचा अनुभव लिहा. तुम्हाला काही वाचण्याचा आग्रह नाहीच आहे... ज्यांना त्यात रस आहे त्यांच्यासाठी ती लिंक आहे.तुमच्या फालतु निर्थक जिलब्या पाडण्या पेक्षा जरा श्वासावर लक्ष केंद्रित करा पाहु ! मन ताळ्यावर येइल तुमचे आणि जिलब्या पाडणे लगेच बंद होइल बघा. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

In reply to by मदनबाण

@ जरा श्वासावर लक्ष केंद्रित करा पाहु ! मन ताळ्यावर येइल तुमचे आणि जिलब्या पाडणे लगेच बंद होइल बघा.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

In reply to by मदनबाण

श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन ताळ्यावर येते हा पद्धतशीर पसरवलेला गैरसमज आहे ,याला कोणताही मानसशास्त्रीय आधार नाही.

In reply to by मदनबाण

दुनियेचं राहू द्या, स्वतःचा अनुभव लिहा! कल्पनाशक्ती हा बुद्धीमत्तेचा एक पैलू समजला गेला आहे. अजपा म्हणजे काय याची सांगितलेली प्रक्रिया वाचून देखिल, परिणाम काय होईल हे कुणाच्याही लक्षात येईल. न तुम्हाला स्वतःचा अनुभव, न कल्पनाशक्ती; आनंदात राहा.

In reply to by संजय क्षीरसागर

कल्पनाशक्ती हा बुद्धीमत्तेचा एक पैलू समजला गेला आहे. कल्पनाशक्ती आणि वास्तव यात फरक असतो हे समजण्यासाठी विशेष बुद्धीमत्ता लागत नसावी नै ? ;) अजपा म्हणजे काय याची सांगितलेली प्रक्रिया वाचून देखिल, परिणाम काय होईल हे कुणाच्याही लक्षात येईल. अजपा म्हणजे काय हे न-वाचताच कल्पनेच्या जिलब्या पाडता हे देखील कुणाच्याही लक्षात येईल बरं का... ;) न तुम्हाला स्वतःचा काही वाचायची इच्छा, न समजुन काही घेण्याची वॄत्ती; जिलब्या पाडत राहा. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

In reply to by मदनबाण

तुम्ही नामस्मरणाच्या कोणत्या स्टेजला आहात आणि किती वर्ष साधना चालू आहे ते सांगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फालतू लिंका आणि कमेंटस करण्यापेक्षा अजपा म्हणजे काय, तो सिद्ध झाल्यावर मनात नेमका काय बदल घडतो आणि पर्यायानं त्याचा जीवनावर काय परिणाम होतो ते इथे लिहा, मग बघू.

In reply to by संजय क्षीरसागर

आधी तुम्ही गीता न-वाचता त्यावर भाष्य करु कसे शकता ? ते सांगा बरं... ;) परत सांगतो... श्वासावर लक्ष द्या पाहु... ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

In reply to by मदनबाण

जो विषय तिथल्या तिथे संपवत चला. तो विषय होता त्या वेळी असेच अवांतर उद्योग केले होते. आता, अजपा म्हणजे काय ते स्वतःच्या शब्दात सांगता येत नाही. वैखारी निषिद्ध तर ती उल्लंघून पुढच्या स्टेजला कसं जायचं याचा पत्ता नाही. त्यात पुन्हा (मला दिलेल्या पहिल्या प्रतिसादात) हा घोळ घातलायं !:
तोंडाने जिभेवाटे नामस्मरण चालु आहे,पण मन मात्र चारही दिशेला भटकत आहे अशा वेळी भगवंताशी एकरुपता कशी साधता येइल ?
मंत्रानं भगवंताशी एकरुपता साधते? नामस्मरणानं एकसंध आणि मुद्देसूद विचार करण्याची क्षमता हळूहळू कशी संपते याची झलक, प्रतिसादातूनच दाखवायचं ठरवलंय का?

