✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मंत्रयोग - जपयोग

अ
अनिल तापकीर यांनी
गुरुवार, 07/17/2014 - 16:32  ·  लेख
लेख
मंत्रयोग - जपयोग शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात. जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय. २- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो. ३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही. ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता. आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो. जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
70530 वाचन

💬 प्रतिसाद (434)

प्रतिक्रिया

ग्रंथांतरी बोलिले.

चित्रगुप्त
Sat, 07/19/2014 - 03:41 नवीन
'ज' म्हणिजे काय 'प' म्हणिजे काय 'जप' म्हणिजे काय मज निरोपावे .. 'ज' म्हणिजे जगणे 'प' म्हणिजे पाप करणे 'जप' म्हणिजे पाप करित जगणे ग्रंथांतरी बोलिले.
↩ प्रतिसाद: मराठे

नाम "जपाला" विशेष महत्व

धन्या
Sat, 07/19/2014 - 14:43 नवीन
नाम "जपाला" विशेष महत्व असणार्‍या एका निरुपद्रवी संप्रदायाच्या अनुयायाकडून "विश्वात ठसवलेला तो विठ्ठल" अशी विठ्ठल या शब्दाची फोड ऐकली होती. त्यामुळे अशा अतर्क्य शब्दार्थांचे हल्ली नवल वाटत नाही.
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे

प्रसाद१९७१
Mon, 07/21/2014 - 16:40 नवीन
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.
"ज" वरुन "जेवण" आणि "प" वरुन पाप असे का नाही?
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अहो त्यांच्या शास्त्रात तसं

बॅटमॅन
Mon, 07/21/2014 - 16:43 नवीन
अहो त्यांच्या शास्त्रात तसं नाही. दुसरी शास्त्रे रचायासि प्रतिबंधु केलाय कवणें?
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

ज वरून जहाज आणि प वरून परात

स्पा
Mon, 07/21/2014 - 16:50 नवीन
ज वरून जहाज आणि प वरून परात पण होऊ शकते
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

ज वरून जाम आणि प वरून पाक पण

बॅटमॅन
Mon, 07/21/2014 - 17:02 नवीन
ज वरून जाम आणि प वरून पाक पण होऊ शकते. 'अन्न' शास्त्राप्रमाणे पाहिले तर हेच्च बरोबर आहे.
↩ प्रतिसाद: स्पा

स्वानुभधिष्ठीत माहीती मिळावी

नानासाहेब नेफळे
गुरुवार, 07/17/2014 - 20:44 नवीन
स्वानुभधिष्ठीत माहीती मिळावी
केलात ना घोळ! स्वानुभवाचा दाखला देऊन प वि सुक्ष्म देहाने मंगळावर जाऊन आले होते, ठेवणार आहात का विश्वास!!

सूक्ष्म देहाने प्रवास

चित्रगुप्त
Fri, 07/18/2014 - 00:16 नवीन
सूक्ष्म देहाने प्रवास काय, आम्ही सुद्धा करतो, पण मंत्र-जप वगैरे लई भारी दिसतंय, म्हणून विचारलंय. बघा आमच्या सूक्ष्मदेह-प्रवासाची हकिगतः पिंगळावेळ आणि आमचा आम्रविका खंडाचा सूक्ष्म - प्रवास http://www.misalpav.com/node/21492 आमचे मिपावरील लेखनः http://www.misalpav.com/user/9160/authored
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

काय ढिंच्याक लेख आहे

टवाळ कार्टा
Fri, 07/18/2014 - 10:25 नवीन
काय ढिंच्याक लेख आहे =)) \m/
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

अनुभव

भृशुंडी
Fri, 07/18/2014 - 01:09 नवीन
श्री तपकीर, तुम्हाला काही अनुभव आले असतील तर ते जरूर लिहा.

||ॐ||

प्यारे१
Fri, 07/18/2014 - 03:27 नवीन
||ॐ|| ||ॐ नमः शिवाय|| ||ॐ नमो भगवते वासुदेवाय|| ||श्रीराम जयराम जयजयराम||

@ अनिलराव माहिती आवडली.

