बिया हव्यात बिया, कोणी बिया देइल का?
गुंडेगाव (ता. नगर) येथील राजाराम भापकर गुरूजी (वय ८४). सध्या जलसंधारणाच्या कामाने झपाटले आहेत. ब्रिटिशांच्या काळात नदी-नाल्यांच्या किनारी जांभळाची बने होती. त्यामुळे पाणी आणि माती धरून ठेवण्याचे काम होत असे, हा संदर्भ त्यांना सापडला. तेव्हापासून त्यांनी गावातील नदी-नाल्यांच्या काठी जांभळाची लागवड करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी ते दररोज सकाळी आपल्या मोपेडवर गुंडेगावहून नगरला येतात. त्यांच्या दुचाकीला एक प्लास्टीकचा क्रेट बांधलेले असते. मार्केट यार्डमध्ये जाऊन ते जांभळे खरेदी करतात. सध्या जांभूळ सुमारे १०० ते १२० रुपये किलो आहे. दररोज हजार रुपयांची जांभळे घेऊन ते शहरात येतात, बँका, दुकाने, लोकांची एकत्र बसण्याची ठिकाणे येथे जाऊन गप्पा मारत बसलेल्या लोकांना ते मोफत जांभळे देतात. त्यांनी सोबत कॅरी बॅगही ठेवल्या आहेत. जांभळे खाणाऱ्याला त्या देऊन त्यात बिया संकलित करतात. लोक जांभळे खात असताना गुरूजी त्यांना जलसंधरणाचे महत्त्व सांगतात. लोकांनाही ही कल्पना आवडते. या वयातही गुरूजी करीत असलेल्या धडपडीचे कौतुक करीत लोक जांभळांवर ताव मारतात. तर काही आणखी फुकटे भेटतात. मिळालेली जांभळे पार्सल बनवून घरी नेण्याचाही प्रयत्न करतात, असा अनुभवही गुरूजींनी सांगितला.
आता या बिया भापकर गुरूजी वनविभागाकडे देणार आहेत. उपवनसंरक्षक डी. टी. चव्हाण यांनी या बियांपासून रोपे करून देण्याचे आश्वासन गुरुजींना दिले आहे. रोपे तयार होण्यासाठी साधारणपणे वर्ष लागले. पुढील पावसाळ्यात ती गुंडेगाव येथील नदी नाल्यांच्या किनारी लावण्यात येणार आहेत.
'बिया दान करा'
यासंबंधी भापकर गुरूजी म्हणाले की, सध्या आपण पेन्शनच्या पैशातून हा उपक्रम राबवित आहोत. एक हजार रुपयांची जांभळे घेतल्यानंतर दोन ते तीन किलो बिया पडतात. मात्र आणखी बियांची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी जांभळे खाऊन बिया दान कराव्यात. अधिक माहितीसाठी ९४२०६४२९८१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
साभार : जांभूळ खा, जलसंधारण वाढवा!
मी आत्ताच भापकर गुरूजींशी बोललो आहे. त्यांनी आपल्याला गुंडेगाव (ता.नगर) भेटी साठी बोलवले आहे.
एकूण ५ लाख बिया हव्यात. देतांना जांभूळ खाल्यानंतर ८ दिवसात पोचत्या केल्यासच त्यापासुन (जास्तित जास्त १५ दिवसात)रोप तयार होउ शकते आहेत. त्यासाठी सर्वांना नम्र विनंति की पूढच्या आठवड्यांत बियांसोबत गुंडेगाव (ता.नगर) ला कट्टा कसा करता येईल हे पहावे.जी मिपाकर मंडळी येतील त्यांना माझ्याकडुन अजुन एक सरप्राईझ मिळेल.
धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चांगला उपक्रम...
अभिनंदन.
छान उपक्रम.. काही करता येती
चालेल की.
आत्ताच ही बातमी चा वाचली
वेरी गूड आयडिया!
विशेषतः उंबर.
फळदार झाडे
फळझाडे लावल्यामुळे अजून हा
>>घरी फणसाचे झाड आहे पण
असा का दिसतोय प्रतिसाद?
(No subject)
झाडे लावायचीच झाली तर वड
http://misalpav.com/node
अतिशय स्पृहणिय उपक्रम आहे.
खुपच अभिनव उपक्रम आहे .पण जांभुळच का ते कळाले नाही.याला +१. जांभळाबरोबर इतरही फळझाडे अथवा इतर उपयोगी झाडे (वड, पिंपळ, इ) जलसंधारणास उपयोगी झाडे लावण्यास हरकत नसावी. पण निदान कोणी हे काम पदरमोड करून करतो आहे हेच कितीतरी असाधारण आहे !!!स्तुत्य उपक्रम. अन्य फळझाडेही
मस्त आयडिया !
आलात तर सरप्राईझ मिळेल की हो!
स्तुत्य उपक्रम.
त्या नदीकाठी पेरुन
पाणी अडणार आहे का पण?
मार्गदर्शन नक्की कशाबद्दल?
अतिशय स्तुत्य उपक्रम.
सहमत
जांभळाचे लाकुड हे वॉटर रेझिस्टंट असते
तुमचा प्रतिसाद वाचून बर्याच
हा हा हा!
भापकर गुरूजींचा हा चांगला
बिया पेरणे
मस्त उपक्रम!
वाळा
फारच छान उपक्रम. शुभेच्छा.