In reply to by संजय क्षीरसागर

@@नामस्मरणानं एकसंध आणि मुद्देसूद विचार करण्याची क्षमता हळूहळू कशी संपते याची झलक, प्रतिसादातूनच दाखवायचं ठरवलंय का? =))

In reply to by संजय क्षीरसागर

जो विषय तिथल्या तिथे संपवत चला. तो विषय होता त्या वेळी असेच अवांतर उद्योग केले होते. हॅ.हॅ.हॅ जिलबी बाबा तुमच्या जिलब्याच अवांतर असतात त्याचे काय ? *LOL* तसेही गीता न-वाचता त्यावर भाष्य करण्याच्या बाता तुम्ही करता,सर्व संत मंडळींनी जे सांगितले त्याला चूक ठरवता. मग तुमचा प्रतिसाद हा जिलब्या नाही तर काय आहे जिलबी बाबा ? मंत्रानं भगवंताशी एकरुपता साधते? हॅ.हॅ.हॅ... च्यामारी पहिल्या प्रतिसाद संतवाणी वाचली नाहीत त्याखाली कबीर वाणी वाचली नाहीत ! मनात कोणताही इतर विचार केला नाही तर ज्याचे नाम घेतो त्याच्याशी एकरुपता का होणार नाही ? जिथे मनोभाव नसेल त्या साधनेला अर्थच कुठे उरतो ? असो... तुमच्या जिलब्या पाडणे चालु ठेवाच. आम्ही मोजु. *LOL* परत एकदा :- अजुन तुम्हाला श्वासावर लक्ष केंद्रित करता येत नाहीये... हॉट इज धिस जिलबी बाबा. *LOL* जाता जाता :- जिलबी बाबा हा वरचा व्हिडीयो तुमच्यासाठी नाही बरं का... ज्यांना पहायचा असेल ते पाहतीलच. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

In reply to by मदनबाण

मनात कोणताही इतर विचार केला नाही तर ज्याचे नाम घेतो त्याच्याशी एकरुपता का होणार नाही ?
असा एकरुप होण्यासाठी कुणीही नाही, तो केवळ मंत्र जपणार्‍याचा कल्पनाविलास आहे. असो, शेवटी (फोटो बरा वाटला म्हणून) विडिओ ऐकला. त्यावरनं आपल्या एकूण साधनेची कल्पना आली. आपण बहुदा मंत्रोच्चारणाच्या `लास्ट स्टेजला' गेलेले दिसता! काही दिवसात इहलोकावरच आपल्याला कृष्णधाम दिसू लागेल! माझा पहिला प्रतिसाद (मुलाखत घेतल्यावीना) सार्थ करुन दाखवल्याबद्दल धन्यवाद!

In reply to by संजय क्षीरसागर

असा एकरुप होण्यासाठी कुणीही नाही, तो केवळ मंत्र जपणार्‍याचा कल्पनाविलास आहे. असं तुम्हाला वाटते हाच तुमचा कप्लना विलास आहे जिलबी बाबा. :ROFL: शेवटी (फोटो बरा वाटला म्हणून) विडिओ ऐकला. अर्रेच्या... अजपा जप ची लिंक दिली तर ती वाचली नाहीत,पण व्हिडीयो पाहिलात ! श्वासावर थोडेफार लक्ष केंद्रित झालेले दिसतय ! गुड कीप इट अप. :ROFL: आपण बहुदा मंत्रोच्चारणाच्या `लास्ट स्टेजला' गेलेले दिसता! काही दिवसात इहलोकावरच आपल्याला कृष्णधाम दिसू लागेल! पुन्हा एकदा कप्लना विलास ! आपण आपले जिलबी बाबा हे नाव सर्वार्थाने खरे करु दाखवलेत. :ROFL: माझा पहिला प्रतिसाद (मुलाखत घेतल्यावीना) सार्थ करुन दाखवल्याबद्दल धन्यवाद! हॅहॅहॅ... ते गीता न-वाचता त्यावर भाष्य करण्याच कसब दाखवा की जरा... तुमची देखील चांगली मुलाखात घ्यायला तयार आहोच. :ROFL: मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