मदनबाण
Fri, 07/18/2014 - 05:56 नवीन
@ अनिलराव माहिती आवडली. माझ्या माहिती प्रमाणे मंत्रांच्या उगम स्थानाचे ४ भाग आहेत. १}वैदिक २}उपनिषदातले ३}तांत्रिक ४}पौराणिक राम मंत्राचिया आवर्ती | घडती जयासी पुढतोपुढती | त्याचा जन्म धन्य ये क्षिती | सर्व कुळासी तारक ||१|| राम मंत्र आवडे जीवा | हाचि उद्धार सर्व जीवां | शिवासही विसावा | पार्वती सहित ||२|| रामकॄष्ण उच्चारे | तरती जड पामरें | ऐसें हें व्यासे निर्धारेम | नानाग्रंथी सांगितले ||३|| नामा जपे नाम मंत्र | आणिक नेणे नाना शास्त्र | राम नामे नित्य वक्त्र | हरी रंगें रंगले ||४|| इति :- श्री संत नामदेव. संदर्भ :- नाम महिमा अभंग १४६ नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥ रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥ हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥ ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥ संदर्भ :- श्री ज्ञानदेव हरिपाठ वासनेचे मूळ छेदिल्या वाचून । तरलोसे कोणी न म्हणावे ॥२३॥ न म्हणावे जाला पंडित वाचक । करो मंत्रघोष अक्षरांचा ॥२४॥ संत तुकाराम अभंग संदर्भ :- तुकाराम अभंगगाथा चला गणपती चे दिवस जवळ येत आहेत... आरती म्हणुन झाल्यावर मंत्रपुष्पांजली सर्व म्हणतातच नाही का ? ;) असो... वाचकांसाठी मंत्रपुष्पांजली चा अर्थ संदर्भ इकडुन घेतला आहे. जाता जाता :- माला तो कर में फिरे, जीभ फिरै मुख माहि । मनुवाँ तो चहुँ दिसि फिरै, यह तो सुमिरन नाहिं ॥ इति:- संत कबीर मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone

आssssssss हा .. मदनबाण......

मृगनयनी
Fri, 07/18/2014 - 09:41 नवीन
आssssssss हा .. मदनबाण...... क्या ब्बात कही है......... चोक्कस्स!!!...
चला गणपती चे दिवस जवळ येत आहेत... आरती म्हणुन झाल्यावर मंत्रपुष्पांजली सर्व म्हणतातच नाही का ?
व्हेरी गुड... एका दगडात बरे पक्षी.. हां..... ;)
↩ प्रतिसाद: मदनबाण

मदणबाण बाबा की जय !!!

खटपट्या
Fri, 07/18/2014 - 23:10 नवीन
मदणबाण बाबा की जय !!!
↩ प्रतिसाद: मदनबाण

मदणबाण बाबा की जय !!!

मदनबाण
Sat, 07/19/2014 - 07:55 नवीन
मदणबाण बाबा की जय !!! हॅं.हँ.हँ... नारायण ! नारायण ! काय साहेब गरीबाची चेष्टा करताय ? ;) बाबा तर आपले गुगल आहेत हो... खाली त्यांच्या भक्तांची प्रतिभा तर पहा... कसे म्हणतात, तन्नो गुगल प्रचोदयात | आता मला देखील गुगल बाबांची महती विषद करावी वाटते... ;) एन्जॉय माडी... :) जाता जाता :- हा ८० वा प्रतिसाद... और सिर्फ २० रन चाहिये सेंन्चुरी के लिये. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ७ समुंदर पार... :- विश्वात्मा
↩ प्रतिसाद: खटपट्या

वेर्री वेर्री फन्नी

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 07/19/2014 - 17:07 नवीन
वेर्री वेर्री फन्नी =))
↩ प्रतिसाद: मदनबाण

धन्यवाद

अनिल तापकीर
Mon, 07/21/2014 - 19:04 नवीन
धन्यवाद
↩ प्रतिसाद: मदनबाण

पहिल्या तीन प्रकारची साधना

बाळ सप्रे
Fri, 07/18/2014 - 10:23 नवीन
पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते
हातच्या कंकणाला आरसा कशाला.. कॉलिंग परा ..

