उंबरठा नसलेले घर -- १
काय झालं कुणास ठाऊक पण
काल रात्री पावसात या घराचा
उंबरठाच वाहून गेलाय
तेव्हापासून घरातल्या सगळ्या वस्तू
जणू स्वतंत्र झाल्या आहेत
----
बैठकीच्या खोलीत
कोपर्यातल्या मेजावर
एक फुलदाणी होती
..
काल रात्रीपर्यंत होती
सकाळी अंगणात सापडली
पहाटेच्या वर्षावात एखादं फुलं
पदरात पडेल
या आशेने अंगणात आली असावी बहुदा
----
देवघरासमोरील समईची मंद ज्योत
आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्याशी
पोहचेनाशी झालीये
त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या
दिशेने झुकत राहते
थरथरत
----
तिच्या पुस्तकांची एक अलमारी आहे
उजाडल्यापासून बघतोय
थडाथड दारं आपटतायत
बहुदा तिची डायरीही असावी त्यात
----
काय झालं कुणास ठाऊक पण
गेला एकदाचा
रात्रभर बरसून
पाऊस फुलं देऊन.. गेला
आता अंगणात परत एकदा शांतता नांदेल
----
पण आता अंगणातली माती
चक्रीवादळात अडकल्यासारखी
आत-बाहेर होतेय
-----
अंगणातली फुलं सांभाळायची कि
उंबरठा नसलेले घर
तेच उमजत नाहीये तिला
-----
काय झालं कुणास ठाऊक पण
काल रात्री पावसात या घराचा
उंबरठाच वाहून गेलाय
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२४/०६/२०१४)
नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
+१
जबरा
(No subject)
सुंदर...
अप्रतिम...
नेहमीप्रमाणेच मस्त!!
पुण्यातल्या घराचा उंबरठा
व्वा !
अंगणातली फुलं सांभाळायची कि
सुन्दर कविता!
हा वेडा माणूस आहे....
एका कथा विषयाशी, इतक्या विविध कल्पना
__/\__
दणकून लागतात रे तुझ्या कविता
काय म्हणू?
भावली.
सुंदर !
सुरेख.तुमच्या कवितेत 'भाग १'
थिम चांगली मांडणी विस्कळीत वाटली.
हा मिका कुठे गेला?
हम्म
माझ मत
दीर्घ प्रतिक्षेनंतर तुझा प्रतिसाद सुखावून गेला
इतकं वेगळं काही बघितल्याच्या
कविता आवडली. प्रा.डाँ.च
सुरेख!
सुंदर कविता
वा कविराज!
देवघरासमोरील समईची मंद ज्योत
वाहुन गेलेला उंबरठा
मिका रॉक्स
सुंदर कविता.....!आवडलं.
मिसळलेला काव्यप्रेमी फार सुंदर कविता.......
मस्त कविता...
छान.......मस्त !!
!!
क्या बात!