In reply to by मदनबाण

अशीच साधना सुरु ठेवा. काही दिवसातच तुम्हाला, इतरांना जे दिसत नाही ते दृगोचर होऊ लागेल. इतकंच काय इतरांना ऐकू न येणारे दिव्य ध्वनी कानात घुमू लागतील. जे दृगोचर होतंय ते इतकं स्पष्ट दिसू लागेल की तुम्ही भर रस्त्यात त्याच्याशी बोलू देखिल लागाल! तुम्हाला जगाची पर्वा करण्याचं काही कारणच उरणार नाही. तुमच्या भोवती तुमच्या मार्गानं जाणारे असंख्य अनुयायी मिळतील. आणि त्यांच्या गराड्यात तर तुम्हाला, आपण `परातत्त्वाला' उपलब्ध झालो याची पदोपदी खात्री पटेल. अश्या `हवाबाणबाबांना' लोक `पोहोचलेला माणूस' समजतील. सायकिअ‍ॅट्रीत यालाच `भ्रमिष्ट होणं' म्हणतात... पण तुम्हाला त्याची फिकीर करण्याचं काही कारण नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

जिलबी बाबा तुम्हालाच फक्त कल्पना विलासाच्या जिलब्या पाडण्या पलिकडे काही जमत नाही ! तेव्हा तुमचच डोक चेक करायची खरी गरज आहे बरं का... सतत कल्पना विलास करणारा माणुसच भ्रमिष्ठ असतो हे देखील तुम्हाला कळत नाही, तेव्हा तुम्हाला भ्रमिष्ठ म्हणजे काय ते कळणे सुद्धा महाकठिण झाले आहे. तशीही प्रतिसाद न-वाचता जिलब्या पाडण्याची तुमची सवय जुनीच असुन तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख इथेच झाली होती. तसेच वैचारिक जिलब्या टाकायला "विशेष" गुण लागत नाहीत हे सुद्धा आधीच सांगुन झाले आहे बरं का जिलबी बाबा. तेव्हा गेट वेल सुन ! जाता जाता :- मनाची रुणुझुणू रुणुझुणू अती वाढली की जिलबी बाबा जिलब्या टाकायला लगेच तयार होतात. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी:- बडबडोबा !

In reply to by मदनबाण

त्या स्टेजला आपण हळूहळू पोहोचता आहातच. सगळीकडे भगवंत दिसू लागला आणि रात्रंदिन मंत्रघोष ऐकू येवू लागला की (कुणाला तरी) नक्की, इथे कळवायला सांगा. सदस्यांना मंत्रजपाचा प्रत्यक्ष परिणाम काय होतो ते पाहण्याचे सौख्य लाभेल आणि पुन्हा कुणीही असले प्रयोग करणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सतत कल्पना विलास करणारा माणुसच भ्रमिष्ठ असतो! चला स्वतः बद्धल खात्री पटली तर तुम्हाला ! ;) { आता ही केस पूर्ण बंद करतो. } *LOL* पुढच्या प्रतिसादासाठी स्रॉरी सॉरी जिलबीसाठी जागा रिकामी ठेवली आहे, कारण शेवटची जिलबी आपलीच हा तुमचा हातखंडा ठावुक आहे...आणि तो तुम्ही नक्कीच पूर्ण करणार याची खात्री देखील आहे. *LOL* जाता जाता :- सध्या जिलबी किती रु. किलो आहे ? *LOL* आणि हो खालची सही तुमच्यासाठी नाही बरं का... उगाच उघडुन बघाल ! *LOL* मदनबाण...... आजची स्वाक्षरी:- बडबडोबा !

In reply to by मदनबाण

ही क्लॅरिटी आहे. तुमचं त्या विपरित, सगळंच धुसर होतंय. रटाळ जपासारखे तेचते निरर्थक शब्द चालू झालेत. चालू द्या.

In reply to by मदनबाण

>>> जिलबी बाबा तुम्हालाच फक्त कल्पना विलासाच्या जिलब्या पाडण्या पलिकडे काही जमत नाही ! तेव्हा तुमचच डोक चेक करायची खरी गरज आहे बरं का... +१११११११११११११.... जिलबीबाबा ४ थ्या प्रकारातले आहेत. आपल्याला काहीच कळत नाही हेच त्यांना कळत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