चायला अजुन १०० नाहीत... १

टवाळ कार्टा
Fri, 07/18/2014 - 16:01 नवीन
चायला अजुन १०० नाहीत... १ मिपाकर म्हणुन शरम...वगैरे वगैरे ;)

कोणीतरी मंत्रपठण सुरु करा रे

टवाळ कार्टा
Fri, 07/18/2014 - 16:03 नवीन
कोणीतरी मंत्रपठण सुरु करा रे ... आहुती टाकणारे कुठे पानपतात गेले आहेत कुणास ठाउक
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खरंच की

प्रसाद गोडबोले
Fri, 07/18/2014 - 16:40 नवीन
मिपावर प्रतिसाद वाढवायला काहीतरी मंत्र असला पाहिजेल राव ... अनिलराव जरा शोधुन पहाता का ?
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हा चालतो का बघा....

सूड
Fri, 07/18/2014 - 16:43 नवीन
या देवि आंतर्जालेषु संस्थलरुपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सबुरी बाळगा. होतील.

प्यारे१
Fri, 07/18/2014 - 17:39 नवीन
सबुरी बाळगा. होतील.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

=============================

बॅटमॅन
Fri, 07/18/2014 - 16:10 नवीन
:) ===================================================== छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..ढिशक्यांव् ढिशक्यांव् ढिशक्यांव्!!!!

हे काय????

टवाळ कार्टा
Fri, 07/18/2014 - 16:39 नवीन
हे काय????
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हे काय????

धन्या
Fri, 07/18/2014 - 17:40 नवीन
हे काय????
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..ढिशक्यांव् ढिशक्यांव् ढिशक्यांव् असा नामजप.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

संस्कृत मंत्र जास्त प्रभावी

अधिराज
Fri, 07/18/2014 - 17:42 नवीन
संस्कृत मंत्र जास्त प्रभावी कि मराठी मंत्र जास्त प्रभावी?

संस्कृत वाणी देवे केली | मग

प्रसाद गोडबोले
Fri, 07/18/2014 - 18:13 नवीन
संस्कृत वाणी देवे केली | मग प्राकृत काय चोरांपासुनी झाली || असा सणसणीत प्रश्न व्हिचारुन ठेवलाय नाथांनी . धन्या , थांब रे थोडा जरा दम धर तुला रेफरन्स काढुन सांगतो *biggrin* तोवर ह्या मंत्राचा जप कर
" इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात || "
*lol*
↩ प्रतिसाद: अधिराज

इन्टर्नेटाय विद्महे | सर्च

अधिराज
Fri, 07/18/2014 - 18:53 नवीन
इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात ||
ये क्या मंत्र है, मै तो बोखला गया रे बाबा!
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अरे काही आहे की नाही?

चित्रगुप्त
Fri, 07/18/2014 - 17:47 नवीन
आपले तापकीर साहेब एवढ्या कळकळीनं 'शहाणे करुन सोडावे, सकळ जन' या रास्त हेतूनं काही माहिती देत आहेत, तरी नुस्ती टवाळी चालवलीय शिंच्यांनी. पुढे एकाद्या धूर्त अमेरिकन प्रकाशकानं "सेव्हन एन्शियंट सीक्रेट्स ऑफ मान्ट्रा-जॅपा योगा" किंवा "अमेझिंग पॉवर ऑफ मान्ट्रा-जॅपा" किंवा " हौ टु बिकम वल्ड्ज मोस्ट पॉवर्फुल पर्सनः मिरॅकल ऑफ मान्ट्रा-जॅपा योगा" असे पुस्तक "बेस्ट सेलर" म्हणून बाजारात आणले, की त्यावर उड्या घ्याल, आणि स्तुतिपर धागे काढाल. अरे काही आहे की नाही?

८०+ = ?

अत्रुप्त आत्मा
Sat, 07/19/2014 - 09:28 नवीन
८०+Image removed. = ?

(No subject)

टवाळ कार्टा
Sat, 07/19/2014 - 16:41 नवीन
=))
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

>>> ४- परा - यामध्ये जप

श्रीगुरुजी
Sun, 07/20/2014 - 13:24 नवीन
>>> ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. यालाच "अजपाजप" असेही म्हणतात.

तुम्ही कोणत्या स्टेजला आहात?

संजय क्षीरसागर
Sun, 07/20/2014 - 14:27 नवीन
ते प्रथम सांगा.
चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अशी देणगी मिळालेली हयात व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का?
यालाच "अजपाजप" असेही म्हणतात.
या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. तुमच्या परिचयात अशी कोणी व्यक्ती असेल तर तिला फक्त स्वानुभवाची एक पोस्ट इथे लिहायला सांगा (किंवा तिचं अनुभव कथन तुम्ही लिहा) आणि बघा काय मजा येते ती.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

>>> या स्टेजला गेलेली व्यक्ती

प्यारे१
Sun, 07/20/2014 - 14:57 नवीन
>>> या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. आपल्या ओळखीत वरील वर्णनाचं कुणी आहे वाटतंय. एवढ्या ठामपणं कसं काय म्हणू शकता?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आपल्या ओळखीत वरील वर्णनाचं कुणी आहे वाटतंय.

संजय क्षीरसागर
Sun, 07/20/2014 - 16:22 नवीन
अर्थात! तुम्हाला वैयक्तिक अनुभव घ्यायचा असेल तर करा सुरु साधना आणि अजपा सुरु झाला की कळवा. तुमची मुलाखत घेऊ!
↩ प्रतिसाद: प्यारे१

आमेन!

प्यारे१
Sun, 07/20/2014 - 17:47 नवीन
:) आमेन!
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>>> तुम्ही कोणत्या स्टेजला

श्रीगुरुजी
Mon, 07/21/2014 - 21:27 नवीन
>>> तुम्ही कोणत्या स्टेजला आहात ते प्रथम सांगा. ते तुम्हाला सांगायची गरज नाही आणि सांगून ते तुम्हाला कळणारही नाही. >>> ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अशी देणगी मिळालेली हयात व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का? तुमचा ग्रंथांवर विश्वास नाही आणि संतांवरही नाही. तुम्हाला स्वतःला शून्य अनुभव आहे आणि इतरांच्या अनुभवावर विश्वास ठेवायची तुमची तयारी नाही. तुम्ही स्वतः कधी अनुभव घ्यायचा प्रयत्न केलेला नाही. तरीदेखील अत्यंत ठामपणे तुम्ही जिलब्या पाडत आहात. बादवे, अशी देणगी मिळालेल्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत. >>> या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःच भ्रमिष्ट झालेले दिसताय (कदाचित गेले वर्षभर अखंड केलेल्या "अरविंद" जपाचा परीणाम असावा व त्यातूनच भ्रामकता आली असावी). जप/नामस्मरण यांविषयी कणभरही माहिती किंवा अनुभव नसताना तुम्ही त्याविषयी अत्यंत चुकीच्या आणि भ्रामक कल्पना मनात घट्ट धरलेल्या आहेत आणि आपल्याच भ्रामक कल्पना हेच वैश्विक सत्य आहे अशी चुकीची समजूत करून घेऊन त्या भ्रामक कल्पना ठामपणे मांडत आहात. पोहण्याचा अनुभव घेण्याकरीता किंवा पोहणे शिकण्याकरीता स्वतः पाण्यात उतरावे लागते. निव्वळ जिलब्या पाडण्याऐवजी काही दिवस स्वतः अनुभव घेऊन बघा आणि मग भाष्य करा. तुमच्या परिचयात अशी कोणी व्यक्ती असेल तर तिला फक्त स्वानुभवाची एक पोस्ट इथे लिहायला सांगा (किंवा तिचं अनुभव कथन तुम्ही लिहा) आणि बघा काय मजा येते ती.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बादवे, अशी देणगी मिळालेल्या

टवाळ कार्टा
Tue, 07/22/2014 - 16:05 नवीन
बादवे, अशी देणगी मिळालेल्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत.
नावे मिळतील का...एकदा चरणस्पर्श करुन येइन
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

केवळ चरणस्पर्श केल्यानी

कवितानागेश
Tue, 07/22/2014 - 16:12 नवीन
केवळ चरणस्पर्श केल्यानी तुम्ही पावन व्हाल ही तुमची अन्धश्रद्धा आहे कार्टासाहेब. ;) आणि खरोखरच स्पर्शानी काही होत असेल, तर तुमचा स्पर्श करुन घेउन उलट स्वतःच टवाळ होण्याचा धोका कोणता शहाणा माणूस पत्करेल? :P
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

केवळ चरणस्पर्श केल्यानी

टवाळ कार्टा
Tue, 07/22/2014 - 16:48 नवीन
केवळ चरणस्पर्श केल्यानी तुम्ही पावन व्हाल ही तुमची अन्धश्रद्धा आहे कार्टासाहेब.
मी पावन होईन असे मी म्हणालोच नाहीये ;)
आणि खरोखरच स्पर्शानी काही होत असेल, तर तुमचा स्पर्श करुन घेउन उलट स्वतःच टवाळ होण्याचा धोका कोणता शहाणा माणूस पत्करेल?
=))
↩ प्रतिसाद: कवितानागेश