शालेय वयात १५ ऑगस्ट, सव्वीस जानेवारी वगैरे दिवशी गावभर कर्णकटु आवाजात "अब तुम्हारे हवाले वतन साथियों" "जरा आंख मे भरलो पानी" "वतन की राह मे ..शहीद हो" वगैरे गाणी ठाणाणा वाजत असायची, आणि जीव नकोसा व्हायचा. त्यानंतर काही दिवस इच्छा नसताना या गाण्यांचा अजपा जप मनात धिंगाणा घालायचा, आणि काही करणे मुश्किल व्हायचे. अलिकडे काही दुकानदार दुकानात 'मच्छर भगाओ - कम- गायत्री मंत्राचे मशीन लावून ठेवतात, त्यातून अहोरात्र गायत्री मंत्र गळत असतो. अश्या दुकानात पाच मिनीटे थांबल्यावरही नंतर बराच वेळ तो अजपा जप चालू रहातो. या अनुभवावरून अजपा जप कसा असावा याची थोडीशी कल्पना आहे, आणि 'भीक नको, पण कुत्रं आवर' अशी स्थिती होत असणार अजपा वाल्यांची. म्हणूनच मी पहिल्या प्रतिसादापासून 'स्वानुभवाधीष्ठित माहिती द्यावी, असा आग्रह धरला आहे, परंतु धागाकर्त्याने वा अन्य कुणी तसे केलेले नाही.

In reply to by चित्रगुप्त

त्यातून अहोरात्र गायत्री मंत्र गळत असतो. ते मशीन आणि त्यातून होणार्‍या शब्दगळीचे चित्र एकदम डोळ्यासमोर उभे केलेत ! =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्यातून अहोरात्र गायत्री मंत्र गळत असतो.
ते सुध्दा अनुराधा पौडवाल की कोणातरी स्त्रीच्या आवाजात ... खरं तर स्त्रीयांना गायंत्री मंत्र म्हणायला बंदी आहे / निषिध्द आहे ! (टाकली काडी *biggrin* मिपाय स्वाहा: ... मिपाय इदम् न मम् !)

In reply to by प्रसाद गोडबोले

खरं तर स्त्रीयांना गायंत्री मंत्र म्हणायला बंदी आहे / निषिध्द आहे !
असं नक्की कुठल्या धर्मशास्त्रात आहे? मुंज झालेली व्यक्ती हा मंत्र म्हणू शकते आणि प्राचीन काळी स्त्रियांचीही मुंज होत असे.

In reply to by बॅटमॅन

गायत्री हा वेदोक्त मंत्र आहे ( ऋग्वेद ४,६२,१० ) स्त्री आणि शुद्रांना वेदोक्ताचा अधिकार नाही (त्यांच्यासाठी पुराणोक्त मंत्र आहेत) म्हणुन स्त्रीयांनी गायत्री मंत्र म्हणाणे निशिध्द आहे !

In reply to by बॅटमॅन

जन्मना जायते शुद्रः संस्कारात भवेत् द्विजः | वेद-पठत भवेत् विप्र ब्रह्म जनातति ब्राह्मणः |
हा रेफरन्स लावला असेल बहुधा ! सो लेट मी करेक्ट माय सेन्टेन्स ...
गायत्री आणि समस्त वेदोक्त मंत्राचा अधिकार फक्त "द्विजांनाच" आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

बरं मग ब्रह्मवादिनी बायकांचे काय? त्यांना निषिद्ध नव्हता तो. विधिवत् मुंज बिंज करून जानवे परिधान करून गायत्री मंत्रच का, वेदांची सूक्ते त्या पठण करीत असत.

In reply to by बॅटमॅन

त्यांची मुंज झाली नव्हती का ? तसे असल्यास ते निशिध्दच म्हणावे लागेल ... मोडस ऑपरॅन्डी हा फॉलॉ व्हाय्लाच पाहिजे , जर सुशिक्षित लोकच त्याला फाटे फोडायला लागले , अन पळवाटा शोधायला लागले तर मग लवकरच तो मोडस नामशेष होईल !

In reply to by प्रसाद गोडबोले

वर स्पष्टच म्हटले आहे की मुंज झाली होती म्हणून. बरं, बाकी मुंज न होता गायत्री मंत्र म्हटल्याने काही आभाळ कोसळत नाही. तथाकथित पावित्र्यही भंगत नाही. मनातला भाव हा शेवटी महत्त्वाचा असतो.

In reply to by बॅटमॅन

बाकी मुंज न होता गायत्री मंत्र म्हटल्याने काही आभाळ कोसळत नाही.
>>> आणि गायत्री मंत्र मुळीच न म्हणल्यानेही आभाळ कोसळत नाही ! आपल्या धर्मात कोनावरच कसलीच सक्ती नाहीये , ज्याला जे करायचे ते करायला तो फ्री आहे ! पण काही विधीनिशेध आहेत हे पाळले पाहिजेत . ज्याला खरंच भक्तीभावने गायत्री मंत्राचे पठण करायचे असेल त्याने विधीवत मुंज करुन घ्यावी , ती करायची नसल्यास इतर पुराणोक्त मंत्र आहेतच की .... मुंजही करणार नाही अन गायत्रीच म्हणणारच असा हट्टाग्रह कशासाठी ? ह्यातील भाव काही भक्तीयुक्त वाट्ट्त नाही ! आता सध्यातरी आम्हाला गाय्त्री मंत्राचे काही कौतुक नाही पण जेव्हा पुरश्चरण करायचे मनात येईल तेव्हा विधीनिषेध पाळुनच करु :) अवांतर : बाकी ह्या विधीनिषेध वरुन एक किस्सा आठवला , एकदा सज्जनगडावर एक असाच हट्टाग्रही माणुस समर्थांच्या समाधीकडे / रामाच्या मुर्तींकडे पाय करुन बसला होता , त्याला जाऊन असे का करतोस बाबा म्हणुन एकाने विचारले तर म्हणतोय कसा की "जळी स्थळी काष्ठी पाषाणी देव आहे " ... तिथल्यातिथे जाऊन सन्नकन कानाखाली वाजवायचा विचार आणि हा डायलॉग मनात आला होता की "माज्या हातातही देव आहे अन तुझ्या गालातही अन ह्या आलेल्या आवाजातही *biggrin* " पण तेवढ्यात ते प्रकरण एका रामदासींनी हातळले ... आमच्या हातुन एक स्टंट हिरावला गेला किंव्वा विसोबा खेचरांसारख्या गुरुंची भेट :)

In reply to by प्रसाद गोडबोले

त्यामुळे जर कुणाला मुंज न करता गायत्री मंत्र म्हणायचा असेल तर हट्टाग्रह इ.इ. लेबले लावणेही काही योग्य नाही. मुंज न करता गायत्री मंत्र म्हणायचा लोकांना अट्टाहास आहे हे तुमचे पर्सेप्शन आहे. ते खरेच कशावरून? याची आणि सज्जनगड एपिसोडची तुलना इतक्यासाठी योग्य नाही, की स्वतःचा पॉइंट प्रूव्ह करण्याच्या नादात एक्स्ट्रीम उदा. दिलेले आहे. अशी एक्स्ट्रीम उदा. दिल्याने मूळ मुद्दा आजिबात सिद्ध होत नाही. केस बाय केस हे बदलत असतं. पुराणोक्त मंत्र आहेतच की, वैदिक मंत्र कशाला? हा सवाल करायची अ‍ॅथॉरिटी तुम्हांलाच काय, कुणालाही नाही. जर कुणी अशा भ्रमात असेल, तर सुदैवाने त्यांना फाट्यावर मारण्यासारखी परिस्थिती आज आहे. कधीकाळी ती नव्हती.

In reply to by बॅटमॅन

तर सुदैवाने त्यांना फाट्यावर मारण्यासारखी परिस्थिती आज आहे.
मी हेच म्हणतोय ना ! तुम्हाला विधीनिषेध मान्य नसतील तर संपुर्ण प्रथाच फाट्यावर मारा ना ! दॅट्स इट ! गायती काय की सज्जनगड काय .... मुळ बेस लाईन इतकीच आहे की सोप्पे सोप्पे नियम जरी आपल्याला फालतु वाट्ट असतील तरी ते पाळले पाहिजेत , जर नसतीलच पाळायचे तर त्या भानगडीतच कशाला पडा ? जे नियम पाळुन करतात त्यांना चीडवायला / डिवचायला काय ???????????? बाकी "विधीनिषेधांना फाट्यावर मारणार आन मनाला वाट्टेल तेच करणार " ह्याला मराठीत हट्टाग्रह म्हणतात असा माझा समज आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

मुळ बेस लाईन इतकीच आहे की सोप्पे सोप्पे नियम जरी आपल्याला फालतु वाट्ट असतील तरी ते पाळले पाहिजेत , जर नसतीलच पाळायचे तर त्या भानगडीतच कशाला पडा ? जे नियम पाळुन करतात त्यांना चीडवायला / डिवचायला काय ????????????
म्हणजे एखाद्या प्रथेतले काय अन किती घ्यावे याचे मूलभूत स्वातंत्र्यही प्रत्येकाला असू नये म्हणता? असे म्हणण्याचा अधिकार कुणाला आहे आणि तो का मान्य करावा? बरं हे तथाकथित डिवचणे म्हणजे तरी काय? इतर लोकांनी गायत्री मंत्र म्हटला हे पाहून त्या मंत्रावर मोनॉपॉली सांगणार्‍यांच्या पोटात का दुखावे हे मला कोणीतरी सांगा. एक चार ओळींचा मंत्र म्हणण्याची साधी इच्छा व्यक्त केली तर त्याला हट्टाग्रह म्हणणे, मंत्र काय तो विशिष्ट अल्पसंख्यांनीच म्हटला पाहिजे असा आग्रह धरणे हे माझ्या मते हट्टाग्रहात मोडते. बाकी चालू द्या.

In reply to by बॅटमॅन

जाऊ दे रे ब्याटमाना ! वेदोक्त कि पुरणोक्त यावादात शाहु छत्रपतींची बदनामी करण्यापर्यंत या दुराग्रही लोकांची मजल गेली होती!! या दुराग्रहात टिळकांसारखा व्यासंगी माणुसही आघाडीवर होता,तिथे प्रगोसारख्या पामरांकडून कसल्या लॉजिकल स्पष्टीकरणाची अपेक्षा करत आहात!!!

In reply to by नानासाहेब नेफळे

तुम्ही गप्प बसाहो नेफळे ...तुम्हाला वेद नको आहेत पुराणेही नको आहेत टिळकही नको आणि शाहुही नको आहेत ... तुम्हाला फक्त राजकारण करायचे आहे ... एक तर तुम्हाला वेदांविषयी आदर नाही तरीही वेदोक्तच पाहिजेल ...बर दिले तर नियमानुसार पाळणार नाही अन नाही दिले तर राडा करनार .... तुम्हाला व्यवस्थित ओळखुन आहेत सगळे !!

In reply to by प्रसाद गोडबोले

वेदोक्त दिले तर.... पुरणोक्त दिले तर.....>>>>> देणारे तुम्ही कोण? वाडवडीलार्जीत इस्टेट असल्यासारखे दावे का करतातय? वेद पुराणे ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे काय? वेद अपौरुषेय आहेत, याचा अर्थ कुणाचाही तिर्थरुपाची खाजगी मालमत्ता नाही, ज्याला जसे योग्य वाटेल तसे त्याने त्यातला सार घ्यावा ,कुणा प्रगोबिगोच्या परमिशनची गरज नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

चला काहीही कारणाने का होईना ... तुम्ही वेदांमधील सार घ्यायला तयार झालात हेच खुप झाले :) (पणत्वैयक्तिक टीका करुन तुम्ही परत तुमची "पातळी" दाखवत आहातच म्हणा )

In reply to by प्रसाद गोडबोले

वेद पुराणांच्या बाबतीत एका विशिष्ट समाजाने पझेसीव्ह व्हायचे कारण नाही! ती त्या समाजाची खाजगी मालमत्ता नाही ,एवढेच मला सांगायचेय!!

In reply to by नानासाहेब नेफळे

वेद पुराणांच्या बाबतीत एका विशिष्ट समाजाने पझेसीव्ह व्हायचे कारण नाही! ती त्या समाजाची खाजगी मालमत्ता नाही ,एवढेच मला सांगायचेय!!
बरं मग कधी येताय वेदोक्त मंत्र म्हणायला ? तुमच्या नावाने आपण एखादा छोटासा यज्ञच करुयात की !!

In reply to by बॅटमॅन

एखाद्या प्रथेतले काय अन किती घ्यावे याचे मूलभूत स्वातंत्र्यही प्रत्येकाला असू नये म्हणता? असे म्हणण्याचा अधिकार कुणाला आहे आणि तो का मान्य करावा?
हेच लॉजिक सर्वत्र लावणार काय ? सिलेक्टीव्ह सिलेक्शनचे मुलभुत स्वातंत्र्त्य ... ह्म्म ?? तसे असले तर वे वाक्य सवे करुन ठेवत आहे ... पुढे मागे कुठेतरी क्वोट करेन सविस्तर चर्चेच्या रेफरन्स साठी :)