>> खरं सांगायचं तर तुम्ही

llपुण्याचे पेशवेll
Tue, 07/22/2014 - 18:05 नवीन
>> खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःच भ्रमिष्ट झालेले दिसताय (कदाचित गेले वर्षभर अखंड केलेल्या "अरविंद" जपाचा परीणाम असावा व त्यातूनच भ्रामकता आली असावी). जप/नामस्मरण यांविषयी कणभरही माहिती किंवा अनुभव नसताना तुम्ही त्याविषयी अत्यंत चुकीच्या आणि भ्रामक कल्पना मनात घट्ट धरलेल्या आहेत आणि आपल्याच भ्रामक कल्पना हेच वैश्विक सत्य आहे अशी चुकीची समजूत करून घेऊन त्या भ्रामक कल्पना ठामपणे मांडत आहात. पोहण्याचा अनुभव घेण्याकरीता किंवा पोहणे शिकण्याकरीता स्वतः पाण्यात उतरावे लागते. निव्वळ जिलब्या पाडण्याऐवजी काही दिवस स्वतः अनुभव घेऊन बघा आणि मग भाष्य करा. << सहमत. मस्तं. हेच म्हणायला आलो होतो.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

एवढ्या ठामपणं कसं काय म्हणू

मदनबाण
Sun, 07/20/2014 - 17:23 नवीन
एवढ्या ठामपणं कसं काय म्हणू शकता? जिलबी बाबा गीता न वाचता त्या बद्धल बोलु शकण्याचा दावा करु शकतात, तर ते यावर सुद्धा ठामपणं सांगु शकतात ना ? ;) मननेन त्रायते इति मन्त्रः - जो मनन करने पर त्राण दे वह मन्त्र है ही व्याख्या / फोड खरी असेल तर मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं कसं होइल ? ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- En Uchimandai... :- Vettaikaran

हवाबाण!

संजय क्षीरसागर
Sun, 07/20/2014 - 20:03 नवीन
फुल रजा घेऊन, फक्त एक दिवस, अ‍ॅटॅचड्य टॉयलेट असलेल्या, बंद खोलीत, जेवणासाठी सुद्धा बाहेर न येता, कोणत्याही एकच-एक मंत्राचं, सतत उच्चारण करुन पाहा. एका दिवसात डोकं भणभणून जाईल. (मध्यमा) दुसर्‍या टप्प्यात, तीन दिवस फुल रजा घेऊन (बंद खोलीतून अजिबात बाहेर न येता) तो प्रयोग करुन पाहा. हळूहळू इतर सर्व विचार करण्याची क्षमता संपून मेंदू बधीर होऊन जाईल. (पश्यंती) शेवटी, आठवडाभरची रजा, घेऊन त्याच बंद खोलीत, फुल्ल अनुष्ठान करा (परा!). मग अजपा सुरु होईल. मनाची सगळी प्रक्रिया तुमच्या आवाक्या बाहेर जाईल. तुम्ही कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरी जप थांबणार नाही. Now the person has gone mad. He has lost control over his thinking process. He can't focus on anything because the mind inside constantly distracts him! पब्लिक उगीच टाईमपास म्हणून वैखारी पुरतं मर्यादित आहे, त्यामुळे `जगी या खास वेड्यांचा पसारा दाटलेला' दिसत नाही इतकंच.
↩ प्रतिसाद: मदनबाण

खत्तरनाक अनुमोदन.

नानासाहेब नेफळे
Sun, 07/20/2014 - 21:42 नवीन
खत्तरनाक अनुमोदन. वेल सेड संजयभाऊ.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अगागागागागा! कस्लं भारी!

प्यारे१
Sun, 07/20/2014 - 21:50 नवीन
अगागागागागा! कस्लं भारी! =)) वरच्या नामस्मरण/ जपाबद्दलच्या अत्यंत चुकीच्या कल्पना आहेत. असहमत आहोत. तरीही असो.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

+१

मदनबाण
Mon, 07/21/2014 - 10:45 नवीन
पब्लिक उगीच टाईमपास म्हणून वैखारी पुरतं मर्यादित आहे, त्यामुळे `जगी या खास वेड्यांचा पसारा दाटलेला' दिसत नाही इतकंच. हॅ.हॅ.हॅ... माझ्या पहिल्या प्रतिसादात शेवटी कबिराचा दोहा दिला आहे तो परत एकदा वाचा... त्याचा अर्थ हातात माळ ओढणे चालु आहे,तोंडाने जिभेवाटे नामस्मरण चालु आहे,पण मन मात्र चारही दिशेला भटकत आहे अशा वेळी भगवंताशी एकरुपता कशी साधता येइल ? अनेक संतांनी वैखरी हा निषिद्ध सांगितला आहे. बाकी तुम्ही फार छान कल्पक जिलबी पाडली आहे. ;) जाता जाता :- अजपा साधना मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा
↩ प्रतिसाद: प्यारे१

हवाबाण!

संजय क्षीरसागर
Mon, 07/21/2014 - 12:18 नवीन
प्रतिसादाची घाई करण्यापूर्वी नीट वाचत चला. यापूर्वीच्या प्रतिसादात आधीच सांगितलंय :
ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अशी देणगी मिळालेली हयात व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का?
तरीही आपण दिव्यप्रभा प्रकट केली आहे :
अनेक संतांनी वैखरी हा निषिद्ध सांगितला आहे.
वैखारी निषिद्ध करुन (थोडक्यात बाह्योच्चारण हा पहिला चरण वगळून) तुम्ही काय घंटा नामस्मरण करणार? मध्यमेला जायला वैखारी अनिवार्य आहे हे कळायला नामस्मरण करण्याची सुद्धा गरज नाही. असो, तुमच्या फालतू लिंका वाचायला मला वेळ नाही. स्वतःचा अनुभव लिहा. आणि खरंच प्रचिती घ्यायची असेल तर तुमचा प्रिय मंत्र `श्रीराम जयराम जयजय राम' मी सांगितलेल्या प्रक्रियेनं (किंवा तुमच्या अक्कलहुशारीनं) अजपा करुन दाखवा. तेवढं झाल्यावर, माझा प्रतिसाद स्मरणात राहिला तर (कारण तदनंतर तुम्हाला सदासर्व काळ केवळ रामनामाचा जयघोषच ऐकू येईल आणि सगळीकडे भगवंतच दिसायला लागेल!)... इथे कळवा. तुम्ही असाल तिथे तुमच्या मुलाखतीची व्यवस्था करतो!
↩ प्रतिसाद: मदनबाण

वैखारी निषिद्ध करुन (थोडक्यात

मदनबाण
Mon, 07/21/2014 - 12:42 नवीन
वैखारी निषिद्ध करुन (थोडक्यात बाह्योच्चारण हा पहिला चरण वगळून) तुम्ही काय घंटा नामस्मरण करणार? मध्यमेला जायला वैखारी अनिवार्य आहे हे कळायला नामस्मरण करण्याची सुद्धा गरज नाही. जिलबी बाबा चला तुम्हाला इतके समजले ही देखील मोठी गोष्ट आहे ! ;) ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अरे ? तुम्ही सगळच नाकारताय ! ज्यांनी ही शिकवणी अख्या जगताला दिली ते नक्की काय आणि का सांगताय ते पहायला नको ? अर्थात तुम्ही गीता न-वाचता त्या बद्धल बोलु शकण्याचा दावा करु शकतात तेव्हा प्रतिसाद सुद्धा नीट वाचत नसणार याची खात्री आहेच. ;) तुमच्या फालतू लिंका वाचायला मला वेळ नाही. स्वतःचा अनुभव लिहा. तुम्हाला काही वाचण्याचा आग्रह नाहीच आहे... ज्यांना त्यात रस आहे त्यांच्यासाठी ती लिंक आहे.तुमच्या फालतु निर्थक जिलब्या पाडण्या पेक्षा जरा श्वासावर लक्ष केंद्रित करा पाहु ! मन ताळ्यावर येइल तुमचे आणि जिलब्या पाडणे लगेच बंद होइल बघा. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ जरा श्वासावर लक्ष केंद्रित

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/21/2014 - 12:49 नवीन
@ जरा श्वासावर लक्ष केंद्रित करा पाहु ! मन ताळ्यावर येइल तुमचे आणि जिलब्या पाडणे लगेच बंद होइल बघा.>>> Image removed.Image removed.Image removed.
↩ प्रतिसाद: मदनबाण
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा